Maharashtra News Live Update : व्हॅलेंटाईन डे साजरा करायला जाताय? जरा जपून, प्रेमात विर्जन पडू शकतं

| Updated on: Feb 16, 2022 | 6:09 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : व्हॅलेंटाईन डे साजरा करायला जाताय? जरा जपून, प्रेमात विर्जन पडू शकतं
Follow us on

मुंबई : आज रविवार 13 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. सोमवारी काही राज्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी गोव्याकडे विशेष लक्ष दिलं आहे. गोव्यातील जनता कुणाला मतदान करणार हे पाहावं लागणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढलेला दिसून येत आहे.  आज हार्बर आणि ट्रान्सहार्बर लाईन वर मेगाब्लॉक असणार आहे. मेन लाईन वर मेगा ब्लॉक नसेल, असं  रेल्वेकडून कळवण्यात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Feb 2022 10:39 PM (IST)

    ऑटोचालकाने चार जणांना दिली धडक

    चेबूर लालडोंगर रोडवर दारूच्या नशेत असलेल्या ऑटोचालकाने चार जणांना दिली धडक…

    – चारही जण जखमी… पोलिस घटनास्थळी दाखल…

    – परिसरात माजली खळबळ… आरोपीला चुनाभट्टी पोलिसांनी घेतलं ताब्यात…

    – जखमींना आसपासच्या रुग्णालयात केलं दाखल…

  • 13 Feb 2022 09:02 PM (IST)

    नाशिक – वडिलांसोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार

    उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

    परिसरातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

    आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल


  • 13 Feb 2022 07:02 PM (IST)

    अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर शाई फेक प्रकरण

    आरोपींना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी

  • 13 Feb 2022 06:09 PM (IST)

    किरीट सोमय्यांच्या आरोपावर स्पष्टीकरण

    व्यावसायिक सुजित पाटकरांवर सोमय्यांचे आरोप

    आमची कशातही भागिदारी नाही-पाटकर

    आम्हाला कायदेशीररित्या कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे

     

  • 13 Feb 2022 05:14 PM (IST)

    आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या विरोधात काॅग्रेसचा आक्रमक पवित्रा

    मुंबई युथ काँग्रेसकडून आंदोलन,

    गाढवावर आसामच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आंदोलन

    आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या फोटोलाही काळे फासले

    आमदार झीशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

    उत्तराखंडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे.

    काय म्हणाले सिद्दक्की?

    आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो

    आज आम्ही त्यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड काढली यांच्या फोटोला काळं फासलं आणि राहुल गांधीं बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या फोटोला चपला मारल्या,

    हेमंत बिस्वा सरमा यांचा भाजपने राजीनामा घेतला पाहिजे

    काँग्रेसन आता निषेध व्यक्त करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय

  • 13 Feb 2022 04:49 PM (IST)

    हैदराबादेतून राष्ट्रपती रामनाथ कोविंद Live

    स्वामींनी इतिहास रचला-राष्ट्रपती

    भारताच्या गौरवशाली इतिहासात भक्तीची मोठी परंपरा

    रामानुजाचार्य यांच्या प्रतिमेचे अनावरण करणे हे सौभाग्य

    हे स्थळ भक्तीभूमि आहे

    तेलंगानाचा प्रत्येक दौरा माझ्यासाठी महत्वाचा

  • 13 Feb 2022 04:41 PM (IST)

    हा जाती भेद नाही का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

  • 13 Feb 2022 03:58 PM (IST)

    रोहित पाटील 121

    – कवठेमहांकाळच्या विजयानंतर रोहित पाटील ने घेतली अजित पवारांची भेट,

    – बारामतीतल्या सहयोग या अजित पवारांच्या निवासस्थानी घेतली भेट,

    – बारामती मॉडेल कवठेमहांकाळ मध्ये राबवण्यासाठी घेतली भेट,

    – सध्या मतदारसंघात पक्ष बांधण्याचे काम सुरू आहे, तरुणांना जोडण्याचं काम सुरू आहे,

    – पक्ष विचार करेल ती जबाबदारी घेणार,

    – हिसाब वादावर सध्या अभ्यास करतोय, रोहित पाटलांची सावध भूमिका.

  • 13 Feb 2022 03:46 PM (IST)

    सांगली

    सांगलीत अवतरली शिवशाही

    सांगलीत भरले 1111 गडांच्या फोटोचे प्रदर्शन

    गडांच्या फोटोचे भारतातील सर्वात मोठं आणि पहिलेच प्रदर्शन

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गडांच्या फोटोचे प्रदर्शनाचे आयोजन

  • 13 Feb 2022 03:45 PM (IST)

    गडचिरोली

    आलापल्ली जंगलात वाघाच्या मृतदेह आढळला,

    दोन वाघाच्या लढाईत मृत्यू झाल्याचा संशय

    आलापल्ली वन विभागातील खंड क्रमांक 12 मध्ये एक पट्टेदार वाघ आहे त्या वाघासोबत या दीड वर्षाच्या वाघाची लढाई झाली असल्याची संशय वन विभागाने व्यक्त केल

    वन विभागाचा गस्ती दरम्यान माहित पडलं वन विभागाला

    या दोन महिन्यात आलापल्ली वन विभागात दोन वाघांचा मृत्यू

  • 13 Feb 2022 03:44 PM (IST)

    नाशिक

    घटस्फोटासाठी सुवर्णा वाझे यांनी मागितले होते पती संदीप यांच्याकडे 50 लाख

    50 लाखांची मागणीच ठरली सुवर्णा वाझे यांच्या हत्येच मुख्य कारण

    संदीप वाझे यांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड

    संदीप वाझे यांना करायचे होते दुसरे लग्न

    मात्र सुवर्णा वाझे यांनी घटसफाटासाठी केली 50 लाखांची मागणी

    यामुळेच काटा काढण्यासाठी पती संदीप वाझेने केली पत्नी ची हत्या

    पोलिसांकडून 5 जवळच्या लोकांची कसून चौकशी सुरू

  • 13 Feb 2022 02:51 PM (IST)

    नाना पटोले

    आसामच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी
    मोदींच्या वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन करणार
    उद्या फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर काँग्रेसचे आंदोलन
    हिजाबचं नंतर बोला आधी आम्हाला रोजगार द्या

  • 13 Feb 2022 02:47 PM (IST)

    अमरावती

    मनपा आयुक्त डॉ प्रविण आष्टीकर यांच्यावर शाई फेक प्रकरण…

    अटकेत असलेल्या पाच आरोपींची पोलीस कोठडी आज संपली…..

    काही वेळातच आरोपींना हजर करनार न्यायालयात…..

    उर्वरित सहा आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना…

  • 13 Feb 2022 02:46 PM (IST)

    आदित्य ठाकरे बाईट

    On Vidrbha Doura

    सगळीकडे शासकीय दौरे सुरू झालेले आहे… आज चंद्रपूरचा दौरा करत आहे तिथे रामाळा तलाव संदर्भात काही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या… तिथे जाऊन तिथल्या सुशोभीकरण आणि स्वच्छते संदर्भात बैठक करणार आहे…

    On Fly Ash Pollution

    नागपूर जिल्ह्यातील नांदगावमध्ये खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाच्या फ्लाय एशचा डम्पिंग बंद केलेला आहे…. तिथल्या नागरिकांच्या काही तक्रारी केल्या होत्या… उद्या तिथे जाणार आहे… आता फ्लाय एशच्या डंपिंग बद्दल परमेंट सोल्युशन कसा काढता येईल याबद्दल मार्ग काढणार.. विदर्भात पर्यावरण जपायला मोठा वाव आहे…. इथे चांगली वने आहेत, पर्यावरणावर प्रेम करणारी माणसं आहेत…

    On Goa Election

    गोव्यामध्ये उद्या मतदान आहे… त्यामुळे आज त्या संदर्भात काहीही बोलू नये…

    On Ajni Van

    नागपूरच्या अजनी वनच्या संदर्भात आम्ही नागपूरच्या नेत्यांसोबत संघर्षाच्या भूमिकेत नाही… अजनी वन साठी स्थानिक नागरिकांकडून आम्हाला अनेक तक्रारी आल्या होत्या… अजनी वन वाचण्यासाठी ते आग्रही आहेत… असं नाही की तो स्टेशन कोणाला नको आहे.. जर पर्यावरण वाचवून शाश्वत विकास होत असेल… तर मी त्या बाजूने आहे… त्या संदर्भात मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू…

    On Shivsena Leadership

    शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही निवडणूक लढवत असतो… आमच्या सगळ्या आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवत असतो… आम्ही सर्व मिळून एक टीम आहोत…

  • 13 Feb 2022 02:26 PM (IST)

    हरी नरके

    Obc आरक्षण थांबले आहे खरा प्रश्न शिक्षण,रोजगार ,आरोग्य ,आर्थिक प्रश्न मोठा आहे…

    लोकसंख्या आकडेवाडी माहीत नाही म्हणून पैसे मिळत नाही

    त्यामुळे अनेक समस्या समोर येत आहे

    विकासाचे राजकारण हे पवार यांचा मुद्दा आहे..

    मुद्दा नाही म्हणून मोदी सरकार धार्मिक फैलावत आहे

    Obc मध्ये 97 % मुस्लिम आहे

    माझा मुलीने काल हिजाब घालून फोटो काढला मी काहीही बोललो नाही

     

    जितेंद्र आव्हाड

    समोर बसल्याचा आवाज कमी

    जोरात ओरडा

    चूप बसून आरक्षण मिळणार नाही

    आपल्याला लढाही करावी लागेल

    बेबीच्या टोका पर्यंत ओरडा

    आरक्षण हा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही

    शोषित लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे

    बाबासाहेब आणि महात्मा फुले यांनी संगीतले आहे

    जोती बा फुले यांचा जास्त अभ्यास आहे

    काल मार्क्स च्या पेक्षा 1 इंच फुले कमी न्हवते

    कुत्र्यांची जनगणना होते मात्र obc जनगणना होत नाही

    माझा मूळ इशारा

    आपल्याकडे 354 जाती आहे अनेक जातीचे लोक आले इथे

    मी स्वतःच obc आहे मी राजकारण केले नाही पण याच्या साठी मला लढावे लागणार

    महाराष्ट मध्ये सर्वात जास्त डोक्यावर छप्पर नाही ते आदिवासी आणि भटके आहेत

    आपण मागासवर्गीय आहे हे सांगायची लाज वाटते काहींना

    माझा आईला सत्य नारायण ला बोलत नसेल

    मोदी ला कोणी काय दिले यावर मी बोलणार नाही

    मंडळ आयोग मुळे तुमच्या कडे महापौर झाले

    पहिली महापौर सोलापूर ची कलाल समाजाची झाली

    दारू विकणारा हा समाज आहे..

    पूर्वी टेलर दुकाने होते आता कुठे आहे

    बिहार मध्ये पिछडा त्यांना जाणीव आहे

    आपल्या अधिकारची जाणीव नाही

    आपल्या महाराष्ट्र मध्ये जाती बाबत ओळख नाहींभे दुर्देवी आहे

    शिक्षण नोकऱ्या आरक्षण

    नोकऱ्या राहिल्या कुठे

    ज्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती मात्र आरक्षण काढल्याने 11 लाख लोकांची पदे गेली

    तुमच्या तोंडातून आवाज निघत नाही

    शहरी करणं मध्ये 100 मुलांपैकी 8 जण पदवीधर

    Obc मध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त आहे..

    महाराष्ट्राची केस सुप्रीप कोर्टात उभी राहिली तेव्हा पार्लमेंट मध्ये या सुप्रीम कोर्टात चुकीव्हे बोलतात

    संघटनेने संविधानाला विरोध केला मग तो आरक्षण ला कसा पाठिंबा देणार

    कर्नाटक मध्ये तिरंगा खाली आणला

    भगवा बाबत अभिमान आहे

    शिवाजी महाराज यांना सलाम करतो

    मानतो जिजाऊ ला सती जाऊ दिले गेले नाही..

    ऑन हिजाब

    हिजाब तो सुरवात हे ‘किताब अभि बाकी आहे

    काय घोषणा स्कर्ट घालायचे नाही कोणता दर आणि हिजाब घालायचा नाही हे श्रीराम सेना ठरवणार का मोदी च्या मिनिसर्टी मध्ये ड्रेस कोट ठरवा..

    कोणत्या राज्यात काय पाठवावे कपडे

    Obc पुढे गेले त्यांच्या डोळ्यात बुचत होते

    हा घर काम करणाऱ्या आता इंजिनीअर होतो..

    ते आता खुपत आहे काहींना ….

    आपल्या घरात देबघर मध्ये महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब यांचा लावा

    शरद पवार साहेब मुळे आपले नशीब फलफलले

    आमचा जीव तुटतो शिक्षणात अडचण म्हणून

    खरे आरक्षण जे आहे ते हवे मात्र मेरिट मधून आमचे आरक्षण काढुच शकत नही

    55 टक्के आरक्षण जागा शिक्षकांच्या आहे..

    मंडळ आणि कमंडल समोर आयोग समोर आले..

    ही नवीन पिढीची लढाई आहे

    प्राण्यांची होते पण जंगणना आणि माणसांची होत नाही

    शिवाजी महाराजांच्या कडे जास्तीत जास्त obc समाज होता.

    आपल्या पिढ्या काही शिकल्या तर आपण पुढे जातो आणि जात विसरतो

    मात्र जावा धरावी मध्ये जावा

    माझा बाप हमाली केली लाज का बाळगली नाही

    माझा बाप गावी गेला नाही
    शेती नाही माझा बाप 22 वर्ष vt स्टेशन ला झोपले..

    खूप कष्ट घेतले माझी आई लेमिंटन रोड ला भाजी विकत असे

    हाय मी वंजारी

    मी ज्ञानात कमी नाही भाषेत कमी नाही कशात कमी नाही तुमच्यात देखील असेच दिसले पाहिजे सर्वात धडकी भरली पाहिजे..

    पवार साहेबांन मुळे मी इथे आहे

    गरी बांच्या साठी काही कामे हाती आलेली आहे..

    कामाठी पुरा येथे येत्या महिन्यात बदल करणार

    कामाठी पुरा एटेहासिक आहे

    त्या ठिकाणी कामठी लोक आले मुंबई मध्ये काम जे झाले ते कामाठी वाले होते म्हणून कामाठी पुरा म्हणतात..

    आज ही बिचारे आरक्षण गेले त्या 10 बाय 10 मध्ये राहतात

    तिथे मी गेलो जेवलो जेवण उत्कृष्ट होते

    देवाने माझा साठी काम करायचे तर ते काम मी करेन

    गरिबी काय असते ते मी बघितले

    ते काम देवा माझा हातातून करून घे

    आपली ताकत दाखवा

    उत्तर प्रदेश आणि बिहार obc मुख्यमंत्री ठरू शकतो तर महाराष्ट मध्ये का नाही??

  • 13 Feb 2022 12:44 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हा आशा प्रकारचे निर्णय सरकार घेताय : अण्णा हजारे

    ही काय आपली संस्कृती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हा आशा प्रकारचे निर्णय सरकार घेताय

    काल सरकारचे लोक आले होते

    त्यांना सांगितले मंत्री मंडळात निर्णय घेतला, मात्र जनता मालक आहेय त्यांना विचारूनच निर्णय घ्यायला हवाय

    काल प्रधान सचिव नायर यांनी सांगितलं जनतेला विचारल्या शिवाय हा निर्णय घेणार नाही

    2014 ला जे आंदोलन झाले, तेव्हा देखील जनतेचा विचार घ्या सांगितले होते

    त्यामुळे त्यांनी काल मान्य केलं की आम्ही यापुढे जो निर्णय घेऊ तो लोकांना विचारून घेऊ

    त्यांनी लेखी आश्वासन दिले

  • 13 Feb 2022 12:39 PM (IST)

    तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही, असा निरोप दिल्यानंतर हालचाली सुरु : अण्णा हजारे

    लोकसभा आणि विधानसभेला ग्रामसभेने बनवलं

    आम्ही ग्रामसभेला प्राधान्य देतो

    मंत्री मंडळाने निर्णय घेतला वाईन ही किराणा दुकानात विक्रीला ठेवायची

    यामुळे लहान मुलांना व्यसन लागू शकते

    यामुळे पिढ्या बरबाद होतील

    बियर बार चे दुकाने आहे, वाईनचे दुकाने आहे मग किराणा दुकानात का ठेवलाय

    व्यसनाने लोक बरबाद झाले, बालके याच्या अधीन गेले तर काय होणार ही राष्ट्राची संपत्ती आहेय

  • 13 Feb 2022 11:19 AM (IST)

    गोव्याच्या मतदानाची तयारी पूर्ण

    गोव्याच्या मतदानाची तयारी पूर्ण

    गोव्याच्या मुख्य निवडणुक अधिकारी आयए एस कुणाल यांची माहिती

    अफवांवर विश्वास ठेवू नका निर्भयपणे मतदान करा

    निर्भय आणि शांततापुर्ण मतदानासाठी आम्ही सज्ज

    सेंट्रल फोर्स गोव्यात निवडुणीसाठी दाखल

    जेष्ठ नागरिकांना मतदान त्यांच्या घरी करता येणार त्यासाठी  १९५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे गोवा निवडणुक आयोगाचे आव्हान

  • 13 Feb 2022 10:31 AM (IST)

    पश्चिम  बंगाल निवडणुकीनंतर सरकार पडेल असंही सांगत होते : संजय राऊत

    चंद्रकांत पाटील यांच्याविषयी सहानुभूती आहे, ते निष्पाप मनाचे नेते आहेत

    सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतात

    10 मार्चनंतर सरकार पडेल असं सागंतात, पश्चिम  बंगाल निवडणुकीनंतर सरकार पडेल असंही सांगत होते

    ईडी, सीबीआय हे त्यांचे हत्यार आहे

    लोकसभा निवडणूक आल्यानंतर सरकार पाडतील

    आम्हाला पाडता पाडता ते स्वत: पडले

    उत्तर प्रदेशात खिचडी बनत नाहीय,

    गोव्यात काँग्रेस  पुढं आहे

    हिमंता बिस्वा सरमा यापूर्वी काँग्रेसमध्ये आपल्या जुन्या नेत्यांवर टीका करु नये

  • 13 Feb 2022 10:17 AM (IST)

    राहुल बजाज यांच्या निधनानं उद्योगातील पितामह आपल्यातून निघून गेलाय : अजित पवार

    राहुल बजाज यांचा स्वभाव स्पष्टवक्ते असा होता

    उद्योग करत असताना सामाजिक क्षेत्रासाठी काय करता येईल हा विचार त्यांच्या मनात होता

    स्कुटरनंतर बाईकमध्ये आवड निर्माण झाली

    बजाजनं जे प्रोडक्ट आणलं ते जगात लोकप्रिय झालं

    ते उद्योग क्षेत्रात असले तरी त्यांनी समाजातील महत्त्वाच्या गोष्टींवर मत व्यक्त केलं

    त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे,

    उद्योग क्षेत्रातील खूप मोठा पितामह निघून गेला आहे

    त्यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी भरुन निघणार नाही

    त्यांनी पुणे हे वास्तव्यासाठी ठिकाण निवडलं

  • 13 Feb 2022 09:46 AM (IST)

    किरीट सोमय्यांच्या सत्कार प्रकरणी पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

    किरीट सोमय्यांच्या सत्कार प्रकरणी पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

    भाजपनं केलेला सोमय्यांचा सत्कार

    पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर झालेला सत्कार

  • 13 Feb 2022 09:21 AM (IST)

    आदित्य ठाकरे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची करणार पाहणी

    मंत्री आदित्य ठाकरे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची करणार पाहणी

    येरवडा परिसरात आहे सलीम अली पक्षी अभयारण्य

  • 13 Feb 2022 09:05 AM (IST)

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत झालेल्या मृत्यूंचे नाशिक महापालिका करणार ऑडिट

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत झालेल्या मृत्यूंचे महापालिका करणार ऑडिट

    महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

    मृत्यूच्या विविध कारणांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

    जिल्ह्यात एकूण साडे आठ हजार रुग्ण दगावले आहेत

    त्यापैकी साडे चार हजार रुग्ण शहरातले

    दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू आधीच्या व्याधींमुळे झाल्याचा होता निष्कर्ष

    तिसऱ्या लाटेच्या मृत्यूंचे देखील होणार ऑडिट

  • 13 Feb 2022 08:57 AM (IST)

    इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मातीचा डंपर ओलांडून एका केळेवाल्याचा मृत्यू

    मुंबईकरांची पहाट धक्कादायक घटनेनं ऊजाडल्याने कुर्ला घाटकोपर परिसरात खळबळ…

    – इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मातीचा डंपर ओलांडून एका केळेवाल्याचा मृत्यू… पाच जण जखमी…

    – भल्या पाहाटेची घटना, एर्टिगा गाडीत बसलेल्या पाच महिलाही जबर जखमी, जखमींवर राजावाडी रुग्णालयात ऊपचार सुरू.,,

    – फायर ब्रिगेड, स्थानिक पोलीस, ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल…

  • 13 Feb 2022 08:48 AM (IST)

    सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबईत

    राज्यात 674 शाळा अनधिकृत

    शिक्षण विभागाच्या पाहणीत अनधिकृत शाळा झाल्या उघड

    सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबईत

    222 शाळा अनधिकृत

    यूडाएस डाटानुसार शाळा अनधिकृत आढळून आल्यात

    शिक्षण विभागानं आरटीई कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधीकाऱ्यांना दिलेत…

  • 13 Feb 2022 07:19 AM (IST)

    सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय अद्याप अंतिम नाही, उत्पादन शुल्कच्या सचिवांची माहिती

    राज्यातील मोठय़ा सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही. लोकांकडून या निर्णयावर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत

    त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सांगितले. तसेच हजारे यांना उपोषण न करण्याची विनंतीही केली.

  • 13 Feb 2022 06:11 AM (IST)

    भिवंडीत पुन्हा अग्नितांडव,संपूर्ण गोदाम जळून खाक

    भिवंडीत पुन्हा अग्नितांडव

    भिवंडी शहरातील फैजान कंपाऊंड परिसरातील भंगार गोदामाला भीषण आग

    आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक

    घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल

    आगीत गोदामात काम करणारा एक कामगार भाजल्याने गंभीर जखमी,

    आगीचे कारण अस्पष्ट