मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. जिल्हा बँकेच्या (District Bank Election) निवडणुका सुरु आहेत. यामुळे जिल्हा पातळीवरच्या राजकारणातही रंग चाढलाय. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…
काँग्रेस नागपूर महापालिका निवडणूक लढणार स्वबळावर
– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बैठकीत झाला निर्णय
– मुंबईत नागपूर काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये पार पडली बैठक
– नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यावर झालं एकमत
– निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनाकडे मंजुरीसाठी पाठविणार
– बैठकीत निवडणुकीची रणनीती वरही झाली चर्चा
पालकमंत्री भुजबळ काय म्हणाले?
व्हॅक्सीन शिवाय कुठेही प्रवेश नाही
– 30 हजार व्हेक्सीन दररोज होत आहेत
– मालेगाव मध्ये 70 टक्के व्हेक्सीन पूर्ण
– एक डोस असेल त्यांनी तात्काळ दुसरा डोस घ्या
– सरकारी-निमसरकारी संस्थांमध्ये व्हेक्सीन प्रमाणपत्र बघितल्या शिवाय कोणाला सोडू नये
– व्हेक्सीन न घेललेल्याना रेशन देणं बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल
सिंधुदुर्गात शिवसेने अंतर्गत असलेली गटबाजी चव्हाट्यावर
कणकवलीत शिवसैनिकांनीच शिवसेनेचे पोस्टर फाडले
पोस्टरमध्ये आमदार, खासदार आणि स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचे फोटो
पण,
पालकमंत्री उदय सामंत यांचा फोटो पोस्टरवर नसल्याने त्यांच्या समर्थक गटातील शिवसैनिकांनी पोस्टर फाडले
नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीची पार्श्वभूमी वादाला कारणीभूत
आमदार वैभव नाईक यांचे नातलग सुशांत नाईक यांचा जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदनाचे पोस्टर स्थानिक पदाधिकारर्यांनी लावले होते.
पालक मंत्री निवडणुकीपासून जाणीवपूर्वक दूर राहिल्याचा शिवसेनेच्या एका गटाला संशय
त्यामुळे पोस्टरमध्ये त्यांचा फोटो दिसला नाही.
पालकमंत्र्यांचा फोटो न छापल्याने त्यांचे समर्थक संतापले आणि ते पोस्टर त्यांनी फाडले.
नाना पटोलेंचा थेट अमित शाह यांच्यावर संशय, काल पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेवरून मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले, यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्यावर संशय घेतला आहे,
मोदी नौटंकी करून देश चालवतात-नाना पटोले
रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी ताब्यात घेण्यात आला आहे. जितेन गजारिया असं ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या अधिवेशनातही रश्मी ठाकरे चर्चेत आल्या होत्या, कारण मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून चंद्रकांत पाटील यांनी कोपरखिळ्या मारल्या होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीचा मुद्दा गेल्या अधिवेशनात खूपच चर्चेत राहिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी वाटून द्यावी असे सल्ले देताना दिसून आले, तर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांना मुलावर विश्वास नसेल तर त्यांनी रश्मी वहिनींना चार्ज द्यावा, अशा कोपरखिळ्या मारताना दिसून आले, त्यानंतर आता हेच प्रकरण राजकारण तापवताना दिसतंय. जितेन गजारिया ने मराठी राबडी देवी असे ट्विट केले आहे.
बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने बजावले अटक वॉरंट
जामीन करून देखील सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी
2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केल्याचं प्रकरण
मुंबई : अमित देशमुख माध्यमाशी संवाद साधत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जशी उपचार पद्धती होती तशी पद्धती तिसऱ्या लाटेतही अवलंबवण्याचे तूर्तास आदेश आहेत. मुंबईतील 265 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यात 95 टक्के ऑक्सिजनेटेड बेड्स आहेत. राज्यात साडेसहाशे आयसीयू बेड्स आहेत. राज्यात ऑक्सिजन जनरेटेड प्लान्ट्स बसवण्यात आले आहेत. सर्व प्लांट्स ऑक्सिजन जनरेशन प्लांट्समध्ये ऑक्सिजनची क्षमता 75 टक्के राखण्याचे उद्दीष्ट आहे. जवळपास एक लाख तीस हजार चाचण्या प्रतिदिन करण्याची राज्य सरकारची क्षमता आहे. आज राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 11.46 आहे. आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी सोळा लाख किट्स पुढच्या पाच ते सहा महिन्यात लागतील असा अंदाज आहे. ही सर्व पूर्वतयारी करण्यात आली आहे.
पणे : कालीचरण महाराजानं जामीनासाठी शिवाजीरनगर कोर्टात केला अर्ज
जामीन अर्जावर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता
काल एक दिवसांची मिळाली होती पोलीस कोठडी
आज न्यायालयात रिमांडसाठी केलं होतं हजर
कालीचरण महाराजला जामीन मिळणार का ?
आज दुपारी 12.30 वाजता वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख मंत्रालयातील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
राज्यातील सध्याची परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजना याबाबतची माहिती मंत्री यावेळी देणार आहेत.
पिंपरी चिंचवड-पिंपरी-चिंचवडमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला भर रस्त्यात आपटल्याची घटना घडली आहे
-या प्रकरणी निगडी पोलिसांनी मध्यस्ती करत दोघांना पोलीस ठाण्यात बोलावले.
पतीला पतीविरोधात तक्रार आहे का? विचारण्यात आलं, मात्र पत्नीने तक्रार देण्यास नकार दिला
-कौटुंबिक वादातून भांडण झाल्याने त्यांचं समुपदेशन करून त्यांना सोडून देण्यात आलं
-ह्या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय त्यानंतर ही क्लिप समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली
मुंबई – राज्यात काँग्रेसच्याच काही मंत्र्यांवर काँग्रेस आमदारांची वाढती नाराजी
– राज्यातील काही मंत्र्यांवर नाराज असलेले काँग्रेस आमदार दिल्लीत हायकमांडची भेट घेणार
– सात ते आठ नाराज काँग्रेस आमदार दिल्लीत जाण्याच्या तयारीत
– दिल्लीत हायकमांडशी भेटून खराब कामगीरी असलेल्या मंत्र्यांची करणार तक्रार
– ‘टीव्ही9 मराठी’ला खात्रीलायक सूत्रांची माहिती
– पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले नाराज काँग्रेस आमदार दिल्लीत जाण्याच्या तयारीत
– काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के सी वेनुगोपाल यांची भेट घेणार
– राहूल गांधी यांच्या भेटीचीही मागीतली वेळ
– 10 दिवसांपूर्वी विदर्भातल्या नाराज काँग्रेस आमदाराने दिल्लीत काँग्रेस मंत्र्यांची केली होती तक्रार
बुलडाणा : प्रेमविवाह करणाऱ्या युवकावर मुलीच्या नागेवाईकांचा हल्ला प्रकरण
17 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
खामगावच्या शिवाजी नगर पोलिसांची कारवाई
प्रेमविवाह केल्यानंतर जबाब देण्यासाठी गेले होते प्रेमीयुगुल
पोलीस स्टेशनच्या बाहेर पडताच केला हल्ला
हल्ल्यात युवक गंभीर जखमी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ मेमध्ये संपणार
त्यामुळे कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू
त्यासाठी राज्यपाल कार्यालयाने विद्यापीठाला पत्र पाठवून राष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीचे नाव सुचवण्याच्या दिल्या सूचना
कोल्हापूर : एसटीच्या निवृत्त चालकांना पुन्हा कामावर घेण्याच्या हालचाली
कोल्हापूर विभागातील प्रशासनाकडून चाचपणी सुरू
गेल्या दोन ते तीन वर्षात निवृत्त झालेले पाचशे चालक पात्र ठरण्याचा अंदाज
पहिल्या टप्प्यात फक्त चालकांना संधी देण्याचा विचार
वारंवार आवाहन करूनही एसटी कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने प्रशासनाकडून सुरू झाली चाचपणी
मुंबई : टीईटी गैरव्यवहार प्रकरणात जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमारला ई मेल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या निखिल कदमची न्यायालयीन कोठडीत रवानगी
काल कोर्टात हजर केलं असता मिळाली न्यायालयीन कौठडी
ई मेल वगळता कोणताही ठोस पुरावा हा निखिल कदमकडे मिळाला नाही
त्यामुळे काल त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा आकडा वाढू लागला
काल दिवसभरात आढळलं नवीन 69 रुग्ण
तर एकाचा मृत्यू
ओमीक्रोनचे काल दिवसभरात पुन्हा नवे चार रुग्ण
कोरोना, ओमिक्रॉनची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता प्रशासन अलर्ट मोडवर
वाढत्या रुग्णसंख्येने पुणे महापालिका अलर्ट मोडवर,
पुण्यातील जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू होणार,
सुरुवातीला 200 बेडची केली जाणार व्यवस्था
जम्बोत एकुण 800 बेडची क्षमता आहे 10 दिवसांपूर्वी जम्बोची साफसफाई करण्यात आलीये,
दोन दिवसात जम्बो होणार पुन्हा सुरू !
नागपूर – नागपुरात काँग्रेस स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडीसोबत ?
– आज काँग्रेसच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
– नागपूर महानगरपालिका निवडणुकीबाबत आज काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक
– प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईत घेणार बैठक
– बैठकीत नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार
– काँग्रेसचे प्रदेश स्तरावरील पदाधिकारी राहणार उपस्थित
– नागपूर महानगरपालिका निवडणूकीची रणनीती ठरणार
मुंबई : देवनार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हवेत गोळीबार
दोघे किरकोळ जखमी
जखमींना उपचारासाठी शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे
डीसीपीनीं दिलेल्या माहितीप्रमाणे लोक सांगत आहे हवेत गोळीबार झालेला आहे
देवनार पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपास सुरु केला