मुंबई :शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्ती शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते आणि मंत्रीही उपस्थित आहेत. त्यात मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष देसाई यांनी केले.