Maharashtra News Live Update : शाहू महाराजांच्या वक्तव्यानंतर आता छत्रपती संभाजीराजे यांचे ट्विट, म्हणतात
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या
LIVE NEWS & UPDATES
-
साताऱ्यात पालिकेविरोधात हॉकर्सचं आंदोलन
सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीम विरोधात सातारा बसस्थानक परिसरातील हॉकर्सनी विरोध करत व्यवसाय बंद करत फुटपाथवर ठिय्या आंदोलन केलेपालिकेने ही कारवाई न थांबवल्यास सोमवारी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे -
छत्रपती संभाजीराजे यांचे ट्विट
“छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे.
माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.”
छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे.
माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 28, 2022
-
-
सांगली – मंत्री जयंत पाटील
आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी पवार साहेबांनी नेहमी तयार असतात
आज साखर कारखाने ची संख्या राज्यात वाढली आहे
देशातील कामगार अस्वस्थ आहे
कामगारांनि जागृत राहिले पाहिजे
संघटित राहिले पाहिजे
-
– पालकमंत्री बदलावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची उद्वीग्न प्रतिक्रिया
– पालकमंत्री बदलणे म्हणजे काय बाजारातला भाजीपाला असतो काय ?
– पत्रकाराने जबाबदारीने बातमी दिली पाहिजे. पालकमंत्री बदलणे एवढे सोप्पे नसते.
– पालकमंत्री जिल्ह्याचा प्रमुख असतो. जिल्ह्याची, शहराची काळजी घेणे ही पालकमंत्र्याची जबाबदारी असते
– उजनी पाणी पळविण्याच्या आरोपावरून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची उद्वीग्न प्रतिक्रिया
– पालकमंत्री भरणे ऑन उजनीतून पाणी पळविल्याचा आरोप :
– लाकडी निंबोळी योजना जुनीच आहे. उगाच अशा मुद्द्यावर राजकारण करु नये. निवडणूक असताना राजकारण ठीक आहे
– विनाकारण लोकांचा गैरसमज करणे हे काही लोकांचे कामच आहे.
– आंदोलन करुन, वातावरण तापवून स्वतः प्रकाशझोतात राहण्याचे काही लोकांचे काम असते
– ही योजना नवीन असती तर निश्चित दोष माझा असता मात्र ही जुनी योजना आहे त्याला पैसे मंजूर केलेत.
– त्याप्रमाणेच मंगळवेढा, बार्शीसाठीच्या योजनादेखील लवकरच मार्गी लागतील. त्यांना सुप्रमा देण्याचा प्रयत्न सुरुय
– टीकाकारांनी अभ्यास करुन बोलावे.
– आमदार प्रणिती शिंदे यांचा गैरसमज झाला असावा. जसा तुमचा गैरसमज ( पत्रकारांचा) झाला तसा आमदार प्रणिती शिंदे यांचा पण गैरसमज झाला असावा.
– प्रणिती शिंदे या आमच्यापेक्षा ज्येष्ठ आमदार असून अभ्यासू आहेत.
– प्रणिती शिंदे या शासनाच्या प्रतिनिधी असून त्यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असेल त्यामुळे आता त्यांचा गैरसमज दूर झाला असेल.
– उजनी पाणी पळवण्यावरुन कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी, आम्ही सोलापूरचे पाणी पळवल्यास रान पेटवू अशी प्रतिक्रिया दिली होती.
– सोलापूरला चार दिवसाला पाणी पुरवठा होतो ही माझ्यासाठी शोकांतिका आहे.
– समांतर जलवाहिनीचा प्रश्न येत्या ८ दिवसात निकाली काढू.
पंधरा महिन्यात समांतर जलवाहिनी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही योजना पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा होईल.
– ज्या व्यक्तीला टेंडर दिले होते तो चुकीचा निघाला. त्याने अतिरिक्त पैशांची मागणी केली त्यामुळे त्याचे टेंडर रद्द करुन नव्याने टेंडर काढले आहे.
-
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील आमोद्यात दहा मोरांचा मृत्यू..
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील आमोद्यात दहा मोरांचा मृत्यू..
वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून घटनेचा पंचनामा..
-
-
राणा दाम्पत्याकडून हनुमान चाळीसा पठण
राणा दाम्पत्याकडून हनुमान चाळीसा पठण
-
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे विघ्न आहे महाराष्ट्राचं…
त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम सुरू आहे
महाराष्ट्राच्या
एसटी कामगारांचा प्रश्न तसाच पडून आहे
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे विघ्न आहे महाराष्ट्राचं
महाराष्ट्राचा हनुमान चाळीसा वाचन करणार
महाराष्ट्राला शनीचं ग्रहण लागलं आहे…
-
अमरावतीत शिवसेनेची राणा दाम्पत्याविरोधात पोस्टरबाजी,
अमरावतीत शिवसेनेची राणा दाम्पत्याविरोधात पोस्टरबाजी,
-
भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची तीन दिवसांची रथयात्रा
भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची तीन दिवसांची रथयात्रा
फलटण ते चौंडी अशी तीन दिवसांची रथयात्रा
उद्यापासून रथयात्रेला होणार सुरुवात
जागर अहिल्याबाई युगाचा जागर पराक्रमी इतिहासाचा या रथयात्रेचं आयोजन
मल्हारराव होळकरांच्या मुळ गाव असलेल्या होळ या गावाला देणार भेट
यशवंतराव होळकर यांच्या वाफगावच्या किल्ल्यावर करणार मुक्काम
30 तारखेला पुरंदर तालूक्यात विविध ठिकाणी देणार भेट
31 तारखेला जेजूरीचं दर्शन घेऊन अहिल्याबाई होळकरांच्या चौडीला रवाना होणार
चौंडीत होणार समारोप
-
औरंगाबाद येथील शाईफेक प्रकरणाचे उस्मानाबाद येथे तीव्र पडसाद
औरंगाबाद येथील शाईफेक प्रकरणाचे उस्मानाबाद येथे तीव्र पडसाद
स्वतंत्र विद्यापीठ होऊ नये यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर काल रिपब्लिकन सेनेकडून केली होती शाईफेक
उस्मानाबाद शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे निषेध आंदोलन
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे उपकेंद्र असलेल्या उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरु कर याच्या मागणीवर उस्मानाबादकर ठाम
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आंदोलनात सहभागी
-
मनसेच्या आजच्या वांद्रेतील मेळाव्याला वसंत मोरे हजेरी लावणार
मनसेच्या आजच्या वांद्रेतील मेळाव्याला वसंत मोरे हजेरी लावणार
वसंत मोरेंनाही मेळाव्यासाठी बोलावणं
वसंत मोरे मुंबईकडे रवाना
आज राज ठाकरे शारदा सभागृहात करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
वसंत मोरेंचीही हजेरी असणार !
-
चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का ? इतरांनी याच्यात चोमडेपणा करू नये – संजय राऊत
आज कोल्हापूरात आहे,
२०२४ साठी पुर्ण तयार राहणं…
या भूमिकेतून शिवसंपर्क मोहिम सुरू आहे
प्रत्येक शिवसेनेचे संपर्क साधत आहेत
मुख्यमंत्र्यांच्या कामाविषयी लोकांच्या मनात एक आस्था आहे
महाविकास आघाडीने एखादा निर्णय घेतला की त्यांनी टीका केली पाहिजे असं त्यांनी ठरवून घेतलं आहे
यातून त्यांना कोणता आनंद मिळतो माहित नाही
दोन दिवस मी कोल्हापूरात आहे…भेटी,
संभाजीराजे…
शिवसेनेची जागा आहे, शिवसेनेचा उमेदवार तिथ आणायचा ठरलं होतं
हा विषय संपलेला आहे
नवीन काय त्याच्यात
४२ मत्तांचा विषय होता. राजकारणात तुम्हाला करिअर करायचं असेल, तर तुम्ही कुठल्यातरी पक्षाशी…
चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का ?
2019 साली शब्द कोणी दिला होता
इतरांनी याच्यात चोमडेपणा करू नये
त्यांना आम्ही उत्तर का द्याचं
संजय पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे
शिवाजी महाराज हे देशाचे आणि विश्वाचे आहेत
शिवेंद्र राजेंनी किती पक्ष बदलले…
नवाब मलिकांचं अभिनंदन करतो
केंद्र सरकारला दिसत नाही का हे सगळं
तरूण मुलाला डॅग्ज प्रकरणात मुद्दाम टाकलं जातं
आज सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुडबुद्धीने कारवाई केली जात आहे
मला माहित नाही पाहावं लागेल
-
मनसैनिकांकडून बृजभूषणविरोधात दादर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
दादार मधील मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहीत कक्षाचे वकील दादर पोलिस स्टेशनमध्ये
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दादर पोलिस स्टेशनमध्ये
उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील तक्रारदार
ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल खालच्या भाषेत केलेल्या या वक्तव्यावरून केली गेली तक्रार
दोन भाषिकांमध्ये तेढ आणि कायदा सुव्यवस्था बिघडवला जात आहे म्हणुन केली जाणार तक्रार
ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा ही जनहीत कक्षाची मागणी
मनसेचे जनहीत कक्षाचे वकील ॲड गजणे , ॲड रवी पाष्टे , उपविभाग अध्यक्ष शशांक नागवेकर सह कार्यकर्त्ये उपस्थित
-
अमरावतीत येण्याआधी राणा दाम्पत्य TV9 वर एक्स्क्लुझिव्ह
पहिल्यांदाच इतके दिवस लांब अमरावतीपासून लांब राहिले- नवनीत राणा
जेलमधून बाहेर आल्यानंतर अभिमानाने घरी परतते आहे – नवनीत राणा
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करणार
तिवसामध्ये सत्कार सोहळा होणार आहे, जोरदार तयारी झाली आहे – रवी राणा
राम भक्त आणि हनुमान भक्त आमचं आणि हनुमान चालिसेचं स्वागत करणार आहे- रवी राणा
प्रीव्हिलेज कमिटीने दखल घेतली आहे, माझी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे – रवी राणा
तब्बल 36 दिवसांनंतर राणा दाम्पत्य अमरावतीमध्ये परतणार
12 वाजून 45 मिनिटांनी नागपुरात राणा दाम्पत्य दाखल होणार
दिल्ली विमानतळावरुन राणा दाम्पत्य लाईव्ह :
-
राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद आज दुपारी 3 वाजता संवाद साधणार आहेत.
राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद आज दुपारी 3 वाजता संवाद साधणार आहेत.
-
आज असुद्दीन ओवेसी यांची भिवंडीत सभा
आज असुद्दीन ओवेसी यांची भिवंडीत संध्याकाळी 7 वाजता सभा होणार आहे. भिवंडीतील परशुराम टावरे स्टेडियममध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा गाजत असताना आज भिवंडीच्या सभेत ओवेसी काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
-
अंबरनाथ शहरात पावसाच्या सरी, मान्सूनपूर्व पावसाला झाली सुरुवात
अंबरनाथ शहरात पावसाच्या सरी, मान्सूनपूर्व पावसाला झाली सुरुवात
-
कोरोना काळात रुग्णांना लुटणार्या 13 दवाखान्यानी पैसे केले परत..
कोरोना काळात रुग्णांना लुटणार्या 13 दवाखान्यानी पैसे केले परत..
औरंगाबाद शहरातील 14 रुग्णालयांनी उपचारापेक्षा केले होते जास्त पैसे वसूल..
नातेवाईकांचा एकही रुपया वापस न करणाऱ्या हॉस्पिटलचा परवाना केला रद्द..
लाखो रुपये रुग्णाच्या नातेवाईकांकडून लुटून खाजगी रुग्णालयांनी आजाराचा केला बाजार..
अखेर खाजगी रुग्णालयांचे पितळ उघडे पडतात तेरा दवाखान्यानी केले पैसे परत..
महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारवाईनंतर पैसे केले परत..
-
औरंगाबाद जिल्ह्यातील तरुणाने मुख्यमंत्र्यांना मागितली किडनी विकण्याची परवानगी..
औरंगाबाद जिल्ह्यातील तरुणाने मुख्यमंत्र्यांना मागितली किडनी विकण्याची परवानगी..
कर्ज द्या अन्यथा किडनी विकू द्या अशी वारेगाव येथील उपोषणकर्त्यांची मागणी..
बेरोजगार तरुणांना बँक कर्ज देत नसल्याने व्यवसायासाठी तरुणाने मुख्यमंत्र्यांकडे मागितली किडनी विकण्याची परवानगी..
तरुणाच्या किडनी विकण्याच्या अजब मागणीमुळे राज्यभर चर्चा..
प्रशांत जाधव असे किडनी विक्रीस परवानगी मागणाऱ्या तरुणाचे नाव..
-
पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
राज्यातील पोलीस दलातील रिक्त पदं भरण्यासाठी 15 जूनपासून प्रक्रीया सुरू होणार
सुरुवातीला 7 हजार पदं भरली जाणार आहेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका सकारात्मक आहे त्याला मंजूरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रीया सुरु होणार
गेल्या दोन वर्षापासून पोलीस दलात भरती करा अशी मागणी विद्यार्थी करतायेत
-
कालीचरण महाराज यांनी घेतलं ग्रामदैवत भद्रकाली चे दर्शन
नाशिक – कालीचरण महाराज यांनी घेतलं ग्रामदैवत भद्रकाली चे दर्शन – दर्शन घेवून केली आरती
बाईट -हिंदूंचे 5 लाख प्रार्थना स्थळे फोडली -ती मिळविणे गरजेचे आहे -मोदी,शहा,योगी देशाला तारतील -हिंदुत्वासाठी जे काही होईल त्याचा सन्मानचं -राज ठाकरेंच्या भूमिकेवर स्पष्टीकरण -शरद पवारांचे वैयक्तिक आयुष्य आहे..पण सोशल मीडियामुळे सर्वच जण बघत आहेत -इस्लाम हा धर्मच नाही..मोठं वक्तव्य -हा वाद धर्म विरुद्ध अधर्म आहे -हिंदूंना जर कुटुंबासह धर्माचं संरक्षण पाहिजे तर हिरीरीने राजकारणात लक्ष द्यायला हवं -मुस्लिमांचे 100 टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होतं -जर आई-बहिणींना वाचवायच असेल तर ते फक्त राजनीतीनेच वाचविता येऊ शकतं -मी मोदींच्या कामावर प्रसन्न आहे -जो हिंदू हिताची गोष्ट करेल त्याला जाहीर पाठिंबा
-
पुणे जिल्ह्यातील 84 गावांना पुराचा धोका सर्वाधिक, जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पावसाळ्याचं नियोजन सुरू
पुणे जिल्ह्यातील 84 गावांना पुराचा धोका सर्वाधिक
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत
बैठकीत नियोजन करण्याच्या दिल्या सूचना
आपत्ती काळात लागणारं सामान उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्यात
दौंड तालुक्यात सर्वाधिक भीमा नदीच्या काठावरील 16 गावांना पुराचा धोका आहे
जिल्हाधिकारी आढावा घेऊन योग्य ते नियोजन करा असे आदेश दिलेत
जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पावसाळ्याचं नियोजन सुरू केलं आहे.
-
नाशिक – अयोध्या,काशी नंतर हनुमान जन्मस्थळाचा वाद ?
नाशिक – अयोध्या,काशी नंतर हनुमान जन्मस्थळाचा वाद ?
हनुमानाचा जन्म किष्किंधा मधेच झाला ..
किष्किंद चे महंत गोविंदानंद यांचा दावा
जनस्थळावर कोणाशीही, कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचा गोविंदानंद यांचा दावा
चर्चेसाठी गोविंदानंद त्रंबकेश्वर मध्ये दाखल
अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा पुरावा द्यावा –
गोविंदानंद यांचे नाशिकच्या पुरोहित आणि अभ्यासकांना आव्हान
-
शिवसेना नेते संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर,
शिवसेना नेते संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर
संजय राऊत शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने कोल्हापुरात
वकील उद्योजक तसच वेगळ्या घटकांशी करणार मिसळ पे चर्चा
दुपारी बारा वाजता संजय राऊत यांची पत्रकार परिषद
तर सायंकाळी प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर होणार जाहीर सभा
राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडीनंतर संजय राऊत पहिल्यांदाच कोल्हापूरात
-
राज्यातील विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात पुण्यातील विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका केली दाखल
राज्यातील विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात पुण्यातील विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका केली दाखल
सर्वच विद्यापीठाच्या परीक्षांत सूसूत्रता असावी व निकाल वेळेत लागावेत
यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
सोमवारी यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची परीक्षेसंदर्भात बैठक घेऊनही सूत्रता नसल्यानं विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे …
-
नागपूरात आज खा. नवनित राणा हनुमान चालीसा पठण करणार
– नागपूरात आज खा. नवनित राणा हनुमान चालीसा पठण करणार
– नागपूरातील रामनगर हनुमान मंदिरात करणार हनुमान चालीसा पठण
– त्याच मंदिरात राष्ट्रवादीचं महागाई जावी म्हणुन हनुमान चालीसा पठण
– दुपारी १२ ते १ः३० वाजेपर्यंत राष्ट्रवादीच्या हनुमान चालीसा पठणाला परवानगी
– राष्ट्रवादीकडून ११ पंडीत करणार होम हवन
– राष्ट्रवादीचा कार्यक्रम संपल्यावर नवनित राणा यांना हनुमान चालीसा पठण करायला पोलीस परवानगी
– नवनित राणा यांच्या रॅलीला पोलीसांनी परवानगी नाकारली
-
नागपुरात आज पासून कॉंग्रेस च नवं संकल्प सोशल मीडिया शिबिर
नागपुरात आज पासून कॉंग्रेस च नवं संकल्प सोशल मीडिया शिबिर
2 दिवस चालणार हे शिबीर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सोशल मीडिया प्रभारी होणार सहभागी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते होणार कार्यक्रमच उदघाटन
तर 29 मे रोजी देशभरातील 30 राज्यातील काँग्रेस सोशल मीडिया पदाधिकारी सहभागी होतील
उदयपूर चिंतन शिबिराच्या पार्श्वभूमीवर या शिबिराच आयोजन करण्यात येत आहे
यात काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेता सुद्धा सहभागी होणार असून अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात , नाना पटोले , विजय वडेट्टीवार सह अनेक काँग्रेस नेते उपस्थित राहणार
काँग्रेस च हे शिबीर म्हणजे येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारी आणि सोशल मीडियाचा वापर कसा करायचा या साठी असणार आहे
-
दीड महिन्यात दंड वसुलीतून रेल्वेची १२ कोटींची कमाई…
दीड महिन्यात दंड वसुलीतून रेल्वेची १२ कोटींची कमाई…
रेल्वेचे जनरल तिकीट बंद असल्याने परीणाम…..
दीड महिन्यात १ लाख ५० हजार २५१ प्रवाशांनी भरला दंड….
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने वसूल केला दंड…
-
– माहिती अधिकारीचा दुरुपयोग करणाऱ्यांची माहिती द्या
– माहिती अधिकारीचा दुरुपयोग करणाऱ्यांची माहिती द्या
– माहिती आयुक्त राहूल पांडे यांचे नागपूर पोलिसांना पत्र
– माहिती अधिकारीचा दुरुपयोग करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी माहिती आयुक्तांचा पुढाकार
– माहिती अधिकार कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे आणि तक्रारीची मागीतली माहिती
– चंद्रपूर, गोंदिया जिल्हयात माहिती अधिकार कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती
-
विरारमध्ये फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, 8 ते 10 दुकान जळून खाक
विरार मध्ये फर्निचरच्या दुकानाला भीषण आग; आठ ते 10 दुकान जळून खाक
विरार पूर्व संतनगर रोडवर आठ ते दहा दुकानांना आज मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास शॉर्टसर्किट ने आग
जीवितहानी नाही मात्र दुकाने पूर्ण जळून खाक
1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
Published On - May 28,2022 6:18 AM