Eknath shinde vs shiv sena supreme court Live : शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि आमदार संजय क्षीरसाठ यांनी घेतली रामदास कदमांची भेट

| Updated on: Jul 21, 2022 | 6:49 AM

Eknath shinde vs Shiv sena supreme court Live Maharashtra Politics Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Eknath shinde vs shiv sena supreme court Live : शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि आमदार संजय क्षीरसाठ यांनी घेतली रामदास कदमांची भेट
Supreme Court LIVE Updates (1)Image Credit source: tv9marathi

मुंबई : आज बुधवार 20 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा परिसरातील आय.सी.आय.सी.आय बँकेच्या शाखेतून तब्बल 12 कोटी 20 लाख रूपयांची रोकड चोरणा-या चौघांपैकी तिघांना ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 5 कोटी 80 लाखांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Jul 2022 03:42 PM (IST)

    धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलाय त्याचं स्वागत

    महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा आयोग नेमण्यात आला आहे

    जी काही प्रक्रिया सांगितली होती ती सगळी पूर्ण करण्यात आली होती

    त्यामुळे आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय

    आतापर्यंत ज्यांनी ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका व्हाव्यात ही भूमिका घेतली त्यांचे मी आभार मानतो

    कोर्टाच्या निर्णयाचं मी माझा पक्ष स्वागत करतो

  • 20 Jul 2022 03:37 PM (IST)

    चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला डिवचलं

  • 20 Jul 2022 03:18 PM (IST)

    राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे प्रतिक्रिया

    … याला म्हणतात दमदार सरकार

    हक्काचं आरक्षण कोर्टाने मान्य केलं

    शिंदे फडणवीस सरकार आलं आणि हे आरक्षण मिळालं

    या निर्णयाचे मी स्वागत करतो

    राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया

  • 20 Jul 2022 03:11 PM (IST)

    जिल्यातून 10 हजार स्टॅम्प पेपर भरून घेतले जाणार

    यवतमाळ- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें च्या आदेशानंतर जिल्ह्यातील शिवसेना लागली कामाला,

    जिल्हाभरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याला आला वेग

    यवतमाळ जिल्ह्यातील 7 ही विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकाकडून घेतले जात आहे प्रतिज्ञापत्र ,

    2 दिवसात हे प्रतिज्ञापत्र करायचं सेना भवनात सादर,

  • 20 Jul 2022 03:09 PM (IST)

    नवी मुंबई – भाजप आणि एकनाथ शिंदे गट आमने सामने

    नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावरून एकनाथ शिंदे गट संतप्त

    आमदार गणेश नाईकांनी दाखवली राजकीय अपरिपक्वता

    दोन्ही पक्ष एकत्र असताना शिंदे गटाचे नगरसेवक फोडणे अयोग्य

    विजय चौगुले यांनी नाईकांवर केले गंभीर आरोप

    नाईकांनी वेळ पाहून प्रवेश द्यायला पाहिजे होता

    आम्ही धक्के दिले तर नाईकांना भारी पडणार – विजय चौगुले

  • 20 Jul 2022 02:51 PM (IST)

    ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; 2 आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

    ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

    2 आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे कोर्टाचे आदेश

    बांठिया आयोगाच्या अहवालानुसार पुढील निवडणुका घेण्याचे आदेश

  • 20 Jul 2022 02:20 PM (IST)

    नाना पदरबारात घेतली अधिकारांची क्लास.टोले यांनी जनता 

    नाना पदरबारात घेतली अधिकारांची क्लास.टोले यांनी जनता

    नुकसानचे पंचनामे करण्याचे घेतले क्लास.

    अतिवृष्टी मुळे तसेच आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही शासन दरबारी ठोस उपाय योजना न झाल्याने. कोंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले अधिकारावर वर्गावर चांगलेच धारेवर धरले आहे

  • 20 Jul 2022 02:19 PM (IST)

    आदित्य ठाकरेंचे मेळावे सुरू

    आदित्य ठाकरे सध्या विविध शहरांमधे दौरे करून मेळावे घेत आहेत .

    उद्या भिवंडी ,शहापूर ,नाशिक ,दिंडोरी , संभाजी नगर ,शिर्डी असा दौरा आदित्य ठाकरे यांचा असणार आहे

    या दौऱ्यांमधे आदित्य ठाकरे यांनी ठाणे वगळले असून , ठाकरे यांनी का ठाणे वगळल याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.

  • 20 Jul 2022 02:11 PM (IST)

    पक्ष फुटतोय तरी सुद्धा ज्यांना ज्यायचं असेल त्यांनी जावं, रामदाम कदम यांची प्रमुखांवरती टीका

    पक्ष फुटतोय तरी सुद्धा ज्यांना ज्यायचं असेल त्यांनी जावं

    न्यायालयीन काम काजावर न बोललेलं बरं

    रामदास कदम कसा वाघासारखा जगला हे सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे हे सांगण्याची गरज नाही.

  • 20 Jul 2022 01:52 PM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुरुवात

    औरंगाबाद जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुरुवात

    शिवसेना भाजप दोन्ही काँग्रेस आणि शिंदे गटात रंगणार रणधुमाळी

    शिवसेनेच्या 4 बंडखोर आमदारांच्या मतदार संघात रंगणार ग्रामपंचायतीच सामना

    सर्वसामान्य मतदार बंडखोर स्वीकारणार की शिवसेनेला साथ देणार

    16 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू

    तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपही उतरणार रिंगणात

    निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत (ग्राफिक्स)

    1) वडगाव कोल्हाटी (बाजाजनगर) 2) पानेवाडी 3)उपळी 4)नानेगाव 5) जंजाळ 6) अगरकानडगाव 7) ममदापुर 8) पानवी खंडाळा 9) लाख खंडाळा 10) खदगाव 11) खेरडा 12)नानेगाव 13) अपेगाव 14) अगरनांदूर 15) शेवता 16) तांडा बु

    अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे आणि रमेश बोरणारे या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात होणार निवडणूक

    16 ग्रामपंचायत साठी 4 ऑगस्ट रोजी होणार मतदान तर 5 ऑगस्ट रोजी लागणार निकाल,

    सर्वसामान्य मतदार बंडखोरांना स्वीकारणार की नाकारणार 5 ऑगस्ट रोजी लाग

  • 20 Jul 2022 01:41 PM (IST)

    शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि आमदार संजय क्षीरसाठ यांनी घेतली रामदास कदमांची भेट

    – शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि आमदार संजय क्षीरसाठ यांनी घेतली रामदास कदमांची भेट,

    – मुंबईतील निवासस्थानी घेतली भेट,

    – यावेळी युवा सेना सचिव किरण साळी आणि अजय भोसले यांचीही उपस्थित

  • 20 Jul 2022 01:40 PM (IST)

    आज पुन्हा शिंदे गटाचा शिवसेनेला दे धक्का

    आज पुन्हा शिंदे गटाचा शिवसेनेला दे धक्का ..

    पनवेल चे शिवसेनेचे नगरसेवक , पदाधिकारी असे हजारो शिवसैनिक शिंदे गटात सामील होणार आज संध्याकाळी नंदनवन येथे होणार प्रवेश..

  • 20 Jul 2022 01:15 PM (IST)

    आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट याबाबत चांगला निर्णय देतील – जयंत पाटील

    आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट याबाबत चांगला निर्णय देतील

    महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात

  • 20 Jul 2022 01:14 PM (IST)

    आणखी काय कागदपत्रे सादर करायची आहे असं साळवे यांचं म्हणणं होतं – छगन भूजबळ

    असे अनेक प्रश्न कोर्टाने तयार केले आहेत. आणखी काय कागदपत्रे सादर करायची आहे असं साळवे यांचं म्हणणं होतं.

  • 20 Jul 2022 01:05 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आम्ही समाधानी आहोत – देवेंद्र फडणवीस

    मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूने म्हणणं माडलं.

    त्याचं म्हणणं त्यांनी सांगितलं

    आमच्या बाजूने निर्णय येईल अशी आम्हाला शक्यता आहे

    त्यावर अधिक बोलण योग्य ठरणार नाही

    आम्ही त्यांना नोटीस दिली आहे, तर त्यांनी आम्हाला नोटीस दिली आहे

    एक तारखेला त्यांच्यावरती सुनावणी होणार आहे

    स्टेटसस्कोपचा सरळ अर्थ असा आहे, की ४० आमदारांना त्यांना नोटीस दिली आहे.

    आता मी मिरीटवरती बोलणं योग्य होणार नाही….

  • 20 Jul 2022 12:56 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांना अंबादास दानवे यांचा खोचक टोला

    आमची बाजू आज न्यायालयात आज ठाम पणे मांडली आहे, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे, पक्षाचा आणि पक्षानेतृत्वाचा मुद्दा प्रामुख्याने मुद्दा मांडला पण विरोधकांनी रस्ता भटकवण्याच्या मुद्दे मांडले गेले मात्र तरीही आम्हाला न्याय मिळेल

    एकनाथ शिंदे गटाने पक्ष सोडला नसला तरी वेगळा गट निर्माण केला आहे पण त्यांना आता कोणत्या तरी गटात जावे लागेल खुर्च्या वाचवण्यासाठी पळवाटा शोधत आहेत. उध्दव ठाकरे सांगतील तोच पक्ष आहे, शिंदे सांगतील तो पक्ष नाही,

    16 आमदारांची अपत्रता झाली तरी एकनाथ शिंदे हे 16 आमदारात आहेत त्यामुळे त्यांचा पद जाऊ शकतं विधानसभा अध्यक्ष निवडणूक रद्द होऊ शकते

    शिवसेनेवर दावा कुणीही सांगू शकत नाही कारण शिवसेनेची घटना वेगळी आहे, त्यांनी स्वतःला पक्षप्रमुख सांगितलं नाही नेता सांगितलं आहे पण नेते पदावरून त्यांना काढलं आहे.

    उद्या एखाद्या गावातला कुणीही व्यक्ती उठेल आणि म्हणेल की मी शिकसैनिक आहे आणि मी नियुक्त्या करतो त्याला काहीही अर्थ नाही

    एकनाथ शिंदे यांना अंबादास दानवे यांचा खोचक टोला

  • 20 Jul 2022 12:32 PM (IST)

    कायद्याने मंत्रीमंडळ विस्तार करायला कुठेही हरकत नाही – उज्ज्वल निकल

    कायद्याने मंत्रीमंडळ विस्तार करायला कुठेही हरकत नाही. परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोळा आमदारांमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा आहेत. राष्ट्रपती राजवट आम्ही रद्द करतो आहोत.

  • 20 Jul 2022 12:25 PM (IST)

    पुढची सुनावणी एक ऑगस्टला

    याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने दाखल केलेल्या याचिकांवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कॅम्पला वेळ दिला आहे.

  • 20 Jul 2022 12:23 PM (IST)

    बुधवारी दोन्ही बाजूंना कागदपत्रे जमा करण्याची संधी आहे.

    प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता. बुधवारी दोन्ही बाजूंना कागदपत्रे जमा करण्याची संधी आहे.

  • 20 Jul 2022 12:15 PM (IST)

    सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना केसरकर साईंच्या चरणी

    शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर साई दरबारी गेले आहेत. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना केसरकर साईंच्या चरणी…. आमदार अपात्रे बाबत सुप्रीम कोर्टात सुरू आहे सुनावणी…. साईबाबांच्या मध्यान्ह आरती मध्ये सहभागी….
  • 20 Jul 2022 12:13 PM (IST)

    पक्षाने बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर – सिंघवी

    पक्षाने बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर – सिंघवी

    गटनेता बदलणं हा पक्षाचा अधिकार आहे

  • 20 Jul 2022 12:09 PM (IST)

    जर पक्षात मोठ्या गटाला वाटत असेल नेतृत्व करावं त्यात चूक काय?

    जर पक्षात मोठ्या गटाला वाटत असेल नेतृत्व करावं त्यात चूक काय?

  • 20 Jul 2022 12:01 PM (IST)

    कपिल सिब्बल यांना पुढच्या मंगळवारी सुनावणी हवी, कागदपत्रे सादर करण्यासाठी साळवे यांनी वेळ मागितला

    कपिल सिब्बल यांना पुढच्या मंगळवारी सुनावणी हवी आहे, तर साळवे यांनी १ ऑगस्टला सुनावणी हवी आहे. पुढच्या मंगळवारपर्यंत सुनावणी व्हावी असं कपील सिब्बल यांनी म्हटलं आहे. पुढची तारीख कोणती मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. हे मोठं खंड स्थापन करण्याची विनंती केली आहे.

  • 20 Jul 2022 11:56 AM (IST)

    कपील सिब्बल यांच्या युक्तीवादाला सुरुवात केली आहे

    साळवे यांनी केलेल्या मागणीला कपील सिब्बल यांनी विरोध दर्शविला आहे. कपील सिब्बल हे सध्या युक्तीवाद करीत आहे. सुप्रीम कोर्ट सुध्दा याबाबत सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. अल्पमतात असलेला नेता गटनेत्याचा काढू शकतो का असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. वेळ वाढवून देण्यात काही अडचण नसल्याचं दिसतंय. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागावा अशी मागणी कपील सिब्बल यांनी केला आहे.

  • 20 Jul 2022 11:50 AM (IST)

    हरिश साळवे .यांच्याकडून सुप्रीम कोर्टात वेळ मागण्यात आली आहे

    हरिश साळवे .यांच्याकडून सुप्रीम कोर्टात वेळ मागण्यात आली आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी एक आठवड़्याचा वेळ असं सांगितलं आहे. त्यावर सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  • 20 Jul 2022 11:48 AM (IST)

    हरिश साळवे .यांच्या युक्तीवादाचा पुन्हा सुरुवात झाली आहे

    हरिश साळवे .यांच्या युक्तीवादाचा पुन्हा सुरुवात झाली आहे

  • 20 Jul 2022 11:47 AM (IST)

    उज्ज्वल निकम काय म्हणाले आजच्या सुनावणीबाबत

    उज्ज्वल निकम काय म्हणाले आजच्या सुनावणीबाबत

  • 20 Jul 2022 11:43 AM (IST)

    पक्षात काय फुट पडलेली नाही – साळवे

    पक्षात आवाज उठवलं तर चुकीचं काय असा युक्तीवाद हरीश साळवे यांनी केला आहे. पक्षात फुट देखील पडलेली नाही. यांना पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही. असं हरिश साळवी यांनी सांगितलं आहे. त्याचं पक्षात राहून बंड केलं तर त्यात गैर काय…

  • 20 Jul 2022 11:34 AM (IST)

    शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरू

    शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरू झाला आहे. ते काय बाजू मांडतात हे पाहावं लागणार आहे. आजच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत, गटनेतेही शिवसेनेचे आहेत असं हरिष साळवे यांनी युक्तीवाद करताना म्हटलं आहे. एखाद्या पक्षाला वेगळा नेता हवा असेल तर त्यात काय चूक आहे ? त्याच पक्षात राहून बंड केलं तर त्यात काय गैर आहे.

  • 20 Jul 2022 11:31 AM (IST)

    गुवाहाटीला जाण्यापूर्वी अधिकृत मेलवरून मेला आला होता.

    गुवाहाटीला जाण्यापुर्वी जो मेल केला होता. तो अधिकृत नव्हता. त्यामुळे १६ आमदारांना तात्काळ निलंबित करा. विधान भवनातील कागदपत्रे सुप्रीम कोर्टात मागवा अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे.

    विलीनीकरण नाही, मग बहुमत चाचणी का घेतली

    संविधान नुसार आम्हाला न्याय द्या

    नवनियुक्त अध्यक्षांनी आमदार अपात्र करण्याबाबत कुठलाच निर्णय घेतला नाही – सिंघवी

  • 20 Jul 2022 11:23 AM (IST)

    लोकशाही धोक्यात असल्याचं कपील सिब्बल यांनी म्हटलं आहे.

  • 20 Jul 2022 11:21 AM (IST)

    Kapil Sibbal : भाजप शिंदे सरकार अवैद्य रित्या तयार झालं आहे

    हा निर्णय लोकशाहीचा थट्टा करणारा आहे

    कपील सिब्बल यांनी अनेक गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे

    भाजप शिंदे सरकार अवैद्य रित्या तयार झालं आहे

    कपील सिब्बल यांनी शिवसेनेची बाजू कोर्टात केला आहे

    मनू सिंगवी यांनी त्यांच्या युक्तीवादाला सुरुवात केली आहे

    पक्षांतर कायद्याची उल्लघंन केल आहे

  • 20 Jul 2022 11:13 AM (IST)

    Harish Salve : शिंदे गटाचे वकील हरीश साळवी यांचा युक्तिवाद सुरू

    शिंदे गटाचे वकील हरीश साळवी यांचा युक्तिवाद सुरू

    शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता द्यायला हवी

    आमदारांना निलंबित करायचं कारण काय ? साळवी

    कपिल सिब्बल, ठाकरे गट

    शपथविधी हा अयोग्य

    विधिमंडळ चे रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे

    घटनेची पायमल्ली केली जातेय

  • 20 Jul 2022 11:10 AM (IST)

    गंमतीशीर असं राहिल की, दोन्ही पक्षांची भिस्त राहिली

    गंमतीशीर असं राहिल की, दोन्ही पक्षांची भिस्त राहिली

    अरुणाचलमध्ये घडलेल्या घडामोडीवरती लक्ष ठेवलं पाहिजे

    चार याचिका प्रलंबित आहेत.

    आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार

    शिंदे गटाला वेगळ्या पक्षात सामील व्हावं लागणार आहे

    आज सुप्रीम कोर्टाचा निकाल

  • 20 Jul 2022 11:09 AM (IST)

    सुप्रिम कोर्टात काही वेळात शिवसेनेच्या पाच याचिकांवर सुनावणीला सुरुवात

    अलर्ट – सुप्रिम कोर्टात काही वेळात शिवसेनेच्या ५ याचिकांवर सुनावणीला सुरवात,

    – सिरियल नंबर १५ आहे

    – एकनाथ शिंदेंच्या वतीने वकिल हरिष साळवे , निरज कौल,

    – मुळ शिवसेनेच्या वतिने वकिल कपिल सिब्बल बाजू मांडणार

    – राज्यपालांच्या वतिने वकिल तुषार मेहता

  • 20 Jul 2022 11:01 AM (IST)

    – 16 आमदारांच्या सुनावणीसंदर्भात आज निकाल येण्याची शक्यता कमी आहे

    घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट 121 –

    – 16 आमदारांच्या सुनावणीसंदर्भात आज निकाल येण्याची शक्यता कमी आहे,

    – जर निकाल विरोधात आला तर सरकार जाणार,

    – शिवसेना खरी कुणाची यासंदर्भात कोर्टाचा सांगू शकतो,

    – सरकार बेकायदेशीर आहे असं म्हणता येणार नाही,मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात वेळेची अशी कुठलीही मर्यादा नाही,

    – ओबीसी आरक्षणासंदर्भात आयोगाचा अहवाल स्वीकारला तर ओबीसी आरक्षण टिकू शकते

  • 20 Jul 2022 11:00 AM (IST)

    – शिवसेनेचे नेते अनिल परब , सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई हे कोर्ट हेयरिंगसाठी सुप्रिम कोर्टात पोहोचले

    – शिवसेनेचे नेते अनिल परब , सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई हे कोर्ट हेयरिंगसाठी सुप्रिम कोर्टात पोहोचले

  • 20 Jul 2022 10:01 AM (IST)

    मिरा भाईंदर, वसई विरार, पालघर बोईसर येथे उदंड प्रतिसाद

    मिरा भाईंदर, वसई विरार, पालघर बोईसर येथे उदंड प्रतिसाद

    मुंबई/ ठाणे/ पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला सर्वत्र जबरदस्त प्रतिसाद लाभत आहे. मंगळवार सकाळी मिरा भाईंदर, दुपारी वसई विरार आणि रात्री पालघर बोईसर येथे अमित ठाकरे यांनी दौरा केला. प्रत्येक ठिकाणी त्यांना भेटायला दोनशे हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आले होते. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्यात मनसेचे वादळ निर्माण झाले आहे. सकाळी 10 वाजता अमित यांनी मिरा भाईंदर येथील बैठक घेतली, तर रात्री 11 वाजता त्यांची पालघर बोईसर येथील बैठक संपली.

  • 20 Jul 2022 10:00 AM (IST)

    मी आज ईडीच्या चौकशीसाठी हजर राहणार नाही – संजय राऊत

    मी आज ईडीच्या चौकशीसाठी हजर राहणार नाही. एक राजकीय घडामोडीचा भाग हे सगळं सुरु आहे. तरी सुद्ध मी ईडीच्या चौकशीला हजर राहणार आहे. एखादा पक्ष आपल्या आनंदासाठी फोडला आहे. आमचं लक्ष आहे. आज सुनावणी सुरु होईल. आमच्या सर्वोच्छ न्यायालात आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. पावसाळी अधिवेशन सुरु मी ईडीच्या चौकशीला हजर राहू शकत नाही. त्यांना जी काही लढाई लढायची आहे. ती त्यांना लढू द्या.. ते आमचे सहकारी होते. आजही सहकारी होते. प्रत्येकाचं वेगळं कारण आहे. प्रत्येक कारण त्यांना माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान ऐकलं आहे. त्यामुळे दानवे यांनी याबाबतची एक क्लीप मी पाठवतो. ते इथे माझ्या शेजारी राहायला आहेत. २०१४ ते २०१९ मध्ये झालेल्या घटनेला कोण जबाबदार कोण आहेत. रावसाहेब दानवे हे पुढच्या टर्ममध्ये….बंड केलेल्या नेत्यांची मजबूरी मला माहित आहे. त्यामुळे मी त्यांच्याबाबत कोणतही वक्तव्य करीत आहे. असली आणि नकलीचा प्रश्न इथे येत नाही. काही दिवसांनी असे म्हणतील की, बाळासाहेबांना आम्हीचं शिवसेना प्रमुख केलं. या देशातील लोकतंत्र अजून मेलेलं नाही. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे त्याबाबत काहीही आत्ता बोलणं योग्य ठरणार नाही.

  • 20 Jul 2022 09:34 AM (IST)

    औरंगाबाद महापालिकेतही शिवसेनेला मोठा झटका

    औरंगाबाद महापालिकेतही शिवसेनेला मोठा झटका

    शिवसेनेचे 4 नगरसेवक शिंदे गटात दाखल

    आणखी 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याचा अंदाज

    राजेंद्र जंजाळ, सिद्धांत शिरसाठ, वर्षारणी वाडकर आणि विकास जैन हे नगरसेवक शिंदे गटात सामील

    29 पैकी चार नगरसेवक उघडपणे शिंदे गटात दाखल

    येत्या काळात आणखी 10 ते 12 नगरसेवक फुटण्याची शक्यता

  • 20 Jul 2022 09:18 AM (IST)

    शिंदे गटातील आमदारांनी बंड केल नाही, त्यांनी उठाव केला आहे – रावसाहेब दानवे

    गेल्या पंधरा दिवसातील शिवसेनेच्या घडामोडी पाहिल्यातर, त्यातून असं वाटतंय की त्यांनी बंडखोरी केली नाही. त्यांनी उठाव केला आहे. सेनेचे भाजपाचे एकविचार आहेत. त्यामुळे युती पंचवीस वर्षे टिकली. ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी युतीला लोकांनी कौल दिला. मुख्यमंत्री पदाच्या पायी त्यांनी महाविकास आघाडी तयारी केली. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगतोय की आम्ही सरकार पाडणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या आज अधिक बहुमत आहे. उलट आम्ही त्यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री झाला आहे. शब्द पाळला नाही असं म्हणतात. त्यावेळी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. त्यावेळी शिवसेनेशी आम्ही चर्चा केली. बसल्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी आतमध्ये जाऊन चर्चा केली. त्यावेळी बाहेर आल्यानंतर आम्हाला डायरेक्ट मिडीयाशी संपर्क साधला. त्यानंतर अमित शहा यांनी सह्याद्री गेस्ट हाऊसवरती आम्हाला माहिती दिली.

  • 20 Jul 2022 09:04 AM (IST)

    मुसळधार पावसामुळे मावळातील बहुतांश धरण भरलीत

    मुसळधार पावसामुळे मावळातील बहुतांश धरण भरलीत

    -त्यापैकी वडीवळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग केला जातोय

    -धरणाच्या आजूबाजूला असलेली हिरवळ, धरणातील पांढरे शुभ्र पाणी यामुळं वडीवळे धरणाकडे पर्यटकांची पाऊले वळत आहेत

    -त्या धरणाच विहंगम दृश्य ड्रोन च्या नजरेतून पाहुयात

  • 20 Jul 2022 09:01 AM (IST)

    रत्नागिरी- सिंगापूर मधील तेलवाहू बार्ज उलटलं

    रत्नागिरी- सिंगापूर मधील तेलवाहू बार्ज उलटलं प्रकरण

    बार्ज उलटल्यामुळे किनारपट्टी भागात तेलासारखे तवंग

    अरे वारी गणपतीपुळे समुद्र किनारी करड्या रंगाचा तेलाचा तवंग

    प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून किनाऱ्यावरील तवंगाचे नमुने घेतले

    सिंगापूर कंपनीचं होतं महाकाय तेलवाहू बार्ज

    बार्जमधील वस्तू आणि तेल किना-यावर लागण्याची वर्तवण्यात आली होती शक्यता

    तवंगामुळे कुठलाही धोका बंदर विभागाच स्पष्टीकरण

  • 20 Jul 2022 08:54 AM (IST)

    एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक घटना

    एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक घटना आली पुढे

    बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात घडली घटना

    त्याने स्वत:च्या पत्नी व मुलालादेखील जाळण्याचा प्रयत्न केला

    मात्र, ते त्यातून बचावले. आगीत व्यावसायिकाचा अक्षरश: कोळसा झाला.

    या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

    रामराज गोपाळकृष्ण भट ६३, असे मृत व्यक्तीचे नाव

    आर्थिक तंगीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

  • 20 Jul 2022 08:52 AM (IST)

    गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करणार राष्ट्रवादी पक्षाचे नेते रोहित पवार

    गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करणार राष्ट्रवादी पक्षाचे नेते रोहित पवार

    प्राणहिता चा गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे सिरोंचा तालुक्यातील 40 गावांना बसला होता पुराचा वेढा

    सिरोंचाच्या नगरम चींतलपल्ली अंकिसा असरअली या गावांना सर्वात जास्त पुराचा फटका बसला

  • 20 Jul 2022 08:51 AM (IST)

    -मावळसह;पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ७०.४२ टक्के पाणीसाठा झालाय

    -मावळसह;पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ७०.४२ टक्के पाणीसाठा झालाय

    -गेल्या २४ तासात झालेला पाऊस ३४ मि.मि.

    -१ जूनपासून झालेला पाऊस १,४६१ मि.मि.

    -गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस ७९८ मि.मि.

    -धरणातील सध्याचा पाणीसाठा ७०.४२ टक्के”

    -गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा ४०.४४ टक्के

    -गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ २.६२ टक्के

    -१ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = ५३.५८ टक्के

  • 20 Jul 2022 08:27 AM (IST)

    हॅक करत चोरलेली फॉर्च्यूनर कार आणि संशयितांना पोलिसांनी पकडले

    -हॅक करत चोरलेली फॉर्च्यूनर कार आणि संशयितांना पोलिसांनी पकडले

    -नाशिक रोड पोलिसांची कारवाई

    -पळसे गावातील पेट्रोल पंपासमोरून ॲटोमेटिक फॉर्च्यूनर कार लॅपटॉप आणि वायफाय सिस्टीमने हॅक करत चोरट्यांनी राजस्थानला चोरून नेली होती

    -मात्र, कारचे इंडिकेटर सुरूच राहत असल्याच्या एकमेव धाग्याच्या आधारे पोलिसांनी या गाडीचा शोध लावला

    -या प्रकरणात संशयिताला देखील ताब्यात घेतले

  • 20 Jul 2022 08:27 AM (IST)

    शिवसेना पदाधिकारी बाळू कोकणे यांच्या वर झालेला हल्ला राजकीय वादातूनच

    नाशिक – शिवसेना पदाधिकारी बाळू कोकणे यांच्या वर झालेला हल्ला राजकीय वादातूनच

    हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी फेकली कोकणे यांच्यावर काळी शाई

    काही दिवसांपूर्वी कोकणे यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांच्या पोस्टर वर फेकली होती शाई

    त्याचा बदला म्हणून हल्ला झाल्याचा संशय

    कोकणे हल्ला प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

    आदित्य ठाकरे उद्या कोकणे यांची भेट घेण्याची शक्यता

  • 20 Jul 2022 08:26 AM (IST)

    कोल्हापूरात स्वाईन फ्लू चा धोका वाढला

    कोल्हापूरात स्वाईन फ्लू चा धोका वाढला

    कोल्हापुरात चार दिवसात आढळणे स्वाइन फ्लूचे 9 रुग्ण

    9 रुग्णाच्या संपर्कात आलेले जवळपास 150 जण स्वाईन फ्ल्यू संशयित

    वातावरणातील बदलाचा परिणाम

    आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या सूचना

  • 20 Jul 2022 07:38 AM (IST)

    एकनाथ शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांची पुणे शहरप्रमुख पदी नियुक्ती,

    – एकनाथ शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांची पुणे शहरप्रमुख पदी नियुक्ती,

    – तर अजय भोसले यांची जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती,

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वता जाहीर केली कार्यकारणी,

    – शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

  • 20 Jul 2022 07:30 AM (IST)

    जिल्ह्यातील टाटांची पाच धरणे वगळता उर्वरित २६ धरणांमधील मिळून एकूण १२१ टीएमसी पाणीसाठा

    जिल्ह्यातील टाटांची पाच धरणे वगळता उर्वरित २६ धरणांमधील मिळून एकूण १२१ टीएमसी पाणीसाठा,

    – हे प्रमाण या धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्याच्या ६०.८८ टक्के इतके,

    – पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासह आंद्रा आणि कलमोडी ही तीन धरणं फुल्ल,

    – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात सुमारे तिप्पटीने वाढ

  • 20 Jul 2022 07:12 AM (IST)

    शिवसेना खा. कृपाल तुमाने शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर

    – शिवसेना खा. कृपाल तुमाने शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर

    – नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुखंही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती

    – आ. आशिष जैयस्वाल पाठोपाठ खा. तुमाने शिंदे गटात गेल्यानं नागपूर ग्रामीण मध्ये शिवसेनेला मोठं खिंडार

    – शिंदे गटात गेल्याने खा. तुमाने यांना पुढील निवडणूकीत भाजपच्या मदतीची आशा

    – रामटेक मधून निवडणूक येण्यासाठी तुमाने यांना लागणार भाजपची मदत

  • 20 Jul 2022 07:11 AM (IST)

    एकनाथ शिंदे गटाने सुरु केलं मिशन विदर्भ

    – एकनाथ शिंदे गटाने सुरु केलं मिशन विदर्भ

    – एकनाथ शिंदे यांचे मानसपुत्र किरण पांडव यांच्यावर पूर्व विदर्भाची जबाबदारी

    – प्रत्येक जिल्ह्यात शिंदे गटात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करुन घेणार

    – विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सहभागी करण्याचे प्रयत्न

    – गडचीरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूरमध्ये शिवसेनेला खिंडार पाडणार शिंदे गट

    – शिवसेनेच्या आजी, माजी पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार

  • 20 Jul 2022 07:11 AM (IST)

    रिफायनरी विरोधी आंदोलकांना अटकपूर्वक जामीन नामंजूर !

    रत्नागिरी – रिफायनरी विरोधी आंदोलकांना अटकपूर्वक जामीन नामंजूर !

    रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला अटकपूर्व जामीन

    29 जून रोजी गोवळ गावच्या सड्यावर स्थानिकांनी केला होता ड्रोन सर्वेक्षणाला विरोध

    आंदोलकांपैकी आठ प्रमुख व्यक्तीविरोधात 353 अंतर्गत गुन्हा दाखल

  • 20 Jul 2022 07:00 AM (IST)

    एकनाथ शिंदे गटाने सुरु केलं मिशन विदर्भ

    – एकनाथ शिंदे गटाने सुरु केलं मिशन विदर्भ

    – एकनाथ शिंदे यांचे मानसपुत्र किरण पांडव यांच्यावर पूर्व विदर्भाची जबाबदारी

    – प्रत्येक जिल्ह्यात शिंदे गटात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करुन घेणार

    – विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सहभागी करण्याचे प्रयत्न

    – गडचीरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूरमध्ये शिवसेनेला खिंडार पाडणार शिंदे गट

    – शिवसेनेच्या आजी, माजी पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार

  • 20 Jul 2022 07:00 AM (IST)

    शिंदे गटात गेल्याने खा. तुमाने यांना पुढील निवडणूकीत भाजपच्या मदतीची आशा

    – शिवसेना खा. कृपाल तुमाने शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर

    – नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुखंही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती

    – आ. आशिष जैयस्वाल पाठोपाठ खा. तुमाने शिंदे गटात गेल्यानं नागपूर ग्रामीण मध्ये शिवसेनेला मोठं खिंडार

    – शिंदे गटात गेल्याने खा. तुमाने यांना पुढील निवडणूकीत भाजपच्या मदतीची आशा

    – रामटेक मधून निवडणूक येण्यासाठी तुमाने यांना लागणार भाजपची मदत

  • 20 Jul 2022 07:00 AM (IST)

    धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात तुरळक पाऊस झाला

    धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात तुरळक पाऊस झाला आहे. मात्र आणि वरसगाव आणि पानशेत परिसरात घाट माथ्यावर चांगला पाऊस आहे . परिणामी या दोन धरणात पाणी मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने पानशेत धरण ६९ टक्के भरले असून वरसगाव धरण ६३ टक्के भरले आहे. या पावसाळ्यात आता पर्यंत मुठा नदीत खडकवासला धरणातून ३.३४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

    खडकवासला -२ मिमी, पानशेत -१५ मिमी, वरसगाव- १६ मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३३ मिमी पावसाची नोंद तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १९.३५ ( ६६.३८ टक्के) टीएमसी झाला आहे. गेल्या २४ तासातील हा पाऊस आहे.मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ११.०३(३७.८३ टक्के) होता.

  • 20 Jul 2022 06:42 AM (IST)

    आय.सी.आय.सी.आय बँकेच्या शाखेतून तब्बल १२ कोटी २० लाख रूपयांची रोकड लंपास

    आय.सी.आय.सी.आय बँकेच्या शाखेतून तब्बल १२ कोटी २० लाख रूपयांची रोकड लंपास

    चोरीचे कोट्यवधी रुपये चोराने आठवडाभर मुंब्रा परिसरात टेम्पोत ठेवले लपवून

    ठाणे मालमत्ता गुन्हे पोलिसांनी चौघांपैकी तिघांना मुंब्रा परिसरातून ठोकल्या बेड्या

    टेम्पो मधून ५ कोटी ८० लाखांची रोकड ही केली जप्त

    मुख्य आरोपी अजूनही फरार पोलिसांचा शोध सुरू

    डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा परिसराती घटना

Published On - Jul 20,2022 6:40 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.