Maharashtra News Live Update : महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसऱ्या कोणत्याही राज्यांत जावे – उदयनराजे भोसले
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज शनिवार 30 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. अकोला लोहमार्ग पोलिसांनी आज अकोला रेल्वे स्थानकावर मुंबई येथून आलेलं सोन आणी चांदी कुरियरने हस्तगत केली. सोने आणि चांदी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामध्ये 100 किलो चांदी आणी दोन किलो सोनं आहे. तर आंगडिया कुरीअर सर्विसने हे सोनं-चांदी अकोल्यात आलं आहे. तर आता हे सोनं-चांदी कुणाची आहे ? या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
महिलेला शिवीगाळ केल्या प्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या प्ररकरणात संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. ऑडिओ क्लिप च्या आधारे पोलिसांनी संजय राऊत आणि विरोधात हा गुन्हा दाखल केला. भारतीय कलम 507 अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.
-
मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी मुख्यमंत्री शिंदे गटात दाखल झाल्यानंतर मावळ तालुक्यातील शिवसेनेत संघर्ष
मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी मुख्यमंत्री शिंदे गटात दाखल झाल्यानंतर मावळ तालुक्यातील शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख मच्छिन्द्र खराडेंनी मावळ लोकप्रतिनिधी आणि त्याचे कार्यकर्ते याना उद्देशून एक भला मोठा मेसेज व्हाट्सअँप ग्रुपवर टाकला होता. त्यात गद्दार आणि अन्य शब्दाचा वापर केला होता. हा मजकुर कट्टर शिवसैनिकांच्या व्हाट्सअँप ग्रुपवर एकनाथ शिंदे गटाला उद्देशून टाकलेला मेसेज खराडेंना भोवला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सी.आर.पी.सी 149 प्रमाणे खराडेना नोटीस धाडली आहे.
-
-
गोकुळ दूध संघाकडून खरेदी दूध दरात आणि विक्री दरात दोन रुपयांची वाढ
गोकुळ दूध संघाकडून खरेदी दूध दरात आणि विक्री दरात दोन रुपयांची वाढ. म्हशीच्या दूधाच्या दरात 2 रुपयांनी तर गायीच्या दूधाच्या दरात 1 रुपयांनी वाढ. खरेदी दराबरोबर विक्री दरात देखील गोकुळकडून वाढ करण्यात आली आहे.
-
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) तातडीने दिल्लीला जाणार आहेत. औरंगाबाद दौरा आवरता घेत एकनाथ शिंदे जाणार दिल्लीला. महालगाव इथली सभा आटोपून ते दिल्लीला निघणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी ते दिल्लीला जाणार .
-
भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची छत्रपती संभाजीराजेंची पंतप्रधान मोंदींकडे मागणी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज ट्विट करीत एकप्रकारे भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची व याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत.त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान Narendra Modi जी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा अशी मागणी त्यांनी ट्विट करत केली आहे.
त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान @narendramodi जी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा. @rashtrapatibhvn
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 30, 2022
-
-
महाराष्ट्राच्या इतिहासातील राज्यपांलाचे आतापर्यंतचे सर्वात वाईट विधान; प्रणिती शिंदेची टीका
महाराष्ट्राच्या इतिहासातील राज्यपांलाचे आतापर्यंतचे सर्वात वाईट विधान. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने शांतताप्रिय समाजात फूट पाडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, पण माझ्या मते ही आरएसएस आणि भाजपची संस्कृती आहे!
Worst statement by a Governor ever in the history of Maharashtra,very unfortunate for a person sitting in a constitutional post to divide a peaceful society, but I guess thats the culture of RSS and BJP! @INCIndia @INCMaharashtra https://t.co/lklZp3MJ1G
— Praniti Shinde (@ShindePraniti) July 30, 2022
-
महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये; अजित पवार यांची राज्यपालांवर टीका
“मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे… खरा वीर वैरी पराधीनतेचा। महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा।।” असे ट्विट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 30, 2022
-
मुख्यमंत्र्यांचं संपुर्ण भाषण एका क्लिकवर
आम्ही घेतलेली दादा भुसेने घेतलेली गुलाबराव ने घेतली निसर्गा आमदारांनी घेतलेली भूमिका
पांडुरंगाचे दर्शन घ्यायला त्याची पूजा करायला आषाढी एकादशीची पूजा त्याला भाग गेला का ती पूजा केली जात असताना ज्या ज्या रस्त्यावरून मी गेलो मला वाटतं हा तुमचा स्वागत केलं मला प्रतिसाद दिला.
ज्या बाळासाहेबांनी हे हिंदुत्वाची राष्ट्र प्रेमाची राष्ट्रभक्तीची जी भूमिका घेतली कायम सांगितलं त्यांचे भाषण तुम्ही आहेत का कधी जवळ उभा करू नका ते आमचे शत्रू आहे बंद करेल.
परंतु त्यांच्याशी कधी मैत्री करणार नाही हे बाळासाहेब आणि काय चुक केली 24 तास लोकांची काम करणं ठा झोपायचे पहिली गाडी पकडून माणूस जायचं असं दिघे साहेबांनी काम केलं लोकांचं त्यांचे भूमिका आम्ही घेतली.
ज्या भारतीय जनता पार्टी बरोबर फोटो दुसरीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा फोटो लावून आपण भूमिका म्हणजे हिंदुत्वाची भूमिका
म्हणजे आपण तुमच्यासारखे क्षेत्र हमारे आणि त्याच लोकांच्या घरी राष्ट्रवादीचे लोक माणसं पाठवायचे तुम्ही राष्ट्रवादीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपल्या शिवसैनिकांची आज आपल्या आमदार आहेत शिवसेनेचे निवडून आलेले त्यांच्या भाऊसाहेब कल्याण जे पराभूत झालेले आमदार ला काही दोन तो ज्या लोकांनी त्याला मागायला जाणार निर्माण झाली
आणि शिवसेनेचे आमदार ते म्हणाले उद्या आम्ही असंच राहिलो आम्हाला दुर्दैवाने त्याच्यामध्ये यश मिळालं आणि काय पाहून उचल लोक विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षाकडे आम्ही आम्हाला माहीतच नाही पुढे काय काही लोकांना तर वाटले किंवा राजकीय काही लोकांना काही माझ्याबद्दल आमच्याबद्दल आणि खरोखर
-
राज्यपालांच्या वक्तव्यावर काही गुजराती लोक संतापले असून काही गुजराती त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना दिसले.
राज्यपालांच्या वक्तव्यावर काही गुजराती लोक संतापले असून काही गुजराती त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना दिसले.
कांदिवलीतील महावीर नगर परिसर हा संपूर्ण गुजरातींचा परिसर असल्याचे येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात प्रत्येक जात, धर्म आणि प्रत्येकाने मुंबईच्या विकासात मोठा हातभार लावला आहे. .
कोणत्याही एक-दोन राज्यांनी लोकांना हातभार लावला किंवा त्यांच्या जाण्याने आर्थिक भांडवल होणार नाही, असे म्हणणे चुकीचे आहे.
गुजराती आणि राजस्थानी लोकांकडून पैसा येत नाही, प्रत्येकजण कष्ट करतो आणि प्रत्येकजण पैसे कमावतो,
त्यामुळे काही लोक राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करतानाही दिसले.
-
आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय अनेक दिवसांपासून घेत आहोत – मुख्यमंत्री
राज्यात सगळीकडे सकारात्मक चर्चा आहे. आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय अनेक दिवसांपासून घेत आहोत. पोलिस भरती सुध्दा लवकरचं निघणार आहे. लोकांच्या हिताचे सगळे निर्णय आम्ही घेणार आहोत. राज्यात जिथं जिथं अडचण आहे तिथं सरकार मदत करणार. राज्यपालांचं जे काही विधान आहे, ते विधान वैयक्तिक आहे. त्यामुळे त्यांचं काम जे काही ते कोणीही नाकारू शकत नाही. मुंबई महाराष्ट्राला सहजा सहजी मिळालेलं नाही. मुंबईत ज्या माणसांनी योगदान दिलं आहे ते कधीही विसरणार नाही. मराठी माणसाच्या प्रगतीवर ही मुंबई आहे. मुंबईला अधिक महत्त्व आहे. मुंबईला देशात अधिक महत्त्व आहे. बाळासाहेबांनी अनेकदा मराठी माणसांना मदत केली आहे. मुंबईवरती किती संकट आली तरी कधीही थांबत नाही.
-
केसरकर साहेब तुमच्या नातवाला कोणी आशीर्वाद दिला, महापौराचा टोला
केसरकर साहेब तुमच्या नातवाला कोणी आशीर्वाद दिला.. या छोट्या गोष्टीच राजकारण झालंच नाही पाहिजेत. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मुख्यमंत्री भेटतात तरी आमदार म्हणतात की मुख्यमंत्री भेटत नाहीत. माझा तेच सांगण्याचा उद्देश होता राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितलीच पाहिजेत-किशोरी पेडणेकर संधी म्हणून न्हवे ज्या महाराष्ट्राचा पालक म्हणून राज्यपाल येतात तेंव्हा त्यांनी एक दिशा दिली पाहिजेत.. हे राज्यपाल वारंवार अपमानच करत आहेत.. ते एका पक्षाचे कार्यकर्ते वाटायला लागले आहेत.. एका स्क्रिप्टच पान उडाल म्हणून उडू उडू बोलतात शिंदे गट निषेध करणारच नाही.. मनसे – मनसे कशीही असलक्ष तरी त्यांना ज्या ज्या वेळी मराठीचा मुद्दा येतो तेंव्हा ते बोलतात. त्याच्या धमन्यात आजही मराठीच रक्त वाहत आहे हे चांगलं आहे. दीपक केसरकर यांनी म्हटलं की स्क्रिप्ट लिहून दिली जाते. ते बोलले ते बरच झालं त्यांना स्क्रिप्ट दिली जाते आणि त्यानुसार ते वाचतात हे तरी आता स्पष्ट झालं.. राज्यपाल स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामात आणि गोष्टीत जास्त लक्ष देतायत.. दुबईतही मसाला किंग म्हणून मराठी माणसालाच ओळखलं जातं.. मुंबईने सगळ्यांना पोट भरण्यासाठी कामासाठी सामावून घेतल. त्याची वाटणी कधी केली नाही वादग्रस्त राज्यपाल म्हणून त्यांची सगळीकडे त्यांची ओळख झालीय. दिपक केसरकर गटाचे प्रवक्ते सांगतात प्रवक्त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली जाते आपण राज्यपाल आहात मी परत नम्रतेने समजावून सांगतेय पुन्हा अशी गुस्ताखी करू नका.. वादग्रस्त राज्यपाल म्हणून त्यांची ओळख तिथे असलेले हसुन बोलतात त्यांना काहीच वाटत नाही मुंबईचा विकास सगळ्यांनीच केला.. सगळ्यानी मिळून मुंबईला मोठं केलं 106 हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी बलिदान दिल राज्यपाल स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामात आणि गोष्टीत जास्त लक्ष देतायत..
-
जळगावातून मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
मुख्यमंत्र्यांनी आज जे काही सरकारकडून चांगले निर्णय घेतले आहेत. त्याची माहिती दिली आहे.
-
जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत – उद्धव ठाकरे
ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालाविषयी भूमिका घेतली पाहिजे. जे पार्सल कुठून तरी पाठवलं आहे. ते पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल महाराष्ट्रात राहुन जाती पाती आणि धर्मात आगी लावत असेल मराठी माणसाचा अपमान करत असेल तर त्यांना तात्काळ गुन्हा केला असेल र घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं हा निर्णय त्या स्तरावर घेतला जावा ही हिंदूंच्यावतीने मागणी आहे
-
कोश्यारींनी राज्यपालपदाचा मान ठेवला नाही; उद्धव ठाकरेंची राज्यापालांवरती जोरदार टीका
मला असं वाटतं महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. ही सगळी त्यांनी संस्कृती पाहिली असेल. कोश्यारींनी त्यांच्या पदाचा मान ठेवलेला नाही. हे विधान अनावधानाने आलेलं विधान नाही. मागच्या काही दिवसांपासून सगळं वरती आलं आहे. आज तो ज्यांनी कहर केला आहे. त्यांची भाषण कोण लिहुन देत माहित नाही. त्यांची भाषण कोण लिहून देत माहित नाही. महाराष्ट्राचं एक पद आहे त्याला योग्य माणूस नाही. १०५ जणांनी रक्त सांडले आहे महाराष्ट्रासाठी…
हे पार्सल राज्यपाल पदाचं मान राखत नसेलं तर घरी पाठवण्याचं काम त्या लेवलवरती घ्यावा
-
वसई विरार नालासोपारा शहरातील प्रवेश मार्गिकेवर लवकरच होणार अत्याधुनिक प्रवेशद्वार
-वसई विरार नालासोपारा शहरातील प्रवेश मार्गिकेवर लवकरच होणार अत्याधुनिक प्रवेशद्वार
– प्रवेशद्वाराने शहराला मिळणार स्वतंत्र स्वताची ओळख
– विरार, वसई, नालासोपारा, नायगाव या चारही महामार्गावरून शहरात प्रवेश करताना असणार आहेत प्रवेशद्वार
– पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून साकारणार आहेत प्रवेशद्वार
– प्रवेशद्वार चे संकल्पचित्र पालिकेने तयार केले असून, यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, लवकरच प्रशासकीय मंजुरी घेऊन कामाला सुरुवात होणार आहे.
– महामार्गवरील विरार फाटा, वालीव फाटा, पेल्हार, सातीवली या ठिकाणी उभारणार अत्याधुनिक प्रवेशद्वार
– वसई विरार महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांची माहिती
-
राज्यात अतिवृष्टी मुळे नुकसान झाले आहे – शरद पवार
राज्यात अतिवृष्टी मुळे नुकसान झाले आहे..
नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार दौऱ्यात आहे
राष्ट्रवादी संकटाच्या काळात उभी राहते
राष्ट्रवादी भवनाची इमारत पाहून आनंद झाला…
– सगळ्या देशाची सत्ता एकाच हातात समावण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न
– सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे
– पंचायत समिती, जिल्हा परिषद माध्यमातून गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत लाभ देण्याचा प्रयत्न
– आज देशात विदारक चित्र
– आम्हीच देशाचे मालक आहोत असं भासवण्याचा प्रयत्न
– धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात जास्तीत जास्त गावात, लोकांमध्ये जावून संवाद साधण्याची इच्छा होती – मात्र काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान – विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतीच प्रचंड नुकसान – अजित पवार त्या भागाचा दौरा करतायत आणि राज्यसरकारने काय करायला हवं, याच्या सूचना देतायत, याचा आनंद
– सत्तेचे काही गुण असतात काही दोष असतात – केंद्रित झालेली सत्ता सामान्य माणसाला त्रास देते – सगळी सत्ता मुठीत ठेवण्यासाठी, संबंध देशाचे मालक आम्हीच आहोत अस चित्र निर्माण केलं जातंय
– काँग्रेस खासदारांनी राष्ट्रपत्नी म्हणून चूक केली, त्यांनी माफी मागण्याची ही तयारी दाखवली
– बोलले एक आणि मागणी सोनिया गांधींनी माफी मागण्याची
– मी माफी का मागायची हे सोनिया गांधी विचारायल्या गेल्या तर त्यांच्यावर लोक धावून आले – राष्ट्रवादी खासदारांनी त्यांना तिथून बाहेर काढलं अन्यथा एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती
– विधानसभा अध्यक्ष पदासाठी उध्दव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रावर राज्यपालांनी २ वर्षे विधानसभा अध्यक्ष पदाच्या पत्रावर सही केली नाही – सरकार बदललं आणि २ दिवसात निवडणूक लावली
-
राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिसेल – शरद पवार
आज मला एका गोष्टीचा आनंद आहे. या देशाच्या राज्याच्या हितासाठी मजबूत स्थितीत उभा राहिल याची सुरुवात आपल्याला करायची आहे. प्रत्येक तालुक्यात त्याचा उल्लेख करण्यात आला. त्याचा जो काही घटक आहे. पुन्हा एकद राष्ट्रवादीचा झेंडा महाराष्ट्रावरती पुन्हा येईल येवढी खात्री देतो…
-
राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही – देवेंद्र फडणवीस
राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसाचं कार्य अत्यंत चांगलं आहे. प्रत्येक समाजाचं मुल्याकन आहे. मराठी लोकांनी महाराष्ट्रासाठी खूप मेहनत घेतली जाते. काल राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे चुकीचं आहे. राज्यपाल हे काय बोलले आहेत ते त्यांचा खुलासा करतील पण आम्ही मात्र राज्यपालांशी सहमत नाही. अजित पवार मराठवाड्यात गेले आहेत. सत्तेत असताना गेले असता तर बरे झाले असते.
-
कार्यालयाची दुरावस्था झाली तर समजावं त्याचा वापर कमी झालाय
– कार्यालयाची दुरावस्था झाली तर समजावं त्याचा वापर कमी झालाय – कार्यकर्त्यांची गर्दी नसली तर कर्यालयाला अर्थ नाही – नेत्यांची वाट पाहावी लागते, अशी आपली व्यवस्था पण शरद पवार वेळेआधीच या ठिकाणी आले – ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर भाजपने ढोल वाजवले – आम्ही आरक्षण मिळवून दिलं, हे भाजपने सांगितलं – मग नगरपालिका निवडणुकीतील आरक्षण गेलं तर त्याची जबाबदारी भाजप का घेत नाही?
– शिंदे फडणवीस सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेलं – ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक..
राज्यपाल यांना जाब विचारण्यासाठी व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाठविणार पत्र.
१ ऑगस्ट २०२२ पासून १० लाख पत्र राज्यभरातून पाठविण्यात येणार….
राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांची माहिती..
-
राज्यपालांना हे वक्तव्य शोभणारे नाही
गुजराती मारवाडी बांधवांच्या कारखान्यांना जागा मराठी माणसाने दिल्या –
राज्यपालांना हे वक्तव्य शोभणारे नाही
एखाद्या समाजाची स्तुती करा त्याबद्दल आक्षेप नाही मात्र मराठी माणसाचा अपमान करू नका –
राज्यपालांनी मराठी जनतेची मन दुखावली आहे
-
मराठी माणसाला डिवचू नका, राज ठाकरेंची राज्यापालांना सुचना
मराठी माणसाला डिवचू नका, राज ठाकरेंची राज्यापालांना सुचना
“मराठी माणसाला डिवचू नका!” pic.twitter.com/0to6ByNyPk
— Raj Thackeray (@RajThackeray) July 30, 2022
-
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा येवला आणि शिर्डी दौरा रद्द
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा येवला आणि शिर्डी दौरा रद्द
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे भुजबळांचा दौरा रद्द
येवल्यात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या घेणार होते भेटी
तसेच कापसे उद्योग समूह येथील दिव्यांग कारागीरांनी साकारलेल्या पैठणीवरील हस्तकला व विणकामास देणार होते भेट
तर दुपारी 4 वाजता शिर्डी येथे घेणार होते साईबाबा चे दर्शन
-
अर्जुन खोतकर यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद
मराठवाड्यातील मातब्बर नेते म्हणून खोतकर यांच्या निर्णयाकडे राजकीय नेत्यांचे लक्ष
अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार का याकडे राज्याचे लक्ष
दिल्लीत झालेल्या भेटीगाठीनंतर अर्जुन खोतकर आज निर्णय जाहीर करण्याची शक्यता
मुख्यमंत्र्यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांच्या पत्रकार परिषदेला महत्त्व
-
राज्यपाल स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि आणि भारतीय जनता पक्षाची काय भूमिका असेल ते भारतीय जनता पक्ष ठरवेल – संदिप देशपांडे
मराठी माणसाचा आहे आणि त्यामुळे इतरांना फायदा झाला आणि मला असं वाटतं ज्या गोष्टीचा इतिहास आपल्याला कळत नाही आपल्याला आपल्याला कळत नाही इतरांमुळे महाराष्ट्राची प्रगती झाली नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि मला असं वाटतं ज्या गोष्टीचा इतिहास आपल्याला कळत नाही आपल्याला मुळात तेच सांगितलं ना इथे जे उद्योगधंदे आले इथले जे इंडस्ट्रीज डेव्हलप ज्याला इथले जे झाले हे मराठी माणसाची आणि इथल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी केलेल्या नियोजनाचा परिणाम आहे इथे त्यांनी जी मेहनत घेतली म्हणून इथे उद्योगधंदे आले म्हणून महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा प्रगत आहे त्यामुळे इतरांच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा आत हे लक्षात ठेवलं पाहिजे आमचा त्यांना स्पष्ट इशारा आहे की आम्ही त्यांच्या पदाचा पूर्ण आदर राखतो पण याचा अर्थ ते वाटेल ते बोलतील ते आम्ही सहन करू असं होत नाही याचा निषेध आम्ही करतोय असा एखादा पदाची गरीब असते त्यांनी नाही सांभाळले तरी आपल्याला सांभाळायला लागतात काही गोष्टी आमचा त्यांना इशाराही ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही त्याच्यात त्यांनी भरून नाही मलाच वाटतं राज्यपाल एका भारतीय जनता पक्षाचे नाहीयेत राज्यपाल स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि आणि भारतीय जनता पक्षाची काय भूमिका असेल ते भारतीय जनता पक्ष ठरवेल
-
तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.
जालना तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना जालना तालुक्यातील बेथल येथे घडली. पावसामुळे तलाव भरल्याने हे दोन मुले आपल्या मित्रांसोबत या तलावात पोहायला गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन तरुणांनाचा या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्रीपर्यंत या मुलांचा पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध सुरू होता.
-
विट्यात मोटारसायकल टोळी पोलिसांच्या ताब्यात
विटा पोलिसांनी आपला कारवाईचा धडाका कायम ठेवत पुन्हा धडाकेबाज कारवाई,,, विट्यात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पुन्हा केला पर्दाफाश,,, ९ गाड्या जप्त करत आरोपी केले गजाआड
-
जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने वातावरणात बदल होऊन रुग्णात वाढ झालीय
पिंपरी चिंचवड
-पिंपरी-चिंचवड शहर तापाने फणफणल आहे, डेंग्यू, मलेरिया सारखे आजार डोकं वर काढत असून 29 जुलै पर्यंत 500 पेक्षा अधिक संशयित रुग्ण आढळेत, पैकी तपासणीत 37 जणांना डेंग्यू ची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय
-ताप, खोकला, सर्दी अशा आजाराने नागरिक हैराण झालेत, नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याच आवाहन महानगर पालिकेकडून करण्यात आलीय
-जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने वातावरणात बदल होऊन रुग्णात वाढ झालीय
-
सुधाकर बडगुजर
सुधाकर बडगुजर – गटातील आमदारांना खुश करण्यासाठी नाशिक ऐवजी मुख्यमंत्र्यांच्या बैठका मालेगाव मध्ये – नाशिक हे विभागीय केंद्र असल्याने इथे बैठक घेणं अपेक्षित होत – आपल्या 40 आमदारांसाठीच मुख्यमंत्री काम करणार आहेत का ? – मुख्यमंत्री राज्याचे की 40 आमदारांचे ? – मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे भाजपाचेच कार्यकर्ते होते – खासदार हेमंत गोडसे स्वार्थी आहेत – दोन वेळेस खासदारकी दिली, तरी पाठीत खंजीर खुपसला – नाशिकची शिवसेना अभेद्य आहे – मालेगाव जिल्हा निर्मितीचा हट्ट फक्त दादा भुसे यांचाच – भाजपाच्या आमदारांनी देखील त्यांना विरोध केलाय
-
पुण्यात जुलैमध्ये पावसाचा विक्रम,10 वर्षांचे रेकॉर्ड मोडीत
– पुण्यात जुलैमध्ये पावसाचा विक्रम,10 वर्षांचे रेकॉर्ड मोडीत,
– 2019 मध्ये शहरात जुलै महिन्यात 377 मिमी पावसाची नोंद झाली होती,
– यंदा पावसाने शुक्रवारी सकाळी 377.6 मिमीचा टप्पा गाठला,
– या महिन्यात सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस झाल्याचं वेधशाळेच्या आकडेवारीवरून स्पष्ट.
-
स्काय डायनिंग हॉटेल मालकाने आवश्यक असलेल्या परवानगी घेतल्या नसल्याचं पुढे आलं आहे
-पुण्यातील कासारसाई धरणाच्या कडलेला उभारण्यात आलेलं हवेतील हॉटेल म्हणजे स्काय डायनिंग वादाचा भोवऱ्यात सापडलं आहे
-स्काय डायनिंग हॉटेल मालकाने आवश्यक असलेल्या परवानगी घेतल्या नसल्याचं पुढे आलं आहे
-त्यामुळं आवश्यक असलेल्या परवांग्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नोटीसीद्वारे दिलेत
-120 फुटांवर जेवण्याची सोय करणे ही बाब अत्यन्त धोकादायक असल्याचं पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे
-
गेल्या महिन्यात वाहतूक पोलिस, महापालिका व खासगी कंपनीने टोइंग व्हॅनद्वारे कारवाई सुरू केली.
वाहनचालक अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका असतो. यांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू
गेल्या महिन्यात वाहतूक पोलिस, महापालिका व खासगी कंपनीने टोइंग व्हॅनद्वारे कारवाई सुरू केली.
गेल्या ५५ दिवसांत वाहतूक पोलिसांनी २ हजार ६४७ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली.
शहरातील मुख्य बाजारपेठा व त्यालगतच्या रस्त्यांवर वाहने पार्क होत असल्याने वाहतूक विस्कळीत होते.
यावर उपाय म्हणून १ जूनपासून वाहतूक पोलिसांनी वाहने उचलण्यास सुरुवात केली.
-
औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असणार 1200 पोलिसांचे सुरक्षा कवच..
औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असणार 1200 पोलिसांचे सुरक्षा कवच..
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा येत आहेत औरंगाबाद जिल्ह्यात..
मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक असणारा असून तब्बल 1200 पोलीस कर्मचारी असणार तैनात..
तीन पोलीस आयुक्तांसह, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक,उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी असणार तैनात..
कायदा आणि सुव्यवस्था तसेच सुरक्षेचा प्रश्न पाहता पोलिसांचा मोठा पोस्ट फाटा शहर भर असतात तैनात..
मुख्यमंत्री महोदय ज्या ठिकाणी जाणार त्या त्या ठिकाणी असणार पोलिसांचा चोख बंदोबस्त..
-
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 742 कोटी रुपयांचे नुकसान..
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 742 कोटी रुपयांचे नुकसान..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाड्यातील पाऊस,अतिवृष्टी, पीकपाणी संदर्भात घेणार आढावा..
शेती नुकसान भरपाई साठी 308.8 कोटी बाधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी 433.64 कोटी असा 742.44 कोटींची केली जाणार मागणी..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा बैठकीनंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काय दिलासा देतील याकडे सर्वांचे लक्ष..
6 लाख 27 हजार शेतकऱ्यांचे 4 लाख 38 हजार हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान..
-
विदर्भातील पूर परिस्थितीच्या पाहणी चा दौरा करून अजित पवार आज मराठवाडयात
– विदर्भातील पूर परिस्थितीच्या पाहणी चा दौरा करून अजित पवार आज मराठवाडयात
-माहूर येथेंब रेणुकांदेवी च्या दर्शन घेऊन अजित पवारांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात
– माजी मंत्री धनंजय मुंडे सोबत
-
पुणे आणि पिंपरी शहरांतील बहुतांश मेट्रो प्रकल्पाचे काम डिसेंबअखेर पूर्ण होणार
– पुणे आणि पिंपरी शहरांतील बहुतांश मेट्रो प्रकल्पाचे काम डिसेंबअखेर पूर्ण होणार,
– पिंपरी चिंचवड – स्वारगेट आणि वनाज- रामवाडी दरम्यान ३१ किलोमीटरचे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे,
– त्यातील पिंपरी – फुगेवाडी आणि वनाज- गरवारे कॉलेज दरम्यान मेट्रोचे ६ मार्चला मोदीच्या हस्ते उदघाटन झाले.
– डिसेंबरपर्यंत बहुतांश मेट्रो मार्ग आणि स्थानकांचे काम पूर्ण होईल,
– मात्र पाऊस वाढल्यास वेळापत्रकात बदल होऊ शकतो.
– महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांची माहिती.
-
नागपुरात कोरोना पाठोपाठ आता स्वाइन फ्लू चे रुग्ण वाढत आहे
नागपुरात कोरोना पाठोपाठ आता स्वाइन फ्लू चे रुग्ण वाढत आहे
29 दिवसात 34 स्वाइन फ्लू च्या रुग्णांची नोंद
वर्षभरात 40 रुग्णांनाची नोंद झाली त्यातील 34 रुग्ण हे मागील 29 दिवसातील आहे
प्रशासनाची वाढली मोठी चिंता
तर दुसरी कडे काल कोरोना मुळे एकाच मृत्यू झाला
तर 24 तासात 215 रुग्णांनाची नोंद झाली
त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर
-
आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी मैदानात
– आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी मैदानात
– रविवारी आपच्या महाराष्ट्र युवा आघाडीचे पुण्यात अधिवेशन,
– अधिवेशनाला आपचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा खासदार संजय सिंह उपस्थित राहणार,
– महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून या अधिवेशनाकडे पाहिले जातय.
-
पूर्व विदर्भात केंद्राचे पथक करणार नुकसानीची पाहणी
पूर्व विदर्भात केंद्राचे पथक करणार नुकसानीची पाहणी
या पथकात सात अधिकाऱ्यांचा समावेश असून ते तीन जिल्ह्यात करणार पाहणी
चंद्रपूर , वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांचा यात समावेश
केंद्राचे पथक 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान असणार दौरा
दोन पथक बनवून करणार पाहणी
मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी केले या भागात दौरे आता केंद्रच पथक करणार पाहणी।
-
पूर्व विदर्भात केंद्राचे पथक करणार नुकसानीची पाहणी
पूर्व विदर्भात केंद्राचे पथक करणार नुकसानीची पाहणी
या पथकात सात अधिकाऱ्यांचा समावेश असून ते तीन जिल्ह्यात करणार पाहणी
चंद्रपूर , वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांचा यात समावेश
केंद्राचे पथक 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान असणार दौरा
दोन पथक बनवून करणार पाहणी
मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी केले या भागात दौरे आता केंद्रच पथक करणार पाहणी।
-
ओबीसी च्या नागपुरात 6 जागा घटल्या
ओबीसी च्या नागपुरात 6 जागा घटल्या
महापालिका आरक्षण सोडत मध्ये कुणाला धक्के बसले तर कुणाचे प्रभाग पक्के झाले
काही दिग्गज नेत्यांचे प्रभाग दुसऱ्या साठी राखीव झाल्याने त्यांची चिंता वाढली
तर अनेक जनांचे प्रभाग सुरक्षित झाले
नागपुरात ओबीसी साठी 41 जागा राखीव होत्या त्या आता 35 वर आल्या
त्यामुळे 6 जागांवर बसला फटका
-
अकोला रेल्वेत कुरीअर सर्विसने आलेलं 100 किलो चांदी आणी 2 किलो सोन नेमक कुणाचं….?
अकोला रेल्वेत कुरीअर सर्विसने आलेलं 100 किलो चांदी आणी 2 किलो सोन नेमक कुणाचं….? हा प्रश्न GRP पोलिसांना पडला आहे….!
Anchor : अकोला लोहमार्ग पोलिसांनी आज अकोला रेल्वे स्थानकावर मुंबई येथून आलेलं सोन आणी चांदि कुरियर ने हस्तगत केली असून सोने आणि चांदी चौकशीसाठी पोलिसांणी ताब्यात घेतले असून यामध्ये 100 किलो चांदी आणी दोन किलो सोनं आहे…तर आंगडिया कुरीअर सर्विसने हे सोनं-चांदी अकोल्यात आलं आहे…. तर आता हे सोनं-चांदी कुणाची आहे….? या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे….
Published On - Jul 30,2022 6:33 AM