Maharashtra News Live Update : राज्याच्या विकासासाठी केंद्र सहकार्य करणार, पंतप्रधानांचे एकनाथ शिंदेंना आश्वासन

| Updated on: Jul 10, 2022 | 6:19 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : राज्याच्या विकासासाठी केंद्र सहकार्य करणार, पंतप्रधानांचे एकनाथ शिंदेंना आश्वासन
मोठी बातमी

मुंबई : आज शनिवार 9 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मालेगावात गॅंगवारचे सीसीटीव्ही फुटेज सुन्न करणारे व्हायरल झाले आहे. चक्क हातात धारधार शस्त्र घेऊन टोळके भिरत असल्याचे दिसत आहे. मालेगावात चाललय तरी काय ? अशी चर्चा नारिकांमध्ये सुरु आहे. मालेगावात भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा पायच छाटला होता. संशयित अद्याप फरार असल्याची माहिती मिळाली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Jul 2022 09:09 PM (IST)

    पुण्याहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरकडे रवाना

    दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात पोहचले. पुणे विमानतळावर भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि काही नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले.  त्यानंतर ते पुण्याहून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.  हडपसर येथेही एकनाथ शिंदे यांचे स्वागत होणार आहे. पंढरपुरात उद्या पहाटे शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे.

  • 09 Jul 2022 06:27 PM (IST)

    राज्याच्या विकासासाठी केंद्र सहकार्य करणार, पंतप्रधानांचे एकनाथ शिंदेंना आश्वासन

    नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरपूर वेळ दिला. राज्याच्या विकासाच्या बाबींवर चर्चा केली. सर्वांगिण विकासासाठी त्याचबरोबर शेतकरी, कामगार, कष्टकरी यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घ्या. राज्याच्या विकासासाठी जे जे लागेल ते केंद्राकडून दिले जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

  • 09 Jul 2022 05:01 PM (IST)

    पंतप्रधान मोदींसोबत शिंदे-फडणवीसांची चर्चा

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे पाऊस तास चर्चा सुरु आहे. सव्वा चारच्या सुमारास दोन्ही नेते पंतप्रधानांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. अद्याप ही चर्चा सुरु आहे. राज्यातील राजकीय स्थितीवर या भेटीत चर्चा होत असल्याची माहिती आहे.

  • 09 Jul 2022 04:08 PM (IST)

    राष्ट्रपती निवडणुकीसाठी हालचालींना वेग, भाजपा कार्यालयात बैठक

    मुंबई – राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यालयात महत्वपूर्ण बैठक

    केंदीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली बैठक

    प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय उपस्थित

  • 09 Jul 2022 04:04 PM (IST)

    पंतप्रधानांच्या भेटीसाठी शिंदे-फडणवीस रवाना

    नवी दिल्ली – दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहचले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी ही भेट होते आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादासाठी दिल्लीत आल्याचे शिंदे आणि फडणवीस यांनी सांगितले आहे.

  • 09 Jul 2022 03:32 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतून Live

    उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क साधण्याचा आधी आम्ही प्रयत्न केला. परंतु त्यात यश आलं नाही. मात्र बाळासाहेबांनी सांगितलं होतं, काँग्रेस, राष्ट्रवादी आपले शत्रु आहेत. त्यांच्याबरोबर जायला लागलं तर पार्टी बंद करेन. त्यामुळे आम्ही काही चुकीचं काम कलं नाही.

    फडणवीस काय म्हणाले?

    खातेवाटपाबाबत शाह यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री पंढरपूरची पूजा करून आल्यावर या सर्व चर्चा होतील. आम्ही एकत्र मिळून मतं मागितली. आम्हाला बहुमत मिळालं. मात्र हे आम्हाला सोडून गेले हे दुखनं या युतीने दूर केलं आहे.

  • 09 Jul 2022 03:12 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतून Live

    ही आमची सदिच्छा भेट आहे. आम्ही आषढी झाली की खातेवाटपाबाबत चर्चा करून तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊ. 18 तारखेला राष्ट्रपदीपदाची निवडणूक आहे. त्यामुळे अधिवेशन थोडं मागे पुढे होईल. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होईल. ओबीसीचा जो महत्वाचा मुद्दा आहे. तो महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. त्यांनी त्याचं प्रतिनिधीत्व करावं यासाठी आम्ही तुषार मेहता यांच्याकडे गेलो होतो.

    सर्वोच्च न्यायलयात जे विषय प्रलंबित आहेत. त्यावर जास्त बोलणं योग्य नाही. देशात संविधान, कायदा आहे. याच्या बाहेर कुणाला जाता येत नाही. आम्ही नियमाच्या बाहेर गेलो नाही. आम्ही नियमाने काम केलं आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. निवडणुका या घटनेप्रमाणे होत असतात. आमच्याकडे बहुमताचे सरकार आहे. त्यांच्याकडे पुरेसा आकडा नाही. लोकांनी चांगल्या सूचना केल्या आहेत. त्यातून आम्ही पुढे जाऊ चांगली कामं करू.

    लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून होत आहे. जनता सुजाण आहे. कोणी काहीही बोललं तरी आम्ही आमचं काम करत राहू. शिवसेना भाजप युतीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आम्ही केलं आहे. कसले पन्नास खोके, मिठाईचे की कसले? नगरसेवकही इकडे तिकडे जायला घाबरतात. मात्र आमदारांना त्यांचं कर्तव्य पार पाडू शकत नाही, अशी स्थिती झाली होती. सावरकरांवर आम्ही बोलू शकत नव्हतो.

    अन्यायला वाचा फोडण्यासाठी पेटून उठायला बाळासाहेबांनी सांगितलं होतं. हे बंड नाही. ही  क्रांती आहे. हे स्वेच्छेने आले आहेत. त्यांना आरोप करायला आता काही नाही, म्हणून काहीही बोलत बसतात. आम्ही अडीच वर्षे पूर्ण करू एवढी कामं करू, आम्ही लोकांसारखं पंचवीस वर्षे सांगणार नाही. पण पुढची निवडणूक तर नक्की जिंकू. कामासाठी लोक माझ्याकडे येतात. बाकी कुणी माझ्याकडे आलं नाही. कुठलाही खासदार माझ्या संपर्कात नाही. मी मुख्यमंत्री झालोय त्यामुळे ते माझ्या सदिच्छा भेटाला येतातच. मला कुठलीही बैठक माहिती नाही. ओबीसी समाजाला न्याय देण्याची हीच आमची भूमिका होती. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर निवडणुका व्हाव्यात हीच आमची इच्छा होती.

    पाऊस येत आहे, पूर आला आहे, निवडणुकांची तयारी करायला मॅन पॉवर लागते. मात्र अनेक लोकांनी सांगितलं आहे की निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये. त्यामुळे आमचीही तीच भूमिका आहे. युतीचे सरकार असताना केंद्र सरकारने मदत केली आहे. पंतप्रधानांनी आत्ताच्या सरकारलाही तेच सांगितलं आहे.

  • 09 Jul 2022 03:09 PM (IST)

    नव्या सरकारला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांचाही आशीर्वाद – मुख्यमंत्री

    नवी दिल्ली – राज्यातील सरकारसाठी केंद्र सरकारचे सहकार्य आवश्यक आहे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. राज्याच्या विकासात केंद्राचा सिंहाचा वाटा असतो. राज्य सरकारच्या स्थापनेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादासोबतच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांचेही सहकार्य आणि आशीर्वाद लाभले आहे. हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचं आहे.

  • 09 Jul 2022 03:07 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतून Live

    आपण कालपासून भेटत आहोत. मी कालच आपणाला सांगत होतो की आपण उद्या भेटुया. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सदिच्छा भेट घेत असतो. त्याप्रमाणे आम्ही राष्ट्रपती महोदयांना भेटणार आहोत आणि अमित शाह, जे.पी नड्डा साहेबांचीही भेट घेतली. दुपारी आम्ही पंतप्रधानांनाही भेटणार आहोत. आपल्याला महाराष्ट्रातील सर्व घडामोडी माहिती आहेत. एका विचारातून या सर्व घडामोडी घडल्या आहे. सर्वजनिक निवडणुका आम्ही शिवसेना-भाजप युती म्हणून आम्ही लढवली होती आणि पुन्हा आत्ता लोकांना हवी असणारी सत्ता, लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे आम्ही वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आलो आहोत. हे सरकार लोकांचं आहे. लोकांच्या हितांची जपणूक करणारं आहे. शेतकरी, कामगार, सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. त्याला केंद्राचे आशीर्वाद हे गरजेचे आहेत. राज्याच्या विकासात आम्ही पंतप्रधानांचं व्हिजनही समजून घेणार आहोत. राज्य पुढे जाण्यात केंद्राचा सिंहाचा वाटा असतो.

    हे सरकार स्थापन करण्यासाठी बाळासाहेबांची आशीर्वाद, दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि प्रधानमंत्री मोदी साहेब यांचे, अमित शाह यांचेही आशीर्वाद आमच्या पाठिशी आहेत. जे. पी. नड्डा हेही आमच्याा पाठिशी होती. ज्यांनी पाच वर्षे यशस्वी मुख्यमंत्र्यांची कारकीर्द गाजवली त्या फडणवीसांचं या सरकार स्थापनेत फार मोठं योगदान आहे. ज्या राज्य सरकारला केंद्रची मदत होते. ते राज्या मोठ्या वेगाने प्रगतीकडे जात असतं. कालपासून आम्ही राज्याच्या विकासासाठी सदिच्छा भेट घेतलेली आहे. काय झालं हे जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. राज्यात ज्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्याची नोंद संपूर्ण देशाने घेतल्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी चांगलं काम केलं. जलयुक्त शिवारसारखे प्रकल्प खंडीत झाले होते ते आता पुढे नेणार आहोत. यातून आम्ही राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करू एवढेच सांगतो.

  • 09 Jul 2022 03:05 PM (IST)

    शिवसेना-भाजपा युती म्हणून पुन्हा सत्तेत आलो आहोत – सीएम एकनाथ शिंदे

    नवी दिल्ली – राष्ट्रपती महोदय, गृहमंत्री अमित शाहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट झाली. पंतप्रधानांचीही भेट घेणार आहोत. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवसेना-भाजपा युती म्हणून पुन्हा सत्तेत आलो आहोत, असे ते म्हणाले.

  • 09 Jul 2022 03:03 PM (IST)

    वरिष्ठ नेत्यांचा भेटीसाठी-आशीर्वादासाठी दौरा- फडणवीस

    दिल्ली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपला दौरा हा वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी आणि आशीर्वादासाठी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या भेटीत राजकीय अजेंडा नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा यांची भेट घेतली.

  • 09 Jul 2022 02:38 PM (IST)

    नवी मुंबईतील खारघरमध्ये एका कारचालकाने आधी वाहतुकीचे नियम तोडले

    नवी मुंबईतील खारघरमध्ये एका कारचालकाने आधी वाहतुकीचे नियम तोडले, नंतर पोलिसांना चकमा देत पळून जाऊ लागला

    पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो कारचालक पळू लागल्याने पोलिसांनी थांबण्याचा प्रयत्न करतात त्यांनी कार सुसाट चालवल्याने पोलीस त्याच्या बोनेट वरती आला मात्र काल चालकाने कार अर्धा किलोमीटर पर्यंत चालवत नेली

    मात्र कोणती दुखापत झाली नसून, नियम तोडणार्याने कहरच केला आहे

  • 09 Jul 2022 02:38 PM (IST)

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुषार मेहता यांच्या भेटीला

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुषार मेहता यांच्या भेटीला

    सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या निवासस्थानी शिंदे आणि फडणवीस दाखल

  • 09 Jul 2022 02:38 PM (IST)

    वाचाळवीर संजय राऊतांचा जाहीर निषेध – डॅा. धनंजय जाधव ~ प्रवक्ता स्वराज्य संघटना

    वाचाळवीर संजय राऊतांचा जाहीर निषेध – डॅा. धनंजय जाधव ~ प्रवक्ता स्वराज्य संघटना

    छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचा एकरी उल्लेख महाराष्ट्र खपवुन घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब यांचे कर्तृत्व नाकारण्याचाआणि चुकीचा इतिहास पेरण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. छत्रपतींच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचे छत्रपतींबद्दल आणि त्यांच्या वंशजाबद्दल केलेले बेताल वक्तव्य स्वराज्य संघटना आणि महाराष्ट्र देखील खपवुन घेणार नाही.

  • 09 Jul 2022 02:37 PM (IST)

    शिवसेना-भाजपाच्या १३ मंत्र्यांच्या शपथविधी होणार

    शिवसेना-भाजपाच्या १३ मंत्र्यांच्या शपथविधी होणार, १२ किंवा १३ तारखेला होणार शपथविधी, भाजपाचे ८ तर शिंदे गटाचे ५ मंत्री शपथ घेणार

  • 09 Jul 2022 01:50 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील हजारो भाविकांना घेऊन विशेष रेल्वे पंढरपूरला आषाढी एकादशी साठी होणार रवाना

    अमरावती जिल्ह्यातील हजारो भाविकांना घेऊन विशेष रेल्वे पंढरपूरला आषाढी एकादशी साठी होणार रवाना….

    खासदार नवनीत राणा व रवी राणा दाखवणार हिरवी झेंडी

  • 09 Jul 2022 01:50 PM (IST)

    ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरूळ सेक्शन मधील गाड्या सध्या बंद

    कोपरखैरणे स्टेशन जवळ ओव्हरहेड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरूळ सेक्शन मधील गाड्या सध्या बंद आहेत.

    त्यामुळे ट्रान्स हार्बर वरील लोकल सेवा सध्या ठप्प झाली आहे

    झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत

    त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

  • 09 Jul 2022 01:49 PM (IST)

    मराठवाडा मध्ये देवेंद्र फडणवीस असताना निधी दिला मराठवाड्यातील महाविकास आघाडी तील मंत्र्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे वॉटर ग्रीड रद्द केला महाविकास आघाडी सरकार ने

    मराठवाडा मध्ये देवेंद्र फडणवीस असताना निधी दिला

    मराठवाड्यातील महाविकास आघाडी तील मंत्र्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे वॉटर ग्रीड रद्द केला महाविकास आघाडी सरकार ने

  • 09 Jul 2022 01:21 PM (IST)

    तुफान मे कष्टीया और घमेंड मे हस्तिया डूब जाती है

    – बाळासाहेबांचा आत्मा बघतोय वरून – शिवसैनिकांची हाय लागेल – खोके घेऊन शांत झोप लागत नाही – ममता बनर्जींपासून अख्खा देश आपल्या पाठीशी – तुफान मे कष्टीया और घमेंड मे हस्तिया डूब जाती है

  • 09 Jul 2022 01:21 PM (IST)

    आम्ही तुरुंगात मरु पण शिवसेना सोडणार नाही

    – आम्ही तुरुंगात मरु पण शिवसेना सोडणार नाही – भुजबळ हारले त्यांच्या सोबत जे गेले ते हारले – राणे पण हारले आणि त्यांच्या सोबत जे गेले ते पण हारले – मुघलांशी हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली – छत्रपतींच्या मृत्यू नंतर महाराष्ट्राला एकाकी लढावं लागलं – पण औरंगाबादच थडग इथेच संभाजीनगर मध्ये बांधला

  • 09 Jul 2022 01:20 PM (IST)

    गुलाबरावांचा जुलाबराव होईल. पचणार नाही. थोड्याच दिवसात सर्वांना जुलाब सुरू होतील.

    समोर बसलेले ५० खोक्यावाले नाहीत. ५० रुपये खर्च करून स्वखर्चाने आले आहेत. व्यासपीठावर नाशिक महापालिकेचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आहे. प्रत्येक पदाधिकारी उपस्थित आहे. शिवसैनिकांना कोणी पळवून नेऊ शकत नाही. ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही. दोन पाच खासदार इकडे तिकडे गेले म्हणजे शिवसेना हलली असं होत नाही. १०० आमदार आणि २५ खासदार निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे.

    शिवसेना आमच्याच बापाची आहे. ५० खोके पचणार नाहीत. गुलाबरावांचा जुलाबराव होईल. पचणार नाही. थोड्याच दिवसात सर्वांना जुलाब सुरू होतील. शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं काम नाही. ही ठाकऱ्यांची शिवसेना आहे. असली नकली काही नाही, सगळं असली इकडे. गदा आमची हनुमान आमचा तशी शिवसेना आमची. शिवसेना बाळासाहेबांनी घातली. तो आमचा बाप. हा वाद खऱ्या खोट्याचा नाही. हा ईमान आणि बेईमानीचा वाद आहे. आता सांगा आम्ही शिवसेना सोडली. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. कारण कशाला देताय. कारण काय देताय.

  • 09 Jul 2022 01:13 PM (IST)

    2019 ला अमित शहा मातोश्रीवर आमच्या हाय कमांड कडे आले होते

    2019 ला अमित शहा मातोश्रीवर आमच्या हाय कमांड कडे आले होते – ठरलं, की अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घ्यायचं – शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नाही असं म्हटलं – जे गेले त्यांच्या पैकी एक पण माईचा लाल त्यावेळी बोलला नाही – तेव्हा हिंदुत्व नाही आठवलं – 2014 ला जर भाजपाने शब्द पाळला असता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले असते – कारण सांगू नका, स्वार्थ साठी गेला – संजय राऊत घाबरणार नाही – माझ्या लहान मुलीला बोलावतात, बायकोला बोलावतात छळ करतात – का तर आम्ही शिवसेनेच्या बाजूने लढतोय

  • 09 Jul 2022 01:11 PM (IST)

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौरा

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौरा

    भाजपची २०२४ लोकसभासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी

    एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार मुख्य जबाबदारी

    रात्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा

    महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४५ जागांवर विजय मिळवण्याची तयारी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला ग्रीन सिग्नल

  • 09 Jul 2022 01:10 PM (IST)

    शिवसेनेच्या समर्थनार्थ कल्याण आणि डोंबिवलीतील कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत

    शिवसेनेच्या समर्थनार्थ कल्याण आणि डोंबिवलीतील कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत.

    शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीच्या गेटवर शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत उद्धव ठाकरेंना भेटण्याचे आवाहन केले, त्यानंतर त्यांना मातोश्रीमध्ये प्रवेश देण्यात आला.

    यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांच्या हातात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही होता.

  • 09 Jul 2022 01:10 PM (IST)

    अख्खा महाराष्ट्र आदेशाची वाट बघतोय – संजय राऊत

    – खोके बाजीला ठोके बाजीतून उत्तर देऊ – शिवसेना हे चार अक्षर नसते तर नगर पंचायतीत निवडुंन इन कठीण झालं असत – उद्धव ठाकरे आजारी असताना पाठीत खंजीर खुपसून तुम्ही निघून गेलात – उद्धव ठाकरेंनी कोरोनात आपल्याला सांभाळलं – उत्तर प्रदेश प्रमाणे नदीत प्रेत वाहिले नाहीत – आमचा धनुष्य बाण आमचा पंचप्राण – धनुष्यबाण शिवसेनेचाच राहील आणि आवाज पण – अख्खा महाराष्ट्र आदेशाची वाट बघतोय – बसू द्या नीट, मग बुडाला आग लागल्या शिवाय राहणार नाही – या 40 लोकांनी परत निवडून येऊन दाखवावं – मालेगाव, नांदगाव वाल्यानी शिवसेने शिवाय निवडून येवुन दाखवावे – मुख्यमंत्री आज दिल्ली ला गेलेत – त्यांचे हाय कमांड तिथे – आम्ही लाल किल्ल्याला नाही, राजगडाला सलाम करतो – शिवसेनेचे, मराठी माणसाचे हाय कमांड मातोश्री – दिल्लीने सतत महाराष्ट्रावर अन्याय केलाय – 105 हुतात्मे दिले तेव्हा मुंबई मिळाली – मुंबई तोडायची म्हणून आधी शिवसेना तोडली – नजराणा घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला गेले – फुटलेल्या लोकांना रस्त्यावर तुडवा अस बाळासाहेब म्हणाले होते – उद्धव साहेबांनी अजून अस बोलले नाही – त्यांच्या सभ्यपणा चा फायदा घेतला

  • 09 Jul 2022 01:02 PM (IST)

    तिथं गेलाय तर तिथं सुखात राहा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला

    शिवसेना अजूनही जाग्यावर आहे, दोनचार आमदार इतके तिकडे गेले म्हणजे शिवसेना संपली असं होत नाही. सगळे पदाधिकारी शिवसेनेसोबत आहेत. शिवसेना आमच्या बापाची आहे. शिवसेनेशी बेईमानी करणं सोप्प नाही. असली नकली असं काही नाही…शिवसेना जन्माला कोणी घातली तो आमचा बाप आहे. हा वाद बेईमानीतला आहे. आता तिथं गेलाय तर सांगा आम्ही शिवसेना सोडली. आता कशाला कारण देताय…जेव्हा गेले तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही सांगितलं. हिंदुत्वासाठी गेलो आहे. आदित्य ठाकरे जास्त ढवळाढवळ करत आहेत. संजय राऊतांमुळे आम्ही पडलो.

  • 09 Jul 2022 12:56 PM (IST)

    शिवसेना अजूनही जाग्यावर आहे – संजय राऊत

    शिवसेना अजूनही जाग्यावर आहे, दोनचार आमदार इतके तिकडे गेले म्हणजे शिवसेना संपली असं होत नाही. सगळे पदाधिकारी शिवसेनेसोबत आहेत. शिवसेना आमच्या बापाची आहे. शिवसेनेशी बेईमानी करणं सोप्प नाही. असली नकली असं काही नाही…

  • 09 Jul 2022 12:53 PM (IST)

    शिवसेनेच्या समर्थनार्थ कल्याण आणि डोंबिवलीतील कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत

    शिवसेनेच्या समर्थनार्थ कल्याण आणि डोंबिवलीतील कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत.

    शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीच्या गेटवर शिवसेनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत उद्धव ठाकरेंना भेटण्याचे आवाहन केले, त्यानंतर त्यांना मातोश्रीमध्ये प्रवेश देण्यात आला.

    यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांच्या हातात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही होता.

  • 09 Jul 2022 12:52 PM (IST)

    शिवसेना खासदार कृपाल तामणे

    आमचे खासदार पंढरपूरमध्ये असल्याची मला माहिती आहे. आमची जी काय भूमिका आहे. ते उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. भावना गवळीचा विषय वेगळा आहे. काल मी नागपूरात होतो. आमची भूमिका ही आहे की दोघांनी एकत्र यावं ते कार्यकर्त्यांची हिताचं आहे. तुमची कायतरी पतंग उडवता. बदनामी करता…

  • 09 Jul 2022 11:49 AM (IST)

    मतदार संघाच्या सीमेवर आमदार योगेश कदम यांचे जंगी स्वागत

    रत्नागिरी- एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानंतर खेड-दापोली चे आमदार योगेश कदम पहिल्यांदाच मतदार संघात परतले

    मतदार संघाच्या सीमेवर आमदार योगेश कदम यांचे जंगी स्वागत

    कशेडी बंगल्याच्या ठिकाणी आमदार योगेश कदम पोहोचले

    आमदार योगेश कदम यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

    आमदार योगेश कदम यांचा दापोली मतदार संघात झंझावाती दौरा

  • 09 Jul 2022 11:49 AM (IST)

    जपानचे माजी पंतप्रधान सिंचो आबे यांच्या निधनाने शासकीय दुःखवटा

    जपानचे माजी पंतप्रधान सिंचो आबे यांच्या निधनाने शासकीय दुःखवटा

    मंत्रालयवरचा ध्वज अर्धा फडकवण्यात आला

    केंद्र सरकारने जाहीर केलाय शासकीय दुखवटा

    शिंजो अवे यांची काल झाली होती हत्या

  • 09 Jul 2022 11:47 AM (IST)

    40 हून अधिक लोक बेपत्ता

    जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी संध्याकाळी ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पुरात अनेक भाविक वाहून गेले. आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर 45 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर 40 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या शोधासाठी बचावकार्य सुरू आहे. ITBP आणि NDRF च्या टीम घटनास्थळी उभ्या आहेत. रात्री उशिरापर्यंत मदत आणि बचावकार्य सुरू होते. शनिवारी सकाळपासून पुन्हा एकदा कारवाईला वेग आला आहे.

  • 09 Jul 2022 11:46 AM (IST)

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलीत घेतली जेपी नड्डा यांची भेट

    ब्रेक – एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलीत घेतली जेपी नड्डा यांची भेट…

    – २० मिनिटांपासून चर्चा सुरूच..

    – विठ्ठल रखूमाई देवीची मुर्ती नड्डा यांना केली भेट…

    – नड्डा यांच्या भेटीनंतर दोघे नेते राजनाथ सिंह यांच्या भेटीसाठी होणार रवाना..

    – नड्डा यांच्या निवासस्थानाबाहेरून आढावा वाॅकथ्रू –

  • 09 Jul 2022 11:43 AM (IST)

    पंढरपूर मध्ये आषाढीच्या एक दिवस आधी वारकऱ्यांचे आगमन

    पंढरपूर मध्ये आषाढीच्या एक दिवस आधी वारकऱ्यांचे आगमन झालेय. मोठ्याप्रमाणात वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेत. वारीतील दिंड्या आता नगरप्रदक्षिणा घालत आहेत.

  • 09 Jul 2022 11:22 AM (IST)

    अमरावती मधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरण….

    अमरावती मधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरण….

    उमेश कोल्हे यांच्या कुटूंबातील दहशतीचे वातावरण दूर व्हावे व उमेश कोल्हे यांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी राणा दाम्पत्या कडून हनुमान चालीसा पठण….

    दहशतीचे व भयमुक्त वातावरण व्हावे यासाठी हनुमान चालीसा पठण

    उमेश कोल्हे यांच्या घरासमोरील हनुमान मंदिरात होत आहे.हनुमान चालिसा पठन….

    खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांची उपस्थित….

    नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाली होती उमेश कोल्हे यांची हत्या…

  • 09 Jul 2022 11:16 AM (IST)

    विजय नाहटा, विजय चौगुले यांची शिवसेनेतून हकालपट्टी

    विजय नाहटा, विजय चौगुले यांची शिवसेनेतून हकालपट्टी

    शिवसेना उपनेते विजय नाहटा तसेच विजय चौगुले यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे,

    अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

  • 09 Jul 2022 11:10 AM (IST)

    आदित्य ठाकरे यांचे आजचे कार्यक्रम रद्द

    आदित्य ठाकरे यांचे आजचे कार्यक्रम रद्द

    राष्ट्रीय दुखवट्यामुळे युवासेना प्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत . कृपया पत्रकार बांधवांनी नोंद घ्यावी

  • 09 Jul 2022 10:47 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असताना शिवसेना खासदारांची दिल्लीत बैठक

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असताना शिवसेना खासदारांची दिल्लीत बैठक

    खासदार कृपाल तुम्हाणे यांच्या निवासस्थानी रात्री बैठक

    10 खासदार होते उपस्थित, सूत्रांची माहिती

    डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचा प्रयत्न

  • 09 Jul 2022 09:52 AM (IST)

    राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या चर्चेला सध्या वेग

    ब्रेक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौर्यात राज्यातील गृहमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याची सुत्रांची माहीती…

    – राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या चर्चेला सध्या वेग…

    – राष्ट्रपती निवडणुकीनंतरच मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागेल असे सत्ताधारी वर्तुळातून संकेत…

    – कालच्या बैठकीत सरकारमध्ये प्रामुख्याने नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचं भाजपचे धोरण असल्याची माहीती…

    – गृह खाते मिळावं यासाठी फडणवीस आग्रही, मात्र हे खातं यंदा त्यांच्याऐवजी भाजपच्या दुसऱ्या वरिष्ठ नेत्याकडे देणेयावर अमित शाह यांचा भर… सुत्रांची माहीती…

    – चंद्रकांत पाटील यांचे नाव गृहमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याची माहीती…

    – मंत्रीमंडळ विस्तारानंतरच्या प्रस्तावित संघटनात्मक बदलामध्ये प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा नेमला जाण्याचीही शक्यता…

  • 09 Jul 2022 09:52 AM (IST)

    सोडून गेलेल्या आमदारांनी राजीनामा द्यावा, निवडून येऊन दाखवाव – संजय राऊत

    तुम्ही जर का करार पाळला असता, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. अमित शहा हे ज्यावेळी मातोश्रीत आले आहेत. त्यावेळी अडिच वर्षे मुख्यमंत्री असं ठरलं होतं. पडझड हा शब्द मला मान्य नाही. अनेकदा लोकं फुटली आहेत. ते परत जोडली आहेत. चाळीस आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग त्यांनी निवडून यावं. नाशिक हा बालेकिल्ला आहे. इथले दोन आमदार गेले आहेत. महापालिका आम्ही चांगल्या निवडणुका लढू…

  • 09 Jul 2022 08:59 AM (IST)

    अमरावतीत विभागात सरासरीच्या तुलनेत 96.6 टक्के पाऊस..

    अमरावतीत विभागात सरासरीच्या तुलनेत 96.6 टक्के पाऊस..

    विभागीय यंत्रणेचा अहवाल आला समोर…

    यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 215.मिलिमीटर पावसाची नोंद….

    विभागातील धरणाना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा.

  • 09 Jul 2022 08:58 AM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे हे आज दोन टप्प्यात भाजपच्या नेत्यांना भेटणार

    ब्रेक – मंत्रीमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाने १० कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याची सुत्रांची माहिती

    – असून उर्वरीत २८ मंत्रिपदे भाजपने घ्यावीत, असा प्रस्ताव आहे. यावर अद्याप शिक्कामोर्तब नाही…

    – मुख्यमंत्री शिंदे हे आज दोन टप्प्यात भाजपच्या नेत्यांना भेटणार

    – पहिल्या टप्प्यात मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत.

    – दुसर्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. जेपी नड्डा तसेच राजनाथ सिंह यांचीही भेट घेणार असल्याची माहीती…

    – सायंकाळी ते खाजगी विमानाने पुण्याला रवाना होणार आहेत… तिथून पुढे पंढरपूर इथे शासकिय पुजेसाठी जाणार आहेत…

  • 09 Jul 2022 08:58 AM (IST)

    दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं हॉलतिकीट आजपासून मिळणार

    1. दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं हॉलतिकीट आजपासून मिळणार
    2. माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना दिलं जाणार हॉलतिकीट
    3. बोर्डाच्या परीक्षेत विषय राहिलेल्या अपात्र विद्यार्थ्यांची घेतली जाते पुरवणी परीक्षा
    4. 21 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान होणार 12 वी ची परीक्षा
    5. तर 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान होणार दहावीची परीक्षा
    6. परीक्षेचं हॉलतिकीट आज 10 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मिळायला होणार सुरुवात !
  • 09 Jul 2022 08:57 AM (IST)

    धक्कादायक मेळघाट मधील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात कॉलरा आजाराचा शिरकाव..?

    अमरावती:अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावातील नागरिकांना 80 पेक्ष्या अधिक जणांना कॉलराची लागण व 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..गावातील नळाचे वीज बिल न भरल्याने या गावांत नळ येत नव्हते त्यामुळे गावातील नागरिकांनी गावाशेजारील उघड्या विहरितील अशुद्ध पाणी पिल्याने त्यांना कॉलरा सारख्या आजाराची लागण झाल्याचं डॉक्टरांनी मान्य केलं आहे.त्यामुळे रुग्णांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • 09 Jul 2022 08:56 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस…

    दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस मुख्यमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून करणार आहे.

  • 09 Jul 2022 08:55 AM (IST)

    जिल्ह्यात गेल्या 24 तासात 74 मिलिमीटर पावसाची नोंद

    नंदुरबार फ्लॅश :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात ७४ मिलिमीटर पावसाची नोंद…..

    अनेक छोट्या मोठ्या नदी नाल्याना पुर….

    छोट्या नाल्यावरील साठवण बंधारे भरलेत….

    येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा हवामान खात्याच्या अंदाज….

    सकाळ पासून जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिपरिप सुरू……

  • 09 Jul 2022 08:20 AM (IST)

    parbhani rain update : परभणीत रात्रभर जोरदार पाऊस

    परभणीत रात्रभर जोरदार पाऊस ,

    काल सकाळ पासून सुरू होता पाऊस,

    जोरदार पावसाने नद्या नाले तुडुंब ,

    शेतकरी सुखावला

  • 09 Jul 2022 08:20 AM (IST)

    solapur news : सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नागरिकांची माहिती

    – सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नागरिकांची माहिती

    – सोलापूर जिल्ह्यानजीक असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू

    – विजयपूर जिल्ह्यातील उत्तर कर्नाटकमध्ये 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

    – दरम्यान भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती

    – सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

  • 09 Jul 2022 08:16 AM (IST)

    भात शेतीचे आगार मानल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात यंत्राद्वारे भातलागवडीस सुरुवात

    1. -भात शेतीचे आगार मानल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात यंत्राद्वारे भातलागवडीस सुरुवात
    2. -भात शेती करताना पारंपरिक ऐवजी चारसूत्री व सगुणा तंत्र या आधुनिक पद्धतीने भातशेती करण्यास शेतकऱ्यांकडून प्राधान्य
    3. -तालुक्यातील अनेक गावांत कृषी विभागाने 200 एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे लागवड करण्याचे नियोजन केलेय
    4. -यंत्राने लागवड केल्याने मजूर कमी लागतात, वेळ आणि पैशाची बचत होते,तसेच भात पिकाचे उत्पादन वाढते
  • 09 Jul 2022 08:16 AM (IST)

    नागपूरात वाढत्या डेंग्यू रुग्णांमुळे महानगरपालिका अलर्ट मोडवर

    1. – नागपूरात वाढत्या डेंग्यू रुग्णांमुळे महानगरपालिका अलर्ट मोडवर
    2. – डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाकडून शुक्रवारी शहरातील 4058 घरांचे सर्वेक्षण
    3. – मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण
    4. – आशिनगर झोनमध्ये डेंग्यूचा एक संशयित रुग्ण आढळला.
    5. – 4058 घरांच्या सर्वेक्षण करण्यात 111 घरांमध्ये आणि 158 कंटेनर्स आणि कूलर्समध्ये डेंग्यू अळी आढळली
  • 09 Jul 2022 07:54 AM (IST)

    हतनुर धरणाचे 8 दरवाजे एक मीटरने उघडले तापी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी

    जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 8 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात विसर्ग*- 232 क्युमेक्स / 8193 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हातनुर भागात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हतनुर धरणाचे 8 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे .

    हतनूर प्रकल्प दिनांक – 09/07/2022 वेळ – 4.00 AM पाणी पातळी – 209.00 मी. एकूण साठा – 167.00 दलघमी. एकूण साठा % – 43.04% विसर्ग- 232 क्युमेक्स / 8193 क्युसेक्स दरवाज्यांची सद्य स्थिती – 8 दरवाजे 1.00 मी. ने उघडे.

  • 09 Jul 2022 07:39 AM (IST)

    प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरले चक्क रानडुक्कर

    1. – प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरले चक्क रानडुक्कर.
    2. – दोन तासांनंतर वन कर्मचाऱ्यांनी केले जेरबद.
    3. – भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा येथील घटना
    4. – अखेर मोठ्या धाडसाने वनकर्मचाऱ्यांनी रानडुकरास जाळ्यात पकडले त्याला बांधून पिंजऱ्यात डांबले.
    5. – रानडुक्कर ला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले।यावेळी दहशतीचे वातावरण पहायला मिळाले आहे.
  • 09 Jul 2022 07:27 AM (IST)

    राज्यात पुढील तीन दिवस हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

    राज्यात पुढील तीन दिवस हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा

    कोकण, मध्य महाराष्ट्रासह पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

    12 जूलैपर्यंत पावसाचा जोर असाच राहणार कायम

    अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यानं ढग मोठ्या प्रमाणावर निर्माण होतायेत

    राज्यात पुढील तीन दिवस असणार अतिवृष्टीचे !

    नागरिकांनी काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन

  • 09 Jul 2022 07:27 AM (IST)

    पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यानं गळफास घेऊन केली आत्महत्या

    पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यानं गळफास घेऊन केली आत्महत्या

    बराक क्रमांक 2 परिसरात घेतला गळफास,

    सचिन मधुकर नरवाडे असं या कैद्याचं नावं असून पत्नीच्या खून प्रकरणात तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे

    7 जूलैला कैद्यांना ज्यावेळी मोकळं सोडण्यात आलं त्यावेळी त्यानं आत्महत्या केली..

  • 09 Jul 2022 07:23 AM (IST)

    राज्यात पुन्हा वीज संकटाची स्थिती

    – राज्यात पुन्हा वीज संकटाची स्थिती

    – कोराडी औष्णीक वीज केंद्रात फक्त साडेतीन दिवसांचा कोळसा

    – खापरखेडा, चंद्रपूर वीज केंद्रात फक्त नऊ दिवसांचा कोळसा

    – पावसाळ्यात १५ दिवसांचा कोळसा साठा असणे गरजेचं

    – राज्यातील अनेक वीज निर्मिती केंद्रावर पुरेसा कोळसा साठा नाही

    – कोळसा आयातीनंतरंही राज्यातील सात पाकी तीन औष्णीक वीज केंद्रांवर कोळसा साठा संवेदनशील स्थितीत

    – पावसाळयात कोळसा खाणीत पाणी साठल्याने कोळसा वाहतूक कठीण

  • 09 Jul 2022 07:22 AM (IST)

    पीक कर्ज वाटपासाठी लवकरच ऑनलाईन पद्धत आणली जाणार

    शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

    गटातटाच्या राजकारणात शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी लवकरच आणली जाणार ऑनलाईन प्रणाली

    पीक कर्ज वाटपासाठी लवकरच ऑनलाईन पद्धत आणली जाणार

    सहकार विभागाच्या बैठकीत घेतला निर्णय सॉफ्टवेअरचंही झालं सादरीकरण

    ग्रामीण विकास बँकेमार्फत शेतकऱ्यांना सोसायट्यांमधून कर्ज दिलं जातं मात्र गटातटाच्या राजकारणात ते काहांना मिळत नाही

    यासाठी सहकार विभागानं हा निर्णय घेतला.आहे

    सहकार आयुक्त अनिल कवडे यांची माहिती

  • 09 Jul 2022 07:22 AM (IST)

    शाळकरी मुलींशी अजितदादांचा संवाद..

    बारामती : शाळकरी मुलींशी अजितदादांचा संवाद..

    – मएसो शाळेतील विद्यार्थीनींची अजितदादांनी केली विचारपूस..

    – काय मुलींनो.. फार नटूनथटून आलाय..

    – शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आलेल्या विद्यार्थीनींचा फोटोसाठी आग्रह..

  • 09 Jul 2022 07:21 AM (IST)

    बकरी ईदच्या दिवशी शहरातील वाहतूक मार्गात करण्यात येणार बदल

    बकरी ईदच्या दिवशी शहरातील वाहतूक मार्गात करण्यात येणार बदल

    बकरी ईदच्या दिवशी गोळीबार मैदान व ईदगाह मैदानावर नमाज पडणासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर येतात

    वाहतूकीला अडथळा नको म्हणून वाहतूक मार्गातचं बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

    रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मम्मादेवी चौक, गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील सेव्हन लव्हज चौक सकाळी 10 वाजेपर्यंत असणार बंद

    पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन !

  • 09 Jul 2022 07:21 AM (IST)

    rantnagiri rain update : रत्नागिरी मुसळधार पावसाची शक्यता

    रत्नागिरी- जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरुच

    जिल्ह्यात पावसाने जून पासून आजपर्यंत ओलांडली 1300 मिलिमीटरची सरासरी

    12 जुलै पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

    कुलाबा वेधशाळेने दिला इशारा

    दमदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या पात्राबाहेर

    खेड जगबुडी तर राजापूरची कोदावली नदी इशारा पातळीवर

    खाडी पट्ट्यातील बावनदी सुद्धा इशारा पातळीवर

  • 09 Jul 2022 07:10 AM (IST)

    pune mhada news : पुणे म्हाडा योजनेतील घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत

    – पुणे म्हाडा योजनेतील घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत

    – पुणे म्हाडाकडून विविध योजनेत 5 हजार 68 सदनिकांसाठी जाहिरात काढण्यात आलीय,

    – 18 ऑगस्ट रोजी आता सोडत काढली जाणार आहे,

    – म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांची माहिती

  • 09 Jul 2022 06:33 AM (IST)

    amit shah : अमित शाह-एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक मुद्दे

    1. अमित शाह-एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक मुद्दे
    2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून निघून रात्री 9:45 वाजता अमित शाह यांच्या दिल्लीतील कृष्णा मेनन रोड येथे असलेल्या शासकीय निवासस्थानी आले.
    3. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या आधी अमित शाह यांच्या निवासस्थानी आले होते
    4. महाराष्ट्राचा आगामी मंत्री मंडळ विस्तार, खाते वाटप आणि 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी हे विषय प्रामुख्याने बैठकीच्या अजेंड्यावर होते.
    5. ज्येष्ठ विधिज्ञ यांचीही या बैठकीला काही वेळ उपस्थिती असल्याची माहिती
    6. महाराष्ट्रात घडलेलं सत्तांतर, जवळपास 15 दिवस सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडी आणि संभाव्य राजकीय आव्हाने यावरही चर्चा झाल्याची माहिती
    7. मध्यरात्री 2 वाजता बैठक संपली
    8. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडले
    9. जवळपास सव्वा चार तास शाह-शिंदे आणि फडणवीस यांच्यात खलबते झाली
  • 09 Jul 2022 06:32 AM (IST)

    malegaon crime news : मालेगावात गॅंगवारचे सीसीटीव्ही फुटेज सुन्न करणारे

    मालेगावात गॅँगवारचे सीसीटीव्ही फुटेज सुन्न करणारे…

    चक्क हातात धारधार शस्त्र घेऊन टोळके…

    मालेगावात चाललय तरी काय ?

    मालेगावात भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा पायच छाटला होता..

    संशयित अद्याप फरार…

  • 09 Jul 2022 06:30 AM (IST)

    hingoli rain update : हिंगोलीत मुसळधार पाऊस

    हिंगोली-जिल्ह्यात मध्य रात्री मुसळधार पाऊस

    पावसा मुळे नदी नाल्यांना पूर

    वसमत तालुक्यातील असना नदीचे पाणी किन्होळा गावात घुसले

    गावातील मारोती मंदिर ,जिल्हा परिष शाळा पाण्याखाली तर अनेकांच्या घरात पुराचे पाणी घुसले

Published On - Jul 09,2022 6:25 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.