Maharashtra News Live Update : हितेंद्र ठाकूर आणि प्रवीण दरेकर यांच्यात तीन तास खलबतं, मतं कुणाला?
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज शनिवार 18 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना हॉटेल वेस्टिन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. या आमदारांना भेटण्यासाठी शिवसेना नेते आणि मंत्री अदित्य ठाकरे हे रात्री 12:30 वाजता दाखल झाले. यावेळी अदित्य ठाकरे यांनी हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये कॉफी घेत छोटी बैठक घेतली. या बैठकीत मंत्री अनिल परब, अनिल देसाई, दादा भुसे आणि काही आमदार होते. विधानरिषदेच्या पार्श्वभूमीवर आणि इतर काही विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तासभर चर्चा झाल्यानंतर आज अदित्य ठाकरे हे हॉटेलमधेच मुक्कामाला थांबले.
LIVE NEWS & UPDATES
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा समन्वयकांना थेट गाडीत बसवून केली चर्चा
छत्रपती संभाजीराजेंना आंदोलनावेळी दिलेल्या सगळ्या आश्वासनांची पुर्तता करणार अजित पवारांनी दिलं आश्वासन
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच अजित दादांना निवेदन
मराठा आरक्षणामुळे 2014 व 2019 मधील एमपीएससीत निवड झालेले विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत
या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळावी यासाठी निवेदन देण्यात आलं
मराठा समाजाचे सगळे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार दादांच आश्वासन
समन्वयकाला थेट गाडीत बसवून साधला संवाद
-
आमदार रवी राणा यांचा गंभीर आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा हा दबाव आहे.
विधानपरिषद निवडणुकीत मी भाजपला मतदान करू नये यासाठी हा दबाब आहे.
मुंबई पोलिस आयुक्त व अमरावती पोलीस आयुक्त यांच्या माध्यमातून पोलीस खार मधील घरी आले होते.
मला पोलीस शोधत आहेत.
पण मी कायदेशीर उत्तर देईल..
भाजपचे उमेदवार निवडून येतील यासाठी मी पूर्ण ताकद लावेन
-
-
काँग्रेसची बैठक संपली
– विधानपरिषद निवडणूकीबाबत बैठकीत झाली चर्चा
– काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारासाठी मतांच्या जुळवाजुळव करण्याबाबत रणनितीवर चर्चा
– उद्या दुपारनंतर पुन्हा होणार काँग्रेसची बैठक
– मतांचा प्राधान्यक्रम याबाबत चर्चा झाली
– आज प्राथमिक चर्चा, उद्या सविस्तर चर्चा होईल
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीने संबोधित करण्याचं आधी ठरवलं होतं
मात्र याच हॉटेलमध्ये उद्या प्रत्यक्ष वर्धापन दिन साजला होईल
मुख्यमंत्री उद्या सकाळी वेस्टीनमध्ये येतील आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन करतील
संपूर्ण देशाचं लक्ष हे मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे
शिवसेनेच्या प्रत्येक वर्धापनदिन सोहळ्याला राजकीय महत्व हे नेहमी असते
प्रत्येक वर्धापण दिन हा महाराष्ट्राला दिशा देत असतो
ज्या पद्धतीन महाराष्ट्रावर आक्रमण सुरू, त्यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्या पक्षांत अंतर्गत मतभेद नसतात
गावकडील आमदरांना याठिकाणी कधी राहायला मिळणार?
ही एक व्यवस्था असते, महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे
आमदरांना मार्गदर्शन करता यावं यासाठी याठिकाणी ठेवण्यात आलं आहे
राज्यसभा आणि विधान परिषदेत अनेक तांत्रिक बाबी असतात
प्रत्येकाने आपला प्लॅन ठरवला आहे, मात्र महाविकास आघाडी एकत्र आहे
आमचा कोटा आम्ही तुम्हाला का सांगू, सोमरच्यांचा कोटा आम्हाला सांगा
सगळ्यांना अपक्षांची गरज असते, सर्वांनी आपआपली व्यवस्था केली आहे
-
दोन हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडलं
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाची कारवाई
चंदगड पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अमित पांडे याला केली अटक
वडील आणि मुला विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी मागितली होती पाच हजारांची लाच
त्यापैकी दोन हजार रुपये स्वीकारताना चंदगड पोलीस ठाण्याच्या आवारातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
पोलीस उपनिरीक्षक लाचप्रकरणी अटक झाल्याने कोल्हापूर पोलीस दलात खळबळ
-
-
3 तासाच्या चर्चे नंतर दरेकर, महाजन आणि ठाकुरांची बैठक संपली
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन हितेंद्र ठाकूर यांचे 3 मत मिळविण्यासाठी आले होते हितेंद्र ठाकुरांच्या भेटीला
-
बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार
राष्ट्रवादीची विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने 7 वाजता मुंबईतील हॉटेल ट्रायन्ट येथे बैठक पार पडणार आहे.
या बैठकीसाठी उप मुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित आहेत.
-
पुलाच्या उद्घाटनापूर्वी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर
बोरिवली कोरा केंद्रात एका पुलाच्या उद्घाटनावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर
पुलाच्या उद्घाटनापूर्वी पुलाखाली भाजपकडून ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी,
तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते पुलावर ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत आहेत.
हा पूल आम्ही बांधला असे भाजपवाले म्हणतात, तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते आदित्य ठाकरेंच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होत असल्याचे सांगत आहेत.
-
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन
– काँग्रेस भवनपासून आंदोलन सुरू होणार,
– पुणे शहर भाजप कार्यालयावर मोर्चा धडकणार,
– पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र
-
यवतमाळ – देशी बनावटीच्या 3 अग्निशस्त्र जप्त; दोघांना अटक
पुसद शहरातील वसंन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोघांना देशी बनावटीचं अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक
कारवाईमध्ये एकूण तीन देशी बनावटीच्या अग्निशस्त्र पोलिसांनी जप्त केली
जगदंबा नगर श्रीरामपूर येथे तीन अग्निशस्त्र असल्यावची मिळाली माहिती
अश्विन बाबुसिंग पवार(36), सरदार खान आमिरउल्ला खान (52) अरुण लेऊट वसंत नगर या दोघाना अटक
आरोपींविरुद्ध वसंत नगर पोलिस स्टेशनमध्ये शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
-
उरणमधील रानसई धरणाचा पाणीसाठा संपुष्टात
डेडस्टॉकमधून करावा लागणार पाणीपुरवठा
-
पुण्यात ओबीसी समाजाकडून ओबीसी समाज मेळाव्याचं आयोजन
मेळाव्यात देववाले, मरी आई व गोंधळी समाजाच्यावतीनं गोंधळ घालून सरकारचं लक्ष वेधण्यात आलं
जातनिहाय जनगणना करा, क्रीमीलेअरची अट रद्द करावी, प्रमोशनमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावं, या मागण्या यावेळी करण्यात आल्यात …
जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय..
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
– सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासन नमले
– सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थी कार्यकर्त्यांनी केलेल्या मागण्या विद्यापीठ प्रशासनाकडून मान्य
– 20 जून पासून होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या
– 14 जुलैपासून सुरू होणार विद्यापीठाच्या परीक्षा
– सविस्तर उत्तर पद्धत ऐवजी आता बहुपर्यायी पद्धतीने होणार परीक्षा
– परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवशंकर गणपुर यांची माहिती
– आज सकाळपासून सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे सुरू होते आंदोलन
– विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे मागण्या मान्य
– मागण्या मान्य झाल्याचा निर्णय होतास विद्यार्थ्यांनी केला जल्लोच
-
मुख्यमंत्री उद्या आमदारांना मार्गदर्शन करणार
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या दुपारी शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करणार
शिवसेना आमदार आणि पाठींबा दिलेल्या अपक्ष आमदारांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांचा आहे हॉटेलमध्ये मुक्काम
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्या सायंकाळी उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना online मार्गदर्शनपर भाषण
-
अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस
गावातील रस्त्यावरून वाहले पाणी;
रस्त्यालगतच्या अनेक घरात घुसले पाणी…
पाण्यातून दुचाकी वाहत जाताना थांबवता नागरिकांची दमछाक…
अचानक आलेल्या पावसाने मोठे नुकसान…
जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री…
-
हिंगोली- मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात
जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
-
अग्निपथविरोधात जोरदार आंदोलनं
मुंबईतील कलिना येथे अग्निपथ योजनेच्या विरोधात मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत
या आंदोलनात काँग्रेसचे आमदार जीशान बाबा सिद्दीकी यांच्यासह शेकडो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसले
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
प्रत्येक स्वतंत्र उमेदवाराचे मत मिळवणे हे आमचं काम आहे
म्हणून आमचे नेते जाऊन भेटले आहेत
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
आज संध्याकाळी आमच्या आमदारांची बैठक आहे
या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत
मला अजून कोणत्याही सूचना आल्या नाही
कुणीही दबाव आणल्याचे अजून सांगितलं नाही
आमदार निवडून देत असताना आपल्याकडे व्यवस्थित कोटा आहे
मागच्या वेळी आमचे उमेदवार निवडून देऊन कमी मतं उरत होती
त्यामुळे आम्ही एकत्र बैठक घेतली होती
शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येतील असं चित्र आहे
आम्हाला थोडी संख्या कमी पडतेय त्याबाबत आम्ही अपक्षांची मदत घेऊ
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
मतं बाद होणार नाहीत याच्यासाठी काळजी घेतोय
राज्यसभेत काय घडलंय सर्वांनी पाहिलं आहे
शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील
महाविकास आघाडीची एकजूट आहे
आम्ही एकमेकांना भेटतो आहे
अपक्षांना काही नेत्यांनी फोन केले हे खरं आहे
मुख्यमंत्री सांगितील तसं आम्ही मतदान करू असे आमदारांनी सांगितलं
अग्निपथ योजनेविरोधात तरुणांचा रोष पहायाला मिळाला
तरुणांच्या आंदोलनात सार्वजनिक संपत्तीचं नुकासान झालं
केंद्रा आधीच वयाची मर्यादा वाढवली असती तर हे झालं नसतं
तरुणाईवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ
पण राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणे योग्य नाही
-
नागपूर : केंद्र शासनाच्या “अग्निपथ योजने” च्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आंदोलन
केंद्र शासनाच्या “अग्निपथ योजने” च्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
आंदोलनात केंद्रसरकार विरुद्धात घोषणाबाजी
-
मुंबई : माजी मंत्री प्रकाश जावडेकरांची महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका
महाराष्ट्राच्या आघाडी सरकार विरोधात प्रचंड असंतोष, कारण हे सरकार काहीच करत नाहीत.
यांचं एकच कॉमन मिनिमम प्रोग्रॅम लूट लूट आणि दुसरा प्रोग्रॅम म्हणजे स्वतःच्या केसेस मधून वाचवणे, तर जितकं हणता येईल तितके हणायच.
देशातील भ्रष्टाचारीची सगळी रेकॉर्ड या आघाडी सरकारने मोडून काढली
आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे काही आमदार कोणमुळे निवडून आले मोदीच्या पोस्टरमुळे आणि आमच्याशी युती केल्यामुळे निवडून आले
हे अनैतिक सरकार आहे.
-
अरविंद सावंत विधान भवनात दाखल
अरविंद सावंत विधान भवनात दाखल
Byte
काऊंटीग एजंट आहे सही करायला आलो होतो
हॉटेलमध्ये एकत्र आहोत आनंदाची गोष्ट आहे सगळे एकत्र आलो आहोत
मार्गदर्शन केले तर मार्गावर चालले पाहिजे
कोटा ठरलेला आहे 27 आहे किंवा 26 होईल आहेत
शिवसेनेकडे स्वतःची 55 मध्ये आहेत काही प्रॉब्लेम नाही
राज्य सभेची पून्हावृती होणार नाही
काळजी करण्याची काही नाही
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी..
अमरावतीत सोनिया गांधी,राहुल गांधी यांच्यावरील ईडी कारवाई विरोधात भाजप कार्यालवर जाणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात…
शेकडो कार्यकर्ते जाणार होते भाजप कार्यालयावर मोर्चा घेऊन..
पोलिसांनी घेतलं कार्यकर्त्याना ताब्यात..
राजकमल चौकातच घेतलं कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यांत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी..
-
९० टक्के भोंगे बंद, कार्यकर्त्यांमध्ये ऊत्साह, पत्राचं स्वागत होतंय – बाळा नांदगावकर
– विभाग अध्यक्षांच्या बैठका सुरू झाल्यात… लोकसभा आणि मनपाच्या निवडणुका आहेत त्यामुळे बैठका…
– मनपा निवडणुकांसाठी तयारी सुरू झालीये, मनसे मिशन मुंबई राबवणार…कोणत्याही परिस्थितीत मनपात मनसेची सत्ता आणायची हा ध्यास
– ९० टक्के भोंगे बंद, कार्यकर्त्यांमध्ये ऊत्साह आहे.. पत्राचं स्वागत होतंय…
– आमची डीनर डिप्लोमसी त्यांची हाॅटेल डिप्लोमसी, बाळासाहेबांच्या वेळेस असा प्रकार नव्हता, आत्ता आमदारांनाही चाॅगलं खायला प्यायला मिळतं म्हणून ते जातात…
– आत्ता गुप्त मतदान काय होणार माहीत नाही, पक्ष नेतृत्वाचा आमदारांवर विश्वास नाही…
– निवडणुक जिंकण्यासाठी टेक्निक असते, प्रतियेक पक्ष टेक्निक, आमदाराने धोका दिला काय करणार, आमदारांची कामे झाली नाहीत, वेळ दिला नाही…
– शिवसेनेच्या आमदारांमध्ये कुरबूरी वाढलीये…
– राज ठाकरे लवकरच एडमिट होतील, आज परवा तेरवा कधीतरी होतील…
– ऑपरेशननंतर आराम गरजेचा आहे, पुढे निवडणुका आहेत, त्यामुळे दौर्याबद्दल वेळ पाहून विचार केला जाईल
-
सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु
– सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु
– सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थी कार्यकर्ते सोलापूर विद्यापीठात घुसले
– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा एमसीक्यू पध्दतीने घेण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी
– मात्र विद्यापीठाच्या कुलगुरू मृनालिनी फडणवीस यांचा एमसीक्यू पध्दतीने परीक्षा घेण्याला विरोध असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
– कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीदेखील परीक्षा एमसीक्यू पध्दतीने घेण्याबाबत विद्यापीठाला निवेदन दिलेय
– मात्र विद्यापीठ प्रशासन या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक
– विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या गेटवर विद्यार्थ्यांनी खुर्चीवर दगड ठेवत मांडला ठिय्या
-
करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय (मामा) शिंदे मुंबईकडे रवाना
– करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय (मामा) शिंदे मुंबईकडे रवाना
-आज मुंबईत सहा वाजता हॉटेल ट्रायडन ला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक-
-बैठकीला राहणार आमदार संजयमामा उपस्थित-
-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची आज महत्वाची बैठक-
-विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय मामा शिंदे मुंबईला रवाना-
-राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला होता संजय मामा शिंदेंवर मत(न दिल्याचा) फुटल्याचा आरोप-
-त्या पार्श्वभूमीवर संजय मामा शिंदे यांच्या भूमीकेकडे लक्ष-
-
मुंबई गोवा महामार्गवर परशुराम घाटात बाराचाकी ट्रकला लागली आग
रत्नागिरी- मुंबई.गोवा महामार्गवर परशुराम घाटात बाराचाकी ट्रकला लागली आग
ट्रकचे केबिन आगीत जाळून खाक
मुंबई-गोवा महामार्गावर पेटत्या ट्रकचा थरार
आगीचे कारण अजूनही अस्पष्ट
आगीमुळे ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता
-
अमरावतीत आलेल्या धुव्वादार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
अमरावतीत आलेल्या धुव्वादार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणलेला हजारो क्विंटल शेतमाल पावसाने भिजला…
मुसळधार पावसामूळे शेतमाल गेला पाण्याने वाहत…
पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर आणतात शेतमाल..
बाजार समितीकडून उपाय योजना होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.
-
तरुणांनी देशाच्या संपत्तीचे नुकसान करू नये, सत्य आणि अहिंसा मार्गाने तरुणांनी आंदोलन करावं – कन्हैया कुमार
काँग्रेस नेता कन्हैया कुमार पत्रकार परिषद
# केंद्र सरकारने तरुणांना विचारलं का की अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत सरकारने काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं
सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुलं सैन्यात जात नाहीत
अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी, सरकारने लॉलीपॉप दाखवायचं बंद कराव, बिहार मध्ये बेरोजगारी दर जास्त आहे,
तरुणांनी देशाच्या संपत्तीचे नुकसान करू नये, सत्य आणि अहिंसा मार्गाने तरुणांनी आंदोलन करावं
-
दादर साने गुरूजी शाळेत मनसेच्या विभाग प्रमुख्यांची बैठक
ब्रेक – दादर साने गुरूजी शाळेत मनसेच्या विभाग प्रमुख्यांची बैठक…
– बैठकित भोंग्याची विषयावर कार्यकर्त्यांची कानऊघडणी…
– राज ठाकरे यांनी २ तारखेला लिहीलेलं पत्र शाखा अध्यक्षांनी घराघरात का नाही वाटले यासाठी कार्यकर्त्यांवर राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहीती…
– पक्षाच्या आदेशाची खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांकडून अंमलबजावणी होत नसल्याने कार्यकर्त्यांवर वरिष्ठ नेतृत्व नाराज असल्याची माहीती…
– कार्यकर्तेयांना बैठकीत जाब विचारण्यात आला…
-
देशप्रेमानं अग्निवीरमध्ये तरुण भरती होतील
देशप्रेमानं अग्निवीरमध्ये तरुण भरती होतील
तरुणांना एक चांगला पर्याय माध्यमातून मिळणार आहे
जे विरोध करतायेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे पुढे जाऊन विविध ठिकाणी संधी मिळू शकते
यामुळे सैन्यदलाची ताकद वाढू शकते जे की तरुण शारीरिक फिट असणारे सैनिक मिळतील क्षमता वाढेल
या चार वर्षांच्या कालावधीत 28 लाख रुपये मिळणार आहेत
हा प्रायोगिक तत्वावरचा प्रयोग आहे भविष्यात विचार करता येईल अग्निवीरच्या माध्यमातून करायची का ? जनरल करायची
तरुणांना संधी आहे तरुण सहभागी होतील अशी आशा
माजी निवृत्त जनरल अधिकारी राजेंद्र निंभोरे यांची प्रतिक्रिया
सैन्यदलानं मोठा निर्णय घेतलाय ज्यासाठी हिंमत लागते …
-
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुक अतिशय अटीतटीची होणार – विनोद तावडे
– महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुक अतिशय अटीतटीची होणार.. – विधानपरिषदेतील भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येतील.. – राज्यसभेतही आम्हाला कमी मते होती, मात्र आमचा विजय झाला.. – दाखवून केलेल्या मतांमध्ये भाजप जिंकलं, हे तर गुप्त मतदान.. – गुप्त आशिर्वाद कोणाचे हे २० तारखेला कळेल.. – महाराष्ट्रातला कोणताही आमदार घोडेबाजारावर विकला जात नाही..
– ज्याचे त्याचे मैत्रीपूर्ण संबंध असतात, मलाही विधानपरिषदेला ९ मते बाहेरुन मिळाली होती.. – राष्ट्रपतीपद निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येईल.. – कौशल्यापेक्षा परस्पर सहकार्य आणि कौशल्य कुणाकडे आहे हे महत्वाचे.. – मला राज्यसभा किंवा परिषदेत जाण्याची इच्छा नव्हती.. – खडसेंविरोधात भाजपकडून कोणतीही रणनिती नाही..
-
झोपलेला उठवणं सोपं असतं, सोंग घेतलेल्या उठवलं कठीण असतं – चंद्रकांत पाटील
महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल
त्यातली कोणाची पडेल हे त्या दिवशी समजेल
अधिक मतं भारतीय जनता पार्टीला मिळतील
त्यांच्यातल्या बेवनावावर मी बोलणं योग्य नाही
विधान परिषदेतही त्यांच्यातले मतभेद समोर येतील
संजय राऊत राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अपक्षांवर भडकले
बघून घेऊ, विकास निधी देणार नाही
लाखोंची भरती केंद्र सरकार करणार
तरूणांनी समजून घ्यायला हवा
सैन्यात जाणारे युवक असं कृत्य करणार नाहीत
तरूणांना भडकावण्याचा प्रयत्न आहे
बेरोजगारी संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे
विधान परिषदेत भाजपाचाच विजय होईल
मुळं सैन्य भरती बंद होणार नाही
भाजपची भूमिका अशा तरूणांना समजून सांगणं हे आहे
चर्चेतून मार्गे काढण सोप्प आहे
झोपलेला उठवणं सोपं असतं, सोंग घेतलेल्या उठवलं कठीण असतं – चंद्रकांत पाटील
-
54 टक्के ओबीसी आहेत,आडनाव वरून डेटा गोळा करता येणार नाही – छगन भूजबळ
– 54 टक्के ओबीसी आहेत,आडनाव वरून डेटा गोळा करता येणार नाही – अनेक जातींमध्ये एकसारखे आडनाव आहेत – आडनाव वरून डेटा गोळा केल्यास ओबीसी समाजाचा नुकसान होईल – या संदर्भात झालेल्या बैठकीत हेच आम्ही सांगितले आहे – या संदर्भात वेळ पडली तर कोणालाही भेटेन
ऑन विधानपरिषद
– आमचे तीनही पक्षाचे उमेदवार निवड येथील – भाजपा पेक्षा महविकास आघाडीचे आमदार जास्त आहेत – अनिल देशमुख आणि मलिक यांचे मत मिळाले नाहीतरी फार काही परिणाम दिसणार नाही – भाजपाचे 4 सहज निवडून येथील पण त्यांनी 5 उमेदवार दिले आहेत त्यामुळे ते प्रयत्न करणारच – केंद्रीय यंत्रणांचे दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे
-
काँग्रेस नेते भाई जगताप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला
काँग्रेस नेते भाई जगताप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला
काँग्रेसकडून दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव
-
मंत्री छगन भुजबळ लाईव्ह
मंत्री छगन भुजबळ लाईव्ह
काही त्रूटी राहिल्या आहे, आम्ही माहिती मागवणार आहोत
ओबीसी आरक्षणावर भुजबळांचं भाष्य
ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही
आमच्या चौथ्या उमेदवारालाही 39 मते पडली, भाजपचा चौथा उमेदवार नव्हता
कुणावर अन्याय होणार नाही
आवश्यकता वाटली तर मी कुणालाही भेटेल
मविआचे सहाही उमेदवार निवडणून येतील
दोन मत कमी पडले तरी चिंता नाही
-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची पत्रकार परिषद
भाजपची विकेट पडेल-नाना पटोले
संजय राऊतांना अपक्ष येऊन भेटले
‘मविआ’चे उमेदवार विधानपरिषद निवडणूक जिंकणार
केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग
आमदारांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून फोन केले जातात आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे-नाना पटोले
-
संतोष जाधव याचे लॉरेन्स बिष्नोईचे संबंध आहेत
संतोष जाधव याचे लॉरेन्स बिष्नोईचे संबंध आहेत
हे त्यानं कबूल केलंय पंजाबमध्ये तो त्याच्या गावी जाऊन पण आलाय
पण शुटर्स कोण होते याचा तपास सुरू आहे
तीन वर्षापासून त्याचा बिष्नोई गँगचा संबंध आहे
सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे संबंध प्रस्तावित केलंय
बिष्नोई गँगचा विस्तार हा पाच सहा राज्यात आहे.
या गँगचे काहीजण बाहेरच्या देशात आहेत
या गँगचे महाराष्ट्रातील पाळमुळं खणून काढणं हे आम्ही काम करतोय
ही शस्त्र जूनमध्ये आली आहेत
संतोष जाधवच्या सांगण्यावरून मुलं ही मध्य प्रदेशातून आणली
संतोष जाधव हा बिष्नोई गँगच्या संबंधित मुख्य माणसाच्या संपर्कात आहे
-
नितीन गडकरी लाईव्ह
साखर उत्पादन कमी करा – गडकरी
इथेनॉलचे उत्पादन वाढला – गडकरी
इथेनॉलचे उत्पादन वाढले तरच ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने वाचतील
गडकरी यांचा साखर कारखानदारांना सल्ला
राज्यात जलसंधारणाची कामे वाढवण्याची आवश्यकता – गडकरी
ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन – गडकरी
भविष्यात भारताला ऊर्जाचे निर्यात करणारा देश बनवू – गडकरी
-
संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्यात ड्रोन कॅमेऱ्याला बंदी
संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्यात ड्रोन कॅमेऱ्याला बंदी
पालखीच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचा निर्णय
दोन वर्ष कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द
यावर्षी पालखी सोहळ्यात गर्दी होणार, देहू पोलिसांना गर्दीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या सूचना
-
सीआरपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांना दहा टक्के सूट
अग्निपथ योजनेबाबत केंद्र सरकारकडून मोठा खुलासा
सीआरपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांना दिली जाणार सूट
दहा टक्के आरक्षित जागा अग्निवीरांसाठी असणार
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
अग्निवीरांना वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्याचीही घोषणा
देशभरात सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
-
पुणे मेट्रोनं ओलांडला 10 लाख प्रवाशांचा टप्पा
पुणे मेट्रोनं ओलांडला 10 लाख प्रवाशांचा टप्पा
मात्र मेट्रो प्रवासासाठी पुणेकरांची गर्दी नाही
गर्दीविनाच पुण्यातील मेट्रो स्थानकं
शनिवारच्या सकाळी मेट्रो स्थानकावर गर्दी नाही
मेट्रोला पुणेकरांचा तुरळक प्रतिसाद
गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्थानकावरूना आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी
Feed _ M
-
पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी साधणार संवाद…
पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी साधणार संवाद…
कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडे यांच्या स्वागताची तयारी सुरू…
भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावलल्याची कार्यकर्त्यांची भावना…
त्यावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष…
-
भाजप नेत्या पंकजा मुंडे 21 तारखेला पाथर्डीत, समर्थक मुकुल गर्जे यांची भेट घेणार
भाजप नेत्या पंकजा मुंडे 21 तारखेला पाथर्डी शहरात येणार
पंकजा समर्थक मुकुल गर्जे यांच्या भेटीसाठी पंकजा मुंडे येणार
पंकजा याना विधान परिषदेची उमेदवार न मुळाल्याने मुकुल गर्जे यांनी विषारी औषध घेवून आत्महत्याचा प्रयत्न केला होता
सध्या पंकजा मुंडे यांनी मौन असलं तरी या घडामोडी नंतर त्या पहिल्यांदाच पाथर्डीत येणार
तर यावेळी मोहटादेवी येथे देखील दर्शन घेणार
-
शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले.
सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.
-
मराठवाड्याची लाईफ लाईन जायकवाडी धरण 10 दिवसांपासून अंधारात..
मराठवाड्याची लाईफ लाईन जायकवाडी धरण 10 दिवसांपासून अंधारात..
एक लाख रुपयांचे बिल थकल्याने महावितरणाने टोकाची भूमिका घेत धरणाचा वीजपुरवठा केला खंडित..
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने जायकवाडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण..
जायकवाडी धरणावरील वीज पुरवठा खंडित करू नये असे लेखी पत्र जायकवाडी प्रशासनाने दिले असताना महावितरणची कारवाई..
जायकवाडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..
महावितरणाचा कारवाईमुळे जायकवाडी धरणाच्या सुरक्षेकडे कानाडोळा..
-
प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई
प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल तर ११४ किलो प्लास्टिक जप्त
प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये सुमारे ११४ किलो प्लास्टिक जप्त करून ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
-
पुण्यात बसखाली येऊन अमोल निकम या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना 15 तारखेला घडली होती
पुण्यात बसखाली येऊन अमोल निकम या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना 15 तारखेला घडली होती
शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत ब्लॉसम पब्लिक स्कूल ही संस्था येते
शाळेचे संस्थापक शिवसेना आमदार तानाजी सावंत आणि शाळा प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
सिंहगड पोलिसांत संभाजी ब्रिगेडनं दिली तक्रार
तानाजी सावंतांच्या अडचणीत वाढ होणार ?
स्कुल बसमधून घरी उतरताना विद्यार्थी बसखाली गेला संभाजी ब्रिगेडचा आरोप
तर मुलाची आई कोमात असून वडील हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती
संतोष शिंदे यांच्याकडून तक्रार दाखल
-
अग्निपथ योजनेबाबत सरकार फेरविचार करणार ?
अग्निपथ योजनेबाबत सरकार फेरविचार करणार ?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची आज बैठक
नौदल, हवाई दल आणि भूदल तिन्ही दलांच्या प्रमुखांशी राजनाथ सिंह चर्चा करणार
देशातल्या अनेक भागात अग्निपथ योजने विरोधात आंदोलन
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांची महत्वपूर्ण बैठक
-
अमरावती शहरातील जवाहर गेट मधील दुकानाला पहाटे भीषण आग.
अमरावती शहरातील जवाहर गेट मधील दुकानाला पहाटे भीषण आग…
दुकानातील लाखो रुपयांचा माल आगीत जळून खाक…आगीत दुचाकीही खाक
जय मेटल दुकानाला लागली आग..आता आग आटोक्यात आणायला अग्निशमन दलाला यश…
-
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा हात पाय पसरायला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा हात पाय पसरायला सुरवात
एक दिवसाच्या अंतराने रुग्ण संख्या झाली तिप्पट
गुरुवारी आढळणारे नवीन रुग्ण तर शुक्रवारी एकाच दिवशी आढळले नऊ नवे रुग्ण
जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या पोहचली 22 वर
पावसाळ्याच्या तोंडावर वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली
नागरिकांनीही खबरदारी घेण्याची गरज
-
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे
नागपूर :- ११३ दिवसांनी कोरोना रुग्णसंख्या ६१ वर
४३ रुग्ण बरे :ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०० च्या आत
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पूर्वी शहरापुरताच मर्यादित असलेला हा आजार ग्रामीण भागातही पसरायला लागला आहे.
शहरातील ३४, ग्रामीणमधील २६ तर जिल्हाबाहेरील १ रुग्ण आहे.
रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ७८ हजार २८६ झाली असून, मृतांची संख्या १० हजार ३३८ वर स्थिर
रुग्णसंख्येचा वाढता ग्राफ
१ जून – ०९ रुग्ण
५ जून- ०५
१० जून – ४३ रुग्ण
१५ जून – ५० रुग्ण
१७ जून – ६१ रुग्ण
-
भंडाऱ्यात पुन्हा आठ कोरोना रुग्णांची भर
– भंडाऱ्यात पुन्हा आठ कोरोना रुग्णांची भर.
– जिल्हा चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर.
– 31कोरोना एक्टिव्ह रुग्ण.
– रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
-
सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याची दहशत कायम
नाशिक – सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याची दहशत कायम
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक तैनात
परिसरात बिबट्या दिसल्या नंतर नागरिकांमध्ये घबराट
बिबट्याला पकडण्यात अद्याव यश येत नसल्याने नागरिकांचा जीव टांगणीला
शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या दिसल्याची माहिती
-
रत्नागिरीत पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
रत्नागिरी- पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला अंदाज रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज १९ जून नंतर मान्सुनचा जोर वाढण्याची शक्यता मान्सुन सक्रीय झाल्यानंतर कोकणात पावसानं दिलीय ओढ
-
ताडोबा बफर क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांबाबत भाजपाचे जनआक्रोश आंदोलन
चंद्रपूर -ताडोबा बफर क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांबाबत भाजपाचे जनआक्रोश आंदोलन,
वना लगत असलेल्या शेती शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या, तीन पिढ्या ची अट रद्द करा, वनावर आधारित रोजगार उपलब्ध करा,
यासोबत अन्य मागण्यासाठी भाजपाचे आंदोलन,
मागण्या त्वरीत पूर्ण न केल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष यांचा इशारा
-
आळंदीत मंदिर परिसरात गंध लावणाऱ्या लहान मुलांना सोन्याच मंगळसूत्र सापडलं,ते मुलांनी प्रामाणिक पणा दाखवत आळंदी पोलिसांना सुपूर्द केलंय
-आळंदीत मंदिर परिसरात गंध लावणाऱ्या लहान मुलांना सोन्याच मंगळसूत्र सापडलं,ते मुलांनी प्रामाणिक पणा दाखवत आळंदी पोलिसांना सुपूर्द केलंय
-वारीला होत असलेल्या गर्दी मुळे आळंदी मध्ये अनेक लहान मुले भाविकांना गंध लावण्याचे काम करत घरी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करतात.अशाच तीन लहान मुलांनी प्रामाणिकपणा दाखवत त्यांना मिळून आलेले मंगळसूत्र आळंदी पोलिस स्थानकात जमा केलंय
-संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरा समोर गंध लावण्याचे काम करत असताना या मुलांना रुमालामध्ये मंगळसूत्र आढळून आले होते
-अथर्व आणि स्वरा गवांडे या भाऊ बहिणीचे आणि पूजा भामरे या तिघांचे चांगलंच कौतुक होतंय
-दरम्यान ज्या महिलेचे मंगळसूत्र हरवलेले आहे, त्यांनी ओळख पटवून ते घेऊन जावे असं आवाहन आळंदी पोलिसांनी केलंय
-
नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 61 नव्या कोरोना रुग्णांची भर
– नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६१ नव्या कोरोना रुग्णांची भर
– ११३ दिवसानंतर जिल्हयात एक दिवसांत ६१ नव्या रुग्णांची नोंद
– गेल्या २४ तासांत ४३ रुग्णांनी केली कोरोनावर मात
– जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ३०० च्या आत
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट अखेर रद्द
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट अखेर रद्द
मात्र शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात राज ठाकरे यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर रहाव लागणार
कोकरूड पोलीस ठाण्यात 14 वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांना बजावलं होत अटक वॉरंट
वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे यांच्या वतीने देण्यात आला होता अर्ज
राज ठाकरे यांचा अर्ज शिराळा न्यायालयाने फेटाळला होता
मात्र शिराळा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज इस्लामपूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात केला होता दाखल
इस्लामपूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय राज ठाकरे यांना दिला दिलासा
-
दहावी बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डानं पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डानं पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक केलं जाहीर
विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देता येणार
21 जूलै ते12 ऑगस्ट दरम्यान होणार बारावीची पुरवणी परीक्षा
तर 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान दहावीची परीक्षा
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेद्वारे संधी देण्यात येते .
बारावीचा निकाल लागला आता लवकरच महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीयेला होणार सुरुवात
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या पसंतीक्रम निवडण्यासाठी पुढील आठवड्यापासून देण्यात येणार सेवा
विद्यार्थ्यांना फॉर्मद्वारे माहिती भरावी लागणार
या महिना अखेरीस महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रीया सुरू होण्याची शक्यता
सुरुवातीला लावले जाणार कँप राऊंड !
-
विधानपरिषद पार्शवभूमीवर शिवसेना आमदारांना हॉटेल वेस्टिन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे
विधानपरिषद पार्शवभूमीवर शिवसेना आमदारांना हॉटेल वेस्टिन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे
या आमदारांना भेटण्यासाठी शिवसेना नेते आणि मंत्री अदित्य ठाकरे हे रात्री १२:३० वाजता दाखल झाले
यावेळी अदित्य ठाकरे यांनी हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये कॉफी घेत छोटी बैठक घेतली
या बैठकीत मंत्री अनिल परब, अनिल देसाई, दादा भुसे आणि काही आमदार होते
विधानरिषदेच्या पार्शवभूमीवर आणि इतर काही विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे
तासभर चर्चा झाल्यानंतर आज अदित्य ठाकरे हे हॉटेलमधेच मुक्कामाला थांबले
-
एल्गार परिषदेसंर्भात पोलीस व तपास यंत्रणांनीच पुराव्यात छेडछाड केली
एल्गार परिषदेसंर्भात पोलीस व तपास यंत्रणांनीच पुराव्यात छेडछाड केली
स्पायवेअर व मालवेअर पाठवून आरोपीच्या उपकरणांमध्ये पुरावे पेरले,
अमेरीकेतील सायबर क्षेत्रात काम करणाऱ्या सेंटीनेंटल संस्थेच्या अहवालात माहिती
आरोपींना विविध स्पँम इमेल पाठवून उपकरणांणा ताबा घेण्यात आला आणि त्यामधील माहितीची छेडछाड करण्यात आली
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते ,लेखक असे एकुण 16 जण अटकेत आहेत..
-
पुणे पोलीस आयुक्तांकडून संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्याचा प्रयत्न
पुणे पोलीस आयुक्तांकडून संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्याचा प्रयत्न
20 महिन्यात 83 टोळ्यांविरोधात केली मोकाची कारवाई
दगडफेक, नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आदेश
टोळीप्रमुख यश हेळेकर यांच्यावर मोका अंतर्गत केली कारवाई
चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे आहेत दाखल…
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र
पुणे बंगळूरू महामार्गावर वाकड ते नर्हे इथपर्यंत साऊंडप्रुफ भिंत उभारा पत्राद्वारे केली मागणी
हायवेवरून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजाचा त्रास बाजूच्या नागरिकांना होतोय हे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी साऊंडप्रुफ भिंत उभारा केली मागणी
तर चांदणी चौकात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवरही लक्ष घाला पत्रात मागणी
पुणे बंगळूरू महामार्गावर विविध ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना.हा नागरिकांना करावा लागतोय…
-
पावसाळ्याच्या आधी पुणे महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनाचं नियोजन
पावसाळ्याच्या आधी पुणे महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनाचं नियोजन
पुणे महापालिका पावसाळ्यासाठी 16 बोट करणार खरेदी
शहरात पावसानं कुठे पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना बाहेर काढण्यासाठी याची मदत घेतली जाणार आहे
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बोट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय 1 कोटी 60 लाख रुपयांच्या बोट घेतल्या जाणार.आहेत…
Published On - Jun 18,2022 6:43 AM