Maharashtra News Live Update : सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण, अन्य काही नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण

| Updated on: Jun 02, 2022 | 9:01 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण, अन्य काही नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण
मोठी बातमी

मुंबई : आज गुरूवार 2 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातल्या भोरमधील रामबाग येथे, फिल्म शूटिंगच सामान असलेल्या गोडाऊनला लागलेल्या आगीत, संपूर्ण गोडावून जळून खाक झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र या आगीत सुमारे 11 लाखांचं नुकसान झालंय.आगीचं कारणं अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशामक दलाचे जवान आणि सह्याद्री रेस्क्यू टीम यांच्या 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. गोडाऊन मध्ये शूटिंगसाठी वापरले जाणारे कपडे, दागिने, टेबल, खुर्चीसह शूटिंगच्या सेटसाठी वापरल जाणारं साहित्य ठेवण्यात आलं होतं. आगीत हे संपूर्ण साहित्य जळून खाक झाल आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Jun 2022 07:23 PM (IST)

    धान खरेदी केंद्राची मर्यादा कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या गडचिरोलीत आंदोलन

    गडचिरोली जिल्ह्यात अंकिसा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले परंतु धान खरेदी केंद्राची मर्यादा कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलन

    सुरू करण्यात आलेले धान्य खरेदी केंद्र बंद करण्यात यावे व खरेदी वाढविण्यात यावी अशी मागणी घेऊन शेतकरी नारे देत आंदोलन

    प्रत्येक धान खरेदी केंद्रात गावाप्रमाणे 13 ते 15 हजार क्विंटल धान्य खरेदी करण्यात येत होती परंतु यावर्षी शासनाने फक्त पाच क्विंटल हजार धान्य खरेदी करण्याचे अटी नियम लावले

    या नियमाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं जुन्या नियमाप्रमाणे प्रत्येक गावात 13 ते 15 हजार क्विंटल धान्य खरेदी करण्यात यावे अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली

    सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे आंदोलन करण्यात आले

  • 02 Jun 2022 07:21 PM (IST)

    गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीसाची आत्महत्येचा प्रयत्न

    गोंदिया शहर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस शिपायाने पोलीस वसाहतीतील राहत्या घरी फिनाईल पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न . आत्महत्या करण्याचे कारण अजूनही अस्पष्ट .

    पोलिसांनी माहिती देण्यास दिला नकार

    महिला पोलीस शिपायांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार सुरु.

  • 02 Jun 2022 07:18 PM (IST)

    अप्पर वर्धा धरणाची पाईप लाईन फुटली; अपार्टमेंटजवळ बांधकाम करणाऱ्या मजुरांची घरे पाण्यात

    अप्पर वर्धा धरणाची पाईप लाईन फुटली

    अमरावती शहरातील रहाटगाव जवळील वृंदावन अपार्टमेंटजवळ साचला तलाव…

    अपार्टमेंटजवळ बांधकाम करणाऱ्या मजुरांची घरे पाण्यात बुडाली

    तीन तासापासून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याची माहिती

    अद्यापही प्रशासनाने नाही घेतली दखल

  • 02 Jun 2022 06:59 PM (IST)

    कोल्हापूरच्या पन्हाळा येथे अवकाशात तबकडी सदृश्य वस्तू; पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून हळूहळू ही वस्तू उत्तरेच्या दिशेने सरकली

    कोल्हापूरच्या पन्हाळा येथे अवकाशात तबकडी सदृश्य वस्तू

    पांढर्‍या शुभ्र रंगाची तबकडी सारखी वस्तू दिसल्याने नागरिकांमध्ये कुतूहल

    पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून हळूहळू ही वस्तू उत्तरेच्या दिशेने सरकली

    पन्हाळा येथील रमेश पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये वस्तूचे शूटिंग केलं

    अतिशय मंद गतीने तबकडीसारखी ही वस्तू उत्तरेच्या दिशेला सरकत होती

  • 02 Jun 2022 06:48 PM (IST)

    नालासोपाऱ्यात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एक 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी

    नालासोपारा:नालासोपाऱ्यात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एक 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी

    नालासोपारा पूर्व 90 फिट रोडवर काल रात्री 8 च्या सुमारास घडली घटना

    जखमी तरुणांच्या हाताला , पायाला, पोटाला, डोक्याला लागला मार

    रुग्णालयात उपचार करून तरुणाला सोडले घरी

    वसई-विरार महापालिकेच्या निष्काळजी पनाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका

  • 02 Jun 2022 06:47 PM (IST)

    वणी मुळाणे बारीतील अपघातातील मृतांची संख्या 5 वर: मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

    वणी मुळाणे बारीतील अपघातातील मृतांची संख्या 5 वर

    -अपघातग्रस्त ट्रॅक्टरला जोडल्या होत्या दोन ट्रॉली

    -ऊसतोड कामगारांना घेऊन जात होता ट्रॅक्टर

    -अपघातातील जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

    -मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

  • 02 Jun 2022 06:41 PM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘संघ शिक्षा वर्ग-तृतीय वर्ष’ वर्गाचा समारोप आज होणार

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘संघ शिक्षा वर्ग-तृतीय वर्ष’ वर्गाचा समारोप आज होणार

    रेशीमबाग मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन

    यावेळी भाग्यनगर येथील श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष दाजी उपाख्य कमलेशजी पटेल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित

    याप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचेदेखील उद्बोधन होईल.

    यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर 9 मे पासून तृतीय वर्ष वर्गाला प्रारंभ झाला .

    देशभरातील 735 स्वयंसेवक शिक्षार्थ्यांसह एकूण 900 कार्यकर्ता वर्गात उपस्थित

    शिक्षार्थ्यांना शारीरिक, बौद्धिक, सेवा यांच्यासह विविध विषयांबाबत प्रशिक्षण

  • 02 Jun 2022 06:39 PM (IST)

    सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पाऊस; मान्सूनपूर्व पावसाची प्रतिक्षा असताना लागला हलका पाऊस

    सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पाऊस.

    जिल्ह्याच्या काही भागात पाऊस कोसळतोय मात्र पावसाला जोर नाही.

    हलका हलका पाऊस.

    मान्सूनपूर्व पावसाची प्रतिक्षा असताना लागलाय हलका हलका पाऊस.

  • 02 Jun 2022 06:38 PM (IST)

    पोलीस पाटलांनाही आता सहकारी संस्थेची निवडणूक लढवता येणार

    बारामती : पोलीस पाटलांनाही आता सहकारी संस्थेची निवडणुक लढवता येणार..

    – सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी गृह विभागाचा हिरवा कंदील

    – सहकार कायद्यात पोलीस पाटलांना निवडणुक लढवण्यास प्रतिबंध नाहीत

    – पोलीस पाटील मानधनावर कार्यरत असल्याने त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांसाठीचे नियम लागू नाहीत

    – गृह विभागाकडून पोलीस पाटलांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवण्यास परवानगी

    – गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस पाटील संघटनांकडून झाली होती मागणी

  • 02 Jun 2022 06:24 PM (IST)

    राज्य सरकारला भारतरत्न मौलाना आझादांचा विसर; आझाद यांच्या जन्मदिनी 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा

    – राज्य सरकारला भारतरत्न मौलाना आझादांचा विसर,

    – राज्य सरकारच्या राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तीच्या यादीत मौलाना अबुल कलाम यांचे नाव गायब,

    – आझाद यांच्या जन्मदिनी 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो,

    – मात्र या सरकारला त्याचा विसर पडल्याची मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केली खंत

  • 02 Jun 2022 06:14 PM (IST)

    गरोदर महिला व सोनोग्राफी गैरसोयीबद्दल गोंदियात प्रहार जनशक्ती आक्रमक

    गोंदिया : गरोदर महिला व सोनोग्राफी गैरसोयीबद्दल प्रहार जनशक्ती आक्रमक

    -उपजिल्हा रूग्णालयातील भोंगळ कारभार दुरुस्तीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन

  • 02 Jun 2022 05:59 PM (IST)

    आता आरक्षण जे जाहीर झाल आहे त्याबद्दल भाई जगताप यांची भूमिका काय आहे, हे मला खरच माहीत नाही आहे; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

    आता आरक्षण जे जाहीर झाल आहे त्याबद्दल भाई जगताप यांची भूमिका काय आहे, हे मला खरच माहीत नाही आहे

    त्यांचा मनामध्ये काही शंका असतील त्याच निससन त्यांचा पद्धतीने ते करून घेतील

    आरक्षण ही प्रक्रिया फक्त मुबईत झाली नाही खूप ठिकाणी झाली आहे

    भाई जगताप त्यांचा शंका ते पूर्ण करतील

  • 02 Jun 2022 05:53 PM (IST)

    अवैध सावकार असणाऱ्या राजेंद्र बंब यांच्या बँकेतील खात्यातून आणखी करोडो रुपये जप्त

    अवैध सावकार असणाऱ्या राजेंद्र बंब यांच्या बँकेतील खात्यातून आणखी करोडो रुपये जप्त

    आतापर्यंत बंब यांच्याकडून साडे चार कोटींची मालमत्ता जप्त

    इतर बँकेतील खात्याविषयी पोलीस प्रशासन आणखी तपास करणार आहे.

    जळगाव पीपल्स बँकेच्या लॉकरमधून 2 कोटी 54 लाख 88 हजार रोख व 19 लाख 5 हजार रुपयांचे सोने असे एकूण 2 कोटी 73 लाख 93 हजार रुपयाचा ऐवज जप्त

    मुबई येथील जी पी फायनान्स ही कंपनी बनावट असल्याची पोलिसांची माहिती

    शिरपूर पीपल्स व योगेश्वरी पतसंस्था या दोन बँकेचा तपास अजूनही बाकी

    आणखी करोडो रुपये जप्त होण्याची दाट शक्यता

    शहरातील सावकारांमध्ये भीतीचे वातावरण

    काल आरोपी च्या घरातून पावणे दोन कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती

  • 02 Jun 2022 05:46 PM (IST)

    यवतमाळ जिल्हा परिषदेची गट आणि गणची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; जिल्हा परिषदेचे 61 गट आता होणार 69 गट

    यवतमाळ – यवतमाळ जिल्हा परिषदेची गट आणि गण ची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

    यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये वाढणार 8 जिल्हा परिषद गट तर 16 पंचायत समिती गण वाढले

    आधी होते जिल्हा परिषदेचे 61 गट आता होणार 69 गट

    यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड बाभूळगाव ,वणी , झरी ,घाटंजी या तालुक्यात वाढले जिल्हा परिषद गट आणि गट

  • 02 Jun 2022 05:42 PM (IST)

    उद्धव ठाकरे हे अनिल परब याना वाचवण्यासाठी कायदा धाब्यावर बसवायचा का?; किरीट सोमय्यांचा सवाल

    उद्धव ठाकरे हे अनिल परब याना वाचवण्यासाठी कायदा धाब्यावर बसवायचा का?

    दापोली दोन्ही रिसॉर्ट पडण्याचे आदेश दिले आहे साई रिसॉर्ट अनिल परब यांचे नाव वगळले

    साई रिसॉर्टवर कारवाई का करत नाही

    विभा साठेकडून जमीन घेतली 2017 मध्ये शेती म्हणून जमीन विकली

    त्याच्यावर अनिल परब यांची सही आहे

    आणि दुसऱ्या दिवशी अनिल परब आणि ग्रामपंचायतीला सांगितले की इथे रिसॉर्ट आहे

    यांच्यावर कारवाई उद्धव ठाकरे यांच्यावर करावी लागणार

    म्हणून तर मी आरोप केला ईडी आणि सीबीआयदेखील येईल

  • 02 Jun 2022 05:34 PM (IST)

    सांगली शहर परिसरात वादळ वाऱ्यासह दुसऱ्या दिवशीही पावसाला जोरदार सुरवात

    आज दुसऱ्या दिवशी ही आणखी सांगली शहर परिसरात वादळ वाऱ्या सह पावसाला जोरदार सुरूवात

    जोरदार वादळ वाऱ्यासह अचानक सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

    शहर परिसरात उकड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला तर शेतकऱ्यांमध्ये समाधान

  • 02 Jun 2022 05:32 PM (IST)

    कोल्हापुरात जोरदार पावसाला सुरुवात; नागरिकांची तारांबळ

    कोल्हापूरात जोरदार पाऊस

    वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस सुरू, पावसामुळे वीज गायब

    अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ

  • 02 Jun 2022 05:29 PM (IST)

    पोटच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या बापाला आणि आईला फाशीची शिक्षा; अल्कोहोल पाजून केला होता खून

    – पोटच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या बापाला आणि आईला फाशीची शिक्षा

    – सिकंदाराबाद येथे कामगार असणाऱ्या पित्याने आपल्या मुलीवर बापानेच अनैसर्गिक अत्याचार केला होता

    – त्यानंतर तिला अल्कोहोल पाजून तिचा गळा आवळून खून केला

    – 16 महिन्याच्या चिमुकलीवर बापानेच केला होता अत्याचार

    – त्यानंतर सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस रेल्वेतून जात असताना प्रवाशांना संशय आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना दिली होती कल्पना

    – सोलापूर जिल्हा विशेष न्यायालयाने पाच महिन्यात सुनावली शिक्षा

    – पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झाला होता गुन्हा

  • 02 Jun 2022 05:20 PM (IST)

    इचलकरंजी शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; शेतीच्या कामांना वेग

    इचलकरंजी शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची हजेरी

    पाऊस पडल्यामुळे  शेतीच्या कामांना मोठा वेग शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

    ऊकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा पाऊस आल्यामुळे हवे मध्ये  झाला गारवा निर्माण

  • 02 Jun 2022 05:17 PM (IST)

    कराडच्या जुना कोयना पुलावरील लोखंडी हाईट आरेस्टर उंच वाहनाच्या धडकेत पडला

    कराडच्या जुना कोयना पुलावरील लोखंडी हाईट आरेस्टर उंच वाहनाच्या धडकेत पडला

    रोडच्या बाजुला असलेल्या झोपड्यांच्या विरोध दिशेला पडल्याने जीवितहानी टाळली

    सहा दिवसांपुर्वीच उद्घाटन करुन पृथ्वीराज चव्हाण यांनी हलक्या चारचाकी वाहनांसाठी केला होता ब्रिटीशकालीन पुल खुला

    दोन तासापासून पुलावरील हलक्या चारचाकी वाहनांची वाहतूक बंद

  • 02 Jun 2022 05:10 PM (IST)

    नाशिकच्या कळवण जवळील मुळाने बारीत कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; 2-3 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी

    नाशिकच्या कळवण जवळील मुळाने बारीत कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात

    मुळाने बारीजवळ अपघात

    कार आणि ट्रॅक्टर समोरा समोर धडकले

    2-3 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी

    जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयांमधे हलवले

  • 02 Jun 2022 05:05 PM (IST)

    कोल्हापुरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात; शहरासह ग्रामीण भागातील वीज गायब

    कोल्हापुरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात

    शहरासह ग्रामीण भागातील वीज गायब

    वादळी वाऱ्यासह पाऊस

  • 02 Jun 2022 05:01 PM (IST)

    दर्यापूरमधील जखमी रुग्णांची भेट घेण्यासाठी आज खासदार नवनीत राणा यांची दोन रुग्णालयांना भेट

    अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात काल आलेल्या वादळी वारा व पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

    वादळी वारा व पावसामुळे एका मंगल कार्यालयातील टीन पत्रे उडून गेल्याने व मंगल कार्यालयाची पडझड झाल्याने अनेक वऱ्हाडी जखमी

    दरम्यान जखमीवर अमरावती शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु

    जखमी रुग्णांची भेट घेण्यासाठी आज खासदार नवनीत राणा यांनी दोन रुग्णालयांना भेटी दिल्या

    तसेच पावसाळ्यात सुरक्षेसाठी मंगल कार्यालयांचे ऑडिट झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली..

  • 02 Jun 2022 04:48 PM (IST)

    केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे सदस्य पाशा पटेल पुणतांब्यात दाखल

    केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे सदस्य पाशा पटेल पुणतांब्यात दाखल शेतकरी आंदोलकांची भेट देण्यासाठी पुणतांबा गावात

    शेतकऱ्यांबरोबर चर्चा करणार

    विविध पक्षाचे नेते दाखल होण्याची शक्यता

  • 02 Jun 2022 04:35 PM (IST)

    आमदार रोहित पवारांनी केले अदिती तटकरे यांच्या गाडीचे सारथ्य

    अहमदनगरः चौंडीत राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आदिती तटकरे यांच्या हस्ते

    तर चौंडीतून आदिती तटकरे आणि आमदार रोहित पवार बैलगाडा शर्यतीकडे रवाना

    यावेळी आमदार रोहित पवारांनी केले अदिती तटकरे यांच्या गाडीचे सारथ्य

  • 02 Jun 2022 04:20 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्हा परिषदेत 61 गट असणार, प्रारूप आराखडा जाहीर

    उस्मानाबाद जिल्हा परिषदेत 61 गट असणार, प्रारूप आराखडा जाहीर

    जिल्हा परिषदेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यात 61 मतदार संघ असणार

    या प्रारूप आराखड्यावर 8 जुनपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हा आराखडा जाहीर केला

    उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 14 मतदार संघ असून कळंब व उमरगा तालुक्यात प्रत्येकी 9 गट, भूम तालुक्यात 5 व परंडा तालुक्यात 6 गट, तुळजापूर तालुक्यात 10, वाशी तालुक्यात 3 तर लोहारा तालुक्यात 5 गट असणार

  • 02 Jun 2022 04:09 PM (IST)

    औरंगाबाद शहरातील काबरा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला तात्पुरती स्थगिती; विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंनी दिलं स्पष्टीकरण

    औरंगाबाद शहरातील काबरा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला तात्पुरती स्थगिती

    परीक्षा काळात गोंधळ उडाल्यामुळे दिली तात्पुरती स्थगिती

    उद्या आणि परवाच्या परीक्षा काबरा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर होणार नाहीत

    विद्यापीठाकडून परिक्षार्थींची केली जाणार इतरत्र व्यवस्था

    विद्यापीठाच्या प्र कुलगुरूंनी दिलं स्पष्टीकरण

  • 02 Jun 2022 04:05 PM (IST)

    वादळात मंगल कार्यालयाच्या पडझडीमुळे जखमी झालेल्या वऱ्हाडी मंडळींची नवनीत राणा घेणार भेट

    काल अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात आलेल्या वादळी वारा व पावसामुळे एका मंगल कार्यालय वरील टीनपत्रे उडून गेले होते

    मंगल कार्यालयातील पडझडीमुळे लग्नसमारंभातील अनेक वऱ्हाडी जखमी

    यातील काही जखमी व्यक्तीवर अमरावतीच्या सावदेकर रुग्णालय व डॉक्टर पंजाबराव देशमुख रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

    या रुग्णांची भेट घेण्यासाठी खासदार नवनीत राणा या रुग्णालयाला देणार भेट

  • 02 Jun 2022 04:02 PM (IST)

    कराड परिसरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी; उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

    कराड परिसरात मान्सून पुर्व पावसाची हजेरी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

    पेरणीपूर्वी मशागतीस पुरक पाऊस

  • 02 Jun 2022 03:58 PM (IST)

    अहमदनगरमधील चौंडीत आदिती तटकरे, आमदार रोहित पवार यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन

    अहमदनगरमध्ये राज्यमंत्री आदिती तटकरे आणि आमदार रोहित पवार चौंडीत दाखल

    विविध विकास कामांचे भूमिपूजन

    आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

  • 02 Jun 2022 03:56 PM (IST)

    दिपाली सय्यदवर कारवाईप्रकरणी महिला आयोगाचे ओशिवरा पोलीस स्टेशनला पत्र; नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अर्वाच्य भाष्य केल्याबद्दल कारवाईची मागणी

    – दिपाली सय्यदवर कारवाईप्रकरणी महिला आयोगाचे ओशिवरा पोलीस स्टेशनला पत्र

    – भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या तक्रारीनंतर महिला आयोगाचे पोलीस स्टेशनला पत्र

    – नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अर्वाच्य भाष्य केल्याबद्दल दिपाली सय्यदवर भाजपने केली होती कारवाईची मागणी

    – महिला आयोगाच्या पत्रानंतर ओशिवरा पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

  • 02 Jun 2022 03:53 PM (IST)

    मविआचे सरकारकडून 2 लाखाची कर्जमाफी; जिल्हा बँकेकडून 1550 कोटी; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

    महसुलमंत्री बाळासाहेब थोरात

    मविआचे सरकारने 2लाखाच कर्जमाफी दिली… जिल्हा बँकेने 1550कोटी दिले नियमित कर्ज फेडण्याबाबत कोविडमुळे थांबले 50 हजार मिळणार आहेत माझी मागणी जी वीज द्यायची ती दिवसा 8 तास पूर्ण द्या दुधाबाबत सरकारने काम केले व दुध खरेदी केली संकट आले की बाळासाहेब थोरात आपला मुन्नाला कळालं तर काय होईल ही भीती ? विखे पाटील यांच्यावर टीका सरंपचांनादेखील विचारलं नाही कोणत्या पक्षाचा

    पुणतांब्यात आंदोलन

  • 02 Jun 2022 03:46 PM (IST)

    येत्या 8 तारखेला मुख्यमंत्र्यांची टोमणे सभा ; आता शिवसैनिकांना प्रश्न पडलाय मैदान भरायचं कसं?; मनसे शहराध्यक्ष योगेश चिले यांची टीका

    पनवेलःयेत्या 8 तारखेला मुख्यमंत्र्यांची टोमणे सभा आहे

    आता शिवसैनिकांना प्रश्न पडलाय मैदान भरायचं कसं?

    तात्पुरता शिवसैनिक बनण्याचा रेट शिवसेनेने जाहीर केला पाहीजे म्हणजे शिवसैनिकांना मैदान भरणे सोपे जाईल

    मनसे शहराध्यक्ष योगेश चिले यांची टीका

  • 02 Jun 2022 03:40 PM (IST)

    बारावीच्या निकालाचं काम अंतिम टप्प्यात; जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होणार; वर्षा गायकवाडांचे स्पष्टीकरण

    बारावीच्या निकालाचं काम अंतिम टप्प्यात

    दोन दिवसांत निकालाचं काम पुर्ण होणार

    जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होतील असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय

    मात्र निकालाचं काम अंतिम टप्प्यात असून दोन दिवसात पूर्ण होणार

  • 02 Jun 2022 03:29 PM (IST)

    भाजपचे चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; जल्लोषाच्या वातावरणात फटाके फोडून केलं स्वागत

    भाजपचे चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

    गेल्या दीड महिन्यापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार

    दीड महिन्याच्या उपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज

    आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाच्या वातावरणात फटाके फोडून केलं स्वागत

  • 02 Jun 2022 03:17 PM (IST)

    काँग्रेस प्रदेशाध्सक्ष नाना पटोले, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आंदोलकांच्या भेटीला; शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांब्यात आंदोलन

    पुणतांबा-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घेणार आंदोलकांची भेट शिर्डीहून पुणतांब्याकडे रवाना

    काँग्रेस प्रदेशाध्सक्ष नाना पटोले, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आंदोलकांच्या भेटीला शिर्डीत काँग्रेसचे चिंतन शिबीर सोडून दोन्ही नेते पुणतांब्यात पुणतांब्यातील शेतकरी नेत्यांची घेतली भेट शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू आहे आंदोलन भेटीनंतर तोडगा निघणार का ?

  • 02 Jun 2022 02:51 PM (IST)

    मनसेकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड

    मनसे कडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड

    वाशिम तालुक्यातील चिखली बु.गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था

    या रस्त्याचं काम त्वरित मंजूर करण्यात येऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक शाखेच्या वतीनं आज जिल्हा परिषद बांधकाम विभागात आंदोलन करणार होते.

    मात्र शांततेत आंदोलन न करता कार्यालयाची तोडफोड केली.

    संबंधित बांधकाम अधिकारी आंदोलन कर्त्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याकरिता प्रयत्न

  • 02 Jun 2022 02:47 PM (IST)

    जुना पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा डेड हाऊससमोर कार जळून खाक

    लोणावळा

    -जुना पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा डेड हाऊस समोर एक डस्टर कार जळून खाक

    -सुदैवाने कुठली जीवितहानी नाही,ह्या वाहनात दोन प्रवाशी प्रवास करत होते वाहनाला आग लागली हे समजताच प्रसंगावधान दाखवत दोघे वाहनांच्या बाहेर आले

    -मागील काही दिवसात द्रुतगती मार्ग आणि जुन्या हायवेवर अनेक वाहने जळून खाक झाली आहेत

    -खंडाळा येथील आयसीआयसीआय ट्रेनिंग सेंटर समोर मागील महिन्यात लोणावळ्यातील एक डस्टर जळून खाक झाली होती. त्यापुर्वी नाझर काॅर्नर व खंडाळा बोगदा येथे ही अश्याच घटना

  • 02 Jun 2022 02:46 PM (IST)

    पुण्यात प्रयेजा सिटीजवळ डंपरला आग; अग्नि शमन दलाकडून आगीवर नियंत्रण

    वडगाव-धायरी, प्रयेजा सिटीजवळ एका डंपरला आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली असून जखमी कोणी नाही

  • 02 Jun 2022 02:28 PM (IST)

    नवी मुंबईतील एपीएमसी बाजरपेठेत जुन्नरचा आंबा दाखल

    नवी मुंबईतील apmc बाजरपेठेत जुन्नरचा आंबा दाखल

    कोकणातील आंबा संपल्याने आता बाजारात जुन्नरचा अर्थातच शिवनेरी परिसरातील आंबा दाखल

    हा आंबा प्रतिडजन 600 ते 1000 रुपये

  • 02 Jun 2022 02:15 PM (IST)

    औरंगाबाद महापालिकेचा प्रभागरचना नकाशा जाहीर

    औरंगाबाद महापालिकेचा प्रभागरचना नकाशा जाहीर

    औरंगाबाद महापालिका प्रशासनाने जाहीर केला प्रभाग रचनेचा नकाशा

    प्रभागरचना नकाशावर मागवल्या हरकती आणि सूचना

    12 लाख 28 हजार 32 मातदारांसाठी प्रभागरचना नकाशा जाहीर

  • 02 Jun 2022 02:13 PM (IST)

    रिफायनरीच्या ठिकाणी अध्यादेशापुर्वीच खोदकामाची बातमी चुकीची

    रिफायनरीच्या ठिकाणी अध्यादेशापुर्वीच खोदकामाची बातमी चुकीची

    धोपेश्वर रिफायनरीच्या प्रकल्पापुर्वी सर्वेक्षणाला सुरुवात

    सर्व्हे आँफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु

    रस्ते, जागा पाणी वीज आणि सिमा निश्चित करण्यासाठी सर्व्हेक्षण सुरु

    खोदकाम करून बांधलेले बांधकाम सर्व्हे आँफ इंडियाचे बेंच मार्क

    सर्व्हे आँफ इंडिया करणार धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाचे ड्रोन सर्व्हे

    राजवाडी पंचक्रोशीत काहीच दिवसांपुर्वी केलं गेलं होत खोदकाम

    स्थानिकांचा विरोध असताना सर्व्हक्षण केलं जाणार का?

  • 02 Jun 2022 01:42 PM (IST)

    संभाजीराजेंच्या ऑफिसकडून फेसबुक पोस्ट

    रायगडावरील 6 जूनच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी संभाजीराजेंच्या ऑफिसकडून फेसबुक पोस्ट करण्यात आली आहे.

  • 02 Jun 2022 01:16 PM (IST)

    औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू

    औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू

    बैठकीला औरंगाबाद महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी ऑनलाइन उपस्थिती

    बैठकीत औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर समन्वय समिती स्थापन करण्याची शक्यता

  • 02 Jun 2022 12:29 PM (IST)

    सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण

    सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण

    अन्य काही नेत्यांनासुद्धा कोरोनाची लागण

  • 02 Jun 2022 12:25 PM (IST)

    चार महिन्यात 346 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

    पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच आत्महत्या सत्र सुरूच

    जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 346 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

    सर्वाधिक शेतकरी आत्महत्या एकट्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात

    346 शेतकरी आत्महत्या पैकी 84 आत्महत्या पात्र, 73 अपात्र तर 189 शेतकरी आत्महत्या चौकशीसाठी प्रलंबित

    नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, कर्जबाजारीपणा उठतोय शेतकऱ्यांच्या मुळावर

    पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात 99 , यवतमाळ मध्ये 96 , अकोल्यात 43, बुलढाण्यात 62 तर वाशिम मध्ये 46 शेतकरी आत्महत्या

  • 02 Jun 2022 12:14 PM (IST)

    6 जूनला रायगडावर होणार शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा

    6 जूनला रायगडावर होणार शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा

    अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीनं जोरदार तयारी सुरू

    राज्यभरातून शिवप्रेमी यंदा रायगडावर जमणार

    छत्रपती संभाजीराजे रायगडाच्या पायथ्याला नवीन घोषणा करण्याची शक्यता

    छत्रपती संभाजीराजे 6 जूनला मौन सोडणार का ?

    किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजे कोणतीही राजकीय भूमिका मांडणार नाहीत

    पायथ्याला घोषणा करण्याची शक्यता, सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

  • 02 Jun 2022 12:01 PM (IST)

    कर्जतमधील बैलगाडा शर्यत पाहा Live

    कर्जतमधील बैलगाडा शर्यत पाहा Live

    कर्जतमध्ये महाराष्ट्र बैलगाडा स्पर्धा

    पहिलं बक्षिस 22 लाखांचे

  • 02 Jun 2022 11:38 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद

    केंद्राने 86 हजार 912 कोटी दिले

    जीएसटीचे 15 हजार 502 कोटी रुपये येणं बाकी

    रक्कम लवकर आल्यास विकासकामे होतील

    कोरोनाचे रुग्ण वाढतायेत, राज्यात काळजीचं वातावरण

    सगळ्यांना मास्क लावणं गरजेचं आहे, त्याचं पालन करावं

    निवडणुकीत ओबीसींना त्यांच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावं

    मध्य प्रदेशच्या धर्तीवर काम करू, कमिटी देखील नेमली आहे

    जीएसटीची रक्कम आताची नाही, हे समजून घ्या

    शक्य होईल तितक इंधन दरवाढ कमी केली

    नामकरणाच्या अनेक मागण्या आहे, तो आजचा मुद्दा नाही

    महंत चर्चेला बसले आणि माईक मारला, यातून काय मिळवणार आहोत, याचाही विचार सर्वांनी करावा

    भाजपचे दोन उमेदवार, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा एक-एक उमेदवार निवडूण येतील

    पाच उमेदवार क्लिअर निवडणून येतील

    त्यावेळी शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा दिला, आज आम्ही त्यांना मदत करत आहोत

    घोडेबाजाराचा प्रश्नच नाही, अपक्ष मदतान दाखवून शकत नाही

    प्रत्येकाला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे

    राज्यात काहीही असलं तरी स्थानिक परिस्थिती पहावी लागते, नाना पटोले यांचं ते वैयक्तिक मत असू शकतं

    राष्ट्रवादी वकिलांच्या मार्फत न्यायालयात जावून अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाचा अधिकार द्यावा, यासाठी प्रयत्न करणार

    सगळ्याच पक्षातील लोक तक्रार करतात

    भांड्याला भांडं लागतंच, लागलं तरी आवाज होऊ नये

    चुकीचं वक्तव्य कुणीही करू नये, भावना दुखावल्या जातील असं वागू नये, अनिल गोटेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

  • 02 Jun 2022 11:15 AM (IST)

    मोहित कंबोज माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये दाखल

    मोहित कंबोज माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये दाखल

    मोहित कंबोजी यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी

  • 02 Jun 2022 11:00 AM (IST)

    माजी आमदार अनिल गोटेंकडून वादग्रस्त वक्तव्य

    माजी आमदार अनिल गोटेंकडून वादग्रस्त वक्तव्य

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त केलं वक्तव्य

    नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

    विशेष म्हणजे वादग्रस्त वक्तव्य केलं त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार रोहित पवारांची उपस्थिती

    भाजपकडून अनिल गोटे आणि सयंजोकांचा जाहीर निषेध

  • 02 Jun 2022 10:27 AM (IST)

    आमदार गोपीचंद पडळकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

    आमदार गोपीचंद पडळकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

    अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करा

    गोपीचंद पडळकर यांची मागणी

  • 02 Jun 2022 10:20 AM (IST)

    ‘आप’कडून पुण्यात आज मेळाव्याचं आयोजन

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी मैदानात

    – आप पक्षाकडून पुण्यात आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

    – मेळाव्याला दिल्ली सरकार आपचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांची प्रमुख उपस्थिती,

    – तर प्रीती मेनन, निवडणूक प्रमुख महादेव नाईक यांचीही उपस्थिती असणार,

    – बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचे आयोजन,

    – मेळाव्याच्या माध्यमातून आप पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार

  • 02 Jun 2022 10:19 AM (IST)

    औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर आज मुख्यमंत्री घेणार बैठक

    औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर आज मुख्यमंत्री घेणार बैठक
    बैठकीला महापालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण राहणार उपस्थित
    12 वाजता सुरू होणार पाणी प्रश्नावर बैठक
    अस्तिकुमार पांडे आणि सुनील चव्हाण यांची ऑनलाइन राहणार उपस्थिती
    औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर आजच्या बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्याची शक्यता
  • 02 Jun 2022 10:15 AM (IST)

    अहमदनगरमध्ये पहिल्यांदाच भव्य बैलगाडी स्पर्धा

    अहमदनगरमध्ये पहिल्यांदाच भव्य बैलगाडी स्पर्धा

    राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी स्पर्धा

    बक्षिस 22 लाख, आमदार रोहित पवार यांच्याकडून आयोजन

  • 02 Jun 2022 09:55 AM (IST)

    शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद

    शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद

    काश्मीर पंडीत रस्त्यावर उतरले-राऊत

    पंतप्रधान आणि गृहमंत्री फक्त निवडणुकीत गुंतले

    केंद्र सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रेश दिसत नाही

    काश्मीरमध्ये अजूनही दहशतवाद सुरूच

    पळपुट्यांनी आमच्यावर दुर्बिण लावून नये

  • 02 Jun 2022 09:44 AM (IST)

    दिपाली सय्यद यांची भाजपवर टीका

    शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे.

  • 02 Jun 2022 09:41 AM (IST)

    राज्यपाल आज पुणे दौऱ्यावर

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज पुणे दौऱ्यावर

    रविवार पेठेतील एका कार्यक्रमासाठी राज्यपाल कोश्यारी पुण्यात

    राज्यपाल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

    रविवार पेठ, शिवाजी रस्त्यावरील सर्व दुकाने आणि अंतर्गत रस्ते केले बॅरिकेट लावून बंद

  • 02 Jun 2022 09:16 AM (IST)

    खारघर उलवे तसेच जेएनपीटी परिसरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे

    खारघर उलवे तसेच जेएनपीटी परिसरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे

    जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने हा पाणीपुरवठा बंद असणार आहे

    नागरिकांनी पाणी जपून वापरावा असे देखील आव्हान करण्यात येते

    3 ते 4 जूनला हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे

  • 02 Jun 2022 09:16 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील कसबेगव्हाण ग्रामपंचायत ने घेतला विधवा कृप्रथा बंदीचा ठराव…

    अमरावती जिल्ह्यातील कसबेगव्हाण ग्रामपंचायत ने घेतला विधवा कृप्रथा बंदीचा ठराव…

    कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायत चाआदर्श अमरावती जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत सभेत एकमताने ठराव मंजूर…

    विधवांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडने व पायातील जोडवी काढणे प्रथेला घालणार प्रतिबंध.

    विधवांना समाजात सन्मानाची वागणुक मिळावी म्हणुन घेतला ऐतिहासिक निर्णय.

    गावातली विधवा प्रथा बंद ठराव मंजूर केल्याने सर्व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होेत होते व या ऐतिहासिक निर्णयला समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  • 02 Jun 2022 07:58 AM (IST)

    रत्नागिरी तालुक्यातील ३० टक्के ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे बिगुल

    रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्यातील ३० टक्के ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे बिगुल

    ३३ ग्रांमपंतायतींची ६ जूनला आरक्षण सोडत

    ग्रामपंतायतींची नवीन प्रभाग रचना देखिल पुर्ण

    शिरगाव, निवळी, गावडे आंबेरे अशा मोठ्या ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत

    एकाच वेळी होणाऱ्या या निवडणुकांकडे राजकीय पक्षांचे लक्ष्य

  • 02 Jun 2022 07:58 AM (IST)

    राज्यातील 480 ग्रामपंचायत प्रभागाची आरक्षण सोडत सोमवारी होणार

    राज्यातील 480 ग्रामपंचायत प्रभागाची आरक्षण सोडत सोमवारी होणार

    मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत जाहीर केली जाणार

    आरक्षण रद्द केल्यामुळे ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा वाढणार

    सोमवारी जाहीर आरक्षण हरकती नंतर 17 जून ला अंतिम केले जाणार

    मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी ऑक्टोबर महिन्यात होताहेत निवडणुका

    पंचायत समिती, जिल्हा परिषद बरोबरच ग्रामपंचायतींच्या ही निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघणार

  • 02 Jun 2022 07:58 AM (IST)

    लोणावळ्यात गाईवरती अनैसर्गिक अत्याचार

    -लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय

    -एका गाईवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आलाय,लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 377 कलम द्वारे एका 28 वर्षीय युवकाला घेतलं ताब्यात

    -लोणावळ्यातील कुसगाव येथील घुनास्पद प्रकार..या प्रकरणी गाईच्या मालकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली होती,त्यानुसार पोलीसांनी ही कारवाई केलीय

  • 02 Jun 2022 07:38 AM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशीच नागपूरातील गंगा जमुना वेश्यावस्तीत पोलीसांची कारवाई

    – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशीच नागपूरातील गंगा जमुना वेश्यावस्तीत पोलीसांची कारवाई

    – वेश्याव्यवसाय सुरु झाला म्हणुन काही आंबटशौकीण तरुण गंगा जमुनात गेले असता कारवाई

    – गंगा जमुना वस्तीत आल्यावर तरुणांना मिळाला पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद

    – पोलीसांच्या लाठ्या मिळाल्यानंतर वेश्यावस्तीतील ग्राहक गेले पळून

    – पोलीसांच्या लाठ्यांचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

    – फुटेज व्हायरल झाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी निलंबीत – ‘स्वइच्छेने वेश्याव्यवसाय गुन्हा नाही, पोलीस कारवाई करु शकत नाही’ असा होता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

    – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरंही नागपूर गंगा जमुना वेश्यावस्तीत २४ तास पोलीस तैनात

  • 02 Jun 2022 07:38 AM (IST)

    75 तासात 75 किलोमीटर किलोमीटर रस्ता निर्मिती करण्याचा संकल्प…

    75 तासात 75 किलोमीटर किलोमीटर रस्ता निर्मिती करण्याचा संकल्प…

    सहा वर्षांपासून रखडलेल्या अमरावती-अकोला मार्गाचे काम होणार पूर्ण करण्याचा प्रयत्न…

    लोणी टाकळी ते मूर्तिजापूर पर्यत होणार काम.3 ते 7 जून पर्यत दिवस रात्र अखंड चालणार काम..

    108 तासात 75 किलोमीटरचा रस्ता होणार…या विक्रमाची गिनीज बुक मध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न…

    देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केला आहे संकल्प.

    ७२८ मनुष्यबळ दिवसरात्र काम करणार….

  • 02 Jun 2022 07:37 AM (IST)

    नव्याने सुरू झालेल्या औरंगाबाद हैदराबाद विमानाला वाटर सॅल्युट

    नव्याने सुरू झालेल्या औरंगाबाद हैदराबाद विमानाला वाटर सॅल्युट

    औरंगाबाद विमानतळावर देण्यात आला वाटर सॅल्युट

    सकाळी साडेसात वाजता औरंगाबादहुन हैदराबादसाठी सुरू करण्यात आलं आहे विमान

    हैदराबादहुन औरंगाबादेत विमान पोचल्यानंतर विमानाला देण्यात आले वाटर सॅल्युट

    औरंगाबाद हैदराबाद हा हा हवाई वाहतुकीसाठी महत्वाचा मार्ग

  • 02 Jun 2022 07:37 AM (IST)

    बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी काल रात्री पोहोचला आहे.

    बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी काल रात्री पोहोचला आहे.

    आज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांचे निवास स्थानी वर्सोवा येथील ठेवण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार दुपारी करण्यात येणार आहेत.

    बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक केके यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलीवुडचे अनेक कलाकार पोहचणार आहे..

    बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक के.के यांच्या मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

  • 02 Jun 2022 06:36 AM (IST)

    जिल्ह्यातील तरुणाईला ग्रामीण भागातच रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार

    जिल्ह्यातील तरुणाईला ग्रामीण भागातच रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार

    त्यासाठी महिला शेतकरी आणि बचत गटांच्या माध्यमातून 71 कंपन्या स्थापन केल्या जाणार

    जिल्हा परिषदेच्या गटात रोजगार देणारे उत्पादन प्रकल्प उभारले जाणार

    कंपन्या स्थापन केल्यानंतर राज्य सरकार, जिल्हा परिषदेच्या वतीने निधी आणि विविध बँकांच्या माध्यमातून सवलतीच्या व्याजदरातील कर्जरूपी भांडवल उपलब्ध करून दिले जाणार

    या कंपन्यांमधून निर्माण केलेल्या उत्पादनांना फायदेशीर बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांची माहिती

  • 02 Jun 2022 06:36 AM (IST)

    पुण्यात वाहन चालविताना धोकादायकरीत्या मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढले

    पुण्यात वाहन चालविताना धोकादायकरीत्या मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढले

    मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याऱ्यांचे परवाने निलंबित करण्याची कठोर कारवाई पुणे ‘आरटीओ’ने केली सुरू

    गेल्या दोन महिन्यांत मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्या 287 जणांचे वाहन परवाने केले निलंबित

  • 02 Jun 2022 06:35 AM (IST)

    – भंडारा एस टी विभाग आला खाजगी पेट्रोल पंप चालकाच्या दारी.

    – भंडारा एस टी विभाग आला खाजगी पेट्रोल पंप चालकाच्या दारी.

    – बल्क मध्ये कंपनीकडून डिझेल महाग पड़त असल्याने भंडारा एस टी विभाग घेत आहे खुल्या मार्केट मधून रिटेलर कडून स्वस्त डिझेल.

    – भंडारा एसटी ला 121.27 पैसे प्रति लीटर भावाने डिझेल घ्यावे लागत होते.याउलट रिलेटर कड़े हेच डिझेल 96 रुपये पर लीटर पड़त असल्याने भंडारा एस टी विभागाला प्रत्येक लीटर मागे 25 रुपये महाग पड़त होते.

    – भंडारा एस टी विभागाला दररोज 23 हजार लीटर डिझेल ची गरज आहे।त्यामुळे 23 हजार गुणीला 25 रुपये (23,000*25=5,75,00) पकडले तर दररोज 5 लाख 75 हजार रुपये ज्यादा द्यावे लागत आहे.

    – भंडारा एस टी आगाराने सेंट्रल ऑफिस ला कळवत होणारा तोटा लक्षात आणून दिला।आधीच संपामुळे एस टी बुडित असतांना ज्यादा पैसे डिझेल वर खर्च करने परवडनारे नव्हते.

    – खर्च कमी करण्यासाठी भंडारा एस टी विभागाने आता रिटेलर कडून डिझेल खरेदी सुरु केली आहे.

    – खाजगी डिझेल-पेट्रोल पंप वर एस टी बसेसच्या लागत आहे लाइन.

  • 02 Jun 2022 06:35 AM (IST)

    भारतातील पहिले साखर संग्रहालय पुण्यात उभारले जाणार

    भारतातील पहिले साखर संग्रहालय पुण्यात उभारले जाणार

    भारतातील पहिल्याच साखर संग्रहालयाच्या कामाची निविदा झाली प्रसिद्ध

    साखर आयुक्त कार्यलयाशेजारील 5 एकरांच्या जागेत हे संग्रहालय बांधण्यात येणार

    साखरेशी संबंधित वेदकाळापासूनच्या गोष्टी व साखर कारखान्याची प्रत्यक्ष प्रतिकृती, साखर या विषयावरच्या जगभरातील पुस्तकांचे संदर्भ ग्रंथालय हे या चारमजली साखर संग्रहालयाचे वैशिष्ट्य असणार

    साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती

Published On - Jun 02,2022 6:32 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.