Maharashtra News Live Update : चंद्रकांत खैरेंचं एक वक्तव्य आणि पुन्हा राज्यात शहरांच्या नामांतराची चर्चा

| Updated on: Jun 03, 2022 | 9:02 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : चंद्रकांत खैरेंचं एक वक्तव्य आणि पुन्हा राज्यात शहरांच्या नामांतराची चर्चा
मोठी बातमी

मुंबई : आज शुक्रवार 3 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे विहिरीत बुडून कर्जत तालुक्यातील ताजु येथील मेंढपाळ मायलेकींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पिंपळगाव डुकरा येथील शेतकरी अरुण शंकर भगत यांच्या शेतातीलविहीरीत आज दुपारी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पपाबाई राजेंद्र गोयकर वय 35, मोनिका राजेंद्र गोयकर 15 वर्षे ह्या दोघी मायलेकींचा बुडून मृत्यू झाला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Jun 2022 08:50 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत

    आम्हाला आमचं बळ दाखवायची संधी मिळेल

    आमचे चारही उमेदवार निवडून येतील

    विरोधकांना उमेदवार दिल्याचा पश्चाताप होईल

    संजय पवार पहिल्या फेरीत निवडून जातील

    सर्व नेते बैठकीला हजर होते संघटनात्मक चर्चा झाली

    विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर थोपली आहे

    या निवडणुकीत अजिबात घोडेबाजार होणार नाही

  • 03 Jun 2022 08:02 PM (IST)

    चंद्रपूर:– डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन

    महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे वडील

    वयाच्या 93व्या वर्षी नागपुरात घेतला अखेरचा श्वास,

    गेले वर्षभर प्रकृती होती नाजूक, नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानंतर सुरू होते उपचार,

    त्यांच्या पश्चात मुले सुधीर आणि संदीप यांच्यासह मुलगी, जामात व मोठा आप्तपरिवार,

    चंद्रपूर व विदर्भातील जुन्या पिढीतील प्रख्यात वैद्यक व्यवसायी होते डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार,

    बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी शहर-जिल्हा व विभाग स्तरावरील संघाची विविध पदे सांभाळली,

    वयाच्या उत्तरार्धात संघाशी निगडित शेकडो सेवाकार्यासाठी सतत केला प्रवास,

    त्यांच्या निधनाने संघ आणि भाजप वर्तुळावर शोककळा,

    शनिवारी संध्याकाळी चंद्रपुरात केले जाणार अंत्यसंस्कार

  • 03 Jun 2022 07:12 PM (IST)

    राज्य महिला आयोगाचे ट्विट

  • 03 Jun 2022 07:10 PM (IST)

    -मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा

    तळेगांव दभाडेत ही सभा असणार आहे

    या सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार संबोधित करणार आहेत

    विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ देखील सभेला आलेत

  • 03 Jun 2022 06:43 PM (IST)

    शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची नामकरण बाबत मोठी माहिती

    उस्मानाबादच धाराशिव व औरंगाबादच संभाजीनगर नामकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण

    कागदपत्र व संपूर्ण फाईल तयार झाली आहे एखादा दिवशी घोषणा होईल

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदेशीर बाबी सर्व पूर्ण करणार

    आम्ही औरंगाबादला 1988 पासून संभाजी नगर म्हणतो, आम्ही म्हणतो म्हणजे नामकरण झाले

    बाळासाहेब ठाकरे सभेत म्हणाले होते , कशाला हवा हा औरंग्या , त्याने मंदिरे तोडली सभाजी महाराज यांना त्रास दिला मग त्याचे नाव कशाला ?

  • 03 Jun 2022 06:43 PM (IST)

    जम्मूमधील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला जाणार

    शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – गृहमंत्री अमित शहा यांचा आदेश

    भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू पोलिसांवर जबाबदारी सोपवली जाणार, संवेदनशील भागांप्रमाणे जबाबदारी सोपवली जाणार

  • 03 Jun 2022 06:42 PM (IST)

    -पुणे – नगर महामार्गावर दुपार पासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

    – वाहनांच्या सुमारे ४ ते ५ किलोमिटर पर्यंत रांगा लागल्या

    – कोंढापुरी ते रांजणगाव या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी

    – पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना

  • 03 Jun 2022 06:41 PM (IST)

    विदर्भात वाढला उष्णतेचा पारा

    चंद्रपूर 46. 4 तर नागपुरात 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    नागपुरातील या महिन्यातील सगळ्यात जास्त तापमान

    दिवसभर नागपूरकर उकाड्याने त्रस्त

  • 03 Jun 2022 04:00 PM (IST)

    भाजप नेत्या पंकजा मुंडे Live

    संकटांनो मी तुम्हाला शरण यावं तेवढं तुमची औकात नाही

    शिवराज सिंह यांचं भाष होईपर्यंत कुणीही जाऊ नका

  • 03 Jun 2022 03:58 PM (IST)

    भाजप नेत्या पंकजा मुंडे Live

    मला उद्याची काळजी नाही

    दिलेल्या संधीचं सोनं करणं हे मला जमतं

    माझा पराभवही मला अनेक ठिाकणी घेऊन गेला

    आत्ता जे सरकारमध्ये चाललंय त्यावरून वाईट वाटतं

    उडून गेलेले रंग पुन्हा भरू, पुन्हा एकदा कष्टानं मिळवू

    राज्यातला एक एक माणूस मुंडे सैनिक म्हणून कामाला लागला पाहिजे

    गोपीनाथ मुंडे हेही सत्यासाठी लढले

  • 03 Jun 2022 03:54 PM (IST)

    भाजप नेत्या पंकजा मुंडे Live

    आम्हाला हिंदू-मुस्लिम वाद मिटवायचा आहे

    समाजासाठी चांगलंं काम करणारे लोक आज आपल्यासोबत आहेत

    अधर्म करून तुम्ही चांगलं काम करु शकणार नाही

    मला पैसे खाऊ घालणारे लोक सोबत घ्यायला नाही जमलं

    महाराष्ट्र सरकारने शिवराज सिंह चव्हाण यांचं अनुकरण करावं

    त्यांनी ओबीसींचं आरक्षण दिलं तसं राज्यातही ओबीसींचं आरक्षण द्यावं

  • 03 Jun 2022 03:52 PM (IST)

    भाजप नेत्या पंकजा मुंडे Live

    मुंडे साहेबांचं अचानक जाणं आमच्यासाठी मोठा धक्का होता

    मध्ये प्रदेशची प्रभारी मी राहू किंवा न राहू मात्र आपलं आपुलकीचं नातं कायम राहिल

    आजचा दिवस आमच्यासाठी चांगला नाही

    ३ जून हा दिवस काळा दिवस म्हणून उगवला

    रामायण सांगतो आणि महाभारत कर्म सांगतं

    धर्म म्हणजे हिंदू-मुस्लिम नाही

    तर माणूसकी आहे, म्हणूनच आम्ही शब्बीर भाईंचा सत्कार केला

    त्यांनी गो पालनाचं काम केलं आहे, त्यांना पुरस्कार मिळाला आहे

  • 03 Jun 2022 03:49 PM (IST)

    भाजप नेत्या पंकजा मुंडे Live

    गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांची समाधी

    हे स्थळ लोकांना प्रेरणा देते

    शिवराज सिंह यांच्या येण्याने दुधात साखर पडली

    तुम्ही मध्य प्रदेशात अत्यंत चांगलं काम केलं

    तुमच्या योजनांपासून प्रेरणा घेऊन आम्ही योजना सुरू केल्या

    माझे वडील आज माझ्यासोबत नाहीत

    मात्र तुमच्यासारख्या नेत्यांमुळे मला वडिलांचा सहवास जाणवतो

    मोदींच्या सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली

  • 03 Jun 2022 02:05 PM (IST)

    लोकायुक्त कायद्याचा मसुदा आज तीन वर्षांनी तयार झाला याचं समाधान आहे – अण्णा हजारे

    लोकायुक्त कायद्याचा मसुदा आज तीन वर्षांनी तयार झाला याच समाधान आहे

    लोकपाल लागू झाल्यावर एक वर्षात लोकायुक्त कायदा करायचा असा नियम होता

    खूप चांगला मसुदा तयार झालाय, मी समाधानी आहे

    हा मसुदा तयार व्हायला खूप उशीर झाला तरी विधानसभेत लवकरच याच कायद्यात रूपांतर होईल ही अपेक्षा आहे

    मी 85 वर्षाच्या वयात महागाई विरोधात आंदोलन उभं करायचं का? तरुणांनी आंदोलन उभं केलं पाहिजे

    केवळ राज्यात नाही तर देशात महागाई वाढली आहे

    एवढी महागाई आत्तापर्यंत वाढली नव्हती

  • 03 Jun 2022 02:04 PM (IST)

    खासदार नवनीत राणांविरोधात काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखडे निवडणूक लढवणार..?

    खासदार नवनीत राणांविरोधात काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखडे निवडणूक लढवणार..?

    मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला बळवंत वानखडे यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख….

    आमदार बळवंत वानखडे यांच जात प्रमाणपत्र खर आहे..खोटं नाही..

    मंत्री यशोमती ठाकूर यांचा खासदार नवनीत राणा यांना नाव न घेता टोला.

    अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघाचे आमदार आहेत बळवंत वानखडे….

  • 03 Jun 2022 01:36 PM (IST)

    जेव्हा पासून नाना पटोले प्रदेश अध्यक्ष झाले तेव्हापासून काँग्रेसमध्ये उमंग वाढली आहे

    जेव्हा पासून नाना पटोले प्रदेश अध्यक्ष झाले तेव्हापासून काँग्रेसमध्ये उमंग वाढली आहे..

    अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहे.

    भावी खासदार बळवंत वानखडे हे आहे. भावी बळवंत भाऊ खरा बोलणारा माणूस आहे.

    त्यांच सर्टिफिकेट खर आहे खोट नाही(नवनीत राणा यांना टोला)

    जे आहे ते तोंडावर बोलतो(बळवंत वानखडे) तिथं म्हटलं तिथं बोलतो

    असा माणूस खासदार करायला काही हरकत आहे का?

  • 03 Jun 2022 12:56 PM (IST)

    कोव्हिडं काळात ऑनलाईन अभ्यास करावा लागला

    पृथ्वीराज चव्हाण – कोव्हिडं काळात ऑनलाईन अभ्यास करावा लागला – अपरिहार्य होत – दोन पिढ्या पुढच्या वर्गात ढकलल्या गेल्या – मात्र नोकरी च्या वेळेस देखील या बॅच कडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जाणार हे पण नक्की – रिझर्ववेशन पेक्षा शोषित वंचित वर्गाला वर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – चांगलं डिझाइन झालं पाहिजे

  • 03 Jun 2022 12:55 PM (IST)

    नागपुरात अगरबत्ती कारखान्याला लागली आग

    नागपुरात अगरबत्ती कारखान्याला लागली आग

    अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

    यशोधरा नगर परिसरातील घटना

  • 03 Jun 2022 12:42 PM (IST)

    आज गंडावर वंचितांची जत्रा समजून घ्या – पंकजा मुंडे

    संधी मिळाली तरं त्याचं सोन करेन

    साहेबांनी लोकांचं प्रेम मिळवलं

    माझं नाव चर्चेत आल्यास नवल नाही

    विधान परिषदेसाठी दावा केलेला नाही

    आज गंडावर वंचितांची जत्रा समजून घ्या

    विधान परिषदेच्या जागे संदर्भात पंकजा मुंडेंचं सुचक वक्तव्य

  • 03 Jun 2022 12:26 PM (IST)

    देशातले उद्योग आज बाहेर चाललेत

    – देशातले उद्योग आज बाहेर चाललेत – त्याच कारण देशात असहिष्णुतेचे वातावरण – देशात भीतीचे वातावरण – धार्मिक ध्रुवीकरणा मुळे अशांतता – कोणी काय घालायचं हे देखील धर्मावर ठरेल असे चित्र – निवडणून आलेली एकाधिकारशाही अस देशाचं जगात वर्णन केलं जातं आहे – आपल्या देशात सेमी कंडक्टर तयार करणाऱ्या कंपन्या नाहीत – 20 हजार कोटींची सबसिडी द्यायला देख तयार – पण we have missed the bus – धोरणात्मक चूक झाली त्याचा हा फटका – उद्याच्या जगात आपल्या देशातल्या लोकांना अन्न धान्य मिळेल की नाही, रोजगार मिळेल की नाही याचा विचार करण्याची गरज

  • 03 Jun 2022 12:26 PM (IST)

    भाजपाला तीन जागा मिळाव्यात – चंद्रकांत पाटील

    आम्ही त्यांना असं म्हटलं आहे की,

    भाजपाला तीन जागा मिळाव्यात

    ११ ते १२ मत आम्हाला कमी पडतं आहेत

    मागच्या वेळेला तीन जागा होत्या

    आपआपसात विचार करतो म्हणून निघून गेले आहेत

    त्यांनी जर हा प्रस्ताव मान्य केला नाही.

    ही निवडणूक होणार

    आम्ही कोणत्याही पाचव्या उमेदवाराला मतदान देणार नाही

  • 03 Jun 2022 11:14 AM (IST)

    संघर्षाचा आवाज आजही माझ्या कानात गुमतोय – धनंजय मुंडे

    संघर्षाचा आवाज आजही माझ्या कानात गुमतोय

    मी त्यांच्यासोबत राहिल्यानंतर त्यांचं स्वप्न पुर्ण करण्याचं काम करतोय

    कामगारांसाठी तयार केलेलं महामंडळं पिढ्यानंपिढ्या चालावं

    महाविकास आघाडीच्या माध्यामातून मी प्रयत्न केला

    त्यांच्यासोबत अनेकवर्षे राहिल्यानंतर त्यांची स्वप्न मला माहित आहेत

    मागच्या सहा-पाच वर्षात ज्या घटना घडल्या, त्या घडल्या नसत्या

    एखादं व्यक्तीमत्त्व निघून गेल्यानंतर तिथं येऊन नत

    जीवनातली पहिली निवडणूक त्यांनी ज्या पध्दतीने लढवली ती सुद्धा माझ्या चांगली लक्षात आहे

  • 03 Jun 2022 11:06 AM (IST)

    राहुल गांधींना ईडी समोर हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स, 10 जूनला परदेशातून भारतात परतण्याची शक्यता

    राहुल गांधींना पुन्हा समन्स

    ईडी समोर हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स

    सध्या राहुल गांधी भारताबाहेर

    13 किंवा 14 जुनला राहुूल गांधी हजर होण्याची शक्यता सुत्रांची माहिती

    10 जूनला राहुल गांधी भारतात परतण्याची शक्यता

  • 03 Jun 2022 10:36 AM (IST)

    प्रवीण मसाल्याचे संस्थापक हुकमीचंद चोरडीया यांच पुण्यात निधन

    प्रवीण मसाल्याचे संस्थापक हुकमीचंद चोरडीया यांच पुण्यात निधन

    वयाच्या 92 व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

    प्रवीण मसाले उद्योग समुहाची केली होती स्थापना

    वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास

    चोरडीयांच्या जाण्यानं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त

  • 03 Jun 2022 10:31 AM (IST)

    चेंबूर इथे राज ठाकरे यांची पत्रक घरो घरी वाटणाऱ्या मनसे कार्यकर्त्याना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    चेंबूर इथे राज ठाकरे यांची पत्रक घरो घरी वाटणाऱ्या मनसे कार्यकर्त्याना पोलिसांनी घेतलं ताब्यात…

    आर सी एफ पोलीस स्थानकात ८ मनसे कार्यकर्त्याना बसवून ठेवण्यात आले आहे..

    विना परवाना पत्रक वाटत असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती…

    मनसे कार्यकर्त्यांनी या घटनेचा केलाय निषेध…

  • 03 Jun 2022 10:30 AM (IST)

    आदीचं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण गढूळ झालं आहे – संजय राऊत

    आदीचं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण गढूळ झालं आहे

    राजकारणात पैसा कुठून येतो

    आमदार खरेदी करण्यासाठी

    आकड्याचा विचार करणं गरजेचं आहे

    त्यातून काही चांगला मार्ग निघणार असेल

    राज्यसभेची ६ वी जागा बिनविरोध व्हायला हवी

    मला वाटतं राज्यसाठी योग्य नाही

  • 03 Jun 2022 10:26 AM (IST)

    कष्टाच्या जीवनाला न्याय मिळाला पाहिजे – पंकजा मुंडे

    गोपीनाथ मुंडे यांची जयंती

    माझं भाषण समोरच्या लोकांना व्यवस्थित कळतं

    परळीतून भाजप नेत्या लाईव्ह

    पक्ष निर्णय घेईल, फार काही लांब नाही

    मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री इथ येत आहेत

    गोपीनाथ मुंडेचा आठवा स्मृतीदिन

    निश्चित सकारात्मक विचारात आम्ही आहोत

    कष्टाच्या जीवनाला न्याय मिळाला पाहिजे

    मी कुठल्याही संधीची अपेक्षा करणार नाही

    जिथं संधी मिळाली तिथं सोन करून दाखवणार

  • 03 Jun 2022 10:16 AM (IST)

    छत्रपती संभाजीराजे उद्या पुणे दौऱ्यावर

    छत्रपती संभाजीराजे उद्या पुणे दौऱ्यावर

    6 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीसाठी करणार समन्वयकांशी चर्चा

    पुण्यातील बैठकीत घेतला जाणार आढावा

    रायगडाच्या पायथ्याला छत्रपती संभाजीराजे नवीन घोषणा करण्याची शक्यता

    लवकरच स्वराज्य संघटनास मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार

    6 जूनला घोषणा करण्याची शक्यता

    सूत्रांची टीव्ही 9 ला.माहिती

  • 03 Jun 2022 10:11 AM (IST)

    डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची परीक्षा अखेर लांबणीवर..

    डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची परीक्षा अखेर लांबणीवर..

    चार जून रोजी होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमच्या पदवी परीक्षा ढकलल्या पुढे..

    केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 पाच तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे..

    केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी औरंगाबाद शहरातील महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून आले देण्यात..

    जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुलगुरू यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे दिले आदेश..

    औरंगाबाद येथे परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती कायम..

  • 03 Jun 2022 10:06 AM (IST)

    मशिदींवरच्या आवाजावरती मर्यादा आली आहे – गजानन काळे

    ९० टक्के मशिदींवरती भोंगे खाली उतरले गेले

    मशिदींवरच्या आवाजावरती मर्यादा आली आहे

    आज आम्ही राज ठाकरेंचं पत्र घरोघरी जाऊन देत आहोत

    १०० नंबरवरती लोकांनी तक्रार दाखल करावी

    दोन वर्षात कोरोनाने अधिक डोके

  • 03 Jun 2022 08:39 AM (IST)

    सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजप मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढवणार

    – सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजप मुस्लिम उमेदवारांची संख्या वाढवणार

    – मागील वेळच्या तुलनेत यंदाच्या वर्षी उमेदवार संख्या वाढविणार असल्याची माहिती

    – याबाबत आज भाजपच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक सोलापुरात होणार आहे

    – मागील निवडणुकीत 4 जणांना उमेदवारी दिली होती यंदाच्या वेळी त्यात वाढ करणार

    – भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची माहिती

    – 1985 आणि 1992 चा अपवाद वगळता सोलापूर महापालिकेत भाजपचा अद्याप एकही मुस्लिम नगरसेवक नाही

  • 03 Jun 2022 08:39 AM (IST)

    1 जुलैपासून ठाण्यात ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’बाबत कडक मोहिम राबविण्याचे

    1 जुलैपासून ठाण्यात ‘सिंगल यूज प्लॅस्टिक’बाबत कडक मोहिम राबविण्याचे

    महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे निर्देश

    प्लॅस्टिकचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  राज्यशासनाच्या माध्यमातून प्लॅस्टिकबंदीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून सर्व शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2022 पासून राज्यात कोणतीच प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरता येणार नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणारे ग्लास, चमचे, वेगवेगळ्या वस्तूंचे वेष्टन प्लॅस्टिकचे वापरता येणार नाही, 1 जुलैपासून या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे सिटी टास्क फोर्सच्या बैठकीत ठाणे महानगरपालिकेला देण्यात आले.

  • 03 Jun 2022 08:16 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विराट जाहीर सभेच्या पत्रकांचे वाटप सुरू

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विराट जाहीर सभेच्या पत्रकांचे वाटप सुरू..

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला नागरिकांनी यावे यासाठी स्वता आमदार आंबदास दानवे वाटप करताहेत पत्रके..

    उद्यान, मंदिरे, मैदाने याठिकाणी असणाऱ्या नागरिकांना सभेला येण्याची केली विनंती..

    भल्या पहाटे व्यायामासाठी येणार्‍या नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन दिले निमंत्रण..

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रतिसाद मिळावा यासाठी शिवसेनेचा प्रत्येक नागरिकांपर्यंत पत्रक पोहचवण्याचा प्रयत्न..

  • 03 Jun 2022 08:16 AM (IST)

    नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या टक्केवारीची माहिती संकलित करा

    नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या टक्केवारीची माहिती संकलित करा

    मनपा आयुक्तांचे सर्व झोनच्या सहा.आयुक्तांना निर्देश

    नागरिकांचा मागास प्रवर्गाची टक्केवारी निश्चित करण्यासाठी समर्पित आयोग गठित करण्यात आले आहे.

    या आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या टक्केवारीची माहिती विहीत कालावधीत संकलित करुन त्याचा अहवाल लवकरात-लवकर सादर करा,

    असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सर्व सहा.आयुक्तांना दिले.

    नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या टक्केवारीची माहिती संकलित करण्याबाबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या पत्राचे अनुषंगाने

    मनपा आयुक्तांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांची बैठक घेतली.

  • 03 Jun 2022 08:16 AM (IST)

    पुणतांबा धरणे आंदोलनाचा आजचा 3 रा दिवस

    पुणतांबा धरणे आंदोलनाचा आजचा 3 रा दिवस… मोफत दूध वाटप तसेच शिल्लक उसाची होळी करत शेतकरी करणार सरकारचा निषेध… या शिवाय पथनाट्यातून कृषीकन्या मांडणार शेतकरी व्यथा… महसुलमंत्री बाबासाहेब थोरात आणि कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल घेतली होती आंदोलकांची भेट…. तोडगा न निघाल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम…. आज कृषीमंत्री दादासाहेब भुसे येणार असल्याची आयोजकांची माहिती..

  • 03 Jun 2022 08:13 AM (IST)

    चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार अपघात, एकाचा मृत्यू

    देवळा तालुक्यातील वासोळ – महालपाटणे रस्त्यावरील वासोळच्या महाले वस्तीवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या कांद्याच्या चाळीवर आदळून झालेल्या भीषण अपघातात चीमन अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण फरार आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून गाडी नेमकी कोण चालवत होते. समजू शकले नाही. पोलीस फरार व्यक्तीचा शोध घेत आहे.

  • 03 Jun 2022 08:11 AM (IST)

    वादळी वाऱ्याने लोंबकळनाऱ्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दुभती म्हैस गतप्राण

    वादळी वाऱ्याने लोंबकळनाऱ्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दुभती म्हैस गतप्राण झाल्याची घटना नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हानेगावात झालीय. लोंबकळलेल्या विद्युत तारां बाबत ग्रामस्थानी महावितरण कार्यालयाला कल्पना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्या नंतर म्हैसीचा हा अपघाती मृत्यू झाल्याने हानेगांव इथल्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. म्हैसीच्या दुधाची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यानी केलीय. यावेळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते.

  • 03 Jun 2022 07:47 AM (IST)

    नवी मुंबईत 300 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची माहिती

    नवी मुंबईत आठवड्या भरात 300 रुग्णांची वाढ

    महापालिका रुग्ण वाढी संदर्भात सज्ज

    रोज चार हजारांपेक्षा जास्त चाचण्या

    जून महिन्यापासून नवी मुंबईत तीनशे पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण

    तर बुधवारी 76 तर गुरुवारी 58 रुग्ण सापडले.

    गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण सापडल्याने पालिका सतर्क.

    गेल्या आठवडा भरात 28 हजार 227 चाचण्या .

    रुग्ण वाढत असल्याने पालिकेचा चाचण्यांवर भर.

    रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

    रुग्ण संख्येवर पालिका लक्ष ठेवून.

    अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची माहिती

  • 03 Jun 2022 07:44 AM (IST)

    वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटर वरील रुग्णाचा मृत्यू

    वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटर वरील रुग्णाचा मृत्यू

    कोल्हापुरातील उचगाव मधील धक्कादायक घटना

    आमेश काळे अस मृत रुग्णांच

    महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा भरपावसात सीपीआर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या

    वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या श्‍वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात

    फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या आमेश वर गेल्या वर्षभरापासून सुरू होते घरीच व्हेंटिलेटरवर उपचार

    वीजबिल थकीत असल्याने 30 मे ला आमिश च्या घरचा वीजपुरवठा महावितरणने केला होता खंडित

    गेल्या दोन दिवसापासून शेजार्‍यांकडे वीज घेऊन सुरु होत व्हेंटिलेटर

    मात्र बुधवारी सायंकाळी सर्वच वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटर बंद होऊन झाला आमिश चा मृत्यू

  • 03 Jun 2022 07:38 AM (IST)

    नाशिक – 15 दिवसात ट्रिपल टेस्ट साठी लागणार इंपेरिकल डेटा अपलोड करा

    नाशिक – 15 दिवसात ट्रिपल टेस्ट साठी लागणार इंपेरिकल डेटा अपलोड करा

    विभागीय आयुक्तांचे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

    मध्यप्रदेश प्रमाणे राज्य शासनाकडून इंपेरिकल डेटा ची जुळवाजुळव सुरू

    महापालिका निवडणुकांपूर्वी प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न सुरू

    ट्रिपल टेस्ट पूर्ण न केल्याने आरक्षण गेल्याचा विरोधकांचा होता आरोप

    तर केंद्राने मदत केली नाही असा मविआ चा होता आरोप

  • 03 Jun 2022 07:37 AM (IST)

    इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे ई-वेस्ट हे आजच्या वैज्ञानिकांपुढील प्लास्टिक इतकेच मोठे आव्हान आहे

    इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे ई-वेस्ट हे आजच्या वैज्ञानिकांपुढील प्लास्टिक इतकेच मोठे आव्हान आहे.

    ई-वेस्टचे नेमके काय करावयाचे, याबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहेत.

    काही ठिकाणी या ई-कचऱ्याचा पूनर्वापर केला जातो. मात्र, त्यासाठी त्यातील धातू काढावे लागतात.

    ही किचकट आणि महागडी प्रक्रिया आहे.

    मात्र, ती कमी खर्चात करता येणे शक्य असून आता मध्य भारतातील पहिलेवहिले ई-कचरा व्यवस्थापन केंद्र राष्ट्रीय अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (नीरी) उ‌भारले जाणार आहे.

    तसा प्रस्ताव नीरीने आपली मुख्य संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडे (सीएसआयआर) पाठविला आहे.

  • 03 Jun 2022 07:37 AM (IST)

    तातडीने कोरोना चाचण्या वाढवण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

    नाशिक – तातडीने कोरोना चाचण्या वाढवण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

    मुंबई पुण्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने नाशिककरांनी देखील दक्षता घेण्याच्या सूचना

    संशयित रुग्णांना शोधून तातडीने उपचाराचे आदेश

    शहरात दररोज 200 चाचण्या सुरू

    मात्र मुंबई प्रमाणे रुग्ण हळूहळू वाढण्याचा धोका

    रुग्णालयांना पुन्हा एकदा सज्ज राहण्याच्या आयुक्त रमेश पवार यांच्या सूचना

  • 03 Jun 2022 07:13 AM (IST)

    मालेगावच्या वसतिगृह आणि नर्सिंग कॉलेजमध्ये आजही विषारी सापांची दहशत.

    मालेगावच्या वसतिगृह आणि नर्सिंग कॉलेजमध्ये आजही विषारी सापांची दहशत..

    इमारतीच्या आजूबाजूला कंपाउंड उभारून सर्व सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी…

  • 03 Jun 2022 06:31 AM (IST)

    आज आणि उद्या दोन दिवस अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद….

    आज आणि उद्या दोन दिवस अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद….

    अमरावती जवळील रहाटगाव जवळ अप्पर वर्धा धरणातून येणारी मुख्यपाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा राहणार बंद…

    महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करणार पाईपलाईन दुरुस्तीचे काम…

    वारंवार पाईप लाईन फुटून पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरीक त्रस्त…

    पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया;वृंदावन अपारमेंट जवळ साचला तलाव…

  • 03 Jun 2022 06:30 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही

    पुणे जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही

    पुणे जिल्ह्यातील 43 टक्के पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली

    तर उर्वरित 57 टक्के शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही

    लाभार्थ्यांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ

    पुणे जिल्ह्यातील चार लाख 97 हजार 937 लाभार्थ्यांना सुमारे 711 कोटी रुपये जमा करण्यात आलेत

  • 03 Jun 2022 06:30 AM (IST)

    आज अमरावतीच्या कौंडण्यपूरातील माता रुक्मिणीची पालखी सासरी पंढरपूर साठी ठेवणार प्रस्थान

    आज अमरावतीच्या कौंडण्यपूरातील माता रुक्मिणीची पालखी सासरी पंढरपूर साठी ठेवणार प्रस्थान.

    यंदा माता रुक्मिणीच्या पालखीचे 428 वे वर्ष..

    कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच आषाढीला पायी दिंडी पंढरपूरला जाणार.

    विदर्भाची पंढरी कौंडण्यपुर हे आहे रुक्मिणीचे माहेर घर…४० दिवस पालखीचा प्रवास ८०० किलोमीटर पायी जाणार दिंडी.

    कोरोना काळात मानाच्या दहा पालख्यांमध्ये मिळाला होता रुक्मिणीच्या पालखीला मान…..

    दुपारी चार वाजता होणार पालखी पंढरपूर कडे रवाना…..

  • 03 Jun 2022 06:29 AM (IST)

    राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येणार

    राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये मृग बहारातील आठ फळपिकांसाठी हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येणार

    संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ आणि द्राक्ष या आठ पिकांचा त्यात समावेश

    ही योजना हवामान धोक्याच्या निकषानुसार आणि उत्पादनक्षम फळबागांनाच लागू राहणार असल्याची कृषी विभागाची माहिती

    पुणे जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड शासनाने निश्चित केली

    या योजनेत नमूद केलेल्या फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात

Published On - Jun 03,2022 6:26 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.