Maharashtra News Live Update : भाजपानं विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवावी, आताचं सरकार हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं- शिवसेना नेते संजय राऊत

| Updated on: Jun 04, 2022 | 9:16 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : भाजपानं विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवावी, आताचं सरकार हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं- शिवसेना नेते संजय राऊत
मोठी बातमी

मुंबई : आज शनिवार 4 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. नालासोपाऱ्यात गर्दुल्या टोळीची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाला अडवून, या गर्दुल्याच्या टोळीने लाता बुक्याने आणि हातात पडेल त्याने बेदम मारहाण केली आहे. हा मारहाणीचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही मारहाण हे टोळकं का करतंय हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jun 2022 08:59 PM (IST)

    शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवणारःमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ अपक्ष आमदारांची बैठकही बोलावली

    शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवणार

    शिवसेनेच्या सर्व आमदारांना सोमवारी सायंकाळी ‘वर्षा’वर बोलवले

    तिथून सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी हलवणार

    सोमवारी सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ अपक्ष आमदारांची बैठकही बोलावली आहे.

    शिवसेना आमदारांसोबत अपक्ष आमदारांनाही सुरक्षित स्थळी हलवण्याची शक्यता

    राज्यसभा निवडणुकीय मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेना नेते सावध

    भाजपच्या सातव्या उमेदवारामुळे निवडणुकीत चुरस

    10 जूनला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान

    निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला

  • 04 Jun 2022 08:51 PM (IST)

    आज कोल्हापुरात पुतळ्यांचे नाही तर विचारांचे अनावरण झाले आहे; नाना पाटेकर

    आज कोल्हापुरात पुतळ्यांचे नाही तर विचारांचे अनावरण झाले आहे

    माणसं गोळा करण्यावर टॅक्स असता तर मुश्रीफ हायेस्ट टॅक्स भरणारे असते

    आता मुश्रीफ जरा तुम्ही सिनेमात काम करा मी तुमच्या कागलमधून निवडणूक लढतो

    तुम्ही सांगितला की मी आरामात निवडून येऊ शकतो

    सगळे पुतळे आपल्या मनात असायला पाहिजे

    नुसते पुतळे उभा करून काय होणार

    मुश्रीफ इतके गोंडस आहेत की मर्फीच्या जाहिरातीमधील मुलगा हा मुश्रीफच होते

    पुढच्यावेळी सुद्धा मुश्रीफ साहेब निवडणुकीसाठी उभा राहिले की प्रचाराची गरज नाही

    आज अशोक सराफ यांचा 75 वा वाढदिवस आहे आज खरं तर मी आज तिथं असायला पाहिजे होतो

    पडत्या काळात अशोक सराफ यांनी मला खूप जपलं आहे

    अशोक सराफ यांना 250 रुपये मिळायचे आणि मला 50 रुपये मिळायचे

    इतके लोक बघितल्यावर बोलण्याऐवजी नाटक करावं असं वाटतं

  • 04 Jun 2022 07:41 PM (IST)

    मी दिलेली जबाबदारी आतापर्यंत पार पाडत आलोयः रोहित पवारांची प्रतिक्रिया

    मी दिलेली जबाबदारी आतापर्यंत पार पाडत आलोय

    भविष्यात आणखी मोठी जबाबदारी मिळाली तर आता जे काम करतोय त्याला आणखी बळ मिळेल

    मी चांगल काम करणार

    रोहित पवारांची प्रतिक्रिया

    आमदार रोहित पवारांची गोपीचंद पडळकरांवर टीका

    भाजपच्या मोठ्या नेत्यांनी यांना आवरलं पाहिजे

    आपण काय आहोत मोठ्या नेत्यांवर बोलताना याचा विचार केला पाहिजे

    यांच कर्तुत्व काय ? सांगली पोलीस स्टेशनमध्ये किती केसेस आहेत ते बघा

    त्यांना अराजकीय कार्यक्रम घेता आला असता मात्र त्यांनी फक्त राजकारण केलं

    घरातला शेंबडा पोरगा असेल तर मोठी माणसं सांगतात तसं यांना मोठ्या नेत्यांनी सांगितले पाहिजे

    प्रवीण दरेकरांनाही इशारा तुम्ही पवारांचा नाद करू नका

    आमचं सगळं ठरलेलं असतं टप्प्यात असल्याशिवाय आम्ही कार्यक्रम करतचं नाही

    प्रवीण दरेकर मोठे नेते आहेत ते लोकांमध्ये जात नसतील मी लोकांची भावना बोलून दाखवली

    रोहित पवारांची कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया

  • 04 Jun 2022 07:33 PM (IST)

    भाजप आमदार गणेश नाईक नवी मुंबईतील जनतेची दिशाभूल करत आहेत;एम.के.मढवी

    भाजप आमदार गणेश नाईक नवी मुंबईतील जनतेची दिशाभूल करत आहेत – शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के.मढवी

  • 04 Jun 2022 07:23 PM (IST)

    कासेगाव-पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कासेगाव जवळ आज कार व कंटनेरचा भीषण अपघात

    सांगली: कासेगाव-पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कासेगाव जवळ आज कार व कंटनेरचा भीषण अपघात

    या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

    पुण्याहून सांगलीकडे निघालेल्या मार्गावर ही दुर्घटना घडली

    गाडीचा पूर्णपणे चक्काचूर

  • 04 Jun 2022 07:05 PM (IST)

    अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन मारहाण केल्याप्रकरणी एकास 20 वर्षे कारावास, 7 हजार दंड

    उस्मानाबाद

    13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व मारहाण केल्या प्रकरणी एका आरोपीस 20 वर्ष कारावासाची व 7 हजार दंडाची शिक्षा

    तुळजापूर तालुक्यातील 2018 सालची घटना , आरोपी विलास गलांडे ( पुळकोटी ता माण जिल्हा सातारा ) याला शिक्षा

    मुलगी नैसर्गिक विधीसाठी गेली असता उसाच्या शेतात बलात्कार केला व मारहाण करून पळ काढला

    उस्मानाबाद येथील विशेष न्यायाधीश सचिन जगताप यांनी ठोठवली शिक्षा

    घटनास्थळी बलात्कार करून आरोपी ड्रायवरने पळ काढला , 16 साक्षीदार कोर्टात तपासले

    कलम 376(3) व बाल लैंगिक अत्याचार कलम 4 नुसार दोषी ठरवत दिली 20 वर्षाची शिक्षा

    विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी मांडली कोर्टात बाजू

  • 04 Jun 2022 07:01 PM (IST)

    सरकारला पर्याय देण्यासाठी शरद पवार देऊ शकतातः संजय पवार

    मी एवढंच सांगतो 1967 साली गेलो आणि आमदाराचं नामदार व्हायला 5 वर्ष थांबावे लागलं

    आम्ही तर कायम त्याचं भूमिकेत आहोत महाराष्ट्रानं देशाला पर्यिय द्यावा

    सरकारला पर्याय देण्यासाठी शरद पवार देऊ शकतात,

  • 04 Jun 2022 06:59 PM (IST)

    छदिल्ली लंडनचे जाऊद्या हो आपल्या सोलापूरचे बघूःपालकमंत्री भरणे यांचा खुलासा

    मी सोलापूरचा पालकमंत्री आहे. मला जुने काही माहिती नाही

    – मात्र सोलापूरला चार दिवसाला पाणी मिळते याचे वाईट वाटते

    – सोलापूर शहरासाठीच्या पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगावे

    – इंदापूरची योजना ही जुनी योजना आहे. त्यांचा काहीही दोष नाही.

    – मंगळवेढा, बार्शीची योजना असू द्या त्यासाठी सुप्रमा देण्याचे काम आम्ही करतोय.

    – लोक दुधखुळी राहिलेली नाहीत. ही पाणी योजना जुनी आहे.

    – सोलापूर शहराला यापुर्वीच पाणी दिले असते तर ही वेळ आली नसती. – पुढील महिन्यात त्या योजनेचा नारळ फोडण्यासाठी मी नक्की बोलवणार

    – पालकमंत्री भरणे यांचा खुलासा

    मुख्यमंत्री जाऊद्या मरुद्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण

    – मुख्यमंत्र्यांचे जाऊद्या मरुद्या… असे बोलण्याचा अर्थ वेगळा होता. पण लगेच ब्रेकिंग न्यूज

    – मी पाहुणा आहे मला समजून घ्या. असा पाहुणा परत मिळणार नाही.

    – दिल्ली लंडनचे जाऊद्या हो आपल्या सोलापूरचे बघू….

  • 04 Jun 2022 06:52 PM (IST)

    संदीप देशपांडे आणि माजी अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख नगरसेवक संतोष धुरी यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन

    मनसे नेते संदिप देशपांडे आणि माजी अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख नगरसेवक संतोष धुरी यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

    साईबाबा संस्थानच्यावतीने विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी देशपांडे यांचा सत्कार केला.

    अनेक दिवसांपासून दर्शनाला येण्याची ईच्छा होती मात्र मध्यंतरीच्या घटनांमुळे येता आले नसल्याची प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्याने मनशांती लाभली

    सध्या गाजत असलेल्या भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक असल्याने या विषयाकडे त्याच दृष्टिने पाहावे असे देशपांडे यांनी सांगितले.

  • 04 Jun 2022 06:42 PM (IST)

    पाणी आले म्हणजे ऊस आलाच आणि ऊस आला म्हणजे वेळेत पैसे देणे आलेचःभाजप आमदार सुभाष देशमुखांना राजू शेट्टींचा चिमटा

    पाणी आले म्हणजे ऊस आलाच आणि ऊस आला म्हणजे वेळेत पैसे देणे आलेच.

    – भाजप आमदार सुभाष देशमुखांना राजू शेट्टींच चिमटा

    – जेवणावळी कोणी असले तरी वाडपी असला पाहिजे.

    – मात्र सोलापूरमध्ये काय झाले की, जेवणावळी आणि वाडपी एकच असल्याने सोलापूरची पंचायत झालीय.

  • 04 Jun 2022 06:37 PM (IST)

    बाब कल्याणी यांनी आत्मनिर्भर भारत हे काही दशकापूर्वीच सुरू केला डॉ. रघुनाथ माशेलकर

    -कोविड मुळे दोन वर्षे कार्यक्रम करता आलं नाही आज सभागृह गच्च भरले पाहून बर वाटत आहे

    -बाब कल्याणी यांनी आत्मनिर्भर भारत हे काही दशकापूर्वीच सुरू केला

  • 04 Jun 2022 06:35 PM (IST)

    ज्यामध्ये दाखवलंय पंडीतांची हत्या होत होती तेव्हा भाजपचं सरकार होतं; शरद पवार

    ज्यामध्ये दाखवलंय पंडीतांची हत्या होत होती तेव्हा भाजपचं सरकार होतं

    आजही केंद्रात भाजपचं सरकार आहे

    लोकांची मतं घेण्याचा प्रयत्न केला जातो

  • 04 Jun 2022 06:32 PM (IST)

    ईडीच्या कारवाईला 2024 ला उत्तर देऊः संजय राऊत

    ईडीकडून फक्त तुमच्या नेत्यांवर कारवाई केली जाते आहे , त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 2024 नंतर आम्ही याचं उत्तर देऊ

    दिन हमारे भी आयेंगे 2024 ला उत्तर देऊ

    त्रास म्हटलं तर होतो करून घ्यायचा नाही

    जे होणारचं आहे

    माझ्यासारख्या माणसाची नसलेली संपत्ती जप्त केली

    कोणतीही नोटीस न देता जप्त केली

    मी 12 वाजता फोन केला

    माझ्यामुळे यांना का त्रास देतोय

    आम्ही यांना घाबरत नाही पुष्पामधला डायलॉग आहे ना

    काय ? खालून आवाज झूकेगा नही साला

  • 04 Jun 2022 06:22 PM (IST)

    अमरावती शहरातील काही भागांतील पाणी पुरवठा उद्या सकाळी उशिरा पर्यत होण्याची शक्यता

    अमरावती शहरातील काही भागांतील पाणी पुरवठा उद्या सकाळी उशिरा पर्यत होण्याची शक्यता…

    रहाटगाव जवळ मुख्य पाईपलाईन फूटल्याने दोन दिवसांपासून बंद

    अमरावती-बडनेरा शहराचा पाणी पूरवठा बंद

    मागील सलग 36 तासापासून सुरू आहे..पाईप लाईन दुरुस्तीचे काम

    पाईप लाईन खराब झाल्याने वारंवार होतो पाणी पुरवठा खंडित

  • 04 Jun 2022 06:21 PM (IST)

    पुण्यातू राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार LIVE

    पुढील अडीच वर्ष देखील सरकार टीकेल

    लढणारा महाराष्ट्र आहे झुकणारा नाही

    भाजपनं देलेला शब्द पाळला नाही- राऊत

    राज्यातील मविआचं योग्य पद्धतीने काम सुरू

    भाजपान विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवावी

    माझी नसलेली संपत्ती जप्त केली, कोणतीही नोटीस न देता-राऊत

    मी ‘ईडी’च्या कार्यालयात जायला निघालो, आधिकारी म्हणतात येऊ नका येऊ नका, शरद पवार

    शहांना सांगितलं मला अटक करा, आम्ही घाबरत नाही-पवार

    देशात भाजपचं राज्य, जम्मू काश्मीरात काय चाललंय? राऊतांचा सवाल

    जम्मू काश्मीरवरुन लक्ष हटवलं जातंय का? राऊतांचा सवाल

    2024नंतर ईडी कारवायांवर उत्तर देऊ-राऊत

  • 04 Jun 2022 06:21 PM (IST)

    उद्योगपती बाबा कल्याणीना या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार

    उद्योगपती बाबा कल्याणीना या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार

    -सैन्यदलातील पाच जायबंदी झालेले जवानदेखील व्यासपीठावर उपस्थित

  • 04 Jun 2022 06:20 PM (IST)

    जळगावमधील रावेर तालुक्यातील तरुणावर बिबट्याचा हल्ला

    रावेर तालुक्यात एका 27 वर्षीय तरुणावर बिबट्याचा हल्ला.

    सातपुडा पायथ्याशी असलेल्या मंगरूळ गावाजवळ गुरे चारणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला.

    गुराखी प्रकाश बारेला गंभीर जखमी असून त्याच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले

  • 04 Jun 2022 06:18 PM (IST)

    रवी राणा आमच्या गिणतीत नाही राज्य सभेबाबत बच्चू कडू यांचे वक्तव्य

    रवी राणा आमच्या गिणतीत नाही राज्य सभेबाबत बच्चु कडू यांचे वक्तव्य

    ते आमच्या गिणतीत नाही असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चु कडू यांनी राज्यसभेच्या निवडणूकी बाबद मोठे सुचक वक्तव्य

    अपक्ष आमदार रवी राणा यांनी अपक्षांनी पत्ते पिसून ठेवले आहे.फक्त ते टाकायच काम आहे.

    माझ्या संपर्कात अनेक अपक्ष आमदार आहे.भाजप उमेदवार निवडून येईल असं रवी राणा यांच्या वक्तव्याचा बच्चू कडू यांनी भंडारा येथे चांगलाच समाचार घेतला

  • 04 Jun 2022 06:16 PM (IST)

    गेल्या अडीच वर्षात वैचारिक भिन्नता असताना सुद्धा एकत्र येण्याचा निर्णय घेतला:शरद पवार

    सुरुवातीला मी सांगतो माझी मान अवघडली आहे

    गेल्या अडीच वर्षात वैचारिक भिन्नता असताना सुद्धा एकत्र येण्याचा निर्णय घेतला

    ही आघाडी योग्य रस्त्यावर आहे

    काही जणांनी भविष्य वर्तवलं होतं

    कोणी 15 दिवस, 1 महिना, 3 महिना सरकार पडेल मात्र अडीच वर्ष चाललंय

    त्यांनी आता भविष्य सांगायच बंद केलं

  • 04 Jun 2022 06:11 PM (IST)

    लातुर-निलंगा येथील तहसीलदार गणेश जाधव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई

    लातुर-निलंगा येथील तहसीलदार गणेश जाधव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कार्यवाही

    1 लाख 50 हजारांची लाच घेताना मध्यस्थी एजंट आणि तहसीलदार गणेश जाधव यांना अटक

    वाळूच्या तीन ट्रक नियमित चालू देण्यासाठी मागितली होती लाच, सापळा रचून रंगेहाथ पकडले

  • 04 Jun 2022 06:09 PM (IST)

    माझ्यावर कोणताही फॉर्म्युला वापरला तरी, मला काही फरक पडत नाही; आमदार हितेंद्र ठाकूर यांची केंद्रावर टीका

    माझ्यावर कोणताही फॉर्म्युला वापरला तरी, मला काही फरक पडत नाही, केंद्रीय यंत्रणा असो की राज्य यंत्रणा असो आमदार हितेंद्र ठाकूर

    राज्यसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपात मोठा संघर्ष होण्याची शक्यता.

    राज्यसभेच्या 6 जागेसाठी 7 उमेदवार उभे असल्याने मोठा घोडेबाजार होणार असून, भाजपा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अपक्ष आमदारा वर केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे असा आरोप महाविकास आघाडीकडून केल्या जात आहे.

    राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणेचा फॉर्म्युला आपल्यावर वापरला का? असा प्रश्न बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना विचारला असता त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

    – माझ्यावर कोणताही फॉर्म्युला वापरला तरी, मला काही फरक पडत नाही, केंद्रीय यंत्रणा असो की राज्य यंत्रणा असो..

    – मी आयुष्यात खूप चढ उतार बघितलेत, वाईटात वाईट प्रसंग बघितलेत, या सर्व प्रसंगात माझा कार्यकर्ता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, कार्यकर्ता हे माझे कुटुंब आहे. त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही.

    -ED चा दबाव आणल्या जातो असे मी प्रेस च्या माध्यमातून बघतो, ऐकतो आहे. असे वेगवेगळ्या पक्षातून आरोप चालू आहेत.

    – 100 टक्के खरे की खोटे हे त्यात्या आमदारांना माहीत. पण शेवटी आपल्या देशात कोर्ट आहे.जर कोणता पक्ष चुकीच्या पद्धतीने ED चा वापर करत असेल तर त्यांनी कोर्टात न्याय मागावा, सर्वाना न्याय मिळू शकतो..

  • 04 Jun 2022 06:02 PM (IST)

    ‘होय हे संभाजीनगरच’ असे पोस्टर संभाजीनगरमधे शिवसेनेने लावलेत; फक्त पोस्टरवर लिहून आणि प्रस्ताव तयार आहे असं म्हणून गाजर दाखवू नका; मनसेची टीका

    ‘होय हे संभाजीनगरच’ असे पोस्टर संभाजीनगरमधे शिवसेनेने लावलेत म्हणे

    फक्त पोस्टरवर लिहून आणि प्रस्ताव तयार आहे असं म्हणून गाजर दाखवू नका ८ जूनला संभाजीनगरमधे पाऊल टाकण्याआधी नामांतर करा बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात महाराष्ट्र अनेक वर्षे

    अगदी काल परवा पर्यंत पाहात आहे

  • 04 Jun 2022 06:00 PM (IST)

    अक्षय कुमार इतिहास न वाचता बोलतो आणि कोट्यवधी कमावतो

    अक्षय कुमार इतिहास न वाचता बोलतो आणि कोट्यवधी कमावतो

    पृथ्वीराज चौहान सगळ्यांना माहीत आहे लिहिलेले आहेत इतिहासात

    पृथ्वीराज चौहान कोण होता हे तुम्हांला माहित नसेल तर गुगल करा

    26 वर्षीय पृथ्वीराज चौहान घोड्यावर बसला- अक्षय कुमार 50 चा

    बघा नक्की काय केलंय नको त्या क्षेत्रात जाऊ नका

    चांगलं काम केलं तेव्हा डोक्यावर घेतलं. वेगळं काही केलंत तर दबले जाल

    जितेंद्र आव्हाडांनी अक्षय कुमारचा उल्लेख मुर्ख माणसा असं केलाय

  • 04 Jun 2022 05:36 PM (IST)

    एनसीसी प्रशिक्षण शिबिर दरम्यान गोळीबार प्रशिक्षणावेळी विद्यार्थिनी गोळी लागून पाड्यातील मुलगी जखमी

    शहापूर तालुक्यातील जंगळीबाबा आश्रमशाळेत आयोजित एनसीसी प्रशिक्षण शिबिर दरम्यान गोळीबार प्रशिक्षणावेळी विद्यार्थिनी गोळी लागून नजीकच्या पाड्यातील मुलगी गंभीर जखमी कांचन राया कोरडे असे जखमी सातवीमध्ये शिकणारी मुलगी असून तिला उपचारासाठी कळवा ठाणे येथे दाखल .

  • 04 Jun 2022 05:24 PM (IST)

    पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात 32 वा पुण्यभूषण पुरस्कार सोहळा पार पडणार

    पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पुणेकरांच्यावतीने देण्यात येणारा 32 वा पुण्यभूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे

    -हा सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार

  • 04 Jun 2022 04:58 PM (IST)

    महाराष्ट्रात मुसलमान आणि हिंदू हा वाद.या शिवचरित्रानं महाराष्ट्रात घातला; जितेंद्र आव्हाडांची इतिहासावरून पुन्हा एकदा पुरंदरेंवर टीका

    आता लोकशाही आली

    सगळे राजे बिजे घरी गेलेत

    तुकोबारायांच काय झालं हे तुम्हाला माहिती आहे

    तुकोबारायांची गाथा बुडवली नव्हती ती गायब केली होती जाळली होती

    मी जर बोललो तर हेडलाईन होते

    माणूस मेल्यानंतर सगळं काही संपतं

    तो गेल्यानंतर जेम्स लेन जागा होतो

    एक इतिहासकार बदनाम करून गेला

    20 वर्ष कोणी बोलत नाही

    तो अमेरिकेहून मुलाखत देतो

    ही माहिती कोणी दिली त्याला

    ती जी माहिती आहे तिच पुरंदरेंनी पुस्तकात लिहून ठेवली आहे

    हे मी जाहीरपणाने बोलतो आहे

    कोण होते शिवाजी महाराज ?

    जमीनी वाचवण्यासाठी मराठे आईला पाठवायचे हे पुरंदरेननी लिहीलंय

    महाराष्ट्रात मुसलमान आणि हिंदू हा वाद.या शिवचरित्रानं महाराष्ट्रात केलं

    शिवाजी महाराज येताना तलवार घेऊन आले आणि मुसलमानांना मारत सुटले असं

    जितेंद्र आव्हाडांची इतिहासावरून पुन्हा एकदा पुरंदरेंवर टिका

  • 04 Jun 2022 04:50 PM (IST)

    चुकून रेस झाली गाडी, मुलगी घुसली थेट ATM मध्ये

    नाशिकः चुकून रेस झाली गाडी, मुलगी घुसली थेट ATM मध्ये

    नाशिकच्या सावता नगर परिसरात घडली घटना

    सुदैवाने अपघातात मुलगी किरकोळ जखमी

    अपघाताचा व्हिडियो सीसीटीव्हीत कैद

  • 04 Jun 2022 04:38 PM (IST)

    लोकशाहीत मुख्यमंत्री जनता बनविते: नाना पटोले यांच्या धनंजय मुंडे यांना खोचक टोला

    स्वप्न बघने हा सर्वांचा अधिकार ,काही लोक दिवसा स्वप्न बघतात नाना पटोले यांच्या धनंजय मुंडे यांना खोचक टोला.

    लोकशाहीत मुख्यमंत्री जनता बनविते..

  • 04 Jun 2022 04:35 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबादमध्ये सभा

    औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी सभा

    सभेसाठी शिवसेनेकडून दुसरा टिझर लॉन्च

  • 04 Jun 2022 04:33 PM (IST)

    जे निवडणूक लढत आहेत ते सर्व लोक संपर्कात; खासदार इम्तियाज जलील

    6 तारखेला नांदेड येथे ओवैसी यांची होणार सभा

    7 तारखेला लातूर येथे सभा.

    राज्यसभा निवडणूक संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते अधिकार फक्त असुउद्दिन ओवैसी यांनाच

    जे निवडणूक लढत आहेत ते सर्व लोक संपर्कात आहेत, त्यांचा अधिकार आमदार आणि खासदारांना नसून असुउद्दिन ओवेसी यांना आहे.

    आम्ही शिवसेनेचे चॅलेंज स्वीकारायला तयार आहे.

    सगळ्यांच्या सभा झाल्या नंतर आम्ही सभा घेणार सौ सोनार की एक लोहार की.

    त्यांचा मुख्यमंत्री येऊ द्या ,त्यांची झाल्यावर आमची सभा घेऊ

    आमच्या सभेला गाड्यांचा आणि पैशांच्या देवाण घेवणाची गरज नसणार

    सगळ्यांची सभा होऊ द्या मग शेवट आमची सभा.

  • 04 Jun 2022 04:24 PM (IST)

    शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा स्तंभ म्हणजे शरद पवार; कन्हैया कुमार

    आपल्यासमोर आव्हान आणून ठेवलं आहे

    मुसलामान प्रामाणिक आहेत त्यांच्याकडे तुम्ही किती वेळा प्रमाणपत्र मागणार

    पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा अनेक मुसलमान तिकडे गेले

    जे राहिले त्यांनी कधीच प्रमाणपत्र दिलं आहे

    टीव्ही वर मी जायचो तेव्हा खूप भांडण व्हायचं आरोप व्हायचे

    जितेंद्र का जाऊ द्या ते हेटाळणी करायचे मात्र मी कधी त्यात अडकलो नाही

    आजकाल पवारांवर टिका करतात,

    कारण हा एकटाच माणूस हा सत्तेपासून दूर ठेवणारा विचार आहे

    पवारांनी महाराष्ट्राला विचार दिलाय.

    सावित्रीबाई फुले जन्माला आले नसते तर मुली आज कुठे असत्या

    महात्मा फुलेंनी एका विशिष्ट जातीसाठी नाही सगळ्या जातींसाठी शाळा सुरू केली

    शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा स्तंभ शरद पवार आहेत

    काय म्हणतात की शरद पवार नास्तिक आहेत

    उपनिषदांमधून, वेदांमधून विषमता निर्माण झाली

    विद्रोहाच्या संस्कृतीची सुरुवात बुद्धांनी केली,

    सगळ्या संतांनी वेदांनी प्रमाण मानायला नकार दिला

    तेच शरद पवार करत आहेत

    दुसरा कोणी नेता नाही की त्याच्यावर टीका करता येईल

    काळाच्या पहाडासमोर उभं राहणारा एवढाच नेता आहे

  • 04 Jun 2022 04:13 PM (IST)

    दरोडेखोरांचा पोलीस उपनिरीक्षकावर हल्लाःदोन-तीन घरफोडी करून पळताना पोलिसांकडून चोरांची धरपकड

    अहमदनगर: राहुरी

    दरोडेखोरांचा पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला निरज बोकिल यांच्यावर प्राणघातक हल्ला. राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी रोडवर सातपीर बाबा दर्गा परिसरातील घटना. घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद पहाटे दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी चार आरोपींना पोलिस पथकाने पाठलाग करून आवळल्या मुसक्या. सुमारे एक तास सुरू असलेल्या या थरारा दरम्यान पोलिसांनी एका दरोडेखोराच्या अंगावर घातली गाडी. दोन-तीन घरफोडी करून पळताना पोलिसांकडून चोरांची धरपकड.

  • 04 Jun 2022 04:04 PM (IST)

    मावळ मधील तळेगांव दाभाडेमध्ये अजित पवारांनी भूमिपूजन केलेल्या जागेवर भाजपकडून गोमूत्र टाकून जागा स्वच्छ

    मावळ मधील तळेगांव दाभाडे येथव अजित पवारांनी भूमिपूजन केलेल्या जागेवर भाजपकडून गोमूत्र टाकून जागा स्वच्छ

    -काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या तळेगांव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम ठिकाणी येऊन भाजपने त्या जागी गोमूत्र आणि पंचामृत टाकत ती जागा स्वच्छ केली

    -उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपवित्र हाताने केलेल्या भूमिपूजनाचे स्थळावर जाऊन निषेध नोंदवून भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र आणि पंचामृत टाकून पवित्र केली

    -मावळ गोळीबार जनता विसरले नाहीत.ज्या मावळातील जनतेवर अजित पवारांनी 2011 साली पाणी प्रश्नावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.

    त्याच मावळात अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा करण्यात आला असल्याने मावळ भाजपकडून हे पाऊल उचलण्यात आले

  • 04 Jun 2022 04:01 PM (IST)

    दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा असं गाणं मी म्हणणार नाही; हार्दिक पटेलचे कन्हैया कुमारने टोचले कान

    दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा असं गाणं मी म्हणणार नाही

    मी एवढंच म्हणेन

    कधी व्यक्तींच्या मागे जाऊ नका

    विचार मजबूरी होऊ शकत नाही विचार स्थायी आहे

    हार्दिक पटेल भाजपाविरोधात होते तेव्हा युथ आयकॉन होते आता ते नेता बनलेत

    हार्दिक पटेलचे कन्हैया कुमारने टोचले कान

  • 04 Jun 2022 04:00 PM (IST)

    मंगळवेढ्यातील 35 गावच्या योजना, दहिगाव, सीना माढा, अक्कलकोट, बार्शी यासह विविध योजना अर्धवटः राजू शेट्टी

    मंगळवेढ्यातील 35 गावच्या योजना, दहिगाव, सीना माढा, अक्कलकोट, बार्शी यासह विविध योजना अर्धवट आहेत

    – या योजना पूर्ण झाल्या असत्या तर उजनीत थेंबबर पाणी राहिले नसते

    – पालकमंत्री भरणे यांनी नीरा उजवा लाभक्षेत्रातील पाणी इंदापूरबारामतीला नेणे कितपत योग्य

    – दुष्काळात होरपळणारा सोलापूर जिल्हा हिरवागार झाला असता

    – मागील दोन तीन दशके सोलापूर जिल्हा मागे उभा राहिला त्यांना पाणी न देणे हे दुर्दैवी

  • 04 Jun 2022 03:55 PM (IST)

    शरद पवारांनी गडकरींचे कौतुक करावे मात्र शरद पवारांनी लक्षात घ्यावे की ते 10 वर्षे कृषीमंत्री होते; राजू शेट्टी

    नितीन गडकरी यांनी साखर उद्योगात बोलले असावेत.

    – गडकरींनी इथेनॉलबाबतीत ठोस भूमिका घेतली

    – साखर निर्यात झाली नसती तर फार मोठी अडचण आली असती

    – 20 टक्के साखर उत्पादन कमी झाले मात्र इथेनॉलचे प्रमाण वाढले

    – शरद पवारांनी गडकरींचे कौतुक करावे मात्र शरद पवारांनी लक्षात घ्यावे की ते 10 वर्षे कृषीमंत्री होते मग त्यांना या गोष्टी का राबवता आल्या नाहीत याचे आत्मचिंतन त्यांनी करावे.

  • 04 Jun 2022 03:52 PM (IST)

    राज्यसभेवरुन सुरु असलेला घोडेबाजार मी पाहतोयः राजकारण किती खालच्या स्तराला गेलेय हे मी पहिल्यांदा पाहतोय; राजू शेट्टींची टीका

    – राज्यसभेवरुन सुरु असलेला घोडेबाजार मी पाहतोय

    – राजकारण किती खालच्या स्तराला गेलेय हे मी पहिल्यांदा पाहतोय

    – विधान परिषदेसाठी मी इच्छुक नाही. लोकांना जर वाटत असेल की मी सभागृहात मी जावे तर त्यांनी वर्गणी काढून मला निवडून द्यावे

  • 04 Jun 2022 03:51 PM (IST)

    मुख्यमंत्री किती दिवस जबाबदारी झटकणार ?: तुम्ही थोरात आणि पवारांकडे जर हे विषय सोपवणार असाल तर कसे होणार ? राजू शेट्टीची मुख्यमंत्र्यांवर टीका

    मुख्यमंत्री किती दिवस जबाबदारी झटकणार ?

    अडीच वर्षे झाली मुख्यमंत्री होऊन तुम्ही कितीदिवस जबाबदारी झटकणार आहत

    – तुम्ही थोरात आणि पवारांकडे जर हे विषय सोपवणार असाल तर कसे होणार ?

    – ते दोघेही कारखानदार आहेत ते सोयीप्रमाणे निर्णय घेतील..

    – राजू शेट्टीची मुख्यमंत्र्यांवर टीका

  • 04 Jun 2022 03:43 PM (IST)

    पुणेकरांसाठी आनंदाची बातमीःस्वारगेट ते बुधवार पेठ अंडरग्राऊड मार्गाचं काम झालं पूर्ण

    पुणेकरांसाठी आनंदाची बातमी;

    स्वारगेट ते बुधवार पेठ अंडरग्राऊड मार्गाचं काम झालं पुर्ण

    स्वारगेटवरून बुधवार पेठकडे येणारी मुठा टीबीएम मशिन बुधवार पेठ स्थानकात पडली बाहेर

    12 कि. मी. मार्गाचं काम झालं पुर्ण

    उर्वरित भुयारी मार्गात सिग्नल यंत्रणा, मेट्रोचे रुळ ,विद्युत व्यवस्था अशी काम करण्यात येणार आहेत

  • 04 Jun 2022 03:41 PM (IST)

    शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे:राजू शेट्टी

    – रासायनिक खते आणि बी बियाणे याबाबत मुख्यमंत्र्यांनी काय आणि कसा आढावा घेतला हे माहिती नाही

    – शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही हे सांगावे – राजू शेट्टी

  • 04 Jun 2022 03:37 PM (IST)

    देशाची अर्थव्यवस्था 3 ट्रीलीयन होती आणि एकट्या महाराष्ट्राची 1 ट्रीलीयन होती:कन्हैया कुमार

    लोकतंत्र संकटात आहेत

    जीएसटी लागू झालाय सगळे धन केंद्रात जातंय

    राज्य केंद्राकडे बघत राहतं की आमचा हिस्सा द्या

    देशाची अर्थव्यवस्था 3 ट्रीलीयन होती आणि एकट्या महाराष्ट्राची 1 ट्रीलीयन होती

    स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारला कर्मचाऱ्यांना द्यायला कर्ज काढावौ लागतं

    ज्या राज्यात भाजपाचं सरकार नाही त्यांना पैसे दिले नाहीत

    भाजपाचे सरकार नाही तिथं दुश्मनी आहे

    आपल्याला ठरवता आलं पाहिजे की काय करायचं आणि काय नाही करायचं

  • 04 Jun 2022 02:58 PM (IST)

    महाविकास आघाडीमध्ये 100 टक्के खूषही नाही आणि 100 टक्के नाराजही नाही; बहुजन विकास आघाडीचे नेते आणि ज्येष्ठ आमदार हितेंद्र ठाकूर

    बहुजन विकास आघाडीचे नेते आणि ज्येष्ठ आमदार हितेंद्र ठाकूर

    महाविकास आघाडीमध्ये 100 टक्के खूषही नाही आणि 100 टक्के नाराजही नाही

    सर्व राजकीय पक्षांमध्ये माझे मित्र आहेत मला कुणीही अस्पृश्य नाही

    सर्व राजकीय पक्षांच्या टॉप लिडर्सनी मला संपर्क साधला आहे

    10 तारखेला मतदाना दिवशी मी माझी भूमिका जाहीर करणार

  • 04 Jun 2022 02:43 PM (IST)

    राज्यातील खत टंचाई राज्य सरकारमुळे; केंद्रीय रसायने खते राज्यमंत्री खुबा यांनी राज्य सरकराला धरले जबाबदार

    लातूर – औसा

    राज्यातील खत टंचाईचे खापर राज्य सरकारवर फोडले

    केंद्रीय रसायने खते राज्यमंत्री खुबा यांनी राज्य सरकराला धरले जबाबदार

    राज्य जितकी मागणी करतोय त्यापेक्षा जास्त पुरवठा केंद्र सरकारने केला आहे

    केंद्र सरकारने दिलेला खतसाठा महाराष्ट्रात अंतर्गत पुरवठा करायची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे

    खत पुरवठा करण्याबाबत राज्य सरकारला समजावून सांगेल की केंद्र सरकारने जितके खत दिले आहे ते खत शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करावे

    ज्या त्या जिल्ह्यात खतांची मागणी गरज आहे त्यानुसार राज्याने करावा

    शेतकऱ्यांनो घाबरू नका , जितका खत हवा आहे तितका पुरवठा केंद्र सरकार करणार

    केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठा आशादायक दिलासा

    दर मंगळवारी मी प्रत्येक राज्याची आढावा बैठक घेत असतो

    महाराष्ट्राचे कृषी आयुक्त हे बैठकीत समाधान व्यक्त करित मोदी सरकारचे अभिनंदन करतात

    राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात खतांची टंचाई असून शेतकरी चिंतेत

  • 04 Jun 2022 02:31 PM (IST)

    पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; 8 लाखांचे अंमली पदार्थ पोलिसांनी केले जप्त

    पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई,

    – 8 लाखांचे अंमली पदार्थ पोलीसांनी केले जप्त,

    – समीर उर्फ आयबा शहनाज शेख या तस्कराला पुणे पोलिसांनी केली अटक,

    – शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार

  • 04 Jun 2022 02:24 PM (IST)

    विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवी करु स यांचा सोलापूर दौरा रद्द

    – विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवी करु स यांचा सोलापूर दौरा रद्द

    – पुढील सर्व दौरे रद्द करुन देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना

    – सोलापुरात दै. पुण्यनगरीच्या कार्यक्रमासाठी येणार होते सोलापूरला

  • 04 Jun 2022 02:13 PM (IST)

    शेत तिथे रस्ता कामाचे आज लोकार्पण झाल्याची घोषणा….

     देवेंद्र फडणवीस पॉईंटर

    शेत तिथे रस्ता कामाचे आज लोकार्पण झाल्याची घोषणा

    कार्यसम्राट असा आमदार अभिमन्यू पवार यांचा उल्लेख
    शेत रस्त्याचे काम चांगले झाले, मोटर सायकल जात नव्हती तिथे गाडी गेली

    आपल्या सरकारच्या कळत पालकमंत्री पानंद मुक्ती योजना केली जनतेचे काम करताना सत्ता विरोधक असे नसते इच्छा शक्ती गरजेची आहे ति पवार यांनी अडीच वर्षात दाखवली , शेतकरी आनंदी समाधानी अभिमन्यू पवार यांनी काम सुरु केले आहे त्या योजना वापर योग्य केला

    उत्पन्न वाढवायचे असेल तर मनरेगा तुन केशर अंबा लागवड , येत्या काळात औसा केशर अंबा हब तयार होईल मनारेगाचा खर्च काँग्रेस काळात 300 कोटी होता

    11 योजना सुरु केल्या 2 ते अडीच हजार कोटी खर्च मनरेगा तुन केले [आताचे सरकारला शेतकऱ्याशी देणे घेणे नाही अतिवृष्टी विमा कमी जास्त पिकले तरी विमा मिळायचा गेल्य दोन वर्षात एक नवा पैसा दिला माही

    मुख्यमंत्री वर टिका

    मुंबई म्हणजे त्यांना महाराष्ट्र वाटते त्यांना शेतकरी माहित नाही

    लाल कार्पेट पेक्षा ते पाहणी करायला गेले नाहीत आता ते विमा साठी किंवा इतर विषयवर मोर्चा काढत नाहीत

    अनेक शेतकरी योजना बंद केल्या , त्याचा सत्यानाश आहे.

    पोखरा योजनेचे काम पूर्ण ठप्प केले शेततळे आमच्या काळात केली

    मागेल त्याला शेततळे 1 लाख पेक्षा जास्त शेततळी आहे.

    ज्या ठिकाणी काही पिकत नव्हते त्या ठिकाणी फलबागा सुरु झाल्या या सरकारने जलसंधारण , जलयुक्त , शेततळे, सौर ऊर्जा योजना बंद केल्या

    जागतिक बँकेच्या योजनेतून गोडाऊन योजना सुरु केली त्याचे नाव बदलले

    बाळासाहेब ठाकरे याचे नाव दिले आनंदाची बाब आहे

    50 कोटी सुद्धा खर्च केले नाही

    शेतकरी जगतोय का मारतोय याचे देणे घेणे नाही अतिरिक्त उसाबाबत कोणताही निर्णय घेत नाही

    विरोधी पक्षाचा शेतकरी असेल तर उस नेहला जात नाही ही राज्याचे अवस्था

    मोदी मुळे उस उत्पादक शेतकरी जगला आता बोनस सोडा खरेदी केंद्र सुद्धा सुरु होत नाहीत

  • 04 Jun 2022 01:17 PM (IST)

    नाशिकच्या कॉलेजरोडवर लागली आग

    -नाशिकच्या कॉलेजरोडवर लागली आग -मोकळ्या मैदानातील गवताने घेतला पेट -विजेची ठिणगी पडल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज -अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल -सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही -आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

  • 04 Jun 2022 12:54 PM (IST)

    सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन

    सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन

    मास्कची सक्ती नाही

    राज्यात मास्कसक्ती नाही

    कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे

    मास्कची सक्ती नाही

    ६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.. टास्क फोर्सच्या मीटिंगमध्ये मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मास्क वापरलाच पाहिजे, असं आमचं म्हणणं नाहीय, पण १०-१५ दिवस सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्यावीच लागेल…

  • 04 Jun 2022 12:36 PM (IST)

    पुण्यात मनसेचं रास्तारोको आंदोलन, साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात आंदोलन

    पुण्यात मनसेचं रास्तारोको आंदोलन

    एअरपोर्ट रोडवरचा उड्डाणपूल चुकला याविरोधात करणार आंदोलन

    साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात आंदोलन

    मनसैनिक करणार रास्तारोको

  • 04 Jun 2022 12:34 PM (IST)

    सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक

    सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक

    राज्य सरकारचा निर्णय

    त्याचबरोबर ट्रेन-बस सिनेमा सभागृह याठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलेला आहे

    आरोग्य सचिवांचं प्रशासनाला निर्देश

  • 04 Jun 2022 12:13 PM (IST)

    खासदार संजय राऊत उद्या अयोध्या दौऱ्यावर, आदित्य ठाकरे यांच्या आयोध्यावारीसाठी पक्षात मोर्चेबांधणी सुरू

    खासदार संजय राऊत उद्या अयोध्या दौऱ्यावर, आदित्य ठाकरे यांच्या आयोध्यावारीसाठी पक्षात मोर्चेबांधणी सुरू

    शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्यावरीसाठी पक्षात मोर्चेबांधणी सुरू

    शिवसेना नेते-खासदार संजय राऊत उद्या अयोध्येत

    आदित्य ठाकरेंच्या अयोध्यावारीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा उद्या अयोध्या दौरा

    आदित्य ठाकरेंच्या अयोध्या वारीच्या तयारीचा संजय राऊत आढावा घेणार

    15 जूनला आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

  • 04 Jun 2022 11:58 AM (IST)

    साखर आणि ऊस तोड कामगारांना आपण आधार दिला पाहिजे – मुख्यमंत्री

    – मला स्वता या परिषदेला यायचं होतं मात्र मी खूप हळुवार पाऊलं टाकतोय,

    – आम्ही पडलो शहरी बाबू, या उद्योगातल जास्त काही कळत नाही

    – मी त्यावेळी डावी उजवीकडे बघत असतो, त्यावेळी माझ्याबाजूला अजित दादा किंवा बाळासाहेब थोरात बसलेले असतात

    – साखर आणि ऊस तोड कामगारांना आपण आधार दिला पाहिजे

    – काही कारखाने उत्तम रित्या चालू आहेत

    – काही कारखान्यांना अडचणी का येतात ते

    – गडकरी साहेब तुमचं भाषण ऐकून मलाही कारखाना काढवसा वाटतोय, मात्र काढणार नाही, कारण गडकरीच जून वाक्य आहे कुणाला आयुष्यात उठवायच असेल तर कारखाना काढून द्यायचा असतो

    – काही अडचणी आल्या तर शरद पवार धावून येतात,

  • 04 Jun 2022 11:57 AM (IST)

    समस्यांवर पवार साहेब मार्गदर्शन करतात – उद्धव ठाकरे

    अनेक गोष्टीत अडचणी येतात

    त्यावेळी मला पवार साहेबांचा फोन येतो

    त्यावर चर्चा होते, मार्ग निघतो…

    ब्राझीलने काय केलं…तसं धोरण आपण आखलं पाहिजे ….

    आपला देश कृषी प्रधान देश आहे….

    साखर उद्योगावर अनेक अडचणी आहेत

    जायला काय हरकत आहे

    सरकार पाठीशी आहे

    साखर परिषदेतून मुख्यमंत्री

    काळ बदलतोय

    आपण आपलं तंत्रज्ञान विकसित केलं आहे

  • 04 Jun 2022 11:36 AM (IST)

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका संभाजी ब्रिगेड लढणार, 12 जूनला बैठक

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका संभाजी ब्रिगेड लढणार

    सर्व महापालिका निवडणुकीत संभाजी ब्रिगेड उमेदवार देणार

    12 जूनला संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांची सिंदखेडराजा इथं बैठक

    बैठकीत होणार निर्णय

    संभाजी ब्रिगेडनं निवडणूकीची तयारी केली सुरू

    सूत्रांची टीव्ही मराठीला माहिती

  • 04 Jun 2022 11:23 AM (IST)

    इथेनॉलबाबतीत करखान्यांमध्ये अजून आत्मविश्वास नाहीय

    नितीन गडकरी –

    – इथेनॉलबाबतीत करखान्यांमध्ये अजून आत्मविश्वास नाहीय

    – साखरचे काही होवो, मात्र उसाचे भाव कमी होणार नाहीत

    – मात्र साखरेचे भाव कमी होऊ शकतात

    – साखरेचे उत्पादन असेच राहिले तर करखानदाराना आणि ऊस उत्पादकाना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही

  • 04 Jun 2022 11:23 AM (IST)

    आज रोज रस्ते वाढत आहे, याचं कारण गाड्यांची संख्या पण वाढत आहे

    नितीन गडकरी –

    – आज रोज रस्ते वाढत आहे, याचं कारण गाड्यांची संख्या पण वाढत आहे

    – आता लवकरच इलेट्रीक टॅक्टर,ट्रक आणणार आहे

    – 15 वर्ष कारखाने चालवून आमच्या हातात काहीच आलं नाही

    – मला बुद्धी आणि दुर्बुद्धी झाली कारखाना काढला, आणि माझ्या गळ्यात कारखाना टाकला

    – जावे ज्याच्या जन्मा तेव्हा कळे

    – आपल्या देशात पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झालाय

  • 04 Jun 2022 10:51 AM (IST)

    कृषीमंत्री दादा भुसे यांची शेतकरी नेत्यांशी बंद दाराआड चर्चा….

    कृषीमंत्री दादा भुसे यांची शेतकरी नेत्यांशी बंद दाराआड चर्चा…. किसान क्रांती संघटनेचे‌ नेते तसेच कोअर कमिटीचे सदस्य यांचेशी चर्चा…. कृषीमंत्री दादा भुसे यांची प्रसारमाध्यमांसमोर चर्चा करण्याची तयारी असताना कोअर कमिटीचा मात्र नकार…. शेतक-यांच्या मागण्यांवर होतेय बंद दाराआड ‌चर्चा….

  • 04 Jun 2022 10:47 AM (IST)

    राज्यसभेसाठी निवडणूक लागावी हे दुर्देव आहे – सुप्रिया सुळे

    प्रत्येक पक्षाला वाटतं निवडणूक व्हावी

    राज्यसभेसाठी निवडणूक लागावी हे दुर्देव आहे

    महाविकास आघाडीचं सरकार उत्तम काम करीत आहे

    तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदाची पाठी न लागता चांगलं काम करावं

  • 04 Jun 2022 10:25 AM (IST)

    देशातल्या 171 कृषी विद्यापीठांमध्ये ड्रोनचा वापर केला जाणार

    देशातल्या 171 कृषी विद्यापीठांमध्ये ड्रोनचा वापर केला जाणार

    यापुढे कृषी क्षेत्रात ड्रोनद्वारे होणारे औषध फवारणी

    सर्वच पिकांसाठी ड्रोनचा वापर फायदेशीर होणार

    बेरोजगार तरुणांना ड्रोनवर अनुदान दिलं जाणार

  • 04 Jun 2022 10:24 AM (IST)

    अपक्ष आमदारांना ईडीची सीबीआयची भीती दाखवली जात आहे – संजय राऊत

    आता सहाव्या जाग्यासाठी भाजप विसंबून आहेत

    आमदारांच्यावरती दबाव आणला जात आहे

    महाविकास आघाडीची बाजू मतबूत आहेत

    राज्यातली जनता डोळसपणे पाहत आहे

    सहावी जागा महाविकास एकदम व्यवस्थित जिंकणार आहे

    भाजपने आपले पैसे वाया घालवू नये

    अपक्ष आमदारांना ईडीची सीबीआयची भीती दाखवली जात आहे

    सरकार त्यांचं काम चोखपणे करतंय

    अपक्ष कोणासोबत जाणार हे १० तारखेला ठरेल

  • 04 Jun 2022 10:08 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरातील आठ शाळा अनधिकृत,महापालिका शिक्षक विभाग करणार कारवाई

    -पिंपरी चिंचवड शहरातील आठ शाळा अनधिकृत,महापालिका शिक्षक विभाग करणार कारवाई

    -शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची मान्यता घ्यावी लागते मात्र ह्या आठ शाळांनी वर्षानुवर्षे शाळा सुरू ठेवल्याचे निदर्शनास आल्याने त्यां शाळा अनधिकृत घोषित केल्यात

    -ह्या अनधिकृत शाळांमध्ये कासारवाडी,पिंपळे सौदागर,रहाटनी,भोसरी,चिखली,सांगवी आदी परिसरातील शाळेचा समावेश

    -सर्वाधिक अनधिकृत शाळा रहाटनी आणि पिंपळे सौदागर मध्ये

  • 04 Jun 2022 09:58 AM (IST)

    पर्यटकासाठी आनंदाची बातमी आहे

    वसई:- पर्यटकासाठी आनंदाची बातमी आहे

    वसई विरार सह पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ यंदाच्या वर्षी राहणार खुले

    महत्वाच्या पर्यटन स्थळावर योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार

    पालघर जिल्हाधिकारी डॉ माणिकराव गुरसळ यांचा निर्णय

    पालघर जिल्ह्यात वसई-विरार, वाडा, विक्रमगड, जव्हार, पालघर यासह अन्य ठिकाणी विविध पर्यटन स्थळ आहेत.

    वसई विरार मधील समुद्र किनारे, अर्नाळा, कळंब, राजोडी बिच, तुंगारेश्वर धबधबा, चिंचोटी धबधबा, देवकुंड, तानसा, उसगाव, मांडवी, या पर्यटनस्थळ चा समावेश आहे. ही सर्व पर्यटन स्थळ यंदाच्यावर्षी सुरू राहणार आहेत.

    पावसाळ्यात या पर्यटन स्थळावर मुंबई, ठाणे, रायगड, सह पालघर जिल्ह्यातील पर्यटकांची मोठी गर्दी असते.

    येणाऱ्या पर्यटकांचे अपघात टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपाययोजना ही केल्या आहेत

  • 04 Jun 2022 08:45 AM (IST)

    कौटुंबिक वादातून पैनगंगा नदीत उडी घेऊन माय लेकीची आत्महत्या

    यवतमाळ- कौटुंबिक वादातून पैनगंगा नदीत उडी घेऊन माय लेकीची आत्महत्या

    उमरखेड तालुक्यातील सोईट घडोली येथील नंदाबाई वानखडे,व साक्षी वानखडे असे मृत माय लेकीचे नाव

    या घटनेन परिसरात खळबळ

    पती सोबत झालेल्या वादानंतर केली नदीत उडी घेऊन आत्महत्या

  • 04 Jun 2022 08:44 AM (IST)

    यंदाच्या वारीसाठी राज्य सरकारची तयारी

    यंदाच्या वारीसाठी राज्य सरकारची तयारी

    अजित पवारांनी उद्या तीन जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखांची बोलावली बैठक

    वारीचं नियोजन करण्यासाठी बैठक बोलावली

    वारीत ज्यांना यायचंय त्यांनी सहभागी व्हा

    आम्ही सगळी काळजी घेऊ अजित पवारांच वारीला येण्यासाठी आवाहन

    यंदा दोन वर्षानंतर होणारी गर्दी लक्षात घेता स्वतः अजित पवार घेणार आढावा बैठक

  • 04 Jun 2022 08:44 AM (IST)

    महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच पुणेकरांना आवाहन

    महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच पुणेकरांना आवाहन

    जे उमेदवार देणार ते चांगले देणार

    कोणत्या पक्षाच्या अध्यक्षाला पुण्याविषयी आस्था आहे ?

    बाहेरचे लोक आपलेपणा समजून मदत करणार नाहीत

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष टिका

    शरद पवार या जिल्ह्यातील आहेत या जिल्ह्यांन मला संधी दिलीये

    महापालिका निवडणुकीचं अजित पवारांनी रणशिंग फुंकलं

  • 04 Jun 2022 08:34 AM (IST)

    पावसाळ्यात अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडणे पडणार महागात..

    पावसाळ्यात अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडणे पडणार महागात..

    अधिकारी कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली नाराजी व्यक्त..

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कार्यवाहीचे आदेश..

    अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी 24/7 कार्यलयात हजर राहणे अनिवार्य..

    सकाळी 7 ते रात्री वाजेपर्यंत मुख्यालयातील दूरध्वनी वरून किंवा व्हिडीओ कॉल ने संपर्क करत दैनंदिन अहवाल देणे बंधनकारक..

  • 04 Jun 2022 08:33 AM (IST)

    पंचगंगा नदी सहा जिल्ह्यातील नऊ नद्यांच्या पूररेषा नव्याने निश्चित

    पंचगंगा नदी सहा जिल्ह्यातील नऊ नद्यांच्या पूररेषा नव्याने निश्चित

    जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर नवीन कसे करण्यात आले अपलोड

    नव्या ब्ल्यू आणि रेड लाईन मुळे बांधकामावर येणार निर्बंध

    करवीर, कोल्हापूर शहर आणि हातकणंगले तालुक्यातील 40 किलोमीटरची पूररेषा करणार महत्त्वाची

    2021 चा महापुरानंतर नव्याने पुरेशा निश्चित करण्यासाठी जानेवारी महिन्यात जलसंपदा केली होती कामाला सुरुवात

    जी डी पी एस प्रणालीचा वापर करून करण्यात आली पूररेषा निश्चित आहे

  • 04 Jun 2022 08:33 AM (IST)

    या भगिनींनी काम करावं यासाठी आमचा प्रयत्न होता – अजित पवार

    आम्ही चंचलताई यांना महापौर केल

    या भगिनींनी काम करावं यासाठी आमचा प्रयत्न होता

    काळाच्या पुढे कोणाच काही चालत नाही ती आपल्याला सोडून गेली

    आज तिच्या नावाने जिमनँशियम सुरू करावं लागलं

    चंचलताई प्रश्न पोटतिडकीने सोडवण्याचा प्रयत्न करायच्या

    आम्ही जेव्हा निसर्गला होतो

    तेव्हा आम्ही तिथं ठरवलं होतं की त्यांना संधी

    झपाट्याने तुमचं माझं पुणे वाढतंय रस्त्याचे प्रश्न निर्माण झालेत, सब वे चा प्रश्न आहे , रूंदीकरणाचा प्रश्न आहे

    काही घरं यामध्ये आडवी येतायेत,काहीजण अतिक्रमण करून राहतायेत मात्र आता रूंदीकरण वाढवण्याचा प्रयत्न आहे

    पिंपरी चिंचवड व्हर्टीकल सायन्स पार्क मात्र

    इकडे 25 एकर जागा डॉगसाठी आरक्षित ठेवली होती

    ती जागा आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय

    सायन्स पार्क मुलांच्या भविष्यासाठी निर्माण करता येणार आहे

    तो एक प्रोजेक्ट डोक्यात आहे

    मला आज अनेकांनी निवेदन दिली

    मी त्यांच्याशी बोललो

    उद्या जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक ठेवली आहे

    काहींनी सांगितले कि आमची शेती गेली मात्र 3 हजार रुपयेच गुंठा दिला तो एक प्रश्न आहे

    बैठकीला तिथं सगळे आहेत

    काहींनी असं सांगितलं कि 52 एकर जमीन कार्पोरेशनच्या ताब्यात आहे

    कचऱ्याच्या बद्दल काही निवेदन आहेत

    मी पण याठिकाणाहून

    मला एक कळतं नाही

    आपलं शहर आपली मुलं मोठी होणार आहेत

    का असा गलिच्छपणा निर्माण करता

    गाडी कधी पाठवायची सांगा

    स्वतःच घर करायच साफ आणि रोडवर कचरा टाकायचा मला कठोर निर्णय घ्यायला लावू नका पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलंय

    स्टेजवर बघा

    मी आणि राजेश टोपेंनी बुस्टरचा डोस घेतला आहे

    जर गरज असेल तर बुस्टर डोस घ्या

    मुंबईमध्ये, रायगड , ठाण्यामध्ये दाट वस्ती आहे कोरोना वाढायला लागला आहे

    आणि काय। होतं आपण दोन वर्ष बघितला आहे

    महाराष्ट्रातला कोरोना नष्ट झालेला नाही

    टेस्टिंग कमी आहे

    मुंबईमध्ये घराघरात कोरोना आहे त्याची तीव्रता कमी आहे

    सोनिया गांधींना कोरोना झाला

    राज ठाकरेंना कोरोना झाल्याचं आपण बघितलं

    त्यातं पण कसं समजलं की  पायाचं ऑपरेशन करायचं होतं तेव्हा समजलं

    त्याची तीव्रता कमी आहे त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या

    अजित पवारांचा सल्ला

    खाजगी पण जिम आहे पण परवडत नाही

    आता 500 रुपये महिना आहे यामध्ये

    आपलं आरोग्य चांगल ठेवण्यासाठी जास्त पैसे लागत नाही मला वाटत

    महापालिका मुदत संपली आहे निवडणूका पुढे गेल्या आहेत

    ओबीसींचा प्रश्न निर्माण झालाय आम्ही चर्चा करतोय

    स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांच्या परीने त्यांना हक्क मिळायला पाहिजे याची काळजी आम्ही घेतोय

    निवडणूकीला संधी कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय

    50 टक्क्यांच्या वर आरक्षण जाणार नाही याची काळजी घेऊन मध्य प्रदेशच्या धर्तीवर आरक्षण देण्याचा प्रयत्न करू

    आम्ही वकिलांशी बोलतोय त्यांच्याशी चर्चा करतोय

    व्यायामाने शरीर चांगलं आहे

    नाहीतर आहे जीम म्हणून लागला व्यायाम करायला

    मात्र लय करणंही चांगलं नाही नाहीतर वर घेऊन जातो

    ही वस्तुस्थिती आहे

    अति व्यायाम करू नका जपून करा अजित दादांचा सल्ला
    रेल्वे विभागाचा निर्णय झालाय त्यामध्ये पुणे आहे

    जिथं रेल्वेच्या जागा आहेत तिथं ते पोलीस बंदोबस्त लावतायेत आणि मोकळी करतायेत

    ते ऐकतचं नाही त्यांची पर्यायी व्यवस्था ते करतील

    आम्ही गरीबांना घरं देण्याचा प्रयत्न करतोय हडपसर परिसरात पाण्याची कमतरता आहे

    लवकर उठून कामाला लागलं तर चांगली सवय

    मी उदया पालखींची बैठक लावली आहे

    संतांच्या पालख्या निघणार आहेत

    दोन वर्ष बसमधून पालखी न्याव्या लागल्या

    आता उत्साह आहे त्यांचं नियोजन करण्याचं काम प्रशासन करेल

    पिण्याचे पाणी, पुणे, सातारा , सोलापूर इथून जात असल्यामुळे आम्ही काळजी घेतोय

    ज्यांना पालखीत जायचंय त्यांनी जावं असं आवाहन वारकरी सांप्रदायाला करतो

  • 04 Jun 2022 07:42 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या नियोजनाला केली सुरुवात

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या नियोजनाला केली सुरुवात

    1 जूलै ते 15 मे पर्यंत असणार शैक्षणिक वर्ष

    दोन वर्षापासून विस्कटलेली घडी सुरळीत करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न

    1 जूलैपासून शैक्षणिक वर्ष सुरू असल्यानं महाविद्यालय सुरू होण्यास विलंब होणार आहे..

    1 जूलैपासून शैक्षणिक वर्ष सुरू करा विद्यापीठाच्या सूचना आहेत..

  • 04 Jun 2022 07:41 AM (IST)

    मास्क न घातल्यास विमान प्रवासास बंदी

    दिल्ली मास्क न घातल्यास विमान प्रवासास बंदी दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश विमानतळ आणि विमानात मास्कचा वापर आणि अन्य कोरोना नियमांचे पालन व्हावे नियमांचे उल्लघंन झाल्यास प्रवाशांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश

  • 04 Jun 2022 07:40 AM (IST)

    नागपूरात पाणीपुरवठा करणाऱ्या ‘ओसीडब्ल्यू’ कंपनीच्या चौकशीचे आदेश

    – नागपूरात पाणीपुरवठा करणाऱ्या ‘ओसीडब्ल्यू’ कंपनीच्या चौकशीचे आदेश

    – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले ‘ओसीडब्ल्यू’च्या चौकशीचे आदेश

    – ‘ओसीडब्ल्यू’ नागपूरात २४ बाय सात पाणीपुरवठा करणारी कंपणी

    – ‘ओसीडब्ल्यू’च्या कामावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाराज

    – मुबलक पाणी असूनंही ‘ओसीडब्ल्यू’कडून पाण्याचं योग्य वितरण नाही

    – ‘ओसीडब्ल्यू’बाबत अनेक जनप्रतिनिधींनी केली गडकरींकडे तक्रार

    – त्रयस्थ संस्थेकडून होणार ‘ओसीडब्ल्यू’ची चौकशी

  • 04 Jun 2022 06:54 AM (IST)

    सोलापुरात वेल्डिंग दुकानात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट

    – सोलापुरात वेल्डिंग दुकानात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट

    – स्फोटामुळे शेजारील दोन ते तीन गाळे जळून खाक

    – सोलापूर शहरातील निराळे वस्ती परिसरातील घटना

    – मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान घडली घटना

    – ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट इतका भयंकर होता की आसपासच्या घराच्या काचा स्फोटाच्या आवाजाने फुटल्या

    – सुदैवाने अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला नाही

    – स्थानिक नगरसेवक देवेंद्र कोठेंनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलासह प्रशासकीय यंत्रणा हलवल्यामुळे मोठा अनर्थ टळला

    – आग आणखी पसरली असती तर शेजारील दुकानात ऑईल-डिझेलच्या डब्यांनी पेट घेतला असता

    – या स्फोटात ऑक्सिजन सिलेंडरच्या टाकीचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाल्याचे पहायला मिळाले

    – सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही

Published On - Jun 04,2022 6:38 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.