Maharashtra News Live Update : जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव राजयगडावर शिवप्रेमींचा जयघोष
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज सोमवार 6 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. किल्ले राजधानी रायगडावर आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी दाखल झाले आहेत. आज हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून शिवप्रेमीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षाच्या काळानंतर हा सोहळा होणार असून रायगडावर जल्लोषाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीराजे आज 8 वाजता रायगडावर होणार दाखल आहेत. पायथ्याला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वरांचे रखडलेले स्मारकाचे काम लवकरच सुरू करणार
मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वरांचे रखडलेले स्मारकाचे काम लवकरच सुरू करणार;
स्मारकासाठी 45 एकर जागा मंजूर झाल्याची पालकमंत्र्यांची माहिती
-
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील इसापूरमध्ये 100 जणांना विषबाबाधा
यवतमाळ- विवाह समारंभमध्ये 100 जणांना विषबाधा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील इसापूर धरण येथील घटना
लग्न लागल्यानंतर जेवणातून विषबाधा झाल्यानंतर अनेकांना उलटी मळमळ सुरू झाली
त्यानंतर बाधित लोकांना शेबालपिप्रि पुसद या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले
-
-
हिंगोली-विवाह सोहळा आटपून आलेल्या 60 ते 70 वऱ्हाडीनां अन्नातून विषबाधा
हिंगोली-विवाह सोहळा आटपून आलेल्या वऱ्हाडीनां अन्नातून विषबाधा
कळमनुरी शहरातील वऱ्हाडीनां विषबाधा
60 ते 70 जणांवर कळमनुरी च्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
-
काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकुरांची शिवसेनेच्या प्रिती बंड यांच्याशी रंगली फुगडी
काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेच्या प्रिती बंड या दोन महिला नेत्यांमध्ये फुगडी आज रंगल्याचे दृश्य आज पाहायला मिळाले.
रुक्मिणीच्या पालखीचे स्वागत समारंभ कारण रुक्मिणीची पालखी ही पंढरपूरला जात
त्यासाठी आज पालखीचे अमरावतीमध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जंगी स्वागत
यावेळी हरिनामाच्या गजरात यशोमती ठाकूर तल्लीन
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या प्रिती बंड यांच्यासोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
-
अखेर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने वादाला तिलांजली
अखेर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने वादाला तिलांजली
जतमधील छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
जतवासियांनी एकत्र येत पुतळ्याची काढली भव्यदिव्य मिरवणूक
-
-
वस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिकमध्ये अडकली शिवसेना आमदारांची बस
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिकमध्ये अडकली शिवसेना आमदारांची बस
– जोगेश्वरीपासून पुढे ट्रॅफिक स्लो मुव्हिंग
– आमदारांना सुरक्षित हाॅटेल रिट्रिटमध्ये पोहोचवण्याचं पोलिसांपुढे आव्हान
-
मी आणि चंद्रकांत खैरे लहान असल्यापासून ऐकतोय की औरंगाबादचा नामकरण संभाजीनगर करणारःइम्तियाज जलील
मी आणि चंद्रकांत खैरे लहान असल्यापासून ऐकतोय की औरंगाबादचा नामकरण संभाजीनगर करणार आहे,
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचे परभणीतील वक्तव्य ,
होय आणि ईडी सीबीआयचा भाजपकडून दुरुपयोग सुरू आहे
संजय राऊत यांच्या वक्तव्याला जलीलांचा परभणीत होकार
राज्यसभे बाबत एमआयएमचा निर्णय पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी घेतील .
-
त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये विश्वस्त आणि लेखा अंतर्गत लेखा परीक्षक यांच्यात वाद
नाशिक – त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये विश्वस्त आणि लेखा अंतर्गत लेखा परीक्षक यांच्यात वाद
एका विश्वस्ताकडून अंतर्गत लेखा परीक्षक शुभम मंत्री यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ
लेखा परीक्षक मंत्री यांची त्र्यंबकेश्वर पोलिसात तक्रार
मंदिराच्या ऑडिट रिपोर्टमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या वादातून झाली धक्काबुक्की
अध्यक्षांनी बोलावली मंदिर विश्वासतांची तातडीची बैठक
-
अभिनेता सलमान खान दुपारी तीन वाजता चित्रीकरणासाठी हैदराबादला निघाले
अभिनेता सलमान खान दुपारी तीन वाजता चित्रीकरणासाठी हैदराबादला निघाले
दुपारी त्यांच्या जबाब नोंदविल्यानंतर चित्रीकरणासाठी निघाले
मुंबई विमानतळावर VIP गेट नंबर 8 वर त्यांचे फोटो आले समोर
-
बीएसएफ शहीद जवान महेश रामा फडवले यांना अखेरचा निरोप
बीएसएफ शहीद जवान महेश रामा फडवले यांना अखेरचा निरोप
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे (माडाचापाडा) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार
सीमासुरक्षा दल व पालघर पोलीसाच्या जवानांची मानवंदना
मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित
-
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा उरकून नगरकडे जाणाऱ्या बोलेरोला ताम्हिणी घाटात अपघात
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा उरकून नगरकडे जाणाऱ्या बोलेरोला ताम्हिणी घाटात अपघात
दुचाकी आणि बोलेरोची धडक
धडकेत दोन जण जखमी
आदरवाडीजवळ घडली घटना
बोलेरोतून नगरकडे 6 जण सोहळा उरकून निघाले असताना झाला अपघात
-
सलमान आणि त्यांचे वडील सलीम खान यांचे जबाब नोंदविले
अभिनेता सलमान खान आणि सलीम खान यांना जिवे ठार मारण्याच्या धमकी प्रकरणातील सलमान आणि त्यांचे वडील सलीम खान यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले
दोनशेहून अधिक सीसीटिव्ही जप्त
लोकल पोलीस आणि क्राईम ब्रांचची या प्रकरणाची चौकशी
पोलिसांच्या दहा टीमकडून या प्रकरणाची चौकशी
-
अमरावती शहरातील लोअर झोनमधील पाणीपुरवठा आजपासून सुरू; पाणी बंद राहणार असल्याची सोशल मीडियावरुन अफवा
अमरावती शहरातील लोअर झोनमधील पाणीपुरवठा आजपासून सुरू
लवकरच संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी दिली.
दरम्यान, काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शहराचा पाणी पुरवठा पुन्हा दोन दिवस बंद राहणार असल्याचा चुकीचा संदेश व्हायरल
नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये.
प्रत्यक्षात शहरातील लोअर झोनमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला आहे
लवकरच सर्व ठिकाणी पुरवठा पूर्ववत
-
गोपीचंद पडळकर हे विकृत राजकीय औलाद; रुपाली पाटील ठोंबरे यांची पडळकरांवर टीका
गोपीचंद पडळकर हे विकृत राजकीय औलाद आहे, राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांची पडळकर यांच्यावर टीका
भाजप नेते पवारांवर बोलू शकत नाही म्हणून पडळकरसारख्या विकृत औलादी पुढे करून तोंडसुख घेतात
भाजपला वारंवार पवारांना टार्गेट करायचं असतं,
नेत्यांना खुश करण्यासाठी करण्यासाठी पडळकर बोलतात
खालच्या पातळीला न जाता जाती पतीचं राजकरण करू नये
अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आवरावं
अन्यथा आमच्याकडूनही जसास तसं उत्तर दिलं जाईल
-
शहीद जवान महेश रामा फडवले यांचे पार्थिव पालघरमधील कऱ्हेमध्ये दाखल
BSF शहीद जवान महेश रामा फडवले यांचे पार्थिव
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे ( माडाचापाडा) या ठिकाणी दाखल
काही वेळात त्यांच्या पार्थिव वर BSF जवान व पोलीस यांच्याकडून शहीद सलामी देऊन स्मशानभूमी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार
-
विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी अमरावती शहरात दाखल
विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी अमरावती शहरात दाखल
काही वेळातच पालखीचे बियाणी चौकात होणार आगमन.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पालखीचं होणार पूजन आणि स्वागत
माता रुक्मिणीच्या पालखीला 427 वर्षाची परंपरा
विदर्भातली सर्वाधिक जुनी पालखी असल्याचा मान.
-
पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ ते दहा मुलांना चावा; परभणीच्या गंगाखेड शहरातील दस्तगिर मोहल्ला येथील घटना
पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ ते दहा मुलांना चावा,
परभणीच्या गंगाखेड शहरातील दस्तगिर मोहल्ला येथील घटना,
हात पाय वर घेतला चावा ,
चावा घेतल्याने मोठा रक्तस्त्राव ,
गंगाखेड रुग्णालयात प्राथमिक उपचार करून , आंबेजोगाई शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले ,
सर्व बालकांवर उपचार सुरू , सर्वांची पृकृती स्थिर
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळाची औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडून पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळाची औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडून पाहणी
पोलीस आयुक्त निखिल गुप्ता सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर दाखल
शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मैदानाची पाहणी सुरू
-
संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली
संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद
केंद्र सरकारचा मोठा निर्णय
संरक्षण मंत्रालयाकडून 76,390 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी
लष्करी उपकरणे आणि सामग्रीसाठी निधी मंजूर
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
भारतीय सैन्यासाठी रफ टेरेन फोर्क लिफ्ट ट्रक्स, ब्रिज लेइंग टँक्स, खरेदी केले जाणार
क्षेपणास्त्रांसह चिलखती लढाऊ वाहने आणि स्वदेशी स्त्रोतांद्वारे रडार शोधणारी शस्त्र खरेदी केली जाणार
-
गोव्यात बेकायदेशीर स्पा सेंटरवर कारवाई; कोल्हापूरच्या चंदगडमधील तरुणांना झाली होती मारहाण
गोव्यात बेकायदेशीर स्पा सेंटरवर कारवाई
कोल्हापूरच्या चंदगडमधील तरुणांना झाली होती मारहाण
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आदेशानंतर पहिली कारवाई
गोवा पोलिसांची पहिली कारवाई
हणजूणमध्ये स्टार्को जंक्शन जवळच्या बेकायदा स्पावर पोलिसांचा छापा
1 महिला आणि 2 पुरुषना घेतले ताब्यात.
-
मालेगावात पावसाचे आगमन; मालेगावकरांना पहिल्या पावसाच्या सरींनी गारवा
मालेगावात पावसाचे आगमन..
मालेगावकरांना पहिल्या पावसाच्या सरींनी गारवा
मालेगाव शहर व परिसरात दमदार एन्ट्री वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी
-
महाविकास आघाडीच्या समन्वयकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बोलावली बैठक
महाविकास आघाडीच्या समन्वयकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता बोलावली बैठक…
– काही अपक्ष आमदारही बैठकीला हजर राहणार
भाजपला शह देण्यासाठी मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये
-
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम हद्दपार
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम हद्दपार
तर श्रीपाद छिंदमसह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी केेले हद्दपार
त्यांच्यावर संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आदेश
छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल
-
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते मुंबईत येणार
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे उद्या मुंबई दौऱ्यावर
मुंबईत होणार आमदारांची बैठक
काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी
-
विदर्भात जुन महिन्यातही तीव्र उन्हाचे चटके; काही ठिकाणी तापमान 47 अशापर्यंत जाण्याची शक्यता
विदर्भात जुन महिन्यातही तीव्र उन्हाचे चटके
विदर्भात उष्णतेची लाट
विदर्भात पुढील दोन दिवस रेड अलर्ट
मान्सून लांबणीवर जाणार का ?.
काही ठिकाणी तापमान 47 अशापर्यंत जाण्याची शक्यता आहे
नागपूर हवामान विभागाचा अंदाज
-
देशांतर्गत विभागलेला भारत बाहेरून कमकुवत; राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका
राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका
देशांतर्गत विभागलेला भारत बाहेरून कमकुवत-राहुल
भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेने भारत एकाकी पडला
जागतिक स्तरावर भारताचे स्थान खराब
अरब राष्ट्रांकडून आलेल्या प्रतिक्रियेनंतर राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका
-
अल्पसंख्यांक मंत्रालय इतिहासजमा होणार ?; पंधरा वर्षांपूर्वी मुस्लिम समाजासाठी युपीए सरकारने सुरू केलं होतं अल्पसंख्यांक मंत्रालय
नवी दिल्ली
अल्पसंख्यांक मंत्रालय इतिहासजमा होणार ?
मुक्तार अब्बास नकवी यांची खासदारकी शेवटची ठरण्याची शक्यता
नकवी यांना राज्यसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीत तिकीट नाही
अल्पसंख्यांक मंत्रालय बंद करण्याची हालचाल, केंद्र सरकारकडून अंतिम निर्णय घेतला जाणार
पंधरा वर्षांपूर्वी मुस्लिम समाजासाठी युपीए सरकारने सुरू केलं होतं अल्पसंख्यांक मंत्रालय
नकवी यांच्यावर भाजप पक्ष अन्य जबाबदारी देण्याची शक्यता
-
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक केलं जाण्याची शक्यता
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधन कारक केलं जाण्याची शक्यता आहे
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणे अपेक्षित
-
मनमाडमध्ये डोंगरावरुन जेसीबी पडून चालक ठार; अंकाईजवळील घटना
डोंगरावरून जेसीबी खाली पडून चालकाचा जागीच झाला मृत्यू
मनमाडच्या अंकाई जवळील घटना
-
आठ तारखेला आम्ही न्यायालयामध्ये हजर राहू आमदार रवी राणा यांची माहिती; शिवसेना उमेदवाराच्या पराभवाच्या भीतीने आम्हाला नोटीस
आठ तारखेला आम्ही न्यायालयामध्ये हजर राहू आमदार रवी राणा यांची माहिती….
शिवसेना उमेदवाराच्या पराभवाच्या भितीने आम्हाला नोटीस दिली आहे.
माझ्या संपर्कात असलेले अपक्ष आमदार मोठ्या ताकतीने भाजपला मतदान करेल.
मला राज्यसभा निवडणूकीच्या तोंडावर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले…
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने माझ्यावर दबाव आणून महाविकास आघाडीला मी मतदान करावे म्हणून माझ्यावर नोटीसच्या माध्यमातून दबाव टाकला जातो आहे…
माझ्या अपक्ष आमदारांसोबत होत असलेल्या भेटी थांबण्यासाठी दबाव आहे.
-
जे हनुमानाचे झाले नाही ते रामाचे काय होणार? आमदार रवी राणांचा खोचक सवाल
जे हनुमानाचे झाले नाही ते रामाचे काय होणार.?.
खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन आमदार रवी राणांचा खोचक सवाल
तुम्ही कितीही अयोध्याला गेले, कितीही राजकिय दौरे केले तरी येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकामध्ये हनुमान भक्त राम भक्त उद्धव ठाकरेंना धडा शिकवणार.
संजय राऊत यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आमदार रवी राणा यांची टीका
-
धनंजय मुंडे यांची तब्येत बरी नाही, त्यामुळे पुढील सर्व नियोजित दौरे रद्द
धनंजय मुंडे यांची तब्येत बरी नाही, त्यामुळे पुढील सर्व नियोजित दौरे रद्द
-सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची तब्येत बरी नसल्याची माहिती
त्यामुळे त्यांचा परभणी दौरा रद्द, रात्रीपासूनच त्यांना ताप आणि पोटात दुखी असल्याने त्यांचे पुढील नियोजित कार्यक्रम रद्द
सध्या त्यांच्यावर परळी इथल्या राहत्या घरी उपचार सुरू
काल त्यांनी राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानात सहभाग घेतला होता.
यावेळी जास्त धावपळ झाल्याने त्यांची तब्येत बरी नसल्याचं सांगण्यात आले.
-
गोपीचंद पडळकरांची आपली लायकी बघून बोललं पाहिजे; मावळचे आमदार सुनील शेळकेंची टीका
मावळ,पुणे
-गोपचंद पडळकर जी वक्तव्य करत आहेत ती जाणीवपूर्वक करत आहेत
-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कुठलंही वक्तव्य केल तरी जनता ते स्वीकारत होते
-बाळासाहेब ठाकरे जे वक्तव्य केले ते लायकी नसलेल्या पडळकराना आणि युवकांना शोभत नाही
-गोपीचंद पडळकरांची आपली लायकी बघून बोललं पाहिजे
-गोपीचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीसांना गुरू मानलं आहे, फडणवीसानी आत्मचिंतन करण्याची गरज,आपल्या पिलावळीना समजून सांगितलं पाहिजे
-आपल्याला विधानपरिषद दिली म्हणून उगाच कुणावर तोंड टाकायचं ही महाराष्ट्रची संस्कृती नाही
-आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये किंमत नाही, विधानसभेत काय दिवा लावला हे महाराष्ट्राला माहिती आहे डिपॉझिट जप्त करते
-तुमची लायकी असलं तर एकदा मावळत येऊन उभ राहा तुम्हाला तुमची लायकी समजेल
-पडळकरासारख्या बेताल आणि चाभरेपणानं बोलणाऱ्यांवर लक्ष देऊ नका, त्याचा मागे असलेलं ज्याची तडफड सुरू असलेल्या फडणवीसना सांगा ही महाराष्ट्रची संस्कृती नाही
-राजकीय दर्जा खालावत चालण्यामागचा सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे,
ही आपली संस्कृती आणि राजकारण नव्हतं,महविकास आघाडीच काम सुरू आहे त्यावरून लक्ष विचलित करण्याच आणि देशातील महागाई, बेरोजगारी ह्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची रणनीती आहे
-
नाशिकच्या मुंगसरे गाव परिसरात बिबट्याची दहशत; पाळीव कुत्र्याचा बिबट्याने पाडला फडशा
नाशिकच्या मुंगसरे गाव परिसरात बिबट्याची दहशद -पाळीव कुत्र्याचा बिबट्याने पाडला फडशा – बिबट्याने कुत्र्यावर केलेला हल्ला CCTV कॅमेऱ्यात कैद – परिसरातील नागरिक भयभीत – बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
-
भंडाऱ्यातील मोहाडीत मानसिक रुग्न महिलेने मंदिरात केली चोरी;हनुमानाच्या चांदीचा डोळा चोरला
मानसिक रुग्न महिलेने मंदिरात केली चोरी
– हनुमानाच्या चांदीचा डोळ्याची चोरी
– जिल्ह्यातील मोहाडीची घटना सीसीटिव्हीत कैद
– मंदिरात कोणीही उपस्थित नसल्याने केले कृत्य
– पुजारी मंदिरात आल्यावर ही घटना उघड
दरम्यान संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद
चोरी करतानाचा सीसीटिव्हीत फुटेज सोशल मीडियावर व्हायरल
-
मनसेच्या पदाधिकऱ्यांचा अयोध्येत पक्षाच्या झेंड्यासह गाडीने फेरफटका
संपूर्ण अयोध्येत मनसेच्या झेंड्यासह गाडीने प्रवास
पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचा केला जयघोष
प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन
शरयु नदीच्या तिरी आरतीमध्ये झाले सहभागी
तीन तारखेपासून मनसे पदाधिकऱ्यांचा अयोध्येत रामधाम हॉटेलमध्ये केला मुक्काम
मुंबईचे राहुल निखारगे, सुरेंद्र मुंडे, ऍड संतोष शिंदे, डॉ जगन्नाथ पाटील गेले होते अयोध्येला
प्रकृती अस्वास्थ्य आणि राजकीय कारणामुळे राज ठाकरेंनी 5 जूनला घोषित केलेला अयोध्या दौरा केला होता स्थगित
स्थानिक भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी केला होता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध
उत्तर भारतीयांची माफी मागितल्यानंतरच राज्यात प्रवेश करण्यास परवानगी देऊ अशी घेतली होती ताठर भूमिका
-
भंडारा : मानसिक रुग्न महिलेने मंदिरात केली चोरी
हनुमानाच्या चांदीचा डोळा नेला चोरुन..
जिल्ह्यातील मोहाडीची घटना सीसीटिव्ही कैमेरात कैद.
मंदिरात कोणीही उपस्थित नसल्याने तिने है कृत्य केले आहे.
पुजारी मंदिरात आल्यावर ही घटना उघड़ झाली आहे.दरम्यान संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली.
चोरी करतांना चा सीसीटिव्हीत पुटेज सोशल मीडिया वर प्रचंड वायरल झाली आहे.
-
औरंगाबाद : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तीन दुकानांचे परवाने रद्द
कन्नड तालुक्यातील तीन दुकानांचे परवाने रद्द
गणेश कृषी सेवा, प्रगती कृषी सेवा आणि प्रशांत कृषी सेवा या तीन दुकानांचे परवाने रद्द
चढ्या दराने केली जात होती खते बी बियाण्यांची विक्री
-
BSF जवान महेश रामा फडवले यांचे पार्थिव त्यांच्या गावी आज 4 वाजता पोहचणार
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे हे BSF जवान महेश रामा फडवले यांचे गाव
माडाचापाडा गावी त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केले जाणार
BSF जवान महेश रामा फडवले ‘जी’ कोय 58 बीएन बीएसएफचे बीएन मुख्यालय 58 माधोपूर येथे कर्तव्य बजावत होते
पोर्टआउटमध्ये झोपले असताना त्यांच्या डाव्या हाताला साप चावला होता
पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर, उपचारदरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले होते
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा वापर करत आहेत : आमदार रवी राणा
मला राज्यसभा निवडणूकीच्या तोंडावर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने माझ्यावर दबाव आणून महाविकास आघाडीला मी मतदान करावे म्हणून माझ्यावर नोटीसच्या माध्यमातून दबाव टाकला जात आहे.
माझ्या अपक्ष आमदारांसोबत होत असलेल्या भेटी थांबण्यासाठी दबाव
मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही शिवसेनेचा उमेदवार पराभूत होईल आणि भाजपचा उमेदवार निवडून येईल ही काळया दगडावरची रेघ
नोटीस आल्यानंतर आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
-
शार्ट सर्किटमुळे टायरच्या दुकानाला लागली भीषण आग
जवाहरनगर ठाना येथील घटना
आगिची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा पाचारन करण्यात आले 4
तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश
-
रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला 80 वर्षांच्या आजींची हजेरी
कोल्हापूराच्या पद्मावती पाटील असं आजीचं नाव
राज्यभिषेक सोहळ्यासाठी आलीय आनंद वाटतीये असं आज्जी आत्मविश्वासानं सांगतायेत
दरवर्षी येत राहीन शिवाजी महाराजांच दर्शन घेतलंय आनंद वाटतंय
छत्रपती संयोगिताराजे भोसले यांनीही विचारपूस करत कौतुक केल्याचं आज्जीबाई सांगतायेत
शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत आज्जीबाईनं सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं
-
तर असली नकलीचा फैसला हा जनता करेल : खासदार संजय राऊत
15 जुन अयोध्येला असली येतोय असे खासदार संजय राऊत म्हणाले
तर असली नकलीचा फैसला हा जनता करेल
-
शहीद विपुल इंगवले यांना त्यांचे बंधू विशाल इंगवले यांनी दिला मुखाग्नी
सातारा: शहीद विपुल इंगवले यांना त्यांचे बंधू विशाल इंगवले यांनी दिला मुखाग्नी
-
आज महाविकास आघाडी आमदार बैठक आहे
हसन मुश्रीफ –
– आज महाविकास आघाडी आमदार बैठक आहे
– आशा बैठक घेऊन मतदान घेतलं जातं ते सागितले जात
– आमदारांना समजून देण्यासाठी आशा बैठका घेतल्या जातात
– महाविकास आघाडी शी सर्व आमदार चा संबंध आला आहे
– दोन्ही उमेदवार कोल्हापूर चे आहेत
– निकाल लागेपर्यंत सर्व पक्ष आपण विजय होईल अस सागितले जाते
– मुख्यमंत्री आमचा म्हणणं गैर नाही त्या कार्यकर्त्याच्या भावना असते
-
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी
एमआयएम पार्टी राज्य सरकारवर नाराज असल्याचं केलं स्पष्ट
राज्य सरकार निधी वाटपात पक्षपात करत असल्याचा केला आरोप
एमआयएमच्या आमदारांना किंवा खासदारांना निधीच देत नसल्याचं केलं स्पष्ट
राज्यसभा निवडणुकीत एमआयएम सरकारवर नाराज असल्याचं स्पष्ट
एमआयएम राज्यसभा निवडणुकीत कुणाला मतदान करणार यावरून उलट सुलट चर्चा सुरू
असदुद्दीन ओवैसी याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे केले स्पष्ट
-
आंदोलनाची रूपरेषा आम्ही सगळे मिळून ठरवू – सदाभाऊ खोत
– आंदोलनाची रूपरेषा आम्ही सगळे मिळून ठरवू – ज्यावेळी इन्कम टॅक्स च्या धाडी पडल्या तेव्हा पणन खात माझ्याकडे होत – मी जिल्हाधिकारी यांना सांगितलं कीं मार्केट सुरू कराच्या असतील तर धाडी थम्बवाव्या लागतील – अधिकारी म्हणाले वरून आदेश आहेत – मी म्हणालो की आता माझा आदेश पण घ्या आणि धाडी थांबवा – अन्यथा धाडीला आलेल्या अधिकाऱ्यांना चोर आल्याप्रमाणे मारा अस मीच सांगितलं हो – त्याकाळी आम्ही कांद्याला 2 रुपये अनुदान दिले – सगळे केंद्राने करायचं – मग काही काळ हे राज्य केंद्राला चालवूनद्या – खुळा राजा आणि गर्भगळीत झालेली जनता अशी राज्याची परिस्थिती
-
विकास आणि त्यासंबंधीचे योगदान महत्वाचे आहे
– विकास आणि त्यासंबंधीचे योगदान महत्वाचे आहे
– त्यासंबंधीचे काम आज ज्यांचा सत्कार तुम्ही केला आहे
– ज्या कागलमधून निवडून येतात, त्यांचा समाज 10 टक्के पण नाही,
– त्यांच्या विरोधात एका मोठा घरण्यातला माणूस उभा राहतो,
-
मुंबई राणा दांपत्याला मुंबई पोलिसांची नोटीस
मुंबई राणा दांपत्याला मुंबई पोलिसांची नोटीस
8 जून ला हजर राहण्याचे आदेश
मुंबई पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार
वांद्रे न्यायालयात राणा दाम्पत्याला हजर राहण्याचा आदेश
आमदार रवी राणा राज्यसभेसाठी मतदान करणार का ??
-
शहीद जवान विपुल इंगवलेंना अखेरचा निरोप
शहीद जवान विपुल इंगवलेंना अखेरचा निरोप
सातारा जिल्ह्यातील भोसे गावचा जवान शहीद झाला
कोरेगाव तालुक्यातील भोसे गावचे विपुल दिलीप इंगवले यांना आले वीरमरण….
सियाचीन येथे -39°सेल्सिअस मध्ये ऑपरेशन मेघदुत बजावत असताना शहीद विपुल इंगवले यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी केले होते रुग्णालयात दाखल ….
पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये मागील एक वर्षापासून सुरू होते उपचार….
आज उपचारादरम्यान कमांड हॉस्पिटल मध्ये घेतला अखेरचा श्वास…
-
पालकमंत्री शिवसेना आमदारांना वाईट वागवतात – चंद्रशेखर बावनकुळे
– आ. आशिष जैस्वाल यांनी मंत्री टक्केवारी मागत असल्याचा गंभीर आरोप केलाय. याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यासोबतंच EOW आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी
– फक्त आ. आशिष जैस्वाल नाही तर शिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज
– अडीच वर्षांत शिवसेनासह महाविकास आघाडीचे आमदार नाराज आहे. कारण मंत्री सेना आमदारांना पैसे देत नाही
– निधी मिळत नसल्याने आमदारांमध्ये प्रचंड मोठा असंतोष
– पालकमंत्री शिवसेना आमदारांना वाईट वागवतात
– सेना आमदारांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेतात पण त्यांना बोलवत नाही
– या सरकारचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही, त्यामुळे त्यांना ते डांबून ठेवतायत.
– आमदार नाराज असल्याने राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या विरोधात आमदार मतदान करणार, अशी भिती महाविकास आघाडीला आहे. म्हणुन आमदारांना मुक्कामानं बोलावलंय
-
विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळानंतर शेकडो विद्यार्थी विद्यापीठात दाखल
विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळानंतर शेकडो विद्यार्थी विद्यापीठात दाखल
परीक्षेचे सेंटर बदलल्यामुळे शेकडो विद्यार्थी विद्यापीठात दाखल
वेगवेगळ्या सेंटर्सवर केली विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था
प्रत्येक पेपरसाठी दिले वेगवेगळे सेंटर्स
एकाच विद्यार्थ्याला अनेक सेंटर्स दिल्यामुळे विद्यार्थी विद्यापीठात दाखल
-
राज्यसभा निवडणूकीसाठी काँग्रेसचेही सावध पावलं
– राज्यसभा निवडणूकीसाठी काँग्रेसचेही सावध पावलं
– काँग्रेस आमदारांना १० तारखेपर्यंत तयारीने येण्याचे आदेश
– विधानसभेच्या मुख्य प्रतोद यांनी पाठवले सर्व आमदारांना मॅसेज
– मुंबईत उद्या ट्रायडेंट येथे सर्व काँग्रेस आमदारांची बैठक
– बैठकीनंतर काँग्रेस आमदारांना हॅाटेलमध्येच ठेवणार
-
इथं जे हवा तयार करीत आहेत, त्यांना महाराष्ट्रातलं राजकारण चांगलं माहित आहे – संजय राऊत
ही उर्जा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जातो
आयोध्येला जाऊन या…
पंधरा तारखेला आदित्य ठाकरे येणार आहेत
ते पत्रकारांशी बोलतील
हे आमचं राजकीय कार्यक्रम नाही
आमचा श्रध्देचा विषय आहे
त्यांचं स्वत एक नेतृत्व आहे
पैलवान आहेत, ते कुणाच्या दबावाखाली येऊ शकत नाही
जी गोष्ट नेत्याजींनी केली आहे.
तो प्रश्न तुम्ही भाजपच्या नेत्यांना विचारा
हमारे साथ काम करते है
इथं जे हवा तयार करीत आहेत, त्यांना महाराष्ट्रातलं राजकारण चांगलं माहित आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत
भारतीय समर्थन पक्षाची लोक सुद्धा नाराज आहेत
१० तारखेला समजेल कोण कोणासोबत आहे
आयोध्येला दर्शनासाठी आम्ही आलो आहोत
आम्ही सुध्दा प्रयत्न करू
थोडा वेळ लागेल, पण आम्हाला नक्की यश मिळेल…
काश्मीरमधील अनेक पंडीतांनी घर सोडली आहेत
त्यांना लागत असलेली गरज आम्ही करू
राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्यांना मारण्यात आलं आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरती याची चर्चा आहे.
-
भव्य राम मंदीर उभ राहत आहे, त्याचं स्वागत प्रत्येकाने करायला हवा – संजय राऊत
काही लोकांनी वातावरण गढूळ केलं
१५ तारखेला ते येणार आहेत
मंदीराचं काम सुरू आहे, त्या ठिकाणी जातील
याच राजकारण अजिबात नाही
इथं आता राजकारण करू नये,
भव्य राम मंदीर उभ राहत आहे, त्याचं स्वागत प्रत्येकाने करायला हवा
आम्ही त्या जागेशी भावनिकदृष्ट्या जोडलो आहे
जेवढ्या वेळी येऊ, तेवढ्यावेळी प्रेरणा मिळते
खूप सारे बदल पाहायला मिळाले
काम जोरात सुरू आहे, तिथं आम्ही जाऊन आलो…
त्यांच्या दौऱ्यासाठी आम्ही सर्व…तयार आहोत
शिवसेना आणि आयोध्या एक वेगळं नातं तयार झालं आहे
-
शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवस्वराज्यभूषण पुरस्कार वितरण सोहळा
– शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवस्वराज्यभूषण पुरस्कार वितरण सोहळा,
– शरद पवारांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण,
– ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात येणार पुरस्कार,
-
गायक सिंधू मूसेवाला हत्या प्रकरण
नवी दिल्ली
गायक सिंधू मूसेवाला हत्या प्रकरण
पोलिसांनी पाच शूटर्सना घेतलं ताब्यात
हरियाणा आणि पंजाब मध्ये पोलिसांची कारवाई
सीसीटीव्ही कॅमेरा आणि चौकशी आधारे पाच शूटर्स ताब्यात
आठ जणांनी मूसेवाला याची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय
अजूनही 3 शूटर्स पकडण्यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न
-
नैसर्गिक आपत्तीमुळे भारतात 1700 जणांचा मृत्यू
नैसर्गिक आपत्तीमुळे भारतात 1700 जणांचा मृत्यू
वर्षभरात 1700 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
सर्वाधिक मृत लोकांची संख्या महाराष्ट्रात
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात 350 जणांचा नैसर्गिक आपत्ती मध्ये मृत्यू
ओडिशामध्ये 223 तर मध्यप्रदेशमध्ये 191 जणांचा मृत्यू
सेंटर फॉर सायन्स अँड इन्व्हरमेंट आणि डाऊन टू अर्थने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून आकडेवारी समोर
पाऊस महापूर भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मृत्यू
-
गोपीचंद पडळकर ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली विषारी कीड
गोपीचंद पडळकर ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली विषारी कीड
राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांची गोपीचंद पडळकर यांच्यावर टिका
जास्तीत जास्त अश्लाघ्य कसं बोलता येईल आणि स्वतः पहिल्यांदा बोललेलं रेकॉर्ड पुढच्यावेळी अजून घाणेरडे बोलून कसे मोडता येईल असा या व्यक्तीचा प्रयत्न असतो
अशा प्रकारांची वक्तव्य करून हे भाजपची आणि स्वतःची लायकी दाखवतात
तुमची अश्लाघ्य बडबड बंद करा थांबली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जसा तसे उत्तर देईल
-
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे गावचे सुपुत्र शहीद विपुल इंगवले यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार
सातारा
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे गावचे सुपुत्र शहीद विपुल इंगवले यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार…
भोसे गावात शोकाकुल वातावरण….
अकरा वाजेपर्यंत पार्थिव गावात होणार दाखल….
अंत्यविधीच्या तयारीसाठी भोसे ग्रामस्थ एकवटले…
शहीद विपुल इंगवले यांना सियाचीन येथे कर्तव्य बजावत असताना झाली होती दुखापत
पुणे येथील कमांड हॉस्पिटल या ठिकाणी उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
शहीद विपुल यांच्या पश्चात आठ महिन्यांची मुलगी, पत्नी, आई, वडील असा परिवार
-
संजय राऊत एकनाथ शिंदे राम लल्लाच्या दर्शनाला
त्यांची बांधणी करण्यासाठी मी येतो आले आहे
त्याचं स्वागत होताना दिसेल
संजय राऊत एकनाथ शिंदे राम लल्लाच्या दर्शनाला
आयोध्येत आदित्य ठाकरे येणार आहेत
त्याच्या आगोदर पाहणी दौरा आम्ही करतोय
पंधरा तारखेला येणार आहेत
इथं आल्यानंतर ते पत्रकारांशी देखील संवाद साधतील
बृजभूषण सिंग हे युपीतले मोठे नेते आहेत
खरे नेते पंधरा तारखेला येत आहेत, नकली कोण नेते आहेत आम्हाला माहित नाही
वादविवाद का होता, त्याच्या मागे कोणाची ताकद आहे हे सगळ्यांना माहित आहे.
-
सोलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी महिला प्रदेश सचिव विद्या लोलगेंसह दोघांविरुध्द गुन्हा दाखल
सोलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी महिला प्रदेश सचिव विद्या लोलगेंसह दोघांविरुध्द गुन्हा दाखल
– घरगुती वापराचा गॅस कमर्शिअल टाक्यांमध्ये भरुन बेकायदा विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी दाखल झाला गुन्हा
– विद्या लोलगेंसह जाकीर अब्दुल सत्तार सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल
– यातील जाकीर अब्दुल सत्तार सय्यद याला पोलिसांनी केली अटक
– सोलापूर शहर गुन्हे शाखेच्यावतीने ही कारवाई करण्यात आलीय
– शहरातील सिध्देश्वर नगर येथे एका मंगल कार्यालयाशेजारी बेकायदेशीर गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली
– त्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्या गोडाऊनवर धाड टाकली असता त्यात 40 भरलेल्या गॅस टाक्या तर रिकाम्या 39 टाक्या आढळून आल्या
– या धाडीत 1 लाख 38 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
– गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांनी याबाबत फिर्याद दिली
– एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय
-
शिवसेना आमदारांना आजचं मुंबईत दाखल होण्याचा आदेश
निवडणुकीतील घोडेबाजार रोकण्यासाठी शिवसेनेकडून खबरदारी
शिवसेना आमदारांना आजचं मुंबईत दाखल होण्याचा आदेश
-
राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा देणं हा भावनिक विषय होता, राजू पाटील आले रायगडावर दर्शनाला
भविष्यात छत्रपती घराण्याची सेवा करण्याची संधी मिळाली तर मी करेन
राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठिंबा देणं हा भावनिक विषय होता
मात्र महाराष्ट्रातील राजकारणानं संधी मिळाली नाही
पुढचं मतं कोणाला द्यायच याचा निर्णय राज ठाकरे घेतील
राजू पाटील यांची टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया
राजू पाटील आले रायगडावर दर्शनाला
-
निवडणुकीतील घोडेबाजार रोकण्यासाठी शिवसेनेकडून खबरदारी
निवडणुकीतील घोडेबाजार रोकण्यासाठी शिवसेनेकडून खबरदारी
शिवसेना आमदारांना आजचं मुंबईत दाखल होण्याचा आदेश
-
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेचा तिसरा टीजर जारी
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेचा तिसरा टीजर जारी
होय हे संभाजीनगरच
हिंदुत्वाचा हुंकार ऐकायलाच हवा
देव देश आणि धर्म हेच शिवसेनेचे मर्म सांगणारा टीजर जारी
8 जून रोजीच्या उध्दव ठाकरे यांच्या सभेचा तीसरा टीजर जारी
-
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू
सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेची 60 टक्के तयारी पूर्ण
सभेचा मंच आणि असनव्यवस्थेचे काम 60 टक्के झाले पूर्ण
सभेसाठी बॅरिगेटिंगचेही काम 100 टक्के पूर्ण
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेसाठी आता फक्त 2 दिवस शिल्लक
उद्या सायंकाळ पर्यंत सभेची तयारी होणार पूर्ण
-
धडगाव पंचायत समितीच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला १० वाजता सुरुवात होणार
नंदुरबार फ्लॅश :- धडगाव पंचायत समितीच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला १० वाजता सुरुवात होणार असून एकूण ०४ फेरी होणार आहे.
०४ टेबल लावण्यात आलेला आहे. मतमोजणीसाठी २० कर्मचारी नेमणूक करण्यात आलेले आहे. तर पोलिस फौजफाटा देखील करण्यात आलेला आहे…
-
वसई विरार मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले
– वसई विरार मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले
– काल एकाच दिवसात 45 कोरोना पॉझिटिव्ह रुगणाची नोंद
-आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची एकूण संख्या 97547
– काल एका दिवसात कोरोनातून बरे झालेले रुग्ण 05
– आत्तापर्यंत किरोनातून बरे झालेल्या एकूण रुगणाची संख्या 95335
– वसई विरार नालासोपारा हद्दीत एकूण उपचार घेत असलेल्या कोरोना रुगणाची संख्या 133
-
मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील ट्रेकर्सच्या ट्रॅव्हलला अपघात
सातारा:मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील ट्रेकर्सच्या ट्रॅव्हल ला अपघात
अपघातात ट्रॅव्हल्स मधील ड्रायव्हर झाला गंभीर जखमी
प्रशिक्षणासाठी गेलेले शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि महाबळेश्वर ट्रॅक्टरचे 51 ट्रेकर्स सुखरूप
दोन बसचा समोरासमोर अपघात…
हिमाचल प्रदेश मधील मंडी येथे झाला अपघात
-
नाशिक जिल्ह्यात आठ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
– नाशिक जिल्ह्यात आठ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
– नाशिक शहरात आढळते चार रुग्ण
– ग्रामीण आणि जिल्हा बाह्य दोन रुग्णांचा समावेश
– मागच्या 24 तासात केली तीन कोरोना वर मात
-
छत्रपती संभाजीराजेंच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष : राजकीय घडामोडींवर नेमके काय बोलणार ?
छत्रपती संभाजीराजेंच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष : राजकीय घडामोडींवर नेमके काय बोलणार ?
छत्रपती संभाजीराजे यांनी मागील महिन्यात स्वराज्य या नावाने संघटना स्थापन करीत असल्याची घोषणा केली. सोबतच ही संघटना भविष्यात राजकीय पक्ष देखील होऊ शकते, असे सूतोवाचही त्यांनी केले. यावेळी संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा देखील केली होती. राजेंच्या या घोषणेनंतर पुढचे काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते.
-
रत्नागिरी- कोकण किनारपट्टीवरती अद्यापही मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे नाहीत
रत्नागिरी- कोकण किनारपट्टीवरती अद्यापही मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे नाहीत
समुद्र अजून ही शांत, अरबी समुद्र किनारपट्टी भागात फक्त वेगवान वारे
समुद्रकिनारी मॉन्सून सदृश्य कुठलीच हालचाल नसल्याने मॉन्सून लांबण्याची चिन्हे
तळकोकणातून महाराष्ट्रात होते मान्सूनची एन्ट्री
-
गडचिरोली जिल्ह्यात तेंदू संकलनातून मिळणार 450 कोटीचा महसूल
गडचिरोली जिल्ह्यात तेंदू संकलनातून मिळणार 450 कोटीचा महसूल
गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यात सर्वात जास्त रोजगार देणारा तेदु संकलन
पेसा कायदा लागू असल्याने अनेक ग्रामपंचायत चा मिळाला हा महसूल
जिल्ह्यातील 54 टक्के आदिवासी यांना मिळाला तेदु संकलनाचा रोजगार
एक ते दीड महिन्यात चालणाऱ्या या व्यवसायामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात या व्यवसायातून उत्पन्न घेत असतात
-
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेले सादलगावाने देखील विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा निर्णय घेतलाय
-पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेले सादलगावाने देखील विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा निर्णय घेतलाय
-विधवा प्रथेला हद्दपार करण्यासाठी गावातील महिलांनी खास ग्रामसभेचा आयोजन करत हा निर्णय बहुमताने घेतलाय
-पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकी पुसणे,जोडवी तोडणे,मंगळसूत्र काढणे,बांगड्या फोडणे यासारख्या प्रथा सुरू होत्या ह्या निर्णयामुळे आता विधवा प्रथेला मूठमाती मिळणार आहे
-
निवडणुकीत दोन उमेदवारत लढत झाली असुन एकूण ७२ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.
वाशिम जिल्ह्यातील एकमेव ब्राह्मणवाडा पंचायत समिती गणाच्या सदस्य पदासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचे मतदान काल शांततेत पार पडले.
या निवडणुकीत दोन उमेदवारत लढत झाली असुन एकूण ७२ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.
आज सकाळी १० वाजता पासून मतमोजणीला होणार सुरुवात…
-
युपीएससीच्या पूर्व परीक्षेला 50 टक्के उमेदवारांनी मारली दांडी..
युपीएससीच्या पूर्व परीक्षेला 50 टक्के उमेदवारांनी मारली दांडी..
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आली परीक्षा..
शहरातील 33 केंद्रांवर संपन्न झाली पूर्वपरीक्षा..
परीक्षेला 50 टक्के उमेदवारांनी दांडी मारल्याने भवितव्याच्या गांभीर्याचा प्रश्न निर्माण..
विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे कारण अस्पष्ट..
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बोपोडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
पिंपरी चिंचवड
-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बोपोडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
-या कार्यक्रमामध्ये 148 रक्तदात्यां महिला आणि पुरुषांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली
-सामाजिक बांधिलकी जपत बोपोडी मधील चंद्रमा सेवाभावी संस्था व समृद्धी गणेश मंडळ रक्तदानाचे आयोजन केले होते
-
शिल्लक राहिलेल्या उसाला एकरी एक लाखाचे अनुदान द्या
– शिल्लक राहिलेल्या उसाला एकरी एक लाखाचे अनुदान द्या,
– ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक,
– शिवाय 15 एप्रिलपासून गाळपास गेलेल्या उसाला हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान देण्याचीही मागणी,
– राज्यात चालू वर्षी ऊस गाळपाचा अंदाज आणि वेळेत गाळपाचे नियोजन होऊ शकलेले नाही.
– काही जिल्ह्यांत शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-
नागपूर जिल्ह्यात वाढवतोय कोरोना रुग्णसंख्येचा ग्राफ
– नागपूर जिल्ह्यात वाढवतोय कोरोना रुग्णसंख्येचा ग्राफ
– गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत ४५ टक्क्यांनी वाढ
– आठवडाभरात ३६ नव्या कोरोना रुग्णांची भर
– सध्या नागपूरात कोरोनाचे ३२ नवे रुग्ण
– शहरात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क घालणे गरजेचं
-
राज्यात हवेचा दाब अनुकूल नसल्यानं मान्सून अरबी समुद्रातच थबकला
– राज्यात हवेचा दाब अनुकूल नसल्यानं मान्सून अरबी समुद्रातच थबकला,
– हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी तो महाराष्ट्रात दाखल होणे अपेक्षित होते,
– राज्यात हवेचा दाब 1006 हेक्टा पास्कल आहे, ते 1004 होईपर्यंत मान्सूनला गती मिळणार नसल्याचे संकेत,
– 6 ते 9 जूनपर्यंत कोल्हापूर, पुणे शहरांसह राज्यातील 13 जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा हवामान विभागाचा इशारा.
-
नागपुरचा कुख्यात गँगस्टर आबू खानला भंडाऱ्यातून अटक..
नागपुरचा कुख्यात गँगस्टर आबू खानला भंडाऱ्यातून अटक..
40 हून अधिक गंभीर दाखल आहे गुन्हे.मकोका लागल्याने होता फरार.
नागपूर शहराच्या ताजबाग जवळील अमजद हुसेन या व्यक्तीच्या तर सहा दुकानांवर त्याने यांच्या बळजबरीने ताबा मिळविला होता.
हुसेन यांच्या तक्रारीनंतर आबू व त्याचे भाऊ अमजद व शहदाजा खान यांच्याविरोधात मकोका लावण्यात आला होता। तेव्हापासून आबू फरारच होता.
मार्च महिन्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून त्याच्या भावांना अटक केली होती.
– नागपुर पोलिसांनी त्याला भंडारा येथून अटक करण्यात आली.यात भंडारा पोलिसांची भूमिका महत्वाची आहे हे
-
राज्यातील शिल्लक ऊस 12 जूनपर्यंत संपवणार
– राज्यातील शिल्लक ऊस 12 जूनपर्यंत संपवणार,
– सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची ग्वाही,
– राज्यात चालू वर्षीच्या हंगामात शेवटच्या टप्प्यातील जेमतेम दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप बाकी,
– सद्य:स्थितीत 1 हजार 318 लाख मेट्रिक टन इतके उच्चांकी ऊसगाळप पूर्ण,
– गतवर्षापेक्षा ते 305 लाख मेट्रिक टनांनी अधिक.
-
श्री. संत गजानन महाराज यांची पालखीचे पंढरपूर करिता आज होणार प्रस्थान
श्री संत गजानन महाराज यांची पालखीचे पंढरपूर करिता आज होणार प्रस्थान ,
यंदा श्रींच्या पालखीचे हे 53 वे वर्ष..
अमरावती- विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा ‘श्री’चा पालखी सोहळा पंढरपूर च्या विठ्ठलाच्या भेटीला पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज, अश्वासह काही वेळात निघणार आहे … श्रींच्या पालखीचे हे 53 वे वर्ष असून या पालखी सोबत 700 वारकरी सहभागी झाले असून एकूण १२७५ चा किलोमीटरचा प्रवास करीत विठ्ठलाच्या जयघोषात २ महिन्यात पूर्ण करणार आहेत… संपुर्ण राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे…शेगाव येथील श्री गजानन संस्थानचे हि १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी खंड न पडता सुरु आहे… मात्र कोरोना काळात दोन वर्ष पायी वारी बंद होती.. पंढरपूर च्या विठ्ठलाचे आषाढी एकादशी ला दर्शन घेऊन पालखी परत शेगांव ला येत असते ..
-
इंदापूर शहरातील शिवशंभो कावड प्रतिष्ठानने इतिहास रचला
इंदापूर शहरातील शिवशंभो कावड प्रतिष्ठान ने इतिहास रचला आहे, भारतामधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिध्द असलेल्या केदारनाथ या ठिकाणी हजारो किलोमिटर चा प्रवास करीत पवित्र असलेल्या केदारनाथ या ठिकाणी कावड नेहत या ठिकाणी देवाला जल अभिषेक करण्यात आला. 500 किलो हून अधिक वजन असलेली व वीस फूट उंच असलेली कावड शिवभक्तांनी खांद्यावर नेहत अवघड अशी वाट पार करीत केदारनाथ येथे नेहत महाराष्ट्रात एक नवा इतिहास निर्माण केल्याने शिवशंभो प्रतिष्ठान चे सर्वत्र कौतुक होत आहे.. सध्या इंदापूर या कावडीच्या दर्शनासाठी भक्त रांगा लावत दर्शन घेत आहेत ..
-
असं असेल शिवाजी राज्याभिषेक सोहळ्याचं नियोजन
-
दुर्गराज रायगडवर 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी
-
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पुर्वसंध्येला दि.#५जून रोजी दुर्गराज रायगडावर अनेक कार्यक्रम संपन्न झाले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पुर्वसंध्येला दि.#५जून रोजी दुर्गराज रायगडावर अनेक कार्यक्रम संपन्न झाले. हे सर्व या चित्रफितीच्या माध्यमातून आपणा सर्वांच्यासाठी….
-
रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
शिवप्रेमींना गडावर जाण्यासाठी रोप वे ची सुविधा
रोप वे नं जाण्यासाठी शिवप्रेमी रांगेत
छत्रपती संभाजीराजे रोप वे नं रायगडावर दाखल होणार
-
छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्य’स्थापनेचा निर्णय घेतला, तेव्हा मुठभर मावळे सोबतीला होते
छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्य’स्थापनेचा निर्णय घेतला, तेव्हा मुठभर मावळे सोबतीला होते.पण महाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पध्दती मूळे लोकसंचय वाढला. आणि सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे “स्वराज्य” उदयास आले.आणि महाराज छत्रपती झाले.या शुभदिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा!
Published On - Jun 06,2022 6:24 AM