Maharashtra News Live Update : राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसल्या, दमदार पावसाची प्रतिक्षा
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज गुरूवार 9 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्री अचानक पडलेल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला, वातावरणात गारवा पसरला आहे. मुंबईतील उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहेत. महाविकास आघाड़ीची बैठक सुरू आहे. निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आलीये त्यावर चर्चा झाली. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचा विजय निश्चित आहे . आमदारांना मतदान कसं कराव याचं प्रशिक्षण दिलं जातंय. रात्री उशिरापर्यंत शिवसेनेचे आमदार ट्रायडंट हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत होते. मात्र सर्वच नेत्यांनी बोलणे टाळले. त्यामुळे आज काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे Live
राष्ट्रपदीपदासाठी उमेदवार देण्याबाबत शरद पवारांशी चर्चा
सोनिया गांधींनी मित्रपक्षांशी चर्चा करण्यास सांगितलं होतं
सर्व विरोधी पक्ष मिळून एक उमेदवारी देण्यावर पवारांची सहमती
मात्र बैठक होईपर्यंत उमेदवार सांगता येणार नाही
पवारांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो
बैठकीची तयारी केल्यानंतर सर्वांना सागण्यात येईल
-
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे दोन गटात तुफान दगडफेक
मुस्लिम समाजाच्या दोन राजकीय नेत्यातील वर्चस्ववादातून झाली दोन गटात दगडफेक
– प्रहार संघटनेचा दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मोहसीन तांबोळी आणि भाजप समर्थक यासीन कटरे या नेत्यांच्या गटाकडून दगडफेक
– एक मेकाकडे खुन्नसने बघण्याच्या कारणावरून दगडफेक झाल्याची माहिती
– वळसंग पोलिसांकडून दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल
-
-
वसई विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले
आज एका दिवसात 87 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
आजपर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह रुगण संख्या 97739
आज कोरोनातून बरे झालेले रुग्ण 15
दिवसभरात एकाचाही मृत्यू नाही
आजपर्यंत कोरोनातून बरे झालेले रुग्ण संख्या 95368
सध्या वसई विरार मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या 292
-
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस
– सकाळ पासून वातावरणामध्ये उकाडा जाणवत होता
– जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस
– मान्सून पूर्व पावसाने बळीराजा सुखावला
– पेरणी पूर्व शेतीच्या मशागतीला येणार वेग
-
गोंदियात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
गोंदियात आज वादळी वाऱ्यासह सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास जोरदार हजेरी लावली असून आलेल्या या पावसाने गोंदियाकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला असून अखेर मृग बरसल्याने शेतकरी सुखावला असून शेतकरी खरीपातील धूळपेरणीच्या कामाला लागणार आहे.
-
-
18 जुलैला शरद पवार पानिपतला जाणार
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीकडून शरद पवार यांना निमंत्रण
पानिपत शौर्य स्मारकाच्या सुशोभिकरणबाबत शरद पवार करणार पाहणी
18 जुलै रोजी दुपारी बारा वाजता शरद पवार पानिपत मध्ये पाहणी करणार
पानिपत मधील मराठा बांधवांसोबत शरद पवार करणार चर्चा
अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांची माहिती
-
दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे ट्विट
पूजाला इंडिगो विमानसेवेत गैरवर्तनचा अनुभव
विपुल नकाशे नावाच्या इंडिगो कर्मचारी सदस्याने आमच्या मुंबईहून निघालेल्या फ्लाइटमध्ये आमच्याशी उद्धट वर्तन केले याबद्दल खूप वाईट वाटले.
आमच्याशी विनाकारण उद्धट आणि धमकावणारा टोन वापरला गेला.
साधारणपणे मी कोणत्याही विषयांवर ट्विट करत नाही. , पण हे खरोखरच भयावह आहे
-
नागपूरच्या काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात
सकाळ पासून कडक उन्ह मात्र दुपार नंतर पावसाचं वातावरण बनायला सुरवात
पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा
मात्र उकाडा अजूनही कायम
-
नवाब मलिक, अनिल देशमुखांचा राज्यसभेसाठी मतदानाचा अर्ज फेटाळला
अटीतटीच्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते कमी होणार आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना उद्याच्या राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा झटका बसल्याचे मानण्यात येत आहे. मलिक आणि देशमुख यांनी मतदानासाठी मागितलेली परवानगी कोर्टाने फेटाळली आहे. मलिक आणि देशमुखांवर टेरर फंडिग सारखे गंभीर आरोप असताना, त्यांना मतदानासाठी बाहेर जाण्याची परवानगी मिळू नये अशी भूमिका ईडीने घेतली होती. त्यावर कोर्टाने आज निर्णय घेत, या दोघांनाही परवानगी नाकराली आहे.
-
राष्ट्रवादीच्या विकास कामांच्या पुस्तिकेचं प्रकाशन – जयंत पाटील
राष्ट्रवादीच्या विकास कामांच्या पुस्तिकेचं प्रकाशन – जयंत पाटील
अडिच वर्षात केलेल्या कामाचा आढावा
जयंत पाटलांच्या हस्ते प्रकाशन
दोनवेळा अर्ज भरला आणि यशस्वी झालो – भाई जगताप
तेवढी संख्या आमच्याकडे आहे
असं कधी फारसं घडलं नव्हतं
राजकीय संस्कृती राहिली आहे
दुर्देवानं हे घडतंय…
-
आमदार रवी राणा दिल्लीवरून मुंबईला पोहचले
आमदार रवि राणा दिल्ली वरून मुंबई ला पोहचले असून 5 मिनटात विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचणार
-
एकनाथ खडसेंनी मानले राष्ट्रवादीचे आभार
उमेदवारी अर्ज भरल्यानं एकनाथ खडसेंनी मानले राष्ट्रवादीचे आभार
अडचणीच्या काळात पवार पाठिशी उभे होते
माझ्यावर आरोप लावण्यात आले, पण राष्ट्रवादी माझ्या संकटाच्या काळात पाठिशी उभी राहिली
-
भाजपच्या आमदारांना प्रशिक्षणासह विशेष सुचना करण्यात आली – चंद्रकांत पाटील
आम्ही तिन्ही जागा जिंकू
प्रशिक्षणाची आणि विशेष सुचना करण्यात आली
देवेंद्र स्वत:बैठकीला येतील
इच्छा असणं आणि इच्छा दूर करणं गरजेचं
यामुळे सगळं काय संपलं आहे का ?
पंकजा ताई त्यामुळे आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या
सहाजण निवृत्त झाले आहेत
आदीचं विधानसभेचं संख्याबळ कमी झालं आहे
-
पंकजा मुंडे समर्थकांचं औरंगाबादमध्ये भाजप कार्यासमोर आंदोलन
पंकजा मुंडे समर्थकांचं भाजप कार्यासमोर आंदोलन
औरंगाबादमध्ये राडेबाजी
-
केंद्र सरकारकडून 4 राज्यांना सूचना, महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये वाढली कोरोना रूग्णांची संख्या
केंद्र सरकारकडून 4 राज्यांना सूचना
कोरोना रुग्ण वाढत असल्याने सूचना
केंद्रीय आरोग्य मंत्रालयकडून सूचना
महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये वाढती संख्या
5 राज्यांना पंचसूत्री कार्यक्रम
चाचणी, लसीकरण, उपचार, ट्रॅक आणि नियम पालन
कोविड 19 च्या परिस्थितीवर केंद्राचे बारकाईने लक्ष
-
परभणीत सुसाट वाऱ्यामुळे प्रमुख रस्त्यावरील झाड उन्मळून पडला ,
परभणीत सुसाट वाऱ्यामुळे प्रमुख रस्त्यावरील झाड उन्मळून पडला ,
शहरातील प्रमुख असलेला वसमत रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीची कोंडी ,
वाहतूक शाखा आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
-
सलमान खान धमकी प्रकरणात सौरभ महाकाली याची चौकशी सुरू
सलमान खान धमकी प्रकरणात सौरभ महाकाली याची चौकशी सुरू
सौरभ महाकाली हा बिष्णोई टोळीचा सदस्य
मुबंई पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, पुणे ग्रामीण पोलीसचे अप्पर अधीक्षक मितेश गट्टे यांच्याकडून महाकालीची चौकशी सुरु
गेली दीड तास सुरु आहे महाकाली याची चौकशी
महाकाली याला ग्रामीण पोलिसांनी मोक्कामध्ये केलीये अटक
पुणे मोक्का न्यायालयाने 20 जून पर्यत सुनावली आहे पोलीस कोठडी
-
दिल्ली पोलिसांकडून मोठी कारवाई ,असुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात एफआयआर दाखल
दिल्ली पोलिसांकडून मोठी कारवाई
असादुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात एफआयआर दाखल
भडकाऊ भाषण केल्याबद्दल FIR दाखल
याती नरसिंहानंद यांचाही या FIR मध्ये नाव
देशातली एकतेला बाधा पोहोचवल्याचा आरोप
नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर आता अकरा जणांविरोधात एफआयआर दाखल
-
नाराजी अजिबात दूर झालेली नाही, दोन्ही आमदार आमचे भाजप सोबत असतील – विनायक मेटे
नाराजी अजिबात दूर झालेली नाही – विनायक मेटे
दोन्ही आमदार आमचे सोबत असतील
बैठक झाल्यानंतर निर्णय होईल
आमचे दोन्ही आमदार भाजपसोबत आहेत
-
सदाभाऊ खोतांच्या उमेदवारीला भारतीय जनता पार्टीने समर्थन दिलं आहे
सदाभाऊ खोतांच्या उमेदवारीला भारतीय जनता पार्टीने समर्थन दिलं आहे
लोकप्रिय नेतृत्व आहे….
भारतीय जनता पार्टीचे पाच
बैठकीनंतर निर्णय घेतला
नामांतर अर्ज उद्या भरण्यात येणार आहे
आज एक भरला आहे
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला
पुर्ण स्टोरी का सांगितली नाही
त्यांनी त्यांचं खच्चीकरण केलं, त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं गेलं नाही
-
चंद्रकांत खैरे यांचा पैसे वाटण्याच्या फोटोवरून खुलासा
चंद्रकांत खैरे यांचा पैसे वाटण्याच्या फोटोवरून खुलासा
अमेय खोपकर आणि नितेश राणे यांच्या वडलांच्या वयाचा मी आहे
मला बदनाम करण्याचा हा डाव आहे
जे फोटो व्हायरल करत आहेत त्यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
-
पुणतांबा गावात ग्रामसभेत चर्चेला सुरूवात…
पुणतांबा गावात ग्रामसभेत चर्चेला सुरूवात… सरपंच धनंजय धनवटे यांनी सरकारशी झालेल्या चर्चेचा अहवाल मांडला… सरकारशी तीन तास प्रश्नांवर चर्चा झाली … आंदोलकांशी सकारात्मक चर्चा झाली… पुणतांबा शेतकरी आंदोलकांशी तीन तास चर्चा… 16 मागण्यांवर झाली सविस्तर चर्चा…
सरकारने दिलेली आश्वासने …..
थकित विज बिलाचे व्याज दंड माफ होणार… कृषीपंपाचा पन्नास टक्के विज बिल माफ करणार… राज्य सरकार कडून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन… कृषीसाठी दिवसा विज देण्यासाठी प्रयत्न करणार…. पूर्ण विजबिल भरणारास सोलर पंप दिले जाणार… सोलर पंपासाठी 60% अनुदान दिले जाणार.. 15 जुन पर्यन्त ऊसाचे गाळप करणार… गाळपाविना ऊस शिल्लक राहीला तर अनुदान दिले जाणार… 15 जुन नंतर आढावा घेऊन सरकार ऊसाला अनुदान देणार… गाळपासाठी गेलेल्या ऊसाला प्रतीटन एक हजार देण्यास सरकारचा नकार… कांद्याला अनुदान देण्यास सरकारचा नकार… कांद्याच्या हमीभावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार… आयात निर्यात धोरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार… दुधाच्या एआरपीसाठी कमेटी गठीत होणार… भारतभर दुधाचा एकच दर राहावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार… दुध दराच्या तफावतीमुळे दुधाला हमीभाव देणं अशक्य… फळे आणी भाजीपाल्याचे दर निश्चित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा… नियमित कर्ज भरणारांना 50 हजार रूपये अनुदान दिले जाणार… एक जुलैपासून अनुदान थेट कर्जदाराच्या खात्यावर जमा होणार… राज्यातील शेतकऱ्यांना दहा हजार कोटी मिळणार… दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणारांनाही मिळणार लवकरच कर्जमाफी… दोन लाखाच्या पुढची बाकी शेतकऱ्यांना भरावी लागणार… राज्यसरकार घेणार लवकरच निर्णय… कांदा गव्हासह इतर आयात निर्यात धोरणासाठी राज्यसरकारचं शिष्टमंडळ केंद्र सरकारची भेट घेणार… मागेल त्या शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जाणार… सॅटेलाईट व्दारे पिकपाहणीसाठी यंत्रणा उभारणार… खतांच्या अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा… पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना विहीर देणार… शेतकरी कुटुंबासाठी दोन लाख रूपयांचा विमा.. 2017 साली झालेल्या शेतकरी संप आंदोलनातील गुन्हे मागे घेतले जाणार… सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान किंवा जिवीतहानी नसेल तर गुन्हे मागे घेतले जाणार ..
-
नवी दिल्ली राष्ट्रपती पदाची निवडणूक आज जाहीर होणार
नवी दिल्ली राष्ट्रपती पदाची निवडणूक आज जाहीर होणार
केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करणार
आज दुपारी तीन वाजता निवडणूक घोषणा करणार
आयोगाची पत्रकार परिषद दुपारी
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची देशभर चर्चा
-
देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, आजच्या बैठकीला हजर राहण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून त्यांनी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं होतं. आज त्यांची सकाळी पुन्हा चाचणी करण्यात आली त्यावेळी त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
-
अमरावती येथील राणा दाम्पत्याच्या निवासस्थाना समोर भीम आर्मीच्या वतीने संविधान उद्देशिकेचे पत्रिकेचे आज वाचन करणार..
अमरावती येथील राणा दाम्पत्याच्या निवासस्थाना समोर भीम आर्मीच्या वतीने संविधान उद्देशिकेचे पत्रिकेचे आज वाचन करणार..
राणा दाम्पत्याच्या निवासस्थान परिसरात पोलिसांचा बंदोबस्त…
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी राणांच्या निवासस्थानी रेड कार्पेट..
भीम आर्मीच्या कार्यकर्त्याच्या स्वागताचे लावले राणांनी फलक…
-
पुणतांबा गावात ग्रामसभेला सुरूवात…
पुणतांबा गावात ग्रामसभेला सुरूवात… सरकारशी झालेल्या चर्चेचा अहवाल मांडला जाणार… आंदोलनाची पुढची दिशा ठरणार… मागण्यांबाबत काय निर्णय झालाय याबाबत ग्रामसभेत होणार चर्चा.. आंदोलन सुरू ठेवायचं की स्थगित करायचं? याबाबत होणार निर्णय… पुणतांबा ग्रामस्थ आणि शेतकरी ग्रामसभेत सहभागी…
-
मुंबईच्या मानखुर्द परिसरात भीषण आग
मुंबईच्या मानखुर्द परिसरात भीषण आग
भीषण आगल्याची माहिती मिळाली आहे
अग्नीशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत
चार गोदामांना आग लागली आहे
भंगाराची चार गोदाम आहेत
-
पंकजा मुंडेंना विधानपरिषद उमेदवारी नाकारल्याने समर्थक नाराज
पंकजा मुंडेंना विधानपरिषद उमेदवारी नाकारल्याने समर्थक नाराज ,
ताई नाहीतर भाजपा नाही.. या तालुक्यातून कमल चिन्ह हद्दपार करणार ,
परभणीच्या गंगाखेड येथे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल ,
-
आज आदित्य ठाकरे ट्रायडेंट हॉटेलमध्ये वास्तव्य करणार
आज आदित्य ठाकरे ट्रायडेंट हॉटेलमध्ये वास्तव्य करणार
शिवसेना आमदारांसोबत आदित्य ठाकरे ट्रायडेंट हॉटेलमध्ये वास्तव्य करणार
दुपारच्या सुमारास आदित्य ठाकरे ट्रायडेंट हॉटेलमध्ये येणार
शिवसेना आमदारांसोबत आदित्य ठाकरे पुन्हा एकदा चर्चा करणार
राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा
मतदानाच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा मतदान कसं करायचं याची कार्यशाळा घेतली जाणार
कसलीही गडबड होऊ नये यासाठी आदित्य ठाकरे ट्रायडेंट मध्ये राहणार
काल आशिष शेलार हॉटेलमध्ये आल्याने उडाला होता गोंधळ
-
विधानपरिषद निवडणूक 2022
विधानपरिषद निवडणूक 2022
भाजप उमेदवार 1) प्रवीण दरेकर 2) राम शिंदे 3) श्रीकांत भारतीय 4) उमा खापरे 5) प्रसाद लाड
भाजपचा आज सहावा उमेदवार अर्ज भरणार.
शिवसेना 1) सचिन अहिर 2) आमशा पाडवी
काॅंग्रेस 1) चंद्रकांत हंडोरे 2) भाई जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस 1) रामराजे नाईक निंबाळकर 2) एकनाथ खडसे
NCP चे उमेदवार आज अर्ज भरणार.
अर्ज मागे घेण्याची तारीख 13 जून 2022 आहे.
-
सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांचं नाव जाहीर
सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांचं नाव जाहीर
-
पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच
पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच
पुण्यात टोळक्यांचा धुडगूस वाढला
शहरातील पर्वती पायथा येथील जनता वसाहत येथे ५०हून अधिक गाड्यांची केली तोडफोड
मंगळवारीची घटना
३० ते ३५ जणांनी परिसरात केली तोडफोड
चारचाकी, टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचे मोठे नुकसान
काही दिवसांपूर्वी सहकारनगर परिसरात देखील असाच प्रकार घडला होता
-
गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष केला, त्यांच्या मुलीला तिकीट नाकारणं हे दुर्देव आहे -एकनाथ खडसे
भारतीय जनता पार्टीची ओळख चौघांनी बदलण्याचा प्रयत्न केला
गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष केला, त्यांच्या मुलीला तिकीट नाकारणं हे दुर्देव आहे -एकनाथ खडसे
ज्याचं काहीही योगदान नाही, त्यांना उमेदवारी
भाजपचा तो अंतर्गत प्रश्न आहे
वर्तमानपत्रामध्ये माहिती मिळाली
२३ वर्षात कधीही असं नव्हतं
घोडेबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे…
मुंडे आणि महाजन हे माझे सहकारी होते
जनतेने हे सगळं पाहून निर्णय घ्यावा
मंत्र्यांची मुलं आमदार आहेत. खासदार आहेत…
अडचणीच्या काळात पवारांनी साथ दिली.
-
राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र वॉरंट, 11 जुलैला पुढील सुनावणी
राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र वॉरंट,,,मनसे नेते शिरीष पारकर यांना जामीन..११ जुलैला पुढील सुनावणी
-
मुख्यमंत्र्यांचे भाषण एमआयएमची मतं मिळवण्यासाठी, जलील यांनीच तर मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून दिले नव्हते?; अतुल भातखळकर यांचं खोचक ट्विट
मुख्यमंत्र्यांचे भाषण एमआयएमची मतं मिळवण्यासाठी, जलील यांनीच तर मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून दिले नव्हते?; अतुल भातखळकर यांचं खोचक ट्विट
एम आय एम च्या खासदार इमतियाज जलील यांनीच तर मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून दिले नव्हते? नाहीतर औरंगाबादच्या नामांतरावरून दोघांची भाषा एवढी एक कशी असू शकते?
-
नागपुरात गेल्या 3 दिवसात रस्त्यावर राहणाऱ्या (वावर असणाऱ्या ) चार जणांचा मृत्यू
नागपुरात गेल्या 3 दिवसात रस्त्यावर राहणाऱ्या (वावर असणाऱ्या ) चार जणांचा मृत्यू
बेशुद्धावस्थेत मिळून आल्याने उष्माघात चे बळी आहे का? अशी चर्चा
वेगवेगळ्या ठिकाणी बेशुद्धावस्थेत मिळून आले
पोलिसांनी रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले
पोस्ट मार्टम अहवाल आल्या नंतर नेमका मृत्यू उष्माघाताने की कशाने हे स्पष्ट होईल
नागपुरात गेल्या काही दिवसात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे
गेल्या तीन चार दिवसात 45 अंश सेल्सियस च्या वर तापमान
काल मात्र तापमानात थोडी घट झाली
त्यामुळे उष्माघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे मात्र अजून स्पष्ट नाही
-
पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली
-पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली
-गेले काही दिवस शहरात ढगाळ वातावरण होत होते मात्र पाऊस काही पडत नव्हता मात्र मध्यरात्री शहराच्या विविध भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला
-आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण असून वातावरणात गारवा आहे, त्यामुळे आज ही पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
-
गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतुक येणार अंगलट..
गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतुक येणार अंगलट..
– गौण खनिज उत्खननाविरोधात राज्य शासनाचे कडक धोरण..
– गौण खनिज वाहतुक करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली बंधनकारक..
– गौण खनिज वाहनाचे जीपीएस खनिकर्म विभाग आणि परिवहन विभागाकडे होणार लिंक..
– १ जुलैपासून जीपीएस प्रणाली केली जाणार कार्यान्वित..
– जीपीएस प्रणाली नसल्यास संबंधित उत्खनन व वाहतुक बेकायदेशीर समजून केली जाणार कारवाई..
– जीपीएस प्रणालीमुळे चोरी व अवैध उत्खननावर येणार मर्यादा..
– उत्खननाच्या माध्यमातून शासनाचा महसूलही वाढणार..
-
शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया प्रणालीचे आज अनावरण
बारामती : शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया प्रणालीचे आज अनावरण..
– ऑनलाईन बदली प्रक्रियेला अखेर मुहुर्त मिळाला..
– ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते मंत्रालयात बदली प्रणालीचे होणार अनावरण..
– जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन बदली प्रणाली..
– दोन वर्षांपासून रखडल्या होत्या शिक्षकांच्या बदल्या..
– बदली रखडल्यामुळे शिक्षकांमध्ये होती नाराजी..
-
राजधानी नवी दिल्लीत मेट्रोमध्ये बिघाड
राजधानी नवी दिल्लीत मेट्रोमध्ये बिघाड
ब्लू लाईनवर आज सकाळपासूनची वाहतूक विस्कळीत
द्वारका सेक्टर पासून नोएडा आणि वैशालीला जाणारी मेट्रो वाहतूक पूर्णपणे विस्कळीत
नोकरदार आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका
अनेक मेट्रो स्टेशनवर हजारो प्रवाशांची गर्दी
मेट्रो सुरळीत व्हायला अजून तीन तासांचा अवधी लागण्याची शक्यता
ब्लू लाईन वगळता राजधानी मधील अन्य मेट्रो मार्ग सुरळीत सुरु
-
मुंबईत आजपासून दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे…
मुंबईत आजपासून दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे…
हेल्मेट न घातल्यास आजपासून पोलीस कारवाई करणार…
-
बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने निराश झालेल्या तरुणीने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या
भंडारा
Feed on ftp
– बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने निराश झालेल्या तरुणीने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या.
– जिल्हातील लाखनी येथील घटना.
मयुरीने शिकवणी विना घरीच अभ्यास करून परीक्षा दिली. तिला निकालाची उत्सुकता लागली होती, काल दुपारी निकाल घोषित झाला आणि तिला केवळ 55 टक्केच गुण मिळाले.
मयुरी निकाल बघून प्रचंड निराशा झाली व तिने आपली जीवनयात्रा संपवली.
-
भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखाने जमा केला दुसरा हप्ता..
बारामती : भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखाने जमा केला दुसरा हप्ता..
– २०२१-२२ च्या हंगामात गळीत झालेल्या उसाचा २०० रुपये प्रतिटन दुसरा हप्ता जमा..
– दुसऱ्या हप्त्याची २४ कोटी ७८ रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा..
– शेतकऱ्यांना चालू हंगामात आजपर्यंत २४०० रुपये प्रतिटन अदा..
– दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाल्याने पूर्व मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना होणार मदत..
– पुढील हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट..
– कारखान्याकडून ऊस तोडणी वाहनांचे करारही सुरु..
-
पुणे जिल्ह्यात कृत्रिम खत टंचाई..
बारामती : पुणे जिल्ह्यात कृत्रिम खत टंचाई..
– खरीप हंगामात आवश्यक खतांची जाणिवपूर्वक केली जातेय टंचाई..
– निश्चित दरापेक्षा अधिक रक्कम मिळवण्यासाठी खत व्यावसायिकांचा खटाटोप..
– खरीप हंगामामुळे रासायनिक खतांना वाढली आहे मागणी..
– जादा दराने खत विक्री केल्यास परवाना रद्द करण्याचा कृषी विभागाचा इशारा..
– जादा दराने खत विक्रीबाबत कृषी विभागाकडे तक्रार करण्याचं आवाहन..
-
कोल्हापूर शहरातील केएमटी बस प्रवास महागणार
कोल्हापूर शहरातील केएमटी बस प्रवास महागणार
तिकीट दरात दोन ते चार रुपयांची वाढ
केएमटी चा किमान दर आता दहा रुपये
उद्यापासून नवे दर लागू होणार
कोरोना कालावधी आणि डिझेल दरवाढीमुळे तिकीट दरवाढीचा महानगरपालिकेचा निर्णय
-
केंद्रीय नागरी विमान उड्डाण संचालनायाच्या पथकाकडून कोल्हापूर विमानतळाची पाहणी सुरू
केंद्रीय नागरी विमान उड्डाण संचालनायाच्या पथकाकडून कोल्हापूर विमानतळाची पाहणी सुरू
विमानतळावर सुरू असलेल्या नाईट लँडिंग आणि धावपट्टी विस्तारीकरणाच्या कामाची पथकाकडून पाहणी
पाहणीसाठी डीजीसीए ची तीन सदस्यीय समिती कोल्हापुरात
समितीच्या पाहणी अहवालानंतर कोल्हापुरातल्या नाईट लैंडिंग चा मार्ग मोकळा होणार
धावपट्टी, नाईट लँडिंग सोबतच विमानतळावर मिळणाऱ्या सुविधा आणि तांत्रिक बाबीची ही पाहणी समितीकडून होणार
-
बेलापूर ते एलिफंटा वॉटर टॅक्सीच्या दरात 301 रुपयांची कपात
बेलापूर ते एलिफंटा वॉटर टॅक्सीच्या दरात 301 रुपयांची कपात
नवी मुंबई बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे
वॉटर टॅक्सीचे तिकीट दर जास्त असल्याने सर्वसामान्य पर्यटकांना परवडणारे नव्हते
सर्वसामान्य पर्यटकांनासुद्धा वॉटर टॅक्सीतून प्रवास करता यावा, या करिता बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी भाडे कपात करण्यात आली आहे
अशी माहिती सागरी महामंडळाकडून देण्यात आली आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला आहे.
वॉटर टॅक्सीचे 800 रुपयांवरून आता 499 आणले आहे
-
नवी मुंबईत पुन्हा आज रिमझिम पावसाला सुरवात
नवी मुंबईत पुन्हा आज रिमझिम पावसाला सुरवात
सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत
नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे
-
राज्यसभा निवडणुकीसाठी अवघा एक दिवस शिल्लक, संध्याकाळी राष्ट्रवादी मधील मंत्र्यांची आणि सर्व आमदारांची बैठक
राज्यसभा निवडणुकीसाठी अवघा एक दिवस शिल्लक…
राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान कसं करावं या संदर्भात आज सर्व पक्षांच्या आमदारांच्या कार्यशाळा होणार…
आज संध्याकाळी राष्ट्रवादी मधील मंत्र्यांची आणि सर्व आमदारांची बैठक… संध्याकाळी सहा वाजता वरळी मधील एका हॉटेल मध्ये बैठक.. राज्यसभा निवडणुकीत मतदान कसे करायचे याची कार्यशाळा होणार.. राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदान बाबत मार्गदर्शन करण्यात येणार…
भाजपचे राज्यातील सर्व आमदार आज हॉटेल ताज प्रेसिडेन्सी मध्ये उपस्थित राहणार आहेत… भाजपकडून राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव हे आज ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये येणार आहेत आणि सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार… दुपारी तीन वाजता राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसे करावे या संदर्भात भाजप आमदारांची मॉकड्रील टेस्ट घेण्यात येणार… आज या बैठकित राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे…
आज शिवसेनेच्या आमदारांची सुद्धा ट्रायडंट हॉटेलमध्ये कार्यशाळा होणार आहे या कार्यशाळेमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान कसे करावे या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यात येणार आहे…
-
नारी शक्तीच्या एकजुटीने कळवण तालुक्यातील हिंगवे गावात दारू बंदी ठराव मंजूर
मालेगाव. (कळवण बातमी)
नारी शक्तीच्या एकजुटीने कळवण तालुक्यातील हिंगवे गावात दारू बंदी ठराव मंजूर….
दारू विक्री केल्यास ११ हजाराचा दंड…
-
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील 3 कैद्यांचा मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे झाला होता
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील 3 कैद्यांचा मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे झाला होता
मृत्युबाबतची दंडाधिकारीय चौकशी उपविभागीय दंडाधिकारी नागपूर शहर यांचे मार्फत करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत.
घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छुकांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसील कार्यालय येथे सादर करावे
25 जून 2022 रोजी किंवा तत्पूर्वी सादर करावे,
कैद्याचे मृत्युबाबत त्या घटनेची कारणे व परिस्थिती, मृतकाच्या मृत्युस कारणीभूत असलेली इतर संयुक्तिक कारणे जसे शासन यंत्रणेकडून झालेली दिरंगाई व दाखल करण्यात आलेले खोटे अहवाल याबाबींवर उपविभागीय दंडाधिकारी चौकशी करणार आहेत.
मृत कैद्यांची नावे नरेंद्र राजेश वाहाने मृत्युचा दिनांक 11 मार्च 2022.
दुर्गेश ऊर्फ छल्ला धृपसिंग चौधरी मुत्युचा दिनांक 26 फेब्रुवारी 2022.
सोनु ऊर्फ सोहेल साहेबखॉन बाबुखाँन मृत्युचा दिनांक 28 फेब्रुवारी 2022 असे आहेत.
-
नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहार प्रकरण
नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहार प्रकरण
राहुल गांधी 13 जूनला ईडी कार्यालयात हजर राहणार
सोमवारी काँग्रेस कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार
काँग्रेस मुख्यालयापासून ईडी कार्यालयापर्यंत काँग्रेस रॅली काढणार
रॅलीसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची वर्चुअल बैठक
बैठकीत ठरणार सोमवारची रणनीती
-
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे
टास्क फोर्स बैठक घेत आढावा घेतला आणि सावधतेचा इशारा सुद्धा दिला
लसीकरण पूर्ण करण्याच्या देण्यात आल्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यलयात झाली।बैठक
जिल्हाधिकारी , जिल्हापरिषद सीईओ होते उपस्थित
-
पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघातील एकूण 29 ग्रामपंचायती आज विधवा प्रथा बंदीचा ठराव करणार
पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघातील एकूण 29 ग्रामपंचायती आज विधवा प्रथा बंदीचा ठराव करणार
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव करण्यात येणार
या कौतुकास्पद निर्णयामुळे खडकवासला मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू
-
पुण्यात पुन्हा सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, तर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर
पुणे
पुण्यात पुन्हा सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, तर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर
सीएनजीच्या दरात तब्बल दोन रुपयांची वाढ
पुणेकर सीएनजी वाहनचालकांना आता एका किलो सीएनजीसाठी मोजावे लागणार 82 रुपये
-
बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार
बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार
या परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना 10 ते 17 जून या कालावधीत त्यांच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये अर्ज भरता येणार
श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2022 आणि जानेवारी-फेब्रुवारी 2023 या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील
-
राज्य मंडळाकडून बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे समुपदेशन
राज्य मंडळाकडून बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे समुपदेशन
बारावीचा निकाल झाल्यानंतर मानसिक दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा सुरू ठेवली जाणार
हे समुपदेशन निकालानंतर आठ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विनाशुल्क करण्यात येणार
समुपदेशकांचे मोबाईल नंबर राज्य मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध
-
मात्र सर्वच नेत्यांनी बोलणे टाळले
रात्री उशिरापर्यंत शिवसेनेचे आमदार ट्रायडंट हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत होते, मात्र सर्वच नेत्यांनी बोलणे टाळले, मग ते विनायक राऊत असोत की सुभाष देसाई असोत किंवा अनिल परब असोत, सगळेच मीडियाला टाळताना दिसले.
-
वांद्रे येथील शास्त्री नगर मधील एक दुमजली इमारत कोसळली आहे
वांद्रे येथील शास्त्री नगर मधील एक दुमजली इमारत कोसळली आहे
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल
बीएमसी व पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी होते
सोळा जण जखमी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे
जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे
घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी व तसेच पोलीस आयुक्त मंजुनाथ शिगें उपस्थित होते
-
चोरट्यांनी पळवले चक्क इंदूताई शाळेतील टीव्ही व संगणक
– चोरट्यांनी पळवले चक्क इंदूताई शाळेतील टीव्ही व संगणक.
– जिल्ह्यातील सालाई खुर्द गावातील घटणा
– पन्नास हजार रुपये किमतीच्या एलईडी टिव्ही व संगणक चोरट्याने पळविल्याची घटना उघडकीस आली आहे.
– याप्रकरणी मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
शहरात बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मात्र अत्यल्प
शहरात बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मात्र अत्यल्प
सध्या शहरात 18 ते 45 या वयोगटातील 19 लाख 33 हजार 588 जणांचा दुसरा डोस घेऊन झाला
शहरात सध्या सुमारे दीड लाख नागरिक बूस्टर डोससाठी पात्र
त्यापैकी केवळ 49 हजार 813 नागरिकांनी बुस्टर डाेस घेतला
बूस्टर डोस घेतलेल्यांमध्ये १८ ते ४५ या वयोगटातील 22 हजार 683 जण
तर 45 ते 59 या वयोगटातील 27 हजार 130 नागिरकांचा समावेश
Published On - Jun 09,2022 6:33 AM