मुंबई : आज शुक्रवार 16 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. फाल्गुन पोर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. रत्नागिरीच्या ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होती.
पंढरपूर तालुक्यातील चळे येथे विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू
भीमा नदी काठावर विद्युत पंप दुरुस्तीचे काम करत असताना, विजेचा धक्का बसून राजेंद्र सातपुते आणि आनंदा मोरे या दोन शेतमजुरांचा मृत्यू
आज सायंकाळची घटना, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये मृत्यूची नोंद
योगी सरकारचा शपथविधी 25 मार्चला
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
भाजपनं उत्तर प्रदेशची सत्ता मिळवत गेल्या 35 वर्षांचं रेकॉर्ड मोडलंय
कर्नाटकातील विद्यार्थ्याचं पार्थिव भारतात आणणार
युक्रेनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचं पार्थिव
येत्या रविवारी नवीन शेखरअप्पा याचे पार्थिव भारतात आणले जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पार्थिव आणण्याच्या दिल्या होत्या सूचना
युक्रेनमधील हल्ल्यात कर्नाटकातील नवीन हा विद्यार्थी झाला होता ठार
तब्बल 18 दिवसांनंतर नवीनचे पार्थिव भारतात आणल जाणार
साक्री शहरात धुलीवंदनाला लागले गालबोट
धुलीवंदन निमित्त डीजे लावून नाचत असताना डीजे च्या आवाजावरून दोन गटात झाली तुंबळ हाणामारी
वाद वाढल्यानंतर धारदार शस्त्राने दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये सात ते आठ जण गंभीर जखमी असल्याची माहिती
जखमींमध्ये महिलांचा देखील सहभाग
दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती
कोल्हापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट
माजी आमदार सुरेश हाळवणकर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी घेतली शेट्टी यांची भेट
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याचा दावा
महाविकास आघाडीमधील आपली नाराजी राजू शेट्टी यांनी केलीय उघड
चंद्रकांत दादांनी आजच राजू शेट्टीं यांचे स्वागत करू असं केलं होतं वक्तव्य
दादांच्या वक्तव्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या शेट्टींच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या
मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि त्यांच्या 100 सहकाऱ्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पाण्याच्या प्रश्नासाठी विनापरवाना महापालिकेत आंदोलन केल्यानं गुन्हा दाखल
सुरक्षारक्षकांना धुडकावत मनसे कार्यकर्ते घूसले महापालिकेत
14 तारखेला शेवटच्या दिवशी महिला घेऊन सभागृहाच्या बाहेर केलं आंदोलन..
वसंत मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल…
उद्या राज्यभरात संभाजी ब्रिगेड करणार अन्नत्याग आंदोलन
19 मार्च 1986 ला देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद झाली
अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अजूनही तोडगा निघाला नसल्यानं संभाजी ब्रिगेड आक्रमक
उद्या राज्यातील सर्वच जिल्ह्यात अन्नत्याग आंदोलन
संभाजी ब्रिगेडनं केली घोषणा…
माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकार वर टीका
हे सरकार जुलमी सरकार आहे
शेतकऱ्यांचे विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी राहिले आहेत
राजकीय पक्ष एक मेकांवर चिकल फेक करत आहे
सर्व सामान्यांचे प्रश सोडवण्यासाठी एकत्र यावे
येणाऱ्या 5 तारखेला राज्यसरकार मध्ये राहायचे का ते कार्यकारणी मेळाव्यात ठरवू
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात मोठा मद्यसाठा जप्त
गोवा बनावटीची साधारण 30 लाख 67 हजारांची दारू केली जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
एकजण अटकेत, इतर साथीदारांचा शोध सुरू
मुक्ताईनगर ग्रामीण भागातही धुलीवंदन उत्साहात
सेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी आदिवासी बांधवांच्या गीतावर ठेका रंगपंचमी साजरी
दोन वर्षापासून होळीचा सण साजरा करता येत नव्हता मात्र यावर्षी निर्बंध कमी असल्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बांधवांना सोबत पारंपरिक पद्धतीने आदिवासी गीतावर नृत्य करत ठेका घेतला
आदिवासी बांधवांनी कोरड्या रंगाने रंगपंचमी साजरी केली
सोमवारपासून एसटीचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडणार
ठाकरे सरकार राज्यातील मुद्दयांवर गंभीर नाही
आज रात्री दिल्लीत पार्लमेंट्री बोर्डाची बैठक आहे
या बैठकीत नावाची घोषणा होईल
देवेन्द्र फडणवीस, पंकजा मुंडे असे राज्यातील नेते प्रचारासाठी येणार आहेत
ज्या दिवशी संभाजीराजेंचा उपोषण संपलं त्या दिवशी मी म्हटलं होतं
सरकार ने ज्या तारखा दिल्या आहेत त्या पाळन्यासाठी त्यांची कॉलर धरावी
आता या तारखा मागे पडायला लागल्या आहेत
सोमवारी सभागृहात या मी विषयात स्थगन प्रस्ताव मांडणार
भारतीय जनता पार्टीने कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक लढवणार
जिल्ह्यातील काही नेते मी वर चर्चा करतोय अस सांगून दिशाभूल करत आहेत
कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक बिनविरोध होणार नाही
जयश्री जाधव यांनी भाजप कडून लढावं हा आमचा आग्रह होता पण त्यांनी नकार दिला
आम्ही जिंकण्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत
आजून ही जयश्री जाधव यांनी भाजप कडून लढावं
दादांच जयश्री जाधवांना आवाहन
– नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सेनेला एकही जागी डिपाॅझिट वाचवता आलं नाही..,
– कोकणात लोकं होळी साजरी करत आहेत, आम्ही इशारा दिला नाहीतर तिथेही निर्बंध लावले असते… आम्ही बोललो जो ऊखाडना हैं ऊखाड लो…
– हिंदू सण साजरे करत नाही हे सरकार, यांना त्रास होतो, यांचे निर्बंध भविष्यायतही झुगारणार…
– पवार साहेब देशाचं जेष्ठ नेतृत्व, एकाचेही डिपाॅझिट वाचवू शकले नाहीत… तुमचे आकडे आणि भाजपचे आकडे पाहा…
– ज्याना वायफळ बोलायचंय बोलू द्या, अडीच वर्षात फक्त वसूली केली, आनंदाचा क्षण दाखवलं नाही…फुटक्या पायाचं सरकार…
– पाठिमागून वार शिवसेनेनं केला, कश्मिर हिंदूंचा चित्रपट त्याला टॅक्स फ्रि होऊ देत नाही…
– आज राजकिय धुळवड आहे, आनंदाचा क्षण आहे आपण त्याला साजरं करूयात…
होळी दहन झाल्यानंतर दुसरा दिवस धुलीवंदन म्हणजे रंगाची मनसोक्त उंधलन केली जाणार आहे.त्यातच गेली 2 वर्ष कोविड मुळ होळी सन साजरा करता न आल्याने यावर्षी होळी सण अनदांत साजरा करता आला आहे. त्यातच आज शुक्रवार असल्याने मटण खण्याऱ्यांची चांगलीच चंगळ आहे.सकाळ पासून पालघर मद्ये मटण ,चिकन chya दुकानात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.तर चिकनचे भाव गगनाला भिडल्याने नागरिकांनी चिकन ऐवजी मटणाला पसंती दिली आहे
सातारा – साताऱ्यातील केंजळ गावच्यानजीक रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये गोगावलवाडी येथील युवक जागीच ठार झाला आहे. युवकाचे नाव शैलेश बाळाराम गोगावले वय 23 असे आहे. हा तरूण गुरुवारी रात्री मेढ्याहून आपल्या गावाकडे होळीसाठी निघाला होता.
जळगावात महिलांच्या कार्यक्रमात वतीने धुलिवंदनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणांनी महिलांनी यात सहभाग घेत जल्लोष साजरा केला. महापौर जयश्री महाजन यांनीदेखील या कार्यक्रमात सहभाग घेत महिलां समवेत धुलीवंदन साजरा करत इतर महिलांसोबत ताल धरला
विरार – मनसेच्या नावाने पावती बुक बनवून, फेरीवाल्याकडून पैस उकळणा-या दोन भामट्यांना मनसेनी रंगेहात पकडल्याची घटना विरार मध्ये घडली आहे. त्या भामट्यांकडे शिवसेनेच सभासद नोंदणी कार्ड सापडलं आहे. मनसेनी भामट्यांना समज देवून सोडून दिलं आहे. मात्र या घटने मुळे विरार मध्ये मनसे आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शिमगोत्सवात पालखी नाचवली
दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव हेदेखील दरवर्षीप्रमाणे आज त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना दिसले. आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आमदार श्री. जाधव हे काहीही झाले आणि कुठेही असले तरी नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचविण्यासाठी पोहोचतात. आजदेखील गावच्या सहाणेसमोर होम पेटवण्यात आल्यानंतर ग्रामस्थांसह ढोल-सनईच्या ठेक्यावर पालखी नाचविताना ते तल्लीन होऊन गेले होते.
काल राज्यात बारावीच्या बायोलॉजी पेपरमध्ये 11 जणांवर कॉपीची कारवाई
सर्वाधिक कारवाई ही अमरावती विभागात 6 जणांवर कारवाई
तर लातूरमध्ये 2,औरंगाबादमध्ये 2 , मुंबई 1 जणावर कारवाई
कॉपी केल्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड करणार कडक कारवाई
कॉपीचे प्रकार टाळण्याचं बोर्डाचं आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे , राज्य सरकार ने निर्बंध देखील शितील केले आहेत. त्याचप्रमाणे सनांवरचे निर्बंध देखील हटवले आहेत. त्यामुळे आज धुळवड निमित्त नागरिकांनी चिकन आणि मटन च्या दुकानांवर मोठ्या प्रमाणत गर्दी केली आहे , पहाटेपासून मोठ मोठ्या रांगा दुकानावर लागल्या आहेत , वातावरणाच्या बदल झाल्या मुळे मासे खोल पाण्यात गेले असल्याने मास्यांचे भाव वाढले आहेत त्यामुळे चिकन ,मटन दुकानावर जास्त प्रमाणत गर्दी होताना दिसून आलीय , त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणत स्विगी वर देखील ऑर्डर चिकन मटण ची ऑर्डर नागरिक देत आहेत .मटण 680 रुपय किलो तर चिकन 280 ते 300 रुपय किलो ने विकले जात आहे .10 ते 20 रुपय भाव वाढ झाली असली तरी मात्र आज चिकन मटण वर ठाणेकर मोठ्या प्रमाणात ताव मारत आज सण साजरा करणार असल्याचे ठाणेकर यांनी सांगितले आहे
आम्ही शिमगा केला तर महाराष्ट्रात खड्डे खूप आहेत – संजय राऊत
भाजप उधळत असलेले रंग नकली
संजय राऊतांचा पुन्हा एकदा राज्यपालांवरती निशाना
शिमग्याचा खरा अर्थ भाजपाने समजून घ्यावा
केंद्रीय तपास यंत्रणांना कुणीही घाबरत नाही
शिवसेनेचं आवाहन आहे, त्याच्या दंडात ताकत नाही
ठीक ठिकाणी केली जात आहे चेकिंग
पोलिसांनी सुरू केली जोरदार कारवाई
रस्त्यावर नागरिकांची वर्दळ मात्र रोज च्या तुलनेत कमी
नवजात बाळाची विक्री करणारे उपराजधानीतील रॅकेट गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणले.
या रॅकेटमध्ये नामांकित डॉक्टरचा समावेश असून त्यांच्यासह दोन दलालांना पोलिसांनी अटक केली.
या रॅकेटने तेलंगणा राज्यातील प्राध्यापक दाम्पत्याला 7 लाख रुपयांमध्ये नवजात बाळाची विक्री केली
डॉ. विलास भोयर, राहुल ऊर्फ मोरेश्वर दाजीबा निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत (शांतीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरीमध्ये ‘क्युअर इट’ नावाने मोठे रुग्णालय आहे.
त्याच्या या गोरखधंद्यात काही परिचारिका, महिला डॉक्टर, पॅथोलॉजीस्ट, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, महिला व पुरुष दलालांची मोठी साखळी असल्याचा संशय
पोलिसांनी विक्री करण्यात आलेल्या नवजात बाळाला ताब्यात घेतले असून त्या प्राध्यापक दाम्पत्याचीही चौकशी सुरू आहे.
नाशिक – 12 ते 14 वयोगटातील 196 बालकांचे लसीकरण
पहिल्या दिवशी विलंब झाल्यान दुसऱ्या दिवशी फक्त शहरी भागात लसीकरण
शहरात 196 बालकांचे लसीकरण झाल्याचे आईसीएमआरच्या पोर्टल वर नोंदविण्यात आले
लसीकरणा च्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात एकही बालकला लस नाही
– वडगाव शेरीत चाकूहल्ला झालेली तरुणी दहावीच्या परीक्षेला मुकली,
– शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे डॉक्टरांनी परीक्षा देण्यास परवानगी नाकारली,
– या तरुणीला परीक्षा देण्यास लेखनिकही देण्याची तयारी दाखवण्यात आली होती,
– एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने दहावीच्या तरूणी चाकूहल्ला केला होता,
विरार -विरार मध्ये होळीच्या दिवशी फुगा मारल्याने सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..
ट्रक मधून होळी नेताना एकाने मोटरसायकल स्वाराला फुगा मारला, यात त्याचे संतुलन बिघडल्याने मोटारसायकल चालकाने सायकल स्वाराला धडक दिली आहे. या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे..
-धुलिवंदन निमित्त मेट्रो सेवा दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत राहणार सुरू
-धुलिवंदन निमित्त मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.आज दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली आहे
-धुलिवंदन निमित्त शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मेट्रोला विराम असेल. दुपारी तीन नंतर मेट्रो तिच्या वेळापत्रकानुसार सुरू राहील. रात्री दहा वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील
-हा बदल केवळ शुक्रवारी असेल.शनिवार पासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे मेट्रो सुरू राहील
कोरोना निर्बंध मुक्तीनंतर कोल्हापुरात उत्सवाला सुरवात
बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा गजर घुमणार
दोन वर्षानंतर श्री क्षेत्र आदमापूर येथील भंडारा उत्सव आणि यात्रा होणार साजरी
२२ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत होणार यात्रा
यात्रेचा मुख्य दिवस २९ मार्च असून, राज्यातील ३ लाख भाविकांचे होणार नियोजन
कोरोना नियमांची खबरदारी घेत यात्रा साजरी होणार
प्रशासन आणि मंदिर समितीच्या बैठक झाला निर्णय
विरार : वसई विरार नालासोपारा परिसरात होळीचा सण अतिशय उत्साहात पार पडला आहे. विरार पूर्व स्टेशन परिसरात सामाजिक कार्यकर्ते मनीष राऊत यांनी कोरोना महामारीचा या होळीत नायनाट व्हावा, पेत्त्येकाला निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थना करत कोव्हिडं होळीचे दहन केले आहे. होळीलाच कोरोना संपून, प्रत्येक नागरिक सुखी राहावा अशा आशयाचे वेगवेगळे फलक होळीला लावून तिचे दहन केले आहे.
नागपुरात काल पासून 12 ते 14 वयोगटातील लसीकरणला सुरवात
मात्र लसीकरण साठी होळी आणि परीक्षांचा खोडा
मुलाच्या परीक्षा असल्याने आणि होळी मध्ये व्यस्त असल्याने पहिल्या दिवशी लसीकरण कमी
जिल्ह्यात फक्त 188 मुलांचं झालं लसीकरण
शहरातील 81 शहरातील तर ग्रामीण भागात 107 विध्यर्थ्यांच समावेश
होळी नंतर लसीकरण ला वेग येण्याची शक्यता मात्र पालकांनी।पुढाकार घेण्याचं प्रशासनाच आवाहन।
महाराष्ट्र सरकारने गुरुवारी होळीसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली. नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात एकत्र न येता रंगांचा सण साजरा करावा. तसेच करोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात ठेवून दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
१८ ला धुळवड तर २२ मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल. होळी/शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. हा सण शक्यतो गर्दी न करता आणि कोविड योग्य वर्तनाचे पालन करून साजरा करावा