Maharashtra News Live Update : श्रीलंकेत पुन्हा एकदा रामराज्य आणण्यासाठी हिंद्स्थानने पुढ़ाकार घेतला पाहिजे!

| Updated on: May 11, 2022 | 6:16 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : श्रीलंकेत पुन्हा एकदा रामराज्य आणण्यासाठी हिंद्स्थानने पुढ़ाकार घेतला पाहिजे!
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज मंगळवार 10 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाचा दौरा राज्यभर माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत हे करीत आहे. या दौऱ्यानिमित्त जळगावच्या चाळीसगाव येथे सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चाळीसगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आ.सदाभाऊ खोत यांनी चक्क महागाईचे समर्थन केले. पत्रकारांनी पेट्रोल डीझेल या सह महागाई वरून प्रश्न विचारला असता त्यांनी महागाईचे समर्थन केले. ते म्हणाले की कोण धाडस करेल, कुठला पक्ष महागाईच्या समर्थनाचे धाडस करेल, मी धाडस केलं, कशाची महागाई आली. हो, 20 हजाराचे सोन 50 हजार तोळ झालं. तरी लोक घेतात ना ? महागाई झाली तरी लोकं दारू पिणं सोडता का ? कांदा डाळींच्या किमती वाढल्यास शेतकरी सुखी होईल. या महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावाही त्यांनी केला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 May 2022 09:21 PM (IST)

    नवनीत राणा यांची केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांनी दिल्ली येथील निवास स्थानी घेतली भेट

    – भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि झालेल्या प्रकारची माहिती घेतल्याची माहीती…

  • 10 May 2022 07:30 PM (IST)

    महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणुक आयोगाचे महत्वाचे आदेश…

    कार्यक्रम पुढील प्रमाणे घ्यावे –

    ११ मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण

    १२ मे पर्संत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यता पाठवावी

    १७ मे अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी

    १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राज पत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहे.

    राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकाना पत्र

    राज्य निवडणुक आयोगाचे निर्देश

  • 10 May 2022 07:01 PM (IST)

    राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला आहे :- नाना पटोले

    भंडारा गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला व अनेक ठिकाणी भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केलं आम्ही जयंत पाटील, व प्रफुल पटेल, यांच्या सोबत सुध्दा बोलणं झाल्यावर यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपा सोबत युती केली, गोंदिया जिल्हा परिषद मध्ये सुध्दा राष्ट्रवादी भाजप सोबत जात युती केली आहे. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केले आहे.

  • 10 May 2022 07:00 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर

    – खासगी कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस नाशकात

    – नाशिकमधील एका लोकल न्यूज चॅनलच्या पुरस्कारांचे फडणवीस यांच्या हस्ते वितरण

  • 10 May 2022 06:59 PM (IST)

    अनिल परब यांची प्रतिक्रिया

    आम्ही देखील आंदोलन केली आमच्या घरी देखील असे पोलीस यायचे

    पोलीस ही कारवाई शिवसेनेचे सरकार आहे म्हणून करतात असे नाही

    पोलिसांचे काम आहे त्यांनी कसे काम करावे ये पोलीस ठरवतात

    पोलीस त्यांचे काम करत असतात

    मनसेला आव्हान करणार मी कोण आहे?

    बाळासाहेब आम्हाला नेहमी सांगायचे आंदोलनाला जातात ना मग दोन दिवस आतमध्ये रहायची तयारी ठेवा

    आम्ही नेहमी म्हणतो सत्ता ही कधीच पर्मनंट नसते

    सत्तेचा ताम्रपट कुणीच घेऊन आलेला नसतो

    तो जनतेचा अधिकार आहे जनता ठरवते

  • 10 May 2022 06:58 PM (IST)

    पुण्यात कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटलांनी आमदार जनसंवाद कार्यक्रमाला केली सुरुवात

    प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

    प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमदार जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन

  • 10 May 2022 05:19 PM (IST)

    अखेर भंडारा जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस आणि भाजप युतीची सत्ता स्थापन अध्यक्ष काँग्रेसच्या तर उपाध्यक्ष भाजपचा

    भंडारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नीतीला छेद देत भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपची युती झाली असून काँग्रेसचे अध्यक्ष तर भाजपचे उपाध्यक्ष झाला आहे. काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असून उपाध्यक्षपदी भाजपचे संदीप टाले यांची निवड झालेली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष यांना 27-27 मते पडले आहेत. तर भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवत सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या 12 पैकी पाच मते हे चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात फुटलेली आहेत.

  • 10 May 2022 05:17 PM (IST)

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार

    25 ते 28 मे दरम्यान संजय राऊत यांचा दौरा

    शिव संपर्क अभियानाअंतर्गत संजय राऊत येणार कोल्हापुरात

    कोल्हापूर,हातकणंगले लोकसभेसह दहा ही विधानसभा मतदार संघांचा घेणार आढावा

    संजय राऊत यांच्या जाहीर सभेचीही शक्यता

  • 10 May 2022 04:50 PM (IST)

    राज ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

  • 10 May 2022 04:02 PM (IST)

    उद्या राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील घेणार बैठक

    राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी मराठा समाजातील समन्वयकांची बोलावली बैठक

    आरक्षण लढ्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उद्या आयोजित केली बैठक

    कोपर्डीतील बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

    दूपारी दोन वाजता मुंबईत बैठकीचं आयोजन

  • 10 May 2022 03:33 PM (IST)

    पुण्यात रविवारी मनसेचा मेळावा

    आज पुण्यात झालेल्या मनसेच्या बैठकीत निर्णय

    रविवारी शहरात मनसेचा होणार स्थानिक पदाधिकारी मेळावा

    शहरातल्या पक्षातील अंतर्गत नाराजीनंतर मनसे अॅक्टीव्ह मोडवर

    रविवारी आयोजित केला मेळावा

  • 10 May 2022 03:26 PM (IST)

    राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे पहाटेचे सामुदायिक ध्यान व प्रार्थना भोंग्यातून करू द्या

    अमरावतीच्या मोझरी गुरुकुंज मधील मुस्लिम बांधवांची प्रशासनाकडे मागणी….

    शिर्डीनंतर आता गुरुकुंज मोझरीतील मुस्लिम बांधवांचे प्रशासनाला निवेदन..

    राज ठाकरेंच्या भोंग्याच्या मुद्यांमूळे तुकडोजी महाराजांचे पहाटेचे सामुदायिक ध्यान सुरू आहे भोंग्याविना..

    तुकडोजी महाराजांची जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण दिली.त्यामुळे त्यांचे सामुदायिक ध्यान भोंग्यातून करण्याची मुस्लिम बांधवांची मागणी…

    सामुदायिक ध्यानाने परिसरातील लोकांची दिनचर्या सुरू होते….

  • 10 May 2022 03:25 PM (IST)

    काहीवेळात आदित्य ठाकरे परभणीत होतील दाखल

    आदित्य ठाकरे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे परभणीत दाखल ,

  • 10 May 2022 03:24 PM (IST)

    रवी राणा यांचा गंभीर आरोप

    लीलावती रूग्णालयाच्या डॅाक्टरांना धमक्या दिल्या जाताहेत.

    मुख्यमंत्र्यांच्या इशा-यावरून डॅाक्टरांवर प्रेशर आणलं जातंय

    सत्तेचा अहंकार मुख्यमंत्र्यांमधे आला आहे

    महाराष्ट्राची जनता हा अहंकार मोडून काढेल.

  • 10 May 2022 01:16 PM (IST)

    त्यांनी त्यांची भूमिका ठरवली ठरवली आहे – बाळा नांदगावकर

    त्यांनी त्यांची भूमिका ठरवली

    मला पक्षाची भूमिका घ्यावी लागते

    आमचं पाच तारखेला जायचं ठरलेलं आहे

    टोकाची भाषा आम्हालाही बोलता येते

    मला आनंद एका गोष्टीचा

    सगळी लोकं जागं झाली आहेत

    पाच लाख लोक येतील त्यांनी जर माफी मागितली नाहीतर

    आयोध्येत मनसेचं कार्यालय आहे.

  • 10 May 2022 01:13 PM (IST)

    भंडाऱ्यात कांग्रेसची भाजपाच्या एका गटासोबत युति…अध्यक्ष काँग्रेसचा तर उपाध्यक्ष भाजप चा….

    भंडाऱ्यात कांग्रेसची भाजपाच्या एका गटासोबत युति…अध्यक्ष काँग्रेसचा तर उपाध्यक्ष भाजप चा….

    Anchor: – भंडारा जिल्हा परीषदेत कांग्रेसने भाजपच्यां एका गटाची युति केली असून अध्यक्ष पदासाठी कांग्रेस चे गंगाधर जिभकाटे पंकज राहागडाले तर उपाध्यक्ष पदासाठी भाजप चे संदीप ताले यानी नामांकन अर्ज दाखल केला आहे।भंडाऱ्यात भाजपचे एकुन 12 सदस्य निवडून आले तर कांग्रेस चे 21 सदस्य निवडून आले आहेत।तर भंडाऱ्यात भाजप आणि काग्रेस हातमिळविनी करित राष्ट्रवादीला ला एकटे पाड़ले आहे।निवडून आलेले पक्क्षीय बल…भाजप 12–काग्रेंस 21…राष्ट्रवादी काग्रेश..13 …बसपा 1,सेना अन्य 4 असे सदस्य निवडून आले आहे..

  • 10 May 2022 01:01 PM (IST)

    राज साहेब माफी मागण्याचा विचार पण करू नका… उलट जुनी भूमिका परत घ्या, UP चे लोंढे थांबवा

    राज साहेब माफी मागण्याचा विचार पण करू नका… उलट जुनी भूमिका परत घ्या, UP चे लोंढे थांबवा

    आज नाभिक समाजाच्या हातातून त्यांचा व्यवसाय भैय्यानी त्यातून पण मुस्लिमांनी पळवला आहे

    परीट समाजाच्या हातातून त्यांचा व्यवसाय कधीच सुटला आहे

    मराठी बांधवांच्या हातातून बांधकाम क्षेत्रातील आणि driving क्षेत्रातील सर्व कामे गेली आहेत….

    मराठी TAXI वाला तर मुंबईत शोधून पण सापडत नाही

    सुतार काम, पेंटिंग, प्लास्टर, pop यात तर मराठी बोलणारा दिसतच नाही

    कमी रकमेत पण खूप कष्ट असणाऱ्या पण उत्तम आर्थिक फायदा देणारे व्यवसाय आत्ता मराठी युवकांनी शिकावे या साठी आत्ता सर्वांनीच प्रयत्न करावे

    हिंदू महासंघ ने त्याची सुरवात केली आहे

  • 10 May 2022 12:59 PM (IST)

    पुणे मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली पुणे पोलिस आयुक्तांची भे

    पुणे मनसे पदाधिकाऱ्यानी घेतली पुणे पोलिस आयुक्तांची भेट,राज्यात सर्व शहरात पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत

    मुबंई पोलीस आयुक्त यांनी आवाजाबाबत जे पत्र काढले आहे तसेच पत्र पुणे पोलीस आयुक्तांनी काढावे

    यामध्ये आवाजाचे नियमावली दिलेली आहे अनेक लोकांचे याबाबत फोन करत आहेत

    जर पोलिसांनी याबाबत माहिती नाही दिली तर आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ

    पुढील दहा दिवसात पुणे पोलीस आम्हाला याबाबत माहिती देतो असे म्हटले आहेत त्यानंतर आम्ही पुढील भूमिका जाहीर करू

    बैठकीला वसंत मोरे सह सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते आमच्यात काही मतभेद नाहीय

    अयोध्या विषयावर ज्या लोकांना बोलायला सागितले आहे तेच लोक बोलतील

    वसंत मोरे

    – डेसीबलबाबत आयुक्तांना पत्र दिले – मला निवेदन कसलं ते इकडे आल्यावर माहिती प्राप्त झाली – एका जालन्याची कार्यकर्त्यांनी फोन रेकॉर्ड केला अन त्यानेच वायरल केलं आहे. – अयोध्या बाबत साहेबानी प्रवक्ते दिलेत तेच बोलतील – एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे – माझं उद्दिष्ट आहे पक्ष वाढवणे अन काम करणं अन नगरसेवक वाढवणे हेच काम आहे – मनसे च्या तीन प्रभाग जबाबदारी द्यावेत मी नऊ नगरसेवक निवडून आणेने,मला शहरात २५ नगरसेवक आणायचे होते पण आता नाही सांगू शकत – मी राजमार्गावरच आहे

  • 10 May 2022 12:58 PM (IST)

    रवी राणा यांची मुलं दिल्लीला गेले

    – रवी राणा यांची मुलं दिल्लीला गेलेत

    – रवनिर सहा वर्षांचा मुलगा आणि आरोही १२ वर्षांची मुलगी दिल्लीला गेले

    – १५ दिलासांपासुन ते आई वडीलांना भेटले नव्हते

  • 10 May 2022 12:57 PM (IST)

    पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रिपाइं’चे राज्य सरकारविरोधात आंदोलन

    पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रिपाइं’चे राज्य सरकारविरोधात आंदोलन

    दलितांवरील अत्याचार, पदोन्नती-ओबीसी आरक्षण, वाढती महागाई, बेरोजगारी* आदी विषयीच्या मागण्यांसाठी *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) – ‘रिपाइं’च्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन

  • 10 May 2022 12:25 PM (IST)

    छत्रपती संभाजीराजे व देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे भेट, 12 मे रोजी पुण्यात समर्थकांची बैठक

    राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजी राजे यांनी 12 वाजता महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली….

    संभाजी राजे आपली पुढील राजकीय भूमिका सांगणार असून, त्यासाठी 12 मे रोजी संभाजी राजांनी पुण्यात आपल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे.

    राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजी राजे कोणत्या पक्षात जाणार आणि त्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 10 May 2022 12:24 PM (IST)

    मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या भेटीला

    मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या भेटीला

    मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावर मनसे शिष्टमंडळ घेत आहे पोलीस आयुक्तांची भेट

    वसंत मोरेही या शिष्टमंडळासोबत

  • 10 May 2022 12:23 PM (IST)

    भाजप सातत्याने मुख्यमंत्र्यांना काउंटर करत आहेत – निलम गोऱ्हे

    कोविड च्या मुख्यमंत्र्यानी या काळात मार्गदर्शन केले

    कामाकडे दुर्लक्ष करून तोंडावर धुराळा उडवण्याचा काम काही लोकांकडून सुरू आहे

    वेळोवेळी ठाकरे कुटुंबीय शिवसैनिकांशी संवाद साधतच असतात

    काही लोकांची वृत्ती फक्त खडे मारण्याचे असत

    अशीच उपद्रवी वृत्ती काही लोकांची दिसते

    त्याला उद्धव ठाकरे कामांमधून उत्तर देतील

    तुमचा मुख्यमंत्री कसा होतो हे बघतोच अहंकारात जे होते त्यांचा भ्रमनिरास झालाय

    खर उत्तर जनता देत असते

    उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्यांना दृष्टिदोष झाला असेल

    सैरभैर झाल्यासारखी यांची वृत्ती आहे

    ………….

    प्रत्येकाच्या पातळी नुसार आरोप करत असतात ………..

    On देवेन्द्र फडणवीस सभा

    भाजप सातत्याने मुख्यमंत्र्यांना काउंटर करत आहेत

    स्वतःच्या सहकाऱ्यांना राज्याबाहेर घालवण्याची वेळ तुम्ही आणली

    दुसऱ्या च्या घरातील वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न तुमचा आहे ……………

    On राणा हॉस्पिटल इशू

    अधिकृतरीत्या पेशंटच्या तपासणीत होताना चे फोटो कधीही काढले जात नाहीत

    फोटो स्टुडिओ लीलावती मध्ये असावा अशा पद्धतीचे फोटो कोणाचे काढले नसतील

    जमल तर डोक्याचा फोटो काढुन पाठवा

    प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल केले जातय

    उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यास व प्रसिद्धी मिळत नाही

    विकासाचा अजेंडा वरून लक्ष वळवण्यासाठी हे सुरू आहे …………… On राणा आदित्य ठाकरे आरोप

    कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही

    यावर आता जास्त काय बोलायचं ……..

    On राज ठाकरे दौरा

    राज ठाकरेंनी बऱ्याच प्रकारे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला

    झेंडा बदलला, भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन झाला, आता परत ते हिंदुत्वाकडे वळले

    हातपाय मारण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो

    पण किनाऱ्याकडे जेव्हा बघतील तेव्हा शिवसेनेशिवाय त्यांना काही दिसणार नाही

    कारण बाकीचे लोक त्यांना पाण्यात ढकलून त्यांचा गेम करण्यासाठी हे राजकारण करत आहेत

  • 10 May 2022 12:05 PM (IST)

    आम्ही महाविकास आघाडीकडे उत्तर मागितले आहे – गजानन काळे

    कोणाचं हिंदुत्व नकली असली आहे

    आज दोन टीझर शिवसेनेचे आहेत

    त्यामध्ये बाळासाहेबांचा फोटो लावावा लागतो

    आम्ही महाविकास आघाडीकडे उत्तर मागितले आहे

  • 10 May 2022 11:10 AM (IST)

    नाशिकमध्ये  साडेदहा हजार फेरीवाल्यांना मिळणार अधिकृत प्रमाणपत्र

    नाशिकमध्ये  साडेदहा हजार फेरीवाल्यांना मिळणार अधिकृत प्रमाणपत्र

    राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत निर्णय

    शहरातील फेरीवाल्यांना मिळणार प्रमाणपत्र

    बायोमेट्रिक नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांना अधिकृत दर्जा

    महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन

  • 10 May 2022 11:00 AM (IST)

    राहुल गांधी रेल्वेने प्रवास करणार

    राहुल गांधी रेल्वेने प्रवास करणार

    राहुल गांधी राजस्थान दौऱ्यावर जाणार

    13, 14, 15 तारखेला काँग्रेसचे उदयपूर मध्ये चिंतन शिबिर

    नवी दिल्ली ते उदयपूर प्रवास राहुल गांधी रेल्वेने करणार असल्याची सूत्रांची माहिती

  • 10 May 2022 10:37 AM (IST)

    एनजीओ ग्राफी झाल्यानंतर सहा तासात सोडले जाते

    एनजीओ ग्राफी झाल्यानंतर सहा तासात सोडले जाते

    तीन दिवसात आजार बरा होऊ शकत नाही

    शरिराचा बॅलेन्स राहत नाही, तो कसा बसावला हा प्रश

  • 10 May 2022 10:32 AM (IST)

    किरीट सोमय्यांच्या खात्यात पैसे आले आहेत – संजय राऊत

    किरीट सोमय्यांच्या खात्यात पैसे आले आहेत

    अनेक संशयित लोकांची चौकशी सुरू आहे.

    पं.बंगाल मेट्रो डेरीची चौकशी सुरू आहे

    किरीट सोमय्याचा त्यात हात आहे

    किरीट सोमय्यांनी मोठा मारला आहे

    सारखा म्हणतोय कागद दाखवा हा काय आहे

    सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी आहे किरीट सोमय्या

    इडीने कारवाई करायला हवी

    करोडो रूपयांची कागद मी देऊ शकतो.

  • 10 May 2022 09:30 AM (IST)

    हनुमान चालीसा म्हणून काही होत नाही – शरद पवार

    हनुमान चालीसा म्हणून काही होत नाही

    सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत

    ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत त्यांना प्रश्न सोडवता येत नाही

    या सर्व मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी असले मुद्दे पुढे आणले जात आहेत

    आज पेट्रोल आणि डिझेल याचे दर किती वाढले आहेत बघा

    याबाबत लोकांनी चळवळ उभा केली पाहिजे

  • 10 May 2022 09:27 AM (IST)

    एकनाथ खडसे यांनी छुप्या युतीचा विषय छेडताच

    -एकनाथ खडसे यांनी छुप्या युतीचा विषय छेडताच..

    -गिरीश महाजन सेना आमदार चंद्रकांत पाटील यांची मुक्ताईनगरात खलबत्त…

    जिल्ह्यात छुप्या युतीची चर्चा रंगत असतानाच आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर

    -एकनाथ खडसेंना टक्कर देण्यासाठी

    सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील भाजपचे नेते गिरीश महाजन यांची मुक्ताईनगरात आमदारांच्या घरी गुप्त बैठक

    खडसे यांना बोदवड नगर परिषद मध्ये सेना-भाजप छुप्या युतीने धक्क्यानंतर पुन्हा

    पुढची रणनीतीसाठी या दोघांमध्ये खलबत्त झाल्याची चर्चा

  • 10 May 2022 09:27 AM (IST)

    भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह राज ठाकरेंना विरोध करत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार,

    – भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह राज ठाकरेंना विरोध करत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार,

    – राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी नंदिनीनगरमध्ये बैठकीचे आयोजन,

    – बैठकीला अयोध्यातील साधू संतासह परिसरातील 50 हजार उत्तर भारतीय नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा,

    – ब्रिजभूषण सिंह नवाबगंजमधील निवासस्थानापासून ते नंदिनीनगर काढणार रॅली,

    – बैठकीत राज ठाकरेंना कसं रोखायचं याबाबत ठरणार रणनीती,

  • 10 May 2022 09:26 AM (IST)

    नवनीत राणा प्रकरण न्यायालयात त्यावर बोलणं योग्य नाही – शरद पवार

    शरद पवार पत्रकार परिषद 124 A कलमामध्ये राजद्रोह म्हणून कुणावरही खटला दाखल करायचा अधिकार हे कलम इंग्रजांनी हे कलम आणलेलं आहे एखादा प्रश्नावर आवाज उठवणं जनतेचा अधिकार

    कोर्टानं निवडणुका ज्या स्टेजला थांबवली तिथून सुरू करण्यास सांगितलं निवडणुकीच्या प्रकियेला दोन ते अडीचं महिने लागणार 15 निवडणुका नाही तर प्रकिया सुरू करण्यास सांगितलं खूप बोलण्यासारखं पण परंतु कोर्टाची नोटीस येईल – शरद पवार

    शरद पवार माझाही नातूही काल अयोध्येत गेला होता मलाही माहित नव्हतं , मी टीव्ही वर पाहिलं

    शरद पवार भिमा – कोरेगावच्या घटनेवेळी फडणवीस मुख्यमंत्री होते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला त्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल

    नवनीत राणा प्रकरण न्यायालयात त्यावर बोलणं योग्य नाही

  • 10 May 2022 08:42 AM (IST)

    राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशच्या लोकांची माफी मागावी – खासदार बृजभूषण सिंह

    मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत

    सगळ्यात जास्त फोन मला पुण्यातून आले आहेत

    मनसेच्या कार्यालयातून फोन आला होता

    उत्तर भारतीयांचं नुकसान होईल, तसेच चुकीच्या शब्दांचं वापर करीत आहे

    सहावेळी मी खासदार झालो आहे…पोरगा आमदार आहे

    जे कर्म राज ठाकरेंनी केलं आहेत. त्याची फळ त्यांना खायला मिळतील

    आत्तापर्यंत त्यांची आणि माझी मुलाखत झालेली नाही

    राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशच्या लोकांची माफी मागावी – बृजभूषण सिंह

    ते राष्ट्रीय नेता होतील

    आज तयारी बैठक आहे

    बैठक झाल्यानंतर कोण सोबत आहे हे समजेल

    राज ठाकरे जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत इथे येऊ देऊ नका

    मला कोणी अडवू शकत नाही

  • 10 May 2022 08:12 AM (IST)

    हार्बरवरील Ac लोकल बंद होणार

    हार्बरवरील Ac लोकल बंद होणार

    Cstm ते पनवेल ac लोकल सुरू होती मात्र तिकीट दर कमी केले तरी योग्य तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा बंद होणार आहे

    हार्बर वरील लोकल मध्य रेल्वे मार्गावर वळवली जाणार आहे

    तशा मध्य रेल्वेच्या हालचाली देखील सुरू आहेत

    हार्बरवरील प्रवाशांना त्यांनी काढलेले पासचे भाडे रिफंड देखील करण्यात येईल

    7 दिवसाच्या कालावधीमध्ये या हालचाली सुरू होणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे

  • 10 May 2022 08:02 AM (IST)

    जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू

    नाशिक – जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू

    आचारसहिता लागण्यापूर्वीच बदल्या होण्याची शक्यता

    निवडणुकांत संदर्भात कुठलेही आदेश प्राप्त न झाल्याने बदली प्रक्रिया सुरू

    जी .प .कडून राज्य शासनाकडे बदल्यांचे वेळापत्रक सादर

  • 10 May 2022 07:53 AM (IST)

    मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह दोघांना अटक

    नाशिक – मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह दोघांना अटक

    भद्रकाली पोलिसांनी अंजनेरी गाव येथून घेतले ताब्यात

    एका हॉटेल मधून घेतले ताब्यात

    अटक करून न्यायालयात हजर केले असता, जामीन मंजूर

  • 10 May 2022 07:52 AM (IST)

    जिल्ह्यातील 2064 कार्यालयाकडे तब्बल 3 कोटी रुपये थकले

    बुलडाणाजिल्ह्यातील 2064 कार्यालयाकडे तब्बल 3 कोटी रुपये थकले

    शासकीय, खाजगी कार्यालयानी थकविले कोट्यवधी ची वीज देयके,

    ,

    महावितरण ने सुरू केलीय वसुली मोहीम,

    तर सर्वाधिक थकबाकी कृषिपंपाकडे ,

  • 10 May 2022 07:52 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

    नाशिक – देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

    संध्याकाळी नाशिकमध्ये एका स्थानिक वृत्त वहिनीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

    भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता

    गिरीश महाजन देखील कार्यक्रमास राहणार उपस्थित

  • 10 May 2022 07:46 AM (IST)

    निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळणार,

    आगामी निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समितीचे 16 गण वाढणार,

    निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळणार,

    आधीची सदस्य संख्या 60 होती तर आता 68 होणार,

    बहुमतासाठी पक्षाला 35 सदस्यांचा आकडा गाठावा लागणार

  • 10 May 2022 07:46 AM (IST)

    महापूर क्षेत्रात येणाऱ्या 109 मिळकतधारकांना महानगरपालिकेची नोटीस

    महापूर क्षेत्रात येणाऱ्या 109 मिळकतधारकांना महानगरपालिकेची नोटीस

    नगररचना विभागाची कारवाई

    खाजगी अंशी मिळकतींच्या अनधिकृत बांधकामांनाही बजावल्या नोटीसा

    पुरुक्षेत्रात सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट्स अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश

    शहरात संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची पूर्वतयारी

  • 10 May 2022 07:45 AM (IST)

    पी एम किसान योजनेतील जिल्ह्यातील आणखी चार हजार तीनशे खातेदार होणार अपात्र

    पी एम किसान योजनेतील जिल्ह्यातील आणखी चार हजार तीनशे खातेदार होणार अपात्र

    संबंधित खातेदार बोगस असल्याचं महसूल विभागाने केलेल्या चौकशीत उघड

    जिल्ह्यात या आधी तब्बल सोळा हजार खातेदार आढळले होते बोगस

    पी एम किसान योजनेतील सर्व खातेदारांची आता तपासणी होणार

    10 जून पर्यंत केंद्राकडे अहवाल पाठवावा लागणार

    या आधी अपात्र ठरलेल्या 16 हजार लाभार्थ्यांकडून सुरू आहे रक्कम वसुलीची प्रक्रिया

    लाभार्थ्यांमध्ये आयकर परतावा करणारे तसंच सरकारी कर्मचाऱ्यांही होता समावेश

  • 10 May 2022 07:45 AM (IST)

    भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह राज ठाकरेंना विरोध करत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार

    – भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह राज ठाकरेंना विरोध करत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार,

    – राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी नंदिनीनगरमध्ये बैठकीचे आयोजन,

    – बैठकीला अयोध्यातील साधू संतासह परिसरातील 50 हजार उत्तर भारतीय नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा,

    – ब्रिजभूषण सिंह नवाबगंजमधील निवासस्थानापासून ते नंदिनीनगर काढणार रॅली,

    – बैठकीत राज ठाकरेंना कसं रोखायचं याबाबत ठरणार रणनीती,

  • 10 May 2022 06:36 AM (IST)

    प्रवासी पुन्हा वळले ‘एसटी’कडे,पुणे विभागात दिवसाला एक लाख जणांचा एसटीतून प्रवास

    प्रवासी पुन्हा वळले ‘एसटी’कडे,पुणे विभागात दिवसाला एक लाख जणांचा एसटीतून प्रवास

    सध्या दिवसाला एक लाख प्रवासी एसटी बसमधून प्रवास करत आहेत

    त्यातून एक कोटी सात लाख रुपये उत्पन्न मिळत असून एसटी पूर्ववत होऊ लागल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मिळाला दिलासा

    पुणे भागात संपापूर्वी 850 एसटी बस दिवसाला तीन लाख 20 हजार किलोमीटर धावत होत्या.

    एसटी संपामुळे पुणे विभागाचे दोनशे कोटी रुपयांचे नुकसान

    त्यानंतर पुन्हा एसटी पूर्ण क्षमतेने धावू लागली असून सध्या दिवसाला विभागात 710 एसटी बस दोन लाख 80 हजार किलोमीटर धावत आहेत

    विभागीय वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे यांची माहिती

  • 10 May 2022 06:35 AM (IST)

    महापालिकेने पावसाळापूर्व कामांचा वेग वाढवला

    पुणे

    महापालिकेने पावसाळापूर्व कामांचा वेग वाढवला

    खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील 12 धोकादायक वाडे पाडले

    आणखी सात वाडे येत्या काही दिवसांत पाडण्यात येणार

    पावसाळ्यात जुने वाडे, जीर्ण इमारती झिजण्याची आणि कोसळण्याची शक्यता

    त्यामुळे महापालिकेतर्फे दर वर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक वास्तूंना नोटीस बजावण्यात येते

    तसेच अतिधोकादायक वाडे पाडले जातात, यंदाही ही कारवाई सुरू

    आतापर्यंत 245 कमी धोकादायक वाड्यांना नोटीस बजावण्यात आली असून, दुरुस्ती करून घेण्याचे आदेश महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागातर्फे देण्यात आलेत

  • 10 May 2022 06:34 AM (IST)

    बोगस डॉक्टर शोधमोहिमेंतर्गत महापालिकेतर्फे आतापर्यंत शहरात 47 बोगस डॉक्टरांवर कारवाई

    पुणे

    बोगस डॉक्टर शोधमोहिमेंतर्गत महापालिकेतर्फे आतापर्यंत शहरात 47 बोगस डॉक्टरांवर कारवाई

    बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय, चुकीचे उपचार करणे अशा विविध कारणांमुळे केली कारवाई

    सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांची माहिती

  • 10 May 2022 06:34 AM (IST)

    बँकेची उलाढाल स्थापनेपासून गेल्या 111 वर्षांतील उच्चांकी 47 हजार 28 कोटींवर पोचली

    झाला असून निव्वळ नफा 602 कोटी झाला

    विशेष म्हणजे बँकेने ‘एनपीए’चे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणलं

    बँकेची उलाढाल स्थापनेपासून गेल्या 111 वर्षांतील उच्चांकी 47 हजार 28 कोटींवर पोचली

    बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती

  • 10 May 2022 06:34 AM (IST)

    राज्य निवडणुक आयोगाने आराखड्याची प्राथमिक तपासणी

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी गट-गण रचनेचे प्रारुप आराखडे तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर

    राज्य निवडणुक आयोगाने आराखड्याची प्राथमिक तपासणी, नकाशे, हद्दी यांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली

    हा सर्व आराखड्याची तपासणीसाठी काही दिवस लागणार आहे. या तपासणीनंतरच गट-गण रचनेचे आराखड्यावर नागरिकांना हरकती-सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध केले जाण्याची शक्‍यता

    नवीन नियमानुसार पुणे जिल्हा परिषदेमधील सदस्यांची संख्या 7 ने वाढणार असून 82 तर पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या 14 ने वाढणार असून 164 इतकी होणार

Published On - May 10,2022 6:27 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.