Maharashtra News Live Update : केतकीचं समर्थन करायचं आणि नंतर प्रश्न मांडायचे याला काही अर्थ आहे का ? – रूपाली पाटील

| Updated on: May 21, 2022 | 6:28 AM

Ajit Pawar, BJP, breaking news, Congress, Latest Updates, live updates, maharashtra, maharashtra news Live Updates, nana patole, NCP, shatad pawar, Shivsena, Uddhav thackeray, Nitesh Rane, Narayan Rane, Sanjay Raut, Kirit Somiaya, Supreme Court , Assembly Election 2022, अजित पवार, उद्धव ठाकरे, महाराष्ट्र, शिवसेना, भाजप, किरीट सोमय्या, navneet rana, नवनीत राणा, रवी राणा, ravi rana, delhi, sandeep deshpande, uddhav thackeray live sabha mumbai buddha purnima

Maharashtra News Live Update : केतकीचं समर्थन करायचं आणि नंतर प्रश्न मांडायचे याला काही अर्थ आहे का ?  - रूपाली पाटील
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज सोमवार 16 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या भोंग्याला आम्ही काडीची किंमत देत नाहीत. आताच यांचा भोंगा का वाजला. भाजपाच्या तालावर नाचणारे राज ठाकरे आहेत, असा घणाघात शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच भोंग्याचा विषय हा केवळ राज्याचा नाही तर केंद्राचा आहे. यावर पंतप्रधानांनी विचार करायला हवा असेही त्यांनी सांगितले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 May 2022 10:28 PM (IST)

    केतकी चितळेवर हल्ला करणाऱ्या युवतीवर गुन्हा का दाखल नाही; भाजपचा सवाल

    -केतकी चितळेवर हल्ला करणाऱ्या युवतीवर गुन्हा का दाखल नाही

    -एक पुण्यावरून येते एक मुंबईवर येते यांना माहिती कुठून मिळते

    -यात पोलीस आणि राष्ट्रवादीची मिलीभगत

    -या केतकी प्रकरणात पोलिसांची चौकशी करावी

    पोलीस डिपार्टमेंट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना काँट्रॅक्टवर चालवायला दिले आहे का ?

    सर्जील उस्मानी तमाम हिंदूंना सडकं म्हणाला त्यावर तुम्ही कारवाई का केली नाही

    भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा सवाल

  • 17 May 2022 10:20 PM (IST)

    मूळ शेतकऱ्यांचा मोबदला बोगस शेतकऱ्यांना देणाऱ्या नायब तहसीलदारास अटक

    मुंबई-बडोदा महामार्गात बाधित होणाऱ्या खऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा मोबदला 11 कोटी 66 लाख 64 हजार रुपयांचा मोबदला बोगस शेतकऱ्यांना

    या गुन्ह्यात मुख्य सुत्रधार भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी

    विठ्ठल गोसावीला शांतीनगर पोलिसांनी केली अटक

    या गुन्ह्यात एकूण 18 आरोपींना अटक

  • 16 May 2022 09:05 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील राड्याची दखल; मारहाण झालेल्या कार्यकर्त्याची केली विचारपूस

    उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील राड्याची दखल

    शहराध्यक्षांना अजित पवारांचा थेट फोन

    मारहाण झालेल्या कार्यकर्त्याची केली विचारपूस

    काय प्रकार घडला याचीही घेतली फोनवरून माहिती

  • 16 May 2022 08:41 PM (IST)

    धारदार हत्याराने वार करून वसईत विवाहित महिलेची राहत्या घरी हत्या

    वसईत विवाहित महिलेची संशयास्पदरित्या राहत्या घरी हत्या

    धारदार हत्याराने वार करून ही हत्या

    कौटुंबिक वादातून हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

    या प्रकरणा संशयित पोलिसांच्या ताब्यात

    वसई पूर्व एव्हरशाईन परिसरातील एका इमारतीत ही हत्या

    वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल

    संगीता रिबेलो असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

  • 16 May 2022 08:33 PM (IST)

    डेक्कन पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपचीही तक्रार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे ठरवून केलं

    डेक्कन पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपाही तक्रार करणार

    कार्यक्रमात येऊन गोंधळ घातल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे ठरवून केलंय

    पोलिसांना आम्ही महिला आतमध्ये जाता आहेत  हे सांगितल होतं त्यावेळी त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं

  • 16 May 2022 08:28 PM (IST)

    पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न; अंडी फेकणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

    -केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न

    -अंडी फेकणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात

    -विशाखा गायकवाड असं महिलेचं नावं

    -बालगंधर्व पोलीस चौकीच्या बाहेरचा प्रकार

  • 16 May 2022 07:56 PM (IST)

    राज्यात सरकार नावाचा प्रकार फक्त विरोधकांवर वरवंटा चालवण्यासाठी शिल्लक उरलायः चित्रा वाघांची टीका

    राज्यात सरकार नावाचा प्रकार फक्त विरोधकांवर वरवंटा चालवण्यासाठी शिल्लक उरलाय;

    चित्रा वाघ यांची टीका

    केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे येथील कार्यक्रमात दंडेली करण्याचा प्रयत्न

    उपमुख्यमंत्री अजित पवार पोलीस चौकशी करतीलच पण या महिला तुमच्या पक्षाच्या होत्या तुमचं समर्थन आहे का या दंडेलीला

    जसे तुमचे विद्यार्थी शोधा आणि तोडाचा फतवा जारी करते तसं महिलांनीही भाजपच्या कार्यक्रमात येऊन दंडेली करायचा ठराव केला का

    गृहमंत्री झोपलेत का? भाजपच्या कार्यक्रमात जाऊन गोंधळ घालणार वर मारहाण केली म्हणून कांगावा करणार वा रे बहाद्दर रणरागिणी…

    \

  • 16 May 2022 07:37 PM (IST)

    गळ्यातील सोने लंपास करणाऱ्या चोरट्यास दहिसर पोलिसांकडून अटक

    दहिसर पूर्व घरटनपाडा परिसरात दिवसाढवळ्या एका जेष्ठ नागरिक महिला पत्ता विचारण्याचा बहाण्याने गळ्यातील बोरमाळा पळविली

    आरोपीला दहिसर पोलिसांकडून अटक

    आतापर्यंत चार ठिकाणी चोरी केल्याचे उघड

    अटक केलेल्या आरोपीचे नाव संदीप धनबर असे आहे

    चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसानी एकूण 40 पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी

    पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांची माहिती

  • 16 May 2022 07:27 PM (IST)

    झेलनमध्ये पुढील वर्षी 1 लाख खेळाडू; नितीन गडकरी

    कोविडमुळे काही दिवस झेलनच आयोजन करता आलं नाही

    नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया

    मात्र आता तुम्ही खेळत आहे याचा मला आनंद आहे

    यावर्षी 45 हजार खेळाळू खेळत आहे ,पुढील वर्षी 1 लाख खेळाडू असतील

    खेळला महत्व देत मैदान आपण तयार करणार

    खेळाळूना चांगली संधी मिळण्यासाठी तुम्ही चांगलं खेळा अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • 16 May 2022 07:24 PM (IST)

    मीराभाईंदर महापालिकेच्या कार्यक्रमामध्येच देवेंद्र फडणवीस मनपा आयुक्तांना मंचावरच भडकले

    मीराभाईंदर महापालिकेच्या कार्यक्रमाला पोहोचलेले देवेंद्र फडणवीस

    कार्यक्रमादरम्यान मनपा आयुक्तवर मंचावरच भडकले

    कोणतेही उद्घाटन एका व्यक्तीकडून केले जाते, तुम्ही तुमच्या पत्रिका मध्ये चार उद्घाटकने दाखवलीत, यात उद्घाटक कोण, हे समजले नाही.

  • 16 May 2022 07:04 PM (IST)

    मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय सिंग ठाकूर मंगळवारी राज ठाकरेंबाबत आपली भूमिका मांडणार

    -मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय सिंग ठाकूर मंगळवारी राज ठाकरेंबाबत आपली भूमिका मांडणार

    -मंगळवार 17 मे रोजी दुपारी 2.30 वाजता पत्रकार परिषद

    -मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय सिंग ठाकूर यांनी सांगितले की, मनसे नेते राज ठाकरे 5 जून 2022 रोजी अयोध्येला जाणार

    -संजय ठाकूर यांनी त्यांना पत्र लिहून यापूर्वी मुंबईतील उत्तर भारतीयांशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल देशाची माफी मागावी, असे आवाहन केले होते.

    – संजय ठाकूर यांनी राजनाथ सिंग यांना पत्र लिहून राज ठाकरे यांच्याशी कोणत्याच केंद्रीय नेत्यांनी बोलू नये अशी मागणी केली होती,

    उद्या राज ठाकरेंच्या दौऱ्यावर आपली भूमिका मांडणार

  • 16 May 2022 07:00 PM (IST)

    NEET PG परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी नागपुरात डॉक्टरांचे आंदोलन

    NEET PG परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी नागपुरात मेडिकलच्या डॉक्टरांचे आंदोलन

    मेडिकल कॉलेजच्या गेट समोर आंदोलन

    कोविडच्या काळात विद्यार्थ्यांचा योग्य प्रकारे अभ्यास झाला नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

  • 16 May 2022 06:53 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या महत्वाची बैठक

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या महत्वाची बैठकः अजित पवार

    कॉंग्रेसकडे एक उमेदवार निवडून आणावी इतकी मत आहेत   निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

    – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे याबाबत निर्णय देतील

  • 16 May 2022 05:30 PM (IST)

    केतकी चितळेच्या कळंबोलीतील राहत्या घरातून एक मोबाईल एक लॅपटॉप जप्त

    केतकी चितळेच्या कळंबोलीतील राहत्या घरातून एक मोबाईल एक लॅपटॉप जप्त

    गुन्हे शाखा युनिट 1 कडून तपास

    जप्त करण्यात आलेल्या साहित्याची तपासणी

  • 16 May 2022 05:10 PM (IST)

    आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले

    आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माजी आमदार नरेंद्र मेहता वर 70 टक्के आणि माझ्यावर 30 टक्के लक्ष दिल्यामुळे मिरा भाईंदर शहरात तरण तलाव

    मी कपिल पाटील आणि रामदास आठवले यांनाही विनंती करतो की शहरावर लक्ष द्यावे जेणे करून शहरांचा चांगलं विकास होईल.

  • 16 May 2022 05:07 PM (IST)

    अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे अडचणीत ?

    अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे अडचणीत ?

    गुरुपीठमध्ये कोट्यवधींचा अपहार झाल्याची तक्रार.

    गुरुपीठमध्ये 50 कोटींचा अपहार झाल्याची माजी विश्वस्तांची नाशिक पोलिसांकडे तक्रार..

    धर्मदायक आयुक्तांचे नियम डावलून, विना टेंडर कोट्यवधींचा निधी लाटल्याचा आरोप

    नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी धर्मदायक आयुक्तांकडून अहवाल मागवल्याची माहिती..

    अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेणार

    मात्र तक्रारदारांनी आर्थिक स्वार्था पोटी आरोप केल्याचा अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठचा दावा

  • 16 May 2022 04:49 PM (IST)

    केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर; गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवत महागाईविरोधात आंदोलन

    -केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन,

    -स्मृती इराणी ज्या हॉटेल मध्ये थांबल्यात त्या हॉटेलबाहेर आंदोलन,

    -वाढती महागाईला राष्ट्रवादीचे आंदोलन,

    -गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवत महागाईविरोधात आंदोलन

  • 16 May 2022 04:14 PM (IST)

    नवनीत राणा यांना पुन्हा मानेचा त्रास सुरु; सोशल मीडीयाच्या माध्यमातून संपर्कात राहणार

    -नवनीत राणा यांना पुन्हा मानेचा त्रास सुरु

    – त्यांच्यावर दिल्लीबाहेरील एका डाॅक्टरकडून फिसिओ थेरपी सुरू

    – तीन दिवस नवनीत राणा सोशल मीडीयाच्या माध्यमातून संपर्कात राहणार

  • 16 May 2022 03:47 PM (IST)

    यवतमाळमधील पारवा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा गळा चिरुन खून

    यवतमाळः राष्ट्रवादी काँग्रेसचा पारवा गावातील कार्यकर्ते अनिल ओच्यावार याचा गळा चिरून निर्घृण खून

    पारवा सर्कलमध्ये सामाजिक कार्यासह भ्रष्टाचार विरोधात देत होते लढा

    हत्येचा कारण अस्पष्ट

    पारवा गावातील महादेव मंदिराजवळ आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

    पारवा पोलीस माजी आमदार राजू तोडसाम घटनास्थळी दाखल

  • 16 May 2022 03:38 PM (IST)

    ठाणे पोलिसांची टीम केतकीला घेऊन तिच्या रोडपाली घरी दाखल; लॅपटॉपसह आणखी काही वस्तू जप्त होणार

    ठाणे पोलिसांची टीम केतकीला घेऊन तिच्या रोडपाली घरी दाखल

    घरातील लॅपटॉप आणखी काही वस्तू जप्त करण्याची शक्यता

    केतकीवर नेरूळ पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल.

    नवी मुंबई पोलीस घरासोबत तैनात

    पोलिसांचा मोठा फौजफाटा घराखाली तैनात

    अनेक काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे

  • 16 May 2022 03:33 PM (IST)

    यवतमाळमध्ये सागर फायबर्स जिनिंगला आग; 600 ते 700 कापसाच्या गठाणी जळून खाक

    -यवतमाळ शहरातील धामणगाव रोड मार्गावरील सागर फायबर्स प्रायव्हेट लिमिटेड जिनिंगला आज दुपारी अचानक आग

    -आगीत 600 ते 700 कापसाच्या गठाणी जळून खाक

    -अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

    -या आगीत अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान

  • 16 May 2022 03:27 PM (IST)

    बुद्धांनी दिलेला शिकवणीची आज महाराष्ट्राला खरी गरजः उपमुख्यमंत्री अजित पवार

    – बुद्धांनी दिलेला शिकवणीची आज महाराष्ट्राला खरी गरजः अजित पवार

    -महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याच काम काही जण करत आहेत.

  • 16 May 2022 03:23 PM (IST)

    सदाभाऊ खोत यांच्या पाठोपाठ आता तृप्ती देसाईही केतकी चितळेच्या समर्थनार्थ मैदानात

    -सदाभाऊ खोत पाठोपाठ आता तृप्ती देसाई केतकी चितळेच्या समर्थनार्थ मैदानात

    – एका वादग्रस्त पोस्टसाठी तब्बल 13 ठिकाणी गुन्हे दाखल

    – राज्य आता हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे

    – तालिबानी पद्धतीने केतकी चितळेला अटक करण्यात आल्याचा देसाई यांचा आरोप

  • 16 May 2022 03:15 PM (IST)

    मी म्हणण्याचं समर्थन केलं नाही – सदाभाऊ खोत

    मी म्हणण्याचं समर्थन केलं नाही

    आमची मतं काही आहेत की नाही

    अमोल मिटकरी यांच्या विरोधात काय चर्चा झाली

    भारतीय जनता पक्षाकडे असले जाती वादी, तुमच्याकडे असला की पुरोगामी

    माझं त्या व्यक्तीला समर्थन नाही आहे

    कुणीबी यावं आणि आम्हाला गोळ्या घालाव्या

    ज्या पध्दतीने चर्चा सुरू आहे

    चर्चा ही सुरू हवी

    राज्यात काय बोलायचं की न्हाय

  • 16 May 2022 03:08 PM (IST)

    सदाभाऊ खोतां विरोधात सोलापूरात आंदोलन

    सदाभाऊ खोतां विरोधात सोलापूरात आंदोलन

    केतकी चितळे यांनी खालच्या दर्जाचं समर्थन केलं होतं

  • 16 May 2022 03:05 PM (IST)

    भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त आज नालासोपारा प्राचीन बौद्ध स्तुपावर मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे.

    नालासोपारा:- भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त आज नालासोपारा प्राचीन बौद्ध स्तुपावर मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे.

    गंधकुटी बुद्ध विहार ट्रस्ट च्या अध्यक्षा एस संघमित्रा महाथेरो, भन्ते नागसेन महाथेरो यांच्या पुढाकारातून आज विविध बुद्ध जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    सकाळी 8 वाजल्यापासून बुद्ध वंदना, धम्मदेसना, परित्रनपाठ यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे.

    या कार्यक्रमासाठी वसई तालुक्यातील शेकडो बौद्ध बांधव, महिला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.

  • 16 May 2022 03:04 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बोला विकासाच्या प्रश्नावर, तुम्ही का बोलत नाही आहात. यावर बोललं पाहिजे ? – सदाभाऊ खोत

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बोला विकासाच्या प्रश्नावर, तुम्ही का बोलत नाही आहात. यावर बोललं पाहिजे ? – सदाभाऊ खोत

  • 16 May 2022 03:01 PM (IST)

    सगळ्यात विकृत कोणी बोललं आहे. त्यांच्यावरती कोणी गुन्हा दाखल केलेला नाही – रूपाली पाटील

    सगळ्यात विकृत कोणी बोललं आहे. त्यांच्यावरती कोणी गुन्हा दाखल केलेला नाही.

    विकृतीचे जनक हे भाजप आहेत

    राहिला विषय वाड्या वस्तीवरचा

    इथे जातीचा प्रश्न नाही

  • 16 May 2022 02:52 PM (IST)

    केतकी चितळेचं समर्थन करीत नाही – सदाभाऊ खोतं

    केतकी चितळेचं समर्थन करीत नाही – सदाभाऊ खोतं

    मी पाटील आहे, पण ओबेसी आहे

    सुपाराचा धंदा हा सुतारकी असते

    आमच्या पक्षात सगळे नेते आहेत

    देवेंद्र फडणवीसांबद्दल काढा शोधून काय बोललं आहे

    शासन व्यवस्था आहे का ?

    पेशवाईचा काळ संपला आहे

    आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे

    भाजपाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेलं नाही

    कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे

    इथे जातीचा प्रश्न नाही, कोणत्याही जातीची व्यक्ती असती तर गुन्हा दाखल केला असता

  • 16 May 2022 02:09 PM (IST)

    चूल आणि बांगड्या घेऊन महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन,

    – चूल आणि बांगड्या घेऊन महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन,

    – महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय

    – राष्ट्रवादीच्या आंदोलनाआधी काँग्रेसचे आंदोलन

  • 16 May 2022 01:54 PM (IST)

    औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यानंतर इम्तियाज जलील यांना धमक्यांचे अनेक फोन

    औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यानंतर इम्तियाज जलील यांना धमक्यांचे अनेक फोन

    फोनवरून अनेक लोकांची इम्तियाज जलील यांना शिवीगाळ

    फोनवर शिवीगाळ करून धमक्या देण्याचे जलील यांना आले अनेक फोन

    आशा फोन कॉलला मी जास्त महत्व देत नाही

    इम्तियाज जलील यांचं स्पष्टीकरण

    मोठ्या नेत्यांनीही मला आशा धमकीवजा प्रतिक्रिया दिल्या

    मात्र त्यांच्यावर पोलिसांनी काहीही केलं नाही

    त्यामुळे येणाऱ्या काळात मीही त्याच शब्दात उत्तर देऊ शकतो

  • 16 May 2022 01:53 PM (IST)

    खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर उत्तर मुंबईतील भाजप खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की.

    खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल, अयोध्या हा हिंदू समाजाच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे, असे मला वाटते.

    तिथे कुणीही जावे, तिथे जाण्यापासून कुणालाही रोखले जाऊ नये, आपले राजकीय मतभेद काहीही असले तरी आपण त्यावर वेगळ्या मार्गाने मात करू शकतो,

    भारत हा देश आहे हेही खरे आहे, एका राज्यातील जनतेने दुसऱ्या राज्यातील लोकांचा आदर केला पाहिजे, हिंसाचार अजिबात होता कामा नये, पण कधी कधी काही घडले तर त्याची जाणीव करून दिली पाहिजे.

  • 16 May 2022 01:52 PM (IST)

    केतकी चितळेला नवी मुंबई येथे राहत्या घरी घेऊन जाण्याची शक्यता

    केतकी चितळे हिला तपास कामी ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ही नवी मुंबई येथे राहत्या घरी घेऊन जाण्याची शक्यता….

    ठाणे गुन्हे शाखा ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल

    ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या लोकप मध्ये केतकी चितळे आहे

  • 16 May 2022 01:51 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून नक्षलवाद्यांचा हैदोस

    गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून नक्षलवाद्यांचा हैदोस,

    आज पहाटे नक्षलवाद्यांनी हालेवारा परिसरात दोन पोकलेन, एक ट्रक व एक टॅक्टर जाळपोळ केली

    14 तारखेच्या रात्री एक पोलीस खबर-याची नक्षलवाघांनी क्रूरतेने हत्या केली होती

    छत्तीसगड राज्यातुन नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हालेवारा परिसरात प्रवेश करून दोन दिवस दोन वेगवेगळ्या घटना केल्यामुळे सध्या एटापल्ली तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

    सदर जाळपोळीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जवळपास २ कोटी रुपयांचे वाहनांना नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली

    या एटापल्ली भागात सुरजागड लोह खनिज प्रकल्प सुरु आहे

    याच्या विरोधातही नक्षलवादी नेहमी कारवाया करताना अनेक वेळा जाळपोळ केली

    दोन वर्षानंतर पुन्हा जाळपोळ ची घटना समोर

  • 16 May 2022 01:21 PM (IST)

    केतकीच्या पोस्टनंतर महिला आयोगाकडे मेलद्वारे अनेक तक्रारी आल्या

    रुपाली चाकणकर ऑन केतकी –

    – केतकीच्या पोस्टनंतर महिला आयोगाकडे मेलद्वारे अनेक तक्रारी आल्या – ज्या विभागातून तक्रारी आल्या तिथल्या पोलिसांना महिला आयोगाकडून कारवाई बाबत निर्देश दिले आहेत

    रुपाली चाकणकर ऑन सदाभाऊ खोत –

    – समाजामध्ये अशा काही विकृती आहेत – शरद पवार साहेबांकडे गुरुतुल्य व्यक्तीमत्व म्हणून महाराष्ट्र बघतो – त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणारी ही किड असून ति ठेचून काढली पाहिजे – केतकी चितलेला समर्थन देणारी ही किडच एक सारखी विचारांची आहे

    रुपाली चाकणकर ऑन चित्रा वाघ – – पोलीस व्यवस्थित काम करतायत त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज नाही

  • 16 May 2022 01:21 PM (IST)

    इम्तियाज जलील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका

    इम्तियाज जलील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका

    देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुभाष देसाई हे दोघेही औरंगाबादच्या जनतेला उल्लू बनवत आहेत

    देवेंद्र फडणवीस औरंगाबादेत मोर्चा काढून फक्त राजकारण करत आहेत

    देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे एकट्याने जर औरंगाबाद शहरात फिरले तर लोक त्यांना रिकाम्या हंड्याने मारतील

    इम्तियाज जलील यांची देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

  • 16 May 2022 01:21 PM (IST)

    शिवेनेना नेते माजी मंत्री दिपक केसरकर साई दरबारी

    शिवेनेना नेते माजी मंत्री दिपक केसरकर साई दरबारी… राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर केसरकरांनी मांडली रोखठोक भूमिका… राज्यात सध्या सुरू असलेले राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही… हे थांबलं पाहिजे अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना… शेवटी आपल्याला विकासाच्या दिशेने जायचं आहे… महाराष्ट्राला एक वेगळा सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा… हा वारसा जपण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे… राज्य चांगले राहील यासाठी सकारात्मक सूचना दिल्या पाहिजे… मात्र आपण अगदी खालच्या पातळीवरून टीका केली तर त्यावर उत्तर येते… त्याच्यातून परिस्थिती बिघडते… महाराष्ट्राच्या राजकारणाला जी प्रगल्भता आणि उंची होती ती कायम राखली पाहिजे… वडील धाऱ्यांचा आदर राखणे ही महाराष्ट्राची संस्कृती… महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देणारे राज्य… देशात झालेल्या सांस्कृतीक आणि सामाजिक चळवळींची सुरुवात महाराष्ट्रातून… महाराष्ट्राचे ते स्थान अबाधित राहिले पाहिजे… संस्कृती आणि सामाजिक परंपरा जपणे ही सर्वांचीच जबाबदारी… केसरकरांचा सर्वच राजकीय नेत्यांना सल्ला…

  • 16 May 2022 01:20 PM (IST)

    माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे मोठे वक्तव्य

    माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे मोठे वक्तव्य

    सरकारने माझ्या जेलवरीची तयारी केली आहे, कालांतराने माझ्यावर गुन्हे दाखल होतील परंतु त्याची भीती मला नाही

    शकुनी मामांनी सतरंजीवर चाली टाकलेल्या आहेत

    जनतेच्या बाजूने बोलल्यानंतर सरकार आवाज दाबते आहे

    सरकार कटकारस्थान करणारे कौरवाचे फौज आहे

    खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली श्रीकृष्णाची उपमा

    कंसाचा वध करायला श्रीकृष्ण रुपी देवेंद्र फडणवीस जन्माला आले आहेत

    तुमच्या बापांचा बाप देवेंद्र फडणवीस आहेत

    सरकार माझी जेलवरी करण्याच्या दृष्टीने कामाला लागलो आहे त्यांनी मला काही फरक पडणार नाही

    20 मेच्या सभेत सरकारचे षडयंत्र उघडे करणार त्यानंतर ते मला अडकवणार हे नक्की

  • 16 May 2022 01:16 PM (IST)

    जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांना उत्तर देईल – इम्तियाज जलील

    सगळ्या लोकप्रतिनिधींना बसवूया

    जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांना उत्तर देईल

    देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं

    सगळ्यांना उत्तर देईल

    मुख्यमंत्री सुध्दा अशीच टीका करतील

    औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मोर्चा काढणार

  • 16 May 2022 01:10 PM (IST)

    ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या वतीने केतकी चितळे हिची चौकशी ठाणे नगर पोलिस ठाण्यात सुरू

    राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट बाबत केतकी चितळे हिला ठाणे नगर पोलिस कस्टडी मध्ये ठेवण्यात आलेले.

    ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या वतीने केतकी चितळे हिची चौकशी ठाणे नगर पोलिस ठाण्यात सुरू.

    ठाणे सायबर सेल देखील केलेल्या पोस्ट बाबत तांत्रिक रित्या चौकशी करत आहे…

    ही पोस्ट राजकीय किंवा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा केतकीचा उद्धेश होता का या बाबत देखील कसून चौकशी गुन्हे शाखा करणार…

    एडवोकेट नितीन भावे हा कोण आहे याचा देखील शोध लावण्याचे प्रयत्न सायबर सेल च्या मदतीने गुन्हे शाखा करत आहे..

    18 मे पर्यंत आहे केतकीची पोलिस कोठडी …

  • 16 May 2022 01:09 PM (IST)

    इंदापूरमधील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी शासनाने 348 कोटी निधी मंजूर केल्याने आंदोलक तीव्र

    उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सद्बुध्दी मिळावी यासाठी सिध्देश्वर मंदिरात महाआरती आणि त्यांची शांती घातली

    – उजनी धरणातून इंदापूरला पाणी देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते आणि संघटनांचा तीव्र विरोध

    – इंदापूरमधील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी शासनाने 348 कोटी निधी मंजूर केल्याने आंदोलक तीव्र

    – उजनी धरणातून इंदापूरला 5 टीएमसी पाणी देण्याची योजना असून त्याला सोलापूरकरांचा तीव्र विरोध

    – उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीतेर्फे सिद्धेश्वर मंदिरात महाआरती आणि शांती क्रिया संपन्न

    – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सद्बुध्दी द्यावी यासाठी ग्रामदैवताची महाआरती आणि शांती केली

  • 16 May 2022 12:56 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा

    चहल यांच्या आधारीत पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

  • 16 May 2022 12:34 PM (IST)

    कुणाच्या मनात काय मला काय माहित – अजित पवार

    कुणाच्या मनात काय मला काय माहित

    नाना पटोंलेंनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावा हा त्यांचा अधिकार आहे

    तीन पक्षाचं सरकार चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे

    पवार साहेबांनी एक रस्ता दाखवला आहे

    मला विकासाच्याबाबत प्रश्न विचारा

    छोटे धरण बांधल्यावर रस्ते कुठून करायचे

    प्रत्यक्षात कृती करायला खूप वेळ लागतो

    आम्हाला पण आता वीज निर्मिती करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे.

  • 16 May 2022 12:05 PM (IST)

    अभिनेत्री असावरी जोशींचीही केतकी चितळेवर टिका

    अभिनेत्री असावरी जोशींचीही केतकी चितळेवर टिका

    कोणीही जातीवाद आणू नये दिला सल्ला

    केतकी चितळेनं आक्षेपार्ह पोस्ट रिपोस्ट केली

    मात्र सोशल मीडियावर व्यक्त होताना आपण जरा आवर घातला पाहिजे

    महाराष्ट्रात काही आदरणीय व्यक्तीमत्व आहेत त्यांच्याविषयी बोलणं हे खूपचं निंदनीय आहे

    आपण काय सोशल मीडीयावर व्यक्त होताना भान राखायला हवं असा सल्लाही तिनं केतकी चितळेला दिलाय

    नुकताच असावरी जोशीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागात प्रवेश केलाय

    बाईट – असावरी जोशी – अभिनेत्री उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग

  • 16 May 2022 12:05 PM (IST)

    देवेंद्रजी खैरे बद्दल जे बोलले ते अत्यंत योग्य आहे

    देवेंद्रजी खैरे बद्दल जे बोलले ते अत्यंत योग्य आहे

    खैरे हे नुसते बहिरेच नाही तर संवेदना हरवलेले नेते आहेत

    चंद्रकांत खैरे हे स्वतःच खोटारडे नेते आहेत

    शिवसेनेने काँग्रेस सोबत युती केली आहे

    काँग्रेसला घाबरून शिवसेना शहराचं नाव बदलण्याचा प्रस्ताव देणार नाही

    जर राज्याने केंद्राकडे शहराचं नाव बदलण्याचा प्रस्ताव दिला तर आम्ही बदलण्यासाठी प्रयत्न करू

    भागवत कराड यांचं चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर

  • 16 May 2022 11:19 AM (IST)

    सदाभाऊ खोतांनी घेतली, केतकी चितळेची बाजू, म्हणाले पोरींन एकटा लढा दिला

    तिला मानाने लागेल, बिचारीने कोर्टात स्वत:ची बाजू स्वत:मांडली. ज्यावेळी तिने ही पोस्ट व्हायरल केली. त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांची टीका टिपण्णी बघा. तुमच्या कमेंट बघा काय कमेंट आहेत. म्हणजे तुम्ही म्हणजे पाटलाच्या पोरानं केलं. दुसऱ्याने केलं म्हणजे गरिबाच्या पोरानं केलं हे धंदं आता बंद करा.

  • 16 May 2022 11:13 AM (IST)

    लोकशाहीचा अर्थ कोणाला कळला की नाही माहित नाही – नाना पटोले

    लोकशाहीचा अर्थ कोणाला कळला की नाही माहित नाही

    महागाई बेरोजगारीवरती लक्ष ठेवणं गरजेचं

    कॉंग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही

    देशाच्या संविधानिक गोष्टी घडायला हव्यात

    श्रीलंकेत काय झालं हे भाजपाने समजून घ्यावं

    माझ्या हिंदू धर्माल बदनाम करण्याचं काम सुरू आहे

  • 16 May 2022 10:49 AM (IST)

    भाजपचे सगळे नेते खोटारडे आहेत, चंद्रकांत खैरे यांचं देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड उत्तर

    चंद्रकांत खैरे यांचं देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड उत्तर

    शहराचं नाव बदलण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना शंभर पत्र लिहिली

    मात्र देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा शहराचं नाव बदललं नाही

    भाजपचे सगळे नेते खोटारडे आहेत ते खोटं बोलतात

    चंद्रकांत खैरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर

  • 16 May 2022 10:39 AM (IST)

    मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे –

    मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे

    संभाजीनगरच्या बाबतीत बोलले

    त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात ओवेसी कितीवेळा आले

    बी टीमला प्रोत्साहन दिलं आहे

    तुमचा एक नेता इथे भैरा आहे

    यांनी पाचवर्षे का हालचाल केली नाही

    भाजपाले सगळे खोटं बोलतातं

    अटलजींनी मला काय सांगितलं आहे

    मोदींना सुध्दा पत्र दिलं होतं

    उद्धवजींवरती का आरोप लावता

    मी तर अनेक ठिकाणी संभाजीनगर बोललो आहे

    ते बीम टीमला घाबरतात, केंद्र सरकार, राज्य सरकार असताना केलं नाही

  • 16 May 2022 09:36 AM (IST)

    नागपूरात काँग्रेसमध्ये खदखद, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांची काँग्रेसवर नाराजी

    – नागपूरात काँग्रेसमध्ये खदखद, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांची काँग्रेसवर नाराजी

    – नागपूरात काम न केलेल्या लोकांची पदावर नियुक्ती

    – काम केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे व्यक्त केली नाराजी

    – नागपूरातून प्रदेश काँग्रेस कमीटीत पदावर आलेल्यांनी खरंच काही काम केलं का? ते पक्षाने पहावं

    – ज्यांनी काम केलं नाही ते काँग्रेसमध्ये पदावर आले, ज्यांनी काम केलं त्यांना पदं नाहीत

    – पक्ष शेवटच्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली नाही तर पक्ष बळकट होणार नाही

    – उदयपूर चिंतन शिबीरात काँग्रेसच्या खालच्या व्यक्तीपर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल? हे करण गरजेचं आहे

    – हायकमांडकडे याबाबत केली नाराजी व्यक्त

  • 16 May 2022 09:20 AM (IST)

    पुण्यात मेट्रो कार शेडचे काम सुरु असताना कामगाराचा मृत्यू

    पुण्यात मेट्रो कार शेडचे काम सुरु असताना कामगाराचा मृत्यू

    ५० फूट उंचीवरून पडल्याने कामगाराचा झाला मृत्यू

    ही घटना रविवारी रात्री उशिरा पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ घडली

    मूलचंद्रकुमार सीताराम असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तो उत्तर प्रदेश चा राहणारा होता

    या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद

    त्याने सुरक्षाविषयक साहित्य घातले होते मात्र ५० फूट वरुन खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला

    तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला

  • 16 May 2022 08:59 AM (IST)

    अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, पिंपरी चिंचवडमध्ये एकूण दोन गुन्हे दाखल

    -अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ

    -जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान कडून दिलेल्या तक्रारीवरून केतकी चितळे हिच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    -काल संत तुकाराम महाराज संस्थान कडून देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती

    -केतकी चितळेवर पिंपरी चिंचवड मध्ये एकूण दोन गुन्हे दाखल

  • 16 May 2022 08:29 AM (IST)

    काशीच्या ज्ञानव्यापी मशिदीत पोहोचले कोर्ट कमिश्नर

    काशीच्या ज्ञानव्यापी मशिदीत पोहोचले कोर्ट कमिश्नर…

    – ज्ञानव्यापीत हिंदू मंदीराचे अवशेष मिळाल्याची सुत्रांची माहीती…दिवा ठेवण्याची जागा, खंडीत मुर्ती, स्वस्तिक चिन्ह, त्रिशुळ, कमळाच्या फुलाचं चिन्ह मिळाल्याची माहीती…

    – आत्ता पर्यंत ८० टक्के सर्वे पुर्ण, आज सर्वेचा तिसरा आणि शेवटचा दिवस, कोर्टाने दिली सकाळी ८ ते १२ ची वेळ.. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त… हजारों शिवभक्त ज्ञानवापी इथे पोहोचले…

    – आज ज्या तळ घराचा सर्वे करायचाय त्यात चिखलगाळ आणि मातीचा ढीग… तिथेच शिवलिंग असल्याचा पंडीतांचा आणि स्थानिकांचा दावा…

    – वाराणसी कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापीमध्ये केला जातोय सर्वे, सर्वेची व्हिडीयो रेकाॅर्डींग…

  • 16 May 2022 08:29 AM (IST)

    मावळात पवनानगर भागात उन्हाळी टोमॅटो चं पीक जोमात आल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत

    -मावळात पवनानगर भागात उन्हाळी टोमॅटो चं पीक जोमात आल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत

    -कोरोना मधील टाळेबंदीत हातातोंडाशी आलेल्या पिकाला पुणे,पिंपरी-चिंचवड मार्केट यार्डातील व्यापारी कवडीमोल भावाने घेत असल्याने शेतकरी राजा ही हवालदिल झाला होता

    -मात्र आत्ता परिस्थिती वेगळी असल्याने मावळातील टोमॅटोला चांगली मागणी आहे

    -त्यामुळे शेतकरी टोमॅटोचं पीक घेत आहे,मावळात पर्जन्यमान चांगला असतो आणि बहुतेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखालच्या असल्याने भर उन्हाळ्यात शेतकरी राजा,बाजरी,फुलं,भेंडी आणि टोमॅटो चं पीक घेऊन उभारी घेऊ लागलेत

  • 16 May 2022 08:12 AM (IST)

    मेळघाटात आता ७२ वाघांचे राज्य.२०१८ च्या तुलनेत पट्टेदार वाघांची संख्या वाढली.

    मेळघाटात आता ७२ वाघांचे राज्य.२०१८ च्या तुलनेत पट्टेदार वाघांची संख्या वाढली…..

    २०१८ मध्ये होते ३५ वाघ आता संख्या पोहचली ७२ वर….

    तृष्णभक्षी प्राणी संख्या वाढवली;पाणवठे कुरणांचा विस्तार केल्याने परिणाम….

    मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ४७ नर मादी २५ शावकांचा समावेश….

    वनविभागाने वाघांच्या अधिवासासाठी तयार केले अनुकूल वातावरण…..

    आज बुद्ध पौर्णिमे निमित्ताने ४६६ मचानावरून घेता येणार प्राण्यांचे दर्शन…

  • 16 May 2022 08:09 AM (IST)

    मावळात पवनानगर भागात उन्हाळी टोमॅटो चं पीक जोमात आल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत

    -मावळात पवनानगर भागात उन्हाळी टोमॅटो चं पीक जोमात आल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत

    -कोरोना मधील टाळेबंदीत हातातोंडाशी आलेल्या पिकाला पुणे,पिंपरी-चिंचवड मार्केट यार्डातील व्यापारी कवडीमोल भावाने घेत असल्याने शेतकरी राजा ही हवालदिल झाला होता

    -मात्र आत्ता परिस्थिती वेगळी असल्याने मावळातील टोमॅटोला चांगली मागणी आहे

    -त्यामुळे शेतकरी टोमॅटोचं पीक घेत आहे,मावळात पर्जन्यमान चांगला असतो आणि बहुतेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखालच्या असल्याने भर उन्हाळ्यात शेतकरी राजा,बाजरी,फुलं,भेंडी आणि टोमॅटो चं पीक घेऊन उभारी घेऊ लागलेत

  • 16 May 2022 08:08 AM (IST)

    रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी

    रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी पर्शुराम घाटातून गणेशोत्सवापुर्वी दोन पदरी वाहतुक सुरु होणार कशेडी घाटानंतरचा मुंबई गोवा महामार्गावरचा दुसरा अवघड घाट चौरदरीकरणासाठी घाट फोडण्याचे काम युद्ध पातळीवर ५० मशिनरी आणि १०० माणसे चौविसतास घाट फोडण्याचे करतायत काम चौपदरीकरणातून घाटातील आाठ वळणे काढली जाणार

    गणेशोत्सवापुर्वी पर्शुराम घाटातील १.४ किलोमिटरचा रस्ता दुपदरी होणार चौपदरीकरणाचे काम करमाऱ्या सनिअर जनरल मॅनेजर रविंद्र प्रसाद यांची माहिती

  • 16 May 2022 08:06 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील 16पैकी 11 साखर कारखान्यांची धुराडी बंद

    – पुणे जिल्ह्यातील 16पैकी 11 साखर कारखान्यांची धुराडी बंद,

    – यंदा उसाचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांशी साखर कारखाने दरवर्षीपेक्षा जास्त काळ चाललेत,

    – येत्या आठ ते पंधरा दिवसात उर्वरित साखर कारखाने देखील बंद होतील,

    – पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाची माहिती

  • 16 May 2022 07:21 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील ११४ तलाव होणार गाळमुक्त

    पुणे जिल्ह्यातील ११४ तलाव होणार गाळमुक्त..

    – नाम फाउंडेशनच्या सहकार्यातून पुणे जिल्हा परिषदेचा उपक्रम..

    – गाळमुक्तीमुळे जलस्त्रोत होणार अधिक बळकट..

    – जिल्ह्यातील १७ हजार ५०० शेतकऱ्यांना होणार फायदा..

    – गाळ विकण्याचीही ग्रामपंचायतींना मिळणार मुभा..

    – शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी मिळणार मोफत गाळ.. ………… बारामती : शेतकऱ्यांना प्रतिक्षा प्रोत्साहानत्मक अनुदानाची..

    – नियमीत कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत..

    – राज्य सरकारने ५० हजारांचे अनुदान केली होती घोषणा..

    – राज्य सरकारने मागवली नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती..

    – प्रोत्साहन अनुदानासह व्याज परताव्यासाठी मागवली माहिती..

    – प्रोत्साहन अनुदानाचा प्रश्न लवकरच मिटण्याची शक्यता..

  • 16 May 2022 07:05 AM (IST)

    कोयनानगर येथील कोयना प्रकल्पाच्या नवीन विश्रामगृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते आज उदघाटन

    कोयनानगर येथील कोयना प्रकल्पाच्या नवीन विश्रामगृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते आज उदघाटन

    कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना अजित दादांच्या हस्ते जमीन वाटप ही होणार

    उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार , पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई हे असणार उपस्थितीत

  • 16 May 2022 07:05 AM (IST)

    शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांमध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान

    – शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांमध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान,

    – गणेशजन्म निमित्त शहाळ्यांची बाप्पाला आरास,

    – ससून रुग्णालयात शहाळयांचा होणार प्रसाद वाटप,

    – वैशाख वणव्यापासून भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासाठी दगडूशेठ गणपतीला प्रार्थना

  • 16 May 2022 07:04 AM (IST)

    अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासाठी केली तक्रार

    – अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासाठी केली तक्रार

    – केतकीविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची नागपूर राष्ट्रवादीची मागणी

    – नागपुरात दोन वर्षे जुन्या फेसबुक पोस्टवरून केली तक्रार

    – नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव वर्षां शामकुळे यांनी केली तक्रार

    – ‘नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात’, अशी फेसबुक पोस्ट केतकीने १ मार्च २०२० ला केली होती. या पोस्टमुळे बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्याचं सांगत केली तक्रार

    – आंबेडकर विचार मंचच्या संयोजिका अलकाताई कांबळे यांनी केतकी चितळे हिच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे केली तक्रार

  • 16 May 2022 06:40 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील मोहगाव झिल्पी तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

    – नागपूर जिल्ह्यातील मोहगाव झिल्पी तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

    – पोहण्यासाठी गेलेल्या काही तरुणांना वाचवण्यात यश

    – वृषभ मेश्राम या २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

    – तलावाशेजारच्या सुचना फलकाकडे तरुणांचं दुर्लक्ष

Published On - May 16,2022 6:26 AM

Follow us
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.