Maharashtra News Live Update : राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी तब्बल 11 ट्रेनची व्यवस्था, मनसेची रेल्वेकडे मागणी

| Updated on: May 18, 2022 | 10:36 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी तब्बल 11 ट्रेनची व्यवस्था, मनसेची रेल्वेकडे मागणी
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज बुधवार 18 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 May 2022 09:37 PM (IST)

    राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी तब्बल 11 ट्रेनची व्यवस्था

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली 11 ट्रेनची व्यवस्था

    अयोध्येला जाण्यासाठी 11 ट्रेन देण्याची मनसेने केली रेल्वेकडे मागणी

    मुंबईच्या वेगवेगळ्या स्टेशनमधून सुटणार अयोध्येच्या 11 ट्रेन

    मुंबई नाशिक मनमाड इथून बसणार ट्रेन मध्ये मनसेचे कार्यकर्ते

    11 ट्रेनमधून 10 हजार मनसे सैनिक अयोध्येला जाणार

  • 18 May 2022 09:36 PM (IST)

    राज ठाकरेंची पुण्यातील सभा ही सभागृहात होणार ?

    मनसेचा वर्धापनदिन झालेल्या स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचात सभा होण्याची शक्यता

    सभागृहाचीही क्षमता मोठी असल्यानं स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात सभा होणार ?

    सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

    उद्या सभेसंदर्मात अधिकृत घोषणा होणार !

  • 18 May 2022 09:36 PM (IST)

    महाराष्ट्राक राज्यसभा निवडणूक घडामोडीना वेग

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली अपक्ष आमदारांची बोलावली बैठक

    परवा सायंकाळी वर्षा या निवासस्थानी बोलवली बैठक

    राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांचे महत्व वाढले

    सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस

  • 18 May 2022 08:32 PM (IST)

    शासन निर्णयाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून स्वागत

    विधवा प्रथेविरुद्ध ग्रामसभांनी ठराव करावेत या शासन निर्णयाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून स्वागत

    महाराष्ट्रातील लोक रुढी परंपरांकडे चिकित्सक नजरेने बघायला प्रवृत्त झाले तर छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात महाराष्ट्राने त्यांना दिलेली ही अर्थपूर्ण आदरांजली ठरेल!

    अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीच्या मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रीया

    हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं शासन निर्णयात रुपांतर

  • 18 May 2022 08:31 PM (IST)

    मोकळ्या जागेत लागली आग

    पूर्व नागपुरातील चिखली चौक ते कळमना रेल्वे क्रॉसिंग कडे जाणाऱ्या मार्गावर मोकळ्या जागेत लागली आग,

    मोकळ्या जागेवर गवत आणि झुडपात लागली आग

    अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

    आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू

  • 18 May 2022 08:31 PM (IST)

    विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर

    रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा उद्या कार्यक्रम

    सकाळी अकरा वाजता नेहरू मेमोरियलला कार्यक्रमाचे आयोजन

    फडणवीस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता

  • 18 May 2022 07:24 PM (IST)

    कोल्हापूर-राधानगरी अभयारण्यात भेकर प्राण्याची शिकार

    शिकारीनंतर मांसाची वाटणी करत असताना तिघे रंगेहात

    वन्यजीव विभागाची कारवाई

  • 18 May 2022 07:15 PM (IST)

    राज ठाकरेंचा अयोध्या दौरा

    कांचन गिरी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

    राज ठाकरे यांना आयोध्या निमंत्रण मी दिले , बृजभूषण यांना राज ठाकरे यांना रोखण्याचा कोणताही हक्क नाही

    आयोध्याची भूमी ही सर्वांसाठी एक समान आहे माझी तुम्हाला विनंती आहे की बृजभूषण यांना रोखावं, कांचन गिरी यांची मोदी यांच्याकडे मागणी

    महाकाल मानव सेवा संस्थानच्या अध्यक्ष कांचन गिरी यांचे पत्र टीव्ही 9 मराठी कडे

    आज महाराष्ट्रात लाखो उत्तर भारतीय शांततेत राहतायत या सगळ्या बाबतीत पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घालावं – कांचन गिरी यांची मागणी

  • 18 May 2022 07:11 PM (IST)

    मनसे नेते बाबू वागस्कर यांची माहिती

    – राज ठाकरेंची पुण्यात सभा होणार ,शंभर टक्के सभा होणार आहे,

    – पुढील आठवड्यात राज ठाकरेंची पुण्यात सभा होणार,

    – चार ठिकाणी आम्ही परवानगी मागितली आहे, 2 जागेची परवानगी आम्हाला आमच्या हातात आहेत,

    – उद्या सकाळी 12 वाजता राज ठाकरे पुण्यातील सभेची तारीख आणि ठिकाण जाहीर करणार,

  • 18 May 2022 07:10 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार

    – पुढील आठवड्यात पुण्यात सभा होणार,

    – मनसे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागस्कर यांची माहिती,

  • 18 May 2022 06:24 PM (IST)

    परभणी तहसील कार्यालयाची बत्ती गुल

    महावितरणने थकीत बिलापोटी तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा केला खंडित ,

    नागरिकांची प्रचंड गैरसोय , लाईट नसल्याने सामान्यांची कामे रखडली ,

  • 18 May 2022 06:24 PM (IST)

    मनसेचा दिपाली सय्यद यांच्यावर पलटवार

    योगेश चिले, प्रवक्ते,मनसे

    दीपाली सय्यद तुम्हाला उत्तर द्यायचे नव्हते

    पण तुमच्या हिमतीची दाद द्यावी लागेल

    तुमची अर्धी हिम्मत जरी तुमचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंना दिली तर त्यांना औरंगाबादचे संभाजीनगर करणे जमेल

    त्यांच्यात सध्या हिंमत कमी पडतेय

    आता आदित्य ठाकरे यांच्या सोबत राज ठाकरे यांनी अयोध्येला जाणं त्या दिवशी होईल ज्या दिवशी आदित्य ठाकरे यांचा आवाज ठाकरेंना शोभेल असा पुरुषी होईल

  • 18 May 2022 06:22 PM (IST)

    केतकी चितळे हिला आजची रात्र ठाणे कारागृहात काढावी लागणार

    वेळे अभावी आज मुंबई गावरेगाव पोलिसांनी ताबा घेतला नाही

  • 18 May 2022 06:22 PM (IST)

    पुणे दौऱ्यात राज ठाकरे आणि वसंत मोरेंची भेट नाही

    राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यात दिली होती भेटीची वेळ

    मात्र न भेटताचं राज ठाकरे मुंबईकडे रवाना

    पुढच्या शनिवारी राज ठाकरे पुन्हा पुण्याचा दौरा करण्याची शक्यता

    पुढच्या दौऱ्यात राज ठाकरे वसंत मोरेंना भेटणार ?

  • 18 May 2022 05:42 PM (IST)

    सांगली – महापालिकेकडून आपत्ती पूर्वी तयारीचा आढावा

    नदी पात्रात घेतली रेस्क्यूची प्रात्यक्षिके

    आपत्ती मदत साहित्य आणि साधनांची घेतली प्रात्यक्षिके

    संभाव्य आपत्तीसाठी सांगली महापालिकेची यंत्रणा सज्ज

    महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे

    मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन

  • 18 May 2022 05:14 PM (IST)

    शिवसेना नेत्या दिपाली सय्यद Live

    राज ठाकरेंच्या मनात माफी मागण्याबाबत चलबिचल आहे

    आदित्य ठाकरेंचा हात पकडा आणि त्यांच्यासोबत जावा

    कार्यकर्त्यांवर आघात झाल्याास त्यांच्यासाठी कुणी नसतं

    मनसे एका आमदारावर सर्व गोष्टी करतंय, मात्र एवढं सोपं नसतं

    असे मुद्दे घेऊन कुणाचं घर नाही चालत

    आता महागाईने कळस गाठला आहे

    यातून आमदार नगरसेवक निर्माण होतील मात्र घर नाही चालत

    तुम्ही माफी मागता मग तुम्ही कसे मुद्दे उचलता

    आदी मारून बाहेर काढलं युपीवाल्यांना ते राज ठाकरे कुठे गेले

    म्हणून तुम्ही आदित्य ठाकरेंचा हात पकडून जावा, तेवढा दबदबा सेनेचा आहे

    कोणती बी, कोणती सी टीम आहे, हे लोक बघतात,

    यांच्याकडे बाकी सांगण्यासारं काही नाही

    उद्धव ठाकरेंनी कोरोनात सर्व बापासारखं हाताळलं

    महाविकास आघाडीला बाजुला करण्यासाठी हे प्रयत्न सुरू

    मग हे परदेशात जाऊन सर्व विकायला मोकळे

    त्यांनी खुलेआम येऊन माफी मागितली पाहिजे

  • 18 May 2022 03:53 PM (IST)

    उजनीतून इंदापूरला पाणी देण्याला कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा कडाडून विरोध

    – सोलापूरकरांचे पाणी वळवत असाल तर खबरदार, आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणा नाही

    – सोलापूरचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर रान पेटवू

    – उजनीचे पाणी 20 वर्षापुर्वी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी पाईपलाईनद्वारे सोलापूरला आणले

    – उजनी प्लस असूनही महापालिकेतून याचे नियोजन होत नाही

    – कॉंग्रेस सत्तेत असताना दुष्काळातसुध्दा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत होते

    – तेव्हा उजनी मायनसमध्ये होते तरीही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला

    – पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एका रात्रीत 2 कोटी खर्च करुन सक्शन पंप लावून एका रात्रीत पाणी आणले

    – हद्दवाढ भागतही दोन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न केला

    – आत उजनी प्लसमध्ये असतानासुद्धा पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय मेलो का ?

    – मला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय

    – सोलापूरकरांचे पाणी वळवत असाल तर खबरदार आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही

    – आम्हाला पाणी द्या, रोज पाणी द्या आणि आमच्या पाण्याला हात लावू नका

    – कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा पालकमंत्र्यांना इशारा

  • 18 May 2022 03:52 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्यात टाळाटाळ करून ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली. मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण गमावले व अनुसूचित जाती – जमातींच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा घोळ केल्यानंतर आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे कायमस्वरुपी गंभीर नुकसान केले आहे. या अन्यायाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी केली. ते म्हणाले की, ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुनावणी चालू असताना सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला १३ डिसेंबर २०१९ रोजीच या आरक्षणासाठी तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले होते. समर्पित आयोग स्थापन करणे, त्या आयोगामार्फत ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचे प्रमाण ठरविणे आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढे जाता कामा नये अशी ही तिहेरी चाचणी आहे. त्यामध्ये एंपिरिकल डेटा गोळा करणे व प्रमाण ठरविणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ताबडतोब तो पूर्ण करून तिहेरी चाचणी पूर्ण केली व ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळविले पण महाराष्ट्रात मात्र अडीच वर्षे झाली तरी एंपिरिकल डेटाचा पत्ता नाही. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे अपयश आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मराठा समाजाला सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले. आमच्या सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले व आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली. आमचे सरकार असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षणावर स्थगिती आली नाही. तथापि, राज्यात जनादेश डावलून महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्या सरकारने मराठा आरक्षणाबाबत ढिलाई केली, त्यातून सर्वोच्च न्यायालयाने प्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली व नंतर ते रद्द केले. आता राजकीय आरक्षणाच्या बाबतीतही महाविकास आघाडी सरकारच्या अपयशामुळेच ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आघाडी सरकारने अनुसूचित जाती – जमातींच्या पदोन्नतीमधील आरक्षणात घोळ केला. धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्यासाठी एक पाऊल टाकले नाही. एकूणच महाविकास आघाडी सरकारमुळे समाजाच्या सर्व घटकांचे नुकसान झाले आहे. याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे.

  • 18 May 2022 03:50 PM (IST)

    परभणीत आज तापमानात घट झाली असून 

    महिन्यानंतर आज तापमान चाळीसच्या खाली

    परभणीत आज 38.5 C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलीय

  • 18 May 2022 02:15 PM (IST)

    राज्य महिला आयोगाचे नाव बदलून राष्ट्रवादी महिला आयोग करा, तृप्ती देसाईंची टीका

    राज्य महिला आयोगाचे नाव बदलून राष्ट्रवादी महिला आयोग करा,

    – तृप्ती देसाई यांची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कामकाजावर टीका,

    – महिला आयोगाच्या अध्यक्षा कारवाई करताना वारंवार भेदभाव करत असल्याचा आरोप

  • 18 May 2022 02:07 PM (IST)

    गुजरातेत सागर मीठ फॅक्टीरीची भिंत कोसळली

    गुजरातेत सागर मीठ फॅक्टीरीची भिंत कोसळली

    मलब्याखाली दबून 12 जणांचा मृ्त्यू, 18 गंभीर जखमी

  • 18 May 2022 02:00 PM (IST)

    ओबीसींच्या राजकीय आरक्षाणाची हत्या महाराष्ट्र सरकारने केली, देवेंद्र फडणवीसांची टीका

    फडणवीस म्हणालेत की, मध्य प्रदेश सरकारने इम्पेरीकल डेटा गोळा करुन संपूर्ण डाटा सादर केला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्यांना सांगीतलं होतं हा इम्पेरीकल डेटा मतदारसंघानुसार द्यावा, आज त्यांनी सादर केला. हा रिपोर्ट सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासोबत निवडणूक घेण्याची परवानगी दिलीय. महाराष्ट्र सरकारला आम्ही दोन वर्षांपासून सांगतोय इम्पेरीकल डेटा गोळा करा, पण यांनी आधी केंद्र सरकारकडे बोट दाखलं, मग कमिशन तयार केलं त्यांना पैसे दिले नाही. त्यानंतर थातुरमातूर रिपोर्ट तयार केला. असा रिपोर्ट सादर करुन आपलं हसं केलं

  • 18 May 2022 01:32 PM (IST)

    संरक्षण मंत्री पुणे दौऱ्यावर

    संरक्षण मंत्री राजनाथसिंह 20 तारखेला पुणे आणि पिंपरी चिंचवडचा दौरा करणार

    पुण्यात 600 पदाधिकाऱ्यांसोबत राजनाथसिंह साधणार संवाद

    कार्यकर्त्यांसोबत चहापानाचा कार्यक्रम आयोजित

    यावेळेस दौऱ्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेनं विरोध केला तर आम्ही बंदोबस्त करू

    मात्र राजनाथसिंह दौऱ्यावर येणार आहेत तयारी सुरू झालीये

    शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती

  • 18 May 2022 01:25 PM (IST)

    पुणे पोलिसांकडून केतकीच्या ताब्याची प्रक्रिया सुरू

    केतकी चितळेच्या ताब्याच्या प्रक्रियेसाठी पुणे पोलीस ठाणे गुन्हे शाखा 1 इथं हजर

    पुणे पोलिसांच्या एका टीमनं केतकी चितळेसोबत केली चर्चा

    पुणे पोलिसांकडून ताब्याची प्रक्रिया सुरू

  • 18 May 2022 01:17 PM (IST)

    मध्य प्रदेशला एक न्याय, महाराष्ट्राला वेगळा न्याय का?

    मध्य प्रदेशला एक न्याय, महाराष्ट्राला वेगळा न्याय का?

    महाविकास आघाडीचे मंत्री जितेंद्र आव्हाडांचा सवाल

    OBC आरक्षणावर जितेंद्र आव्हाडांचं भाष्य

  • 18 May 2022 01:11 PM (IST)

    मध्ये प्रदेशनं एम्पेरिकल डेटा दिला होता, मविआ वेळ काढूपणा करतंय, पंकजा मुंडेंची टीका

    ओबीसी आरक्षणावर पंकजा मुंडेंचं भाष्य

    राज्य सरकारचा वेळकाढूपणा-पंकजा मुंडे

    मध्ये प्रदेश सरकारनं एम्पेरिकल डेटा दिला होता, मविआ वेळ काढूपणा करतंय

  • 18 May 2022 01:08 PM (IST)

    मनसे सरचिटणीस नयन कदम पोलिसांच्या ताब्यात

    मनसे सरचिटणीस नयन कदम यांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.

    नयन कदम म्हणाले की, भोंग्याचा विषय सुरू होता, त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती, आम्हालाही नोटीस मिळाली होती, मला 18 तारखेला अटक झाली आहे, याचे कारण काय, मला समजत नाही, मी भगव्या बुलेटवर फिरतो म्हणून पोलीस आम्हाला अटक करत आहेत का? सरकार दादागिरी करू पाहत आहे, पण मनसे थांबणार नाही, मनसेचा आवाज कायम राहणार आहे.’

  • 18 May 2022 01:06 PM (IST)

    पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा पोलीसांकडून शोध सुरू

    पुण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा पोलीसांकडून शोध सुरू

    एक अधिकारी आणि 6 कर्मचाऱ्यांचा शोध पथकात समावेश

    मोबाईल फोन्स बंद असल्यानं लोकेशन मिळणं अवघड

    पोलीसांकडून मात्र शोधकार्याला सुरुवात

    भाजपा पदाधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार

    कारवाईसाठी शोध पथकं नेमलं !

  • 18 May 2022 12:55 PM (IST)

    सोमय्यांचा संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

    सोमय्यांचा संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

    किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या शिवडी कोर्टात

    26 मे रोजी सुनावणी होणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दहशत मोडीत काढणार

  • 18 May 2022 12:43 PM (IST)

    मनसे सरचिटणीस नयन कदम यांना अटकेची शक्यता

    मनसे सरचिटणीस नयन कदम यांना पोलिस ठाण्यात हजर होण्याचा फोन

    नयन कदम पोलिस ठाण्यात हजर न झाल्यास पोलीस त्यांना आज अटक करू शकतात,

    नयन कदम यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त

  • 18 May 2022 12:22 PM (IST)

    नवी दिल्लीतील रोहिणी कोर्टात आग

    नवी दिल्लीतील रोहिणी कोर्टात आग

    न्यायाधीशच्या चेंबरजवळ आग, दुसऱ्या मजल्यावर लागली आग

    सध्या आग नियंत्रणात, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

  • 18 May 2022 12:11 PM (IST)

    राणा दाम्पत्याची गैरहजेरी, सुनावणी पुढे ढकलली

    राणा दाम्पत्याच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली

    राणा राम्पत्यावरील सुनावणी 15 जूनला

    राणा दाम्पत्या गैरहजर राहिल्याने सुनावणी पुढे ढकलली

  • 18 May 2022 11:54 AM (IST)

    इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर

    इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

    शीना बोरा हत्या प्रकरणात मोठी बातमी

    इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षेापासून तुरुंगात

  • 18 May 2022 11:08 AM (IST)

    केतकी तितळेला न्यायालयीन कोठडी

    अभिनेत्री केतकीची चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

    आतापर्यंत केतकीवर 17 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत

  • 18 May 2022 10:53 AM (IST)

    अभिनेत्री केतकीची आज कोठडी संपणार, जेल का बेल?

    अभिनेत्री केतकीची आज पोलीस कोठडी संपत आहे

    तिला आज ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं आहे

    तिला आता जेल का बेल मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे

    आतापर्यंत केतकीवर 17 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत

  • 18 May 2022 10:47 AM (IST)

    हार्दिक पटेल यांचा राजीनामा

    गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का बसला असून हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला आहे.

  • 18 May 2022 10:20 AM (IST)

    राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी, राज्यातून 12 ट्रेन अयोध्येला जाणार

    राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.जवळपास 12 ते 15 हजार मनसैनिक अयोध्येला जाणार असल्याची माहिती आहे. राज्यभरातून बारा ट्रेन अयोध्येला जाणार आहेत. ठाणे, रायगड, पुणे, नाशिकमधून मनसेच्या सहा ट्रेन अयोघ्येला जाणार आहेत.औरंगाबाद, नागपूर आणि इतर जिल्ह्यातून रेल्वे बुकिंग सुरू आहे.

  • 18 May 2022 10:06 AM (IST)

    देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 829 नवे कोरोनाबाधित

    देशात गेल्या 24 तासांत 1,829 नवीन प्रकरणे, 2,549 कोरोनामुक्त आणि 33 मृत्यूची नोंद झाली आहे.

  • 18 May 2022 10:04 AM (IST)

    भिवंडीतील दापोडामधील गोदामास भीषण आग

    भिवंडी तालुक्यातील दापोडामध्ये गोदामास भीषण आग

    इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलातील 3 गोदाम अंगीच्या भक्ष्यस्थानी

    गोदामात थिनर, पेंट याचा साठा असल्याने आग भडकली

    भिवंडी व ठाणे अग्निशामक फळांच्या गाड्या घटनास्थळी दाखल

  • 18 May 2022 09:35 AM (IST)

    पंढरपूरमध्ये शिक्षक दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

    पंढरपूरमध्ये शिक्षक दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

    पोलिसांकडून मात्र आरोपींची पाठराखण केल्याचा पिडीत दाम्पत्याचा आरोप

    जमीनीच्या वादातून वाळू माफिया असलेल्या सावत्र भावाने केला जीवघेणा हल्ला

    जीवघेण्या हल्ल्यात शिक्षक उमेश वावरे गंभीर जखमी

    -करकंब पोलिसांकडून मारहाण करणारा वाळू माफिया विठ्ठल वावरे आणि नागनाथ शेंडगे यांना अभय मिळत असल्याचा पिडीत शिक्षक उमेश वावरे यांचा आरोप

    – करकंब पोलिसांनी पिडीत शिक्षक दाम्पत्यावरच दाखल केला गुन्हा

  • 18 May 2022 09:32 AM (IST)

    सिन्नरमध्ये भीषण अपघात

    नाशिक – सिन्नर च्या वावीवेस परिसरात भीषण अपघात

    चालकाचा ताबा सुटल्याने पीक अप ने गॅरेज चालकाला चिरडले

    तीन दुचाकींना धडक देत, पीक अप ने गॅरेज चालकाला फरपटत नेले

    अपघातात गॅरेज चालक गंभीर जखमी

  • 18 May 2022 09:30 AM (IST)

    आसामला महापुराचा फटका, 15 जणांचा मृत्यू

    आसाम राज्याला महापुराचा फटका

    आतापर्यंत आसाममध्ये 15 लोकांचा मृत्यू

    26 जिल्ह्यांमधील 4 लाख नागरिकांना महापुराचा फटका

    50 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतरण

    NDRF सह आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू

  • 18 May 2022 09:00 AM (IST)

    उत्तर प्रदेशमध्ये मदरशांचे अनुदान रद्द, योगी सरकारचा मोठा निर्णय

    उत्तर प्रदेशमध्ये मदरशांचे अनुदान रद्द

    योगी सरकारचा मोठा निर्णय

    मदरशांना मिळणारे अनुदान पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय

    कॅबिनेट बैठकीत योगी सरकारने घेतला निर्णय

    उत्तर प्रदेश मध्ये सातशेहून अधिक मदरसे असल्याची माहिती

  • 18 May 2022 08:56 AM (IST)

    पुण्यात राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपचं आंदोलन

    पुण्यातील राष्ट्रवादी – भाजप राडा प्रकरण,

    – राष्ट्रवादी पाठोपाठ आता भाजपही आज आंदोलन करणार,

    – भाजप कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी सरकारच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन,

    – 9:30 वाजता अलका टॉकीज चौकात भाजपचे निषेध आंदोलन,

    – भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

  • 18 May 2022 08:27 AM (IST)

    आज राणा दाम्पत्य कोर्टात बाजू मांडणार

    आज आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हनुमान चालीसा प्रकरणात सकाळी 11 वाजता सत्र न्यायालयात वकीलामार्फ़त बाजू मांडणार आहे.

  • 18 May 2022 08:02 AM (IST)

    स्मृती इराणींच्या कार्यक्रमात आंदोलन, राष्ट्रवादीच्या 40 जणांविरुद्ध गुन्हे

    केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांसह 40 जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

    शहराध्यक्ष जगताप, प्रदीप देशमुख, रुपाली पाटील, महेश हांडे, उदय महाले, राजु साने, मृणाल वाणी, अनिता पवार आदी 40 पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुंबई पोलिस अधिनीयमानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल

  • 18 May 2022 07:59 AM (IST)

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेसाठी आज मुंबईत बैठक

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेसाठी आज मुंबईत मोठी बैठक

    बैठकीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे जिल्हा प्रमुख राहणार उपस्थित

    सर्व आमदार खासदार आणि मोठ्या नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

    8 जून रोजी उध्दव ठाकरे यांची सभा रेकॉर्ड ब्रेक होण्याची चिन्हे

    सभेला लाखो लोकांची गर्दी उसळण्याची चिन्हे

    राज ठाकरे यांच्या सभेचा विक्रम हातोहात मोडण्याचे शिवसेनेचे प्रयत्न

  • 18 May 2022 07:58 AM (IST)

    मेधा सोमय्या संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार

    आज सकाळी 11.45 वाजता मेधा सोमय्या (सोबत किरीट सोमय्या असणार) शिवडी येथील न्यायालयात संजय राऊत यांचा विरोधात मानहानी चा defamation खटला दाखल करणार त्यासाठी नीलम नगर येथून 10:45 वाजता निघणार.

  • 18 May 2022 07:50 AM (IST)

    नागपूरात महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडियाचे नवसंकल्प शिबीर

    नागपूरात महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडियाचे नवसंकल्प शिबीर

    – सोशल मीडियाच्या नवसंकल्प शिबीर येणार काँग्रेसचे दिग्गज नेते

    – २८ आणि २९ मे रोजी नागपूरात होणार शिबीर

    – के सी वेणुगोपाल, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण राहणार उपस्थितीत

    – आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सोशल मीडिया सेलला देणार बळ

  • 18 May 2022 07:49 AM (IST)

    पुण्यात 4 महिन्यांत 530 सेक्सटॉर्शनच्या तक्रारी

    पुणे सायबर पोलीस ठाण्यात गेल्या 4 महिन्यांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो टाकून बदनामी केल्याच्या एक हजारांहून अधिक तक्रारी

    यामध्ये राजकीय व्यक्तींपासून व्यावसायिक, सामान्यांचा समावेश

    गेल्या 4 महिन्यांत फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातून 1,182 बदनामीच्या तर 530 सेक्सटॉर्शनच्या तक्रारी

    त्याखालोखाल फेस प्रोफाइल तयार करून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्याच्या 387 तक्रारी

    फेसबुक प्रोफाइल हॅक करून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्याच्या 190 तक्रारी

    फेसबुकच्या माध्यमातून खरेदी- विक्री करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या 71 तक्रारी

  • 18 May 2022 07:48 AM (IST)

    विमुक्त जाती, भटक्या जमाती कल्याण समिती आज अमरावतीत

    महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती आज अमरावतीत ..

    तीन दिवस समितीचा अमरावती जिल्ह्यात दौरा आहे.

    समितीप्रमुखांसह विधानमंडळाचे 15 सदस्यांचा समितीत सहभाग….

    समितीप्रमुख आमदार शांताराम मोरेंसह अनेक आमदारांची राहणार उपस्थिती.

    पोलीस अधिक्षक कार्यालय, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, परिवहन, एमआयडीसी, उद्योग विभागा सह आदी विभागांचा घेणार आढावा

  • 18 May 2022 07:47 AM (IST)

    जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक

    अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक..

    पावसाळ्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मंत्री यशोमती ठाकूर घेणार आढावा बैठक..

    शेतकऱ्यांसाठी खतांची उपलब्धता, बी-बियाणे,कृषी कर्ज या संदर्भात घेनार आढावा..

  • 18 May 2022 07:44 AM (IST)

    औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलण्याचा मुद्दा पेटण्याची चिन्हे

    औरंगाबाद शहरातील विमानतळाच्या नाव बदलण्याचा मुद्दा पेटण्याची चिन्हे

    औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव देण्याची शिवसेनेची मागणी

    विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतली ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट

    विमानतळाचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत

    तर भाजप शिवसेनेला औरंगाबाद शहराचे नाव बद्दलब्यासाठी अडचणीत आणण्याच्या तयारीत

  • 18 May 2022 07:42 AM (IST)

    संघ मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी अटकेत

    संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी करणारा दहशतवादी नागपूर एटीएसच्या ताब्यात

    – जानेवारीमध्ये रईस अहमद शेख सदाउल्ला शेखला कश्मिर पोलिसांनी केली होती अटक

    – 15 जुलैला नागपुरात येऊन रईस शेखने संघ मुख्यालय, स्मृती मंदिर परिसराची केली होती रेकी

    – नागपूरात कोतवाली पोलिसांनी रईस शेख विरोधात गुन्हा दाखल केला होता

    – नागपूर दहशतवादी पथकाने कश्मिरमध्ये जाऊन रईस शेखला अटक केली

    – नागपूर एटीएस आतंकवादी रईस शेखची कसून चौकशी करत आहेत

  • 18 May 2022 07:37 AM (IST)

    राज्यसभेच्या जागेवरुन संजय राऊतांची टीका

    राज्यसभेच्या जागेवरुन संजय राऊतांचं ट्विटरवरुन विरोधकांवर टीकास्त्र

  • 18 May 2022 06:47 AM (IST)

    नागपूर विभागात एसटीचे कंत्राटी चालक पुन्हा बेकार

    नागपूर विभागात एसटीचे कंत्राटी चालक पुन्हा झाले बेकार

    – एसटीचा संप मिटल्यानंतर कंत्राटी चालकांची सेवा बंद

    – संपकाळात कंत्राटी कामगारांनी बजावली महत्त्वाची भूमिका

    – अडचणीत दिलेल्या सेवेमुळे पुन्हा कामावर बोलावतील अशी कामगारांची आशा

    – नागपूर विभागात शंभर कंत्राटी चालकांनी दीड ते दोन महिने केले काम

  • 18 May 2022 06:36 AM (IST)

    चहूकडे घोटाळेच घोटाळे, अशी देशाची स्थिती, ‘सामना’तून केंद्रावर टीका

    ‘सामना’तून केंद्रावर टीका

    देशातील निम्मी लोखसंख्या अर्धपोटी आणि घोटाळेबाज दरवर्षी देशाचे 40-50

    हजार कोटी पचवून देशाबाहेर फरार होत आहेत. हा देखील एक घोटाळाच म्हणावा लागेल.

    देशातील कोरोना बळींच्या आकड्याचा घोटाळा जागतिक बँकेने उपस्थित केलेल्या

    प्रश्नावरुन समोर आला आहे. कोरोना काळात गंगेत किती मृतदेह टाकले आणि

    किती नदीकिनारी पुरले गेले याची माहिती आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानेच

    उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारकडे मागितली आहे. त्यात गेल्या वर्षभरात

    7 हजार 940 बँक घोटाळे होउन त्यात 40 हजार कोटी रुपये

    अडकल्याचे रिझर्व्ह बँकेनेच आता मान्य केले आहे. घोटाळेच घोटाळे चहूकडे

    अशी स्थिती सध्या देशात दिसत आहे.

  • 18 May 2022 06:23 AM (IST)

    त्यांनी टीका करावी, आम्ही कामं करू, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

    गेल्या दोन वर्षापासून रस्त्याचे कामे बंद होते

    पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे कामे होत आसतात

    जवळपास 250 ठिकाणी कामे चालू आहेत

    जूनच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण कामे होतील

    यासाठी आम्ही नियोजन करत आहोत

    भाजप रोज उठून टिका करतात

    पण नालेसफाई हे एवढे अवघड काम आहे

    ते एवढे काम करणे सोपे नाही आहे

    माल आनंद आहे की ते आमच्यावर

    टिका करत आहेत त्यांनी टिका करत राहावी आम्ही लोकांची कामे करू

Published On - May 18,2022 6:22 AM

Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.