Maharashtra News Live Update : अयोध्येत राज ठाकरेंची बॅनर झळकले, भगवाधारी
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज सोमवार 2 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आज औरंगाबाद झालेलं भाषण म्हणजे लोकांच्यासाठी निव्वळ मनोरंजन होतं. शरद पवार यांच्यावर बोलले की महाराष्ट्रमध्ये कव्हरेज मिळतो. त्याच्या या भाषणाला महाराष्ट्र किंमत देईल असे वाटत नाही असं प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
LIVE NEWS & UPDATES
-
अयोध्येत झळकले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बॅनर
अयोध्येत झळकले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बॅनर..
बॅनरवर राजा ठाकरे यांच्या भगवाधारी असा उल्लेख..
राज तिलक की करो तैयारी आ रहे है भगवाधारी
मनसे पदाधिकारी अभिनंद गणेश चव्हाण यांची अयोध्येत बॅनरबाजी…
राज ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी मनसेकडून बॅनरबाजी..
5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा..
-
एमपीएससी आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
CSAT चा पेपर आयोगानं केला ग्राह्य
विद्यार्थ्यांना यापुढे 33 टक्के गुण घेणं बंधनकारक
GS च्या पेपरवरचं विद्यार्थ्यांचा लागणार निकाल,
मात्र आता CSAT उत्तीर्ण होणं बंधनकारक
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश 8 वर्षापासून विद्यार्थी करत होते मागणी
आज एमपीएससी आयोगानं काढलं परिपत्रक
-
-
अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका
विष कालवणा-या माणसाने काय काम केल ?
साधी दूध सोसायटी नाही काढली पठ्ठयाने…
एक खरबूज , टरबूज सोसायटी देखील नाही…
संस्था चालवण्यास डोकं लागतं….
धुडगूस घालण्यासाठी डोक लागत नाही….
राज ठाकरेंना खोचक टोला..
योगींनी मस्जिद आणि मंदिराचे भोंगे देखील बंद कले…
साई मंदाराची आरती देखील पहाटे ६ च्या अगोदर होते…
जागरण गोंधळण देखील उशिरा होते…
जत्रा , ऊरूस चालू आहेत…
विरंगुळा म्हणुन कार्यक्रम होतात…
पोलिस देखील उटसूट काही कारवाई करत नाही …
यांच्या सभा रात्री होतात…
दुपारी घेतली का ?
सध्या राजकारण विचित्र दिशेने सुरू …
राजकीय स्वार्थ म्हणून समाजात फुट पाडण्याच काम करताना…
यांनी छत्रपतींच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी केल…
पवार फुले शाहू आंबेडकर तसेच छत्रपतींच्या विचाराने काम करतात…
आमच्या नसानसात छत्रपती…
कोण तुकडोबा आम्हाला विचारतो ?
भाषण म्हणजे नुसती नोटंकी…
नकलाकार की भाषण करायला आले…
-
छगन भुजबळ यांची राज ठाकरेंवर टीका
राज ठाकरे म्हणतात आम्ही छत्रपतींच नाव घेत नाही…
राज ठाकरे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेत नाही…
त्यांचं नाव ताणतणाव वाढवण्यासाठी…
संभाजी भिडे यांनी मुस्लिम द्वेष वाढवला….
त्यांच ऑपरेशन मुस्लिम डॉक्टरने केलय…
माणुसकीच्या पुढे कोणताही धर्म नाही…
छत्रपती शिवरायांकडे कित्येक मुस्लिम सैनिक होते…
कोणता इतिहास सांगता आहात…
-
न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे
हेच न्यायालय आमच्या बाजूने निर्णय देईल.
सरकारचा दबाव आहे.पण आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे
चार तारखेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर होईल असा विश्वास
आमदार रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा यांची प्रतिक्रिया
-
-
ज्यूस सेंटरच्या मालकाला जबर मारहाण
– शिवाजीनगर परिसरात एका ज्यूस सेंटरच्या मालकाला जबर मारहाण,
– लोखंडी हाथोडीने केला डोक्यावर हल्ला,
– गंभीर गुन्ह्यातील आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी केलं ७२ तासांच्या आत जेरबंद,
– गुन्ह्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
-
रोहित पाटील यांची राज ठाकरेंच्यावर अप्रत्यक्ष टीका
महाराष्ट्रला पुन्हा एकदा जाती-जातीच्या बेड्यामध्ये अडकवण्याचे काम काही लोक करतायत,
पण अशा लोकांना महाराष्ट्र मधील जनताच उत्तर देईल
जे मुद्दे समाजात अशांतता पसरवतात अशा मुद्याना महाराष्ट्र मधील जनता थारा देणार ना
हल्ले हे नेहमी शक्तीस्थळावरच केले जातात,
पवार साहेब महाराष्ट्राचे नेतृत्व करतात
शक्तिस्थळ म्हणूनच त्यांच्यावर टीका होते
-
खामगाव तालुक्यातील जनुना येथे फटाका गोडाऊनला आग
आगीत लाखोंचे फटाके जळाले,
गोडाऊन मधील आग विझवण्याचा अग्निशमन दलाकडून प्रयत्न,
आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट,
खामगावचे व्यापारी गोयनका यांचे फटाका गोडाऊन,
-
पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार
मस्जिदीच्या बाहेर आणि नमाजाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करणार.
3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त लावला जाणार,
शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही. याची काळजी घेऊ
कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातामध्ये घेऊ नका
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा इशारा
रमजानच्या पार्श्वभूमीवर घेणार सगळी खबरदारी
टीव्ही मराठीला दिली माहिती
-
राज ठाकरे यांच्या सभेचं फुटेजची तपासणी पूर्ण
डीसीपी अपर्णा गीते यांच्या पथकाने केली तपासणी पूर्ण
सायबर सेल मध्ये झाली फुटेजची तपासणी
तब्बल पाच तास सुरू होती फुटेजची तपासणी
7 ते 8 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली फुटेजची तपासणी
राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात पोलीस अहवाल तयार करणे सुरू
-
शिवसेनेला शरद पोंक्षेंचा घरचा आहेर
अभिनेते शरद पोक्षेंनी राज ठाकरेंच्या भाषणाचं केलं कौतुक
व्वा राजसाहेब व्वा आम्ही भारतीय आज सुखावलो
बऱ्याच काळाने एक जबरदस्त विचार विशेषतः मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे आमच्या मनातले विचार मांडलेत धन्यवाद !
अशा आशयाचं केलं कौतुक
शरद पोंक्षे शिवसेनेचे उपनेते आहेत
-
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
-
अजित पवारांनी केली राज ठाकरे यांची नक्कल
– नाशिककरांना माहिती पवार जातीयवादी आहे की नाही
– रामदास आठवले,राजू शेट्टी यांनी देखील सांगितलं की पवार साहेब जातीयवादी नाही
– एखादा धाधांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व देण्याचं कारण नाही
– लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती, आता तिकडची घेतली आहे
– म्हणजे मविआच्या उमेदवारांच्या सपोर्ट मध्ये बोलत होते
– नाही तर परत ब्रेकिंग न्यूज ..अजित दादांनी सांगितले सुपारी घेतली
– फक्त शरद ,पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावर टीका
– पवार साहेबांनी कोणाचे नाव घ्यायचं हा त्यांचा प्रश्न
– आम्ही एखाद्याच कौतुक केलं आणि नंतर टीका करायचं म्हटलं तर जीभ पण वळत नाही
– यांना काही घेणं देणं नाही
– सभा दुपारी का घेत नाहीत ? संध्याकाळीच का
– कधी तरी 15 दिवसातून एक सभा संध्याकाळी घ्यायची
– काय आहे ते एकदाच शिकरून घे
-
राणा दाम्पत्याच्या जामीनावर पाच वाजता निकाल येणार आहे
राणा दाम्पत्याच्या जामीनावर पाच वाजता निकाल येणार आहे
दोन राणा दाम्पत्य दोन दिवस कोठडीत राहणार
-
इतिहासाचा चुकीचा संदर्भ देऊ नका – जितेंद्र आव्हाड
इतिहासाचा चुकीचा संदर्भ देऊ नका – जितेंद्र आव्हाड
कधी त्यांना फुलेंचं, शाहू, आंबेडकरांचं नाव घेत नाहीत
त्यांना सविधानाविषयी प्रेम असतं, तर ते असं वागले नसते.
फुलेंनी १०८ ओळींचा पोवाडा लिहिला आहे. तो वाचा
इतिहासाची मोडतोड करू नका
माझी आई अशिक्षित होती. आज मी माझ्या आईमुळे आहे
शिवाजी महाराजांनी मुद्रा ही फक्त त्यांच्यापुरती मर्यादीत ठेवली आहे
राजमुद्रा ही शिवाजी महाराजांची ओळख होती.
महाराष्ट्र सगळं बघण्यास समर्थ आहे
-
एमपीएससीनं 2020 च्या जाहीरातीमधील एमपीएससी गट ब ची मुख्य परीक्षा घ्यावी
एमपीएससीनं 2020 च्या जाहीरातीमधील एमपीएससी गट ब ची मुख्य परीक्षा घ्यावी
गेल्या एक वर्षापासून रखडली मुख्य परीक्षा
4 सप्टेंबर 2021 ला झाली होती पुर्व परीक्षा तर 29 जानेवारीला होणार होती मुख्य परीक्षा
पुर्व परीक्षेत काही प्रश्न चुकल्यानं विद्यार्थी थेट न्यायालयात
निर्णय न्यायालयात प्रलंबित असल्यानं मुख्य परीक्षेस विलंब
एमपीएससी आयोग कोणताही तोडगा काढत नसल्याचा आरोप
एमपीएससी आयोगाच्या विरोधात आज पुण्यात विद्यार्थी करणार आंदोलन
संध्याकाळी 5 वाजता अलका चौकात विद्यार्थी करणार आयोगाला आवाहन
मुख्य परीक्षा लवकर घ्या विद्यार्थ्यांची मागणी
-
वाढत्या उन्हाचा आंबा बागेला फटका, 5 एकर वरील बाग जळून खाक
वाढत्या उन्हाचा आंबा बागेला फटका,5 एकर वरील बाग जळून खाक
उस्मानाबाद –
वाढत्या उन्हाचा व शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीचा आंबा बागेला फटका बसला असून कळंब तालुक्यातील दिगंबर कापसे यांची 5 एकरवरील बाग जळून खाक झाली आहे. शेतकर्यांचे 10 लाखाचे नुकसान झाले असून जळलेल्या बागेचा पंचनामा करण्यासाठी कृषी चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
राज ठाकरेंच्या आदेशानुसार 3 तारखेला ईद असल्यानं हनुमान चालीसा लावली.जाणार नाही
राज ठाकरेंच्या आदेशानुसार 3 तारखेला ईद असल्यानं हनुमान चालीसा लावली.जाणार नाही
मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय.
ईदचा सण पार पडू देणार
मात्र4 तारखेनंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाणार
राज्य प्रवक्ते योगेश खैरे यांची माहिती.
-
तुम्ही चित्त लावून शेती केली, म्हणून आमचे वित्त मंत्रीने 5 पट पुरस्कार वाढवले
तुम्ही चित्त लावून शेती केली, म्हणून आमचे वित्त मंत्रीने 5 पट पुरस्कार वाढवले
दादा भुसे हे जंगल मधून आलेली भाजी मला घरी आणुन देतात ती भाजी मी खातो – मी 3 वर्षांपासून महाराष्ट्र मध्ये आहे, शेतकरीचा मुलगा आहे नरहरी झिरवाळ माझ्याकडे येतात आदिवासी बांधवांना राजभवनाचे दर्शन करण्याची विनंती केली मी त्यांच्या आदिवासी गावात जाण्याची विनंती केली – भुजबळ यांनी भाषण केले नाही, नेते भाषणाची संधी सोडत नाही, पण भुजबळ बोलले नाही
राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी व्यासपीठावरील सर्व नेत्यांचे नाव घेऊन कोपरखळ्या मारल्या
राज्यपाल भाषण आपण देशातच नाही तर विदेशात ही अन्नधान्य देतोय – पूजा पाठ करा पण भोंगा लावा न लावा हे तुमचा प्रश्न त्यात मी काय बोलु
राज्यपाल भगतसिंग कोशयारी उत्तरराखड मधून लोकांना महाराष्ट्र मध्ये घेऊन येतो महाराष्ट्र मधील शेतकरी कडून शिका असे सांगतो – डाळिंब, कांदे असे पीक घेतले जातात – गरीब शेतकऱ्यांना पुढे नेण्यासाठी सर्वानी प्रयत्न करायला पाहिजे,प्रोत्साहन दिले पाहिजे
– तुम्ही काही करा तुम्ही 2 पावलं पुढे या राज्य आणि केंद्र सरकार चार पावलं पुढे येईल
-
राष्ट्रवादीचं घड्याळ बंद असल्यानं त्यांना सगळीकडं घड्याळ दिसतंय – अशिष शेलार
राष्ट्रवादीचं घड्याळ बंद असल्यानं त्यांना सगळीकडं घड्याळ दिसतंय
सर्व पक्षांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे
सुडबुध्दीने कारवाई केल्यास आमचा विरोध असेल
भाजपवरती तुटून पडा हे काय आहे
मला असं वाटतंय टोमणे मारणे हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही
ओवेसी ज्या पध्दतीची भाषण करीत आहेत. त्यावर न्यायालय गप्प का आहेत
न्यायालयाने लक्ष देण्याची वेळ आलेली आहे
गरीबांचे कैवारी असाल तर तुम्ही करा
-
अतिक्रमणमूळे मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक देखील त्रस्त होते
नागपुर शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजापेठ असलेल्या बर्डी मेन रोड वरील अतिक्रमण काढायला नागपुर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक आणि नागपुर सुधार प्रन्यास ने काढायला सुरुवात केली.
२० पेक्षा जास्त दुकाने जमिनोध्वस्त केली,
या संदर्भात दुकानदार संघटना न्यायालयात गेले होते आधी या कारवाई वर न्यायालयाने स्टे दिला होता.
आता न्यायालयाने स्टे हटविल्याने आज कारवाई करण्यात आली.
अतिक्रमणमूळे मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक देखील त्रस्त होते
-
शेती हे शाश्वत विकासाच स्रोत – अजीत पवार
उपमुख्यमंत्री अजीत पवार –
शेती हे शाश्वत विकासाच स्रोत… पारितोषिकाची रक्कम पाचपट करणार… तापमानात कमाली़ची वाढ झालीय…त्यामुळे काळजी घ्या… शेतीला जोडधंदा हवा… कँन्सरचे प्रमाण वाढले आहे… धान्य , फळे खाण्याकरिता अपायकारक… रसायन मुक्त खते , सेंद्रीय शेती करण्याकडे भर दया… ऊसाबाबत निर्णय ..ऊस आहे तोपर्यंत कारखाने सुरू राहणार… रिकवरी लॉससाठी २०० रुपये टन अनुदान… आता ऊस लावताना इथेनॉलचा पर्याय द्यावा लागेल… नितीन गडकरी देखील पर्याय देण्याबाबत बोललेत….
-
देशातील वीज संकटाबाबत महत्त्वपूर्ण बैठक
देशातील वीज संकटाबाबत महत्त्वपूर्ण बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली बैठक
उर्जा मंत्री आर के सिंग यांच्यासह कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी बैठकीला उपस्थित
देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या तीव्र वीज संकट
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये भारनियमनाचे संकट
केंद्र सरकार लवकरच तोडगा काढणार
-
संभाजी भिडे यांनी आयुष्यभर मुस्लिम द्वेष पसरवला – छगन भूजबळ
राज ठाकरे महाराष्ट्राचा खोटा इतिहास मांडत आज
महाराजांची समाधी शंभू राजे यांनी बांधली
फुले यांनी ती शोधली
फुलेंनी पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात और केली
संभाजी भिडे यांनी आयुष्यभर मुस्लिम द्वेष पसरवला
पण त्याच भिडे यांची शस्त्रक्रिया मुस्लिम डॉक्टर ने केली
शरद पवारांना जातीयवादी ठरवण्यासाठी च काल राज ठाकरेंची सभा होती की काय
तुम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही
टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हे धादांत खोटं
ज्या वेळी फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ १३ वर्षांचे होते
टिळकांनी शिवस्मारक साठी केवळ फंड गोळा केला, मात्र उभ्या आयुष्यात काहीच केलं नाही
पुढे विचारणा झाल्यावर ज्या बँकेत फंड ठेवला होता, ती बँकच बुडाली असं सांगण्यात आलं
-
राज ठाकरे यांनी आमच्यावर टीका केली नाही मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही
राज ठाकरे यांनी आमच्यावर टीका केली नाही मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही
माझ्या वर जे बोलले दिलीप धोत्रे सुमित खांबेकर हे जेल मध्ये जाऊन आलेले आहेत
दिलीप धोत्रे हा वाळू माफिया आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तो जेल मध्ये जाऊन आला त्याच्याबद्दल काय बोलायचं
-
नागपूरात पाणीप्रश्न पेटला, काँग्रेस आक्रमक
– नागपूरात पाणीप्रश्न पेटला, काँग्रेस आक्रमक
– महाविकासआघाडीतील घटकपक्ष काँग्रेसचा नागपूर महानगरपालिकेवर मोर्चा
– नेहरू नगर झोन कार्यालयावर काँग्रेसचे मटका फोड आंदोलन
– काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या शेकडो नागरिक आक्रमक
– मनपाच्या अधिकाऱ्यांच्या समोर फोडले मटके
– फुटलेले मटते अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेऊन केला निषेध
– नागपूरात पाण्याचा भीषण प्रश्न, नागरिक त्रस्त
-
हिंगोली-कळमनुरी महामार्गावरीलवाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू
हिंगोली /कळमनुरी महामार्गावरील खानापूर चित्ता परिसरात दुचाकीला आज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोठा रक्त स्त्राव होऊन दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला गजानन पारखे अस 25 वर्षीय अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे..
-
शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली तो चिरडला जाता कामा नये – उद्धव ठाकरे
प्रत्यक्ष शेती करणारे आपल्या समोर बसले आहेत. माझ्या मनात एक तळमळं आहे की, कृषी प्रधान देशातला आणि माझ्या राज्यातला शेतकरी, आत्महत्येची वेळी कदापि येता कामा नये. कर्जाच्या डोंगराखाली तो चिरडला जाता कामा नये. जो संपुर्ण देशाला जगवतो, राज्याला जगवतो. त्याचं जगणं सुसय्य करणं. हे आपल्या सरकारचं काम करतोय.
-
औरंगाबादचे पोलीस आयुक्त आज त्यांच्या संपूर्ण टीमसोबत राज ठाकरे यांचे भाषण पाहणार
फ्लॅश – मंगळवारी सकाळपर्यंत औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांना राज ठाकरेंच्या भाषणाचा तपास अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवणार…
– औरंगाबादचे पोलीस आयुक्त आज त्यांच्या संपूर्ण टीमसोबत राज ठाकरे यांचे भाषण पाहणार…
– भाषणात आक्षेपार्ह, प्रक्षोभक भाषा वापरली असेल तर त्याची दखल घेतली जाणार…
– राज ठाकरेंच्या भाषणाबाबत औरंगाबाद पोलीस कायदेशीर सल्लाही घेणार…
– हा तपास अहवाल ईदनिमित्त गृहराज्यमंत्री दिलीप वळसे यांच्यासोबतच्या बैठकीत ठेवण्यात येणार…
-
शरद पवार जातीयवादी नाहीयत,राष्ट्रवादीत सर्वच जाती धर्माचे लोक आहेत,
– या सगळ्या मागे भाजप आहे,
– मुख्यमंत्री पदाची आस लावून बसलेले देवेंद्र फडणवीस हे सर्व करतायत,
– राज्यात दंगली होणार नाहीत, यासाठी महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे,
– शरद पवार जातीयवादी नाहीयत,राष्ट्रवादीत सर्वच जाती धर्माचे लोक आहेत,
– राज यांच्या भाषणामुळे जर काही घटना घडली तर कारवाई होणार,
– बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय होते?
– बाळासाहेब ठाकरेंचे मोजमाप तुम्ही नाही करू शकत
-
विदर्भातील नदीजोड प्रकल्पाचे कार्यालय हलवणार ?
नवी दिल्ली
विदर्भातील नदीजोड प्रकल्पाचे कार्यालय हलवणार ?
वैनगंगा नदी आणि नळगंगा नदी जोड प्रकल्प कार्यालय गुंडाळण्याच्या हालचाली
याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची माहिती
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा
कार्यालय बंद झालं तर या प्रकल्पाबाबत आम्हाला हैदराबाद शी संपर्क साधावा लागणार
नागपुरातील विभागीय कार्यालय बंद होऊ नये आशिष देशमुख यांची मागणी
-
लवकरच सामनामध्ये मुख्यमंत्री यांची मुलाखत येईल तेव्हा बोलू – संजय राऊत
किती बाबरी ढाच्या वर बोलणार महागाई बेरोजगारी असंख्य प्रश्न चीन घुसखोरी यावरन लक्ष हटवण्यासाठी हनुमान चालीसा बाबरी यावर भाजप, त्यांचे सिस्टर पक्ष लक्ष वेढत आहेत
बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती हे भाजपने तेव्हाचे त्यांच्याच पक्षाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारा
त्याकाळातला सीबीआय चा अहवाल तपासा
राम मंदिर उभं राहतंय वातावरण बद्दललंय प्रश्न बद्दललेत पण भाजप आणि त्यांचे गुप्त छुपे साथीदार या प्रश्नांकडे लोकांना आकर्षित करतायेत
लवकरच सामनामध्ये मुख्यमंत्री यांची मुलाखत येईल तेव्हा बोलू
भोंगे विषय नाही भोंग्यांमागे इलेक्ट्रिसिटी कोणाची आहे सर्वांना माहितीये
हा विषय कोर्टाचा पोलिसांचा आहे राजकीय स्वार्थासाठी देशाचं वातावरण खराब करताय आम्ही स्वतः भोंग्यांविरुद्ध आंदोलन केलंय कोर्टाचा आदेशानुसार पालन होईल
विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय त्याचा आधी त्यांनी अंत करावा मग बोलावं
-
राज ठाकरे यांच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
राज ठाकरे यांच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
16 अटी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी होऊ शकतो गुन्हा दाखल
औरंगाबाद पोलिसांकडून सभेचं फुटेज तपासणे सुरू
आवाजाची मर्यादा आणि गर्दीची मर्यादा ओलांडल्या प्रकरणी होऊ शकतो गुन्हा दाखल
-
शिवसेना कुठे होती, काय करीत होती हे सगळ्यांना माहित आहे – संजय राऊत
शिवसेना कुठे होती, काय करीत होती
राम मंदीर उभ राहत आहे
मुळ प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळं सुरू आहे.
भोंग्यापेक्षा महत्त्वाचे विषय या देशात आहेत. हे हिंदुत्व नाही
कायदा मोडणाऱ्यांवरील काय करायचं हे कायदा ठरेल
तुम्हाला आता काहीचं काम नसल्याने तुम्ही बोलत आहात
मला वाटत नाही परिस्थिती बिघडेल असं
त्यांनी रामायण पुन्हा वाचायला हवा
-
राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभाला थोड्याच वेळात होणार सुरुवात
नाशिक – राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभाला थोड्याच वेळात होणार सुरुवात
राज्यपाल कोश्यारी,अजित पवार,छगन भुजबळ,बाळासाहेब थोरात,दादा भुसे राहणार उपस्थित
198 शेतकऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण
मुख्यमंत्री कार्यक्रमाला ऑनलाईन राहणार उपस्थित
-
पुढील 3 महिन्यात रिफायनरीबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित!
रत्नागिरी- कोकणातील रिफायनरीसंदर्भातील मोठी घडामोडकोकणातील रिफायनरीसंदर्भातील मोठी घडामोड
पुढील 3 महिन्यात रिफायनरीबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित!
सध्या राज्य आणि केंद्रामध्ये ‘कॉस्ट असेसमेंट’बाबत चर्चा सुरू – सुत्र
प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्वबाबींची चाचपणी झाल्यानंतर निर्णय
राज्य आणि केंद्रामध्ये सकारात्मक पातळीवर चर्चा सुरू – सुत्र
पुढील 3 महिन्यात रिफायनरीबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित!
सध्या राज्य आणि केंद्रामध्ये ‘कॉस्ट असेसमेंट’बाबत चर्चा सुरू – सुत्र
प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्वबाबींची चाचपणी झाल्यानंतर निर्णय
राज्य आणि केंद्रामध्ये सकारात्मक पातळीवर चर्चा सुरू – सुत्र
-
कायद्याच्या चौकटीमध्ये ज्याला त्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे – दादा भुसे
– कायद्याच्या चौकटीमध्ये ज्याला त्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे – आज सर्वांसमोर इतरही मुद्दे महत्त्वाचे आहे ज्यात महागाई बेरोजगारी असे मुद्दे देखील महत्त्वाचे आहे – कोणत्या विषयाला किती महत्त्व दिले पाहिजे याचा देखील आपण विचार करण्याची आवश्यकता आहे – कोणी कितीही षड्यंत्र केलं तरी शिवसेनेचा काम हे एक किंवा दोन दिवसाचा नाही, गेल्या पन्नास साठ वर्ष रक्ताच पाणी करून शिवसेना उभी केली आहे, अजय कोणी बोलत आहेत ते शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादानेच नावारूपाला आले आहे
-
गडचिरोली एटापल्ली सुरजागड लोह प्रकल्पाच्या काम बंद करण्यासाठी आदिवासी पुन्हा घेणार पुढाकार
गडचिरोली एटापल्ली सुरजागड लोह प्रकल्पाच्या काम बंद करण्यासाठी आदिवासी पुन्हा घेणार पुढाकार
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव लोहा सुरजागड प्रकल्प व शासनाने दिलेले लीज च्या विरोधात आदिवासी आहेत
गोटू समितीच्या आदिवासी एटापल्ली तालुक्यातील जनतेला आवाहन
गोटुल समिती मध्ये जवळपास चाळीस ग्रामपंचायत व दीडशे गावांचा समावेश
याच्या अगोदर तीन दिवस आक्टोबर २०२१ महिन्यातही करण्यात आले होते आंदोलन
या आंदोलनात शासनाने दिलेले आश्वासन खोटे ठरल्याने पुन्हा करणार आदिवासी आंदोलन
जल जंगल जमीन नष्ट न होता कंपनीने काम करावे ही आहे आदिवासी यांची मुख्य मागणी
-
महाराष्ट्रात 65 चित्रपट गृहात होणार चित्रपट प्रदर्शित : अमेय खोपकर
प्रदर्शनाआधीच मनसेचा ‘भोंगा’ वादात
‘भोंगा अजान’ हा मराठी चित्रपट आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यातुन मालकांची माघार
चित्रपट प्रदर्शित व्हायला उरले अवघे 24 तास
‘भोंगा अजान’ मंगळवारी 3 मेला होणार चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
याआधी OTT वर हा चित्रपट प्रसिद्ध झालाय
मनसे सिनेकर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतलेत.
चित्रपटामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशी भीती चित्रपटगृह मालकांना महाविकास आघाडी सरकारकडून दाखवली जातेय : अमेय खोपकर यांचा आरोप
त्यामुळे चित्रपटगृह मालक भीतीपोटी माघार घेत आहेत : अमेय खोपकर
पण चित्रपटगृह मालकांना हा चित्रपट लाववाच लागेल : अमेय खोपकर यांचा विनंती वजा इशारा
अन्यथा, हिंदी चित्रपटांचे खेळ होऊ देणार नाही : अमेय खोपकर
महाराष्ट्र सैनिक चित्रपटगृहांना सरंक्षण देण्यास तयार : अमेय खोपकर
‘भोंगा अजान’ हा चित्रपट धार्मिक नाही, तर तो सामाजिक चित्रपट : अमेय खोपकर
हा महाराष्ट्र आहे, पाकिस्तान नाही : अमेय खोपकर
महाराष्ट्रात 65 चित्रपट गृहात होणार चित्रपट प्रदर्शित : अमेय खोपकर
चित्रपताबाबत चित्रपटगृह मालकांशी खूप आधी बोलणी झाली होती : अमेय खोपकर
ट्रेलर नुकताच रिलीज केला : अमेय खोपकर
चित्रपट प्रदर्शित न करायला कोण दबाव आणतंय त्याचं फक्त नाव कळू द्यात….. : अमेय खोपकर
-
गडचिरोली रेल्वे फाटक बायपास रस्त्याचे त्वरित काम पुर्ण करावे
गडचिरोली रेल्वे फाटक बायपास रस्त्याचे त्वरित काम पुर्ण करावे
अन्यथा आंदोलन करू असा इशारा देसाईगंज काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला
या बायपास रस्त्यासाठी देसाईगंज तालुक्यात अनेक पक्षाचे आंदोलने झाली
त्यानंतर बायपास रेल्वे फाटक च्या रस्त्यासाठी निविदा काढण्यात आली
परंतु काम सुरू ना झाल्यामुळे जवळपास तीन वर्षापासून नागरिकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो आहे
या कामाला घेऊन आता काँग्रेस मैदानात उतरण्याची शक्यता आहे
-
समाजामध्ये सगळ्यांनी शांतता राखण्याचं काम करावं – दिलीप वळसे पाटील
पवार साहेब नास्तिक आहेत काय आहेत हे सगळ्यांना माहित आहे
बोलायला मुद्दे नसल्याने शरद पवारांवरती टीका केली
काल झालेल्या सभेची औरंगाबाद पोलिस चौकशी करतील आणि निर्णय घेतील.
उद्यापर्यंत पलिस चौकशी करतील
या संदर्भात मी उद्या मी वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
समाजामध्ये सगळ्यांनी शांतता राखण्याचं काम करावं
-
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या जामिनावर आज निकाल
अमरावती फ्लॅश
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या जामिनावर आज फैसला…
जमिना संदर्भातील निकालाच्या पूर्वी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने गजानन महाराज यांची आरती आणि 21 पारायणचे ठेवण्यात आले आहे पाठ..
गजानन महाराजांच्या मंदिरात पार पडणार आरती..यापूर्वीही कार्यकर्त्यांनी केले होते सुटकेसाठी हनुमान चालीसा पठण….
-
आमदर गणेश नाईकांचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला
आमदर गणेश नाईकांचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला
ते उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता
तसेच पीडित महिलेलची व तिच्या वकिलाची उच्च न्यायालयात जाण्याची तयारी
डी एन ए टेस्ट व नाव देण्यात यावं पीडित महिलेची मागणी
आमदार गणेश नाईक आत्तासुद्धा नॉटरिचेबल सूत्रांची माहिती
अटकेची टांगती तलवार असून देखील नवी मुंबई पोलीस त्यांना का अटक करत नाही असा प्रश्न देखील उपस्थित होतो?
-
रत्नागिरी-जयगड-निवळी मार्गावर निवळी येथे भीषण अपघात
रत्नागिरी-जयगड-निवळी मार्गावर निवळी येथे भीषण अपघात
ट्रक आणि कारमध्ये भीषणमध्ये अपघात
अपघातामध्ये कारचालक जखमी
अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी
दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा
-
सेना नेते रघुनाथ कुचिक लैंगिक अत्याचार प्रकरण
– सेना नेते रघुनाथ कुचिक लैंगिक अत्याचार प्रकरण,
– भाजप नेत्या चित्रा वाघ आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनला येणार,
– कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांचा जबाब नोंदवला जाणार,
– कुचिक यांचा जामीन रद्द करण्याची वाघ यांनी केली होती मागणी,
– सकाळी 11 वाजता चित्रा वाघ यांचा जबाब नोंदवला जाणार
-
शहरालगत दुर्गापूर येथे बिबट्याचा हल्ला, घरकाम करत असलेल्या महिलेला बिबट्याने केले ठार,
चंद्रपूर:- शहरालगत दुर्गापूर येथे बिबट्याचा हल्ला, घरकाम करत असलेल्या महिलेला बिबट्याने केले ठार,
दुर्गापूरच्या वॉर्ड क्र. ३ मधील दिल्ली मोहल्ला येथील घटना,
गीता विठ्ठल मेश्राम 47 असे मृत महिलेचे नाव,
रात्री 12 वाजताची घटना, घरातच बिबट्याने नरडीचा घोट घेतल्याने परिसरात खळबळ,
वनपथक व पोलिसांनी घटनास्थळी पोचून केला प्राथमिक तपास,
याच भागात सातत्याने होत आहेत वाघ-बिबट हल्ले,
वनविभागाने याआधी केलेल्या कारवाईत एक वाघ आणि एक बिबट केला होता जेरबंद,
या परिसराला लागून आहेत वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणी,
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रातून वन्यजीवांचा होतो परिसरात प्रवेश,
वाघ-बिबट्यांच्या तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
-
नागपूरात १३ दिवसांत उष्माघाताचे पाच बळी
– नागपूरात १३ दिवसांत उष्माघाताचे पाच बळी
– यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताच्या मृत्यूची संख्या पोहोचली ९ वर
– नागपूरचा पारा ४५ पार, कडाक्याच्या उन्हामुळे वाढला उष्माघाताचा धोका
– जिल्ह्यात १३ दिवसांत ६१ नव्या उष्माघाताच्या रुग्णांची भर
– यंदाच्या उन्हाळयात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या पोहोचली ९० च्या पुढे
– मे महिन्यात तापमानात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता
-
नागपूर मेट्रो स्टेशनच्या कामाला तडा
– नागपूर मेट्रो स्टेशनच्या कामाला तडा
– इन्स्टीट्यूट ॲाफ इंजिनिअर्स स्टेशनच्या एका खांबाला लागून असलेल्या बांधकामाला मोठा तडा
– या बांधकामाला तीन्ही बाजूने गेल्या भेगा
– मेट्रो स्टेशनच्या कामाला तडा गेल्याने रस्त्यावरुन ये जा करणाऱ्यांच्या जीवाला धोका
– जागतीक दर्जाच्या दावा करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह
– नागपूर मेट्रोच्या बांधकामात यापूर्वीही अनेक तृटी असल्याची बाब उघड
– यापूर्वी वर्धा रोडवरील मेट्रोच्या कामाला गेल्या होत्या भेगा
– काही दिवसांपूर्वी नागपूर मेट्रोच्या पिलरमधून वाळू पडत होती
-
कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांचा आज जबाब नोंदवला जाणार
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाणार
कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांचा आज जबाब नोंदवला जाणार
अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करण्याची चित्रा वाघ यांची मागणी
-
नागपूर मेट्रो स्टेशनच्या कामाला तडा
– नागपूर मेट्रो स्टेशनच्या कामाला तडा
– इन्स्टीट्यूट ॲाफ इंजिनिअर्स स्टेशनच्या एका खांबाला लागून असलेल्या बांधकामाला मोठा तडा
– या बांधकामाला तीन्ही बाजूने गेल्या भेगा
– मेट्रो स्टेशनच्या कामाला तडा गेल्याने रस्त्यावरुन ये जा करणाऱ्यांच्या जीवाला धोका
– जागतीक दर्जाच्या दावा करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह
– नागपूर मेट्रोच्या बांधकामात यापूर्वीही अनेक तृटी असल्याची बाब उघड
– यापूर्वी वर्धा रोडवरील मेट्रोच्या कामाला गेल्या होत्या भेगा
– काही दिवसांपूर्वी नागपूर मेट्रोच्या पिलरमधून वाळू पडत होती
-
विद्यार्थीनीकडून शरीरसुखाची मागणी करणारा तो प्राध्यापक निलंबीत
– विद्यार्थीनीकडून शरीरसुखाची मागणी करणारा तो प्राध्यापक निलंबीत
– मुलीला पास करण्याचं आमिष दाखवून केली होती शरीरसुखाची मागणी
– सिंद्धू महाविद्यालयातील प्राध्यापक राकेश गेडाम वर गुन्हा दाखल
– पाचपावली पोलीसांनी महाविद्यालयातील अनेक मुलींचे घेतले बयान
– गुन्हा दाखल झाल्यानंतर तो प्राध्यापक फरार
-
मे महिन्यात उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे
मे महिन्यात उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रात मे महिन्यात बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीच्या खाली राहण्याचा असल्याचा पुणे हवामान खात्याचा अंदाज
मात्र, पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात आलं स्पष्ट
देशपातळीवर उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असून, संपूर्ण देशात पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 109 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या विदेश दौऱ्यावर रवाना झालेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या विदेश दौऱ्यावर रवाना झालेत या विदेश दौऱ्यात पंतप्रधान जर्मनी डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांत भेट देणार आहेत 2022 सालातील पंतप्रधानांचा हा पहिलाच विदेश दौरा असून देशाच्या धोरणांबाबत तिन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा पंतप्रधान मोदी करणार आहेत
-
3 मेपासून मध्यप्रदेश छत्तीसगड सह अनेक अनेक राज्यात उष्णता कमी होणार होणार आहे
नवी दिल्ली
देशभरातील नागरिकांना सध्या उष्णतेन हैराण केल आहे मात्र या उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे 122 वर्षांचा विक्रम मोडीत काढत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात तापमान प्रचंड वाढलं होतं मात्र येत्या 3 मेपासून मध्यप्रदेश छत्तीसगड सह अनेक अनेक राज्यात उष्णता कमी होणार होणार आहे देशाच्या अनेक भागात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही तापमान कमी होण्याची शक्यता आहे
Published On - May 02,2022 6:38 AM