Maharashtra News Live Update : उद्या काय घडलं तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज ठाकरे असतील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचं वक्तव्य
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज मंगळावार 3 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळात मुस्लिम समाजातील लोकांना मशिदीत ईदची नमाज अदा करता येत नव्हती.त्यामुळे प्रसिद्ध असलेल्या मिनारा मशिदीत ईदच्या नमाजाची तयारी सुरू झाली आहे. मुंबईच्या मशिदीमध्ये लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मिनारा मशिदीत ईदच्या दोन जमात होतील, एक सकाळी 6.35 ला आणि दुसरी 7.20 ला. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम समाजातील लोक ईद साजरी करतात आणि आनंद व्यक्त करतात.
LIVE NEWS & UPDATES
-
सतेज पाटील यांची प्रतिक्रिया
विधी तज्ञांशी चर्चा करून कालच्या भाषणावर 153 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
त्याची चौकशी होईल
पुढचे दोन दिवस राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे
पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे
नागरिकांची सुरक्षा ही राज्यासाठी महत्त्वाची आहे
महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे
आवश्यक त्या सर्व काळजी पोलिस विभागाने घेतले आहेत
राज्य शांत करून राज ठाकरेंना बेरोजगारी वाढवायचे आहे का
या राज्याची प्रगती होऊ नये अशी त्यांची अपेक्षा आहे का
अशा दिशाहीन वक्तव्यामुळे महाराष्ट्र पाच वर्षे मागे जाणार आहे
केवळ राजकारणातून ते या गोष्टी करतात हे चुकीच आहे
उद्या काय घडलं तर सर्वस्वी जबाबदार राज ठाकरे असतील
-
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचं वक्तव्य
उद्या काय घडलं तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज ठाकरे असतील
राज ठाकरेंना तरुण हा बेरोजगार करायचा आहे का
-
-
कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांची आज विजयी सभा
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील मालोजीराजे छत्रपती राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत होतेय विजयी सभा
कदमवाडीच्या विठ्ठल चौकात विजयी सभेच आयोजन
महाविकास आघाडीची पहिली विजयी सभा पराभूत उमेदवार सत्यजित कदम यांच्या बालेकिल्ल्यात
विजयी सभेला थोड्याच वेळात होणार सुरवात
-
बुलडाणा जिल्ह्यातही मनसे च्या पदाधिकाऱ्यांना नोटीस
जिल्ह्यातील 30 ते 40 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस दिल्याची माहिती
-
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील Live
समाजात तेढ निर्माण करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न
मी कुणाचेही समर्थन करणार नाही
नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा वाचण्यासाठी आल्या तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा
मग राज ठाकरेंनी काय वेगळा गुन्हा केला आहे की त्यांना जामीनपात्र गुन्हे लावले
पोलिसांनी आपली जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडावी
मुस्लिमांना पोलिसांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन
राज ठाकरेंना सोपी कलमं लावल्याचा जलील यांचा आरोप
-
-
खालकर चौकात मनसे पदाधिकारी एकत्र आल्याने पोलीसही चौकात दाखल
– पोलिसांची मनसे सरचिटणीस अजय शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा,
– पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली समज,
– कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं पोलिसांनी केलं आवाहन
-
मनसेचा कार्यकर्ता 10 दिवसासाठी तडीपार
पुण्याच्या शिरूरमधील मनसेचा कार्यकर्ता 10 दिवसासाठी तडीपार
पुणे ग्रामीण पोलिसांनी काढले तडीपारचे आदेश.
नानासाहेब लांडे असं मनसैनिकाचं नावं,
आजपासून 10 दिवसासाठी तडीपार
भोग्यांच्या बाबतीत मिटींग घेऊन वातावरण बिघडू नये यासाठी काढले आदेश…
-
उद्याच्या अल्टीमेटमवर मनसैनिक अद्याप ठाम
-पिंपरी चिंचवड मधील मनसेच्या शहराध्यक्ष सह प्रमुख 30 ते 40 कार्यकर्त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी सीआरपीसी 149 प्रमाणे दिल्या नोटिसा
-सध्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय वातावरण पाहता अपूर्व आपल्या कार्यकर्त्यांनी मार्फत कोणत्याही प्रकारचे कायद्याचे व नियमांचे उल्लंघन होणार नाही तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य किंवा वक्तव्य आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच कोणतेही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये या कायद्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास आपणा विरुद्ध कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस देण्यात आली
-मात्र राज ठाकरे यांनी दिलेल्या उद्याच्या अल्टीमेटमवर मनसैनिक अद्याप ठाम
-
शिवसेना नेते संजय राऊत यांची 5 तारखेला पुण्यात जाहीर सभा
– पुण्यातील हडपसर परिसरात विठ्ठल तुपे नाट्यगृहात सभेचं आयोजन,
– शिवाय संजय राऊत यांच्या हस्ते होणार विविध विकासकामांचे उदघाटन,
– गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता सभेचे आयोजन,
– सेना नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी केले सभेचे आयोजन
-
भेंडवळ मध्ये काही वेळातच सुरू होणार प्रसिद्ध घट मांडणी
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ मध्ये काही वेळातच सुरू होणार प्रसिद्ध घट मांडणी…..
भेंडवळच्या घटमांडणी कडे लागून असते राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष…
उद्या पहाटे पुंज्याजी महाराज सांगनार भाकीत…..
चंद्रभान महाराज यांनी सुरू केली परंपरा..
-
वसंत मोरे बालाजीला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती
मनसे कार्यकर्त्यांना नोटीस द्यायला सुरुवात झाल्यानंतर पुण्यातील अनेक मनसे चे नेते नॉटरिचेबल
तर चार दिवसाच्या देवदर्शनासाठी वसंत मोरे बालाजीला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती
-
महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीसा
पुण्यातील मनसे शहराध्यक्षांसह महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीसा
मात्र उद्याच्या अल्टीमेटमवर मनसैनिक ठाम
राज ठाकरेंचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा
शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची भूमिका
नोटीसा दिल्या तरी राज ठाकरे जे सांगतील ते आम्ही करणार
-
मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
– पोलिसांनी नियमा प्रमाणे नोटीस दिल्या होत्या
– पोलिसांनी भाषण तपासलं
– त्यातून त्यांनी अतिशय अग्रेसिव्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले
– पोलीस कायद्या प्रमाणे काम करतात
– शेवटी न्याय पालिका विचार करणार
– हे सगळं रुटीन आहे
– नोटीस येणार याची त्यांना देखील मानसिक तयारी आहे
– केंद्रीय मंत्री राणे यांना देखील अटक झाली
– त्यानंतर राणा याना देखील अटक झाली
– कोर्टाने देखील राणा दाम्पत्याला फटकारल
– कायदे बनवणारे अस कस करू शकतात अस न्यायालयाने देखील म्हटलं आहे
– राज, राणे आणि राणा म्हणजे RRR चित्रपट
– अस भाषण करताना कारवाई होणार याची तयारी असतेच
– आंदोलन करण्यावर ठाम असाल तर पोलीस आपलं काम करतील
-
मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
– मागच्या वेळी लाऊडस्पिकरवर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला होता
– चांदिवली पेलिसांनी केली कारवाई
-
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया
मनसेची जी सभा झाली
परवानगी देतानाच काही अटी घालुन परवागनी दिली होती
सर्व फुटेज पोलिस आयुक्तांनी तपासली आहे
त्यात काही अटींची नियमांच उल्लंघन झाल अशी खात्री झाली
त्या अनुशंघाने ही कारवाई झालेली आहे
जे त्या सभेत होते त्यांवर पण कारवाई अभिप्रेत आहे
कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहील अस करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे
पोलिसांनी अधिकार आहे
कायदा जो कोणी मोडत असेल तर पोलिस सतर्क आहेत
कायदा कोणाला हातात घेऊ देणार नाही
-
पुण्यात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावयला सुरवात
पोलिसांनी नोटीस बजावल्या, परवानगी नाकारली तरी पुण्यात ठरल्याप्रमाणे महाआरतीचा कार्यक्रम होणारच
हेमंत संभुस, मनसे राज्य प्रवक्ता,
-
राज ठाकरे यांच्यावर 153 अंतर्गत गुन्हा दाखल
अजामीनपात्र गुन्हा दाखल
अटकेची शक्यता
-
मुंबई पोलीस आयुक्तांनी मनसेच्या 4 नेत्यांना चर्चेसाठी बोलवले
सायंकाळी 4 वाजता मुंबई पोलीस आयुक्त आणि मनसे नेत्यांची बैठक
-
नियम मोडेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचाच भाग म्हणून गुन्हा दाखल झालाय. – नाना पटोले
नियम मोडेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचाच भाग म्हणून गुन्हा दाखल झालाय.
महाराष्ट्रात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजप आणि केंद्र सरकारकडून सुरु आहे. महाराष्ट्राची बदमानी हा एकमेव उद्देश भाजपचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नवे उद्योग यायला तयार नाहीत. आहेत ते उद्योग सोडून चालले आहेत. त्यामुळे बेरोजगारी आणि तरुणांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे कायद्याचं राज्य, प्रशासन त्यांची कारवाई करेल. कायदा कुणी हातात घेऊ नये यासाठी प्रशासनाला पूर्वतयारी करावी लागते आणि प्रशासन तशी खबरदारी घेतं.
जी काही वक्तव्ये त्यांच्या वतीनं ऐकायला मिळतात. त्यावरुन हे कुणाच्या इशाऱ्यावर केलं जात आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळे केंद्र सरकारचं अपयश लपवण्यासाठी भाजप दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून षडयंत्र रचत आहे.
महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे त्याचं पालन होणं ही सरकारची जबाबदारी आहे. कायदेशीर कारवाई व्हायला हवी.
माननीय सुप्रीम कोर्टानं भोंग्यांबाबत जे काही निर्देश दिले आहेत त्या नियमानुसारच सर्व काही असायला हवं. कायद्याच्या पलिकडे जाऊन कुणी भूमिका घेत असेल तर त्याला मुभा देऊन चालणार नाही.
राज ठाकरे हा विषय नाही. कायद्यापेक्षा कुमी मोठं नाही. कायदा तोडेल त्याचावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही आमच्या मंत्र्यांची बैठक घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालीय. राज्यात कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, असंच आमचं मत आहे.
महाराष्ट्रात दंगे भडकवण्याचं काम होतं आहे. धार्मिक विवाद घडवून आणण्याचे काहींचे प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून दुसऱ्या राज्यातून तलवारी मागवण्यात आल्या होत्या. पण आमच्या पोलिसांनी हे षडयंत्र हाणून पाडलं आहे.
-
खरंतर महाराष्ट्रामध्ये वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे – नाना पटोले
खरंतर महाराष्ट्रामध्ये वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे
महाराष्ट्राचे अनेक उद्योग बाहेर जात आहेत
प्रशासनाची जबाबदारी आहे, नियम तोडले असतील तर कारवाई होईल
कायदा कोणी हातात घेऊ नये, यासाठी पूर्व तयारी करण्यात आली आहे
महाराष्ट्रात सध्या सगळं चुकीच्या पद्धतीने सुरू आहे
जी काही नियमाप्रमाणे कारवाई करावी
-
राज्याच्या बाहेरून काही गुंड आणून गडबड करण्याचा प्रयत्न आहे – संजय राऊत
राज्यात शांतता आहे
राज्याच्या बाहेरून काही गुंड आणून गडबड करण्याचा प्रयत्न आहे – संजय राऊत
मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, गृहमंत्री सक्षम आहे
अल्टीमेटमवरती सरकार चालत नाही
मुख्यमंत्र्यांकडे विविध बैठका होतात.
अशा पद्धतीची गुन्हे दाखल होत राहतात
भडकाऊ भाषणं केल्याने गुन्हा दाखल होतो
महाराष्ट्रात फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालतो
-
औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, 12 अटींचं उल्लंघन केल्याने कारवाई
औरंगाबादमध्ये राज ठाकरेवर गुन्हा दाखल
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
बारा अटींचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सिटी चौक पोलिसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
-
अमरावती ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या वर गुन्हा दाखल
अमरावती ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या वर गुन्हा दाखल…..
ब्राम्हण समाजाला उद्देशुन शिवीगाळ केल्याचा आरोप…
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल.
परतवाडा मध्ये काल शिवीगाळ केल्याचा आरोप…
परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष यांच्या तक्रारिवरून निवेदिता चौधरी यांच्या वर गुन्हा दाखल…
-
राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम
राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम
भाषणाचा अभ्यास केला आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद सीपी सक्षम आहे आणि ते करतील. सीपी औरंगाबाद गुन्हे कोणते लावायचे कारवाई करायचे ते अभ्यास करत आहेत.
कोणीही जातीय तेढ निर्माण केला तर आम्ही त्यावर कडक कारवाई करू. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. नोटीसा दिल्या आहेत. ८७ एसआरपीएफ कंपनी ३० हजारावर होमगार्ड तैनात आहे. सर्व सीपींना सूचना कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही.
१५ हजार लोकांवर कारवाी केली आहे. १४९ ची नोटीस १३ हजार लोकांना नोटीस
कुणीही अनुचित प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल
-
कोणत्याही परिस्थिती कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे
ईद आणि अक्षयतृत्तीयेच्या सगळ्यांना शुभेच्छा
महाराष्ट्र पोलिस कायदा आणि सुव्यवस्था संभाळण्यास सक्षम आहे
कोणत्याही परिस्थिती कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे
जे मोठे गुन्हेगार आहेत, त्याच्यावरती आम्ही अॅक्शन घेतली आहे
भाषणाच्या संदर्भात जे काही कारवाई करायची आहे. ते करतील…औरंगाबाद आयुक्त कारवाई करतील…त्यांचा अभ्यास सुरू आहे…
कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावरती कारवाई करणार
सर्व युनिटला सुचना देण्यात आल्या आहेत…
-
एसआरपीएफ आणि होमगार्ड राज्यात तैनात केल्या आहेत
पोलीस महासंचालक
गृहमंत्र्यांनी आढावा घेतला. कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस सक्षम. समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई केलीय. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड राज्यात तैनात केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडवल्यास कारवाई करू. राज्यातील जनतेला आवाहन आहे की त्यांनी शांतता व सुव्यवस्था राखावी. पोलिसांना सहकार्य करावं
-
फडणवीस साहेबांनी जे सांगायचं ते सांगितलं आहे – निलेश राणे
फडणवीस साहेबांनी जे सांगायचं ते सांगितलं आहे
संजय राऊतांनी तपास करावा,
हा तपासाचा भाग आहे
राऊतांच्या डोक्याचा हा भाग नाही
विरोधकांना त्रास देण यापलिकडे काही नाही
याचा कुठलाही मॅटर टिकत नाही…
हे केल्याने आम्ही अधिक चार्ज होतो.
त्यांच्या बोलण्याला कोण किंमत देतंय..
मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यासारखे बोलत नाहीत
-
वारणा धरण दुरुस्तीसाठी 58 कोटींचा निधी प्रस्तावित आहेत – जयंत पाटील
ताकारी म्हैसाळ टेम्भू योजना
विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी 6 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे
64 दुष्काळी गावातील 40 हजार हेक्टर सिंचन क्षेत्र समाविष्ट आहे
खानापूर तासगाव आटपाडी जत कवठेमहांकाळ सांगोला मान खटाव येथील 109 वंचित गावासाठी 8 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिली आहे
50 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे
विस्तारित योजनेमुळे जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील सर्व गावांना पाणी पोहचेल
सांगली जिल्ह्याचे एकही गाव आता पाण्यापासून वंचित राहणार नाही
खुले नाले आता बंदिस्त केले जाणार आहेत
40 गावांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्यात येणार
पुराच्या पाण्याची समस्या पाहता
म्हैसाळ नजीकचा केटीवेअरच्या जागी बॅरेज उभा केला जाणार
म्हैसाळ योजनेसाठी अधिकचा पाणीसाठा उपलब्ध होईल
आरग बेडग येथील 1100 हेक्टर क्षेत्रसाठी 250 एमसीएसी पाणी दिले जाणार
ताकारी दुधारी योजना बचतीमधून वाळवे तालुकातील वंचित गावांना लाभ दिला जाणार
ताकारी दुधारी भावणींनागर, येडे मच्छिद्र लावनमाची, किल्ले मॅचिंद्रगड येथील 650 हेक्टर क्षेत्रासाठी योजना
कृष्णा कॅनॉलला 86 km लायनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे
वाकुरडे योजनेसाठी 3.35 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाईल
यातून वाळवा तालुकायतील 20 गावांना पाणी दिले जाणार
वारणा धारण दुरुस्तीसाठी 58 कोटींचा निधी प्रस्तावित आहेत
जिल्ह्यात जलसंपदा विभागाकडून 3858 कोटींचा निधी खर्च केला जाईल
ही कामे पूर्ण होताच जिल्ह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही
विस्तारित म्हैसाळ प्रकल्पामुळे जतची सात गावेही टँकरमुक्त होतील
-
घाटकोपर परिसरातील अनेक कार्यकर्त्यांना पाटवल्या नोटीस
मनसे नंतर भाजप कार्यकर्त्यांनाही पेलिसांकडून १४३(३) अन्वये पोलिसांनी पाठवल्या नोटीस
– घाटकोपर परिसरातील अनेक कार्यकर्त्यांना पाटवल्या नोटीस
– हनुमान चालिसा लावण्यासाठी राज ठाकरे आक्रमक झाल्याने भाजपचे नेतेही यात सहभाग घेऊ शकतात या अर्थी खबरदारीचा ऊपाय म्हणून कार्यकर्त्यांना नोटीस जारी
-
शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर प्रहार
रत्नागिरी- शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर प्रहार
स्वतःचा भाऊ मुख्यमंत्री पदावर बसला आहे हे पहावत नसल्याने राज ठाकरे यांचा थयथयाट
केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांचा द्वेश राज ठाकरे यांच्या मनात भिनला आहे
राज ठाकरे यांची करणमुक करण्याची पद्धत जुनी
प्रत्येक निवडणुकीला सुपारी घ्यायची हि मनसेची जुनी पद्धत
भोगा हा विषय देशपातळीवरचा
याबाबत नियंत्रण आणायचे असेल तर केंद्राने कायदा करावा
भोंग्याचा विषय घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी हा प्रश्न उचलला
दुष्ट आणि कपट नितीने भाजपची साथ आहे- शिवसेना खासदार विनायक राऊत
-
भीम आर्मीची भूमिका
भीम आर्मी ची भूमिका.
आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय गृहमंत्री साहेब आजच्या आज राज ठाकरे आणी त्याच्या कार्यकर्त्यांना अटक करावी, राज ठाकरे आणी त्याच्या कार्यकर्त्यांनमुळे 4 तारखेला महाराष्ट्रसह देशात हिंदू मुस्लिम दंगल झाली, कोणाचे रक्त सांडले तर याद राखा राज ठाकरे तुम्हाला आणी तुमच्या कार्यकर्त्यांना शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विचाराचा कार्यकर्ता सोडणार नाही, तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
तुमचा आणी आमचा संघर्ष अटळ आहे. ठरल्या प्रमाणे औरंगाबाद येथील तुमची सभा आम्ही उधळून लावली, तुम्हाला सभा मधेच थांबवावी लागली, खुर्च्या फेका फेकी झाल्या तरीही तुम्ही आमचे वाकडे करू सकला नाही.
मुस्लिम बांधवाना ईद च्या मंगलमय शुभेच्छा.
-
चिंचवडगावातील जैन शाळेजवळ हा प्रकार घडलाय
-चिंचवड येथील एका स्नॅक्स सेंटरमध्ये सिलेंडर ने पेट घेतल्याने दुकान मालकासह दोघे भाजलेत
-चिंचवडगावातील जैन शाळेजवळ हा प्रकार घडलाय
-अग्निशमन दलाने सहा भरलेले सिलेंडर तत्काळ हलवल्याने पुढील अनर्थ टळला
-गंभीर घटनेत दोघे जण जखमी झालेत त्यांना उपचारासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
-
रमजान ईद – मुस्लिम बांधवानी सामूहिक नमाज अदा केली, एकमेकांना दिल्या शुभेच्छा
रमजान ईद – मुस्लिम बांधवानी सामूहिक नमाज अदा केली, एकमेकांना दिल्या शुभेच्छा उस्मानाबाद येथील ईदगह मैदानात मुस्लिम बांधवानी सामूहिक नमाज पठण केले व एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. गेली 2 वर्ष कोरोना असल्याने ईद साजरी करता आली नव्हती मात्र यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी करित एकमेकांना शुभेच्छा दिल्या. उस्मानाबाद शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे यांनी मुस्लिम शुभेच्छा ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाज पठण करण्यासाठी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती
-
तारखेला हजर राहिले नसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाने काढला वॉरंट
तारखेला हजर राहिले नसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाने काढला वॉरंट. 2008 साली राज ठाकरे यांना कल्याण मध्ये अटक करण्यात आली होती.त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते.
-
रमजान ईद निमीत आज जळगावातील ईदगहा मैदानावर आज मुस्लिम बांधवांतर्फे नमाज अदा करण्यात आली
रमजान ईद निमीत आज जळगावातील ईदगहा मैदानावर आज मुस्लिम बांधवांतर्फे नमाज अदा करण्यात आली
रमजान ईद निमित्त आज शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांतर्फे यावेळी सामूहिक नमाज अदा करण्यात आली दोन वर्षापासून कोरोनामुळे रमजान ईद ही अगदी साधेपणाने साजरी करण्यात येत होती मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मुस्लिम बांधवांतर्फे सामूहिक नमाज अदा करण्यात आली असून विश्वशांतीसाठी यावेळी प्रार्थना करत सर्व देशवासियांना रमजान ईद च्या याप्रसंगी शुभेच्छा दिल्या
-
ईदगाह वरच मुस्लिम समाजातील दोन गटात राडा,
बुलडाणा
ईदगाह वरच मुस्लिम समाजातील दोन गटात राडा,
चाकू भोसकल्याने युवकाचा मृत्यू,
संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील घटना,
जुन्या वादातून घडला प्रकार,
शे.रफीक शे .गणी, वय 27 वर्ष असे मृत युवकाचे नाव,
घटनास्थळवर पोलीस बंदोबस्त,
-
राऊतांनी बाळ रडूपणा करू नका – अशिष शेलार
कुणी कुणाचा अपमान करू नका
राऊतांनी बाळ रडूपणा करू नका
चाणाक्य असल्यासारखे वागत आहेत का ?
हा प्रश्न मनसेला विचारा…
कायद्याचं राज्य कसं असावं
मुळात राऊतांचा लेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी लागण्यासारखं आहे
संजय राऊत झेंड्याचे कलर दिले आहेत का ?
कायदा सुव्यवस्था अशांत करायचा आहे का ?
डायरेक्ट लोकांना कोर्टापर्यंत का नेलं
मी कायद्याच्या चौकटीत बोलणार आहेत
नोटीसा केवळ नाही, राजद्रोहाचा आरोप केला आहे
घरात घुसून डोळे फोड…
घरातून खेचून आणं त्याचं डोळे फोड
कॉंग्रेसला कुणी विचारत नाही, त्याकडे पुरावा नाही…
थेट चाळीस टक्के करण्यामागचं कारण काय…
एका बाजूला सांडपाणी प्रक्रिया न करता सोडायचं
मुंबईकरांच्या हितासाठी लढतोय, चौकशीची मागणी करतोय
शहरात तीस टक्के पाण्याची गळती आहे.
-
चायनाचा विषय गांभीर्याने घेणे गरजेचं आहे – सुप्रिया सुळे
चायनाचा विषय गांभीर्याने घेणे गरजेचं आहे.
युद्ध हे कोणत्याही गोष्टीचं उत्तर नव्हे
चव्हाण साहेबांच्या वागण्यात बोलण्यात सहनशीलता होती, त्यामुळे अल्टीमेटम शब्दाचा माझा अधिक अभ्यास नाही
आंब्याच्या झाडाला दगड मारतात. बाबळीच्या झाडाला कोण दगड मारत का ?
मला आनंद वाटतं की, सुंदर यात्रा सुरू आहेत. आपल्या देशात रोज काहीतरी साजरं करण्यासारखं आहे.
-
मनसेनं राज्यभरात वकिलांची फौज तयार केली
मनसेनं राज्यभरात वकिलांची फौज तयार केली,
पुण्यातील मनसे नेते किशोर शिंदेंच्या नेतृत्वात वकिलांची फौज तयार.
मुंबई आणि पुण्यातील वकिलांची यादी तयार
वकिलांची यादी टीव्ही 9 मराठीच्या माहिती
कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या तर वकिल करणार मदत,
मनसेनं तयारी सुरू केल्याचं चित्र स्पष्ट !
-
कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य चालत नाही, कुणाच्या धमक्यांवर शांती बिघडत नाही – संजय राऊत
धमक्या देणा-यांत ती ताकद नाही
त्यांच्यामागे ज्या शक्ती आहेत त्यांच्या त्यांचा बंदोबस्त करायला हवा
ते सत्तेत येऊ शकत नाहीयत, त्यामुळे हे सारे धंदे सुरूयत
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निर्णय घेतला जाईल
राज्याचे गृहमंत्री, शरद पवार, मुख्यमंत्री सारे अनुभवी आहेत
इथं कयदा सुव्यवस्थेची परिस्थिती सहज निर्माण होऊ शकत नाही
कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य चालत नाही
कुणाच्या धमक्यांवर शांती बिघडत नाही
कुणी सभेतून काही बोललं म्हणजे काही होत नाही
आज शुभ दिवस आहे
बेळगावचा मुद्दा संपलेला नाही
ती जमीन तुमची नाही
जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत काहीही होणार नाही
-
पाम बीचवर मध्यरात्री अपघात
पाम बीचवर मध्यरात्री अपघात
पाम बीच वाशी अशोका स्पोर्ट सिंगनलवर आपघात
स्विफ्ट व क्रेटा कार एकमेकांना धडकल्या
कारमधील प्रवासी किरकोळ जखमी
फायर ब्रिगेडच्या सहाय्याने कार रस्त्यावरून बाजूला करण्यांत आल्या
कुठलीही जीवितहानी नाही मात्र कारच मोठ्या प्रमाणात नुकसान
-
कुणाच्याही अल्टीमेटमवरती राज्य चालत नाहीत – संजय राऊत
कुणाच्याही अल्टीमेटमवरती राज्य चालत नाहीत – संजय राऊत
कुणी भ्रमात राहू नये
आज सण, लोकांना सण साजरा करू द्या
अल्टीमेटम असं काही नसतं
सुपारी देणाऱ्यांना सरकारने शोधायला पाहिजे
राज्यकर्त्यांना राज्य चालवायचा अनुभव आहे
त्यांच्यामागे अस्वस्थ शक्ती आहे
त्याचे वैफल्यग्रस्त आहेत
राजकारणात असे वापर सुरू आहेत सध्या
आम्ही सगळे त्यादृष्ट्या सक्षम आहोत
या राज्यात बेकायदेशीर असं काही खपवून घेतलं जाणार नाही..
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहेत
टिळक फुले यांच्या विषयी वाद निर्माण करून फोडणी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-
Apmc बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली आहे
Apmc बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली आहे
85 ते 90 हजार पेट्या दाखल
आवक वाढल्याने आंब्याचे दर कमी
हापूस 400 ते 500 रुपये डजन दराने
-
मोठ्या संख्येने मुस्लिन बांधवांनी रमजान ईद निमित्त मस्जिद समोर नमाज पठण केला..
मोठ्या संख्येने मुस्लिन बांधवांनी रमजान ईद निमित्त मस्जिद समोर नमाज पठण केला..
Anchor:चरई येथील महागिरी जुमा मजीद याठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमून रमजान ईद या सणानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा ही नमाज पठण केले.यावेळी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून लहान मुले ,तरुण आणि जेष्ठ नागरिक गुण्या गोविंदाने एकत्र जमले होते.महिनाभर उपास करून पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद आज साजरी झाली यावेळी पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.कायदा सुव्यवस्थेचे पालन करत सण साजरा केला..
-
खासदारकीची टर्म संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे सूचक ट्विट
खासदारकीची टर्म संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे सूचक ट्विट
छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभा खासदारकीची टर्म आज (३मे) रोजी समाप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज सकाळी ट्विटर फोटो पोस्ट करीत एक सूचक इशारा दिलेला आहे.
या फोटो मध्ये संभाजीराजे हे छत्रपती शाहू महाराजांचे पुस्तक वाचताना दिसत असून मागे छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मोठ्या तसबीरी आहेत. तसेच शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज, संभाजीराजे यांचे आजोबा मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज व वडील विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांच्याही प्रतिमा या फोटोमध्ये दिसत आहेत. या फोटो सोबत संभाजीराजे यांनी “आजन्म विचारांशी बांधील” असेही म्हटले आहे. निश्चितच संभाजीराजे यांना ते आपल्या या पूर्वजांच्या विचारांशी बांधील आहेत, हेच म्हणायचे आहे.
-
नवी मुंबईत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी
नवी मुंबईत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी
Anchor : नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली. नेरुळ येथील जामा मशिदित मुस्लिम बांधवांनी केलेली गर्दी, पारंपरिक पोषाख आणि विविध रंगाच्या आकर्षक टोप्या घालून अनुभवायला मिळाले. काँग्रेस नेते संतोष शेट्टी यांनी गुलाब देऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्या दिल्या.
-
गोकुळ दूध संघाच्या स्वीकृत संचालकपदी राष्ट्रवादीच्या युवराज पाटील यांचे नाव निश्चित
गोकुळ दूध संघाच्या स्वीकृत संचालकपदी राष्ट्रवादीच्या युवराज पाटील यांचे नाव निश्चित
तर शासन नियुक्त संचालक पदी मुरलीधर जाधव कायम राहणार
मुरलीधर जाधव यांच्या निवडीवरून महाविकास आघाडी मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी रंगल होत राजकारण
काँग्रेसचे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात
आज गोकुळ दूध संघाच्या आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्वीकृत संचालकांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब
-
जमीन मोजणीचे पैसे भरले , मात्र जमीन मोजणीचा नंबर कधी येणार,
जमीन मोजणीचे पैसे भरले , मात्र जमीन मोजणीचा नंबर कधी येणार,
पैसे भरूनही शेतकरी त्रस्त,
जिल्ह्यात परीक्षण भूमापकाच्या 7 जागा रिक्तच,
तर मोजणीदाराच्या 17 जागा रिक्त असून 53 पदे मंजूर आहेत,
जिल्ह्यात 2 हजार मोजणीचे अर्ज प्रलंबित
-
जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पातील जलसाठा 50 टक्क्यांवर,
बुलडाणा
जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पातील जलसाठा 50 टक्क्यांवर,
मध्यम प्रकल्पातील ही जलसाठा होतोय कमी,
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने प्रकल्पातील जलसाठा होतोय कमी,
पाण्याचा काटकसरीने वापर न केल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता,
-
औरंगाबाद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॅमेरा फुटेज तपासून एक सविस्तर अहवाल तयार केला
औरंगाबाद :- राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात औरंगाबाद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॅमेरा फुटेज तपासून एक सविस्तर अहवाल गृह विभागाला पाठवला ज्यात राज ठाकरे यांच्या सभेने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झालं असल्याचा निष्कर्ष औरंगाबाद पोलिसांनी काढला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे, याबाबत गृहविभागतील वरिष्ठ अधिकारी आज मुंबईत एक विशेष बैठक घेऊन गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेणार आहेत, आज सायंकाळ पर्यंत याबाबत औरंगाबाद पोलिसांना निर्देश दिले जाणार आहेत त्यानंतर औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो
-
ईदच्या पार्श्वभुमिवर नागपूरातील जामा मस्जीद परिसरात चोख पोलीस बंदोबस्त
– ईदच्या पार्श्वभुमिवर नागपूरातील जामा मस्जीद परिसरात चोख पोलीस बंदोबस्त
– जामा मस्जीद परिसरात वॅाच टॅावर, दंगल नियंत्रण पथक तैनात
– नागपूरातील मोमीनपुरास परीसरात सीसीटीव्हची नजर
– नागपूर शहरात २८३ तर ग्रामीण भागात १०८ मस्जीदी
– जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्य राखीव दल, होमगार्डसह साडेतीन हजार पोलीस तैनात
– जिल्ह्यातील पोलीसांना अलर्ट राहण्याच्या सुचना
– जिल्ह्यातील गुन्हेगारांची धाडाझडती घेण्याचे वरीष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश
-
रमजान ईद च्या निमित्ताने पुण्यातील ईदगाऊ मैदानात नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव एकत्र यायला सुरुवात
रमजान ईद च्या निमित्ताने पुण्यातील ईदगाऊ मैदानात नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव एकत्र यायला सुरुवात
सकाळी 8.30 वाजता ईदची पहिली नमाज पठण होणार
ईदगाह मैदान परिसरात मोठा बंदोबस्त तैनात
-
लोणावळा-खंडाळा परिसरात मागील दोन महिन्यांपासून या वानराने हौदोस घातला होता
-पर्यटननगरीत मुक्त संचार करून अनेक नागरिकांना चावा घेणारे वानर पकडण्यात वनविभाग आणि शिवदुर्ग रेस्क्यू टिमला यश आलेय
-लोणावळा-खंडाळा परिसरात मागील दोन महिन्यांपासून या वानराने हौदोस घातला होता
-गिरीजा हॉटेल, आय सी आय सी आय लर्निग होम, दगडी बंगला या परीसरात सुरक्षा रक्षक तसेच गेस्ट व टू व्हिलर वर येणाऱ्या लोकांना पाडून ते वानर चावत होते
-
रत्नागिरी- कोकण कृषी विद्यापिठाच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुढे
रत्नागिरी- कोकण कृषी विद्यापिठाच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुढे
भरतीप्रक्रियेसाठी आवश्यक असलेला आकृतीबंध मंजुरीसाठी शासनाकडे पाठवलाच नाही
२०१६ मध्ये आकृतीबंधाला मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठवणं होतं आवश्यक
कृषी विद्यापीठात ५० टक्के नोकरभरती करण्यास सरकारनं दिलीय परवानगी
आकृतीबंधाच्या मंजूरीचा विषय कोकण कृषी विद्यापीठाने गार्भीयांने घेतला नाही
आकृतीबंध तयार करण्याच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या हालचाली सुरु- सुत्रांची माहिती
-
रमजान इदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात
रमजान इदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा शहरातील विविध भागात तैनात
त्याशिवाय एसआरपीएफ तुकड्या, डॉगस्कॉड, बॉम्ब शोधक नाशक पथकांकडूनही ठिकठिकाणी तपासणी करण्यात येणार
सामाजिक सलोखा राखण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन
-
सिल्वर ओक हल्ल्यात सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन कारवाई होणार
– सिल्वर ओक हल्ल्यात सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन कारवाई होणार
– नागपूर विभागातील पाच कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन कारवाई होणार
– गणेशपेठ आगारातील ४ आणि काटोल आगारातील एका कर्मचाऱ्यावर होणार कारवाई
– सिल्वर ओक हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी केली होती अटक
– पोलिस अटकेमुळे एसटीने त्या कर्मचाऱ्यांना रुजू करुन घेतले नाहीत
-
‘महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक
‘महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वासंतिक मोगरा व आंबा महोत्सवाचे आयोजन
अक्षयतृतीयेच्या निमित्ताने पुष्पसजावट व आंबा महोत्सव पाहण्याची संधी
तब्बल 151 किलो मोगरा, 251 गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास
तब्बल 2 हजार आंब्याचा महानैवेद्य देवीला दाखविण्यात आला
-
बालविवाह लावणारे पंडीत, सहभागी होणारे, आचाऱ्यांवरंही होणार कारवाई
– बालविवाह लावणारे पंडीत, सहभागी होणारे, आचाऱ्यांवरंही होणार कारवाई
– बालविवाहाची पत्रिका छापणाऱ्यांवरंही आता होणार कारवाई
– प्रशासनाने दिले कडक कारवाईचे निर्देश
– दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि एक लाखांचा दंडंही होऊ शकतो
– बालविवाह थांबलण्यासाठी नागपूर जिल्हाधिकारी आर विमला यांचे आदेश
– कोरोना आणि लॅाकडाऊनच्या काळात झाले अनेक बाल विवाह
– बाल संरक्षण कक्षाने गेल्या दीड वर्षात नागपूर जिल्ह्यातील १५ बालविवाह थांबवले
– एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात महाराष्ट्रात १३३८ बालविवाह रोखण्यात यश
-
नागपूरात उष्माघाताच्या मृत्यूची नोंद करणारी यंत्रणा नाही
– नागपूरात उष्माघाताच्या मृत्यूची नोंद करणारी यंत्रणा नाही
– नागपूर महानगरपालिकेचा अजब कारभार
– माध्यमात आलेल्या माहितीच्या आधारे मनपा करते उष्माघाताच्या मृत्यूची नोंद
– माध्यमातील माहितीच्या आधारे मनपाकडे उष्माघाताचे सात मृत्यू आणि ६९ रुग्णांची नोंद
– मनपाकडे उष्माघाताच्या मृत्यूची नोंद करणारी यंत्रणा नसल्याने मृत्यूच्या आकडेवारीबाबत संभ्रम
-
लांजातील शाळेतील सहा विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण
रत्नागिरी- लांजातील शाळेतील सहा विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण
मुख्याध्यापकाला ठोकल्या पोलिसांनी बेड्या
रत्नागिरीतून केली अटक, न्यायालयाने मुख्याध्यापकाला दिली ४ दिवसांची पोलिस कोठडी
या प्रकरणाची तक्रार राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली होती तक्रार
लांजा तालुक्यातील गवाणे केंद्र शाळा क्रमांक १ मध्ये घडला होता प्रकार
-
नाशिक मनपातील भ्रष्टाचाराची चौकशी होणार
नाशिक – नाशिक मनपातील भ्रष्टाचाराची चौकशी होणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
मनपात भाजपची सत्ता असताना भ्रष्टाचार झाल्याचा केला आरोप
उपमुख्यमंत्री पवार यांनी नाशिक दौऱ्यावेळी केली घोषणा
-
मालेगावात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज नमाज पाठणसाठी मालेगांव कॅम्प रोडवरील ईडगाह मैदानावर येण्यास सुरुवात.
मालेगावात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज नमाज पाठणसाठी मालेगांव कॅम्प रोडवरील ईडगाह मैदानावर येण्यास सुरुवात…
लाखोंच्या संख्येने या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज अदा करतात.
मालेगावात विविध ठिकाणी १४ ठिकाणी नमाज अदा केली जाणार आहे.
मालेगांव शहरात ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रस्त्याच्या विविध ठिकाणी मेटल डिटेक्टर लावण्यात आले असून त्यातूनच येणाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे.
संपूर्ण मैदानावर CCTV बसवण्यात आले असून शहरात महत्वाच्या चौकात देखील CCTV लावण्यात आले असून त्यासाठी कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.त्या ठिकाणहुन लक्ष ठेऊन आहेत.
-
रमजान इदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात
रमजान इदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा शहरातील विविध भागात तैनात
त्याशिवाय एसआरपीएफ तुकड्या, डॉगस्कॉड, बॉम्ब शोधक नाशक पथकांकडूनही ठिकठिकाणी तपासणी करण्यात येणार
सामाजिक सलोखा राखण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन
-
अमरावतीत काही जण दंगल घडवण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांना खोटा फ़ोन.
अमरावतीत काही जण दंगल घडवण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांना खोटा फ़ोन.
पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर खोटा फोन….
112 क्रमांकावर दंगलीचा प्रयत्न सुरू असल्याचा। खोटा फोन करणाऱ्या एका युवकाला नागपूरीं गेट पोलिसांनी घेतले ताब्यात
अमरावतीच्या ट्रांन्सपोर्ट नगर येथे ४०० ते ५०० लोक हातात हत्यार घेऊन दंगल घडवण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांना केला होता खोटा फोन….
खोट्या अफ़वावर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन….
अमरावतीत सोशल मीडियावर अफवा पसरवण्यावर पोलिसांची करडी नजर.
काही महिन्यांपूर्वी अमरावतीत दंगल झाल्याने पोलीस आहेत अलर्ट..
-
कात्रज परिसरातील जांभुळवाडीत असलेल्या एका जलतरण तलावात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू
कात्रज परिसरातील जांभुळवाडीत असलेल्या एका जलतरण तलावात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू
सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली ही दुर्देवी घटना
सोमेश राठोड असे मृत्युमुखी पडलेल्या सोळा वर्षीय मुलाचे नाव
सोमेश राठोड सोमवारी जलतरण तलावात पोहताना दमछाक झाल्याने बुडाल्याची माहिती
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद
-
अक्षयतृतीये निमित्त पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला
आज अक्षयतृतीये निमित्त पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला
या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली
पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षयतृतीया निमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो.
-
भारतभरात आज ईदचा चंद्र दिसल्यानंतर ईदच्या नमाजाची तयारी सुरू झाली आहे.
भारतभरात आज ईदचा चंद्र दिसल्यानंतर ईदच्या नमाजाची तयारी सुरू झाली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळात मुस्लिम समाजातील लोकांना मशिदीत ईदची नमाज अदा करता येत नव्हती.त्यामुळे प्रसिद्ध असलेल्या मिनारा मशिदीत ईदच्या नमाजाची तयारी सुरू झाली आहे. मुंबईच्या मशिदीमध्ये लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मिनारा मशिदीत ईदच्या दोन जमात होतील, एक सकाळी 6.35 ला आणि दुसरी 7.20 ला. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम समाजातील लोक ईद साजरी करतात आणि आनंद व्यक्त करतात.
Published On - May 03,2022 6:19 AM