Maharashtra News Live Update : आगामी निवडणुकीत महाविकास आगाडी एकत्र लढणार, जयंत पाटलांनी सांगितला प्लॅन

| Updated on: May 04, 2022 | 10:10 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : आगामी निवडणुकीत महाविकास आगाडी एकत्र लढणार, जयंत पाटलांनी सांगितला प्लॅन
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज बुधवार 4 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात सध्या मशीदीवरील लाऊडस्पीकर विरुद्ध हनुमान चालीसा असा संघर्ष सुरू आहे, अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा तसे लेखी आदेश मनसैनिकांना काढल्याने हा मुद्दा आणखी तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजानवेळी हनुमान चालीसा लावल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. मशीदीवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणार आहेत. तसेच ऐकणार नसाल तर धर्माला धर्मानेच उत्तर देऊ असाही इशारा राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 May 2022 09:39 PM (IST)

    शिवसेनेच्या पराग गूढधे यांच्या कार्यालयातील खुर्च्याची फेकाफेक

    अमरावतीच्या राजापेठ चौकातील शिवसेनेच्या पराग गूढधे यांच्या कार्यालयातील खुर्च्याची फेकाफेक.

    रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकफाक केल्याचा शिवसेनेच्या पराग गुढधे यांचा आरोप.

    शिवसेनेच्या कार्यालया समोर फटाके फोडल्याचा शिवसेनेचा आरोप.

    राजापेठ पोलिस घटनास्थळी दाखल…

  • 04 May 2022 09:35 PM (IST)

    बदलापूरच्या चंदेरी गडावरून तरुण दरीत पडला

    विराज म्हस्के असं २२ वर्षीय तरुणाचं नाव

    विराज हा मुलुंडचा राहणारा असून ७ जणांच्या ग्रुपसह सकाळी ट्रेकिंगसाठी आला होता

    रेस्क्यू टीम विराजपर्यंत पोहोचली असून त्याला चिंचवली गावात आणलं जातंय

    घटनेत विराज याच्या पायाला आणि डोक्याला झाली दुखापत

  • 04 May 2022 09:04 PM (IST)

    राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बैठकीनंतर Live

    आगामी निवडणुकींसाठी राष्ट्रवादीने प्लॅन आखला

    एकत्र लढण्यावर असणार भर

    मतांचं विभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढण्याचे प्रयत्न करणार

    सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र बसून निवडणुका एकत्र कशा होतील याबाबत चर्चा करावी

    त्यात्या जिल्ह्यातील नेत्यांनी त्या लेव्हला निर्णय घ्यावेत

  • 04 May 2022 07:39 PM (IST)

    आप पुणे महापालिकेच्या सर्व जागा लढवणार

    – आम आदमी पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज,

    – विजय कुंभार यांच्या नेतृत्वात आप महानगरपालिकेच्या निडणुकीला सामोरं जाणार,

    – दिल्ली मॉडेल पुणेकरांसमोर ठेवत निवडणूक लढवण्याचा मानस

  • 04 May 2022 06:47 PM (IST)

    पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली

    -मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 36 वर रायगड हद्दीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती

    -द्रुतगती महामार्गालगत असलेल्या दरडी आणि रस्ता रुंदीकरणासाठी बॉस्टिंग करण्यात आले होते त्यामुळे खालापूर टोल नाक्यापासून काही अंतरावर अर्धा तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती

    -रायगड जिल्हा पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी सोडवली असून रस्तावरील वाहतूक कोंडी पूर्ण मोकळी करण्यात आलीय

  • 04 May 2022 06:46 PM (IST)

    मनसेकडून कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

    – शहाबाज पंजाबीच्या विरोधात मनसेकडून कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल,

    – शहाबाज पंजाबीवर कारवाई करण्याची मनसे राज्य सरचिटणीस हेमंत संभुस यांची मागणी,

    – कोंढवा परिसरात हनुमान चालीसा लावू देणार नसल्याच शहाबाज पंजाबीने केलं होतं वक्तव्य,

    – हनुमान चालीसा लावला तर आमची मुलं तयार असल्याचं केलं होतं वक्तव्य

  • 04 May 2022 06:16 PM (IST)

    मंत्री आदित्य ठाकरे Live

    आदित्य ठाकरे यांच्याकडून कोस्टल रोडच्या कामची पाहणी

    मुंबईसाठी याठिकाणी ओपन स्पेसही तयार होईल

    जिथे उशीर झाला आहे ते भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत

    काही आठवडे मागे पुढे होत असतात, मात्र काम वेगाने सुरू आहे

  • 04 May 2022 06:12 PM (IST)

    आवाज कमी करण्यासाठी मनसेची पोलिसात तक्रार

    अमरावती शहरातील उस्मानिया मज्जीद वरील भोंग्याचा आवाज कमी करण्यासाठी मनसेची पोलिसात तक्रार…..

    पोलीस तक्रारीची प्रत देत नसल्याचा मनसैनिकांचा आरोप….

    अमरावती सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते एक तासा पासून थांबून…..

    जोपर्यत पोलिस तक्रारीची प्रत देणार नाही तो परत जाणार नाही..कार्यकर्त्यांची भूमिका..

  • 04 May 2022 05:44 PM (IST)

    मंत्री जितेंद्र आव्हाड Live

    धार्मिक वाद पेटवण्याचा हा प्रयत्न

    यावर शासन विचार करेल

    राज ठाकरेंच्या मागणीचा नियम एकाला लागू होत नाही

    राज ठाकरे जी शाल पांघरत आहेत ती सहा महिन्यांपूर्वी कणी बघितली नव्हती

    अचानक त्यांच्या मनात आलंय की ते बाळासाहेब होतील, त्यातून हे सुरू आहे.

    पुन्हा बुद्ध होणे नाही, पुन्हा सम्राट होणे नाही, पुन्हा ज्ञानेश्वर होणे नाही, शिवाजी महाराज दुसरे होणे नाही, गांधीजी दुसरे होणे नाही, तसे बाळासाहेब पुन्हा होणे नाही

    मामुटी नावाच्या कलाकाराने बाबासाहेबांची भूमिका केली म्हणून ते बाबासाहेब झाले नाहीत

    राज ठाकरेच म्हणाले मंदिरावरील भोंगेही उतरवून टाका

    आपल्या परंपरा जुन्या आहेत

  • 04 May 2022 05:25 PM (IST)

    कोंढवा परिसरात अजानवेळी हनुमान चालीसा लावू देणार नाही

    – शहाबाज पंजाबी यांचा इशारा,

    – शहाबाज पंजाबी हे मनसेचे शहर उपाध्यक्ष होते,

    – काही दिवसांपूर्वी त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करत दिला होता राजीनामा,

    – अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावू देणार नाही, पंजाबी यांची भूमिका

  • 04 May 2022 05:03 PM (IST)

    काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात

    हिंगोली-दोन दिवसांच्या ढगाळ वातावरना नंतर काही ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात

    जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात

    अचानक आलेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची धांदल घाई..

  • 04 May 2022 04:57 PM (IST)

    पाम बीचवर कारचा अपघात, दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

    पाम बीच मार्गावर अक्षर ते n r i signal दरम्यान वाशी ते बेलापूर रोडवर कारचा अपघात झाला असून यात दोन जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात 4 मे रोजी पहाटे तीन वाजता घडला आहे.

    नवी मुंबई पाम बीच येथे भरधाव वेगाने आलेल्या कारने पोलला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे तर 1 जखमी इसमास उपचाराकरिता अपोलो हॉस्पिटल येथे भरती करण्यात आलेले आहे.

  • 04 May 2022 03:59 PM (IST)

    नाशिक – मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर 15 दिवस तडीपारीची कारवाई

    अजान वेळी हनुमान चालीसा लावल्या प्रकरणी केली कारवाई

    सत्यम खंडाळे – विभाग अध्यक्ष

    अमित गांगुर्डे – शहर संघटक

    मनोज घोडके – उपजिल्हा अध्यक्ष

    संजय देवरे – शहर सरचिटणीस

    निखिल सरपोतदार – चित्रपट सेना शहराध्यक्ष

    सचिन भोसले – समन्वयक

    संतोष कोरडे – शहर उपाध्यक्ष

    यांच्यावर केली कारवाई

  • 04 May 2022 03:39 PM (IST)

    नवी मुंबईतील मनसे कार्यकर्ते स्वतःहून नेरूळ पोलीस स्थानकात हजर

    आज पहाटे राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार नेरुळच्या मशिदी बाहेर भोंग्यावरुन अजान सुरु असताना हनुमान चालिसा नवी मुंबईच्या मनसैनिकांनी लावली होती. यात सहभागी असलेले मनसे कार्यकर्ते श्रीकांत माने, अक्षय भोसले, उमेश गायकवाड, नरेश कुंभार हे स्वताहून नेरुळ पोलिस स्टेशनला हजर झाले.

  • 04 May 2022 03:39 PM (IST)

    ठाण्यातील कापूरबावडी जामा मस्जिद वरील भोंगे मुस्लिम बांधवांनी उतरवले

    ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील असलेल्या जामा मस्जिद वरील भोंगे मस्जिद कमिटी यांच्या कडून काढण्यात आले असून सामंजस्य आणि एकोपा जपण्यासाठी हे भोंगे उतरवले असल्याचे मुस्लिम बांधवांकडून सांगण्यात आले . हे भोंगे उतरवण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा व समाजाचा दबाव नसून हे भोंगे आम्ही स्व इच्छेने काढले असल्याचे मुस्लिम बांधवांकडून सांगण्यात आले. भोंग्या बाबत सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत त्या निर्णयांचा पालन करून भोंग्यांच्या रीतसर परवानगी साठी पोलीस स्टेशन मधे परवानगी देखील मागणार असल्याचे देखील यावेळी मुस्लिम बांधवांकडून सांगण्यात आले. तर मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करत मस्जिद शेजारील अशापुरा मंदिर च्या सदस्यांकडून पुष्गुच्छ देत सत्कार करण्यात आला

  • 04 May 2022 03:08 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत Live

    भाजपने मनसेला पुढे करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला

    मनसेच्या आधाराने भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटला

    राऊडस्पीकर न लागल्याने लोखो भाविकांची गैरसोय झाली

    आज सकाळपासून अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहे

    प्रमुख हिंदू स्थळांवरील आरती अनेकांना ऐकता आली नाही

    शिर्डील्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे

    त्र्यंबकेश्वरमध्येही ही परिस्थिती राहिली

    हिंदुत्वासाठी आणि श्रद्धावंतांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे

    उद्या हिंदू रस्त्यावर उतरले तर आश्चर्य वाटणार नाही

    मात्र मी मुख्यमंत्र्यांच्या वतीने आवाहन करतो की हिंदुनो संयम राखा

    मशीदीवरील भोंग्यांचा निर्णय हा कायद्यानुसारच होईल

    एक कायदा सगळ्यांसाठी आहे

    हा वाद हिंदुंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे

    यामागे भाजपचं मोठं कारस्थान आहे

    लहान पक्षांना हाताशी धरून भाजप राजकारणासाठी वापर करून घेत आहे

    हा कायदेशीर विषय आहे, न्यायालय आहे. पोलीस व्यवस्था आहे ते याबाबत निर्णय घेतील

    अनेक ठिकाणी भजन किर्तनाचे कार्यक्रम होते, ते रद्द करावे लागले

    याला जबाबदार नवहिंदू ओवेसी आहेत

  • 04 May 2022 03:05 PM (IST)

    घोषणाबाजीवर मंदिर प्रशासनाचा आक्षेप

    – नागपूरात मनसेने ज्या मंदिरात हनुमान चालीसा पठण केलं तिथली परवानगी घेतली नव्हती

    – मनसेच्या हनुमान चालीसा पठणावर आणि घोषणाबाजीवर मंदिर प्रशासनाचा आक्षेप

    – सोनेगाव हनुमान मंदिरचे पदाधिकारी मनसे पदाधिकाऱ्यां विरोधात पोलीस तक्रार करणार

    – नागपूरातील सोनेगाव हनुमान मंदिरात अटीशर्थीसह पोलिसांनी दिली होती हनुमान चालीसा पठणाची परवानगी

    – हनुमान चालीसा पठणानंतर नियंमांचं उल्लंघन झाल्यास पोलीसंही करणार कारवाई

  • 04 May 2022 03:05 PM (IST)

    मुस्लिम धर्मगुरु यांचा मनसेने केला सत्कार

    राज ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे मनसे पदाधिकारी यांनी मुस्लिम धर्मगुरू यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे पालन करून मशीदीवर भोंगे कमी आवाजाने लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते त्याला नळदुर्ग येथे धर्मगुरू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी मुस्लिम धर्मगुरू यांचा सत्कार केला.

  • 04 May 2022 02:09 PM (IST)

    पंकजा मुंडेंची राज्य सरकारवर टीका

    ओबीसी आरक्षण हा फक्त भाजपचा विषय नाही

    अडीच वर्ष तुम्ही काय केलं, असा प्रश्न जनता विचारतेय

  • 04 May 2022 01:58 PM (IST)

    देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘माझी पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्यात साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. मला असं वाटतं की, उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे. आणि अशा प्रकारचं काही आल्यावर माझ्या पत्नीने त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही,’ अशा गोष्टी माझ्या पत्नीने इग्नोअर केल्या पाहिजे. पण हा त्या दोघांचा प्रश्न आहे, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत.

  • 04 May 2022 01:52 PM (IST)

    देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

    पाच वर्ष पूर्ण झाले आणि सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासक ठेवता येत नाही

    अशा ठिकाणी निवडणूक लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत

    हे राज्य सरकारचं फेल्यूअर आहे.  दोन वर्षे राज्य सरकारने टाईमपास केला,

    ट्रीपल टेस्ट पूर्ण केली नाही. त्यामुळे हा निर्णय आला, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

    न्यायालयाने सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रचंड ताशेरे ओढले असल्याची फडणवीस यावेळी म्हणालेत

    या निर्णयामुळे ओबीसींची मोठी हानी, याला राज्य सरकार जबाबदार

    न्यायालयाचा निर्णय समजून भाजप भूमिका मांडणार

  • 04 May 2022 12:52 PM (IST)

    लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवल्याबद्दल मनसेचे 250हून अधिक कार्यकर्ते ताब्यात

    लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 250 हून अधिक कार्यकर्त्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

  • 04 May 2022 12:16 PM (IST)

    राणांच्या खारमधील घरी मुंबई महापालिकेचं पथक

    राणांच्या खारमधील घरी मुंबई पालिकेचं पथक

    अनधिकृत बांधकामाबाबत पाठवली होती नोटीस

  • 04 May 2022 11:48 AM (IST)

    राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

    राणा दाम्पत्याला जामीन मंजूर

    – नवनीत राणा रवी राणा यांना जामीन मंजूर..

    – राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

    – अमरावतीत राणा दाम्पत्याच्या घरी जल्लोष

    – राणा समर्थकांच्या घोषणाबाजी

    – राणा दाम्पत्याला 12 दिवसांनी जामीन मंजूर

  • 04 May 2022 10:52 AM (IST)

    ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

    ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

    थोड्याच वेळात होणार सुनावणी

    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी बाबत निर्णय होणार?

    सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

  • 04 May 2022 10:24 AM (IST)

    सोलापुरात पोलिस आणि मनसे कार्यकर्त्यात वादावादी

    – सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न

    – पोलिस आणि मनसे कार्यकर्त्यात वादावादी

    – पोलिसांनी मारुती मंदिरातील एम्प्लिपायर जप्त केला

    – सोन्या मारुती मंदिरातील प्रकार

  • 04 May 2022 09:32 AM (IST)

    रझा अकादमीवर बंदी घाला, नितेश राणेंचं ट्विट

    रझा अकादमीवर बंदी घाला, नितेश राणेंचं ट्विट

  • 04 May 2022 09:28 AM (IST)

    मोठी बातमी! नवनीत राणांना जेजे हॉस्पिटलमध्ये हलवलं

    खासदार नवनीत रवी राणा यांना भायखळा जेलमधून जेजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती आहे.

  • 04 May 2022 09:17 AM (IST)

    जलसंधारण विभागाचे 3 अधिकारी ACBच्या जाळ्यात

    चंद्रपूर : 50 लाखांची लाच घेतांना जलसंधारण विभागाचे 3 क्लास वन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळयात अडकले आहेत. ब्रम्हपुरी येथे 50 लाखांची लाच स्वीकारताना श्रावण शेंडे (46), प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. सोबतच नागपूर येथून कविजीत पाटील (32) प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी आणि चंद्रपूर येथून रोहीत गौतम (35) लेखाधिकारी, जलसंधारण कार्यालय यांना देखील अटक करण्यात आली. या प्रकरणात तक्रारदाराने नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे काम केले होते. या कामाचं बिल काढण्यासाठी या तीनही अधिकाऱ्यांनी 81 लाखांची मागणी केली होती आणि त्यासाठी 50 लाखांची रक्कम स्वीकारताना नागपूर येथील ACB च्या पथकाने कारवाई केली.

  • 04 May 2022 09:07 AM (IST)

    राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा जूना व्हिडीओ ट्विट

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा जूना व्हिडीयो केला ट्विट

  • 04 May 2022 09:05 AM (IST)

    ‘नागपूरमध्ये हनुमान चालिसेसाठी परवानगी द्या’

    – नागपूरातील मनसेचे कार्यकर्ते आज पुन्हा पोलीस परवानगी मागणार

    – नागपूरातील 32 पोलीस स्टेशनमध्ये मनसे कार्यकर्ते जाणार

    – पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मागणार हनुमान चालीसा लावण्याची परवानगी

    – पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानं मनसेचे पदाधिकारी शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जाणार

    – मनसेचे कार्यकर्ते हनुमान चालीसा लावल्यावर ठाम

  • 04 May 2022 09:05 AM (IST)

    बाळासाहेब ठाकरेंचा Video ट्विट करत राज ठाकरेंचा निशाणा

    राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ ट्वीट

  • 04 May 2022 08:35 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांचं बॅरीकेटींग 

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांचं बॅरीकेटींग

    उपायुक्त प्रणय अशोक यांच्याकडून परिसराची पाहणी

    राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर अनेक ठिकाणी भोंगे बंद ,

    कार्यकर्ते राज ठाकरेंचे अभिनंदन करण्यासाठी येण्याची शक्यता

    या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर बॅरीकेटींग

  • 04 May 2022 08:32 AM (IST)

    औरंगाबादेत मशिदींना पाळले आवाजचे नियम!

    औरंगाबाद शहरातील अनेक मस्जिद मध्ये आवाज पूर्ण कमी करून अजाण देण्यात आली,

    औरंगाबाद शहरातील सर्वच मस्जिद मध्येही परिस्थिती

    औरंगाबाद शहरातील मशिदींनी पळाले आवाजाचे नियम

  • 04 May 2022 08:30 AM (IST)

    साताऱ्यात शांततेत अजान

    सातारा शहरासह जिल्ह्यात बहुतांश मशिदीत पहाटे 5:30 वाजता शांततेत पार पडली आजान

    शहरातील 17 तर जिल्ह्यातील 250 मशिदीमध्ये पार पडले आजान….

    शहरातील अनेक मशिदी बाहेर पोलीस बंदोबस्त….

    सातारा सर्वत्र शहरात शांतता

  • 04 May 2022 08:17 AM (IST)

    Local Breaking : वाशी ते सीएसएमटी सेवा सुरू

    वाशी रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती

    आता ती पूर्वरत झाली असून 6.25 मिनिटांनी वाशी ते सीएसएमटी सेवा सुरू झाली आहे

    मात्र, वाशी 2 ठाणे अद्याप बंदच आहे, ट्रान्स हार्बर बंदच आहे.

    ठाणे 2 नेरुळ आणि ठाणे 2 पनवेल सेवा सुरू आहे

  • 04 May 2022 08:13 AM (IST)

    Nagpur Breaking : कन्हान नगर परिषदेच्या सदस्यांना केलं अपात्र

    नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कन्हान नगर परिषदच्या सदस्यांना केलं अपात्र

    अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने कन्हान नगर परिषद सदस्य अनिल ठाकरे यांचा दावा अवैध ठरवला आहे.

    2019- 20 च्या निवडणुकीत प्रभाग 7 मधून अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवरून आले होते निवडून

  • 04 May 2022 08:10 AM (IST)

    ट्विटरनं आणलं इन्स्टासारखंच नवं फिचर, आता बनवा स्वत:चं ट्विटर सर्कल

    मुंबई : ट्विटरनं इन्स्टासारखंच नवं फिचर आणलंय. यामुळे आता तुम्ही दीडशे लोकांचा समूह बनवून तुमचं ट्विटर सर्कल बनवू शकतात. ट्विटरचे नवे फिचर इन्स्टासारखंच आहे. जे तुमच्या ट्विटसाठी तुम्हाला तुमचा ऑडियन्स निवडण्याचा पर्याय देतं. मंगळवारी या नव्या फिचरची घोषणा करताना ट्विटरनं सांगितलंय की, काही ट्विट्स प्रत्येकासाठी असतात आणि इतर फक्त तुम्ही निवडलेल्या लोकांसाठी असतात. आम्ही आता ट्विटर सर्कलचा प्रयोग करत आहोत. जे तुम्हाला दीडशे लोकांना एकत्र आणून देईल. हे दीडशे लोक तुमचे ट्विट्स बघू शकतात.’

Published On - May 04,2022 8:04 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.