Marathi News Live Update : मराठा समाजाचा इतर मागास वर्गात समावेश करण्याबाबत पुण्यात सुनावणी
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
आज दिनांक 11 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा खटला मुंबईत स्थानांतरीत करण्यात आला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार संबंधित खटले हे मुंबई सत्र न्यायालय, फोर्टमध्ये स्थानांतरीत करण्यात आले आहेत. या खटल्यांमध्ये योग्य न्यायदान व्हावे व सर्व आरोपींना सुनावणीची योग्य संधी मिळावी याकरिता सुप्रीम कोर्टाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा खटला अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित होता.
हे सुद्धा वाचा