मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : भाजप आज राज्यभर फाळणी वेदना दिवस पाळणार. म्हाडाच्या लॉटरीची आज दुपारी 2 वाजता सोडत. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार. चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. कोल्हापूरसह इचलकरंजीत एनआयएची छापेमारी, तीन संशयित ताब्यात. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
कवठेमहांकाळ रत्नागिरी नागपूर महामार्ग लांडगेवाडी वस्ती येथे आनंद सागर स्कूलच्या गाडीचा अपघात झाला आहे. ब्रेक फेल होऊन ड्रायव्हरचा गाडी वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. गाडी मध्ये 14 विध्यार्थी होते. तर यामध्ये 5 मुली जखमी झालेची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तर ड्रायव्हर पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात बाईक रायडर्सने आपल्या गाडीवर तिरंगी झेंडे लावत भारत माता की जय अशा घोषणा देत बाईक रॅली काढली आहे..
बुलडाणा | बुलडाणा-मलकापूर रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि दुध टँकरचा अपघात झाला. या अपघातानंतर ट्रकला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.
मुंबई | केंद्रीय गृहमंत्रालयानं देशातील ९५४ पोलीस पदकांची घोषणा केली. यामध्ये राज्यातील 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपची पदक जाहीर झालं आहे. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गालाही पदकं जाहीर झाली आहेत. या अधिकारी वर्गाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत अभिनंदन केलंय.
अजित पवार यांचं ट्विट
केंद्रीय गृहमंत्रालयानं देशातील ९५४ पोलीस पदकांची घोषणा केली. यामध्ये राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील ७६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन! उल्लेखनीय सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पदक’ विजेत्या प्रवीण साळुंखे, विनयकुमार…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 14, 2023
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाल्यानंतर थोड्याच वेळात ते रुग्णालयातून बाहेर येणार असून घरी जाणार आहेत. असंख्य कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी क्रिटीकेअर रुग्णालयाबाहेर जमले आहेत.
नूह जिल्ह्यात इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. 31 जुलै रोजी शोभा यात्रेदरम्यान नूह येथे हिंसाचार झाला होता, त्यानंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा १३ ऑगस्टपर्यंत सतत बंद होती. अखेर आज ती पूर्ववत करण्यात आली.
कळवा रुग्णालयातील 18 जणांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड व्यथित. मुख्यमंत्री मुंबईतील यशवंतराव चव्हाण इथल्या म्हाडाच्या कार्यक्रमानंतर थेट कळवा सिव्हिल हॉस्पिटलला जाणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये असल्याने रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
लोकसभा मतदारसंघ निरीक्षक पक्षश्नेष्ठींना 16 तारखेला अहवाल सादर करणार. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकांच्या अहवालावरून काँग्रेसची लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरणार.
शिंदेंऐवजी अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? असा सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शंका उपस्थित केल्या आहेत.
इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक पार पडणार आहे.
विधानसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू करा, अशी सूचना शरद पवांरानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिली आहे. बारामतीतील बैठकीत दिली सूचना.
अमरावतीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला आहे. शहरातील कचऱ्याच्या मुद्यावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाजवा रे वाजवा आंदोलन केले आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले असून त्यांच्यात व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी आहेत, हा शरद पवारांचाच गेम आहे. पवारांची एक टीम सत्तेत, आता दुसरीही लवकरच जाईल, असा टोला राज ठाकरे यांनी मारला.
राजकारणातील सध्याचा घोळ पाहता महापालिका निवडणुका होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभेच्या तयारीला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
अजित पवार कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, असे हुसेन दलवाई यांनी म्हटले आहे.
तसेच संभाजी भिडे यांना राष्ट्रवादीच्या लोकांनी मदत केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्यांना मदत करणाऱ्या पक्षातील लोकांचा पवारांनी शोध घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
चिपळूण मधून ठाकरे गटाला धक्का. उमेश सकपाळ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा. उमेश सकपाळ यांनी पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट. उमेश सकपाळ ठाकरे गटाचे चिपळूण शहर प्रमुख होते. उद्या सायंकाळी 7 वाजता करणार पक्ष प्रवेश. मंत्री उदय सामंत त्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात करणार पक्ष प्रवेश.
ठाणे महापालिकेबाहेर मनसेचं आंदोलन. रुग्णालयातील 18 जणांच्या मृत्यूनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांचं ठाणे पालिका आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलन.
राष्ट्रवादी मध्ये कुठलीही फूट नाही शरद पवार हे अजित पवारांसोबत भाजप सोबत जातील. शरद पवार बोलतात एक करतात एक त्यांच्या बद्दल नेमकं काय बोलावे ते कळत नाही. 2024 पर्यंत राज्यातील कुठलाही बदल नाही, जर झालाच तर खुप महाग पडेल – बच्चू कडू
ठाणे शहर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घर आहे. विरोधी पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात एका रुग्णालयात सुविधा अभावी १८ रुग्ण मृत्यू पावल्याची घटना घडली असती तर भारतीय जनता पक्षाने आतपर्यंत तेथील मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागितला असता. एका रात्रीत १८ रुग्ण मृत्यू झाल्याच्या घटनेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याची आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे. एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाचा ठाणे महानगरपालिकेवरती अनेक वर्षांपासून प्रभाव राहिला आहे. त्यामुळे सदर घटनेची मुख्यमंत्री यांनी जबाबदारी घ्यायला हवी.
पवार साहेबांच्या भोवती काय चालले आहे याचीच बातमी होते. बाकी कोणाकडे माध्यमांचेही लक्ष नाही. औषधी नव्हती, कळवा हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे, आर्थिक मदतीने कुटूंबाला आधार मिळणार नाही. घटना का घडली ही स्पष्ट करा. आरोग्य सेवा सक्षम करा. निधी न दिल्याने अनेक ठिकाणच्या आरोग्य विभागातील काम रखडली आहेत. या घटनेने आरोग्य विभाग किती सक्षम आहे कळतं. – रोहित पवार
पुणे नगर महामार्गावरील सणसवाडी येथे अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. सुनील राजाराम कोळपे (वय 40) असे चालकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशन आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नवाब मलिक यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. त्यानंतर ते कारागृहात अजून बाहेर आलेले नाही. कदाचित आज ते कारागृहातून बाहेर येऊ शकतात. ते कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
यंदा टोमॅटो चांगला दर मिळाला आहे. त्याचवेळी नेपाळमधून टोमॅटो आयात केली जात आहे. आपल्याकडे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळताच आयात केली जात असल्याचा प्रकार नेहमी होतो, असे मत शरद पवार यांनी मांडली.
मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील रुग्णालयात १८ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी घटना घडत असेल तर राज्य कोणत्या दिशेला जात आहे, हे याठिकाणी दिसून आले. यासंदर्भात अत्यंत कठोर पावले तातडीने टाकण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिले. महाविकास आघाडीत एकी आहे. तुम्ही वारंवार संभ्रम निर्माण करु नका, असे शरद पवार यांनी सांगितले.
ठाण्याच्या रुग्णालयात १८ रुग्ण दगावले हा आक्रोश कुणी ऐकायचा अशी टीका संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवरती केली. हेलिकॉप्टर घेऊन फिरणारे मुख्यमंत्री आहेत कुठे ? असा देखील प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. मी सत्य बोलतो, ते त्यांना खूपतं. या राज्यांचा कारभार वेडे झालेल्या माणसांच्या हातात आहे. त्याचबरोबर आम्हाला तोंड उघडायला लावू नका असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला. ठाण्यातील घटनेनंतर आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्याचबरोबर शिवसेनेच्या डीएनएमध्ये कसलाही ढोंगीपणा नाही असेही संजय राऊत म्हणाले.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात 100 टक्के इलेक्ट्रिक असलेल्या बस दाखल झाल्या आहेत. नाशिक आणि पुणे दरम्यानचा प्रवास सुकर होणार आहे. ई-शिवाई बसमध्ये पूर्ण ऑटो सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस, ड्राइवर अलार्म सिस्टम सह आधुनिक यंत्रणा आहेत. गाडीत अत्याधुनिक ड्राइवर अल्कोहोल अलार्म सिस्टम सुध्दा आहे. नाशिक विभागात सध्या 8 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत.
पुणे – पुणे नगर महामार्गावरील सणसवाडी येथे भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टेम्पो चालक सुनील राजाराम कोळपे असं चालकाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशन आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून शरद पवारांना भेटण्यासाठी मराठा सेवा स्वराज्य संघाचे कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले आहेत. मराठा सेवा स्वराज्य संघ कोल्हापूर पवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी दाखल झाले असल्याची माहिती मिळाली आहे. गोविंदबाग या निवासस्थानी कार्यकर्ते मोठ्या दाखल झाले आहेत.
राज्यातील झालेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तब्बल दीड महिन्यानंतर बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी रात्री दाखल झाले आहेत. आज सात वाजल्यापासून बारामतीतील निवासस्थान असलेल्या गोविंद बाग याठिकाणी शरद पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. आज शरद पवार हे संपूर्ण दिवसभर बारामती येथे असणार आहेत. त्यानंतर ते उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत.
चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन होऊन दोन दिवस झाले. मात्र अद्यापही उड्डाणपुलावरील वाहतूक बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी झालेल्या समारंभाचे मंडप अजूनही त्या ठिकाणी आहेत. पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला करणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र सभामंडपाचा सांगाडा पुलावर असल्याने पुलावरील वाहतूक बंद आहे.
हिमाचल प्रदेशच्या सोलानमध्ये कांदाघाट क्षेत्रात जादोन गावात ढगफुटी झाली आहे. दोन घरं आणि एक गोशाळा वाहून गेलीय. पाच जणांचा मृत्यू झाल्या. तिघे बेपत्ता आहेत.
Five killed, 3 missing after cloudburst in Himachal’s Solan
Read @ANI Story | https://t.co/XDykTiXubC#HimachalPradesh #Solan #cloudburst pic.twitter.com/sHmTGq2mKn
— ANI Digital (@ani_digital) August 14, 2023
अजित पवार यांच्या बरोबर माझी भेट झाली. पण वडिलधाऱ्या माणसांना भेटण्यात गैर काय? असा सवाल शरद पवार यांनी विचारला. पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात शनिवारी बैठक झाल्याची बातमी आहे.
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. मतदारसंघ निरीक्षकांचे लोकसभा मतदारसंघ दौरे सुरू झालेत. आज पुण्यात काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आढावा बैठक घेणार आहेत. त्या लोकसभा मतदारसंघ निरीक्षक आहेत. आतापर्यंत पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसनं लढवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही आतापर्यंत अनेकवेळा मतदारसंघाची मागणी केली आहे. मात्र काँग्रेसनं हा मतदारसंघ लढवला आहे. आज लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा
टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीज गमावली. मागून पिछाडी भरुन काढत टीम इंडियाने या सीरीजमध्ये बरोबरी साधली होती. पराभवाची 3 कारणं जाणून घ्या. वाचा सविस्तर….
अंधेरी उड्डाणपुलावर असलेल्या गॅन्ट्री गर्डर पाडण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरू होते. त्यामुळे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आल्याने पुलाखालील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अधिसूचना जारी केली होती. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 ते 6 दरम्यान उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीसाठी बंद असेल. मात्र काम उशिरापर्यंत सुरू असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.
राज्यात पुन्हा 19 ऑगस्टपासून पावसाला सुरुवात होणार आहे. 19 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. हवामान खात्याने त्याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.
कोल्हापूरसह इचलकरंजी आणि हुपरीत एनआयएने छापेमारी केली आहे. याप्रकरणी एनआयएने तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांची आज सोडत काढण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही सोडत निघणार आहे. या सोडतीवेळी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.