मुंबई | 1 ऑक्टोबर 2023 : आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचा सामान्य ग्राहकांनाही अप्रत्यक्ष फटका बसणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरूच आहे. आज पुण्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज. पनवेल ते बेलापूर दरम्यान 38 तासांचा मेगाब्लॉक. काल रात्री 11 वाजल्यापासून हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक सुरू झाला आहे. आजपासून स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम ‘एक तारीख एक तास’. गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाग घेणार. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
नवी दिल्ली : भाजपची केंद्रीय समितीची बैठक सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत.
अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार अशी माहिती सुजात आंबेडकर यांनी दिली. अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कंत्राटी नोकर भरती विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करू. कंत्राटी नोकर भरतीचा जीआर म्हणजे काळा कायदा आहे. स्पर्धा परीक्षा मार्फतच नोकर भरती व्हावी असे ते म्हणाले.
पुणे : मराठा आरक्षणासाठी राजगुरुनगर येथे साखळी उपोषण सुरु आहे. शरद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत आरक्षण तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर लागु व्हावे. एका राज्यात मिळु शकते मग बाकी ठिकाणी का नाही असा सवाल केला. घटनादुरुस्ती करुन मराठा आरक्षण मिळु शकते अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली.
ठाणे : ठाणे टोलची मुदत कधीच संपली आहे. टोलचे दर वाढवत असाल, अन्याय करत असाल तर आम्ही त्याविरोधात आवाज उठवणारच. पाच तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू. तोपर्यंत सरकारकडून काही झाले नाही तर आम्ही उपोषण करणार एवढं नक्की. आम्ही शांततेची भूमिका घेतली आहे नाही तर आमच्या रक्तात जे आहे ते करणार, असा इशारा माणसे नेते अविनाश जाधव यांनी सरकारला दिला.
पुणे | सत्ता येते आणि जाते, मात्र सत्तेला चिटकून जाऊ नये. सत्तेला चिकटून राहिल्यास लोकं कधी ना कधी कायमचा निकाल घेतात”, असं शरद पवार म्हणाले आहेत. ते पुण्यातील आंबेगाव इथे बोलत होते.
हिंगोली | मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी 2 ऑक्टोबर रोजीवसमत तालुक्यातील कुरुंदा येथे जाहीर सभा होणार आहे. ही सभा 16 एकर परिसरामध्ये पार पडणार आहे. कुरुंदा येथे होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे. सभेसाठी हजारोंच्या संख्येने सकल मराठा समाज होणार सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई | या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास मान्यता मिळाली आहे. त्याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकल्पामुळे सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव या तालु्क्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे.
स्वच्छतेच्या कार्यक्रमात आमदार प्रकाश आवाडे आणि माजी नगरसेवक सागर चाळके एकमेकांसमोर भिडले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेवरून खडाजंगी झाली. आमदार प्रकाश आवाडे यांनी के एल मलाबादे चौकातच स्मारक होणार असल्याची घोषणा केली. स्मारकाच्या जागेवरूनच दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळते.
सरकारमध्ये असल्यामुळे आपण निधी मिळवू शकतो. तुमच्या मनात काही कल्पना असतील तर सांगा. त्या आपल्या फायद्याच्या असतील तर आपण त्या अमंलात आणण्याचा प्रयत्न करु, असे अजित पवार म्हणाले आहेत.
राज्याच्या राजकारणात बदल झाले. सत्ता येते जाते. मात्र सत्तेला चिकटून जाऊ नये. भूमिका योग्य नाही. ही लोकांची फसवणूक असते आणि काहींनी ही फसवणूक केलीये, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दौरे रद्द झाले याबाबत मी काल भाष्य केलं आज मला काही प्रश्न विचारायचे आहेत त्याचा आज खुलासा करत आहे. जनतेत संभ्रम निर्माण करणे सुरू आहे राजकारणाचा स्तर घसरत आहे. आरोप करताना पुरावे दिले पाहिजे प्रत्येकाला बोलता येते पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
शरद पवार हे आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देणार आहेत. आंबेगाव बाजार समितीमध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वर्चस्व बघायला मिळतंय.
पालखी महामार्गाच्या दुरावस्थेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बोट ठेवले आहे. महामार्गावर हडपसर ते सासवड रोडवर मोठं मोठे खड्डे पडल्याचे फोटो त्यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहेत. या खड्यात पाणी साचत असल्याने ती दिसत नाहीत. या मार्गावर अपघात होत असल्याचे सांगत त्यांनी यंत्रणेला लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर हडपसर-सासवड रोडवर भेकराईनगर ते उरुळी फाटा मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून, यामध्ये पाणी साचत असल्याने प्रवाशांना खड्डे दिसत नाहीत.
या महामार्गावर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, विद्यार्थी… pic.twitter.com/D27bgvugpa— Supriya Sule (@supriya_sule) October 1, 2023
इंडिया आघाडीकडून उद्या मैं गांधी आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्ष वारंवार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. याविरोधात 2 ऑक्टोबर रोजी मैं गांधी आंदोलन करण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांनी गणेशोत्सव आणि एकूणच हिंदू सणांमधील बदलांबाबत कान टोचले आहेत. सण साजरे करताना ते पर्यावरण पूरक आणि त्याला पारंपारिक वाद्यांची साथ मिळायला हवी असे मत त्यांनी मांडले. सोशल प्लॅटफॉर्म ट्विटरवर त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यात या सणांना येत असलेला बीभत्सपणा थांबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच यासाठी सार्वजनिक मंडळांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
सस्नेह जय महाराष्ट्र
महाराष्ट्रातला गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, आणि तो पार पडावा ह्यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणा राबल्या त्यांचं मनापासून अभिनंदन. नेहमीप्रमाणे स्वतःच्या घरातील सण, सणाचा आनंद बाजूला ठेवून त्यांनी जे काम केलं ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.
मी आज ज्यावर…
— Raj Thackeray (@RajThackeray) October 1, 2023
सामान्य माणसाचा विचार महत्वाचा आहे. जनतेला खरी परिस्थिती माहीती आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण सामान्य माणसाला माहीत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
पुण्यात महात्मा गांधी जयंती निमित्त पऺतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीमेत विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. पुण्यातील विद्यार्थ्यांनी एस. एम. जोशी पुलाजवळ एकत्र येत नदीपात्रामध्ये स्वच्छता केली.
वंदे एक्सप्रेसमध्ये स्वच्छता मोहिम राबवण्यात आली असून अवघ्या 14 मिनिटांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस स्वच्छ करण्याचा प्रयोग राबवण्यात आला आहे. हा प्रयोग जर यशस्वी ठरला तर इथून पुढे हा लागू केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी तरूणाईसोबत संवाद साधला.
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटी चे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम चे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले.
ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्स ची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती
पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले घोडधरण 100% भरलं आहे. धरणातून 1 हजार क्युसेक्सने घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या डिंभे आणि वडज धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. घोड धरण ही पूर्ण क्षमतेने भरलं आहे. घोड धरणातून सध्या घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस जर असाच सुरू राहिला तर हा विसर्ग अजून वाढवला जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्याच्या खेड तालुक्यात आजपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या धर्तीवर खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आलं आहे. राजगुरू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण सुरु झालं आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातून उपोषणकर्ते सहभागी होणार आहेत. आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजी राजे भेट देणार आहेत.
गोकुळ दूध संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात दीड रुपयांची वाढ झाली आहे. म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर 50 रुपये 50 पैसे भाव मिळणार आहे. म्हैस दूध उत्पादन घटल्याने उत्पादन वाढीसाठी गोकुळ दूध संघाने निर्णय घेतलाय. नव्या दरामुळे म्हैस दूध उत्पादकांचा फायदा होणार आहे. गायीच्या खरेदी दरात मात्र दोन रुपयांची कपात झाली आहे. आज पासूनच नव्या दराची अंमलबजावणी होणार आहे. विक्री दरात मात्र अद्याप वाढ नाही.
विरोधकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नख्यांबाबत राजकारण केलं जातंय. लंडनमधील वाघ नख्या खोट्या असतील तर त्या विरोधकांनी सिद्ध करावं. ज्या गोष्टींबाबत मराठी अस्मिता जोडलेली आहे त्याचं राजकारण करू नका. साताऱ्यातील पोवई नाका येथे स्वच्छता मोहिमेदरम्यान आमदार शिवेंद्रराजे यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला स्वच्छते संदर्भात आवाहन केल्यानंतर राज्यभरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात येतेय. पुण्यातील निरा येथे आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शेकडो श्रीसेवकांनी स्वच्छता मोहीम सुरू केलीय ..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गिरगाव चौपाटीस स्वच्छता मोहीम सुरु झाली आहे. ‘स्वच्छता हिच सेवा’ उपक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग पाहायला मिळत आहे.
सोलापुरात धनगर समाज ३ ऑक्टोबरला आक्रोश मोर्चा काढणार आहे. शेकडो मेंढरं घेऊन धनगर समार रस्त्यावर उतरणार आसल्याची माहिती समोर येत आहे.
दिवा सावंतवाडी गाडी न आल्याने प्रवाशी संतप्त झाले. प्रवाशांनी दिवा स्थानकावर रेले रोको आंदोलन सुरु केले आहे. प्रवाशांनी कोकणात जाण्यासाठी नियोजन केले होते. परंतु रेल्वे न आल्यामुळे प्रवाशी संतप्त झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट विदर्भात चांगलाच सक्रिय झाला आहे. शरद पवार गटाकडून विदर्भात मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी केली जात आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आजपासून तीन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामती दौरा करणार आहे. बारामती शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमांना अजित पवार हजेरी लावणार आहे. तसेच स्वच्छताही सेवा या अभियानांतर्गत एक तास श्रमदान उपक्रमातही ते सहभाग होणार आहे.
समृद्धी महामार्गावर चोरीची घटना छत्रपती संभाजीनगरजवळ घडली आहे. महामार्गावर सुरक्षा जाळीची चोरी झाली आहे. या ठिकाणी जाळी नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तसेच दिशा दर्शक फलक आणि बॅटरीही चोरी झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सोलापुरात पाच सभा होणार आहे. सोलापूर शहरासह मंगळवेढा, पंढरपूर, कुर्डुवाडी आणि बार्शीत 5 ऑक्टोबर रोजी सभा होणार आहे. सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात सभा होणार आहे.
मुंबईच्या मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधनीला स्थगिती मिळाली आहे. पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे हे निर्देश आहेत. 389 झाडे या प्रकल्पाने बाधीत होत असल्यानं या प्रकल्पाला विरोध केला जात आहे. जलाशयासाठी नवीन जागा सुचवण्यासाठी समिती स्थापण करण्यात येणार आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत जलाशयाच्या पुनर्बांधनीला स्थगिती देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. पूर्व – मध्य अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता शनिवारी रात्री पणजीपासून 110 किलोमीटर तर रत्नागिरीपासून 130 किलोमीटर अंतरावर होते.
मंत्रीपदाची आशा सोडून आमदार निवडणूकीच्या तयारीला लागलेले आहेत. हिंगणघाटच्या भाजप आमदारांना 300 कोटींचा निधी मिळालेला आहे. आमदार समीर कुणावार यांच्याकडून आता भुमीपुजनाचा सपाटाच लावण्यात आलेला आहे.
पालक मंत्री गिरीश महाजन नांदेड जिल्ह्याला वेळ देत नाहीत असा आरोप शिंदे गटाच्या पदाधीकाऱ्यांनी केला आहे. नांदेडमध्ये विकास कामांचा खोळंबा झाला आहे असा आरोप शिंदे गटाच्या पदाधीकाऱ्यांनी केला आहे.
देशात नऊ महिन्यात तब्बल 146 वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधीक वाघांचा मुत्यू झाल्याची माहिती आहे.
मुंबई आणि कोकण विभागातील पदवीधर मतदार नोंदणी आजपासून होत आहे. नाशिक विभागामधील शिक्षक मतदार नोंदणीलाही आजपासून सुरूवात होणार आहे. पदवीधर आणि शिक्षकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन निवडणून आयोगाकडून करण्यात आलेले आहे.
काँग्रेसचे आमदार कुणाल पाटलांच्या सुतगिरणीवर छापेमारी करण्यात आलेली आहे. गेल्या 24 तासांपासून चौकशी सुरू आहे. आजही चौकशी सुरू राहाण्याची शक्यता आहे. चौकशीबाबत तपास यंत्रणेकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. नागपूर आणि पुणे येथील आयकर विभागाची पथकं असल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रीपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे. आज दिवसभर पुणे शहरासह जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढची तीन दिवस पुण्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कराडमध्येही आज जोरदार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता असून कोकणातही काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला आहे. या गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. मुंबईत हा गॅस सिलिंडरचे दर 1684 रुपये झाली आहे.
काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर धाडसत्र सुरूच आहे. गेल्या 24 तासापासून सूत गिरणीत कसून तपास सुरू आहे. नागपूर आणि पुणे येथील आयकर विभागाच्या पथकांनी हे छापे मारल्याची माहिती आहे. मात्र, त्याला अद्याप कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
पनवेल रेल्वे स्थानक येथे मुख्य पायाभूत सुविधा संबंधित कामकाजाकरीता बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. काल रोजी रात्री 11 वाजल्या पासून ते आज दुपारी 1 वाजेपर्यंत 38 तासांचा मेगाब्लॉक घेतलेला आहे.त्यामुळे बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानक दरम्यान लोकल रेल्वेची सेवा बंद राहणार आहे.
त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमांकडून ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीकरिता 28 विशेष बसेसने 232 फेऱ्याद्वारे बस सेवा देण्यात येणार आहेत.