Maharashtra Breaking News Live | ईडीची कारवाई बघून काहीजण भाजपसोबत – शरद पवार

| Updated on: Aug 21, 2023 | 7:20 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Live | ईडीची कारवाई बघून काहीजण भाजपसोबत - शरद पवार
Marathi News Live
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : चांद्रयान-3 चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचलं आहे. इसरोने दुसरे आणि अखेरचे डिब्यूस्टिंग ऑपरेशन यशस्वी पार पाडले आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणार आहे. ब्राह्मणांमध्ये शिवाजी आणि संभाजी ही नावे नसतात, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विधानावरून वाद. हिंदुत्ववादी संघटनांकडून टीका, आज पडसाद उमटण्याची शक्यता. मुंबईसह, वसई, विरार, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये पावसाची दमदार हजेरी. वातावरणात गारवा. नागपूर, अकोला, भंडारा आणि गोंदियातही पावासाची दमदार हजेरी. यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Aug 2023 08:33 PM (IST)

    Chhagan Bhujbal case | विश्वजीत देशपांडे यांना अजित पवार गटाने दिला मोठा इशारा

    छगन भुजबळ यांना धमकी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अजित पवार गटाकडून मुंबई नाका पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलंय. पुन्हा असे वक्तव्य केल्यास देशपांडे यांना संपूर्ण महाराष्ट्रभर फिरू न देण्याचा अजित पवार गटाचा इशारा

  • 20 Aug 2023 08:27 PM (IST)

    वसईच्या कामन परिसरातील केमिकल कंपनीला भीषण आग

    वसईच्या कामन परिसरात केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडलीये. कामन सागपाडा देवदळ परिसरात ममता इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या बाजूला ही केमिकल कंपनी आहे. आज रात्री 8 च्या सुमारास ही आग लागली असून आगीचे कल्लोळ परिसरात पसरले आहेत.  वसई विरार महापालिका अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळावर पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

     


  • 20 Aug 2023 08:25 PM (IST)

    Chandrapur News | इरई धरणाची सर्व 7 दारे अर्ध्या मीटरने उघडली

    चंद्रपूर शहरालगत असलेल्या इरई धरणाची सर्व 7 दारे अर्ध्या मीटरने उघडली आहेत. 1 ते 7 अशी सर्व दारे उघडून इरई नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या धरण क्षेत्रात आतापर्यंत 1200 मिमी वार्षिक सरासरीपैकी 926 मिमी पाऊस झाला आहे. धरण 93 टक्के भरल्याने  दारे उघडण्यात आली आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय.

  • 20 Aug 2023 08:18 PM (IST)

    Pune News | पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यासाठी विनंती करणार- सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार

    केंद्र सरकार तर्फे दिला जाणारा पद्मश्री पुरस्कार अशोक सराफ यांना द्यावा अशी विनंती करणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यात म्हटले आहे. यंदाचा अभिनय क्षेत्रातील पद्मश्री अशोक सराफ यांना देण्यात येणार, असेही त्यांनी म्हटले.

  • 20 Aug 2023 05:20 PM (IST)

    Sharad Pawar On Ajit Pawar Group | ईडीच्या भीतीने काही जण भाजपसोबत, शरद पवार यांचा अजित पवार गटावर हल्लाबोल

    पुणे | अलिकडे आपल्यातील काही लोक पक्षाबाहेर गेलेत. विकासासाठी भाजपसोबत गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यात काही अर्थ नाही. सत्तेचा गैरवापर केला जातोय. ईडीच्या भातीने काही जण भाजपसोबत जाऊन बसलेत, अशी टीका शरद पवार यांनी अजित पवार गटावर केली.

  • 20 Aug 2023 05:13 PM (IST)

    Sharad Pawar On Onion Export | केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या निर्णयावरुन शरद पवार यांची टीका

    पुणे | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 31 डिसेंबरपर्यंत 40 टक्के शुल्क लावणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांनी या निर्णयावरुन केंद्र सरकारवर टीका केली “कांद्यावर शुल्कवाढ केल्याने शेतकऱ्यांसाठी जगातलं मार्केट बंद झालं” , अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्राच्या निर्णयावर टीका केली.

  • 20 Aug 2023 05:08 PM (IST)

    Sharad Pawar Pune Live | सरकारकडून अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष, शरद पवार यांची टीका

    पुणे | “राज्यात अनेक प्रश्न आणि समस्या आहेत. सरकारकडून अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं आहे. महाराष्ट्रातून गेल्या 6 महिन्यात किती कारखाने गुजरातला गेले, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच कारखाने दुसऱ्या राज्यात गेल्यानं स्थानिकांची संधी गेली”, असं शरद पवार म्हणाले.

  • 20 Aug 2023 04:41 PM (IST)

    CM Eknath News : राज्यात नवीन उद्योग येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर आहे. येत्या काळात देशात महाराष्ट्र अग्रेसर राहील. राज्यात नवीन उद्योगांची सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

  • 20 Aug 2023 04:22 PM (IST)

    Solapur News : सोलापुरातील काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

    सोलापूरमध्ये काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. आमदार प्रणिती शिंदे काँग्रेस भवनाबाहेर पडताच कार्यकर्ते एकमेकांना भिडले. ही घटना का घडली, कार्यकर्त्यांमध्ये कशामुळे वाद झाला याचं कारण मात्र अस्पष्ट आहे.

  • 20 Aug 2023 04:09 PM (IST)

    Supriya Sule News : दादांसोबत मतभेद, मनभेद नाही-खासदार सुप्रिया सुळे

    अजित पवार यांच्यासोबत राजकीय मतभेद असले तर मनभेद नाहीत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अजित पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे बाळबोध असल्याचा टोला ही त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

  • 20 Aug 2023 11:21 AM (IST)

    27 ऑगस्टला अजित पवारांची सभा, बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडेंची बैठक

    27 ऑगस्टला बीडमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. सभेच्या निमित्ताने आज मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. हॉटेल सनराईस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत धनंजय मुंडे पदाधिकाऱ्यांना काय सूचना करतील याकडे लक्ष लागले आहे.

  • 20 Aug 2023 11:09 AM (IST)

    अजितदादांसोबत राजकीय मतभेद आहेत, मनभेद नाहीत – सुप्रिया सुळे

    कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीवर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार राज्यात ज्या गोष्टी सुरु आहेत त्याकडे लक्ष द्यावे. मणिपूर आणि हरियाणामध्ये झालेल्या घटना धक्कदायक घडल्या आहेत. अजितदादांसोबत राजकीय मतभेद आहेत, मनभेद नाहीत असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

  • 20 Aug 2023 10:59 AM (IST)

    Shard Pawar : राष्ट्रवादीची पुण्यात कार्यशाळा

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडियाची कार्यशाळा रविवारी पुण्यात होत आहे. या कार्यशाळेला शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार , जितेंद्र आव्हाड उपस्थित असणार आहे. दुपारी 4:30 वाजता शरद पवार कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.

  • 20 Aug 2023 10:46 AM (IST)

    Maharashtra News : भंडाऱ्यात पावसाची हजेरी

    सलग तिसऱ्या दिवशीही भंडाऱ्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे वैनगंगा नदीसह उपनदी ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसामुळे काही भागातील भात पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

  • 20 Aug 2023 10:37 AM (IST)

    Maharashtra News : कांदा उत्पादक संतप्त

    देशांतर्गत बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे. यामुळे कांद्याच्या दरात वाढ होत असताना केंद्र सरकारने निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले आहे. तसेच नाफेड मार्फत 3 लाख मेट्रिक टन खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

  • 20 Aug 2023 10:22 AM (IST)

    Maharashtra News : शेतकरी संघटना आक्रमक

    कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आंदोनल उभारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे.

  • 20 Aug 2023 10:09 AM (IST)

    Sanjay Raut : भाजपने कोर्टात जावे – संजय राऊत

    शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे. सामनाच्या अग्रलेखाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा शनिवारी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. आता राऊत यांनी भाजपने कोर्टात जावे, मी वाट बघतोय असे प्रत्युत्तर दिले आहे.

  • 20 Aug 2023 10:02 AM (IST)

    Thane News : ठाणे परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचारी उद्यापासून संपावर

    ठाणे परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. पगारवाढ आणि इतर माग्ण्यासाठी कर्मचारी संपावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागण्यांकडे लक्ष दिलं जात नसल्याचे कार्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • 20 Aug 2023 09:50 AM (IST)

    Chagan Bhujbal : ब्राम्हणांमध्ये फक्त पुरूषांचेच शिक्षण होते, स्त्रियांचे नाही- भुजबळ

    ब्राम्हणांमध्ये फक्त पुरूषांचेच शिक्षण होते, स्त्रियांचे होत नाही असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री छगण भुजबळ यांनी केले आहे. याशिवाय ब्राम्हणांमध्ये संभाजी शिवाजी असे नावही ठेवत नाही असेही ते म्हणाले. ब्राम्हणाबद्दल केलेल्या वक्तव्याचा आनंद दवे यांनी समाचार घेतला.

  • 20 Aug 2023 09:38 AM (IST)

    Samna Agralekh : भाजप कार्यकर्त्यांकडून सामना वृत्तपत्राची होळी

    सामनामध्ये देवेंद्र फडणवीसांबद्दल लिहीलेल्या अग्रलेखामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांकडून वृत्तपत्राची होळी करण्यात आली. मुंबईच्या सामना कार्यालयाबाहेर वृत्तपत्राची होळी करून भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह आणि भायखळ्यामध्येही अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे.

  • 20 Aug 2023 09:22 AM (IST)

    Ramesh Kadam : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर

    सोलापूर, औरंगाबादसह अनेक ठिकाणी घोटाळे केल्याचा आरोप असलेले मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्थिक घोटाळ्यांप्रकणी त्यांना 2015 साली अटक करण्यात आली होती. माजी आमदार रमेश कदम आज तुरूंगाबाहेर येणार आहेत. कदमांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते ठाण्यातील कारागृहाबाहेर जमणार आहेत.

  • 20 Aug 2023 09:16 AM (IST)

    Pune News : पुण्यात केसरी वाड्यामध्ये गणेशोत्सवाला सुरूवात

    पुण्यात केसरी वाड्यामध्ये आजपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. येथे आज गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. टिळक पंचांगानुसार हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.

  • 20 Aug 2023 08:57 AM (IST)

    मुंबई विमानतळावरून 3.20 कोटींचं सोनं जप्त…

    मुंबई विमानतळावर सीमा शिल्लक विभागाकडून सहा किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. आठ वेगवेगळ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. यात तब्बल 3.20 कोटींचे 6.19 किलो सोने जप्त कण्यात आलं आहे.  तर या संदर्भात सीमा शिल्लक विभाग अधिक तपास करत आहे.

  • 20 Aug 2023 08:45 AM (IST)

    केसरीवाडा गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात

    पुण्यातील केसरीवाडा गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. केसरी वाड्यात गणपती बाप्पाची आज प्रतिष्ठापणा होणार आहे. टिळक पंचांगानुसार केसरी वाड्यातील गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. परंपरेनुसार पालखीमधून मिरवणूक काढत गणपती बाप्पांचं केसरी वाड्यात आगमन होणार आहे. केसरी वाडा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पाचवा गणपती आहे.

  • 20 Aug 2023 08:30 AM (IST)

    नाशकात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

    केंद्रीय मंत्री भरती पवार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवली. नाशिकच्या RTO रोड परिसरात ही घटना घडलीये. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडली. म्हसरुळ पोलीस ठाण्यात भारती पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. परीसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे.

  • 20 Aug 2023 08:17 AM (IST)

    दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात मुकमोर्चा

    समाजातील अंद्धश्रद्धा दूर व्हावी यासाठी झटणाऱ्या नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावरअंनिस आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते जमले आहेत. 20 ऑगस्ट 2013 सकाळी दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती.

  • 20 Aug 2023 08:00 AM (IST)

    local : मध्यरेल्वे आणि हार्बरवर मार्गावरील मेगा ब्लॉक; पाच तास खोळंबा

     

     

    उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील लोकस सेवा पाच तास विस्कळीत राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यत ट्रान्स हार्बर मार्गावरुन प्रवासाची परवानगी दिली आहे.

  • 20 Aug 2023 07:46 AM (IST)

    Pune : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

    पुण्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. आंबेगावमधील निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्रात 51 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर या सर्व महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • 20 Aug 2023 07:31 AM (IST)

    mumbai airport : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, 3.20 कोटी किंमतीचे सोने जप्त

    मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. विमानतळावर आठ वेगवेगळ्या कारवायांमध्ये 54 लाखांची तीन ब्रँडेड घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय साडे सहा किलोचं सोनंही जप्त करण्यात आलं आहे. या सर्वांची किंमत 3.20 कोटी आहे.

  • 20 Aug 2023 07:18 AM (IST)

    Rain : मुंबई, ठाण्यात पावसाची दमदार हजेरी, हवेत गारवा; चाकरमानी सुखावला

    गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने अखेर आज मुंबईसह ठाण्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच पावसाने पुनरागमन केल्याने चाकरमानी सुखावला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.