Maharashtra News Live Marathi Batmya | शरद पवार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार

| Updated on: Aug 22, 2023 | 11:04 PM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra News Live Marathi Batmya | शरद पवार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 :  महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला इथे एका क्लिकवर पाहायला मिळणार आहेत. नाशिक पदवीधरचे आमदार ‌सत्यजित तांबे यांनी डिजेच्या तालावर मनसोक्त डान्स केल्याचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. परभणीत एसटी मडामंडळाला 5 महिन्यात 7 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. मंत्री विजयकुमार गावीत हे त्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळं अडचणीत आले आहेत. विरोधकांनी त्यांच्या जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Aug 2023 06:24 PM (IST)

    शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. शरद पवार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची घेणार भेट घेणार आहेत. ते टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट देणार आहेत. शरद पवारांचा 24 ऑगस्टला पुरंदर तालुक्याचा दौरा असणार आहे.  शरद पवार या दौऱ्यादरम्यान टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

  • 22 Aug 2023 05:44 PM (IST)

    विक्रोळीत पालिकेच्या शाळेतील चार विद्यार्थिनींवर पिटी शिक्षकाचा लैंगिक अत्याचार

    मुंबई | विक्रोळी पूर्व टागोरनगर मनपा शाळेतील 4 विद्यार्थिनींवर पिटी शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली असून या घटनेमुळे विक्रोळी पोलीस स्टेशन समोर सर्वच राजकीय पक्षांनी धाव घेतली. या घटनेचा जाहीर निषेध करत आरोपी शिक्षकावर कडक कारवाईची मागणी देखील करण्यात आली. याच दरम्यान शिंदे गटाचे पदाधिकारी हे या घटनेसंदर्भात विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये आले असता याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष चेतन अहिरे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे सरकारचा जाहीर निषेध करण्यास सुरुवात केली. यामुळे विक्रोळी पोलिस स्टेशन समोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

  • 22 Aug 2023 04:24 PM (IST)

    Rain News : पावसाअभावी खरीप धोक्यात, राज्य सरकार काय घेणार निर्णय

    राज्यातील अनेक भागाता पावसाने डोळे वटारले आहेत. या भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पीक धोक्यात आले आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. याप्रकरणी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. खरीप हंगामाबाबत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होऊ शकते. सह्याद्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात याविषयी बैठक सुरु आहे.

  • 22 Aug 2023 04:09 PM (IST)

    Onion News : नाफेडकडून कांदा खरेदी सुरु

    नाफेडने कांद्या खरेदी सुरु केली आहे. पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्याची खरेदी सुरु झाली आहे. खरेदीची माहिती घेण्यासाठी भारती पवार या नाशिकमधील कांदा खरेदी केंद्रावर पोहचल्या. त्यांनी यासंबंधीची पाहणी केली आणि माहिती घेतली.

  • 22 Aug 2023 04:01 PM (IST)

    Chandrayaan-3 : चांद्रयान-3 नियोजीत वेळेतच चंद्रावर उतरणार

    मिशन चंद्रयान-3 नियोजीत वेळेतच चंद्रावर उतरणार असल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्त्रोने दिली आहे. चंद्रयानाचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. उद्या संध्याकाळी नियोजीत वेळेत चंद्रावर चंद्रयान लँडिंग करणार आहे. अनेक सेलेब्रिट, दिग्गज हे प्रक्षेपण पाहणार आहेत.

  • 22 Aug 2023 03:33 PM (IST)

    Chandrayaan 3 live : चांद्रयान-3 मिशनचे चार हिरो माहित आहेत का?

    चांद्रयान-3 मिशनमध्ये चौघांची महत्त्वाची भूमिका आहे, त्यांच्याबद्दल जाणून घ्या. वाचा सविस्तर….

  • 22 Aug 2023 03:32 PM (IST)

    Chandrayaan 3 live : चांद्रयान-3 मिशनचे चार हिरो माहित आहेत का?

    चांद्रयान-3 मिशनमध्ये चौघांची महत्त्वाची भूमिका आहे, त्यांच्याबद्दल जाणून घ्या. वाचा सविस्तर….

  • 22 Aug 2023 11:59 AM (IST)

    Pune News : अमेरिकेतून पुणे पोलिसांना धमकीचा फोन

    पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अमेरिकेतून धमकीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत राहणारा एक व्यक्ती अतिरेकी असल्याचे सांगून फोन कट केला. याबाबतची माहिती पुणे नियंत्रण कक्षाने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाने संबधित फोन करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन तपासले असता ते अमेरिकेचे निघाले. मात्र घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिस तपास करत आहेत. मात्र हा एक खोडसाळपणा केल्याचा पोलिसांना संशय आहे.

  • 22 Aug 2023 11:53 AM (IST)

    Dhananjay munde | धनंजय मुंडे पियुष गोयल यांच्या भेटीनंतर काय म्हणाले?

    “आज 12 वाजल्यापासून 2410 रुपयांनी कांदा खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. निर्णय घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभार. देवेंद्र फडणवीस यांनी जपान मधून कॉल केला. कांदा उत्पादक शेतकऱ्याला कुठलीही अडचण येणार नाही. 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार आहे. निर्यात दराचा पुनर्विचार करण्याबाबत विचार करू म्हणालेत” असं धनंजय मुंडे पियुष गोयल यांच्या भेटीनंतर म्हणालेत.

  • 22 Aug 2023 11:41 AM (IST)

    Deepali Sayed | दिपाली सय्यद यांची मनसे विरोधात पोलीस तक्रार

    अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद आणि मनसेमध्ये सध्या शाब्दीक लढाई सुरु आहे. मनसेने खड्डयांचा प्रश्न हाती घेतल्यानंतर दिपाली सय्यद यांनी मनसेवर टीका केली होती. मनसेने त्यांना लगेच प्रत्युत्तर दिलं. आता दिपाली सय्यद यांनी मनसे विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

  • 22 Aug 2023 11:31 AM (IST)

    Devendra Fadnavis : कांदा विषयावरुन राष्ट्रवादी-भाजपामध्ये श्रेयवादाच राजकारण ?

    थेट जपानमधून देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा आणि पियुष गोयल यांना फोन केला. कांदा निर्यात शुल्कबाबत दोन्ही मंत्र्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केली. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे गोयल यांची भेट घेण्यापूर्वीच फडणवीस यांची ट्विट करून माहिती दिली. सरकारमध्ये पुन्हा राजकारण ? श्रेय घेण्याचा भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न ?

  • 22 Aug 2023 11:06 AM (IST)

    आजपासूनच कांदा खरेदी सुरू करणार – पियुष गोयल

    केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे, अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली. 2410 प्रतिक्विंटल दराने ही खरेदी करण्यात येईल, असे ते म्हणाले.

  • 22 Aug 2023 10:59 AM (IST)

    खासदार नवनीत राणा यांना मिळाली जीवे मारण्याची धमकी

    खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून विठ्ठल नावाची व्यक्ती त्यांना धमकीचे फोन करत आहे. याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

  • 22 Aug 2023 10:47 AM (IST)

    कांदा निर्यात शुल्क वाढीच्या प्रश्नावर अमित शाहांशी संपर्क साधला – देवेंद्र फडणवीस

    कांदा निर्यात शुल्क वाढीच्या प्रश्नावर अमित शाहांशी संपर्क साधला अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली आहे.

    केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

  • 22 Aug 2023 10:38 AM (IST)

    कांदा निर्यात शुल्क वाढीला विरोध, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन

    कांदा निर्यात शुल्क वाढीवरून शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला असून पुण्याजवळील आळेफाट्यावर रास्तारोको करण्यासाठी शेतकरी एकवटले आहे.

    कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, हमीभाव द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. निर्यात शुल्कवाढ मागे घेईपर्यंत, राज्यात येणाऱ्या प्रत्येकाला कांद्याची माळ घालणार, असेही ते म्हणाले.

    शेतकऱ्यांचा पोटावर पाय दिला जात आहे अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली. तसेच महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राचं हित पहावं, असे ते म्हणाले.

  • 22 Aug 2023 10:30 AM (IST)

    धनंजय मुंडे पियुष गोयल यांची घेणार भेट

    धनंजय मुंडे हे आज पियुष यांची भेट घेऊन त्यांच्याशी कांद्याप्रश्नी चर्चा करणार आहेत. कांदा निर्यात शुल्क वाढीवरून थोड्याच वेळात दिल्लीत होणार बैठक.

  • 22 Aug 2023 10:27 AM (IST)

    सल्ले द्यायचे असतील तर शिक्षण, नोकरी संदर्भात द्या – रोहित पवारांची विजयकुमार गावित यांच्यावर टीका

    ऐश्वर्या रायचे डोळे मासे खाल्ल्यामुळं सुंदर आहेत, असे वक्तव्य केल्याने अडचणीत सापडलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी टीका केली आहे.

    मा. गावित साहेब… प्रेमात पडणं ही नाही तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय ही आजच्या युवा वर्गाची प्राथमिकता आहे. त्यामुळे सल्ले द्यायचे असतील तर शिक्षण, नोकरी संदर्भात द्या.

    आणि हो… डोळे कसे दिसतात यापेक्षा त्या डोळ्यातलं पाणी बघणं, चिकण्या स्कीनऐवजी नोकरी मिळत नसल्याने टेन्शनमुळं तारुण्यातच युवांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या बघणं आणि काबाडकष्ट करणाऱ्या त्यांच्या आईवडलांच्या हातावरच्या भेगा पाहणं, हे तुमचं काम आहे ! कारण तुम्ही मंत्री आहात ! अशा शब्दांत रोहित पवारांनी गावित यांना टोला लगावला आहे.

  • 22 Aug 2023 10:21 AM (IST)

    छगन भुजबळ यांना मिळाली जीवे मारण्याची धमकी

    ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांना धमकीचा कॉल आला आहेत. भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांकडूनन तपास सुरू करण्यात आला आहे.

  • 22 Aug 2023 09:57 AM (IST)

    दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार सभा घेणार

    दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. सप्टेंबर महिन्यात शरद पवार आंबेगाव मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत.  वळसे पाटलांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पवार गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंबेगावमधील राष्ट्रवादी पदाधिकऱ्यांनी पवारांची भेट घेऊन सभेची तारीख मागितली आहे.

  • 22 Aug 2023 09:45 AM (IST)

    अहमदनगरमधील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीत कांदा लिलाव आज बंद

    अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीत आज कांदा लिलाव बंद आहे.  शेतक-यांच्या आंदोलनाला व्यापा-यांचाही पाठींबा आहे. केंद्र सरकारने निर्यातीवर 40 % कर लावल्याने कांद्याचे भाव गडगडले. त्यामुळे अहमदनगर  जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत. कर रद्द केला जावा मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. आज बाजार समितीत कांदा लिलाव बंद आहे.

  • 22 Aug 2023 09:30 AM (IST)

    नाशिकमध्ये कांदा प्रश्नी शेतकरी आक्रमक

    नाशिकच्या निफाडमधील रुई गावात शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत.  रस्त्यावर कांदा फेकून यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला.  केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याचा यावेळी विरोध केला गेला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  • 22 Aug 2023 09:19 AM (IST)

    दिलीप वळसे पाटलांचे समर्थक शरद पवारांच्या भेटीला

    दिलीप वळसे पाटलांच्या समर्थकांनी घेतली घेतली शरद पवारांची भेट घेतली. शिरूर-आंबेगाव मतदारसंघाच्या 39 गावातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांची भेट घेतली आहे. बारामतील ‘गोविंदबाग’ या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट घेतली. वळसे पाटलांचे समर्थक देवदत्त निकम यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शिरूर-आंबेगाव मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा झाली.

  • 22 Aug 2023 08:59 AM (IST)

    Maharashtra News : कांदा निर्यातीवर शुल्क अहमनगरमध्ये आंदोलन

    केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात रास्ता रोको आंदोलन अहमदनगर जिल्ह्यात करण्यात आले. पारनेर तालुक्यातील निघोज येथे शेतकरी आणि शरद पवार गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

  • 22 Aug 2023 08:48 AM (IST)

    Maharashtra News : पीएडची शोध प्रबंधाची कॉपी

    शिवाजी विद्यापीठातील पीएचडीचे शोधनिबंध कॉपी-पेस्ट असल्याचा आरोप कोल्हापुरातील डॉ. राजवर्धन कापशीकर यांनी केला आहे. यासंदर्भात डॉ. कापशीकर यांनी पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले.

  • 22 Aug 2023 08:40 AM (IST)

    Maharashtra News : सलग दुसऱ्या दिवशी बाजार समित्या बंद

    सलग दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहेत. कांदा निर्यात शुल्क वाढी संदर्भात आज पुन्हा आंदोलन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचा कांदा चाळीत कांदा खराब होण्याची भीती आहे.

  • 22 Aug 2023 08:30 AM (IST)

    Maharashtra News : पावसासाठी अजून दोन दिवस प्रतिक्षा

    राज्यात पावसाने चिंता वाढवली आहे. राज्यात अजून दोन दिवस पाऊस नाही, असे पुणे हवामान विभागाने म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.

  • 22 Aug 2023 08:14 AM (IST)

    अजितदादांना भाजपच्या नेत्यांनी समज देणं गरजेचं, शिंदे गटात चर्चा

    ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट विचारणा केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. अजितदादांना भाजपच्या नेत्यांनी समज देणं गरजेचं असल्याची शिंदे गटात चर्चा आहे.

  • 22 Aug 2023 08:04 AM (IST)

    दहीहंडीला खेळाचा दर्जा नियम व तांत्रिक बाबींमुळे अशक्य ?

    दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी केली होती. मात्र नियम व तांत्रिक बाबींमुळे हे अशक्य असल्याने प्रशासनाने विरोध केल्याची माहिती मिळाली आहे. दहीहंडीचा प्रसार होऊन आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत लोकप्रिय व्हावा, यासाठी त्याला खेळाचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती.

  • 22 Aug 2023 07:59 AM (IST)

    आळेफाटा येथे आज शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

    आळेफाटा येथे आज शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन, कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगेसचे जुन्नरचे तटस्थ आमदार अतुल बेनके आंदोलनात सहभागी होणार आहेत. पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील शेतकरी रास्ता रोको मध्ये सहभागी होणार आहेत. ९ वाजता आळेफाटा येथील मुख्य चौकात आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

  • 22 Aug 2023 07:56 AM (IST)

    कोल्हापुरातील सुळकुड पाणीपुरवठा योजनेचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

    कोल्हापुरातील सुळकुड पाणीपुरवठा योजनेचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, सुळकुड पाणी योजनेसाठी 11 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत. बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इचलकरंजी आणि कागल मधील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Published On - Aug 22,2023 7:49 AM

Follow us
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.