मुंबई | 29 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण पाचव्या दिवशी सुरु आहे. मराठा आरक्षणावर अजून कोणताही तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी असल्याचे म्हटले आहे. आम्ही मराठा आरक्षण देण्यास ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. इस्रायल आणि हमास यांचे युद्ध सुरु आहे. इस्त्रायलने गाजावर बॉम्ब हल्ले सुरुच ठेवले आहेत. देशभरात अनेक ठिकाणी चंद्रग्रहण दिसले. बोगस कर्ज घेऊन 113 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
छत्रपती संभाजी नगर : येथील एका ड्रग्स कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 160 कोटी रुपयांचे मेफेड्रम जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी कंपनी मालकासह मॅनेजरलाही अटक केलीय. काही दिवसापूर्वी देखील पोलिसांनी 500 कोटी रुपये किमतीचे ड्रग्स जप्त केले होते. संभाजी नगरमध्ये एका आठवड्यात डीआरआयने केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
संगमनेर : शहरामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरोध करण्यात आला. मात्र, तालुक्यातील वडगावपान येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हा गावात पुढारी, नेते यांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही विखे यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेच्या भुमिपूजनासह अनेक विकास कामांचे उदघाटन केले. विशेष म्हणजे माजी महसूलमंत्री आणि विखे पाटील यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांचा हा तालुका आहे.
पुणे मांजरी येथील बेल्हेकर वस्ती येथे गॅस सिलेंडर गोडाऊनमध्ये सहा सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडलीये. अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे आनंदाची बाब म्हणजे यामध्ये कोणीही जखमी झाले नाहीये.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा शब्द दिला तो पाळावा. मराठा समाजाची अवस्था दयनीय आहे, त्यामुळे त्या समाजाला आरक्षण दिले पाहिजे. जरांगे पाटील जीवाची बाजी लावून उपोषण करत आहेत. सरकारने आरक्षणाचा निर्णय तात्काळ घेऊन शब्द पाळावा, असे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाला इंदोरीकर महाराज यांनी पाठिंबा दिलाय. उद्यापासून पुढचे 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इंदोरीकर महाराज पाठीशी.
मराठा आरक्षणाला माझा पाठींबा असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. चार पाच कार्यकर्त्यांना शिकवून पाठवल होत. त्यांनी विरोधात घोषणाबाजी केली. काही लोक समर्थकांना पुढे करून राजकारण करतायत हे दुर्देव आहे, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले,
येवल्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. एसटी बसवरील मंत्र्यांच्या फोटोला काळे फासल्याची घटन. नाशिक-छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गांवरील हा प्रकार आहे. येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे ही घटना घडलीये.
कोचीच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटाबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
#WATCH जम्मू-कश्मीर: एक पुलिस अधिकारी को गोली लगने के बाद श्रीनगर के ईदगाह में सुरक्षा कड़ी कर दी गई। उन्हें एक अस्पताल पहुंचाया गया है। pic.twitter.com/bI3bRwbnAW
— ANI_HindiNews (@AHindinews) October 29, 2023
मराठा समाजाच्या आंदोलकांनी जरांगेंना पाणी पिण्याची विनंती केली. यावेळी जरांगे पाटलांनी पाणी पिणार पण मागे हटणार नाही असं सांगितलं. दरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे.
केरळमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यूपी एटीएसलाही सतर्क करण्यात आले आहे. एटीएसने गेल्या काही दिवसांपासून मिळालेल्या नवीन इनपुटची पुन्हा तपासणी सुरू केली आहे. इस्रायल-हमास युद्धाशी संबंधित प्रत्येक कार्यक्रमावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महसूलमंत्री विखे पाटलांसमोर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी परत जा..परत जा…असं सांगण्यात आलं. पोलिसांनी या संदर्भात 7 ते 8 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारने सोमवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावली आहे. ही बैठक 10 वाजता सुरू होईल. यानंतर दुपारी एक वाजता समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याविषयीचे निवेदन राज्यपाल रमेश बैस यांना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतराव पाटील व राष्ट्रीय सरचिटणीस माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी… pic.twitter.com/489MgXKkbM
— NCP (@NCPspeaks) October 29, 2023
मराठा आरक्षणावरुन खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. मराठा आंदोलनकांच्या मागणीनंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला. हेमंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे हिंगोलीचे खासदार आहे. मराठा आंदोलकांनी त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला.
नाशिकच्या गिरणा नदीपात्रात ड्रग्स फेकल्याची कबुली ललित पाटील यांच्या ड्रायव्हरने दिली आहे. त्यामुळे या नदीत पुन्हा ड्रग्ज मोहिम राबविण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही शोध मोहिम राबविण्यात येत आहे.
दौंड दौऱ्याला विरोध झाल्यानंतर संजय राऊत यांचा नियोजीत दौरा रद्द करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले. संजय राऊत हे थांबलेल्या हॉटेलबाहेर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती. राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलक आंदोलन करत आहे.
अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नेरुळ मधील कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन भेट घेतली
पण माझा नाईलाज आहे. समाजाने खूप वेदना सहन केल्या. जातीवर खूप अन्याय झाला. आता होऊ द्यायचं नाही. त्यामुळे ही लढाई आहे. माझा हेकेखोरपणा नाही. आडमुठेपणाही नाही. पण जातीवर खूप अन्याय झाला. मला नाही थांबता येणार.
समाजाचं लेकरू आणि नंतर मी माझ्या कुटुंबाचा. आगोदर नाही. माझं कुटुंब कधीही येत नसतं. आता कुटुंब यायला लागलं. कुटुंबाने येऊ नये. मी पहिला समाजाचा आहे. जगलो तर तुमचा. मेलो तर समाजाचा. कुटुंबाने यायचं नाही.
आंदोलनाचा दुसरा टप्पा शांततेत सुरु झालाय. आंदोलनाला बसल्यावर मी पहिल्यांदा समाजाला मानतो. मागे हटणार नाही, लेकरांवरील अन्याय सहन करणार नाही – जरांगे पाटील
राज्यात होणाऱ्या आत्महत्या थांबवल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. पण, सरकारला शिंदेचे राजकीय प्राण वाचवण्यात रस आहे. आम्ही स्वतः केंद्र सरकार सोबत चर्चा करणार आहे. हे आंदोलन आता थांबायला हवं. केंद्र सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यावा. वोरोधी पक्षाकडून काही सहकार्य हवं असल्यास आम्ही देण्यास तयार आहोत असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
चिपळूण : देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या अधिकृत ट्विटरवर अपलोड होऊन वायरल झालेला व्हिडिओ हा भाजपकडून जाणीवपूर्वक केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. ही भाजपची कूटनीती आहे. एकनाथ शिंदे यांचा वापर आता संपलेला आहे. त्यांची विसर्जन करण्याची वेळ आलीय अशी टीकाही त्यांनी केली.
पुणे : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा युवक आत्महत्या करत आहेत, हे दुर्दैवी आहे. या घटनांमुळे मी व्यथित झालो आहे. आरक्षण मिळेपर्यंत माझ्या देहाला अग्नी देवू नका असे एका तरुणाने लिहिले. काल एका युवकाने मराठा आरक्षणाच्या घोषणा देत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून जीवन संपवले. मराठा समाज बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत. संघर्ष करून एखादी गोष्ट मिळवणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे आपले जीवन संपवू नका.
कल्याण : महाविजय 2024 संकल्प दौरा दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कल्याणमध्ये हजेरी लावली. डोंबिवलीच्या इंद्रा चौक ते गणेश मंदिरपर्यंत ढोल ताशा वाजवत रॅली काढून त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. चंद्रशेखर बावनकुळे परिसरातील फेरीवाले दुकानदार आणि नागरिकांना लोकसभेत पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे असे प्रश्न करत लोकांचे मत जाणून घेत आहेत.
भाजपाने कल्याण लोकसभा मतदार संघात ‘महा विजय 2024 संकल्प दौरा केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डोंबिवलीच्या इंद्रा चौक ते गणेश मंदिर पर्यंत ढोलताशा वाजवत रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले आहे.
सोलापूरातील तिऱ्हे गावात सरकारच्या विरोधात अनोखे तिरडी आंदोलन करीत निषेध केला गेला. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ त्यांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्यात आली.
मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून माझी भूमिका मांडत आहे.नाही असं मनोज जरांगे यांचे उपोषण मुख्यमंत्री गेल्यानंतर उपोषण मागे घेतलं, त्यांनी दिलेल्या 40 दिवसात सरकारने काहीच काम केलं जात नसल्याचं भासवलं जातं, मात्र या 40 दिवसात सरकारने काम केलं. मराठा आरक्षणासाठी समिती गठीत केली, त्यानं लागणारी सर्व यंत्रणा दिल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.
शेकडो वाहनांच्या ताफ्यासह आमदार बच्चू कडू लखनऊवरून अयोध्या कडे रवाना झाले आहेत. मेरा देश मेरा खून या अभियानाचा आयोजित दुसरा टप्पा. शेतकऱ्यांच्या आर्थिक आरक्षणासाठी बच्चू कडूंची लढाई, लखनऊ-अयोध्या महामार्गावर बच्चू कडू यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं आहे. अयोध्येत आज बच्चू कडू यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पुण्यामधील दौंड येथे आहेत. या ठिकाणी मराठा समाजाच्या तरूणांनी जोरदार घोषणाबाजी केली. राऊत पत्रकार परिषदा घेतात पण त्याना आमच्या आंदोलनस्थळी भेट देता आली नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या इथे थांबायचं नाही, असं तरूण कार्यकर्ते म्हणाले.
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता राज्यभर साखळी उपोषण सुरू होते. आज त्याचे साखळी उपोषणात रूपांतर करण्यात येणार आहे. तसेच अंतरवाली सराटी मधील गावकरीही आता आमरण उपोषण करणार आहेत, मराठा आरक्षण द्यावे आणि आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे परत घ्यावे अशी मागणी अंतरवाली सराटी मधील नागरिक करत आहेत.
नाशिक : नाशिकमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलला आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी होणारा नियोजित कार्यक्षम आमदार पुरस्कार कार्यक्रम सकल मराठा समाजाचे उपोषणकर्ते यांनी आवाहन केल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाकडून आयोजित कार्यक्रमास मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार होते, अशी माहिती चंद्रकांत बनकर यांनी दिली.
गोंदिया : जिल्ह्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असल्याने लोकांची बाजारात गरम कपडे घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर जिल्ह्यात मागील 25 वर्षांपासून तिबेटीन लोक गरम कपडे विकत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर नाशिकमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. सकल मराठा समाजातील साखळी उपोषणकर्ते नाना बच्छाव यांचे आमरण उपोषण सुरू आहे. जिल्ह्यातील ज्या गावात नेत्यांना गावबंदी आहे, त्या गावात नेत्यांनी कार्यक्रम न घेण्याचे आवाहन करण्यात आलेय. जर काही विपरीत घडल्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहणार असल्याची सकल मराठा समाजाची भूमिका आहे.
नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत दाखल झालेत, उद्या सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी होणार असल्याने आज नार्वेकर सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला लवकरच न्याय मिळेल, मी कायदेशीर सल्ला घेणार आहे, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी करमाड- जालना महामार्गावर सकल मराठा समाजाचा रास्ता रोको सुरू आहे. करमाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन सुरू असून आंदोलनामध्ये शेकडो सकल मराठा सहभागी महिलांचाही सहभाग आहे.
नवी मुंबई : कोपरी गाव येथे मुलाने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मध्यरात्री मुलगा आणि आई यांच्यात कामावर जाण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. या भांडणादरम्यान रागाच्या भरात मुलाने घरात आईचा गळा आवळून हत्या केली आहे.
महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे तेथे आता आमरण उपोषण करा आणि स्थानिक पोलिसांना कळवा म्हणजे सरकारला पण कळले पाहिजे – मनोज जरांगे
आपण आरक्षण घेऊ. कोणीही आत्महत्या करू नका. शांततेत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. आपली एकजूट फुटू देऊ नका. फक्त एकजूट राहा, ंमनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन
मालेगाव : मालेगावात टेहरेसह परिसरातील नागरिकांनी महामार्ग रोखला आहे. वारंवार अपघात होत असल्याने टेहरे, मुंगसे, पाटणेसह मुंबई आग्रा महामार्गावर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सोमा कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करून उड्डाण पुल करण्याची ग्रामस्थांनी मागणी केलीये.
जरांगेंच्या आवाहनानंतर आजपासून गावागावात आमरण उपोषण सुरु झालं आहे. साखळी उपोषणाचं आजपासून आमरण उपोषणात रुपांतर झालं आहे. जरांगे यांच्या आमरण उपोषणचा आजचा पाचवा दिवस आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्या सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी आहे. आज नार्वेकर सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला लवकरच न्याय मिळेल मी कायदेशीर सल्ला घेणार आहे… असं वक्तव्य नार्वेकर यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी तोडगा आहे. पण जरांगे पाटील यांच्यासाठी नाही. हे या राज्याचं दुर्दैव आहे… असं देखील संजय राऊत म्हणाले… संजय राऊत सध्या दौंड याठिकाणी बोलत आहेत.
२०२४ नंतर राज्यात आणि देशात बदल होणार असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत यांना सुरक्षा आहे. सरकार भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे… सत्तेत बसलेल्या घोटाळेबाजांना २०२४ नंतर तुरुंगात टाकणार… असं देखील संजय राऊत म्हणाले…
सोलापुरातील कोंडीगावामध्ये मराठा समाजातर्फे मुंडन आंदोलन सुरु झालं आहे. समस्त मराठा समाजाच्या वतीने हे मुंडन आंदोलन होत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. आज पन्नासहून अधिक मराठा बांधव मुंडन करत निषेध व्यक्त करत आहेत. सरकारने आमचा अंत पाहू नये अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू… असा इशारा मराठा समाजाने सरकारला दिला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कल्याण दौऱ्यावर असताना त्यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. जरांगे यांच्या आव्हानानंतर अनेक मराठा कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या अनुशंगाने मनुष्यबळासाठी नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत दृष्टीपथात असलेल्या महापालिकेची निवडणूक लोकसभेनंतरच होईल.
देवेंद्र फडणवीस यांनी टिव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत मराठा आरक्षणाची भुमीका स्पष्ट केली. वर्षभरात सरकारी नोकऱ्या जवळपास 30 हजार निघतात त्यात आरक्षणाच्या 10 टक्के नोकऱ्या म्हणजेच 3 हजार नोकऱ्या मराठा समाजासाठी राहतील. इतक्या कमी नोकऱ्यांनी मराठा समाजाचं खरचं भलं होईल का? असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांनी मांडलं.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर वकील सदावर्ते हे त्यांचा माणुस आहे अशी टिका वारंवार होते. यावर त्यांनी टिव्ही 9 ला दिलेल्या खास मुलाखतीत खुलासा केला. माझी आणि सदावर्ते यांची भेट आतापर्यंत भक्त दोनदाच झाली आहे. याआधी सदावर्तेंनी माझ्यावरही अनेक आरोप केले असं फडणवीस म्हणाले.
मुंबईत पश्चिम रेल्वे ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत आहे. नवीन रेल्वेरूळ जोडणीचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे चाकरमान्याना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्यासाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सांगली जिल्ह्यातील ९४ सार्वत्रिक ग्रामपंचायत आणि 3 पोट ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण 664 जागावर 1513 उमेदवार आणि सरपंच पदासाठी 220 उमेदवार उमेदवार रिंगणात आहेत. सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ही माहिती दिली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याचा ते दौरा करत आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यासाठी काँग्रेस पक्षाकडून तयारी करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पटोले यांचा दोन सभा घेणार आहेत. आगामी निवडणुका पाहता काँग्रेस पक्षाच्या हा दौरा महत्त्वाच्या मानला जात आहे.
आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते आजपासून दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. बच्चू कडू हे अयोध्या दौऱ्यासाठी नागपुरातून रवाना झाले आहेत. बच्चू कडू प्रभू रामाचे दर्शन घेणार आहेत. प्रभू रामाला कापूस, तूर ,सोयाबीनचा प्रसाद बच्चू कडू चढवणार आहेत.
नाशिकमध्ये गेल्या २६ दिवसांत नाशिक शहरात डेंग्यूचे १९३ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील नाशिकरोड, सातपूर विभागात सर्वाधिक रुग्ण आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या ७१५ वर पोहोचली आहे. मलेरिया विभागाकडून डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळलेल्या १०१२ मिळकत धारक, संस्था कार्यालयांना नोटीस देण्यात आली आहे.
प्रदीप कुरुलकर यांच्या जामीन अर्जावरील दोन्ही पक्षाचा युक्तिवाद अखेर संपला आहे. आता पुढील तारखेला प्रदीप कुरुलकर यांच्या जामीन अर्जावर निकाल येणार आहे. प्रदीप कुरुलकर यांना जामीन देऊ नये, असी मागणी सरकारी पक्षाकडून कोर्टात करण्यात आली आहे.
नाशिक पुणे रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी २५० कोटी रुपये लागणार आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी याबाबतची माहिती शासनाला कळवली आहे. २३२ किलोमीटरचा हा सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग आहे.
मुंबईतील चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ मद्यधुंद महिला चालकाने दुचाकी वाहनास धडक दिली. या धडकेत तीन जण जखमी झाले. हर्ष जैस्वाल, समृद्धी जैस्वाल, दिपू जैस्वाल अशी त्यांची नावे आहेत.
पुण्याचे पालकमंत्री पद गेल्यानंतर चंद्रकात पाटील सक्रीय झाले आहे. आता चंद्रकांत पाटील प्रभागनिहाय बैठका सुरु केल्या आहे. वाहतूककोंडी, जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिन्यांच्या समस्या इतर प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.
मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकारने काहीच केले नाही असा समज पसरवला जातो. टिकणारे मराठा आरक्षण आम्ही देणार, अधिवेशन घेण्यास आमचा ना नाही आहे, बैठक घ्यायला तयार आहोत, असंही देसाई म्हणाले.