मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : ठाण्यातील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण तापलं. मनसेकडून आरोपींना अटक करण्याची मागणी. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात होत असलेल्या 122 व्या दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांची चकमक, तीन जवान शहीद. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
पुणे :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत बैठक
11 वाजता जे डब्लू मेरीटमध्ये होणार चर्चा
अजित पवारही जे डब्लू मेरीटमध्ये दाखल झाले
पुणे :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला
जे डब्लू मेरीटमध्ये दोघांमध्ये चर्चा
आगामी मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चेची शक्यता
मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री बंद दाराआड चर्चा
पुणे :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे डब्लू मेरीटमध्ये पोहोचले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आधीच हॉटेलमध्ये दाखल
कोथिंबिरीला भाव न मिळाल्याने सोलापुरातील शेतकरी संतप्त झाला. त्याने कोथिंबिरीची 50 कॅरेट रस्त्यावर फेकले. सोलापूर मार्केट यार्डमध्ये हा प्रकार घडला. कोथिंबिरीला भाव मिळत नसल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे : MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने दहा लाखांची खंडणी मागितली. पुणे शहरातील कोरेगावपार्क भागात हा प्रकार घडला. पुणे पोलिसांनी तपास करत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस भागातील वेळापूर येथून श्रीनाथ शेडगे याला ताब्यात घेतले.
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री पुणे दौऱ्यावर येत आहेत. ते केंद्रीय सहकार विभागाच्या पोर्टलचा शुभारंभ करतील. ते अनेक महत्वाच्या बैठकी घेणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकांना महत्व आले आहे.
मुंबई : इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. त्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक होणार आहे. 31 ऑगस्ट रोजी रात्रीपासून या बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. ही बैठक दोन दिवस असेल.
अमरावती : येथे 13 नोव्हेंबर 2021 रोजी दंगल झाली होती. त्या प्रकरणी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांच्यावर होता. यासह पोलिसांना दुखापत केल्याचाही आरोप अनिल बोंडे यांच्यावर होता. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने अनिल बोंडे यांच्यासह २९ जणांची निर्दोष सुटका केली.
मुंबई : मुंबई काँग्रेसच्या वतीने पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. शहरातील रस्ते, खड्डे, कचरा, आरोग्य या समस्यांवर उपाययोजना करा, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना अडवलं.
पुणे : एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने एका व्यवसायिकाच्या गाडीवर १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पोलिसांनी शोध घेतला असता तो सापडला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तोशाखाना प्रकरणात दोषी आढळल्यामुळे इम्रान खान पुढची पाच वर्षे निवडणूक लढवू शकत नाहीत
31 तारखेला उद्धव ठाकरे यांच्याकडून डिनरचं आयोजन करण्यात आल आहे. ‘इंडिया’ च्या बैठकीला किमान पाच राज्यांचे मुख्यमंत्री येतील. बैठकीसाठी आम्हाला सरकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे असेही संजय राऊत म्हणाले.
31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ‘इंडिया’ची बैठक होणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
मुंबईतील बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे आहे. पाटणा आणि बंगळुरूप्रमाणे मुंबईतील बैठकही यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
थोड्याच वेळाच महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे.
उद्धव ठाकरेंचे दोन मोठे शिलेदार अडचणीत सापडले आहेत. कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तर ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते, माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. दोन्ही महत्वाचे शिलेदार अडकल्यामुळे ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे चित्र दिसतंय. आज बैठक झाल्यावर त्यांची दिशा सुद्धा आम्हाला कळेल. मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला असेल तर ही त्यांची अडचण आहे. माझ्यासारख्याने हे भाष्य करणे योग्य नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.
लासूर येथे पकडलेल्या युरिया विक्री दुकानाविरोधात कृषी विभागाकडून पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला जाणार. या प्रकरणाची चौकशी सुरूंय. नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची टीव्ही 9 मराठीला दिली.
हिंदू समाज म्हणून आम्ही उभे आहोत. कोणतीही पदे लागली असली तरी मी आमदार, खासदार म्हणून नाही, हिंदू समाज म्हणून बोलतोय.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वात अंधेरी के/पश्चिम येथील मनपा कार्यालयावर धडक मोर्चा सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले मुंबईतील सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत सोयी सुविधांवर बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
1956 सालापासून वीज चोरीचा धक्कादायक प्रकार समोर. ग्रामपंचायत कार्यालय कडून अनेक वर्षांपासून वीज चोरी, माहिती अधिकारातून माहिती आली समोर. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीचा हा प्रकार. सन 1956 साली निर्माण झाली होती आंधळगाव गावातील ग्रामपंचायत. आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आज पर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर. महावितरण खात्याचे ग्रामपंचायतकडे दुर्लक्ष. वीज चोरी केल्याबद्दल सर्वसामान्य शेतकरी वर्गावर दंडात्मक कारवाई व गुन्हा दाखल.
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आज संध्याकाळी पुणे दौऱ्यावर. उद्या बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार. पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडेल. प्रेक्षागृह परिसरात छावणीचे स्वरूप आलंय. पुण्यातील पंचतारांकित हॉटेल ते पिंपरीतील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह दरम्यान ताफ्याची रंगीत तालीम पार पडली. पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळं अमित शाहांनी या कार्यक्रमासाठी पुण्याची निवड केल्याचं बोललं जातंय. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत
राज्यात युती आणि महाविकास आघाडीनंतर आता तिसरी आघाडी होणार आहे. छोटे पक्ष एकत्र येऊन राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यासाठी राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई, दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्याचा फोन शुक्रवारी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने तपासणी केली. परंतु काही आक्षेपार्ह आढळले नाही. यामुळे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राहुरीत हिंदू जनआक्रोश मोर्च्यास सुरुवात झाली आहे. या मोर्च्यासाठी आमदार नितेश राणे दाखल झाले आहेत. त्यांनीही मोर्चाकऱ्यांसोबत पायी चालण्यास सुरुवात केली आहे.
जयपूर, मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणात मोठा अपडेट समोर आला आहे. आरोपी चेतन सिंह याने टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केल्यानंतर 20 मिनिटांनी दुसऱ्या प्रवाशावर गोळीबार केला होता.
महाविकास आघाडीची शनिवारी बैठक होत आहे. या बैठकीसाठी शरद पवार रवाना झाले आहे. बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी होणार आहे. दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संभाजी भिडेंचे समर्थक जमले आहेत
दुग्धाभिषेक कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली
भिडेंचे समर्थक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत
अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे
भिडे गुरुजींची अवहेलना थांबवावी, या मागणीसाठी शिष्टमंडळ भेटणार आहे
मुंबईतील पूर्व दृतगती महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी
कांजूरमार्ग ते मुलुंड पर्यंत वाहतूक कोंडी
कांजूरमार्ग विभागात बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
तर गाड्यांच्या लांबच लांब रांगा
जवळपास 3 ते 5 किलोमीटर च्या वाहनांच्या रांगा
पुण्यात मेट्रोचं जाळे आणखी विस्तारणार
वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, खडकवासला ते खराडी आणि पौड फाटा ते माणिकबाग असा नव्या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव
प्रकल्प आराखड्यास आणि भूसंपादनासाठी 7 कोटींच्या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी
या मार्गाचा एकूण खर्च 12 हजार 683 कोटी रुपये इतका आहे
सर्वाधिक वाहतूककोंडी असणाऱ्या भागातून मेट्रो गेल्यास पुणेकरांना दिलासा मिळणार
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी…
लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक…
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर ब्लॉक
हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर मरिन लाईन्स ते माहीम दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी चौक इथल्या एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेते, अभिनेत्यांसह चित्रपटसृष्टीतील त्यांचे सहकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यविधी पार पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अभिनेता आमिर खानने देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ‘लगान’ या चित्रपटासाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. देसाई यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतून कोणी मदत का केली नाही, असा प्रश्न यावेळी आमिरला विचारण्यात आला, वाचा सविस्तर..
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह महानगर प्रदेशास होणारा भाजीपाल्याचा पुरवठा गेल्या काही दिवसांपासून रोडावला आहे. यामुळे जवळपास सर्वच भाज्यांचे दर 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. वाशी इथल्या घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात वाढ होताच किरकोळ विक्रेत्यांनी काही काही भाज्या दुप्पट तर काही तिप्पट दराने विकण्यास सुरूवात केली आहे.
पुण्यात ATS ने अटक केलेल्या चारही दहशतवाद्यांची ATS कोठडी आज संपणार आहे. आज दुपारी या चारही दहशतवाद्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. आत्तापर्यंत ATS च्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले असून आज पुन्हा ATS कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये बीएसटी बस कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आज चौथ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरू आहे. दिंडोशीसह मुंबईतील सर्व बस डेपोवर बीएसटी बस कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा परिणाम मुंबईतील दिंडोशी डेपोतही दिसून येत आहे, आज पूर्वीपेक्षा कमी कर्मचारी दिसत आहेत. बीएसटी बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांच्या अडचणीत वाढ झाली असून बीएसटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना तासनतास बसस्थानकावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या पाच पदाधिकाऱ्यांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन देसाई यांनी 2 ऑगस्टला चौक इथल्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. शुक्रवारी नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ईसीएल फायनान्स कंपनी एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्जप्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून नितीन देसाई यांना मानसिक त्रास दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असा आऱोप त्यांनी या तक्रारीत केला आहे, वाचा सविस्तर..
बेरोजगार युवकांना नोकरीसाठी खुशखबर, ११ वर्षांनंतर नाशिक जिल्हा परिषदेत भरती होणार आहे. २० संवर्गातील तब्बल १०३८ पद भरण्यात येणार आहे. आरोग्य विभागात अधिक जागा भरण्यात येणार आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सोलापूरात भिडे समर्थकांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल आमदार विजयकुमार देशमुखांनी सभागृहात त्यांच्याबाजूने आवाज उठवल्याने भीम आर्मी आक्रमक झाली आहे.
उद्या तिन्ही मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गावर मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने बहुतांश जणांचे जीव गेले आहेत. समृद्धी परिसरामध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने फोन करण्यात अडचणी येत आहेत. समृद्धी महामार्गावर नेटवर्क समस्या दूर झाल्यास अपघातस्थळी तात्काळ मदत मिळू शकते.
नाशिकमध्ये पोलिस उपनिरीक्षकांची पासिंग आऊट परेड होणार आहे. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर फडणवीस नागपूरमधील काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्याऐवजी मदतीसाठी विचारणा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेता अमिर खानने व्यक्त केली आहे. नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर आमिर खानने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के पदे भरली जाणार आहेत. तर इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर येत आहे. या दोन दिवसाच्या दौऱ्यात ते भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपच्या मिशन 45 संदर्भात ते भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. यावेळी तीन जवान शहीद झाले आहेत.