मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यावर अजूनही निर्णय नाही. उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या समितीच्या बैठकीत निर्णय होणार. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन बालंबाल बचावले. हत्येच्या कटाचा संशय. उत्तर प्रदेशातील 37 जिल्ह्यातील नगर पालिकांसाठी आज मतदान होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसात बाचाबाची. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
तामिळनाडूहून पुद्दुचेरीला जाणाऱ्या स्टेट रोडवेजच्या बसने ऑटो-रिक्षाला धडक दिली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने कमी होत आहेत. गेल्या 24 तासांत राजधानीत कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग दर 7.07% पर्यंत वाढला आहे.
अनंतनागमधील पडशाई पुलावर दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसने डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाला अटक केली आहे. पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटींगच्या एका व्यक्तीने हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर शास्त्रज्ञ डीआरडीओशी संबंधित माहिती पाकिस्तानला पाठवत होता.
बुलडाणातील 8 वर्षांच्या मुलाकडून 4 तासात कळसुबाई शिखर सर
तनिष्क माधव देशमुख असं मुलाचं नाव
तनिष्क देशमुख याचं सर्वच स्तरातून कौतुक
साईबाबा संस्थानचा पदभार स्वीकारण्यापूर्वी शंकर यांचा दर्शन रांगेतून प्रवास
शिर्डीत आल्यानंतर भाविकांची एजंटाकडून कशी लूट होते
एजंट कसे फसवतात याबाबत सामान्य भाविक बनून घेतली माहिती
दर्शन रांगेत भाविकांना येणाऱ्या विविध अडचणीदेखील जाणून घेतल्या
भाविकांच्या सुकर दर्शनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन
पावसामुळे नागरिकांसह नोकरदारांची उडाली धावपळ
सकाळपासूनच नागरिक हे उकड्यामुळे हैराण होते
दुपारी अचानक ढग दाटून आले आणि अवकाळी पाऊस सुरू झाला
गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण, ऊन सावल्याचा खेळ सुरू
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक
आमदार-खासदार यांच्या मतदार संघातील प्रलंबित विषयावर बैठक
विविध विकासकामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे सचिवांना आदेश
बैठकीत विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित
हल्ल्यात पन्नास जण गंभीर जखमी
नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिरातील घटना
हल्ल्यानंतर वधू-वराकडील नागरिकांची धावपळ
अनेकांनी नाल्याच्या पाण्यात मारली उडी
नातेवाईकांनी पळ काढल्याने अन्नाची नासाडी
बेळगावमध्ये सुरु केला झंझावती प्रचार
पहिल्याच दिवशी काँग्रेसवर साधला निशाणा
मराठीच्या मुद्याला दिली बगल, धार्मिक मुद्यावर खल
शरद पवार यांच्या आवाहनानंतरही राजीनामा
बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी आक्रमक
शरद पवार यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न
80 राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
भारताने कोळसा उत्पादनात आघाडी घेतली
गेल्या पाच वर्षांत कोळसा उत्पादनात 23 टक्के वाढ
उत्पादनात 893.08 दशलक्ष मेट्रीक टन वाढ
जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीला
जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा
शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर झाले होते भावूक
सहकारनगरमध्ये शनिवारी रात्री इलेक्ट्रॅानिक्स दुकानात झालेल्या स्फोटांचा एटीएसने केला तपास सुरू
टीव्हीचा स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झाला होता
मात्र स्फोटांत झालेल नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसचा तपास सुरू
सोमवारी पहाटे तीन वाजता हा स्फोट झाला होता
होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स व आणि मोबाईल शॉपी अशी दुकाने होती. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तु होत्या
याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. एक दुचाकी पुर्ण जळाली होती
भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाले असून यामधे एक इसम दुकानाचा मालक असल्याचे स्थानिकांकडून समजते
सहकारनगरमध्ये इलेक्ट्रॅानिक्स दुकानात सोमवारी पहाटे झाला होता स्फोट
टीव्हीचा स्फोट होऊन 2 जण गंभीर जखमी झाले
स्फोटात झालेलं नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसकडून तपास सुरू
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्याविरोधात दोषारोपपत्र
ईडीने दाखल केले 2000 पानांचं पुरवणी दोषारोपपत्र
एक्साईज पॉलिसी प्रकरणात ईडीने पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले
पटणा हायकोर्टाने तात्काळ प्रभावाने थांबवली प्रक्रिया
डाटा सुरक्षित ठेवण्याचे दिले निर्देश
3 जुलै रोजी होईल पुढील सुनावणी
जातनिहाय जनगणनेवर मोठा निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारं सरकार द्यायचे की टिपू सुलतान की जय म्हणणारं सरकार द्यायचं
हे तुम्हाला ठरवायचं आहे
कर्नाटकात आज अनेक विकास काम झाली मात्र एक पैशाची दलाली कोणाला द्यावी लागली नाही
लॉकडाउनच्या काळात नरेंद्र मोदीच भारतीयांच्या पाठिशी उभे राहिले
मागच्या वेळी भाजपला थोड्या जागा कमी पडल्या तर बाकीच्यांची सर्कस सुरू झाली
आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला
बजरंग दलाने भारत माता की जय म्हटलं म्हणून त्यांना बंदी घालता का?
भारत तुम्हारे तुकडे होंगे हजार असं म्हणणाऱ्या दिल्ली युनिव्हर्सिटीतील लोकांचं राहुल गांधी सांत्वन करतात
इतके हे नालायक लोक आहेत
त्यांना अजूनही मोघलांबद्दल कळवळ आहे, त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे का?
जळगावात सोन्याचे दर प्रति तोळा 63 हजार 500 रुपयांवर
आंतरराष्ट्रीय बाजाराचा मोठा परिणाम
सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
रत्नागिरी दौऱ्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात दाखल
उद्या राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन
उद्या पुण्यातून राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यासाठी रवाना होणार
इंधनाच्या महागाईचे दिवस संपले
पेट्रोल-डिझेलमध्ये लवकरच दोन अंकी कपात
इतकी होणार लिटरमागे बचत
केंद्र सरकार खेळणार इंधन कार्ड, वाचा सविस्तर
गेली 55 वर्षं मी राजकारणात आहे
माणूस म्हणून सगळे जगतात, पण माणूस म्हणून रहायचे कसे?
सुखी कसे राहायचे हे समजले पाहिजे
अमेरिका, ब्रिटनच्या तुलनेत आपले दरडोई उत्पन्न कमी
आपल्या देशात 2 लाखात मानव जगतो
मंगळवेढा परिसरात उद्योग वाढीसाठी क्लस्टरची मागणी आहे
क्लस्टर हे येथील तरुण तरुणीसाठी
येथील लोकांनी स्वतः राज्याचे आणि देशाचे उत्पन्न वाढवून जीडीपी वाढवावा
55 वर्षांपासून मी राजकारणात
अजित पवार सीमी रेषेवर
उद्धव ठाकरे अडीच वर्षात फक्त अडीच तास मंत्रालयात
यंत्रणाचे दबाव ठेवून राजकारण चालत नसतं
शिवसेना संजय राऊतांनी संपवली
राष्ट्रवादी संपवण्याचा प्रयत्न राऊतांचा आहे
संजय राऊतांनी आपला पक्ष बघावा
दुसऱ्यांचं वाकून पाहण्याची संजय राऊतांना सवय
त्यामुळे अजित पवार आणि नाना पटोलेनी झापलं आहे
संजय राऊतांनी इतर पक्षामध्ये लुडबुड करू नये
शरद पवारांचा निर्णय विचारअंती घेतलेला आहे
भाकरी फिरवायची सुरूवात पवारांनी स्वतःपासून केली
आली तर पूर्ण राष्ट्रवादी भाजपासोबत येईल असं वाटतं एखादा गट येईल असं वाटतं नाही
महाविकास आघाडी काँमन मिनिमम प्रोगामवर झाली होती
आमच्या विचारांशी राष्ट्रवादीनं जुळवण घेतलं तर आम्ही स्वागत करू
उद्धव ठाकरेंचा सल्ला पवारांना लागतो की नाही हे बघावे लागेल
उद्धव ठाकरे कधी सरळ बोलले नाही ते टोलाच लगावतात
ज्याच्याकडे जे आहे ते तो देतो
उद्धव ठाकरे यांच्याकडे शिव्याच आहे, त्यामुळे ते तेच देतात
उद्धव ठाकरेंनी हुकूमशहा म्हणावे एवढे त्यांचे मॉरल आहे का?
त्यांचा पक्षच हुकूमशाहीवर चालतो
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संजय राऊत यांचा भोंगा ऐकला तर कळेल की त्यांची वज्रमुठ केव्हाच सुटत चाललीय
अजित पवारांनी स्वत:च स्पष्ट केलंय की मी आयुष्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार
तर मी त्यावर बोलण्याचा प्रश्नच नाही
पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी
पुण्यात नोकर भरतीसाठी जाणाऱ्या एका तरुणाला दहावीचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर
60 हजार रुपये घेऊन देत होता बनावट प्रमाणपत्र
दहावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेट बरोबर मार्कशीट आणि स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट देत होता
संदीप कांबळे असे या आरोपीचे नाव आहे
आरोपी संदीपने अनेक लोकांना पैसे घेऊन फसविल्याचे चौकशीत उघड
राज्यातील 35 तरुणांना फसवल्याचा पोलिसांना संशय
महाराष्ट्र दिनाला पुणे पालिकेतील 2,300 कर्मचारी अनुपस्थित
अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे पालिका आयुक्तांचे आदेश
पुणे पालिकेतील 2, 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
एकुण 2500 अधिकारी आणि कर्माचारी महापालिकेत कार्यरत
प्रकाश आंबेडकरांची 8 मे रोजी पिंपरी चिंचवडमध्ये सभा
पिंपरी चिंचवडमधील भीमसृष्टीवर प्रकाश आंबेडकरांची सभा
वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सभा
600 कोटींचं कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण
येस बँकेचे संस्थापक राणा कपूरांचा जामीन अर्ज फेटाळला
मुंबई उच्च न्यायालयानं राणा कपूरांचा जामीन अर्ज फेटाळला
राणा कपूरांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला
शरद पवार कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी बाहेर
पवार यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
शरद पवार यांनी राजीनामाचा निर्णय मागे घ्यावा, यावर कार्यकर्ते ठाम
उद्या सकाळी पुणे मनसेकडून राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाणार,
ढोल ताश्यांचा गजरात राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा शुभारंभ होणार,
राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याची पुणे मनसेकडून जय्यत तयारी
अचानक आलेल्या पावसाने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची झाली धावपळ
शहरातील पंचवटी, शालिमार, जुने नाशिक भागात पावसाची हजेरी
नगर शहरातील स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरातील घटना
डोक्यात लोखंडी झाऱ्याने मारहाण करून संपवला पत्नीचा जीव… मृतदेह टाकला बाथरूममध्ये
पत्नीला संपवून पतीने स्वतःचं देखील आयुष्य संपवलं
कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल मात्र घटनेचे कारण अस्पष्ट
शिर्डीचा चेहरा मोहरा बदलणार…
52 कोटींचा विकास आराखडा मंजूर…
शिर्डी शहरातील मंदिर परिक्रमामार्गाचे होणार सुशोभीकरण…
मंदिरासमोरील नगर मनमाड महामार्गाच्या दोन्ही बाजूला हजारो झाडे लावली जाणार…
भक्तांना बसण्याच्या व्यवस्थेसह होणार सौंदर्यीकरण…
राज्य सरकारने मंजूर केला विशेष निधी…
विकास आराखडा आज साईचरणी अर्पण केला जाणार…
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील चार वाजता साईमंदिरात अर्पण करणार आराखडा…
पुढच्या एक ते दिड वर्षात बदलणार शिर्डीचा चेहरामोहरा…
मुंबई : बजरंग बली की जय म्हणून मोदी सांगत असतील तर आता काय करणार ?
बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता
जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा – उद्धव ठाकरे
मराठी माणसाने एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे
मुंबई : मी मुख्यमंत्री काय केलं हे जगजाहीर आहे
प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या घरातील एक सदस्य वाटतोय
शरद पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी आत्मचरित्रात उद्धव ठाकरे हे मंत्रालयात गेले नाही हे पटले नाही असं म्हंटलं आहे
एनसीपीत काहीही घडलं तरी महाविकास आघाडीला तडा जाणार नाही
नवी दिल्ली : दोन वर्षाची शिक्षा झाल्यावर खासदारकी रद्द होण्याच्या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
केरळमधील आभा मुरलीधरन नावाच्या महिलेने दाखल केली होती याचिका
याचीकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
तुम्ही कोण आहात ? तुमच सदस्यत्व रद्द झाल आहे का ? सुप्रीम कोर्टाची विचारणा
राहुल गांधी यांच्या बाबत मागणी करणारी याचिका दाखल होती
नवी दिल्ली : पोस्को कायद्या अंतर्गत दाखल खटल्यामध्ये महिला कुस्तीपटूंचे जबाब नोंदवा, मॅजिस्ट्रेट समोर जबाब नोंदवले जावेत
यापुढे या प्रकरणात हायकोर्ट लक्ष घालेल : सर्वोच्च न्यायालय
आत्तापर्यंत खेळाडूंचे जबाब का नोंदवण्यात आले नाही सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
हरीश साळवे यांचा ब्रजभूषण शरण सिंह यांच्या वतीने युक्तीवाद केला
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या खर्चाबाबत आम्ही लक्ष घालणार नाही
आयोग EVM मशीन खरेदीवर जास्त खर्च करत – याचिका
देशात निवडणूक प्रक्रिया मोठी आहे, आयोग कसा खर्च करत हा त्यांचा प्रश्न आहे – सुप्रीम कोर्ट
पुणे : गगन केशव रांहाडगळे असे माजी सहकारमंत्र्याच्या बनावट स्वीय नाव..
आरोपी गगन हा पुण्यातील येरवडा परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध नागरिकाला गंडा घातला आहे.
घरावर असलेल्या एका खाजगी बँकेची कर्जाची कोट्यावधी रुपयांची रक्कम मंत्र्याच्या मार्फत माफ करून देतो अशी थाप मारून तब्बल 59 लाख रुपये उकळले
थेट माजी मंत्र्याच्या नावाने वृद्धाना लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणात येरवडा पोलिसात ३ जणांवर गुन्हा दाखल
जम्मू : 3 जण होते हेलिकॉप्टरमध्ये, 1 जणाचा मृत्यू
अपघातग्रस्त भागात लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू
– बेळगाव येथे प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केलीय.
– मागच्या 2018 च्या निवडणुकीमध्ये थोडेसे कमी पडले होते. मात्र, आता ती उणीव भरून काढू, असेही फडणवीस म्हणाले.
– देशाचा पैसा देशामध्ये परत आणण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं.
– एक काळ असा होता आमचे मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते. एखाद्या कार्यक्रमात ते जायचे त्यावेळी ते फोटोमध्ये कुठे उभे आहेत हेच माहिती होत नसे.
– ते पाठीमागे उभे असायचे.
– रामाच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणारे एकीकडे आणि दुसरीकडे मंदिर वही बनायेंगे सांगत खऱ्या अर्थाने मंदिर बांधणारे मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी दुसरीकडे फडणवीस म्हणाले.
– अमरावती जिल्ह्यात मोठे माध्यम आणि लघु असे एकूण 54 प्रकल्पामध्ये केवळ 34 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
– यामुळे जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.
– नांदेड जिल्ह्यात वातावरणातील बदल झाला असून येथे थंडीत वाढ झाली आहे.
– राज्यसरकारच्या नव्या वाळू धोरणानुसार अमरावतीमध्ये 14 ठिकाणी 99 वाळू डेपो सुरू होणार आहेत.
– कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी बेळगाव येथे गेलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यात आले आहेत.
– महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून हे काळे झेंडे दाखविण्यात आले आहेत.
– शिवसेने खासदार संजय राऊत यांनी प्रचारादरम्यान शिंदे, फडणवीस यांना काळे झेंडे दाखवा असे आवाहन केले होते.
– त्यामुळे प्रचारासाठी गेलेल्या फडणवीस यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले आहेत.
बिहार विधानपरिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.
आज दुपारी 1 वाजता मातोश्री निवासस्थानी ही भेट होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आमदार कपिल पाटील सोबत असणार आहेत.
या भेटींनंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे.
सामनाच्या अग्रलेखातून आग लावायचे काम केले- नितेश राणे
राऊतांची चमडेगिरीमध्ये पिएचडी, नितेश राणेंचा हल्लाबोल
सुप्रिया सुळे आणि अजित दादांमध्ये संजय राऊतांनी आग लावली
संजय राउतांनी काँग्रेसची दलाली सोडावी- देवेंद्र फडणवीस
मराठी भषिकांच्या मागे भाजप उभा आहे- देवेंद्र फडणवीस
शरद पवार यांनी राजिनामा का दिला याची विचारपुस करण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांचे फोन
राहूल गांधी यांनी सुप्रिया सुळेंकडे मांडले मत
अनेक बड्या नेत्यांकडून शरद पवारांची मनधरणी
शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहावे हीच आमची ईच्छा- अनिल देशमुख
आमच्या प्रयत्नांना यश येईल अशी आशा आहे- अनिल देशमुख
राजीनाम्यानंतरही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरूच
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत
कार्यकर्त्यांकडून शरद पवारांची मनधरणी सुरू
तीन बांधकाल व्यावसायीकांच्या निवासस्थानी आयकर विभागाची छापेमारी
आर्थिक अनियमीतते प्रकरणी छापेमारी झाल्याचा अंदाज
गुंतवणूकदारांना मिळाला मोठा परतावा
गेल्या काही दिवसांपासून अप्पर सर्किट
तर काहींनी उसळी घेतल्यानंतर घेतली माघार
आयटी, इलेक्ट्रिक टेक्सटाईलसह या क्षेत्रातील स्टॉक
गुंतवणूकदार काही दिवसांतच मालामाल, वाचा सविस्तर
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात जात नसायचे या मुद्द्यावर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
शरद पवार यांच्या पुस्तकावर उद्धव ठाकरे लवकरच प्रतिक्रीया देतील – संजय राऊत
– अध्यक्ष म्हणून शरद पवारांचच नाव
– अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, कोणाच्याही नावाची चर्चा नाही
– 7 ते 8 लोकांच्या समितीची उद्या बैठक होईल
अध्यक्षपद निवड समितीची उद्या बैठक होणार
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता
लोक माझे सांगाती या पुस्तकात उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीबाबत करण्यात आला होता उल्लेख
पवारांकडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका
त्यावर ठाकरे योग्य वेळी उत्तर देतील, संजय राऊत यांनी केले स्पष्ट
उद्धव ठाकरे नियमितपणे मंत्रालयात जात होते
– गेल्या तीन चार दिवसांतल्या सततच्या पावसामुळे कच्च्या विटांची झाली माती
– कच्च्या विटांची पावसामुळे माती झाल्याने २५ लाख रुपयांचे नुकसान
– नागपूरातील पुनापूर, पारडी भागात ५० ते ६० वीटभट्ट्या
– वीटभट्ट्यांवर १५० मजूर काम करतात, सततच्या पावसामुळे मुजरांचा रोजगार बुडाला
– पाणी वीटभट्टीत शिरल्याने कच्च्या विटा आणि मातीही वाहून गेली
– नुकसान भरपाई मिळण्याची केली मागणी
सोने-चांदीच्या किंमतींनी घेतली उसळी
अमेरिकेच्या या धोरणाचा झाला परिणाम
19 एप्रिलपासून दरवाढीला ब्रेक
3 मेपासून पुन्हा किंमतींमध्ये वाढ
सोने-चांदीचा भाव एका मिस्ड कॉलवर जाणून घ्या, वाचा बातमी
जिल्ह्यातील विटा नेवरी रोडवर आज सकाळी ट्रॅव्हल्स व कारचा भीषण अपघात झाला आहे. यात चारजण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
आज सकाळी हा अपघात घडला आहे.
विट्याहून नेवरीकडे निघालेल्या गितांजली ट्रॅव्हल्सला कारची धडक बसून अपघात हा झाला.
यात तीन पुरुष व एक महिला ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
यानंतर अपघातस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
– सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी,
– हे तिन्ही बांधकाम व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती,
– पहाटेपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु,
– या बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती
जंतर-मंतर परिसर निर्मनुष्य
पोलिसांचा प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त जंतर-मंतर परिसरात
बॅरिकेटिंग करून पोलिसांनी सर्व रस्ते केले बंद
माध्यमांच्या ओबी व्हन्स आणि गाड्याही एक किलोमीटर लांब हलवल्या
आंदोलन परिसरात कलम 144 लागू
मध्यरात्रीच्या राड्यानंतर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर
अमेरिकेतील तीन बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्याचा परिणाम जगभर होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंदीचे संकट घोंगावत आहे. आता भारतात काय परिस्थिती असणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे….सविस्तर वाचा
नाशिक द्वारका परिसरात उड्डाणपुलावर भीषण अपघात
मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक आणि पीक अपमध्ये धडक
अपघातात 2 जण गंभीर जखमी
अपघातामुळे नाशिक उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी
तुमसर शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात बॅनरबाजी करण्यात करण्यात आली आहे.
“वस्ताद.. कधीही कुस्ती सोडत नसतो, तो आणखी नव्या जोमाने पैलवानांची भावी पिढी घडवत असतो. साहेब, तुम्ही आमच्या पाठिशी होता, आहात आणि कायम राहाल…साहेब,आपला निर्णय मागे घ्या…
शरद पवार यांना आगळेवेगळे आवाहन
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात पहिल्यांदाच लागले शरद पवार यांचे बॅनर.
पुण्यातील सिंध सोसायटीत आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे. हे तिन्ही बांधकाम व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी पहाटेपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे….वाचा सविस्तर
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात लोखंडा फाट्याजवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. अपघात इतका भीषण होता की या अपघातात दुचाकी जळून खाक झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाई
एक लाख चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम काढली
शहरात गेल्या तीन दिवसापासून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई
14 पैकी 8 तालुक्यात 44 वाळूंचे घाट
वाळू डेपोमधून सहाशे रुपये ब्रासने मिळणार सर्वसामान्यांना वाळू
अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी सरकारने आणली नवीन नियमावली
वाळू वाहतुकीचे दर जिल्हा प्रशासन तयार करणार
काल रात्री उशिरापर्यंत आज होणाऱ्या सुनावणींच्या यादीत या याचिकेचा समावेश नाही
ही सुनावणी आता उन्हाळी सुट्टीनंतरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांना पावसाळ्यानंतर म्हणजे किमान ॲाक्टोबर महिन्याचा मुहूर्त उजाडेल
अशी शक्यता वर्तवली जात आहे
जागतिक बाजारात क्रूड ऑईलची घसरगुंडी
परभणी, नांदेड, औरंगाबादमध्ये पेट्रोल-डिझेल महागले
पेट्रोलियम कंपन्यांसाठी सध्या अच्छे दिन
प्रति लिटर इतक्या रुपयांचा कमावित आहे नफा
आज तुमच्या शहरातील इंधनाचा भाव काय, वाचा सविस्तर
अतिक्रमण विभागाची पहाटेपासून कारवाई सुरू
शिवसेना कार्यालयाशेजारी असलेले अनधिकृत गाळे हटविण्याचे काम सुरू
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
अनेक वर्षांपासून तक्रारी होऊन देखील हटवले जात नव्हते अनधिकृत दुकानं
काही बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई झाल्याची माहिती
सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी
वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात पाच लिटर प्रतिदीन क्षमतेच्या यंत्राची करण्यात आली उभारणी
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले दोन्ही संयंत्र कार्यान्वित
बॅलेस्टिक सेपरेटर आणि प्लॅस्टिक टू फ्युइल असे दोन संयंत्र कार्यान्वित
सकल हिंदू महिला समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन
जिल्ह्यातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहण्याचे केले आवाहन
अमरावती जिल्ह्यातील 54 पाणी प्रकल्पात 44.19% जलसाठा.
उन्हाळ्यात प्रकल्पातील जलसाठांवर जिल्ह्याची मदार…
अमरावती जिल्ह्यात मोठे मध्यम आणि लघु असे एकूण 54 पाणी प्रकल्प..
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अप्पर वर्धा धरणात 47.4% जलसाठा..
-सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकानेच घेतली लाच
-संशयित सागर डगळे यांना सात हजार रुपयांची लाच घेताना घेण्यात आले ताब्यात
-नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
-वाहतूक आणि जेवण खर्चासाठी लाच मागितल्याची प्राथमिक माहिती
नाशिक ब्रेकिंग
-आता घनकचरा केंद्रात प्लॅस्टिकपासून तयार होणार इंधन
-वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात पाच लिटर प्रतिदीन क्षमतेच्या यंत्राची करण्यात आली उभारणी
-मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले दोन्ही संयंत्र कार्यान्वित
-बॅलेस्टिक सेपरेटर आणि प्लॅस्टिक टू फ्युइल असे दोन संयंत्र कार्यान्वित
ब्रेकिंग छत्रपती संभाजी नगर :-
छत्रपती संभाजी नगरात झोपेच्या गोळ्या आणि सर्दी खोकल्याच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर..
मेडिकल मधील औषधींचा वापर नशेसाठी सर्रासपणे करत असल्याचे आले समोर..
15 हजारांच्या सिरपच्या बाटल्या आणि 3 हजारांच्या गोळ्या जप्त..
खोकल्याची औषधें वापरले जात होते नशेचे साधन म्हणून..
डॉक्टरांच्या बिलाशिवाय आणि सल्ल्याशिवाय केली जात होती औषधांची विक्री..
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली नियुक्ती
बाळा भेगडे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणीमध्ये 16 उपाध्यक्ष असणार
प्रदेश कार्यकारिणीत पिंपरी चिंचवडला देखील झुकत माप, मात्र जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याने नाराजी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांना फोन
राजकीय घडामोडींवर राहुल गांधी, एमके स्टॅलिन यांची सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा
पुणे शहर भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना उपाध्यक्षपदी बढती,
माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची पुन्हा एकदा सरचिटणीस पदावर नियुक्ती
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर
येत्या काही दिवसात पुण्यासाठी नवीन शहराध्यक्षही जाहीर होण्याची शक्यता
पहिल्या टप्प्यात 37 जिल्ह्यात होणार मतदान
एकूण 44,226 उमेदवार मैदानात
भाजप, सपा आणि बसपामध्ये होणार लढत
संत गजानन भक्तांना अनेक वर्षांपासून होती आनंद सागर अध्यात्मिक केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा
दररोज सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहील आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 मे रोजी रत्नागिरीत सभा होणार आहे.
राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
मुंबईतील कार्यकर्ते रत्नागिरीत पोहोचले असून मनसे अध्यक्षांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावत आहेत.
भारतरत्न सचिन तेंडुलकर मध्य प्रदेश येथील संदाळपूर गावात शाळा बांधणार आहे
सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने या गावातील आणि आसपासच्या 2300 मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.