Maharashtra Breaking News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल
Maharashtra Breaking News in Marathi : आज 7 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई | 07 मार्च 2024 : आज 07 मार्च… लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाडींच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. अशात भेटीगाठी आणि बैठकाचं सत्र सुरु आहे. नेत्यांचे दौरे सुरु आहेत. शिवसेना- ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर आहेत. तर राज ठाकरे आज नाशिकमध्ये असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी घेणार कल्याण लोकसभेचा आढावा घेणार आहेत. लोणावळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचं असेल.
LIVE NEWS & UPDATES
-
लोकसभा निवडणुकांचा रणशिंग राज ठाकरे नाशिकमधून फुंकणार
नाशिक | मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात मनसैनिकांनी केलं राज यांचं स्वागत केलं गेलं. मनसेचा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये साजरा होणार आहे. तर उद्या राज ठाकरे संपूर्ण कुटुंबा सोबत काळाराम मंदिरात आरती करणार आहे. लोकसभा निवडणुकांचा रणशिंग राज ठाकरे नाशिकमधून फुंकणार आहेत.
-
उमरगामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन
धाराशिव : उबाठा गटाचे प्रक्ष प्रमुख उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात दाखल झाले आहेत. उमरगामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. या सभेसाठी संजय राऊत सुषमा अंधारे अंबादास दानवे आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.
-
-
मोदी सरकारने काय काम केले हे भाजप सांगू शकत नाही: खरगे
काँग्रेस नेत्यांनी देशासाठी काय काम केले हे आम्ही अभिमानाने सांगतो, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. पण मोदी सरकारने देशासाठी काय केले यावर भाजपचे लोक कधीच बोलत नाहीत. भाजपचे लोक फक्त आदिवासी आणि दलितांवर अत्याचार करतात.
-
पुढील वर्षीही दिल्लीत वीज सबसिडी सुरू राहणार
आप नेत्या आणि मंत्री आतिशी म्हणतात, “..मला हे घोषित करताना अत्यंत आनंद होत आहे की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत, 2024-2025 मध्ये तसेच दिल्लीच्या लोकांसाठी मोफत वीज बिले आणि सबसिडी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..”
#WATCH | Delhi: AAP leader and minister Atishi says, "..I am extremely glad to announce that in today's cabinet meeting, it has been decided that free electricity bills and subsidies will continue in 2024-2025 as well for the people of Delhi.." pic.twitter.com/29yy69VTw8
— ANI (@ANI) March 7, 2024
-
चीनच्या किंघाईमध्ये 5 रिश्टर स्केलचा भूकंप
चीनच्या किंघाई भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. यामुळे एकच धावपळ उडाली आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.
China: Earthquake of magnitude 5 hits Qinghai, National Center for Seismology, urges for necessary precautions
Read @ANI Story | https://t.co/ucUk8aJmXQ#China #Earthquake #NationalCenterforSeismology pic.twitter.com/PU2Tve0LRJ
— ANI Digital (@ani_digital) March 7, 2024
-
-
17 मार्च रोजी मुंबईत महाआघाडीचा मेळावा
17 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर महाआघाडीचा मेळावा होणार आहे. काँग्रेसने ही रॅली बोलावली असून, या रॅलीला राहुल गांधी संबोधित करणार आहेत. याशिवाय भारत आघाडीत समाविष्ट असलेल्या नेत्यांनाही यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. या रॅलीसाठी काँग्रेसने प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.
-
तेव्हा त्यांनी काय दिवे लावले? महाजन यांची शरद पवार यांच्यावर टीका
जळगाव : शरद पवार इतके वर्ष राज्यांमध्ये होते तेव्हा काय चाललं होतं? पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी केला. शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी काय दिवे लावले? मोदींची गॅरंटी मतदारांना आणि जनतेला माहित आहे. पवारांनी त्यांचे माणसं सांभाळावे आणि लोकसभेचे खात उघडावं माझं त्यांना आव्हान आहे. लोक मोदींची गॅरंटी पाहत आहे असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार यांना लगावला.
-
मोठ्या ताई आहे त्यांना करिअर सावरावं लागतं, चित्रा वाघ यांची टीका
कोल्हापूर : शरद पवारांनी तयार केलेली नेत्यांची फळी कुचकामी ठरलेली आहे. यासाठी मला यांचं वाईट वाटतं. नेत्याला या वयात फिरावं लागतं आहे. साहेबांना छोट्या छोट्या तालुक्यात जावं लागतं आहे. मोठ्या ताई आहे त्यांना करिअर सावरावं लागत आहे अशी टीका भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलीय.
-
रामदास कदम संधी साधू राजकारणी, सुषमा अंधारे यांची टीका
मुंबई : कृतज्ञता आणि कृतघ्नता अशा दोन गोष्टी असतात. रामदास कदम यांच्यासारख्या लोकांकडून आपण कृतज्ञतेची अपेक्षा करू नये. कारण जो माणूस पक्षात असताना काँग्रेसशी मांडवली करत होता आशा लोकांबद्दल काय बोलावे. आपल्याला मिळत आहे म्हटल्यावर भाटगिरी करायची आणि मिळत नाही म्हटले की नखं बाहेर काढायची. रामदास कदम हे संधी साधू राजकारणी आहेत अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
-
कांदिवली येथील मैत्री पार्क इमारतीला आग
मुंबई : कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील मैत्री पार्क इमारतीला आग लागली. सदर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत कोणीही अडकल्याची किंवा जखमी झाल्याची माहिती नाही.
-
लोकसभा उमेदवारीवरून चुरस, माजी उपमहापौर यांचा लेटरबॉम्ब
पुणे : पुणे शहर काँग्रेसमध्ये लोकसभा उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नाना पटोले यांच्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. पुण्यातील उमेदवार जनमत चाचणी घेऊन ठरवा. जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्याची मागणी बागुल यांनी केली आहे.
-
आरक्षण मिळेपर्यंत मत मागायला येऊ नका, नांदेडच्या या गावात लागले पोस्टर्स
नांदेड : मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनाला नांदेडमध्ये प्रतिसाद मिळत आहे. महादेव पिंपळगावातील प्रत्येक घरात मी मतदार, आरक्षण मिळेपर्यंत मत मागायला येऊ नका असे स्टिकर लावण्यात आलेत.
-
अमरावतीमधील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन
अमरावती जिल्ह्यातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. जिल्ह्यातील 500 पैकी 300 कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 15 लाख रुपये मदत देण्याची मागणी केली आहे.
-
खासदार नवनीत राणा यांचा मेळघाट मध्ये निवडणूक प्रचाराचा श्री गणेशा
मेळघाट की बेटी असा बॅनरवर नवनीत राणा यांचा उल्लेख केला आहे. नवनीत राणा यांनी प्रचाररथ तयार केलेत. प्रचाररथाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सह भाजप नेत्यांचे फोटो नवनीत राणा सध्या अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत. दोन आठवड्यात नवनीत राणा यांच्या जात प्रमानपत्रावर निकाल असतांना नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला.
-
पाठीत वार होतो तेव्हा कोथळा बाहेर काढायची शिकवण आहे – उद्धव ठाकरे
मोदी समोर बोलायला वाघाची छाती लागते ती ओमराजे यांची आहे. वडिलांचे विचार सोडले असे भाजपवाले म्हणत होते. बाळासाहेबांनी विचार सोडू नका असे सांगितले होते मात्र भाजपची पालखी वहा असे सांगितले नव्हते. पाठीत वार होतो तेव्हा कोथळा बाहेर काढायची शिकवण आहे. – उद्धव ठाकरे
-
मोदीजी फक्त मेरा परिवार म्हणतात मात्र जबाबदारी घ्यायला येतं नाहीत – उद्धव ठाकरे
लातूर : मोदी म्हणतात मेरा परिवार मात्र मी यापूर्वीच म्हटले. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हटले होते. मोदीजी फक्त मेरा परिवार म्हणतात मात्र जबाबदारी घ्यायला येतं नाहीत. – उद्धव ठाकरे
-
महायुतीच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत – उद्धव ठाकरे
बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं नसतं तर आज मोदी दिसले ही नसते. मोदींना कोणी ओळखत नव्हतं तेव्हा देखील आपण धाराशिव जिंकलं होतं. – उद्धव ठाकरे
-
सगळ्यांना मातीत घालून मुटमाती देऊन शिवसेना टिकेल – उद्धव ठाकरे
आमदार, खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपली असे वाटले असेल. पण सगळ्यांना मातीत घालून मुटमाती देऊन शिवसेना टिकेल – उद्धव ठाकरे
-
आमदार राजू पाटील आणि मंत्री रवींद्र चव्हान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी
मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेतील विविध विषयावर पालिका अधिकाऱ्यांसह, पदाधिकारी आणि आमदार यांच्यासोबत बैठक घेणार आहे.
-
पाठीत खंजीर खुवसणाऱ्याचा बदला घ्यायचा आहे – संजय राऊत
लातूर : शिवसेना फक्त बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरे यांची आहे. शिवसेना पक्ष प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुवसणाऱ्याचा बदला घ्यायचा आहे. असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
आमदार सुनील शेळके यांनी फेटाळले आरोप
पुढच्या आठ दिवसात मी कुणाला दम दिला किंवा कुणाला सांगितले सभेला जाऊ नका असा माणूस समोर आणा. शरद पवार यांना जाऊन भेटणार, माझी काय चूक झाली ते सांगावं. आमदार सुनील शेळके यांची माहिती
-
शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामिन फेटाळला
मालेगाव न्यायालयाने शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामिन फेटाळला आहे. रेणुका सुत गिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणात हिरे तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत.
-
यवतमाळ येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावर बिनधास्त कॉपीचे प्रकार
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील चिखली येथील वसंतराव नाईक विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरविण्यासाठी झुंबड उडाली आहे.
-
उद्धव ठाकरे लातूर विमानतळावर दाखल होत आहेत
उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा सुरु असून उद्धव ठाकरे लातूर विमानतळावर दाखल होत आहेत.
-
काटकसरीचा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प
कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला काटकसरीचा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प. प्रशासक तथा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडला अर्थसंकल्प
-
कोल्हापूर फोंडा ते दाजीपूर मार्गावर 18 चाकी कंटेनर रस्त्यामध्ये पलटी
फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद. फोंडा घाटात वाहनांच्या रांगा. घटनास्थळी पोलिस विभाग व इतर संबंधित यंत्रणा पोहोचली.
-
पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात झाली मोठी वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत २१०० कोटीने बजेट वाढलं. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी अर्थसंकल्प केला सादर ११ हजार ६०१ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प. नव्याने गाव समाविष्ट झाली आहेत ५५० कोटी रुपये बजेट ठेवला आहे.
-
समृद्धी महामार्गावरील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन
समृद्धी महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे. दोन-दोन महिने पगार होत नसल्यामुळे काम बंद आंदोलन केलंय. आज सकाळपासून हे आंदोलन सुरू केलंय. समृद्धी महामार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे.
-
अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराचा वाद विकोपाला
अमरावती- अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराचा वाद विकोपाला गेला आहे. हजारोंच्या संख्येने नागरिक गाव सोडून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. काल संध्याकाळी दर्यापूर इथं जिल्हा प्रशासनाने लेखी पत्र देऊनही नागरिक मुंबईला जाण्यास ठाम आहेत.
-
उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
नवी दिल्ली- उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. आज दुपारी साडेबारानंतर याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
-
मॅकडोनाल्ड इंडियाकडून वापरण्यात आलेल्या चीजची पडताळणी
पनीरऐवजी चीजसदृश पदार्थाचा वापर करण्यात येत असल्याचा दावा करत मुंबईतील मॅकडोनाल्ड इंडियाच्या 13 आऊटलेट्सना अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी नोटीस पाठवली होती. या पार्श्वभूमीवर मॅकडोनाल्डकडून वापरण्यात आलेल्या चीजची पडताळणी केली. यावेळी मॅकडोनाल्ड इंडिया त्यांच्या उत्पादनांमध्ये शंभर टक्के अस्सल चीजचा वापर करते, तसंच कोणतंही चीजसदृश पदार्थ किंवा पर्यायी पदार्थ वापरत नसल्याचं अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने पडताळणीअंती स्पष्ट केलं.
-
मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर उद्या सुनावणी
राज्यातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालय शुक्रवारी तातडीची सुनावणी घेणार आहे. सरकारने पोलीस भरती प्रक्रिया सुरू केली असून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियाही याच महिन्यात होणार असल्याचं याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितल्यावर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली.
-
शासकीय वेबसाइट्सवरून नेत्यांचे फोटो हटवा, निवडणूक आयोगाच्या सूचना
लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसंच त्यांच्या अधिनिस्त कार्यालयांच्या अधिकृत वेबसाइट्सवरील राजकीय नेत्यांचे फोटो तातडीने काढून टाकावीत, अशा सूचना राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो आहेत.
-
भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर
पुण्यातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनर महापालिकेच्या जवळ बॅनरबाजी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
-
गावकरी मुंबईच्या दिशेने
अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराचा वाद विकोपाला गेला आहे. हजारोच्या संख्येने नागरिक गाव सोडून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. काल सायंकाळी दर्यापूर येथे जिल्हा प्रशासनाने लेखी पत्र देऊनही मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचे समोर येत आहे.
-
ईव्हीएमऐवजी मतपत्रिका?
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता लक्षात घेत जास्त उमेदवारी अर्ज आल्यास evm ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्यावी लागण्याची शक्यता आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत मार्गदर्शन मागितले आहे.
-
अरुणाचल प्रदेशात अजित पवार यांची मोर्चेबांधणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आता पंख विस्तारले आहेत. अजितदादांच्या नेतृत्वात पूर्वोत्तर राज्यात सुद्धा मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अरूणाचल प्रदेशात लोकसभेसह विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
-
आम्ही वंचितचं समाधान करणार
आघाडीत सर्वांच्याच मनासारखं होत नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले. वंचितचे प्रकाश आंबेडकर नाराज नाहीत. त्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. आम्ही वंचितचं समाधान करणार असल्याचे ते म्हणाले.
-
सोने वधारले, तर चांदीत घसरण
सोने आणि चांदीला अखेर मार्च महिना पावला. मार्चमध्ये सोन्याने 2300 रुपयांची उसळी घेतली आहे. तर चांदी दोन हजारांच्या घरात वाढली. सोने 70 हजारांचा लवकरच टप्पा गाठणार असा अंदाज आहे.
-
नाशिक महापालिकेविरोधात भुजबळ आक्रमक
नाशिक महापालिकेतील अनागोंदी विरोधात भुजबळांचे मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवले आहे. महापालिकेत अनागोंदी कारभार होऊ नये म्हणून पत्र दिल्याची माहिती भुजबळांनी दिली. निवडणुका जवळ आल्याने सरकार बदनामीला कारण नको म्हणून पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक भूखंडावरील आरक्षण आणि भूखंड प्रक्रिया विरोधात भुजबळ यांना पत्र आल्याने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.
-
Maharashtra news | राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिकमध्ये
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर. काळाराम मंदिरात राज ठाकरे घेणार दर्शन. मनसे वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे तीन दिवस नाशिकमध्ये. यंदा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये. राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते नाशिकमध्ये होणार दाखल.
-
Maharashtra news | भाजप आणि बच्च कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते भिडले
अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये भाजप आणि बच्चू कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते आमने सामने. कामगार कल्याण विभागाने साहित्य वाटपाचा आयोजित केला होता कार्यक्रम. कार्यक्रम लवकर न सूरु झाल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ते झाले होते आक्रमक. प्रहार आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले; कामगारांना कीट वाटप कार्यक्रम करण्यात आला रद्द. प्रहारच्या व भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
-
Maharashtra News | मुख्यमंत्री आज घेणार कल्याण लोकसभेचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी घेणार कल्याण लोकसभेचा आढावा. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून खासदार आहेत. आज दुपारी तीनच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहात मतदार संघातील विविध विषयांबाबत बैठक घेत घेणार आढावा
-
Maharashtra News | सोलापुरातील ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा
सोलापुरातील ग्रामीण भागात बसतायत दुष्काळाच्या झळा. सोलापुरातील कुंभारी गावचा युवक भागवतोय हजारो ग्रामस्थांची तहान. स्वमालकीच्या विहिरीतून दररोज 12 टँकरद्वारे 72 हजार लिटर मोफत पाणी वाटप करतोय. युवक काँग्रेस आणि शिखर युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून धर्मराज गुंडे नामक युवक भागवतोय ग्रामस्थांची तहान.
-
पुण्यातील ड्रग्स प्रकरणातील मास्टर माईंड कुवेतला पळाला
पुण्यातील ड्रग्स प्रकरणातील मास्टर माईंड संदीप धुनिया नेपाळमार्गे कुवेतला पळाला. धुनियाकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याची माहिती आहे. नेपाळमध्ये त्याला ड्रग्जचा कारखाना उभा करायचा होता. पोलीस तपासात माहिती उघड झाली आहे. संदीप धुनियाच्या प्रेयसीची पण पोलिसांनी चौकशी केली आहे. एकूण ३५०० हजार कोटीच हे ड्रग्ज प्रकरण आहे.
-
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठाचे केंद्र सरकारला निर्देश
विदर्भ विकास मंडळाच्या मुदत वाढीवर चार आठवड्यात भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठाचे केंद्र सरकारला दिले आहेत. ही शेवटची संधी असल्याचं सुद्धा सांगितलं. स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थक नितीन रोंघे व कपिल चंद्रायन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना निर्देश दिले आहेत.
-
शहीद सोपान काळे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवान हिमाचलमध्ये शहीद… छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द गावातील जवान शहीद झाला आहे. सोपान काळे असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. हिमाचल प्रदेशात हिमस्खलन झाल्यामुळे वीरमरण आलं. शाहिद जवानाचे पार्थिव साडेसात वाजता संभाजीनगर विमानतळावर येणार आहे. आज दुपारी 2 वाजता मूळ गावी पळशी खुर्द येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
-
नागपूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात
फेब्रुवारी महिन्यातही नागपूर शहरातील हवा प्रदुषित होती. शहरातील चार केंद्रापैकी व्हीआयपी परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीपीओ चौकातील केंद्रावर 29 दिवसांपैकी तीन आणि अंबाझरी केंद्रावर दोन दिवस हवेची शुद्धता धोक्याच्या श्रेणीत आहे. रामनगर आणि महाल केंद्रावरील हवेचे शुद्धता हे चिंता वाढवणारी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यातील प्रदूषणाची स्थिती वाढलेली आहे.
Published On - Mar 07,2024 7:38 AM