Maharashtra Breaking News in Marathi : आगऱ्यात शिवजयंती उत्सवाला सुरुवात, शिवप्रेमी पारंपरिक वेशभूषेत किल्ल्यावर दाखल

| Updated on: Feb 20, 2024 | 7:32 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 19 फेब्रुवारी 2024. आज शिवजयंती... त्यानिमित्तच्या घडामोडी वाचा... देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : आगऱ्यात शिवजयंती उत्सवाला सुरुवात, शिवप्रेमी पारंपरिक वेशभूषेत किल्ल्यावर दाखल

मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : आज 19 फेब्रुवारी… छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती… सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह आहे. शिवरायांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राजधानी नवी दिल्लीतही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. सलग दुसऱ्या वर्षी आग्र्याच्या लाल किल्ल्यावरही शिवजयंती साजरी होणार आहे. पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अमरावतीत प्रहारच्या वतीने शिवभीम मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवजयंतीच्या बातम्यांसोबतच इतरही महत्वाच्या बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Feb 2024 06:25 PM (IST)

    रात्री 8 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात, मुख्य एकनाथ शिंदे उपस्थित राहणार

    उत्तर प्रदेश | आगऱ्यात शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे. शिवप्रेमी पारंपरिक वेशभूषेत आग्रा किल्ल्यावर दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं जात आहे. रात्री 8 वाजता मुख्य कार्यक्रमाला होणार सुरुवात होणार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचा लाल किल्ला परिसरात कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार आणि छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

  • 19 Feb 2024 06:10 PM (IST)

    शिक्षकांना दिलासा द्यावा, आमदार सत्यजीत तांबे यांची सरकारकडे मागणी

    मुंबई | शिक्षकांना शिक्षणेतर कामाची जबाबदारी अनेकदा सरकारकडून दिली जाते. शिक्षकांना नुकतंच आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता शिक्षकांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामं दिली जात आहेत. शिक्षकांना शिक्षणेतर कामातून मुक्त केल्याने विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होतं. विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनीही याच मुद्द्याला हात घालत सरकारकडे मागणी केली आहे.

    सत्यजीत तांबे यांची प्रतिक्रिया

    “शिक्षकांना शिक्षणेतर कामाला जुंपल्यास त्याचा विपरित परिणाम विद्यादानावर होतो. हा विद्यार्थ्यांवरही अन्याय आहे. ही भूमिका मी वारंवार मांडत आलो आहे. राज्य सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा असलेल्या शिक्षकांना दिलासा द्यावा”, असं आमदार तांबे म्हणाले.

  • 19 Feb 2024 05:50 PM (IST)

    समन्स योग्य आहे की नाही हे न्यायालय ठरवेल: सौरभ भारद्वाज

    आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या सहाव्या समन्सवर हजर न राहिल्याबद्दल मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, “ईडी समन्ससाठी कोर्टात गेली आणि कोर्टानेही या प्रकरणाची दखल घेतली, त्यामुळे आता कोर्टच निर्णय घेईल. केजरीवाल यांना बजावण्यात आलेले समन्स योग्य आहे की नाही. जर त्यांना समन्स पाठवायचे होते तर त्यांनी कोर्टात जायला नको होते. कोर्टाने आता केजरीवाल यांना 16 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. ईडीने पाठवलेल्या समन्समुळे हे सिद्ध होईल. ते घाईत आहेत.”

  • 19 Feb 2024 05:25 PM (IST)

    हे आसाम-बिहार नाही, बंगाल आहे: ममता बॅनर्जी

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, मतुआ समाजातील बहुतांश लोकांची आधार कार्डे निष्क्रिय करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील लोकांचे आधार कार्ड निष्क्रिय करण्याबाबत पंतप्रधान मोदींना पत्र पाठवण्यात येणार आहे. हे आसाम आणि बिहार नसून बंगाल आहे. आधार कार्डाच्या जागी दुसरे कार्ड बनवले जाईल. बंगालमध्ये NRC चालणार नाही.

  • 19 Feb 2024 05:25 PM (IST)

    मी पंतप्रधान मोदींना भेटायला रात्री नाही तर दिवसा जाईन : फारूख अब्दुल्ला

    जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्यावर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “जेव्हा मी त्यांच्याकडून (गुलाम नबी आझाद) अशी विधाने ऐकतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटते. जर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणणे ऐकले किंवा अमित मला शहांना भेटायचे असेल तर मी त्यांना दिवसा भेटेन. मी रात्री त्यांना भेटायला का जावे?, त्यांनी हेही लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांना (गुलाम नबी) राज्यसभेची जागा द्यावी अशी कोणाचीच इच्छा नसताना मीच त्यांना राज्यसभेची जागा दिली होती.”

  • 19 Feb 2024 05:10 PM (IST)

    अमेठीतील लोक स्वागताला आले नाहीत : स्मृती

    अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, “जेव्हा अमेठीला सत्तेचे केंद्र मानणारे वाजतगाजत आले, तेव्हा अमेठीचे लोक त्यांच्या स्वागतासाठी आले नाहीत. त्यामुळे त्यांना प्रतापगड, सुलतानपूर येथून लोकांना आणावे लागले. लोक विसरले नाहीत की याच व्यक्तीने वायनाडमध्ये उत्तर भारत आणि विशेषत: अमेठीबद्दल काय सांगितलं होतं ते.. इथल्या लोकांची समज चांगली नाही, या विधानामुळे आजपर्यंत लोक संतप्त आहेत. आता परिस्थिती अशी झाली आहे की या कुटुंबाने रायबरेलीची जागाही सोडली आहे.”

  • 19 Feb 2024 04:52 PM (IST)

    फेब्रुवारीच्या मध्यातच मुंबईकरांना सोसाव्या लागताय उन्हाचा झळा..!

    मुंबई : फेब्रुवारीच्या मध्यातच मुंबईकरांना उन्हाचा झळा सोसाव्या लागत आहेत. किमान तापमानात दिवसेंदिवस वाढ होतेय. वातावरण कोरडे असल्याने आकाश निरभ्र आहे. त्याचा परिणाम कमाल तापमानात वाढ झालीय. पुढील काही दिवस वातावरणात असाच कोरडेपणा राहणार असून किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविलीय.

  • 19 Feb 2024 04:34 PM (IST)

    मनसेकडून कॉलेजमध्ये तोडफोड

    वाघोली : वाघोली येथील जीएसपीएम कॉलेजमध्ये मनसेकडून तोडफोड करण्यात आलीय. कॉलेजने फी बाकी असल्याचं कारण देत 10 वीच्या विद्यार्थ्याना परीक्षेचे हॉल तिकीट देण्याचे नाकारले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ऐन परीक्षा काळात मनस्ताप सहन करावा लागला. याची दखल घेत मनसेने आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या कार्यालयाची तोडफोड केली.

  • 19 Feb 2024 04:22 PM (IST)

    किती वेळा लग्न केले, किती वेळा तलाक घेतला, जयंत पाटील यांचा मंत्र्याला टोला

    मुंबई : कोर्टात काय झालं माहित नाही. पण आमच्या नाव आमच्यासोबत राहावं ही आमची अपेक्षा आहे. किती वेळा लग्न केले. किती वेळा तलाक घेतला हे महत्वाचे नाही. जिथे आहात तिथे सुखी रहाणे हे महत्वाचे आहे. पण, तसे होताना दिसत नाही असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लगावला.

  • 19 Feb 2024 04:06 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन

    इंदापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. त्याला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी तालुक्यातील मराठा समाजातील तरुणांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री या निवासस्थानी आंदोलन केले. हर्षवर्धन पाटील जोपर्यंत मराठा आरक्षणा संदर्भातील पाठिंबाचे पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भावना मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय.

  • 19 Feb 2024 01:52 PM (IST)

    पुण्यात सराईत गुंडाकडून गाडी जाळून महिलेला पेटविण्याचा प्रयत्न

    पुण्यातील खराडी परिसरात टोळक्याकडून गाड्यांच्या जाळपोळीसह महिलेला देखील पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे

  • 19 Feb 2024 01:38 PM (IST)

    उद्धव ठाकरे विधानसभेपूर्वी भाजपात येतील – आमदार रवी राणा

    उद्धव ठाकरेंना अहंकारात बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला होता. त्याचं चिंतन मातोश्रीवर सुरू आहे. त्यांना आता मोदीजी शिवाय पर्याय नाही. मोदीजींच्या नेतृत्वाला उद्धव ठाकरे स्वीकारतील असे अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.

  • 19 Feb 2024 01:26 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अचानक दिल्ली दौरा

    शिवजयंती निमित्त आग्रा येथील लाल किल्ला येथील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यापुर्वी दिल्लीत अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासोबत दोन्ही नेत्यांची मराठा आरक्षण , लोकसभा जागा वाटपावर होणार असल्याची सुत्रांची माहीती.

  • 19 Feb 2024 12:58 PM (IST)

    शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामासाठी रूजू होऊ नये- राज ठाकरे

    शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामासाठी रूजू होऊ नये, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • 19 Feb 2024 12:56 PM (IST)

    निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांचा मोठा सवाल

    निवडणूक तोंडावर आल्या की, घाईघाईमध्ये का काम करावे लागते, असे थेट राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • 19 Feb 2024 12:33 PM (IST)

    ड्रग्स तस्करांविरोधात पुणे पोलिसांची मोठी कारवाई

    ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस.  ४ कोटीचे अंमली पदार्थ (M.D) जप्त.. ३ तस्कर अटकेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई.

  • 19 Feb 2024 12:18 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान

    बरोबर आहे., धक्का लागतच नाही. सगे सोयरे अंमलबजावणी होईल. धक्का लागण्याचा प्रश्नच येत नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

  • 19 Feb 2024 12:12 PM (IST)

    नितेश राणे यांचे मोठे विधान

    आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक प्रवेश होत आहेत. मोदींची गॅरंटी चालते हे दिसून येत आहे. राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान खाली होणार आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

  • 19 Feb 2024 11:55 AM (IST)

    कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या निर्णयानंतर कांद्याच्या बाजार भावात तेजी

    लासलगाव (नाशिक)- कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या निर्णयानंतर कांद्याच्या बाजार भावात तेजी पहायला मिळतेय. शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी 661 रुपयांची वाढ झाली आहे. – कांद्याला 2 हजार 100 रुपयांचा बाजार भाव मिळाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 300 वाहनातून कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त 2101, कमीतकमी 1000 रुपये तर सरासरी 1800 रुपये भाव मिळाला.

  • 19 Feb 2024 11:45 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी फक्त जिजाऊ यांचा वाटा- शरद पवार

    “राजे अनेक होऊन गेलेत, अनेक संस्थानिक होऊन गेलेत पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कुणी नाही. शिव छत्रपती यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी अनेक जण वेगवेगळी नावं घेतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी फक्त जिजाऊ यांचा वाटा आहे. काहीजण वेगळी नावं घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात,” असं शरद पवार म्हणाले.

  • 19 Feb 2024 11:25 AM (IST)

    राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट

    राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाली असून त्यांच्यात एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे.

  • 19 Feb 2024 11:19 AM (IST)

    चंद्रपूर- अधिकृत राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची आज घोषणा होणार

    चंद्रपूर- अधिकृत राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याची आज घोषणा होणार आहे. आज संध्याकाळी आग्रा येथे होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना दांडपट्ट्याचा अध्यादेश सुपूर्द करणार आणि दांडपट्टा हे राज्यशस्त्र घोषित होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात घोषणा केली. दांडपट्टा हा मराठा सैन्याचं वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे आणि त्याचं महत्त्व अधोरेखित होण्यासाठी दांडपट्टा राज्यशस्त्र होणार आहे. छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

  • 19 Feb 2024 10:43 AM (IST)

    पुण्यात ४ कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, 3 आरोपी अटकेत

    पुण्यात ४ कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 19 Feb 2024 10:22 AM (IST)

    नवी दिल्ली – महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवरायांचा जयजयकार

    नवी दिल्ली –  महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवरायांचा जयजयकार, संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत साजरी झाली शिवजयंती.  राजधानी दिल्लीतील शेकडो शिवप्रेमींची शिवजयंती उत्सवाला उपस्थिती होती. महिलांचा होता लक्षणीय सहभाग.

  • 19 Feb 2024 10:18 AM (IST)

    छत्रपती शिवराय लोकशाहीचे जनक – उदयनराजे भोसले

    छत्रपती शिवराय हे लोकशाहीचे जनक आहेत. लोकशाहीत सर्वांना विचार मांडण्याचे अधिकार.

  • 19 Feb 2024 09:57 AM (IST)

    Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता – अजित पवार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता… त्यानुसार उद्याच विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे… अजित पवारांची टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया… प्रथेप्रमाणे राज्याचे प्रमुख शिवनेरीवर येतात… गडकिल्ल्याचे पण काही निर्णय घेतले आहेत.

  • 19 Feb 2024 09:50 AM (IST)

    Live Update : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री

    किल्ले शिवनेरीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार. ‘

  • 19 Feb 2024 09:36 AM (IST)

    Live Update : महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार वाघ नख भारतात आणणार – मुख्यमंत्री

    किल्ले शिवनेरीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेला संबोधित करत आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शिभेच्छा दिल्या. शिवाय महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार वाघ नख भारतात आणणार असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

  • 19 Feb 2024 09:07 AM (IST)

    Live News : राजधानी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात शिवजयंती साजरी

    राजधानी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात शिवजयंती साजरी होत आहे. शिवप्रेमी आणि मराठी भाषिकांनी फेटे बांधायला अक्षरशः रंग लावली आहे. तसेच नाशिक ढोल या शिवजयंतीच्या उत्सवामध्ये सहभागी झालेला आहे.

  • 19 Feb 2024 08:57 AM (IST)

    पवारांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा पार पडणार

    पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा पार पडणार आहे. पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयात शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे.  यावेळी बाल शिवबाचा पाळणा, पालखी मिरवणूक आणि आदर्श माता पित्यांचा सम्मान जाणार केला आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे,खासदार अमोल कोल्हे यांचीही उपस्थिती असणार आहेत.

  • 19 Feb 2024 08:40 AM (IST)

    सोलापुरात शिवरायांचा पाळणा उत्सव पार पडला

    सोलापुरात लखोजीराजे जाधवर आणि तानाजी मालुसरे यांच्या वंशजांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा उत्सव पार पडला.  सोलापूर शिवजयंती निमित्त शहरात पाळणा सोहळा पार पडला. शिवरायांचा पाळणा उत्सवासाठी हजारो शिवभक्त सोलापुरात दाखल झाले होते.शिवरायांच्या या पाळणा उत्सवासाठी वीरमाता, वीरपत्नी तसेच जिजामातांचे वंशज शिवाजीराजे आणि संगीताराजे जाधवर, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज शितल मालुसरे, रायबा मालुसरे आदी मंडळी उपस्थित होते.

  • 19 Feb 2024 08:25 AM (IST)

    आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह

    सलग दुसऱ्या वर्षी आग्र्याच्या लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने विनोद पाटील आग्ऱ्यात शिवजयंती साजरी करणार आहेत.  संपूर्ण आग्रा शहरात शिवजयंतीसाठी हजारो बॅनर लावण्यात आले आहेत.

  • 19 Feb 2024 08:10 AM (IST)

    आज शिवजयंती…

    छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासकीय अभिषेक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्या हस्ते जन्म सोहळा संपन्न होणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. शासकीय शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवर फक्त पास धारकांनाच प्रवेश असणार आहे.

Published On - Feb 19,2024 7:53 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.