Maharashtra Budget 2022 : पंचसूत्री कार्यक्रमात उद्योग क्षेत्रात भरीव तरतूद, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 1 लाख 89 कोटींची गुंतवणूक
अजित पवार यांनी राज्याचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून अर्थ संकल्पातून आरोग्यावर (Health Sector) अधिक भर देण्यात आला आहे. तसेच राज्यातील विविध महामंडळांसाठी भरीव तरतूदही करण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रासाठीदेखील भरीव तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई : तू नेता… योद्धा वीर राष्ट्रसंग्रामी, तू राजधुरंधर, माणूस अंतर्यामी, तू लेखक, वक्ता, रसिक स्वयंप्रज्ञेचा, तू जणू प्राण, यशवंत महाराष्ट्राचा… अशी कविता अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज बजेट सादर करताना विधानसभेत सादर केली. या कवितेतून त्यांनी अर्थसंकल्पाच्या (Maharashtra Budget) माध्यमातून यशवंतराव चव्हाण साहेबांना अपेक्षित असलेला, त्यांच्या स्वप्नातला प्रगत, पुरोगामी, समर्थ, बलशाली महाराष्ट्र घडवण्यास निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला. अजित पवार यांनी राज्याचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून अर्थ संकल्पातून आरोग्यावर (Health Sector) अधिक भर देण्यात आला आहे. तसेच राज्यातील विविध महामंडळांसाठी भरीव तरतूदही करण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रासाठीदेखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अंदाजात महसूली जमा 4,03,427 कोटी रुपये, महसूली खर्च 4,27,780 कोटी रुपये आणि महसूली तूट 24,353 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे.
अजित पवारांनी यावेळी अर्थसंकल्पातून विकासाची पंचसूत्री मांडली. या पंचसूत्रीमधील पाचवे सूत्र म्हणजे उद्योग.
उद्योग
- मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 98 गुंतवणूक करारातून 1 लाख 99 हजार कोटी रूपये गुंतवणूक आणि रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन संधी.
- ई-वाहन धोरणांतर्गत 2025 पर्यंत वाहन नोंदणीत इलेक्ट्रीक वाहनांचा हिस्सा 10 टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा 25 टक्के करण्याचे उद्दिष्ट, तसेच 5000 चार्जिंग सुविधा उभारणार.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 30000 हून अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार.
- कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 100 टक्के व्याज परताव्याची पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना.
- कौडगाव व शिदाळा (जि. लातूर), साक्री (जि. धुळे), वाशीम, कचराळा (जि. चंद्रपूर) आणि यवतमाळ येथे एकूण 577 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प, राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेचे नवीन सौर ऊर्जा पार्क,
- मुंबईत पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी 11,530 कोटी रुपयाचे 5 प्रकल्प. भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय’ स्थापित करण्यासाठी 100 कोटी रुपये निधी राखीय,
- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमीत्त बढ़ बुद्रुक व तुळापूर, ता. हवेली, जि.पुणे या परिसरात स्मारकासाठी 250 कोटी रुपये निधी उपलब्ध करणार.
- ‘छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरु करणार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरुषांशी संबंधित गावांतील 10 शाळांकरिता 10 कोटी रुपयांचा निधी
- मुंबई पुणे व नागपूर येथे स्वातंत्र्यलढयाशी निगडीत स्थळांचा ‘हेरिटेज वॉक’
- रायगड किल्ला व परिसर विकासाकरिता 100 कोटी, राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी 14 कोटी, मुंबईतील शिवडी आणि सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी 7 कोटी रुपये प्रस्तावित
- छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युद्ध पद्धतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव दाखल करणार.
- ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत 500 कोटीची तरतूद, स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मासिक उत्पन्नाची 10 हजार रुपयाची मर्यादा ३० हजार रुपये,
- औरंगाबाद येथील अमृतमहोत्सवी वंदे मातरम् सभागृहांकरिता 43 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार.
- अष्टविनायक विकास आराखड्याकरिता ५० कोटी रुपये.
- पंढरपूर देवस्थान मंदिर विकासासाठी 73 कोटी 80 लाख रुपये रकमेचा आराखडा
- मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी 75 कोटी रुपये.
स्मारक
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक उभारणार, महाराणी सईबाई स्मृतीस्थान विकास आणि श्री संत जगनाडे महाराज स्मारकांसाठी निधी उपलब्ध करुन देणार.
- पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भागातील 5 लाख घरकुल बांधकामाकरिता 6000 कोटी रुपये उपलब्ध करुन देणार.
- मुंबईबाहेरील झोपडपट्टयांमधील सुधारणांची मुलभूत कामे करण्यासाठी 100 कोटी रूपये उपलब्ध करुन देणार.
पर्यटन
- कोयना, जायकवाडी व गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित. जव्हार जि. पालघर, फर्दापूर जि. औरंगाबाद, अजिंठा, वेरूळ, महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरिता सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान.
- पुरातत्व स्मारकांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय ‘महावारसा सोसायटीची’ स्थापना करणार.
- पुणे वन विभागात बिबट्या सफारी सुरु करणार.
- बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात ‘आफ्रिकन सफारी’ सुरु
महामंडळे
- बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थाना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी 250 कोटी रुपये.
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना.
- मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा 500 कोटी रुपयांवरुन वाढवून ७०० कोटी रुपये.
वार्षिक योजना
- 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 13340 कोटी रुपयांची तरतूद.
- वार्षिक योजना 1,50,000 कोटी, अनुसूचित जाती घटक योजना 12,230 कोटी रुपये, आदिवासी उप योजना 11,199 कोटी रुपये.
- अर्थसंकल्पीय अंदाज सन 2022-23 : महसुली जमा 4,03,427 कोटी रुपये, महसुली खर्च 4,27,780 कोटी रुपये, महसुली तूट 24,353 कोटी रुपये.
इतर बातम्या
Maharashtra Budget 2022: अर्थसंकल्पात धार्मिक स्थळांच्या विकासासाठी काय तरतूद?
Maharashtra Budget 2022: मनुष्यबळ विकासासाठी 46,667 कोटी, अजितदादांची मोठी घोषणा