Maharashtra Budget 2022 : पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प-आशिष शेलार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आशिष शेलार यांनीही सडकून टीका केली आहे. राज्य सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प हा पंचसूत्रीचा विकासाच्या आधारावर नसून तो मांडल्यानंतर लक्षात येते की, पानचट,पचपचीत आणि प्रतिगामी असा अर्थसंकल्प आहे. असे शेलार म्हणाले आहेत.

Maharashtra Budget 2022 : पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प-आशिष शेलार
आशिष शेलार यांच्याकडून अर्थसंकल्पावर टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 5:56 PM

मुंबई : राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर (Maharashtra Budget 2022) भाजप नेत्यांनी टीकेची झोड उडवली आहे. या अर्थसंकल्पावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnaivis) यांच्यानंतर आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही सडकून टीका केली आहे. राज्य सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प हा पंचसूत्रीचा विकासाच्या आधारावर नसून तो मांडल्यानंतर लक्षात येते की, पानचट,पचपचीत आणि प्रतिगामी असा अर्थसंकल्प आहे. हा स्व-राज्याचा अर्थसंकल्प वाटत असून स्व-हिताचा अर्थसंकल्प आहे.आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप काही केलं,असं सांगितले गेले पण प्रत्यक्षामध्ये आर्थिक पाहणी अहवालात बघितलं ही, कोरोना काळामध्ये शेतकरी खासगी सावकाराकडे वळला हे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चकार शब्द सुद्धा या अर्थसंकल्पात काढला नाही, अशी टीका शेलारांनी केलीय.

पुण्याला झुकतं माप-शेलार

अर्थसंकल्प राज्याचा पण जिल्हा नियोजनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे दिसते आहे. अर्थसंकल्प पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे अशा पद्धतीचा आहे. पुणे जिल्ह्यामधील सगळ्या प्रकल्पांना निधी दिला आणि मुंबईला मात्र भोपळा असे चित्र आहे.कुणाच्या विरोधात आम्ही नाही पण पुणे जिल्ह्यामध्ये जर मेट्रोच्या विकासाची गती वाढवली जाते तर मुंबईतल्या मेट्रो कारशेडचे काय ? याबाबत काहीच बोलले जात नाही.इंद्रायणी मेडिकल सीटी बनविण्याची घोषणा केली. 300 एकर जागेत उभी केली जाणार आहे. पुण्यामध्ये जागा बघून मेडिकल सीटी आणली जातेय की पुण्यासाठी मेडिकल सिटी आणली जातेय?याच्यावर सुद्धा मनात शंका निर्माण होते. या पद्धतीचे चित्र आहे. म्हणून एकंदरीतच बघितलं तर इतर मागासवर्गीय आयोगाला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केलंय. निधीची तरतूद दिसतच नाही. म्हणून हा अर्थ संकल्प स्वराज्या पेक्षा स्व हिताचा विचार करणारा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

विकास पंचतत्वात विलीन-फडणवीस

आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे राज्यातलं राजकारण पुन्हा तापलं आहे. कळसूत्री सरकारने विकासाचे पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे. सर्वांच्या तोंडाला काळं फसण्याचे काम या सरकारने केले आहे. हे बजेट विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटमध्ये काही नाही. चालू कामांच्या घोषणा या बजेटमध्ये केल्या, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

Maharashtra Budget 2022 : कळसूत्री सरकारने पंचसूत्रीच्या माध्यमातून विकास पंचतत्वात विलीन केला, बजेटनंतर फडणवीस आक्रमक

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक, मोदींच्या कालच्या वक्तव्यानंतर घडमोडींना वेग

Maharashtra Budget 2022 : बजेटमधील चौथे सूत्र, दळवळण सुविधांसाठी किती कोटींची तरतूद?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.