Maharashtra Budget 2022 : शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, विमानतळाची मोठी घोषणा
राज्यातल्या विमान वाहतुकीसाठीही (Transport budget 2022) काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याच शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे.
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प ( Maharashtra Budget 2022) सादर झाला आहे. यात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात आरोग्य, शेती, वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास, अशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी राज्यातल्या विमान वाहतुकीसाठीही (Transport budget 2022) काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याच शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे. यात शिर्डी विमानतळासाठी 150 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. शिर्डी विमानतळावरून मालवाहतुकीसाठी तसेच रात्रीच्या वाहतुकीच्या कामासाठ हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे राज्याल्या माल वाहतुक आणि इतर वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.
विमानतळासाठी मोठ्या घोषणा
कोणत्या विमनातळासाठी किती कोटी?
- शिर्डी विमानतळावरून मालवाहतूक आणि रात्रीची वाहतूक सुरू होणार, त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- शिर्डी विमानतळाच्या विकास कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
- रत्नागिरी विमानतळाचे बांधकाम आणि भूसंपादनासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
- अमरावती विमानतळावरून रात्रीची उड्डाणे, नवीन टर्मिनलची उभारणी आणि धावपट्टीचे रुंदीकरण यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- कोल्हापूर विमानतळासाठी भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.
- गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारणीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही अजित पवारांनी सांगितले आहे.
- राज्यातील उद्योगांंना चालना देण्यासाठी नवीन विमानतळे आणि विमानतळांचा विस्तार हा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
- नवीन विमानतळांमुळे वाहतुकीचे जाळे आणखी मजवूत होणार आहे.
- महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे.
- विमान वाहतुकीच्या जाळ्याने महाराष्ट्र देश-विदेशाशी अधिक वेगाने जोडला जाणार आहे.
Maharashtra Budget 2022 LIVE Updates : 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प सादर