Maharashtra Budget 2022 : कळसूत्री सरकारने पंचसूत्रीच्या माध्यमातून विकास पंचतत्वात विलीन केला, बजेटनंतर फडणवीस आक्रमक

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Ajit Pawar)  हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सांगितले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnaivis)या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Maharashtra Budget 2022 : कळसूत्री सरकारने पंचसूत्रीच्या माध्यमातून विकास पंचतत्वात विलीन केला, बजेटनंतर फडणवीस आक्रमक
Devendra FadnavisImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 4:11 PM

मुंबई : राज्यांचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) आज सादर झाल्यांतर राज्याच्या राजकारणात जोरदार खडाखडी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Ajit Pawar)  हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे सांगितले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnaivis)या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्याच कामांची या सरकारने पुन्हा घोषणा केली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे राज्यातलं राजकारण पुन्हा तापलं आहे. कळसूत्री सरकारने विकासाचे पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे. सर्वांच्या तोंडाला काळं फसण्याचे काम या सरकारने केले आहे. हे बजेट विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटमध्ये काही नाही. चालू कामांच्या घोषणा या बजेटमध्ये केल्या, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू

तर मला एका गोष्टीचा आनंद आहे. पहिल्या वर्षात आमच्या योजना बंद करणारे सरकार आता पुन्हा त्या योजना सुरू करत आहे. समृद्धी महामार्गपासून मेट्रोपासून बुलेट ट्रेनला विरोध केला आणि आता पुन्ह घोषणा करत आहे.त्यामुळे हसावे की रडावे ते कळेना. असेही ते म्हणाले आहेत. शेतकऱ्यांसाठी दोन वर्षापूर्वीच घोषणा आज पुन्हा केली. गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कर्जखाती सांगितली नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. नुकसानाीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. कोरोनात सर्वात जास्त मृत्यू झालेले राज्य का पाट थोपटून घेतंय. असा सवालही त्यांनी केला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या करासाठी काही घोषणा नाही

तसचे काही घोषणा सोडल्या तर या अर्थसंकल्पाने काय दिलं नाही. देशातल्या बावीस राज्यांनी पट्रोल डिझेलचा कर कमी करून दिलासा दिला. पण राज्याची अर्थव्यवस्था चांगली असूनही पेट्रोल डिझेलचा कर कमी करण्यासाठी फुटकी कवडी दिली नाही. आता सायकल मोर्चा काढणार पटोले आणि काँग्रेस कोणता मोर्चा काढणार आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भासाठी काही दिलं नाही. मराठवाडा ग्रीडचा खून या सरकारने केला आहे. कुठल्याच घटकाला काही दिलं नाही. उत्तर महाराष्ट्र हे बजेटमध्ये दिसत नाही. ते नकाशावर आहे याचा विसर पडला आहे. केंद्र सरकाच्या योजना मात्र जोरात घोषित करण्यात आल्या आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारवर जोरदारर टीका केली आहे.

Maharashtra Budget : औरंगाबादेत 100 खाटांचे महिला रुग्णालय, वाचा मराठवाड्यासाठी 10 महत्त्वाच्या तरतुदी!

गडचिरोली पोलीस दलासाठी विशेष रुग्णालय स्थापन करण्यात येणार, अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 100 कोटी, अजित पवार यांची मोठी घोषणा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.