Maharashtra Budget 2022 : बजेटमधील चौथे सूत्र, दळणवळण सुविधांसाठी किती कोटींची तरतूद?
दळणवळणासाठीही मोठ्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. पंचसूत्रीत चौथे सुत्र हे दळणवलण आहे. यात सडक वाहतूक, समृद्धी महामार्ग, मेट्रो, जलमार्ग, विमान वाहतूक, अशा विविध योजनांसाठी भक्कम तरतुदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) मांडला. या अर्थसंकल्पातून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून अर्थ संकल्पातून विविध योजनांवर अधिक भर देण्यात आला आहे. तसेच राज्यातील विविध महामंडळांसाठी भरीव तरतूदही करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अंदाजात महसूली जमा 4,03,427 कोटी रुपये, महसूली खर्च 4,27,780 कोटी रुपये आणि महसूली तूट 24,353 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे. यात दळणवळणासाठीही मोठ्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. पंचसूत्रीत चौथे सुत्र हे दळणवळण (Transport Budget 2022) आहे. यात सडक वाहतूक, समृद्धी महामार्ग, मेट्रो, जलमार्ग, विमान वाहतूक, अशा विविध योजनांसाठी भक्कम तरतुदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर कळसूत्री सरकारने विकासाचे पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे. सर्वांच्या तोंडाला काळं फसण्याचे काम या सरकारने केले आहे. हे बजेट विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटमध्ये काही नाही. चालू कामांच्या घोषणा या बजेटमध्ये केल्या, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
पंचसूत्रीमधील चौथे सूत्र : दळणवळण
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 अंतर्गत 10,000 कि.मी. लांबीच्या रस्त्याकरीता 7500 कोटी रूपये तरतुद.
- 6550 कि.मी. लांबीच्या पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा-3 चा प्रारंभ.
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया,नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.
- 16039 कोटी रुपयांच्या नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन सुरु.
- मुंबईतील मेट्रो मार्गिका क्रमांक 3, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गिकेचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत.
- पुण्यातील स्वारगेट ते कात्रज व पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट मेट्रो प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु.
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 3000 नवीन बसगाड्या व 103 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसहाय्य.
- शिर्डी ,रत्नागिरी , अमरावती व कोल्हापूर विमानतळाची कामे गडचिरोलीला नवीन विमानतळ
- यामुळे राज्यातल्या वाहतूक क्षेत्रात क्रातिकारी बदल होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
- राज्यातील जनतेचा प्रवास वेगवान आणि सुखर बनवण्यासाठी या काही महत्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक, मोदींच्या कालच्या वक्तव्यानंतर घडमोडींना वेग
एसटी विलीनीकरणावरील सुनावणी आता 22 मार्चला! आज हायकोर्टात नेमकं काय घडलं?