Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांसाठी आनंदाची बातमी!! आता एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा

Maharashtra Budget news | अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

महिलांसाठी आनंदाची बातमी!! आता एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 2:49 PM

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) आज महिलांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा करण्यात आली. राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना तब्बल ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत प्रवास करताना महिलांना फक्त निम्मे तिकिट द्यावे लागणार आहे. राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार तसेच महिलांच्या सुरक्षित आणि सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यंटन धोरण तयार कऱणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केला. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांकरिता केंद्र सरकारच्या मदतीने ५० वसतीगृह स्थापन करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महिलांसाठी आणखी काय काय?

अर्थसंकल्पात महिलांसाठी करण्यात आलेल्या घोषणा पुढील प्रमाणे-

  1. – महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभारणार
  2.  कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर उभारणार
  3.  मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करणार
  4.  महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार
  5.  माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करणार
  6.  आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये करणार
  7.  गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करणार
  8.  अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये करणार
  9.  मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये करणार
  10.  अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये करणार
  11.  अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
  12.  अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली विकसित करणार
  13.  शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती करणार
  14.  अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबवणार. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देणार. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.