Maharashtra Budget : औरंगाबादेत 100 खाटांचे महिला रुग्णालय, वाचा मराठवाड्यासाठी 10 महत्त्वाच्या तरतुदी!

औरंगाबादसाठी 100 खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. हिंगोलीसाठी महत्त्वाची घोषणा म्हणजे येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे हिंगोलीतील प्रसिद्ध असलेल्या दर्जेदार हळदीला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पातील मराठवाड्याकरिता असलेल्या महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे-

Maharashtra Budget : औरंगाबादेत 100 खाटांचे महिला रुग्णालय, वाचा मराठवाड्यासाठी 10 महत्त्वाच्या तरतुदी!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 4:46 PM

औरंगाबादः कोरोना संकटामुळे आरोग्य यंत्रणेसोबतच कृषी, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रावरही मोठा दुष्परिणाम झाला आहे. देशासह महाराष्ट्र आता या संकटातून सावरत असताना अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारतर्फे 2022-23 या वर्षासाठीचा महत्त्वाचा अर्थसंकल्प आज सादर केला. अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2022-23)औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. यात औरंगाबादसाठी 100 खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. हिंगोलीसाठी महत्त्वाची घोषणा म्हणजे येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे हिंगोलीतील प्रसिद्ध असलेल्या दर्जेदार हळदीला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पातील मराठवाड्याकरिता असलेल्या महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे-

  1. औरंगाबादेत 100 खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापन केले जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात अशी रुग्णालये उभी केली जाणार असून मराठवाड्यात बीड आणि औरंगाबादचा समावेश यात आहे.
  2. जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 2022-23 या वर्षात आरोग्य विभागात कार्यक्रम खर्चाकरिता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला 3 हजार 183 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
  3. हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. हिंगोलीमध्ये सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेतले जाते. केवळ उत्पादनच नाही तर प्रक्रिया उद्योग उभारणीच्या अनुशंगाने हे संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. यामुळे हळदीपासून निर्माण होणाऱ्या सौदार्यप्रसाधनाला वेगळेच महत्व येणार आहे.
  4.  परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाला 50 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या कोकण विद्यापीठाला संशोधनाकरिता 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  5. कर्क रुग्णांवर वेळेत निदान उपचार होण्याकरिता, 8 आरोग्यमंडळांसाठी 8 मोबाइल कर्करोग निदान वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  6. महानगरातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा ग्रामीण भागातील जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शिवारोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेली मेडिसीन केंद्र स्थापन करण्यात येईल. पुढील टप्प्यात ही सेवा उपजिल्हा रुग्णालयापर्यंत विस्तारीत करण्यात येईल.
  7. औरंगाबाद येथील अमृतमहोत्सवी वंदे मातरम् सभागृहांकरीता 43 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  8. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी 75 कोटी रुपये. स्मारक
  9. खरिपात विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनचे भरघोस उत्पादन घेतले जाते. या वाढीव उत्पादनाचा विचार करीता विशेष कृती योजना राबवली जाणार असून यामाध्यमातून बाजारपेठे आणि उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याकरिता 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  10. देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा

इतर बातम्या-

दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी, सासरच्या विरोधामुळे सहा वर्षांच्या लेकासह पोलिसात धाव

Maharashtra Budget 2022: राज्यातील 16 जिल्ह्यात महिला स्पेशल हॉस्पिटल उभारणार, अजित पवार यांची मोठी घोषणा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.