Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget | अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटींची तरतूद

महाविकास आघाडी सरकारनंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

Maharashtra Budget | अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटींची तरतूद
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 2:26 PM

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज प्रथमच अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पाच्या (Budget) सुरुवातीलाच हा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी महत्त्वाचा असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्याचे निर्मिती करण्यासाठी शासनाची पुढील वाटचाल असेल, त्यामुळे येत्या 2 ते 9 जून 2023 या काळात शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. महाविकास आघाडी सरकारनंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

संभाजीनगरसाठी काय घोषणा?

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दृकश्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्याने विकसित करण्यात येतील या उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवन गाथा प्रदर्शित करण्यात येईल यासाठी 250 कोटी रुपये निधी देण्यात येईल, असेही अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी सांगितलं.

आणखी काय घोषणा?

  • – महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवन चरित्रावर संग्रहालय उभारण्यात येईल शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनाकरता 300 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
  •  राज्याच्या जलद आणि सर्वसमावेशी विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी 36 हजार कोटीहून अधिकची तरतूद झाली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
  •  अमृत काळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून पंचामृत असा आहे, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. हे पाच अमृत पुढील प्रमाणे- अमृत- शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, दुसरे अमृत- महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसी सह सर्व समाज घटकांचा सर्व समावेशक विकास. तिसरा अमृत- भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास. चौथे अमृत- रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम युवा पाचवे अमृत- पाचवे अमृत पर्यावरण पूरक विकास
  •  राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती मधल्या काळात अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे लाभ घेण्यात आले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात येते ध्या न विक्री धनाची विक्री सातबारा उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022 23 साठी डीबीटी द्वारे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति एक तरी 15000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.