Maharashtra Budget 2024 LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थसंकल्पाबाबत काय म्हणाले?

| Updated on: Jun 29, 2024 | 9:53 AM

Maharashtra Assembly Budget Session 2024-25 LIVE Updates in Marathi : महायुती सरकारचं अंतरिम बजेट अर्थमंत्री अजित पवार सादर करत आहेत. या बजेटमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. या अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील..

Maharashtra Budget 2024 LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थसंकल्पाबाबत काय म्हणाले?
Maharashtra Budget Session 2024 LIVEImage Credit source: TV9 Marathi

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज अर्थमंत्री अजित पवार हे विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असून, त्या डोळ्यासमोर ठेवून या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात सर्व घटकांना सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. या अर्थसंकल्पात सरकार कोणत्या घोषणा करतंय, शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी काय योजना आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी २ वाजता हा अर्थसंकल्प सादर होणार असून राज्यातील विद्यार्थी, तरूण वर्गासाठी काय तरतुदी, काय घोषणा होतात, हे जाणून घेण्यासाठी जनसामान्य उत्सुक आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. अर्थसंकल्पासह अनेक महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Jun 2024 08:27 PM (IST)

    कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

    कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक परिसरात पाणी साचले आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.  तर कल्याणच्या म्हारळ गावात विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली आहे. तर कल्याण कोळशेवाडी लोकग्राम परिसरातील चाळीतील घराचे छत कोसळ्याने चार जण जखमी झाले आहेत.

  • 28 Jun 2024 08:03 PM (IST)

    L3 हॉटेलमधील व्हायरल झालेल्या व्हिडीओचे शूटिंग करणाऱ्या इसमाची ओळख पटली

    पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर येत आहे.  L3 हॉटेलमधील व्हायरल झालेल्या व्हिडीओचे शूटिंग करणाऱ्या इसमाची ओळख पटली आहे.  व्हिडिओ शूट करणाऱ्या त्या व्यक्तीची पुणे पोलिसांकडून चोकशी करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओचा शूट करणाऱ्या व्यक्तीचा पुणे पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. संबंधित व्यक्तीने आपल्या जबाबात स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी व्हिडिओ शूट केल्याची कबुली दिली आहे. चौकशी करून व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी सोडलं आहे. गरज पडल्यास त्या इसमाला पुणे पोलीस पुन्हा चौकशीला बोलावणार आहेत.

  • 28 Jun 2024 05:52 PM (IST)

    लखनऊमध्ये बनावट सीबीआय अधिकाऱ्याला अटक

    लखनौमध्ये बनावट सीबीआय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती डिजिटल अटक आणि धमकी देऊन फसवणूक करायचा. यूपी पोलिसांच्या सायबर क्राईम टीमने या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर 2 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

  • 28 Jun 2024 05:37 PM (IST)

    NEET वर उत्तर देण्यास सरकार तयार- धर्मेंद्र प्रधान

    NEET च्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की सरकार NEET वर उत्तर देण्यास तयार आहे. ते म्हणाले की, एनईईटीवर विरोधकांनी दिशाभूल करू नये. आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही. विद्यार्थी आणि पालकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची सरकार कटिबद्धतेने चौकशी करत असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. दोषींना सोडले जाणार नाही.

  • 28 Jun 2024 05:25 PM (IST)

    पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोठी बैठक, शाह-नड्डाही उपस्थित

    पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोठी बैठक होत आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. NEET पेपर फुटीवरून विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला असताना ही बैठक होत आहे.

  • 28 Jun 2024 05:08 PM (IST)

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची 5 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यानंतर आता त्यांची रांची तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सोरेन यांनी तेथे उपस्थित असलेल्या समर्थकांचे हात जोडून स्वागत केले.

  • 28 Jun 2024 04:41 PM (IST)

    “अर्थसंकल्प पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले”

    अर्थसंकल्प पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले आहेत. सरकार शब्द पाळणार, आजपर्यंत दिलेला शब्द पाळण्यात आला. अजित पवार हे शब्दाचे पक्क आहेत. शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षात 45 कोटींची मदत केली. शेतकरी, महिला आणि वारकऱ्यांसाठी भरीव निधी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 28 Jun 2024 04:08 PM (IST)

    अर्थसंकल्पातून महिलांचं सरकार असल्याची प्रचिती: सुशिबेन शहा

    राज्य सरकारने 2024 -25 अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्पात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सरकारने जाहीर केल्या. यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण, विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना आणि मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ अशा अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महायुती सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प महिला पूरक असल्याची प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या सुशिबेन शहा यांनी दिली आहे.

  • 28 Jun 2024 04:06 PM (IST)

    आजच्या अर्थसंकल्पात फक्त घोषणांचा पाऊस: नाना पटोले

    काँग्रेसच्या नाना पटोले यांनी राज्य सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावरुन जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस, असं नाना पटेलो म्हणाले आहेत.

  • 28 Jun 2024 03:55 PM (IST)

    एका बाजूने शेतकऱ्यांना लुटायचं आणि दुसऱ्या बाजूने उदारपणा दाखवायचा- उद्धव ठाकरे

    राज्यातील जनता विधानसभा निवडणुकांची वाट पाहत आहे.  एका बाजूने शेतकऱ्यांना लुटायचं आणि दुसऱ्या बाजूने उदारपणा दाखवायचा. शेतकऱ्यांच्या खतावर १८ % जीएसटी लावला गेलाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 28 Jun 2024 03:50 PM (IST)

    आजचा अर्थसंकल्प आश्वासनांचा महापूर- उद्धव ठाकरे

    लोकसभेत भाजपच्या आश्वासनांना कंटाळून जनतेते दणका दिला. जनता यांच्या थापांवर विश्वास ठेवेल असं वाटत नाही.  आजचा अर्थसंकल्प आश्वासनांचा महापूर आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 28 Jun 2024 03:40 PM (IST)

    अर्थसंकल्प झाल्यावर महाविकास आघाडीची बैठक सुरू

    अर्थसंकल्प झाल्यावर महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, नाना पटोले उपस्थित आहेत. अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे.

  • 28 Jun 2024 03:20 PM (IST)

    पुणे बर्बाद होण्यामागे सरकार जबाबदार- आमदार रवींद्र धंगेकर

    सरकार बोगस आहे, यांनीच पबला परवानगी दिली आत्ता तोडायचं नाटक करत आहे. यांचे लागे बांदे आहेत पबवाले, ड्रग्जवाले सगळ्यांसोबत हफ्ता घेतात. आता कारवाईचे नाटक करत आहेत. पुणे बर्बाद होण्यामागे सरकार जबाबदार असल्याचं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

  • 28 Jun 2024 03:15 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातील घोषणांच्या अंमलबजावणीसाठी पैसा आणणार कुठून? एकनाथ खडसेंचा सरकारला सवाल

    अर्थसंकल्पात अनेक प्रकारच्या घोषणा केल्या आहेत, पण त्याची अंमलबावणी करण्यास पुरेसा वेळ नाही. या अनेक घोषणांसाठी पैशांची मोठ्या प्रमाणात तरतूद केल्याचं सांगितलं. पण प्रत्यक्षात हा पैसा आणणार कुठून? असा सवाल एकनाथ खडसे यांनी सरकारला विचारला.

  • 28 Jun 2024 03:11 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : नवी मुंबईतील महापे येथे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारणार

    नवी मुंबईतील महापे येथे 25 एकर जागेत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित आहे. त्यात 3 हजार सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग घटकांचा समावेश असून 50 हजार कोटींची गुंतवणूक होईल. त्यातून 1 लाख रोजगार निर्माण होतील.

  • 28 Jun 2024 03:10 PM (IST)

    मातोरी गावात ओबीसी बांधवांवर दगडफेक झाल्याच्या निषेधार्थ सोनारी गावात कडकडीत बंद

    बीड जिल्ह्यातील मातोरी गावातील ओबीसी बांधवांनवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ परंडा तालुक्यात सोनारी येथे सकल ओबीसी बांधवांच्या वतीने रात्री रॅली काढत एक बंदची हाक देऊन सोनारी गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.यावेळी आठवडी बाजार देखील बंद ठेवण्यात आला.

  • 28 Jun 2024 03:05 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पेट्रोल, डिझेलचा दर कमी होणार

    पेट्रोलवरील कर 26 टक्के वरून 25टक्के करण्यात येणार आहे.  मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात जास्त होता. या बदलामुळे या तिन्ही महापालिकेतील पेट्रोलचा दर 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7  पैसे कमी होणार आहे.

  • 28 Jun 2024 03:02 PM (IST)

    Maha FM Budget 2024 : 2035 पर्यंत 1 लाख लोकसंख्या मागे 100 हून अधिक डॉक्टर निर्माण करावे लागतील

    उच्च शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ही योजना सुरु आहे. 2035 पर्यंत 1 लाख लोकसंख्या मागे 100हून अधिक डॉक्टर निर्माण करावे लागतील. त्यासाठी नवी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार. जालना, हिंगोली, परभणी, धाराशिव, वर्धा, सातारा, अलिबाग अशा विविध शहरांचा समावेश आहे. रायगड येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवे युनानी महाविद्यालय सुरु करण्यात मान्यता देण्यात येत आहे.

  • 28 Jun 2024 02:57 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : दारिद्र्य निर्मूलनासाठी, जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध

    दारिद्र्य निर्मूलनासाठी, जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तृतीयपंथी समुदायलाही राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे.

    राज्यातील 46 लाख 6 हजार शेती पंपधारक एवढे शेतकरी आहेत. साडे सात हॉर्ससपॉवर पर्यंत पंप चालवतात. त्यांचा पूर्णपणे वीज माफीचा निर्णय घेतला आहे. सरकारवर भार पडणार आहे

  • 28 Jun 2024 02:55 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : सिंधुदुर्ग स्कूबा डायव्हिंग केंद्र बनवणार

    सिंधुदुर्ग स्कूबा डायव्हिंग केंद्र बनवणार. संजय गांधी निराधार योजनेत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता 1500 रुपये मिळणार.

  • 28 Jun 2024 02:53 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : तुफानों में संभलना जानते है.. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांची शेरोशायरी

    तुफानों में संभलना जानते है

    अंधेरों को बदलना जानते है

    चिरागों का कोई मजहब नहीं है

    ये हर मेहफिल में जलना जानते है

    अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवारांची शेरोशायरी

  • 28 Jun 2024 02:49 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रबोधिनी गोवंडीत कार्यरत

    स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रबोधिनी गोवंडीत कार्यरत झाली आहे.

    राज्यात एक लाख लोकसंख्ये मागे 84 डॉक्टर आहे. आपल्याला हा आकडा 100 करायचा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय करण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

    रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे युनानी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. बुलढाण्यात आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे.

  • 28 Jun 2024 02:48 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : दरवर्षी 500 कौशल्य विकास केंद्र वाढवणार

    दरवर्षी 500 कौशल्य विकास केंद्र वाढवणार. मुंबई, पुणे, नागपूर, कराड, नाशिक येथील तंत्र शिक्षण संस्था मध्ये उपलब्ध करून देणार

    511 कौशल्य विकास केंद्र स्थापन केले आहेत. तेथे हजारो विद्यार्थी कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. बार्टी, सारथी, महा ज्योती, अमृत या संस्थांचे काम सुरू.2 लाख विद्यार्थ्यांना रोजरगारभिमुख प्रशिक्षण दिले आहे. 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार.

  • 28 Jun 2024 02:44 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : उपसा सिंचन योजनेसाठी ४ हजार कोटींची आवश्यकता

    १ हजार ५९४ कोटींचा प्रकल्प राबवणार. सांगली व पट्ट्यातील ७५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार.

    उपसा सिंचन योजनेसाठी ४ हजार कोटींची आवश्यकता आहे. वैनगंगा, नळगंगा तसेच गोसीखुर्द प्रकल्पात पाणी वळवण्याचे नियोजन आहे. अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागाला वळवण्याचा कार्यक्रम राबवणार.

    ४९ हजार कालवे पूर्ण झाले आहेत. ६५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना सुरु आहे.

  • 28 Jun 2024 02:42 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : गाईच्या दुधासाठी उत्पादकांना राहिलेले अनुदान दिले जाईल

    गाईच्या दुधासाठी 5 रुपयाचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय जाहीर. 1 जुलैपासून अनुदान दिले जाणार.

  • 28 Jun 2024 02:41 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : पशुधन हानीच्या भरपाईच्या रक्कमेतही वाढ

    पशुधन हानीच्या भरपाईच्या रक्कमेतही वाढ करत आहोत. १०८ प्रकल्पांना आत्तापर्यंत सुप्रमा देण्यात येत आहे .

  • 28 Jun 2024 02:39 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार

    मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान व कौशल्य विकास प्रकल्पा अंतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जाला तसेच मॉडेल आयटीआय जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ एका सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

    2023-24 मध्ये 95 हजार 478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे मुंबई गोवंडी येथे कार्यालय रोजगार केंद्र उभारण्यात आलेले आहे.

    राज्याच्या ग्रामीण भागात 511 प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधनाची काम करण्यासाठी सारथी, बार्टी तसेच इतर सामाजिक संस्थांना भरीव अनुदान.

  • 28 Jun 2024 02:38 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना जाहीर , अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

    शैक्षणिक संस्थातून 11 लाख विद्यार्थी पदवी घेतात. डिप्लोमा करणारे विद्यार्थी मोठे., त्यांना औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळणार. दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील अनुभव येण्यासाठी मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना राबवणार. दरवर्षी 10 हजार रुपये देण्यात येईल. त्यासाठी 10 कोटीची तरतूद करण्यात येईल. दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण दिलं जाणार आहे.

  • 28 Jun 2024 02:35 PM (IST)

    Maha FM Budget 2024 : भारत 2047 पर्यंत विकसित देश म्हणून उदयाला येईल – अजित पवार

    मोदी यांच्या नेतृत्वात सरकारच्या दूरदर्शी धोरणाने भारत 2047 पर्यंत विकसित देश म्हणून उदयाला येईल. त्यात भारताचं योगदान मोठं असणार आहे. भारत ही तिसरी मोठी अर्थ व्यवस्था होणार आहे. त्यात तरुणांचा वाटा असणार आहे. त्यासाठी आम्ही कौशल्य विकासाला पाठबळ देत आहोत. त्या अधिक परिणामकारक राबवणार.

  • 28 Jun 2024 02:34 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर

    मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. कृषी पंपांना मोफत वीज, लाभार्थी- 7.5 एचपी मोटर असलेल्या लहान, मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल.

    44 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 8.5० लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप दिले जाणार आहेत.

  • 28 Jun 2024 02:32 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : अंगणवाडी सेविका यांना 1 लाख रुपयांचा लाभ देण्यात येत आहे.

    अंगणवाडी सेविका यांना 1 लाख रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. बचत गटांच्या निधीच्या रक्कमेत 15 हजारांहून 40 हजार रुपये करण्यात येत आहे

  • 28 Jun 2024 02:30 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : वन्य प्राण्याच्या हल्यात मृत्यू झाल्यास २५ लाख रू देणार

    वन्य प्राण्याच्या हल्यात मृत्यू झाल्यास 25 लाख रू देणार… याआधी 25 लाख रूपये देण्यात येत होते, अर्थ संकल्पात घोषणा.

  • 28 Jun 2024 02:28 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या मुलींना शिक्षणात 100 टक्के फी भरण्याचा निर्णय

    व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना 8 लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंब्यातल्या मुलींना 100 टक्के फी भरण्याचा निर्णय

  • 28 Jun 2024 02:26 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : कापूस आणि सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये देणार

    कापूस आणि सोयाबीन पिकाचा राज्याच्या उत्पन्नात वाटा आहे. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नुकसान सोसावं लागलं होतं. आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मागेच कॅबिनेटने निर्णय घेतला होता. पण आचारसंहिता लागली होती. आता कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजार देणार आहे.

  • 28 Jun 2024 02:24 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी सरकार कटीबद्ध

    शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. एक रुपयात पिक विमा, गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान अशा अनेक योजना सुरू आहेत. एक रुपयात पिकविमा योजना सुरू राहणार.

  • 28 Jun 2024 02:22 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करणार

    विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना राबवणार. मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करणार. 25 लाख महिलांना लखपती दिदीचा लाभ देणार

  • 28 Jun 2024 02:21 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : राज्यातील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 10 हजार रुपये देणार

    आई योजना सुरू करण्यात आली आहे. त्यातून 10 हजार रोजगार निर्माण होणार आहे. महिला अत्याचाराची सुनावणी लवकर होण्यासाठी 100 विशेष न्यायालयांना निधी देणार. राज्यातील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 10 हजार रुपये देणार

  • 28 Jun 2024 02:19 PM (IST)

    Maha FM Budget 2024 : प्रत्येक कुटुंबाला 3 गॅस सिलिंडर मोफत, अजित पवार यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा

    महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. 52 लाख 16 हजार 400 कुटुंबांना लाभ मिळेल.

  • 28 Jun 2024 02:17 PM (IST)

    Maha FM Budget 2024 : हर घर नल, हर घर जलसाठी 1 कोटी 25 लाख 66 लाख घरांना नळजोडणी दिली

    जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ.हर घर नल, हर घर जलसाठी 1 कोटी 25 लाख 66 लाख घरांना नळजोडणी दिली राहिलेल्या घरांचे काम प्रगतीपथावर आहे.

  • 28 Jun 2024 02:15 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात 78 हजार कोटी उपलब्ध करून देणार

    शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान 10 हजार होते ते आता 25 हजार केलं आहे. स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात 78 हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • 28 Jun 2024 02:12 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : मु्ख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना लागू करणार

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत.महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबणासाठी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महा 1500 रुपये देणार. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी देण्यात येईल. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल

  • 28 Jun 2024 02:11 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार

    महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार. लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या.

  • 28 Jun 2024 02:08 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : 76 हजार कोटीच्या वाढवण बंदराला मंजुरी दिली

    एनडीएला बहुमत मिळालं आहे. सलग तिसऱ्यांदा सरकार आलं आहे. पंतप्रधानांचं अभिनंदन करतो. राज्याला सहकार्य करण्याची केंद्राने नेहमी भूमिका घेतली आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 76 हजार कोटीच्या वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. 10 लाख रोजगार निर्माण होणार आहे

  • 28 Jun 2024 02:06 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार आहोत

    वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार आहोत. प्रती दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देणार. देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी केली जाणार आहे,. मोफत औषध देणार आहोत. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

  • 28 Jun 2024 02:03 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात

    बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल…अभंग म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-225 चा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली.

  • 28 Jun 2024 01:53 PM (IST)

    Maharashtra Budget 2024 : राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीस सुरुवात, अर्थ संकल्पाला मंजुरी

    राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीस सुरुवात झाली आहे. शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठकीला सुरूवात झाली आहे. मंत्री मंडळ बैठकीत अर्थ संकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. थोड्याच वेळात अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

  • 28 Jun 2024 01:50 PM (IST)

    शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या , उद्धव ठाकरे यांची मागणी

    निवडणुकीतील आमचं नरेटिव्ह खोटं नव्हतं. महाराष्ट्राल ओरबाडून गुजरातला दिलं जातंय. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या , अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

  • 28 Jun 2024 01:41 PM (IST)

    अजित पवार होणार दाखल

    अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. अगदी थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर केला जाईल

  • 28 Jun 2024 01:31 PM (IST)

    अगदी थोड्याच वेळात सादर होणार आहे राज्याचा अर्थसंकल्प

    राज्याचा अर्थसंकल्प अगदी थोड्याच सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प अजित पवार सादर करण्यात येणार आहे.

  • 28 Jun 2024 01:20 PM (IST)

    मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात

    मुंबईच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. रात्रीपासूनच पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय.

  • 28 Jun 2024 01:11 PM (IST)

    धनंजय मुंडे यांनी दिली मोठी माहिती

    प्रवक्त्याने कसे बोलावे हे अजित पवार यांनी मिटकरी यांना सांगितले आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

  • 28 Jun 2024 01:10 PM (IST)

    शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवणी गाव बंद

    दगडफेक प्रकरणानंतर तिंतरवणी गाव कडकडीत बंद. मातोरी गावात काल झाली होती दगडफेक. दगडफेकीनंतर तिंतरवणी पूर्णपणे बंद

  • 28 Jun 2024 01:08 PM (IST)

    राज्य सरकार ड्रग्जवरील कारवाईचा सपाटा सुरूच ठेवणार

    कितीही आरोप केले तरी पब कल्चर, ड्रग्ज पेजवर कारवाई सुरूच राहणार. माझ्यावर टिका झाली तरी चालेल, असे सीएमने म्हटले आहे.

  • 28 Jun 2024 12:59 PM (IST)

    विना परवाना 27 पब चालतात, पोलीस आयुक्त झोपलेत का?- वडेट्टीवार

    “कोण पाठिशी घालत होतं, कुणाचा दबाव होता, हे सर्व समोर आलं पाहिजे. नमुने बदलण्यापर्यंतची हिंमत कशी जाते? यामागे कोणाचा हात होता, हे समोर आलं पाहिजे. विना परवाना 27 पब चालत होते. पोलीस आयुक्त झोपलेत का,” असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केलाय.

  • 28 Jun 2024 12:50 PM (IST)

    पुण्याचा उडता पंजाब झालाय- विजय वडेट्टीवार

    “पुण्याचा उडता पंजाब झालाय. राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही. नंबर नसताना ती गाडी पुण्याच्या रस्त्यावर फिरत कशी होती?”, अशा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला.

  • 28 Jun 2024 12:45 PM (IST)

    घटना गंभीर आहे, पण बदनामी करू नका- फडणवीस

    चूक करणाऱ्या पोलिसांचं निलंबन केलं. पुण्याचा उडता पंजाब झालं, हे म्हणणं योग्य नाही. घटना गंभीर आहे, पण बदनामी करू नका, असं फडणीवस म्हणाले.

  • 28 Jun 2024 12:40 PM (IST)

    पुणे कार अपघातप्रकरणी विधानसभेत फडणवीस काय म्हणाले?

    “आरोपीच्या वडिलांनी आणि आजोबांनी गाडीच्या चालकावर दबाव आणला. आरोपीचे वडील आणि आजोबांवर गुन्हा दाखल केला आहे. चालकाला दोघांनी एक दिवस घरात डांबून ठेवलं,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

  • 28 Jun 2024 12:35 PM (IST)

    ससूनमध्ये पैशाचा वापर करून न्याय ओरबाडण्याचा प्रयत्न- फडणवीस

    “गरीब-श्रीमंत असं काही नाही, न्याय सर्वांना समान आहे. पोलिसांनी मेडिकलला रात्रीच पाठवलं नाही ही पोलिसांची चूक आहे. ससूनमध्ये पैशाचा वापर करून न्याय ओरबाडण्याचा प्रयत्न झाला,” असं पुणे कार अपघातप्रकरणी देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.

  • 28 Jun 2024 12:30 PM (IST)

    पुणे कार अपघात प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं निवेदन

    “तीन लाख रुपये घेऊन डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलला. अपघाताच्या वेळी गाडीचा वेग 110 किमी होता. आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. अल्पवयीन असतानाही मुलाला वडिलांनी गाडी दिली. अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केलाय,” असं फडणवीसांनी सांगितलं.

  • 28 Jun 2024 12:20 PM (IST)

    विधानसभेत पुणे कार अपघाताचा मुद्दा

    पुणे कार अपघात प्रकरणावर विधानसभेत चर्चा झाली. “पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचं वय 17 वर्षे आहे. आरोपीला प्रौढ घोषित करावं अशी मागणी पोलिसांनी केली,” असं फडणवीस म्हणाले.

  • 28 Jun 2024 12:10 PM (IST)

    मोहन भागवत यांच्या हस्ते आशा भोसलेंवरच्या पुस्तकाचं प्रकाशन

    मोहन भागवत यांच्या हस्ते आशा भोसलेंवरच्या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं. ‘स्वरस्वामिनी आशा’ असं या पुस्तकाचं नाव आहे. आशा भोसले यांच्यावरील 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचं आणि दुर्मिळ छायाचित्रांचे हे पुस्तक आहे.

  • 28 Jun 2024 11:54 AM (IST)

    National News : हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर. झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. लोकसभा निवडणुकीआधी घोटाळा प्रकरणात ईडीने सोरेन यांना केली होती अटक.

  • 28 Jun 2024 11:40 AM (IST)

    Maharashtra News : कोल्हापूर, सोलापूरमध्ये हिंदू संघटनांच आंदोलन

    कोल्हापूर, सोलापूरमध्ये हिंदू संघटनांच आंदोलन. सकल हिंदू समाजाचे ठिकठिकाणी रास्ता रोको. पुण्यात महापुरुषांचा अवमान झाल्याने आंदोलन.

  • 28 Jun 2024 11:26 AM (IST)

    National News : आधी NEET वर चर्चा करा – राहुल गांधींची मागणी

    संसदेत आधी NEET परीक्षा घोटाळ्यावर चर्चा झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेत सहभागी व्हावं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी.

  • 28 Jun 2024 11:17 AM (IST)

    Maharashtra News : दुसरे मंत्री का उत्तर देतात? – विजय वडेट्टीवार

    विधानसभेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा. संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित, तरी दुसरे मंत्री का उत्तर देतात? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आक्षेप. निकष सांगू नका, राज्यातील शेतकऱ्यांना मदत करा. निकषाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.

  • 28 Jun 2024 11:13 AM (IST)

    Maharashtra News : जरांगे आहेत कोण? लक्ष्मण हाके

    “मनोज जरांगे पाटलांना उठ सूठ छगन भुजबळ दिसतात, काही झालं का भुजबळांवर आरोप करतात. दगडफेक कुणी केली त्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे, कायदा हातात घेण्याऱ्यांवर कारवाई करतील. जरांगे आहेत कोण? झुंडशाहीच्या बळावर लोकनियुक्त सरकारला काहीही करायला सांगता का? जरांगे जर या व्यवस्थेला वेठीस धरून मोडून तोडून काही करू नका” असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.

  • 28 Jun 2024 10:57 AM (IST)

    विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

    विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांचं आंदोलन करण्यात येत आहे. हातात गाजर घेत विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट आमदारांनी आंदोलन सुरु आहे.

  • 28 Jun 2024 10:50 AM (IST)

    संविधानाची प्रत घेऊन आमदार विधिमंडळात दाखल

    आमदार राजेश राठोड संविधानाची प्रत घेऊन विधानभवनात दाखल झाले आहेत. विधिमंडळाचं अधिवेशवन सुरु आहे. आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अशातच राजेश राठोड संविधानाची प्रत घेऊन विधानभवनात आलेत.

  • 28 Jun 2024 10:50 AM (IST)

    उरण रेल्वे स्थानक परिसरात पाणीच पाणी

    उरण रेल्वे स्थानकाच्या अंडरग्राउंडमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्या साचलेल्या पाण्यातच तरूण पोहण्याचा आनंद लुटत आहे

  • 28 Jun 2024 10:40 AM (IST)

    संजय राऊत यांचं मोठं विधान

    काल झालेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पुन्हा भाजपसोबत जाऊन आमचे हात अपवित्र करून घेणार नाही. विधानभवनात एकमेकांना नमस्कार करण्याची पद्धत आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

  • 28 Jun 2024 10:30 AM (IST)

    मातोरीतील दडडफेकीनंतर सुरेश धस घटनास्थळी दाखल

    मातोरी येथील घटनेनंतर माजी आमदार भाजप नेते सुरेश धस यांची गावाला भेट दिली आहे. काल सायंकाळी दोन गटात दगड फेक झाली होती. रस्त्याने जाताना घोषणाबाजी करत शिवीगाळ देखील करण्यात आली होती.तर मातोरी गावातील काही तरुण आणि समोरील तरुणांत बाचाबाची झाली. याचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांची गावकऱ्यांसोबत बैठक सुरू आहे.

  • 28 Jun 2024 10:15 AM (IST)

    यवतमाळमध्ये जोरदार पावसाची हजेरी

    यवतमाळमध्ये मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून पाऊस रिमझिम सुरू आहे. तीन ते चार दिवसानंतर पाऊस पडल्याने शेतकरी आनंदित आहे. पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप राहण्याची शक्यता आहे.

  • 28 Jun 2024 10:00 AM (IST)

    अनेक विमानांचे उड्डाण केले रद्द

    इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट वरच्या टर्मिनल 1 वरची अनेक विमान उड्डाण रद्द करण्यात आली आहे. छत कोसळल्यामुळे एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत. टर्मिनल वन वरून जाणारी तब्बल 28 विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहे.

  • 28 Jun 2024 09:50 AM (IST)

    शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील बागायती शेती आहे ज्यामध्ये ऊस फळबाग आहेत. पाऊस नाही त्यात विहिरीचे पाणी अटल्यामुळे शेतकऱ्यांना या बागायती पिकांना देण्यासाठी पाणी नसल्यामुळे शेतातील उभी पिके जळू लागली आहेत.

  • 28 Jun 2024 09:40 AM (IST)

    चार मुलांना अमानुष मारहाण

    इचलकरंजीतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चार मुलांना अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. मोक्यातून सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खंडणीची मागणी करत मुलांचे अपहरण करून बंद खोलीत अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • 28 Jun 2024 09:30 AM (IST)

    देवगिरी किल्ल्यावर पूजेला मनाई

    दौलताबाद किल्ल्यावरील भारत मातेची पूजा करण्यास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने बंदी घातली आहे.दौलताबाद किल्ल्यावरील जनार्दन स्वामींच्या 400 वर्षापासूनच्या पूजेलाही मनाई, गणेश मंदिर आणि भारत मातेची पूजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.संरक्षित स्मारक अधिनियम 1958 आणि नियम 1959 नुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे.पूजाअर्चा बंद करून शेकडो वर्षांची परंपरा खंडित करू नये अन्यथा आंदोलनाचा इशारा पुजाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी दिला आहे.

  • 28 Jun 2024 09:20 AM (IST)

    आर्थिक परिस्थिती खालावली, कर्जाचा वाढला डोंगर

    महायुती सरकारच्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प आहे. हे अंतरिम बजेट आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती खालवल्याचे दिसून येत आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. तर गुंतवणुकीत राज्य अव्वल स्थानी आहे.

  • 28 Jun 2024 09:10 AM (IST)

    पाच विद्यार्थ्यांवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला

    बोईसर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतो . काल संध्याकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या पाच चिमुकल्या विद्यार्थ्यांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला असून यानंतर या कुत्र्यांनी तीन पादचाऱ्यांवरही जीवघेणा हल्ला केला . या हल्ल्यामध्ये हे आठही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत .

  • 28 Jun 2024 09:00 AM (IST)

    सर्पदंशाने लहान मुलाच्या मृत्यू नंतर प्रशासनास जाग

    नाशिकमधील वटार सर्पदंश प्रकरणी दोन डॉक्टर निलंबित करण्यात आले आहे. लहान मुलाचा सर्पदंशाने मृत्यू नंतर प्रशासनास जाग आली आहे. मृत मुलाच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आरोग्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • 28 Jun 2024 08:44 AM (IST)

    अधिवेशन कालावधीत राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक

    अधिवेशन कालावधीत राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक होणार आहे.  आजच्या बैठकीत कुठले महत्त्वाचे निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या आठवड्यात सलग दुसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.

  • 28 Jun 2024 08:30 AM (IST)

    Maharashtra Budget 2024 : अजित पवार यांच्याकडून काल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर

    आज राज्याच्या अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये बेरोजगार तरूण, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता आहे. मराठा, ओबीसी. धनगर समाजाला सवलती मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

    अजित पवार यांच्याकडून काल राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला.

  • 28 Jun 2024 08:22 AM (IST)

    आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडणार

    आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडणार.  विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सर्व घटकांना सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

Published On - Jun 28,2024 8:21 AM

Follow us
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?.
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?.
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ.
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं.
T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार?
T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार?.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 'इतके' नगरसेवक शरद पवारांकडे जाणार
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 'इतके' नगरसेवक शरद पवारांकडे जाणार.
इंडिया टीममधील 'या' प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?
इंडिया टीममधील 'या' प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?.
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न.
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?.
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा...
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा....