Maharashtra budget session 2021 LIVE | शर्जील उस्मानीवर गुन्हा दाखल केलाय, अजित पवारांची विधानसभेत माहिती

| Updated on: Mar 12, 2021 | 7:41 PM

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. (Maharashtra Budget Session Day 4)

Maharashtra budget session 2021 LIVE |  शर्जील उस्मानीवर गुन्हा दाखल केलाय, अजित पवारांची विधानसभेत माहिती
Ajit Pawar

मुंबई :  महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session day 4 live updates) चौथा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर दिलं आहे. आज, विधिमंडळात दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Mar 2021 02:09 PM (IST)

    शर्जील उस्मानीवर गुन्हा दाखल केलाय, अजित पवारांची विधानसभेत माहिती

    शर्जील उस्मानीवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे – पोलीस तपास करीत आहेत. लोकांच्या भावना भडकविण्याचे काम कोणीही करू नये. कुणालाही पाठशी घातलं जाणार नाही. एक तथाकथित पत्रकाराने व्हाट्सएपच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे . त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एक सदस्य मंत्रालयाबाहेर आंदोलन करीत होते जिथे आंदोलक कमी होते, अजित पवारांचा राम कदम आणि अर्णव गोस्वामींना टोला

  • 04 Mar 2021 01:37 PM (IST)

    गंभीर आजाराने देशाला वेढलं होतं,केंद्राने निधी दिला की नाही यावर मला वाद घालायचा नाही : अजित पवार

    इतक्या गंभीर आजाराने देशाला वेढलं होतं. पॅरामेडिकल स्टाफ सहित सर्वच कोरोना योद्ध्यांचं आभार मानतो. राज्य सरकारने ज्या पद्धतींत काम केलं त्यामुळे 1 वर्षपूर्वी जशी भीती वाटायची तशी आता सर्वांना वाटत नाही. केंद्राने निधी दिला की नाही यावर मला वाद घालायचा नाही. नेत्यांनी लस घेतल्यामुळे आता लोक लस घेतायेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

  • 04 Mar 2021 12:56 PM (IST)

    सुधीर मुनगुंटीवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हक्कभंग

    सुधीर मुनगुंटीवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हक्कभंग – हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्याचे अध्यक्षांचे निर्देश – अजित पवार यांनी वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असं १५ डिसेंबर २०२० रोजी आश्वासन दिले होते – सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे

  • 04 Mar 2021 12:08 PM (IST)

    अन्यथा राष्ट्रपती राजवट लागल्यावर रडू नका, मुनगंटीवारांचा राज्य सरकारला इशारा

    विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आक्रमक

    विधासभा अध्यक्ष निवडीवरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विधानसभा नियमाबाहेर जाऊन काम करत असेल तर लक्षात आणून देणं काम आहे. सुधीर मुनगंटीवारांनी राज्य सरकारला इतिहास घडवायचाय का? 50 वर्षे राज्य करा पण संविधान मोडू नका. विधानसभा अध्यक्ष निवडीमध्ये 30 दिवसांचा गॅप ठेवू नका, अन्यथा राष्ट्रपती राजवट लागल्यावर रडू नका, असा थेट इशारा मुनगंटीवारांनी राज्य सरकारला दिला.

  • 04 Mar 2021 12:06 PM (IST)

    अध्यक्षाची निवडणूक का होत नाही, मुनगंटीवारांचा सभागृहात सवाल

    सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा विषय काढला, इतक्या दिवस अध्यक्षाची निवडणूक का होत नाही, मुनगंटीवारांचा सभागृहात सवाल, 30 दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले, अजून अध्यक्षांची निवडच नाही

  • 04 Mar 2021 11:04 AM (IST)

    कोविड सेंटरमधील महिलांवरील अत्याचारांवरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक

    कोविड सेंटरमधील महिलांवरील अत्याचारांवरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देत आहेत. अजित पवार यांनी संबंधित प्रकरणी बलात्काराची घटना घडली नाही, विनयभंगाची घटना घडलीय. डॉक्टरवर कठोर कारवाई केली जाईल. 31 मार्चपूर्वी कार्यपद्धती जाहीर केली जाईल, असं अजित पवार म्हणाले.

  • 04 Mar 2021 10:30 AM (IST)

    कोरोना काळातील भ्रष्टाचाराविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन

    कोरोना काळातील भ्रष्टाचाराविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन

  • 04 Mar 2021 10:27 AM (IST)

    विधिमंडळ अधिवेशनात आज काय घडणार?

    आज दोन्ही सभागृहांमध्ये 2020-21 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान घेतले जाईल. अशासकीय कामकाज देखील सुरु राहणार आहे.

  • 04 Mar 2021 10:27 AM (IST)

    विधिमंडळात पुरवणी मागण्यांवर चर्चा, विरोधक आक्रम होण्याची शक्यता

    विधिमंडळात पुरवणी मागण्यांवर चर्चा, विरोधक आक्रम होण्याची शक्यता

Published On - Mar 04,2021 2:09 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.