NCP Cabinet Minister 2024 : नव्या मंत्रिमंडळात अजितदादांचे किती शिलेदार? कोणाला मिळाला डच्चू?

आज मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला, नागपुरात नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे.

NCP Cabinet Minister 2024 : नव्या मंत्रिमंडळात अजितदादांचे किती शिलेदार? कोणाला मिळाला डच्चू?
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 6:40 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं. राज्यातील दोन प्रमुख पक्षात फूट पडली होती, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीच्या बाजूनं कौल दिला. त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. यावरून विरोधकांकडून महायुतीवर अनेकदा निशाणा देखील साधण्यात आला. अखेर आज हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

या दिग्गजांचा पत्ता कट 

दरम्यान अजित पवार यांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांना खंबीर साथ दिली होती. त्यांनी अनेकदा जाहीर सभेमधून अजित पवार यांची बाजू मांडली, शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. मात्र नव्या मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणखी एक मोठे नेते दिलीप वळसे पाटील यांना देखील वगळण्यात आलं आहे. उठावाच्या वेळी दिलीप वळसे पाटील देखील अजित पवारांसोबत ठामपणे उभे होते. मात्र नव्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या दोघांचा देखील पत्ता कट करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांची यादी 

हसन मुश्रीफ धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे आदिती तटकरे माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ मकरंद जाधव बाबासाहेब पाटील

इद्रनील नाईक

खातेवाटपाबाबत उत्सुकता 

दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, मात्र अजून खातेवाटप झालेलं नाही, त्यामुळे कोणाच्या वाट्याला कोणतं खातं येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.