रात्रीस खेळ चाले! महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, एकनाथ शिंदेंच्या पारड्यात कोणती मंत्रिपदं?

या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. येत्या १४ डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

रात्रीस खेळ चाले! महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, एकनाथ शिंदेंच्या पारड्यात कोणती मंत्रिपदं?
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 8:23 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर त्यांचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र शपथविधी सोहळ्याला एक आठवडा उलटल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यातच सध्या महायुतीत रात्री-मध्यरात्री अनेक बैठका पार पडताना दिसत आहेत. आता मंत्रिमंडळ विस्ताराची एक नवीन तारीख समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तिन्हीही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला किती मंत्रिपद द्यायची, कोणती मंत्रिपद कोणाला मिळणार यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत गृहमंत्रिपद कोणाला मिळणार यावरही शिक्कामोर्तब करण्यात आला.

महायुतीकडून मंत्रि‍मंडळाच्या विस्तारासाठी तारीख निश्चित

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १४ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. काल रात्री अमित शाहांसोबतच्या बैठकीत महायुतीने मंत्रि‍मंडळाच्या विस्तारासाठी तारीख निश्चित केली आहे. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना कोणकोणती खाते मिळणार यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार १४ डिसेंबरला होऊ शकतो. यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गृहखाते, महसूल खाते दिले जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास मंत्रालय देण्यात येईल. यासोबतच भाजप स्वत:कडे २० मंत्रिपद ठेवू शकते. तर शिंदे गटाला १२ आणि अजित पवार गटाला १० मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्तीत जास्त ४३ मंत्री असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार?

दरम्यान येत्या १६ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. महायुतीतील अनेक नेत्यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले आहे. शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी येत्या 16 डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खातेवाटप केले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे सांगितले आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.