मंत्रिमंडळ विस्तार : नवी 7 मंत्रिपदे, विखे-क्षीरसागरांना मानाचं पान?
अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळाबाबत सर्व निर्णय दिल्लीतूनच होत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात 7 मंत्रिपद नव्याने दिली जाऊ शकतात.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. इतकंच नाही तर अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. येत्या 14 जूनला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळाबाबत सर्व निर्णय दिल्लीतूनच होत आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात 7 मंत्रिपद नव्याने दिली जाऊ शकतात. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले जयदत्त क्षीरसागर, तसंच विजयसिंह किंवा रणजीतसिंह मोहिते पाटील यांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. विखे आणि क्षीरसागर यांना चांगली खाती मिळणार आहेत. तर 5 नविन खाती कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांना कृषिमंत्रिपद मिळण्याची चिन्हं आहेत. तर या विस्तारात 4 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत दिग्गजांची बैठक
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील आणि गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक होत आहे. रणजितसिंह मोहिते पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात हजर आहेत. संभाव्य भाजप पक्षप्रवेश आणि मंत्रिमंडळ विस्तार याबाबत चर्चा होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शिवसेनेच्या वाट्याला काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येण्याची शक्यता आहे. क्षीरसागर बीडमधील आहेत. मराठवड्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न होतील.
विधानपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते अॅड. अनिल परब यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते.
शिवसेनेकडून कोल्हापूरला मंत्रिपद?
मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या वाट्याला येणारी मंत्रिपद शिवसेनेकडून कोल्हापूरला देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि हातकणंगलेचे आमदार सुजीत मिणचेकर यांची नावं चर्चेत आहेत. या दोघांपैकी एकाचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित असताना शिवसेनेतील परिस्थिती.
सध्या शिवसेनेकडे पाच कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री पदे आहेत
- एकनाथ शिंदे, MSDRC ( सार्वजनिक बांधकाम) मंत्री, तसेच डॉ. दीपक सावंत यांच्या आरोग्य खात्याचा पदभार शिंदे यांच्याकडे आहे.
- सुभाष देसाई, उद्योग मंत्री
- रामदास कदम, पर्यावरण मंत्री
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री
राज्यमंत्री
- अर्जुन खोतकर
- रवींद्र वायकर
- दादा भुसे
- संजय राठोड
- विजय शिवतारे
संबंधित बातम्या
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या दोन, तर काँग्रेसच्या एका नेत्याला स्थान?
आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?
Ajit Pawar Exclusive : ‘मावळमधील पराभवाची जबाबदारी अजित पवारची’
Balu Dhanorkar | महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार नेमका कसा जिंकला?
राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, पृथ्वीराज चव्हाण अध्यक्षपदाच्या शर्यतीत
स्पेशल रिपोर्ट : वांद्रे ते वरळी, आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ कोण सोडणार?
महाराष्ट्राचा महापोल : उद्या निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातील चित्र काय?