Maharashtra Cabinet Expansion : नगरसेवक ते मंत्री, विद्यार्थीदशेत ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठात विजयी; कोण आहेत जयकुमार रावल?

शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपच्या एकूण 39 आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यापैकी 33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Maharashtra Cabinet Expansion : नगरसेवक ते मंत्री, विद्यार्थीदशेत ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठात विजयी; कोण आहेत जयकुमार रावल?
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 6:48 PM

मुंबई : गेल्या दहा दिवसांपासून प्रतीक्षा असलेला महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. नागपूरमधील राजभवनात तब्बल 39 आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपच्या एकूण 39 आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यापैकी 33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजप नेते आणि उपाध्यक्ष असलेल्या जयकुमार रावल यांचीही मंत्रि‍पदी वर्णी लागली.

राज्याचे माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे तब्बल चार वेळा निवडून आलेले आहेत. नगरसेवक ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. जयकुमार रावल हे नेहमी वादांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिले. जयकुमार रावल यांचा जन्म 16 जानेवारी 1975 रोजी दोंडाईचा, (तालुका-शिंदखेडा, जिल्हा-धुळे) येथे झाला. बी.कॉम., एम्.बी.ए.(यु.के.). पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व अहिराणी या भाषा त्यांना अवगत आहेत. रावल हे विवाहित असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शेती व उद्योग हे त्यांचे व्यवसाय आहेत. रावल हे 8-शिंदखेडा, जिल्हा-धुळे या मतदार संघातून चारवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांचे शिक्षण पंचगणी, मुंबई, पुणे आणि यु.के.मधील कार्डीफ युनिर्व्हसिटीमध्ये झालेले आहे. ते यु.के. मधील कार्डीफ विद्यापीठातून विजयी होणारे ब्रिटीशोत्तर पहिले विद्यार्थी आहेत.

ऐतिहासिक वारसा

रावल यांचे आजोबा सहकारमहर्षी दादासाहेब रावल व काका वृक्षमित्र बापूसाहेब रावल हे देखील आमदार होते. याशिवाय त्यांना ऐतिहासिक वारसा देखील लाभला असून ते खान्देशातील राऊळ या संस्थानिक कुटुंबातून येतात.

संस्था आणि पदे

स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे सचिव, राणीमाँसाहेब मनुबादेवी रावल सह. पतसंस्था लि. दोंडाईचाचे संस्थापक, चेअरमन, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, धुळे जिल्हा सहकारी बँक लिमिटेडचे संचालक आदी पदांवर ते कार्यरत आहेत.

वयाच्या 25 व्या वर्षी नगरसेवक

रावल यांच्या राजकारणाची सुरुवात नगरसेवकपदापासून झाली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ते दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते 2004 पासून ते आतापर्यंत विधानसभेचे सदस्य आहेत. 2004 मध्ये विधिमंडळ सदस्यांची युथ फोरम नावाने संघटना स्थापन केली. या फोरममध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, राम शिंदे, प्रणिती शिंदे, पंकज भुजबळ आदी सर्व पक्षीय आमदार होते. ते पंचायत राज समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती व क्रीडा धोरण समितीचे सदस्य होते. ऑक्टोबर 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली. जून 2015 पासून ते रोजगार हमी योजना समितीचे समिती प्रमुख आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार व रोजगार हमी योजना अशी महत्त्वपूर्ण खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद होते.

रावल आणि वाद

रावल हे विविध गुन्ह्यांमुळेही नेहमी वादात राहिले आहेत. त्यांच्यावर वकिलावर प्राणघातक हल्ला, जमाव जमवून दंगल घडविण्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, नगरसेविकेचे अपहरण, बँकेच्या कर्जवाटपात अफरातफर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आठ ते दहा गुन्हे होते. दोंडाईचा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. 2013मध्ये विधिमंडळात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकणी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

पक्षातील पदे

त्यांनी भाजयुमोचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम पाहिलं आहे. धुळे जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकारिणीतही आमदार रावल महामंत्री होते. त्यांच्याकडे कर्नाटक आणि राजस्थान या दोन राज्यांची जबाबदारी होती. गेल्यावर्षीच त्यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.