Maharashtra Cabinet Minister Swearing-in Ceremony LIVE : महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, नागपुरात जय्यत तयारी

| Updated on: Dec 15, 2024 | 11:26 AM

Maharashtra Cabinet Minister Swearing-in Ceremony LIVE Updates : आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Maharashtra Cabinet Minister Swearing-in Ceremony LIVE : महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, नागपुरात जय्यत तयारी
देवेंद्र फडणवीस

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Dec 2024 11:30 AM (IST)

    भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना मंत्री पदासाठी फोन

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय सावकारे यांना मंत्रिपदासाठी फोन आला असून भुसावळ मध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे दरम्यान संजय सावकारे यांना फोन येताच संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे व त्यांचे कुटुंबीय हे नागपूरकडे रवाना झाले आहेत. मंत्री पदासाठी सावकारे यांना फोन आल्याची माहिती स्वतः त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी दिली आहे.

  • 15 Dec 2024 11:20 AM (IST)

    शालिनी विखे पाटील यांनी केला आनंद व्यक्त

    आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॉल आला आणि त्यांनी मंत्री पदासाठी आमची वर्णी लागल्याचं जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे आनंदाचा उत्साहाचे वातावरण आहे सुजय विखे पाटील यांचा जो पराभव होता त्यातून आम्ही बरेच काही शिकलो आणि तरीदेखील आम्ही विजयश्री खेचून आणली कारण त्यांची काम जनतेकडे पोचलेली आहेत, असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी व्यक्त केले.

  • 15 Dec 2024 11:10 AM (IST)

    नागपूरात महायुतीच्या नेत्यांची जोरदार बॅनरबाजी

    सरकारच्या पहिल्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण नागपुरात महायुतीच्या नेत्यांची जोरदार बॅनरबाजी दिसून आली. होर्डिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन दिसून आले. महायुतीच्या विजयाचे कर्णधार म्हणून एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे एअरपोर्ट पासून विधानभवनापर्यंत मोठ-मोठे होर्डिंग आणि बॅनर्स तर चौका चौकात देवा भाऊ जो बोलता है वो करता है अशा आशयाचे देवेंद्र फडणवीस यांचेही मोठे होर्डिंग आणि बॅनर लागले आहेत.

  • 15 Dec 2024 11:00 AM (IST)

    रविंद्र चव्हाण भाजपा प्रदेशाध्यक्षपदी?

    या मंत्रिमंडळात रविंद्र चव्हाण यांना मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण त्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे.

  • 15 Dec 2024 10:53 AM (IST)

    Maharashtra News: सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीनंतर महायुतीनेही पुन्हा डावलले

    सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला अद्याप फोन नाही… 2014 साली सोलापूर जिल्ह्याला एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद दिले होते… मात्र 2019 नंतर सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद न दिल्याने सोलापूरकर नाराज… आमदार विजयकुमार देशमुख सलग 5 वेळा आमदार तर सुभाष देशमुख सलग 3 वेळा आमदार आहेत… मात्र तरीही सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे चित्र… अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाची मंत्रिपदाबाबत चर्चा होती… मात्र दोघांनाही अद्याप फोन न आल्याने सोलापूरकर नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहेत…

  • 15 Dec 2024 10:42 AM (IST)

    Maharashtra News: महाबळेश्वरचं तापमान 11.7° तर छत्रपती संभाजी नगरचं 10.6°

    राज्यात जळगाव शहरात सर्वात कमी ८.४, नगर ८.७ आणि नागपूरमध्ये ९.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर असलेल्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बुलडाणा, अकोला शहरांत तापमान १०.६ अंश होते. डिसेंबरमध्ये शहरात किमान तापमान प्रथमच १०.६ अंश नीचांकी पातळीवर गेले. यापूर्वी डिसेंबर २०२२ च्या पहिल्याच आठवड्यात १०.८ व त्यापेक्षा कमी तापमान गेल्याची नोंद आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये ११.७ अंश तापमानाची नोंद झाली.

  • 15 Dec 2024 10:30 AM (IST)

    Maharashtra News: जयकुमार रावल यांची मंत्री पदी वर्णी लागेल अशी माहिती…

    धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या वाट्याला आलेल्या सर्व जागांवर भाजपचा शत प्रतिशत विजय झाल्याने रावल यांना संधी… सलग 5 वेळा भाजपकडून आमदार, विक्रमी मताधिक्य मिळवून विजयी… एकेकाळी दोन्ही जिल्हे मिळून रावल हे एकटे भाजप आमदार होते… संघर्षातून दोन्ही जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्यात यशस्वी…

  • 15 Dec 2024 10:09 AM (IST)

    Maharashtra News: गंभीर रुग्णांना दिलासा, घाटीत वाढणार 100 व्हेंटिलेटर खाटा

    घाटी रुग्णालयात 100 व्हेंटिलेरच्या खाटा वाढणार आहेत. येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लवकरच 50 व्हेंटिलेटर खाटा कार्यान्वित होतील, तर गुरुवारी 50 खाटांच्या क्रिटिकल केअर युनिटच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. क्रिटिकल केअर युनिटची उभारणी 23 कोटी रुपयांच्या निधीतून होत आहे. यामध्ये मूलभूत सुविधा आणि यंत्रसामग्रीचा समावेश असून, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केला जाईल,असे डॉ.धानोरकर यांनी सांगितले.

  • 15 Dec 2024 09:53 AM (IST)

    मोदी ६५ वर्षातील असत्य बोलणारे पंतप्रधान – संजय राऊत

    विरोधी पक्ष राहू नये अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. मोदी ६५ वर्षातील असत्य बोलणारे पंतप्रधान आहेत. ज्यांच्यावर मोदींनी आरोप केले त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. ईडी-सीबीआय भाजपच्या घरी कधी गेली नाही – संजय राऊत

  • 15 Dec 2024 09:19 AM (IST)

    Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

    Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

    • छगन भुजबळ
    • आदिती तटकरे
    • अनिल पाटील
    • संजय बनसोडे
    • अजित पवार
    • मकरंद पाटील
    • नरहरी झिरवाळ
    • धनंजय मुंडे
    • सना मलिक
    • इंद्रनील नाईक
  • 15 Dec 2024 09:17 AM (IST)

    भाजपच्या ‘या’ नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ

    Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : भाजपच्या ‘या’ नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ

    • रविंद्र चव्हाण
    • नितेश राणे
    • मंगलप्रभात लोढा
    • आशिष शेलार
    • अतुल भातखळकर
    • शिवेंद्रसिंहराजे भोसले
    • गोपीचंद पडळकर
    • माधुरी मिसाळ
    • राधाकृष्ण विखे पाटील
    • चंद्रशेखर बावनकुळे
    • संजय कुटे
    • गिरीश महाजन
    • जयकुमार रावल
    • पंकजा मुंडे
    • अतुल सावे
  • 15 Dec 2024 09:14 AM (IST)

    शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

    Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

    • उदय सामंत
    • दादा भुसे
    • शंभूराज देसाई
    • संजय शिरसाट
    • भरत गोगावले
    • अर्जुन खोतकर
    • प्रताप सरनाईक
    • प्रकाश आबिटकर
    • विजय शिवतारे
  • 15 Dec 2024 09:13 AM (IST)

    दुपारी 4 नंतर राज्यपाल देणार नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ

    Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 :महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. सध्या कोणत्या पक्षातील किती आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी 4 नंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.

  • 15 Dec 2024 09:12 AM (IST)

    हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार

    Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : उद्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.

  • 15 Dec 2024 09:08 AM (IST)

    तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी, राजभवनात जय्यत तयारी

    Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. त्यामुळे सध्या नागपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Cabinet Minister Swearing-in LIVE : महाराष्ट्रात महायुती सरकारला बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी सरकार स्थापन केले. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारीख पे तारीख मिळताना दिसत होती. त्यातच आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील असं बोललं जात आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे यावेळी कोणाच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

Published On - Dec 15,2024 9:02 AM

Follow us
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.