महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा फैसला उद्याच ( बुधवारी ) होणार, विजय रुपानी काय म्हणाले पाहा ?

भाजपा प्रणित महायुतीला राक्षसी बहुमत मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात दहा दिवस उलटूनही नवीन सरकार स्थापन झालेले नाही. आता ५ डिसेंबरला महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. यापूर्वी उद्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाच्या विधीमंडळ नेत्याची निवड होणार असल्याने उद्याच मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होणार आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा फैसला उद्याच ( बुधवारी ) होणार, विजय रुपानी काय म्हणाले पाहा ?
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 1:52 PM

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल लागून दहा दिवस झाले आहेत. परंतू राज्याचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार याचा निर्णय झालेला नाही. या दरम्यान केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या विजय रुपानी यांनी एक महत्वाची घोषणा केलेली आहे. उद्या बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. आणि भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींना या संदर्भात कळवले जाईल. विधीमंडळ नेत्याच्या निवडीनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रात भाजपा प्रणित महायुतीला मोठा विक्रमी विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री पदाचे नाव निश्चित झालेले नाही.महाराष्ट्रात ५ डिसेंबर रोजी नवीन मुख्यमंत्री शपथ होणार आहे. त्यामुळे सर्वांची नजर उद्या होणाऱ्या भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीकडे लागली आहे. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपाने या बैठकीला केंद्रातून केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांना पाठविले आहे.

प्रथम हायकमानला निर्णय सांगू

‘मी मुंबईत जात आहे. निर्मला सितारमन या देखील मुंबईत मंगळवारी सायंकाळी येत आहेत. उद्या सकाळी ११ वाजता महाराष्ट्र भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्याआम्ही चर्चा विनिमय करु. त्यानंतर सर्व संमतीने विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड होईल. नावाची घोषणा करण्यापूर्वी पक्ष श्रेष्टींना कळविले जाईल. त्यानंतर नावाची घोषणा होईल. आमच्या पक्षश्रेष्ठींनी तिन्ही घटक पक्षांशी चर्चा केलेली आहे त्यामुळे यात काही अडचण नाही.सर्वकाही सुरळीत आणि सर्व संमतीने होईल, असे विजय रुपानी यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांचा हल्ला

महाराष्ट्रातील सत्तास्थापने होणाऱ्या दीरंगाई बाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री कसा काय ? गायब होऊ शकतो. महाराष्ट्रात खेळ चालून आहे. दहा दिवस झाले आहे. महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे.तरीही अजून मुख्यमंत्र्‍याचे नाव जाहीर करत नाहीत. आता पर्यंत राज्यपालाकडे सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नाही. हा सर्व दिल्लीचा खेळ आहे. महाराष्ट्रात ज्या मकर्टलीला चालू आहेत त्या दिल्लीतून चालत आहेत असेही ते म्हणाले.

दिल्लीत अजित पवार दाखल

या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती गिरीश महाजन यांनी काल ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे. त्यानंतर मिडीयाशी बोलताना गिरीश महाजन यांनी महायुती कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.

भाजपा ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नवीन सीएमच्या शपथग्रहण समारंभाच्या तयारीत मग्न आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीच्या तयारीचा आढावा देखील घेतला आहे. मुख्यमंत्र्‍यांच्या शपथविधीला चाळीस हजाराहून अधिक लोक उपस्थित रहाणार आहेत. शपथविधीला सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहाणार आहेत.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.