देवाभाऊंचा रेकॉर्ड अन् अजितदादांची हॅट्रिक…; आजच्या शपथविधीनंतर रचला जाणार इतिहास

Maharashtra CM Devendra Fadnavis DCM Ajit Pawar Swearing-in Ceremony : राज्यातील आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. वाचा सविस्तर बातमी...

देवाभाऊंचा रेकॉर्ड अन् अजितदादांची हॅट्रिक...; आजच्या शपथविधीनंतर रचला जाणार इतिहास
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 2:42 PM

राज्यात पुन्हा एकदा भाजप-महायुती सरकार सत्तेत येत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता जवळपास 12 दिवसांनी नव्या सरकारचा आज शपथविधी होणार आहे. 230 जागा जिंकत महायुतीने घवघवीत यश मिळवलं आहे. तर भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर काल भाजपची विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली. यात देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. आता आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्टपणे सांगितलं गेलं नसलं तरी सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. आजच्या शपथविधीनंतर दोन नवे रेकॉर्ड नोंदवले जाणार आहेत.

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांचा मुख्यमंत्री होणार

महायुती सरकारचा आज शपथविधी होणार आहे. राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत. आजच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांचा मुख्यमंत्री होणार आहेत. 2014 ला देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2019 ला त्यांनी पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र हे सरकार औटघटकेचं ठरलं. 2022 ला पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानंतर शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली.

आता 2024 ला देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत उपमुख्यमंत्री असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झालेली नव्हती. पण देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील, तेव्हा उपमुख्यमंत्री असणारे फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत.

अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 2010 ते 2012 या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री राहिले. 2012 ते 2014 या काळात अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. तर 2019 ला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे अजित पवारांनी उपमख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण हे सरकार केवळ औट घटकेचं ठरलं. काहीच तासात हे सरकार कोसळलं. त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. यावेळी उद्धव ठाकरे सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री झाले. पुढे 2023 ला अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. यावेळी ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. आतापर्यंत अजित पवार यांनी सहावेळी राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भुषवलेलं आहे. त्यामुळे सहा वेळा मुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड अजित पवारांच्या नावावर आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.