मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांना किती पगार मिळणार?; इतर कोणत्या सुविधांचा लाभ घेता येणार?
Devendra Fadnavis Salary after becoming Chief Minister : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आझाद मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना किती पगार मिळणार? इतर कोणत्या सुविधांचा लाभ मिळणार? वाचा सविस्तर...
देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री असणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 230 जागा महायुतीने यंदाच्या निवडणुकीत जिंकल्या आहेत. तर भाजप पक्ष 132 जागांवर विजयी झाला आहे. भाजपच्या या यशात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. काल भाजपची बैठक झाली. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची काल एकमताने निवड झाली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना किती पगार मिळणार आहे? इतर कोणत्या सरकारी सुविधांचा लाभ देवेंद्र फडणवीस यांना घेता येणार आहे? याबाबतची माहिती जाणून घेऊयात…
मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळणार?
राज्याचा राज्यकारभार चालवण्यासाठी राज्य सरकार मुख्यमंत्र्यांना वेतन देतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना 3 लाख 40 हजार रुपये वेतन मिळणार आहे. 2016 पर्यंत 2 लाख 25 हजार वेतन मुख्यमंत्र्यांना मिळत होतं. पुढे यात बदल करण्यात आला. याशिवाय मुख्यमंत्र्यांना इतर सरकारी सोई- सुविधांचा लाभ घेता येतो.
इतरही सुविधांचा लाभ
मुख्यमंत्र्यांना काही सरकारी सुविधा देखील पुरवल्या जातात. अर्थातत त्यांना राहण्यासाठी सोई- सुविधांयुक्त बंगला दिला जातो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा’ बंगला दिला जातो. याआधीच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी याच बंगल्यात वास्तव्य केलं आहे. या शिवाय त्यांना गाडी दिली जाते. त्यांना सरकारी संरक्षण असतं. फोन, वीज आणि प्रवासाच्या सुविधा त्यांना दिल्या जातात.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरला तरूण वयातच सुरुवात झाली. अवघ्या 22 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सर्वात तरूण महापौर बनले. मग ते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. भाजपचं प्रदेशाध्यक्षपद देखील देवेंद्र फडणवीसयांना सांभाळलं आहे. 2014 साली वयाच्या 44 व्या वर्षी ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2019 ला अजित पवारांसोबत त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली मात्र अवघ्या काही तासात हे सरकार कोसळलं. आता आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार की नाही?
मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच इतरही दिग्गज मंडळी उपस्थित असणार आहेत. यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही