मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद; पाच मोठे मुद्दे

CM Eknath Shinde Full Speech in Marathi on Maratha Kunbi Reservation : मराठा उपसमितीची मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील पाच मोठे मुद्दे, वाचा...

मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद; पाच मोठे मुद्दे
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 1:24 PM

मुंबई | 30 ऑक्टोबर 2023 : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. उपोषण सुरु आहेत. मोर्चे निघत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत असतानाच मराठा उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजासाठी निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेत आहेत.

1. 11 हजार 530 कुणबी नोंदी सापडल्या

न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली आहे. ही समिती मराठा समाजाच्या कुणबी असण्याचे पुरावे एकत्र करत आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत या शिंदे समितीने आज पहिला अहवाल सादर केला. यात 11 हजार 530 मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असल्याचं या समितीने उपसमितीच्या बैठकीत सांगितलं. या शिंदे समितीकडून 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. कागदपत्रांच्या पडताळणी केली जात आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

2. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नका

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. तर काही तरूणांनी मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं. मात्र मराठा तरुणांनी आत्महत्या करू नका. सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

3. दोन टप्प्याने आरक्षण देणार

मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देण्यात येणार आहे. क्युरेटिव्ह पिटीशन आणि शिंदे समितीच्या मार्गाने आम्ही हे आरक्षण देणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

4. उद्यापासून कुणबी सर्टिफिकेट देणार

उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उपसमितीची मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असा निर्णय झाला. उद्यापासून हा निर्णय लागू होईल. उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

5 . जरांगे पाटील यांना आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. कुणबी प्रमाणपत्राची मागणी तुम्ही केली आहे. त्यावर शिंदे समिती चांगलं काम करतेय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, वैद्यकीय उपचार घ्यावेत, असं आवाहन एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना केलंय.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.