Maharashtra New CM Government Formation : महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेबाबत मोठी अपडेट

| Updated on: Nov 27, 2024 | 9:52 AM

Maharashtra CM Eknath Shinde Resign Today LIVE Updates : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. आज 27 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra New CM Government Formation : महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेबाबत मोठी अपडेट
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 27 Nov 2024 09:52 AM (IST)

    Maharashtra News: नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक

    निवडणुकीच्या पराभवावर बैठकीत करण्यात आली चर्चा… शिवसेना मध्यवर्तीय कार्यालयात बैठक संपन्न मात्र बैठकीत प्रसार माध्यमांना करण्यात आली मनाई… येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्यासाठी ठरवण्यात आली रणनीती… नाशिक जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक… नाशिक जिल्ह्यात ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्व उमेदवार पराभूत… ठाकरे सेनेच्या पदाधिकारी बैठकीत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मोठी आर्थिक उलाढाल आणि ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा ठेवण्यात आला आरोप… महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरही ठाकरे गटाची नाराजी

  • 27 Nov 2024 09:35 AM (IST)

    Maharashtra News: नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी होण्याची शक्यता

    महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र व्यवहार करत केली होती मागणी… एकूण असलेल्या बूथ पैकी पाच टक्के बूथ वरील फेर मतमोजणी होण्याची शक्यता… फेर मतमोजणीसाठी एक बुथसाठी 40 हजार रुपये शुल्क आणि GST भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सुधाकर बडगुजर यांना पत्र… मतमोजणीनंतर अनेकांनी ईव्हीएम मशीनवर केली होती शंका उपस्थित… याच मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी देखील फेर मतमोजणीची केली आहे मागणी…

  • 27 Nov 2024 09:21 AM (IST)

    Maharashtra News: बंडखोर आता दिल्लीतल्या नेत्यांना घाबरत नाहीत – संजय राऊत

    बंडखोर आता दिल्लीतल्या नेत्यांना घाबरत नाहीत… सरकार स्थापनेबाबत अद्यापही संभ्रमच.. 26 तारखेची मुदत उलटून गेली… भाजपनं तयार केलेले बंडखोर त्यांच्याच नेतृत्वाला आव्हान देत आहेत… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे…

  • 27 Nov 2024 09:09 AM (IST)

    Maharashtra News: पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं व्हावे लाडल्या बहिणींची मागणी

    जळगावच्या मुक्ताईनगरात असंख्य लाडक्या वहिनींनी एकत्र येत नागेश्वर मंदिरात घातलं देवाला साकडं… केला दूध अभिषेक… लाडक्या बहिणींनी एक मुखाने केली मागणी, पुन्हा मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे व्हावे….

  • 27 Nov 2024 08:57 AM (IST)

    मटारच्या दरात घट

    नवी मुबंईच्या Apmc बाजारात मटारच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. दरही निम्म्यावर आले आहेत. Apmc बाजारात हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू झाला असून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रतिकिलो शंभरी पार केलेल्या हिरव्या वाटाण्याचे दर निम्यावर उतरले आहेत. मागील आठवड्यात घाऊक बाजारात प्रतिकिलो १००-१२० रुपयांवरून उपलब्ध असलेला वाटाणा आता ६०-७० रुपयांवर विक्री होत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही वाटाणा आवाक्यात आहेत.

  • 27 Nov 2024 08:45 AM (IST)

    आशियाई सिंह बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार

    बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणखी आशियाई सिंह दाखल होणार आहेत. गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणखी दोन आशियाई सिंह मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय उद्यानात सिंहाची जोडी आणण्यात आली होती. सिंहांच्या बदल्यात, SGNP सक्करबाग प्राणीसंग्रहालयाला वाघांची जोडी देईल. आशियाई सिंह प्रदर्शन आणि प्रजननासाठी आणले जात आहेत.

  • 27 Nov 2024 08:30 AM (IST)

    सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात १ हजार ४०० तर चांदीच्या दरात १ हजार ५०० ने घसरण झाली आहे. सोमवारी रोजी सोने एक हजार ३०० रुपयांनी तर चांदीच्या भावात एक हजार २०० रुपयांची घसरण झाली होती. दोन दिवसांत मिळून सोने व चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू २ हजार ७०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. सोन्याचे दर ७६ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर तर चांदी ८९ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. ऐन लग्न सराईत सोन्या चांदीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 27 Nov 2024 08:16 AM (IST)

    मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी म्हणून आमदारांची फिल्डिंग

    पुण्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळालं आहे. पुणे जिल्ह्यातील २१ पैकी १८ जागा महायुतीला तर केवळ दोन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंत्रिपदावर वर्णी लागावी, यासाठी भाजपसह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील इच्छुकांची संख्या वाढली आहे. महायुतीत कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार, याचे सूत्र अद्यापही निश्चित झालेले नसताना आपल्या आमदाराला मंत्रिपद मिळावं,  यासाठी जुळवणी सुरू झाली आहे.

महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेबाबत मोठी अपडेट… महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचं लक्ष आहे. काल 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपला. त्यानंतर आता महायुती सरकारचा शपथविधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. अश्विनी वैष्णव आणि भाजपचे दोन निरीक्षक महाराष्ट्रात येणार आहेत. तेव्हा नेता निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

Published On - Nov 27,2024 8:10 AM

Follow us
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....